गुजरात चे मुख्यमंत्री नरेन्द्र मोदीना कुणीतरी आवरले पाहीजे.
सर्व महानगरपालीका चे निकाल लागले आणि प्रचंड मताधिक्याने परत त्यांनाच निवडून दिले. सामान्य लोकांच्या डोळ्यात धूळ फेकून मिळालेली ही मते आहेत.
अहमदावाद मध्ये झालेले बदल आश्चर्य कारक आहेत.
कसे चिकट्वायचे याचे मार्गदर्शन करावे.
----
काही उपाय सुचवावेसे वाटतात.
१. ही प्रगती सोहराबुद्दीन (एक आतंकवादी) याच्या हत्येकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून मुद्दाम घडवून केलेली आहे उद्देश शुद्ध नसल्यामुळे हे कौतुक हे अस्थायी आहे. (पुण्यातील बिआरटी ची जाहीरात का होत नाही? इतकी चांगली बससेवा केवळ जाहीरात नाही म्हणून मागे पडते आहे.)
२.भारताची अशी एकांगी एकाच राज्याची प्रगती होणे गैर आहे.त्यामुळे पुण्याचे विद्यमान खासदार ना त्या राज्याचे प्रभारी नेमावे
३.शक्य असेल तर ३५६ कलम लावून राज्य बरखास्त करावे.
४. गोध्रा लोक विसरत आहेत त्याची आठवण करून द्यावी.
५.सर्वात महत्वाचे म्हणज यापुढे कोणत्याही उद्योगला गुजरात मध्ये परवानगी देउ नये.
६. नानो प्रकल्प त्वरीत बंगाल ला शिफ्ट करावा.
७. गुजरात ची जाहीरात करण्यासाठी आलेल्या खर्चाची पूर्ण चौकशी करून मोदिना शिक्षा हो इ पर्यंत वेगळ्या वेगळ्या केसेस .....अगदी सुप्रिम कोर्टापर्यंत लढावे शेवट एकच मोदीना शिक्षा. बास
८. महाराष्ट्र, बिहार या राज्यांची प्रगती होई पर्यंत गुजरात मध्ये कोणत्याही प्रगती वर बंदी घालावी.
९. बरखा दत्त,वागळे यांना खास भत्ता देउन सर्व प्रकरण खोदून काढावे. अशी आज्ञा द्यावी.
एका जातीय वादी नेत्याला इतके महत्व देणे चुकीचेच आहे.
कळावे लोभ असावा.
प्रतिक्रिया
16 Oct 2010 - 9:02 pm | गणपा
आत्ताच पीपली पाहिलास का रे कापुसकोंड्या?.. ब्लॅक कॉमेडी, उपहास वगैरे म्हणतात तसल लिखाण आहे का हे? तस असेल तर वा वा चान चान.
मी मोदी/भजपा/काँ/राकाँ/शिसे/मनसे/डावे/उजवे/जद कुंणाचाच समर्थक नाही.
16 Oct 2010 - 9:33 pm | नितिन थत्ते
नाही बॉ. होऊ दे तिथली प्रगती अशीच. म्हणजे भय्ये इकडे न येता गुजरातमध्ये जातील आणि आपला प्रॉब्लेम सुटेल.
16 Oct 2010 - 11:04 pm | सुनील
सहमत!
हॅ हॅ हॅ!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
16 Oct 2010 - 9:41 pm | कापूसकोन्ड्या
भय्याना तिथे आमंत्रणच असते.
18 Oct 2010 - 12:51 pm | विजुभाऊ
महाराष्ट्रात भाषीक उतमात घालणारे मुजोर भय्ये गुजरातेत एकदम मवाळ गुजराती बोलतात हे महत्वाचे
गुजराती लोक त्यांच्याशी उगाचच हिन्दी बोलायच्या भानगडीत पडत नाहीत. हे देखील महत्वाचे.
गुजराती ही राष्ट्रभाषा नाही हे कोणताच गुजराती इतर गुजरात्याला पाटवून देत नाही हे ही महत्वाचे.
16 Oct 2010 - 10:51 pm | हुप्प्या
सर्वधर्मसमभाव, इतर धर्माविषयी बंधुभाव ही भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये आहेत.
