गाभा:
मिसळपावचे पान उघडले की मला एक वाक्य दिसते
"अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ. येथे तुम्हा सर्व मराठीप्रेमींचं मनापासून स्वागत आहे."
माझ्या कडुन अनावधानाने हिंदी आणि उर्दु भाषेचा खुप गैर वापर झाला. माझे विचार मी लोकांपर्यंत पोचवुच शकलो नाही. मी काहितरी वेगळेपना निर्मान करण्याच्या नादात असे केले होते. पण संपादक मंडळाने मला माझी चुक निदर्शनास आनुन दिली. म्हनुन मी आता केवळ मराठीच लिहिन.
पण एक कुतुहल म्हनुन मला एक प्रश्न पडतो , की अभिव्यक्ति म्हनजे काय ? माझं मराठि तितकसं सॉलिड नाही आणि बरेच प्रश्न पडतात. त्यातला हा एक. तुम्हा जाणकार लोकांकडुन काहि विस्त्रुत प्रतिसादातुन काहितरी माहिति मिळेल अशी अपेक्षा ठेवतो.
आणि हो माझ्या जन्नत ए कलेजाला प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार करतो.
प्रतिक्रिया
10 Oct 2010 - 10:53 am | Nile
नक्की प्रश्न काय आहे?
(व्याख्या खाली दिली आहे)
अभिव्यक्ती स्वातंत्र्य: जे तुम्हाला होतं त्यामुळे इतके दिवस उई उई करायला मिळत होतं तुम्हाला.
जाता जाता खुळे पणाची वाख्यापण देतो.
खुळे पणा: चार लोकांमध्ये त्यां चारांपैकी एकालाही जी भाषा कळत नाही, किंवा ज्याभाषेत त्यांना संवादाची इच्छा नाही, त्याभाषेत सतत पिटपिट करणे.
10 Oct 2010 - 12:06 pm | सद्दाम हुसैन
धन्यवाद! आपण खुप सोप्या भाषेत समजुन सांगितल्याबद्दल आपला खुप आभारी आहे.
"अभिव्यक्ती स्वातंत्र्य: जे तुम्हाला होतं त्यामुळे इतके दिवस उई उई करायला मिळत होतं तुम्हाला. "
म्हनजे आता माझे अभिव्यक्ति स्वातंत्र्य काढुन घेतले आहे असे का म्हनायचे आहे तुम्हाला ?
10 Oct 2010 - 1:28 pm | Nile
माझे स्वातंत्र्य हिरावुन घेतले अश्या प्रकारचे करुण रुदन काढणारा धागा अजुन आहे याचा अर्थ काय आहे त्याचा तुम्हीच विचार करा. पण कुणाच्या खुळेपणाला वेसण घातले गेले तर ते योग्यच आहे. आता खुळेपणा आहे की नाही हे ज्याचे त्याला कळत नसेल तर पुढे बोलण्यात काही अर्थ नाही.
10 Oct 2010 - 11:59 pm | सद्दाम हुसैन
"माझे स्वातंत्र्य हिरावुन घेतले अश्या प्रकारचे करुण रुदन काढणारा धागा "
असा धागा मी काढल्याचा जावईशोध तुम्ही कसा लावला ? माझ्या धाग्यात तसा कुठेही उल्लेख दिसत नाही म्हणुन आपल्या खुळेपणाचे आश्चर्य वाटले.
"पण कुणाच्या खुळेपणाला वेसण घातले गेले तर ते योग्यच आहे."
सम्पादकांनी काही अयोग्य केले आहे असाही सुर मी लावला नाही. तुमचा खुळेपणा चालु द्या.
तुम्हाला इथुन पुढे इग्नोर केले जाईल :) आपली पिटपिट चालु राहु द्या. जमलं तर नाव मराठी घ्या .. ही मराठी साईट आहे ना ?
