माहिती हवी आहे ..

स्पा's picture
स्पा in काथ्याकूट
19 Oct 2010 - 1:42 pm
गाभा: 

पुढील महिन्यात " अजिंठा - वेरूळ " जाण्याचा बेत आहे ....
त्यासोबत " अंबेजोगाई - माहूरगड - पैठण - लोणार " असे करता येईल काय?
वरीलपैकी कोणती ठिकाणे जवळ आहेत?

औरंगाबाद वरून "लोणार" किती लांब आहे?

(इंटरनेट वर माहिती शोधण्याच्या प्रयत्न केला....

पण हे सगळे ३ ४ दिवसात करता येईल अशी माहिती मिळाली नाही...

कोणी यापूर्वी या ठिकाणांवर जाऊन आले आहे का?

)

प्रतिक्रिया

कुंदन's picture

19 Oct 2010 - 2:09 pm | कुंदन

औरंगाबादचे आमचे एक मित्र आहेत डॉ दिलीप बिरुटे. ते याबाबत मदत करतील असे वाटते.
त्यांना जर वेळ असेल तर ते गाईड म्हणुनही तुमच्याबरोबर येतील कदाचित.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Oct 2010 - 10:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अजिंठा दोन तास आणि वेरुळ दोन तासात पाहून होते. पण अजिंठा-वेरुळ पाहण्याच्या आवडीवर वेळ किती लागेल ते अवलंबून आहे. चांगला मार्गदर्शक मिळाला तर लेण्यातील शिल्पवैभव पाहण्यात मजा आहे. गाईड म्हणून यायला आवडले असते पण सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू असल्यामुळे जरासा बीझी आहे. पण भ्रमणध्वनीवर नक्की बोलूया...!

बाकी शरदरावांनी माहिती दिलीच आहे. त्यामुळे अधिक सांगण्यासारखे काही नाही.

-दिलीप बिरुटे

शरद's picture

19 Oct 2010 - 2:20 pm | शरद

औरंगाबादहून वेरुळ १५ कि.मी. एवढेच असल्याने लागणारा वेळ हा तुम्ही वेरुळ-घृष्णेश्वरला कितीवेळ घालवणार यावर अवलंबून आहे. सकाळी निघून, दोनही पाहून अजिंठ्याला रात्री पोचावे. सकाळी अजिंठा पाहून परत औरंगाबादला यावे. दुसर्‍या दिवशी लोणारला (सा. १२० मैल )जाऊन जालन्याला मुक्काम टाकावा. सकाळी लवकर निघून औंढ्या नागनाथ, परळी वैजनाथ, अंबे जोगाई करून रात्री उशिरा औरंगाबादला यावे. माहूरगडला जावयाचे असेल तर वाटेत मुक्काम टाकावा. एक दिवस वाढतो.तेथून पुण्याला येतांना पैठण वाटेतच लागते. ड्रायव्हर असेल व गाडी चांगली असेल तर फार त्रासाचे नाही. नाहीतर स्वत:चे दोन चालवणारे असतील तर उत्तम. (एक सल्ला : खरेदी नसेल व मुंबईला यावयाचे असेल तर पैठण सोडून द्या.)
शरद

स्पा's picture

19 Oct 2010 - 2:31 pm | स्पा

आणि लोणार बद्दल.............. माहिती?

शरद's picture

19 Oct 2010 - 6:55 pm | शरद

औरंगाबाद-जालना-लोणार साधारणत: ३ तासाचा प्रवास आहे. उल्कापाताने तयार झालेले जगातील तीन क्रमांकाचे सरोवर. प्रेक्षणीय. गावातील ३-४ देवळेही अप्रतीम आहेत. तुमचा सगळा प्रवास औरंगाबाद-औरंगाबाद ४ दिवसात बसेल.
मुंबई-औरंगाबाद जादा.
शरद

शरद..
मनापासून धन्यवाद....... :)

सुनिल पाटकर's picture

19 Oct 2010 - 9:20 pm | सुनिल पाटकर

-औरंगाबाद जवळ भद्रामारुतीचे सुंदर मंदिर आहे. हा मारुती झोपलेला आहे आणि त्याचे पाय मऊ आहेत. पैठण टाळू नका.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Oct 2010 - 9:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> त्याचे पाय मऊ आहेत.
म्हणजे कसे ? भद्रा मारुतीचे छायाचित्र असलेला दुवा.

-दिलीप बिरुटे

तर्री's picture

19 Oct 2010 - 11:27 pm | तर्री

औरंगाबाद ला जाताच आहात तर "देवगीरी " किल्ला पहाच . रामदेव राया च्या राज्याचा / लढाईचा ईतिहास माहित असेलच. जर महित नसेल , तर मात्र वाचून जावा . किल्या पहाण्याचा आनंद वाढतो .
अर्थाथ , सगळ्यांना ह्या मध्ये रूची असतेच असे नाही , हे जमेस धरून ही सांगतो ,किल्ला पहावा .

धन्यवाद...
देवगिरी आणि भद्रा मारुती नक्की पाहू........

तिथे गाईड दाखवतात तो चार टोकांचा खिळा नक्की पहा (या खिळ्यांच्या भौमितीक आकाराला tetractine म्हणतात, मराठीत काय प्रतिशब्द आहे माहीत नाही):

शत्रूचे सैनिक वा हत्ती किल्ल्याच्या आवारात प्रवेश करतील अशी परिस्थिती आली तर हे अणकुचीदार खिळे म्हणे इतस्ततः विखरून टाकीत असत. हा खिळा कसाही टाकला तरी त्याचं एक टोक उभं राहतं....

सुनील's picture

21 Oct 2010 - 2:31 am | सुनील

अरे वा! चार टोकी खिळ्याची कल्पना चांगली आहे.

पण फायदा काय? एवढं करूनही किल्ला गेलाच ना हातातून? म्हणे धान्याच्याऐवजी मिठाची पोती आली!

सरकारी धान्य खरेदीतील पहिला ज्ञात भ्रष्टाचार!!

ह्या सिझनमध्ये तिथे सीताफळे चांगली मिळतात!

साधा_सरळ's picture

22 Oct 2010 - 5:22 pm | साधा_सरळ

और॑गाबाद परिसरातील प्रसिध्द गोष्टी पाहण्यासाठी दीड-दोन दिवस पुरे आहेत का? अज॑ठा, वेरुळ, देवगिरी इ. ठिकाणे दाखवणारी एखादी चा॑गली सेवा असल्यास बरे होईल... अगदी लहान मुला॑ना घेऊन जाण्याची योजना आहे.

आगाऊ (in adnavce) धन्यवाद!