केवळ ऐहिक प्रगतीकरता ह्या मूलभूत तत्त्वांना तिलांजली देणे म्हणजे महापाप आहे. भारताला ऐहिक प्रगतीला सर्वस्व मानायची पद्धत नाही. उप्र, बिहार, महाराष्ट्र इथे बघा. सर्वधर्मसमभावाकरता गरीबी पत्करली आहे, अनागोंदी पत्करली आहे पण मूळ गाभ्याला धक्का लावू दिलेला नाही. ही खरी आदर्श राज्ये!
युवराज राहुल गांधी यांचा भारतीय संस्कृतीचा अभ्यास विख्यात आहे. त्यांनी मोठे मर्मभेदक वक्तव्य केले होते. मोदी आणि मुशर्रफ ह्या दोघात काहीही फरक नाही. असे ते सुप्रसिद्ध वाक्य आहे. हे वाक्य सगळ्या भारतीय प्रजेने शिरोधार्य मानावे असेच आहे. इतक्या थोड्या शब्दात इतकी मार्मिक टीका अफाट बुद्धीवंतांनाच जमते. असो.
मलातर वाटते कसाब आणि मोदी हेही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एक मुख्यमंत्रीपदाच्या गादीवर असताना दुसर्याला मात्र फाशी हा अन्याय आहे. त्यामुळे अशा लोकांच्या फाशीला काँग्रेसने कायम लांबणीवर टाकणे समजू शकतो.
असो. कोळसा उगाळावा तितकाच काळा!
17 Oct 2010 - 1:38 am | चिंतामणी
मग त्याला ब्लॅक कॉमेडी म्हणा अथवा उपहासात्मक लिखाण म्हणा.
17 Oct 2010 - 2:04 am | बबलु
असेच म्हणतो.
एकदम झक्कास लिहिलंय कापुसकोंड्या शेठ.
होय होय ...ब्लॅक कॉमेडीच.
बाकी.... आपल्याकडे कधी होणार अशी पटापट कामे त्याची वाट पाहूया.
17 Oct 2010 - 2:09 am | बबलु
हे दुवे:-
http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/4/47/Ahmedabad_BRTS_Networ...
http://en.wikipedia.org/wiki/Ahmedabad_BRTS
17 Oct 2010 - 2:38 am | अविनाश कदम
आपण मराठी माणसांनी सुद्धा गुजरात मध्ये जायला काय हरकत आहे?
आपल्या सारख्या कष्टाळू माणसांची तिथे फार गरज आहे. मोदी आपलं स्वागतच करतील.
मराठी माणसांसारखी प्रामाणीक, कार्यक्षम व कष्टाळू माणसं जगात सापडायची नाहीत
17 Oct 2010 - 5:25 am | मराठमोळा
>>मराठी माणसांसारखी प्रामाणीक, कार्यक्षम व कष्टाळू माणसं जगात सापडायची नाहीत
हो. त्यामुळेच मराठी माणसांना/नावांना हिंदी सिनेमात नोकर, ड्रायवर, हवालदार अशी कामे मिळतात. आणि मुंबईमधे गुजराती व बाहेरच्या राज्यातले व्यवसायीक लोकं फार आदरने वागवतात.
असो,
मुद्द्याकडे वळुयात..
भारतातील सर्व राज्ये ही स्वतंत्र घोषीत करावीत, फक्त मिलिटरी/डिफेंस आणि राष्ट्रीय पातळीवर होणरे (उदा. कॉमनवेल्थ गेम्स वगैरे) खर्च हे प्रत्येक राज्याकडुन राज्याच्या उत्पन्नानुसार घ्यावेत. त्या राज्याची प्रगती, उत्पन्न/खर्च हे त्याचे त्यालाच पाहु द्यावेत. असे मला वाटते, बरेचशे प्रश्न सुटतील.
18 Oct 2010 - 8:08 am | llपुण्याचे पेशवेll
+१००० रे ममो.
मनातलं बोल्लास.