इन्द्रा , प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
"त्या चेष्टेच्या सुरातील 'उई उई' ची पुंगी वाजवली नसती "
माझ्या उई ने कोणाची चेष्टा झाली स्पष्ट कराल काय ? माझे लेखन वाचा एकदा परत :)
माझे मराठी शब्दांवर प्रभुत्व नसल्याने मी प्रांजळ प्रश्न विचारला होता. कारण पेज ओपन झाले की मला तो शब्द नेहमी दिसतो. आणि या वेळी माझ्या मनाप्रमाणे न लिहीता मराठी का लिहितोय याचं कारण आधी स्पष्ट केलं होतं , इतकंच !
संपादक मंडळाने काय करावं आणि काय नाही ह्यात मला लक्ष घालण्याची किंवा त्यावर मत नोंदवण्याची गरज वाटत नाही. इथे हिंदी उर्दु चालणार नाही हे कळलं ते मान्य आहे , विशय संपला आहे आणि कोणीही त्यावर खाजवुन खरुज काढु नये असे वाटते
11 Oct 2010 - 12:43 am | चिंतामणी
Nileला उत्तर देताना तु म्हणले आहेस की
"माझे स्वातंत्र्य हिरावुन घेतले अश्या प्रकारचे करुण रुदन काढणारा धागा "
असा धागा मी काढल्याचा जावईशोध तुम्ही कसा लावला ?"
सद्दाममीयॉ (तु सद्दाम नाहीस हे समजले असले तरी तु "सद्दाममीयॉ". असो.)
मियॉ, माझा पोस्ट (जो तुझ्या पोस्टच्या २३तास आधीचा आहे, ११.०४ वाजताचा आहे) तो पुन्हा एकदा वाच.
तुला इँग्लीश येत असेल हे माहीत आहे. पण तु घेतलेल्या अवतारामुळे तुला समजेल अश्या भाषेत लिहीतो.
"तुम्ही थोड्या लोकाना दिर्धकाळ मुर्ख बनवु शकता. खूप लोकाना काही काळ मुर्ख बनवु शकता. पण तुम्ही सगळ्या लोकाना कायमचे मुर्ख बनवु शकत नाही".
10 Oct 2010 - 11:04 am | चिंतामणी
अभिव्यक्ति स्वातंत्र्याची नक्की काय व्याख्या आहे ?
हा प्रश्ण ज्या प्रकारे विचारला आहे ते बघता ती व्याख्या नक्कीच माहीत आहे तुम्हाला हे समजते.
पण अभीव्यक्ती स्वातंत्र्य हे कायद्याच्या म्हणजेच नियमांच्या चौकटीत राहूनच उपभोगायचे असते.
10 Oct 2010 - 12:08 pm | नितिन थत्ते
अन्य एका धाग्यावर मिपावर धर्मभेद नाही असे ठासून म्हणालो होतो.
या धाग्यावर आलेले प्रतिसाद पाहता पुनर्विचार करीत आहे.
10 Oct 2010 - 12:44 pm | अप्पा जोगळेकर
सहमत आहे. आणि एक महत्वाचा मुद्दा हा की भारतात काय चालतं ते आम्ही ब्।आर्तीय लोकं पाहून घेउ, अमेरिकन लोकं कशाला उगाच त्रास करुन घेत आहेत?
10 Oct 2010 - 1:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>महत्वाचा मुद्दा हा की भारतात काय चालतं ते आम्ही भारतीय लोकं पाहून घेऊ.....
-दिलीप बिरुटे
11 Oct 2010 - 11:09 am | अवलिया
अन्य एका ठिकाणी मिपावर प्रांतभेद नाही असे ठासून म्हणालो होतो.
या धाग्यावर आलेले प्रतिसाद पाहता पुनर्विचार करीत आहे.
10 Oct 2010 - 12:10 pm | सद्दाम हुसैन
क्रुपया आपन मला अभिव्यक्ति स्वातंत्र्याची व्याख्या सांगावी
10 Oct 2010 - 12:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मराठी विकिपीडियाचे दुवे पाहावेत. आणि जमलेच तर मराठी विकिपीडियावर योग्य भर घालावी.
