परवा गावाहुन येता येता वाटेत जळगाव लागले चहा करीता थांबलो तर मस्त भाजीची शेव दिसली म्हंटल चला घेउन जाउ शेव घरी आज भाजी केली होती तर वाटल डकवु या मि पा वर
शेव भाजी
साहित्य:
कांदे २+१
सुके खोब्रे ५० ग्राम
खसखस २ चमचे
धणे २ चमचे
जीरे १ चमचा
शेंगदाणे मुठभर
तीळ २ चमचे
लवंग ४
काळे मीरे ६-७
लाल तिखट २_३ चमचे
हळद १ चमचा
मिठ चवीनुसार
लसुण ५_६ पाकळ्या
आलं १/२ इन्च
कोथिंबीर मुठ्भर
तेल १/४ वाटी
पाणी गरजेनुसार
शेव २५० ग्राम
सोबत भाकरी,कांदा आणी लिंबु हवेच आणी तिखट सहन होत नसल्यास ताक किंवा दह्याची वाटी मस्ट
२ कांदे आणी खोबरे आचेवर खरपुस भाजुन घ्यावे
खसखस,जीरे,धणे,लवंग,मीरे,तीळ,दाणे सर्व कोरडे भाजुन घ्या
भाजलेले सर्व साहीत्य मीक्सर वर वाटुन घ्या
१ कांदा आणी कोथींबीर बारीक चीरुन घ्या
तेल तापवत थेवा
बारीक चीरलेला कंद आणी थोडीशी कोथींबीर फ़ोडणी ला घाला गुलाबी होऊ द्या
वाटण घाला आणी तेल सुटे पर्यन्त भाजा
तिखट हळद घाला २ मी परता
पाणी घाला आणी २-३ दणदणीत उकळ्या काढा मग मंद आचेवर १० मी उकळा
वाढताना आधी वाटीत शेव घेउन वरुन रसा घालावा वरुन कोथींबीर पेरावी
गरमा गरम शेव भाजी भाकरी सोबत खायला तयार
प्रतिक्रिया
20 Sep 2010 - 4:34 pm | इंटरनेटस्नेही
मस्त! टोन्डाला पाणी सुटले!
20 Sep 2010 - 4:35 pm | मेघवेडा
फोटो????
पण भाजी आमची अंमळ आवडती असल्याने पाकृ शेफ आहे, गच्चीवर वाळत टाकलेली नाही. ;)
तरी फोटोशिवाय पाकृंना मजा नाही. हे मी या ठिकाणी पुन्हा एकदा अधोरेखित करू इच्छितो!
20 Sep 2010 - 4:39 pm | सुनील
फोटो कुठाय?
भाजीची शेव वेगळी असते काय?
20 Sep 2010 - 4:46 pm | कुंदन
लै भारी पा़कृ.....
20 Sep 2010 - 4:48 pm | सहज
दिपालीतैंनी दिलेली फोटोसहीत शेव भाजी अजुन एक प्रकार. ह्यात पोहे घातले आहेत १ चमचा.
खाल्ले पाहीजे एकदा.
धन्यु.
20 Sep 2010 - 6:24 pm | गणपा
माझ्या आठवणी प्रमाणे बहुदा बिका काकाने पण फोटुसकट ही पाकृ टाकली होती मागे एकदा.
लिंकाळ्यांनो लिंक द्या रे. :)
मिपाच सर्च काय कामाच नाय बा (किंवा मलाच ते वापरायची पद्धत माहित नाही.)
20 Oct 2010 - 12:29 am | मराठमोळा
गणपाशेट,
>>मिपाच सर्च काय कामाच नाय बा (किंवा मलाच ते वापरायची पद्धत माहित नाही.
गुगल मधे मराठीत धाग्याचे नाव + मिसळपाव असे टाकल्यास पहिलिच लिंक तुम्हाला हव्या त्या धाग्यावर नेऊन ठेवते.
खुप वेळा अनुभव घेतला आहे. :)
25 Sep 2010 - 11:48 am | परिकथेतील राजकुमार
धाग्याचे शिर्षक वाचल्या वाचल्या आधी दिपालीतैच्या पाकृचीच आठवण झाली.
तिची पाकृ आली आणि लगेच २/३ दिवसांनी आमचा 'अपाचे कट्टा' झाला आणि त्यादिवशी अगदी लक्षात ठेवुन शेवभाजी खाउन बघितली होती.