17 Oct 2010 - 7:52 am | तिमा
मी कामानिमित्त गुजरातमधे जात असतो. तिथली प्रगती थक्क करणारी आहे. मुख्य म्हणजे तिथली मुस्लीम प्रजाही मोदींच्या कारभारावर खुष आहे. त्यामुळे प्रचार केला नाही तरी गुजरातमधे मोदी कायम निवडून येतील. हा मोदींचा करिष्मा आहे, ह्यात भाजपाचे काहीच कर्तृत्व नाही.
17 Oct 2010 - 9:00 am | पिवळा डांबिस
हा मोदींचा करिष्मा आहे, ह्यात भाजपाचे काहीच कर्तृत्व नाही.
१००% सहमत!!!!
17 Oct 2010 - 10:38 am | गांधीवादी
पण खुद्द मोदींचे असे मत आहे कि,
त्यांना घडविण्यात लालकृष्ण अडवाणी ह्यांचा महत्वाचा सहभाग आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------
(असे काही विधान केले कि लेगेच खाली
"मी य्यावत्याव राजकीय पक्षाचा समर्थक/विरोधक नाही अशी म्हणायची सध्या फॅशन आहे." )
17 Oct 2010 - 10:53 am | नितिन थत्ते
आता हे अडवाणी कोण ????? ते गृहमंत्री होते ते का? पण त्यांची तर कधी कुठे विकास करण्याविषयी ख्याती नाही. विध्वंस करण्याबद्दल मात्र आहे. ते कसे विकास करणार्याला घडवतील ??
तुम्ही लालकृष्ण अडवाणींच्या बोलत असाल तर बरोबर आहे. अडवाणींमुळेच २००२ मध्ये मोदी बचावले. अन्यथा 'राजधर्म' न पाळल्याबद्दल त्यांची गच्छंतीच व्हायची होती. त्या बाबतीत अडवाणींनी मोदींना समर्थन देणे साहजिकच आहे.
18 Oct 2010 - 8:11 am | llपुण्याचे पेशवेll
लौकिकास साजेसा प्रतिसाद. बादवे कसला राजधर्म?
काँग्रेसवाले बोंबलतील तो?
18 Oct 2010 - 9:58 am | नितिन थत्ते
निशाणा चुकला पुपे !!!!
त्यावेळी राजधर्माची बात कॉंग्रेसने नव्हे तर बाजपेयींनी केली होती.
(वाचलेल्या बातम्यांप्रमाणे काँग्रेसचे हिंदू नेतेही संहारात सामील होते).
17 Oct 2010 - 10:40 am | सूर्य
(पुण्यातील बिआरटी ची जाहीरात का होत नाही? इतकी चांगली बससेवा केवळ जाहीरात नाही म्हणून मागे पडते आहे.)
हॅ हॅ हॅ....
हे वाक्य वाचुन गडाबडा लोळलो..
असो.
- सूर्य.
17 Oct 2010 - 10:56 am | गांधीवादी
>>हे वाक्य वाचुन गडाबडा लोळलो..
ह्या विषयीच्या बातम्या ऐकून, लोळून लोळून आमची हाडं खिळखिळी झाली.
पुण्यात BRT परवडत नाही, त्यामुळे आम्ही सध्या सायकल वापरतो.
18 Oct 2010 - 8:14 am | llपुण्याचे पेशवेll
पुण्यात BRT परवडत नाही, त्यामुळे आम्ही सध्या सायकल वापरतो.
सहमत. मी पण सायकल वापरतो. पण त्याचे कारण दिवाळीत फटाके वाजवायला मिळावेत म्हणून. दिवाळीत हुच्चभ्रू सुधारणावादी त्यांच्या सँन्ट्रोतून मला सांगायला येतात प्रदूषण बिदूषण. मग मी त्यांना सायकल दाखवतो आणि म्हणतो तो उपाय आहे प्रदूषण कमी करण्याचा. पहील्यांदा ते आचरणात आणा मग सांगा फटाके बिटाके. :)
17 Oct 2010 - 10:46 am | प्रिया देशपांडे
माझ्या काही गुज्जु मैत्रिणी मोदींच्या फॅनपण आहेत्.चांगली डेवल्प्मेंट केली आहे त्या माणसाने म्हणतात.
(महाराष्ट्रात असे मोदी कधी बनणार ह्या विचारात असलेली) प्रिया
18 Oct 2010 - 8:15 am | llपुण्याचे पेशवेll
त्यासाठी महाराष्ट्रात एक गोध्रा घडवावं लागेल.