-दिलीप बिरुटे
10 Oct 2010 - 12:41 pm | वेताळ
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या अपेक्शित असताना त्याला धार्मिक रंग देण्याची काहीएक गरज नव्हती.
एकाद्याने आपुलकिने घराचा पत्ता विचारल्यावर त्याला देशाचा इतिहास वाचुन दाखवण्याचा हा एक प्रकार वाटतो.
10 Oct 2010 - 1:32 pm | वेताळ
इतरांच्या भावनेला किंवा अधिकाराना काही हानी होणार नाही अश्या पध्दतीने स्वःताचे अधिकार वापरणे.अशी ढोबळ मानाने व्याख्या करता येईल.
10 Oct 2010 - 4:29 pm | पैसा
कोणी तुमचं स्वातंत्र्य काढून घेत नाही हो! बिनधास्त जे वाटेल ते लिहा. जर धोरणात बसत नसेल, तर संपादक मंडळी कामाला लागतीलच! कोणाला आवडलं नाही तर, ते तसं लिहितील. त्याला दुसरे कसले रंग मात्र देऊ नका म्हणजे झालं! इतकं सोप्पं आहे ते.
आणि हो, काही म्हणा, तुमच्या "उई उई"ने आम्हाला १ दिवस मजा आली! कधीतरी मजा म्हणून बरं आहे! अर्थात रोज नाही.
10 Oct 2010 - 1:35 pm | इन्द्र्राज पवार
".....एकाद्याने आपुलकिने घराचा पत्ता विचारल्यावर त्याला देशाचा इतिहास वाचुन दाखवण्याचा हा एक प्रकार वाटतो...."
~~ श्री.वेताळांचा हा दाखला एकदम नामी आहे. टिटवीची तहान किती आणि ती भागविण्यासाठी तिला कुठले पात्र लागेल याचा विवेक राखला तर तहानही भागेल आणि अकारण साठ्यालाही डिवचण्याचे कारण नाही.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा श्री.हुसेन यांनी काढला म्हणून उत्तर द्यावे लागते अन्यथा ते त्यांनी विचारले नसते आणि त्या चेष्टेच्या सुरातील 'उई उई' ची पुंगी वाजवली नसती तर काही दिवसातच या संज्ञेचा अर्थ त्याना इथल्या वैचारिक देवाणघेवाणीतून निश्चितच झाला असता. अभिव्यक्ती स्वातंत्र्यात (ज्याला इंग्लिशमध्ये 'Freedom of Expression' असे म्हटले जाते त्या) विचारांना घटनेने मान्य केलेल्या सुसंबंध्द भाषेत गुंफून लोकासमोर आणणे आणि त्यानुसारच आपल्या मताचा/मतांचा ज्ञान देण्यासाठी वा प्राप्तीसाठी आदानप्रदानात उपयोग करणे. इतक्या मर्यादित व्याख्येचा श्री.हुसेन यांनी पाठपुरावा केला तरी त्यांना प्रत्यक्षात या स्वातंत्र्याचे महत्व भारतासारख्या सर्वधर्मसमभाव सूत्र मान्य केलेल्या लोकशाही राष्ट्रात किती आहे हे उमजेल.
धर्मभेद असो, जातिभेद राहो की न राहो, एखादी विशिष्ट मतप्रणाली प्रचलित असो की नसो,तथापि जी व्यक्ती, तो वर्ग, जी जात, जे राष्ट्र वा जी संस्था नागरिकाच्या स्वतंत्र अभिव्यक्तीला, आचार-विचारशक्तीला वाव देत नाही ती अन्यायी आहे असे समजले जाते. तदनुषंगाने भले आपल्या समाजरचनेत अनेकविध अन्यायकारक उतरंड्या असल्या तरी घटनेने 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' आपल्याला दिले आहे म्हणून किमानपक्षी त्या विरूध्द सार्वत्रिक आवाज तरी उठविला जातो....याला श्रेय जाते ते आपल्या घटनेमध्ये अधोरेखित केलेल्या नागरिकाच्या हक्काला.
