मागच्या भागात आपण स्क्रब्ज च्या रेसिपी पाहिल्या कि ज्यामुळे चेहर्यावरची मृत त्वचा निघुन जाते.
या भागात काही त्वचा उजळ करणार्या ( skin lightening) रेसिपीज पाहु.
आपला प्रत्येकाचा आपल्याला मिळालेला एक वर्ण असतो.तो पुर्णपणे बदलवणे शक्य नसते. म्हणजे जर सावळा वर्ण असेल तर कितीही प्रयत्न केला तरी गोरापान नक्कीच होणार नाही. पण तरीही जो आपला नैसर्गिक वर्ण आहे तो नितळ आणि तजेलदार मात्र नक्कीच होउ शकतो.
१) जेव्हा कधी कच्चा बटाटा किसाल त्यावेळी त्यातला २-३ चमचे कीस बाजुला ठेवून द्या. तो पिळून त्यामध्ये लिंबाच्या रसाचे ४-५ थेंब टाका.आणि चेहर्याला लावून १० मिनिटानी धुवून टाका. काही प्रमाणात naturally bleach होते.आणि उन्हामुळे येणारा काळसरपणा (Tan) हळू हळू कमी होतो.
२) मिल्क पावडर + मध + लिंबू स्किन टोन light करते.
३) साधे खोबरेल तेल + लिंबाचा रस नियमीत वापरा (तेलकट त्वचा असणार्यांसाठी नाही)
४) ओटमिल + दही + टोमॅटो रस एकत्र करून लावा. पॅक साधारण सुकत आला की हळुवार पणे चोळून काढा आणि थंड पाण्याने धुवा.
५) हातांचा काळसरपणा जाण्यासाठी लिंबू रस आणि दुध एकत्र करून लावा ५-६ मिनिटे सुकल्यावर धुवून टाका.
लिंबाच्या साली राहिलेल्या साली हातावर ,कोपर्यांवर घासा. (चेहर्यावर वापरू नका)
६) पपई कुस्करून लावल्याने टॅन जायला खुप मदत होते. पपई ७-८ छोट्या फोडी + मध एकत्र करुन हाता-पायावर लावा. नियमीत (साधारण २-३ दिवसांच्या अंतराने) केल्यास खुप फरक जाणवतो. आणि खबरदारी म्हणून उन्हात जाताना शक्य तेव्हा जॅकेट आणि स्कार्फ घालूनच बाहेर पडा. नाही तर सनस्क्रीन लावूनच बाहेर पडा.कारण निसर्ग आहे..तो आपला प्रभाव दाखवणारच! :)
काही उपयुक्त पॅक्स :
१) कुस्करले बनाना २-३ चमचे + मध (कोरड्या स्किन साठी)
२) दही + बेसन + हळद
३) इडली साठी आपण जेव्हा डाळ तांदूळ भिजवतो त्यावेळी वाटून झाल्यावर अर्धी वाटी काढुन ठेवा.(मीठ न घालता) आणि चेहृयावर लावा. अर्धवट सुकत आले की धुवून टाका (हे लिहिताना मलाही हसू येतय्.. :) पण खरच खुप मस्त होते स्किन)
तेलकट त्वचेसाठी तेलकट पणा कमी करण्यासाठी आणि उजळ्पणासाठी काही महत्वाच्या गोष्टी :
चेहरा दिवसातून कमीत कमी ४ वेळा धुण्याचा प्रयत्न करा. कमीत कमी टिश्यू ने तरी स्वच्छ करा.कारण सतत तेल त्वचेवर राहिले तर दिसताना तर तेलकट दिसतेच पण स्किन pores (रंध्रे) बंद होउन pimples आणि इतर प्रॉब्लेम वाढतातकरा.
मागच्या भागातल्या रेसिपीज ट्राय करताना बटर, साय ऐवजी दुध किंवा साधे दही वापरा.
१) मध + लिंबू + हळदीची चिमुट
२) काकडीचा कीस + लिबू
३) तांदुळाचे पीठ + बेसन कोरडे मिक्स करून ठेवा आणि चेहरा ओला करुन कोरडे पीठ हलक्या हाताने चोळुन लावा.धुवून टाका.