18 Oct 2010 - 1:47 pm | गणपा
पुपे ९२ -९३ विसरलात का एवढ्या लवकर ?
:(
17 Oct 2010 - 5:19 pm | मदनबाण
या मोदींना महाराष्ट्राचा विकास करायला द्यायला हवे, ते शक्य नसेल तर निदान माझ्या ठाणे शहराचा विकास त्यांनी जरुर करावा, कारण ठाणे शहराचा विकास करण्यास भरपुर वाव आहे... ;)
१ )टीएमटी सारखी डब्बा बस सेवा अख्ख्या हिंदुस्थानात सापडणार नाही...
२) अख्या ठाणे शहरात फक्त आणि फक्त खड्डेच आहेत...खड्डा नसलेला रस्ता दिसल्यास त्याची लिमका बुक मधे नोंद करावी का ? असाव विचार सध्या करतोय. खड्डॅ न पडणारे रस्ते ठाण्यात बांधण्याचे मोठे आवाहन मला मोदींना करायचे आहे.
३) सिंमेंटच्या रस्त्याला पडलेले खड्डे फक्त आणि फक्त ठाण्यातच आहेत असे मला वाटते त्यामुळे मोंदींना इथे रस्त्यांची क्वालीटी कशी असावी हे दाखवुन देण्यास मोठी संधी आहे.
४) या शहरातल्या उड्डान पुलावर गाड्या उड्डान करतात ते पाहण्यासारखे असुन त्याचा अनुभव सुद्धा घेण्या सारखा आहे, ते थ्रील वगरै काय म्हणतात ते नक्कीच अनुभवता येते. तेव्हा मोदीना चांगले ब्रीज इथेले का गुजरात मधले असा प्रश्न देखील मला विचारायचा आहे.
५) बस सेवाच मुळी रद्दड असल्याने रिक्षावाले फार माजले आहेत, एखादी चौकशी समिती* नेमल्यास आणि त्याचा अहवाल* दिल्यास चांगली बस सेवा नागरिकांना मिळुन रिक्षा वाल्यांचा माज उतरवायची सुप्त इच्छा मनात असल्याने, अशा अहवालावर* मोदींचे अमुल्य मत घेण्याची इच्छा आहे...
६) ठाण्यातल्या नागरिकांना टोल भरल्या शिवाय कुठे जाता येत नाही, इतके टोल नाके या शहरा भवती आहेत, तेव्हा टोल नाक्याला कोणता पर्याय मोदींनी त्यांच्या राज्यात केला आहे का ? असे त्यांना विचारीन म्हणतो...
* :--- राजकारण्यांना चौकशी समिती नेमुन त्याचा अहवाल वाचायची फार हौस असते म्हणे... ;)
जाता जाता :--- झेंड्यांवर पैसा खर्च करण्यापेक्षा रस्त्यांवर पैसे खर्च करणे शक्य असेल काय ?
(भिकार रस्त्यांच्या ठाणे शहरात राहणारा )
17 Oct 2010 - 5:28 pm | नितिन थत्ते
त्याऐवजी तुम्ही गुजरातमधल्या (राष्ट्रीय किंवा राज्य) महामार्ग नसलेल्या रस्त्यावर फिरून त्यांची कोलिति पाहिली तर बर्याच प्रश्नांची उत्तरे मिळून जातील.
.
.
.
.
.
.(खोलात जाऊन पाहणारा)
17 Oct 2010 - 5:36 pm | मदनबाण
तुम्ही गुजरातमधल्या (राष्ट्रीय किंवा राज्य) महामार्ग नसलेल्या रस्त्यावर फिरून त्यांची कोलिति पाहिली तर बर्याच प्रश्नांची उत्तरे मिळून जातील.
थेत्ते चाचा सुचना चांगली आहे, ;) आता तुम्ही खोलात जाउन पाहता हे कळल्याने आपल्या ठाण्यातले रस्ते कसे आहे हे तुम्हाला विचारावेसे वाटते... ;)
बाकी ठाण्यातले (राष्ट्रीय किंवा राज्य) महामार्ग तुम्हाला कसे वाटतात ? यावर आपले अमुल्य मत जरुर द्यावे.