~~ आणि मिसळपावच्या संपादक मंडळाने संस्थळ स्थापनेवेळी मनी हाच विचार ठेऊन भूमिकेच्या प्रस्तावनेत "अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ" यावर भर दिला आहे. सबब श्री.हुसेन यांना विनंती की, जरी विचार प्रदर्शनाचे स्वातंत्र्य असले तरी त्याला 'उई' चा काटा लावून चेष्टेचे रूप देऊ नका.
[धाग्यातील शंका तुम्ही मराठीतून मांडली असल्यानेच प्रतिसाद दिला आहे]
इन्द्रा
10 Oct 2010 - 6:15 pm | शुचि
ह्म्म विषय आहे विचार करण्याजोगा.
सद्दाम हुसेन , तुम्हाला समाजात, चार चौघात, मुक्त व्यासपीठावर जे विचार व्यक्त करणं योग्य वाटतं ते जरूर करा. ते तसे करता येणं हेच तुमचं स्वातंत्र्य - अभिव्यक्ती स्वातंत्र्य.
एक लक्षात ठेवा जे काही तुम्ही लिहाल ते जतन केलं जाईल. तेव्हा जबाबदारीची विधानं करणे हे सर्वस्वी तुमच्या हाती आहे. तेव्हा स्वातंत्र्य हे उपभोगायचं आहे ते एका बंधनात राहून.
10 Oct 2010 - 10:06 pm | शिल्पा ब
अरे!!! माझा प्रतिसाद काय चुकीचं होतं म्हणून उडवला? का आम्ही अमेरिकन आणि तुमच्या भारतातील गोष्टींबद्दल मत दाखवले म्हणून एकदम पोटात दुखायला लागले...असो, कोल्हयाला द्राक्षे आंबट अशीच लहानपणची भारतातली शिकवण आहे... पुन्हा चुकलंच , तुमच्या भारतातील असं लिहायचं होतं.. =))
11 Oct 2010 - 11:10 am | अवलिया
जॉर्ज ऑरवेलला विसरु नका ! :)
12 Oct 2010 - 12:00 am | विश्वनाथ मेहेंदळे
अमेरिका काही आता "उंचावरची द्राक्षे" राहिली नाही. अमेरिकेत काय हल्ली पट्टेवाले सुद्धा जातात. कुणाच्या पोटात कशाला दुखेल? खंडीभर H1 पडले आहेत, कुणी उचलत नाही सध्या.
तुमचा सदर प्रतिसाद मुळात उडण्याच्या लायकीचा होता. तुम्ही तो मुंबईत (किंवा पुण्यात) बसून लिहिला असता तरीही उडलाच असता. प्रत्येक विषय हा संवेदनशील मुद्द्यावर आणलाच पाहिजे असे नाही. मागे ते आक्रस्ताळीपणाबद्दल काही लिहिले होतेत ते स्वत:ही ध्यानात ठेवलेत तरी चालेल.
12 Oct 2010 - 12:39 am | लंबूटांग
खंडीभर H1 पडले आहेत, कुणी उचलत नाही सध्या
वाक्याचा पहिला अर्धा भाग अगदी बरोबर.. पण दुसरा शिल्पातैंच्या विधानाला सोदाहरण स्पष्ट करणारा.
खंडीभर H1 पडले आहेत ते अमेरिकन कंपन्यांवर कडक निर्बंध घातले गेल्यामुळे त्या sponsorकरत नाहीयेत म्हणून. बाकी चालू द्या.
12 Oct 2010 - 4:39 am | शिल्पा ब
आपण कितीदा अमेरिकेत जाऊन आला आहात? नाही पट्टेवाले सुद्धा जाऊन येतात म्हणून विचारलं?