20 Oct 2010 - 12:26 am | मराठमोळा
>>तिची पाकृ आली आणि लगेच २/३ दिवसांनी आमचा 'अपाचे कट्टा' झाला आणि त्यादिवशी अगदी लक्षात ठेवुन शेवभाजी खाउन बघितली होती.
शिवाजीनगर ला.. रात्री १ वाजता. :D
20 Sep 2010 - 5:01 pm | रश्मि दाते
फोटो ड्कवता येत नाही हो सोपी पध्त शोघा ना त्याची,
20 Sep 2010 - 5:25 pm | मितान
तोंडाला पाणी सुटले गं :)
शेवभाजीच्या जेवणात शेवटी दहीबुत्ती असली की तिखटाचा त्रास होत नाही..
20 Sep 2010 - 5:43 pm | मेघवेडा
दहीबुत्तीचीही पाकृ येऊ द्या.
20 Sep 2010 - 5:41 pm | मनि२७
फोटो कुठेय रश्मी????
शेवभाजी ची रेसिपी हवीच होती....
मस्त!!! फोटो चढव पण...
20 Sep 2010 - 6:13 pm | मराठमोळा
फोटु??????
खुप दिवस झाले शेव भाजी खाउन.. जिभेवर चव रेंगाळतेय..
पन फोटु द्या.. :)
20 Sep 2010 - 9:17 pm | शुचि
झणझणीत - खमंग - खरपूस - फर्स्टक्लास
20 Sep 2010 - 9:29 pm | दीपा माने
पाकक्रुती छानच आहे पण रश्मीताई ही शेव कशी असते? कारण शेवेचे खूपच प्रकार आहेत म्हणून विचारते आहे. क्रूपया कळवाल का?
20 Sep 2010 - 10:38 pm | रश्मि दाते
भाजीची शेव ही वेगळी असते,फरसाणाच्या दुकानात भाजीकरीता शेव मागावी,आणी घरी करणार असाल तर मोहन न घालता शेव पाडावि,जरा कड्क असावी म्हणजे वीरघळत नाही रश्यात टाकल्यावर
फोटो आहे हो पण आम्ही पड्लो माथ त्यामुळे चिकटवता आला नाही कुणी चिकटवुन देत असेल तर mail id dya पाटवते मी
21 Sep 2010 - 11:02 am | स्वातीदेव
छान. करुन पाहिली पाहिजे ही भाजी आता.
मेघवेडा, दहीबुत्ती म्हणजे दहीभातच त्याला फोडणी दिलेली असते फक्त.
21 Sep 2010 - 11:47 am | सुहास..
फोटो कुठेय रश्मी????
21 Sep 2010 - 5:05 pm | स्वाती२
कधी खाल्ली नाहिये. आता करुन बघेन.
22 Sep 2010 - 3:09 am | दिपाली पाटिल
वेगळी शेवभाजी छान आहे पण खानदेशी या भाजीत कध्धीच शेंगदाणे नाही घालत...
22 Sep 2010 - 9:18 am | स्वाती दिनेश
मला भारी आवडते शेवेची भाजी.. दिपालीने केलेली शेवेची भाजी आठवली.. आता लवकरच केलीच पाहिजे .
स्वाती
25 Sep 2010 - 12:02 pm | डावखुरा
:) :(
" width="200" height="200" alt="" />
25 Sep 2010 - 12:15 pm | डावखुरा
शेवभाजी चा फोटो "ईथे" पहा.....
25 Sep 2010 - 12:14 pm | अमोल केळकर
सुरेख पदार्थ
अमोल
19 Oct 2010 - 3:34 pm | आचारी
रश्मी ताई तोन्दाला पाणी सुटले !! पण आले लसुण ?????????? फक्त सगळे देतात म्हणुन दिले का?
19 Oct 2010 - 3:35 pm | आचारी
आले लसूणचे काय केले ते शेवट पर्यत नाही समजले
10 Dec 2010 - 7:39 am | निनाद मुक्काम प...
कशाला आठवण करून देता ताई अगदी मुंबईत आमच्या घरी बनते हो हि
बाकी खानदेश अन्याय झाला किंवा राजकारणात जास्त नसतो.खा आणि खाऊ घाला हीच शिकवण बाकी मुंबईत सामंत डेअरी चे दुध लोणी चक्क अस्सल चाळीसगाव