(भिकार रस्त्यातुन सध्या दुचाकी चालवणारा)
17 Oct 2010 - 5:47 pm | नितिन थत्ते
ठाण्यात एक राष्ट्रीय महामार्ग (मुंबई आगरा) आणि एक राज्य मार्ग (ठाणे गोडबंदर) आहे बहुधा. दोन्ही उत्तम स्थितीत आहेत (आणि नेहमी असतात).
जुना मुंबई पुणे महामार्ग (मुंब्रामार्गे) हा नेहमी खराब असतो. पण तो आता अॅबॅन्डन्ड समजावा.
अंतर्गत रस्त्यांवरील चौकांमध्ये पेव्हरब्लॉक ऐवजी मास्टिक अस्फाल्ट केले तर स्थिती सुधारेल. अर्थात ती तुलना देखील गैरलागू आहे कारण पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. ज्या भागात खूप पाऊस पडतो उदा. दक्षिण गुजरात (वापी, वलसाड वगैरे) तेथे रस्ते वारंवार खराब होतच असतात. मुंबई अहमदाबाद महामार्ग सुद्धा आत्ता या दिवसात वापी परिसरात उखडलेला आहे असे आमचा एक कलीग गेल्याच आठवड्यात म्हणाला.
17 Oct 2010 - 6:06 pm | मदनबाण
राज्य मार्ग (ठाणे गोडबंदर) आहे बहुधा. दोन्ही उत्तम स्थितीत आहेत (आणि नेहमी असतात).
थत्तेचाचा इथे तुमची खोली कमी पडलेली दिसत आहे...
गोडबंदर हे नाव घोडबंदर :--- जुन्याकाळी इथल्या बंदरावर घोडे उतरवले जात म्हणुन त्याचे असे नाव पडले आहे.(जवळच नागला बंदर देखील आहे जिथे मुंबई बॉब्मस्फोटासाठी वापरलेले गेलेले आरडीएक्स उतरवले गेले होते)
माझिवडा- कापुरबावडी इथुन घोडबंदर रस्ता सुरु होतो असे धरले जाते... त्याच माझिवड्याची हालत बेक्कार आहे, सध्या महामार्ग रुंदीकरणाचे कार्य चालु असुन नागरिकांची प्रवासात प्रचंड गैरसोय होत आहे.कापुरबावडी येथेही उड्डान पुलाचे काम गेले अनेक महिने चालुन कुठलीही प्रगती माझ्या नजरेस पडलेली नाही... (इथेच जवळपास १५ वर्षापूर्वी नियोजित उड्डानपुल अशी पाटी वाचल्याचे स्मरते...जो आता बांधायला घेतला असावा !!! )
याच कापुरबावडीला जिथे उड्डानपुलाचे काम चालु आहे तिथे रस्ता भिकार अवस्थेत आहे...आधी रस्त्यावर खडी टाकली, मग पेव्हर ब्लो़क बसवले आता त्यापेव्हर ब्लॉकवर थोडे फार डांबर देखील घातले आहे.
तत्वज्ञान विद्यापीठ पासुन मानपाड्या पर्यंत जो काही सिमेंटचा रस्ता बनवला आहे त्यात अनेक खड्डे असुन सध्या ते सिमेंटचे खड्डे डांबराने भरले गेले आहेत. पुन्हा मानपाड्याला उड्डान पुलाचे काम गेले अनेक महिने चालु असुन तिथेही काही प्रगती झालेली माझ्या दॄष्टीपथास पडलेली नाही.
17 Oct 2010 - 6:50 pm | कापूसकोन्ड्या
थत्ते साहेब ,
फक्त तुम्हीच बरोबर अर्थ समजू शकला.!!
अगदी बरोबर. गुजरातची प्रगती झालेली बघूनच एक जातीय वादी माणूस गादीवर येतो. म्हणूनच मी हा धागा काढला.
बंदी घातली पाहीजे असे म्हणूनच मी म्हटले.काही लोका नी त्याचा ब्लॅक कॅमेडी असा अर्थ घेतला.
सोहराबुद्दीन चे काय झाले? तो दहशत वादी असेलही पण पूर्ण चौकशी होउन मोदीना शिक्षा होइपर्यंत थांबता कामा नये.