बाकी भारतात मुसलमानांना जेवढे स्वातंत्र्य आहे (स्त्री /पुरुष दोघेही) तसे कोणत्या मुस्लीम राष्ट्रात नाही असे म्हणणे हे आक्रस्ताळेपणाचे कसे ते स्पष्ट करा....आणि भारताबाहेर माफ करा अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांनी (भारतीय नागरिकांनी )का म्हणून या विषयावर बोलायचे नाही ते सुद्धा स्पष्ट करा.
विषयच संवेदनशील मांडलाय तर प्रतिसाद तसेच येणार.
त्यात तुम्ही का एवढा आक्रस्ताळेपणा करताय?
12 Oct 2010 - 7:53 am | विश्वनाथ मेहेंदळे
>> आपण कितीदा अमेरिकेत जाऊन आला आहात?
हा प्रश्न एकदम गैरलागू आहे. पण तरीही तुमच्या समाधानासाठी सांगतो. एक पेक्षा जास्त वेळा. कदाचित तुमच्यापेक्षा जास्त अमेरिका पाहिली असेल मी. आणि हो, Dependent Visa वर नव्हतो गेलो बरे.
>>भारताबाहेर माफ करा अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांनी (भारतीय नागरिकांनी )का म्हणून या विषयावर बोलायचे नाही ते सुद्धा स्पष्ट करा.
असे मी कधीच म्हटले नाही. इतर कुणी म्हटले असेल तर मी उत्तर द्यायला बांधील नाही.
>>विषयच संवेदनशील मांडलाय तर प्रतिसाद तसेच येणार.
मुळात विषय धर्माचा कधीच नव्हता. त्यांनी अभिव्यक्तीचा अर्थ विचारला आणि त्याला संदर्भ इथे मराठी व्यतिरिक्त भाषा वापरण्याचा होता. यात संवेदनशील काहीच नाही. तुम्ही विषय खेचून धर्मावर आणता आहात. ते ही विनाकारण. मूळ धागा परत वाचा. तुम्ही त्याला पहिलाच प्रतिसाद काय दिला होता ते ही आठवा.
12 Oct 2010 - 7:56 am | शिल्पा ब
मी उदाहरण दिले...मुस्लीम आणि भारतातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे...त्यात तुम्हाला फक्त धर्मच दिसला राजकारण नाही हा तुमचा दोष...
<<<बाकी भारतात मुसलमानांना जेवढे स्वातंत्र्य आहे (स्त्री /पुरुष दोघेही) तसे कोणत्या मुस्लीम राष्ट्रात नाही ..हे आक्रस्ताळेपणाचे कसे ते अजूनही तुम्ही स्पष्ट केलेले नाही.
अवांतर : आणि मी किती अमेरिका (किंवा आणि काही देश) पहिले आहेत ते कधीतरी सांगेनच...मग ठरवू तुम्ही माझ्यापेक्षा जास्त पहिले का नाही ते..
13 Oct 2010 - 12:35 am | विश्वनाथ मेहेंदळे
>>मी उदाहरण दिले...मुस्लीम आणि भारतातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे...त्यात तुम्हाला फक्त धर्मच दिसला राजकारण नाही हा तुमचा दोष...
माफ करा हो ताई.... तुम्ही इतक्या निर्मळ मनाने उदाहरण दिलेत आणि मी चुकीचा अर्थ काढला. त्याचे काय आहे की आम्हाला जिकडे तिकडे केवळ धर्मच दिसतो. अमेरिकेत न राहण्याचा परिणाम असणार हा. तुमच्यासारखी कर्तबगारी दाखवली असती आणि अमेरिकेत राहत असतो तर आम्हीही शहाणे झालो असतो. आयुष्याकडे बघायचा तुमचा जो विशाल आणि निर्मळ दृष्टीकोन आहे तो आम्हालाही अंगी बाणवता आला असता.
