धूसर असेल तर ती स्पष्ट केली पाहिजे!
वैधानिक इशारा - धोका पुढे दीर्घ आणि काही लोकांच्या मते वैचारिक प्रश्न मांडणारे लेखन आहे. आपापल्या जबाबदारीवर वाचावे. डोक्याला त्रास झाल्यास गुंडोपंत जबाबदार नाहीत!
सध्या मिसळपाव वरील सिद्धहस्त लेखक आणि अभ्यासक धनंजय यांचे लेखन येत का नाही, असा प्रश्न पडला. थत्ते यांच्या कृपेने धनंजयच्या खरडवहीत त्याचे उत्तरही मिळाले. ते पुढील प्रमाणे -
सध्या संपादनाबद्दल आचारसंहिता फारच धूसर आहे. काही प्रमाणात तरी ती स्पष्ट झाली तर बरे.
सध्या कुठले लेख संयत असून अप्रकाशित होतील, कुठल्या ठिकाणी फक्त प्रतिसादच अप्रकाशित होतील, ते मला समजत नाही.
उगाच लांबलचक लेखा-प्रतिसादाच्या लिहिण्याची जोखीम का घ्या? म्हणून फक्त "अतिसुरक्षित" विषयांवरच येथे चर्चा करेन. तूर्तास "प्रेमकविता", "कवितांच्या वृत्ताबद्दल चर्चा" या विषयांवरचे लेख/प्रतिसाद उडणार नाहीत, याबद्दल खात्री वाटते आहे.
पुढे कधी धोरणांबद्दल आंतरिक ओळख होऊ लागली, तर राजकारण, संस्कृती, वगैरे विषयांना हात घालेन.
हे वाचून मी चाट पडलो आणि वाईटही वाटले. मिपा इतके उघडे वागडे (ओपन या अर्थाने) स्थळ जालावर नाही. असे असतांना धनंजय सारख्या संयत लेखकाला लेखनाला मुरड घालावी लागावी? मला हे आश्चर्यजनक वा
टते!
संपादनाबद्दल आचारसंहिता धूसर असेल तर ती स्पष्ट केली पाहिजे. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच संकोच नाही का? संपादकांच्या संपादनात किंवा सदस्यांच्या वावरात अशी कोणती कमी आहे?
धोरणात स्पष्टपणा आणणे इतके अवघड आहे का?
मी मागे उपक्रमावरही हा विषय काढला होता तेथे हे उपाय मी लिहिले होते आणि उत्तम प्रतिसादही आले होते.
मराठी संकेतस्थळांच्या पारदर्शकतेसाठी गुंडोपाय
एखादा लेख नाकारल्यावर तो पारदर्शक रितीने नाकारला आहे ही लेखकाला पटावे आणि एकूणच व्यवस्थापन पारदर्शक रितीने व्हावे यासाठी मला खालचे नियम नि मुद्दे सुचले.
सर्व लेख संपादन मंडळाच्या नजरेखालूनच प्रकाशनास जातील.
आवश्यक असल्यास मंडळ लेख संपादित/अप्रकाशित करेल.
लेखाचे संपादन झाल्यास, आपले म्हणणे मांडण्याचा लेखकाला हक्क आणि संधी दिली जाईल. यासाठी लेखकाला लेख कसा योग्य आहे हे मंडळाला पटवून द्यावे लागेल.
मंडळाच निर्णय अमान्य झाल्यास लेखकाला निरीक्षक समितीकडे जाता येईल. यासाठी लेखाच्या समर्थनासहित संपादकांच्या निर्णयाचे खंडन करणाऱ्या लेखासह अर्ज करावा लागेल.
निरीक्षक समितीचाही निर्णय मान्य नसल्यास प्रशासकांकडे जाता येईल. मात्र त्यांचा निर्णय अंतिम असेल.
संपादन मंडळ
मुख्य संपादक, सहसंपादक, लेखनिक, सचिव (आपण नाय बाबा लेखनिक होणार हा)
या मंडळामध्ये मध्ये ३/७/९/११ असे विषम सभासद असावेत.
याच्या ऑनलाईन बैठका व्हायला हरकत नसावी. मंडळाचे कामकाज सदस्यांना बैठका झाल्यावर खुले असेल.