मोदींच्या प्रगती ची जाहीरात केल्यामुळे युवराजांच्या गादीवर येण्यात अड्चण येउ शकते.
१..तुम्ही तुमचे मित्र गण किंवा इतर सोर्सेस शोधून गुजरातमधील ग्रामीण भागातले रस्ते आणि महाराष्ट्रातले शहरी रस्ते
यांची तुलना करावी. विषेशतः मुंबैतील रस्ते.
तसेच
२..गुजरातम्ध्ये कुठेतरी नक्की केव्हातरी विज जात असेलच ती शोधून दक्षिण मुंबै मध्ये कधीच विज जात नाही हे ठासून सांगा
बघा नक्की परीणाम होइल. सर्व गोष्टी विचार प्रक्रिये वर अवलंबून असतात.
धन्य वाद!
18 Oct 2010 - 10:21 am | नितिन थत्ते
मी छिद्रान्वेषण करीत आहे असे आपणास वाटत आहे.
विकास यांच्या या धाग्यात माझ्याखेरीज इतरांनीदेखील प्रतिकूल मते व्यक्त केली आहेत. आणि त्या धाग्यात मी अनुकूल मतेही व्यक्त केली आहेत.
तुमचा हा धागा फारच तिरकस आहे. "एवढा विकास होतो आहे आणि तरी लोक टीका करतातच कशी?" असा टोन आहे.
म्हणून निगेटिव्ह प्रतिसाद द्यावे लागले.
17 Oct 2010 - 7:42 pm | कापूसकोन्ड्या
थत्ते साहेब ,
फक्त तुम्हीच बरोबर अर्थ समजू शकला.!!
अगदी बरोबर. गुजरातची प्रगती झालेली बघूनच एक जातीय वादी माणूस गादीवर येतो. म्हणूनच मी हा धागा काढला.
बंदी घातली पाहीजे असे म्हणूनच मी म्हटले.काही लोका नी त्याचा ब्लॅक कॅमेडी असा अर्थ घेतला.
सोहराबुद्दीन चे काय झाले? तो दहशत वादी असेलही पण पूर्ण चौकशी होउन मोदीना शिक्षा होइपर्यंत थांबता कामा नये.
मोदींच्या प्रगती ची जाहीरात केल्यामुळे युवराजांच्या गादीवर येण्यात अड्चण येउ शकते.
१..तुम्ही तुमचे मित्र गण किंवा इतर सोर्सेस शोधून गुजरातमधील ग्रामीण भागातले रस्ते आणि महाराष्ट्रातले शहरी रस्ते
यांची तुलना करावी. विषेशतः मुंबैतील रस्ते.
तसेच
२..गुजरातम्ध्ये कुठेतरी नक्की केव्हातरी विज जात असेलच ती शोधून दक्षिण मुंबै मध्ये कधीच विज जात नाही हे ठासून सांगा
17 Oct 2010 - 9:57 pm | चिरोटा
ईतर पक्ष,विशेष करुन काँग्रेस,जनता दल प्रामाणिकपणे काम करुन मते मिळवतात? १९७१साली इंदिरा गांधी 'गरीबी हटाव' णार होत्या ना? २००४ साली मनमोहन सिंगांनी मुंबईचे शांघाय करण्याची घोषणा केली होती!!सध्या महाराष्ट्रात तिसर्यांदा निवडून आलेले आघाडी सरकार 'आम्ही काम करून निवडून आलो"असे म्हणू शकतील?
मोदी ह्यांनी गुजरात investor friendly बनवले आहे हे नाकारून कसे चालेल?ईतर राज्यांच्या मानाने गुजरातम्ध्ये व्यवसाय करणे सोपे आहे असे म्हंटले जाते.गुजरात बद्दल जे वाचले आहे त्यावरून तिकडे भ्रष्टाचार ईतर राज्यांच्या तुलनेत कमी असावा. मोदी ह्यांची प्रतिमा मनमोहन सिंग ह्यांच्यासारखीच अजूनतरी स्वच्छ आहे.(गोध्राचा अपवाद करता).
18 Oct 2010 - 1:04 pm | विजुभाऊ
ठाणे आणि पुणे म्हणजे महाराष्ट्र नव्हे.