>>मी किती अमेरिका (किंवा आणि काही देश) पहिले आहेत ते कधीतरी सांगेनच...मग ठरवू तुम्ही माझ्यापेक्षा जास्त पहिले का नाही ते
अरे वा !! तुम्ही इतरही अनेक देश पाहिले आहेत. म्हणजे केवळ गोड द्राक्षेच नाहीत तर इतरही अनेक गोड फळे खाल्ली आहेत तुम्ही. तुमच्या मनाचा हा किती मोठेपणा आहे की तुम्ही आजवर त्याचा उल्लेख नाही केलात. आमच्या सारख्या कोल्ह्यांना फार वाईट वाटू नये म्हणून तुम्ही हा विशाल दृष्टीकोन बाळगला असेल.
>>बाकी भारतात मुसलमानांना जेवढे स्वातंत्र्य आहे (स्त्री /पुरुष दोघेही) तसे कोणत्या मुस्लीम राष्ट्रात नाही ..हे आक्रस्ताळेपणाचे कसे ते अजूनही तुम्ही स्पष्ट केलेले नाही.
हे आक्रस्ताळेपणाचे नाही म्हटले तर तुम्ही आधी वाद धर्मावर आणलात आणि मग सोयीस्कर निष्कर्ष काढून मोकळ्या झालात की केवळ तुम्ही अमेरिकेत राहता या आकसाने प्रतिसाद उडवला गेला. केवळ निष्कर्ष काढून थांबला नाहीत तर तसे जाहीर केलेत याला आक्रस्ताळेपणाचे वागणे म्हटले. अर्थात हे सगळे तुमच्या निर्मळ मनाची प्रचीती यायच्या आधीची गोष्ट आहे. आता तुमच्या मनाचा मोठेपणा कळल्यामुळे तो आरोप मी मागे घेतो.
(तुमच्या मनाच्या मोठेपणापुढे नतमस्तक झालेला) वि. मे.
13 Oct 2010 - 12:51 am | शिल्पा ब
एक तर तुम्ही नीट सगळे वाचायला शिका...जर प्रतिसादच द्यायची खुमखुमी असेल तर...
मी अमेरिकेत राहते म्हणून प्रतिसाद उडवला असे म्हंटले नाही ...त्याचा संदर्भ माझ्या प्रतीसादानान्तारचे प्रतिसाद वाचण्याचे कष्ट घेतले असते तर समजले असते...पण मग वळवळ्या बोटांना कसा न्याय मिळाला असता?
आणि हो प्रतिसाद निर्मळच होता निर्मळ नाही..आणि हीच काय आणि बरीच गोड गोड फळे चाखलीत...पण अजून कुणाच्या पोटात दुखायला नको म्हणून मन मोठे ठेवून सांगतिले नाही एवढेच.
इथून पुढे समजले नाही तर इथे बरेच जेष्ठ लोक आहेत त्यांना विचारत चला.
11 Oct 2010 - 12:28 am | इन्द्र्राज पवार
"....माझ्या उई ने कोणाची चेष्टा झाली स्पष्ट कराल काय ? माझे लेखन वाचा एकदा परत !"
श्री.हुसेन....माझ्या प्रतिसादात मी कुठेही 'अमुक एकाचा/एकीची त्या उई ने चेष्टा झाली' असे म्हटलेले नाही. पण हे नक्कीच स्पष्ट आहे की तुम्ही इथे प्रवेश घेतलेल्या क्षणापासून [त्यातही त्या कलेजा पाककृतीपासून] मजकुरात प्रमाणाबाहेर त्या 'उई' चा जो वापर केला होता तो निश्चितच गंमतीच्या पलिकडील होता. त्यामुळे तुमची अशी एक प्रतिमा इथे तयार झाली की तुम्ही काहीही लिहिले की ते चेष्टास्वरूपातीलच असणार. ही मास सायकॉलॉजी आहे ज्यामुळे लोकानी आपल्याविषयीचे मत बदलणे फार जिकिरीचे काम होऊन बसते.