संपादन मंडळाचे सदस्य होण्यासाठी पात्रता-
किमान ३ महिने सदस्यत्वाचे झालेले असावेत.
७५० शब्दांचे किमान ५ लेख प्रसिद्ध केलेले असावेत.
किमान १० चर्चां मध्ये साधक बाधक असा सहभाग दिसावा.
मंडळाचा कार्यकाळ ६ महिने (की एक वर्ष?) असा असावा. (किती असावा बरं?)
संपादना साठी वेळ देण्याची तयारी असावी. (कसा म्हणे?)
संगणकीय लिखाणाची सवय असावी. (हे कसे सिद्ध करणार बुवा?)
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे काही ग्राहक सौजन्याचे नियम माहीत असणे आवश्यक. (पाहू का रे गुंड्या तुझ्याकडे आं?)
या संपादक मंडळाच्या वर निरीक्षक समिती असावी.
संपादक मंडळात वाद झाल्यास किंवा लेखकांस संपादक मंडळाचा निर्णय मान्य नसल्यास निरीक्षक समिती काम सुरू करेल. तोवर हस्तक्षेप करणार नाही. (म्हणजे तोवर मुकाट गंमत पाहावी)
यात किती सदस्य असावेत?
निरीक्षक समितीवर सदस्य म्हणून जाण्यासाठी पात्रता
किमान ३ महिने सदस्यत्वाचे झालेले असावेत.
१००० शब्दांचे किमान ५ लेख "संदर्भांसहित" प्रसिद्ध केलेले असावेत.
किमान १० चर्चां मध्ये साधक बाधक असा सहभाग दिसावा.
संपादनासाठी वेळ देण्याची तयारी असावी.
संगणकीय लिखाणाची सवय असावी.
यांनाही ग्राहक सौजन्याचे नियम माहीत असणे आवश्यक आहे. (परत तेच?)
सर्व लेखनावर अंतिम निर्णय प्रशासकांचा राहील. (झालं! हे आहेच का वर अजून?)
सर्व मंडळांची निवड निवडणूकीने व्हावी. (हे ठीक आहे)
निवडणूकीचा जाहीरनामा आपापल्या खरडवही वर लावता येईल.सभासदाच्या सहमतीशिवाय व्यनिचा वापर करत येणार नाही. (किंवा करता येईल अशी सोय सभासदस्यत्व देतानाच करता येईल का?)
याविषयी आपल्याला काय वाटते?
यातून पारदर्शकता साधली जाईल का?
यात काय भर घालणी आवश्यक राहील?
(हे अती होते आहे का? पण मग इतर मार्ग काय?)
आपला
(नियमीत)
गुंडोपंत
------------------
या लेखावर साती यांनी कल्पना मांडली होती की, "www.sureshbhat.in इथे केलेल्या प्रयोगाप्रमाणे काही (विवादास्पद) लेख "विचाराधीन" या नावाखाली साठवून सदस्यांना आणि व्यवस्थापकांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात यावी. हा लेख साधारणतः एक ते दोन दिवस तेथे असावा आणि नंतरच त्याचे भवितव्य ठरवावे. या कालावधीत मूळ लेखकालाही 'हा लेख उडू शकतो त्यामुळे दुसरीकडे जपून ठेवावा' याची कल्पना येईल. "
तर शशांकरावांनी उत्तर दिले होते, "माझ्यामते ३ किंवा ५ सदस्यांची एक "संचालन समिती" असावी. संचालन समितीत जाळ्यावर आणि विविध संस्थळांवर वावरण्याचा प्रदीर्घ अनुभव असणार्या सदस्यांचा समावेश असावा. संस्थळाचे सर्व धोरणात्मक निर्णय या समितीने विचारांती आणि सर्वानुमते घ्यावेत. ५ ते ७ सदस्यांचे "संपादन मंडळ" असावे. यात जाळ्यावर आणि विविध संस्थळांवर वावरण्याचा अनुभव असलेले (शक्यतो वेगवेगळ्या टाइमझोन मधील) सदस्य असावेत. (संपादनासाठी वेळ, इच्छा आणि जाळ्याची जोडणी या गोष्टी गृहीत धरल्या आहेत.) दोन्ही समित्यांतील लोकांनी संपादनाचे धोरण निश्चित करावे. संपादनाचे सर्वाधिकार संपादन समितीकडे असतील आणि संचालन समिती त्यात हस्तक्षेप करणार नाही. आता हे मोठे चित्र ("बिग पिक्चर":)) झाले. पण काही प्रश्न अनुत्तरित आहेत. उपरोल्लिखित सदस्यांची नेमणूक कशी करावी? (मराठी संस्थळांवर वावरणारे आणि ह्या जबाबदार्या पार पाडू शकणारे लोक संख्येने मर्यादित असल्याने ही निवड फारशी अवघड असणार नाही पण तरीही) संपादन मंडळाच्या सदस्यांनी (जे वेगवेगळ्या ठिकाणी आणि टाइमझोनमध्ये आहेत) परस्पर संवाद कसा साधावा आणि निर्णय कसे घ्यावेत? इ. इ. (अर्थात ही फक्त कल्पना आहे यावर अधिक विचार होणे आवश्यक आहे.)