नंदूरबार धुळे जळगाव अमरावती अमळनेर पाचोरा वडनेरा एकदा पाहून या कसल्या जब्बरदस्त सुधारणा झाल्या तिथे.
बार्शी उस्मानाबाद इथे तर विकासगङ्गा वहातेय नुसती.
17 Oct 2010 - 5:25 pm | चिंतामणी
मलाही असेच म्हणायचे आहे.
फक्त एक फरक करायचा.
ठाणे ऐवजी पुणे असे वाचावे.
18 Oct 2010 - 10:05 am | अविनाशकुलकर्णी
मोदींना कधी एकदा पंतप्रधान म्हणून बघतो असे झाले आहे....मोदी म्हणजे चमत्कार आहे....
18 Oct 2010 - 10:44 am | चिगो
लै वाईट माणुस आहे. त्यानी आमच्या जातभाईंची (सरकारी नोकर) वाट लावली आहे. "खायला-प्यायला" वाव ठेवला नाही. "ट्रांसपरेंसी" आणलीय म्हंणे मेल्यानं सगळ्या कारभारात.. आता उठसुट कोणीही नेटावर येवून माहिती मिळवू शकतो म्हणे. उपासमार सगळी.. जाऊ द्या. आमचा मराठी गडी असता तिथं, तर आतावरी धा वेळा खाली व्हढला असता.
;-)
18 Oct 2010 - 4:59 pm | सर्वसाक्षी
य माणसाची काही अघोरी कृत्ये
असहकार - स्वतःच्या पक्षकार्यकर्त्यांसह सर्व विजग्राहकांकडुन वापरत असलेल्या विजेचे पैसे वसूल करणे. आपल्याच पक्षातील एखाद्याचा पोरगा कारखाना चालवतोय तर द्यावी की थोडी वीज, पण नाही! हे कृत्य सहकाराच्या तत्वाला हरताळ फासणारे आहे
आमानुष वर्तन - एकदा तर याने समस्त आय ए एस मातब्बरांना रविवारी सकाळी सात वाजता अहमदाबादेतल्या कर्णावती क्लब येथे बैठकीसाठी बोलावले. काहींची कुरकुर कानावर जाताच 'मुख्यमंत्री येऊ शकतो तर अधिकारी का नाहीत ?' असा उद्दाम सवाल केला. आता अधिकारी म्हणजे काय माणसे नाहीत का? त्यांना आराम नको का?
कारस्थानी प्रचार - नुकताच मोरबीला गेलो होतो. राजकोट ते मोरबी तास - दिड तासाचा रस्ता. येताना प्रवासात (व त्या आधी कचेरीत ) झोप झाली असल्याने पुढील प्रवासात जागा होतो. ट्याक्षीवाल्याशी सहज चकाट्या पिटु म्हटल तर बेटा या माणसाचे गुणगान करत होता. आता 'इस्लामुद्दिन' नावाचा माणूस माणूस या धर्मांधाचे गोडवे कसे गाईल? म्हणजे त्याने अनेक खोटेच मुसलमान आपल्या स्तुतिसाठी तयार केले असावेत अथवा गरजु मुसलमनांना आमिष दाखवुन त्यांना आपल्या विषयी चांगले बोलायला नेमले असावे.
शेतकर्यांवर धोर अन्याय - सदर खेपेत प्रवासात सर्वत्र प्रचंड शेती दुतर्फा दिसुन आली. सोन्यासारख्या पाण्याची शेतात ओतुन नासाडी तर केलीच वर पीक जास्त आणुन शेतमालाचे भाव कमी होतील व शेतकरी नागवला जाईल यासाठीच हे कृत्य केले जात असावे.
विजेची उधळपट्टी - वेळोवेळी दिवे न घालवता ते अहोरात्र जाळुन विजेची नासाडी होताना दिसली.
अशी किती अपकृत्ये लिहावीत. एकुण माणूस फार भयंकर आहे.
18 Oct 2010 - 5:35 pm | गांधीवादी
>>विजेची उधळपट्टी - वेळोवेळी दिवे न घालवता ते अहोरात्र जाळुन विजेची नासाडी होताना दिसली.
संभ्रमित.