मतभेद असावेत पण ते वैचारिक पातळीवरील. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्न उभा करायचा आणि त्याला कुणी उत्तर दिले तर ते उत्तर म्हणजे आपल्या इथल्या अस्तित्वाविरूद्ध आहे असे समजायचे आणि विषय संपला आहे, आता कुणी काही उकरू नये, इ. म्हणणे म्हणजे आपला मुद्दा फार हळवा आहे असाच याचा अर्थ होतो.
मतभेदाच्या महत्वावर खुद्द प्रेषित मुहम्मद (स.) यांचे मत तुम्हाला माहित आहे? पवित्र कुराणात त्याचा उल्लेख आहेच; पण तरीही ते तुम्ही जाणत असाल तर इज्तिहाद्चे स्वातंत्र्य म्हणजे काय ते तुम्हास नक्कीच माहित असेल.
असो.
इन्द्रा
11 Oct 2010 - 8:22 am | नगरीनिरंजन
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे एखाद्या व्यक्तीचे म्हणणे मांडायची तिला दिलेली मुभा. यात ती व्यक्ती आपले म्हणणे कुठे आणि कशाप्रकारे मांडायचे याचा विवेक बाळगून असेल हे अध्यारुत आहे. हा विवेक न बाळगल्यास त्या व्यक्तीचे म्हणणे ऐकणार्या व्यक्तींना त्यांच्या प्रतिक्रियांची अभिव्यक्ती करायचे स्वातंत्र्य आहेच.
उदाहरणार्थ, एखाद्या रॉक कन्सर्टला आलेल्या लाखो लोकांसमोर व्यासपीठावर जाऊन तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून मंगलाष्टके गाऊ लागलात तर प्रेक्षक त्यांच्या प्रतिक्रियांची अभिव्यक्ती अंडी-टोमॅटो आणि दगड-चपलांच्या माध्यमांतून करणार. हेच ते उभयपक्षी असलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य.
जेव्हा तुम्ही मिपावर काहीतरी लिहीलं तेव्हा तुम्ही हा विवेक पाळला असं तुम्हाला म्हणायचं आहे काय?
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय हे तुम्ही इतरांना नाही तर स्वतःलाच विचारायची गरज आहे असं मला वाटतं.
11 Oct 2010 - 11:56 am | परिकथेतील राजकुमार
एकच माणुस दोन दोन सदस्यनामे घेउन रोज दोन्ही सदस्यनामांनी धाग्याचा रतिब घालत आहे, आणि हे माहित असुनही प्रशासन गप्प आहे ;) ह्यालाच म्हणतात अभिव्यक्ति स्वातंत्र्य.
बाकी रसायनशास्त्राचा तुमचा अभ्यास कसा चालु आहे हॅकर साहेब ? ;)
11 Oct 2010 - 12:12 pm | अवलिया
हॅ हॅ हॅ
प्रशासन गप्प असण्याची अनेक कारणे असु शकतात पराशेट.
तुम्ही जुने जाणते.. तुम्हाला सगळं माहित असेलच की! ;)
11 Oct 2010 - 12:38 pm | परिकथेतील राजकुमार
हॅ हॅ हॅ अल्ला मेहरबान तो .... बरोबर ना ? ;)
11 Oct 2010 - 12:00 pm | विजुभाऊ
प्रत्येक स्वातन्त्र्याची किम्मत चुकती करावीच लागते.
अभिव्यक्तीस्वातन्त्र्य म्हणजे एक सोयीस्कर टर्म आहे. ज्यात दुसर्यावर चिखल फेकायची सोय आहे पण ज्याच्यावर चिखल उडतो त्याने अरे ला का रे केले की अभिव्यक्ती स्वातन्त्र्य आठवते.
13 Oct 2010 - 2:19 am | मराठमोळा
अरे वा!! मस्तच धागा.
नुकतेच अमेरीकन जेवण करुन भारतीय ढेकर दिल्याने (याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतात का?) पॉपकॉर्न खाण्याची इच्छा नाही.. ;)
बाकी चालु द्या!!!