हे सर्व झाले संस्थळ चालवणार्यांसाठी, सदस्यांनी काय करावे? मला वाटते, आपण सदस्यांनी तारत्म्याने आणि स्वयंस्फूर्तीने कोणत्या संकेतस्थळावर कोणत्या स्वरूपाचे लेखन प्रकाशित करावे याचा निर्णय घेऊन त्याप्रमाणे वागणे हा योग्य उपाय आहे. अमुक एक लेखनप्रकार 'क' संस्थळाच्या धोरणाशी सुसंगत नाही पण 'ख' संस्थळावर प्रकाशित करता येतो हे माहीत असेल तर असे लेखन 'ख' संस्थळावरच प्रकाशित केले तर 'नरका'ची गरज भासणार नाही. तसेच लेख, चर्चाविषय आणि प्रतिसादात व्यक्तिगत संदर्भ, टीका इ. येणार नाही याची काळजी आपण प्रत्येकाने घेतल्यास 'आपापसात'ची गरज भासणार नाही. असे झाल्यास योगेशरावांनी म्हटल्याप्रमाणे कालांतराने संपादन मंडळाचीच गरज राहणार नाही :)
अवांतर - बराच विचार करूनही 'गुंडोपाय' सारखा शब्द सुचला नाही म्हणून प्रतिसादाला "विचार करण्यासारखे" असे म्हणावे लागले :)"
या उत्तरा प्रमाणेच मिसळपावावरील सध्याची रचना असावी असे दिसते.
मग तरीही घोळ कुठे आहे?
संपादकीय पारदर्शकता ही गोष्ट इतकी मोठी का बनते आहे की लेखकाला लिहावेसे वाटू नये?
-------------------------------------------------------
संपादक मंडळाने काय करावे, कसे करावे ह्याबद्दल सदस्यांनी विनाकारण टिप्पण्या करणारे लेखन करु नये हे धोरणात स्पष्ट लिहिलेले असतानाही हे लेखन इथे आले. संपादक मंडळाची भूमिका खाली प्रतिसादात मांडली आहे (चित्राताईंचा प्रतिसाद पाहावा.) सर्व सदस्यांना धोरणांची कल्पना यावी म्हणून हे लेखन वाचनमात्र करुन ठेवण्यात येत आहे. परंतु अशाच पद्धतीचा धागा यानंतर आल्यास तो तात्काळ अप्रकाशित करण्यात येईल. संपादकीय धोरण पुरेसे स्पष्ट झाले असावे अशी आशा आहे!
धन्यवाद!
-संपादक मंडळ
वर्गीकरण
प्रतिक्रिया
संपादकीय पारदर्शकता ही गोष्ट
सर्व लेख संपादन मंडळाच्या
चला म्हणाजे मिपाचे लवकरच भारत
धन्यु ...
डिस्क्लेमर
जाऊ द्या हो ...
-१००
पंतआजोबा काय झाले ?
धुसर
+१
हम्म
अतिशय संयत
तसा थोडा जुना मथळा आहे