४) अंडे + कॉर्नस्टार्च (कॉर्नफ्लोअर) चा पॅक लावत जा. त्याने ओपन पोअर्स ब्लॉक होण्यास मदत होते. पर्यायाने चेहर्यावर तेल कमी येते.
तुम्हाला वाचुन कंटाळा आला नसेल तर क्रमशः :)
नाहीतर आठ्वेल तश्या फळ्यावर टाकत जाईन! :)
प्रतिक्रिया
7 Oct 2010 - 8:23 pm | मेघवेडा
पराच्या सूचना अमलात आणल्या गेल्या आहेत व्यवस्थित! =)) =))
पण त्यामुळे रसभंग होतो आहे काही ठिकाणी. ;)
7 Oct 2010 - 8:26 pm | गणपा
मेव्याशी सहमत ;)
7 Oct 2010 - 8:29 pm | सूड
छान आहे, वाचायला आम्हाला कंटाळा येणार नाही पण तुम्हाला टंकाळा* येत नसेल असं लिहायला तर जरुर लिहा.
मेव्याशी काही अंशी सहमत.
*सौजन्यः मिपावरीलच कुणीतरी, नाव आठवत नाही.
7 Oct 2010 - 8:38 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
हीहाहहहह
I knew this!
खास करून "रंध्रे" 'घासून लावा" चोळा..मृत त्वचा हे लिहिताना मलाच जाम हसु येत होतं.
पॅक आणि इतर काही शब्दाना तर मला खरच योग्य शब्द सापडेनात यार्....म्हणून आहे तसे छापले...!
हे रंध्रे वगैरे शब्द आपण जर बोली भाषेत वापरायला लागलो तर जिभेच्या शेवया पडतील ! :)
7 Oct 2010 - 8:42 pm | सूड
पॅक= लेप (माझ्या माहितीत तरी)![](http://l.yimg.com/us.yimg.com/i/mesg/emoticons7/1.gif)
अडतंय ते ईचारायचं की तै, जमंल तेवडं सांगू.
7 Oct 2010 - 11:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
सूचना चांगल्या आहेत, पण माझ्यासारख्या आळशी लोकांसाठी याचा काही फारसा उपयोग नाही. तजेलदार कांती आणि डोळ्यांसाठी भरपूर झोपा ही सूचना मला फार आवडते.
पण या सूचना अमलात आणून रूपांगी ज्योतिषाचे बारा वाजणार का?
7 Oct 2010 - 11:36 pm | प्रियाली
असेच. सोबत दुसरे कोणी लेप करून चेहर्याला लावून देत असेल तर उत्तमच. ;)
8 Oct 2010 - 12:19 am | रेवती
या आणखी अश्याच सुचनांची पुस्तके मला भेट म्हणून मिळाली आहेत.
तसाही माझा उत्साह फारसा नसतोच या कामासाठी पण कोणी लावून देत असतील तर खरी मजा!
आपल्याआपण फेशियल असेच कंटाळवाणे असते. दुसर्या कोणी करून दिल्यावर मज्जा!
हैद्राबादला जवळच एक ब्युटीपार्लर होते. ते फारसे चालत नसावे. त्या बाईला म्हणूनच भरपूर वेळ हाताशी असे.
भलत्याच निवांतपणे मन लावून फेशियल आणि डोक्याचा मसाज करीत असे. दरही बेताचे होते मग काय मी न चुकता जात असे. हा हा! फार आठवण आली आज तिची!:)
8 Oct 2010 - 12:24 am | प्रियाली
फेशियलचे भाव ऐकले तर डोळे फिरून त्यांचाही चांगला मसाज होतो असे ऐकले आहे. ;)
8 Oct 2010 - 11:12 am | स्वैर परी
हो! नक्किच! माझी पार्लर वाली, दर महिन्याला फेशियल चे पैसे वाढवतच चालली आहे. :(.. जाई ने सान्गितलेले उपाय करुन पाहायला हवेत. ;)
8 Oct 2010 - 3:41 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
देवदयेनी skin healthy आहे. मी ती घरी टिकवायचा प्रयत्न करत असते. पार्लर मध्ये तर threading इ .किरकोळ कारणा व्यतिरिक्त पैसे घालवावे लागत नाहित. फेशियल तर करून मला सहज दीड एक वर्ष आरामात झाले असेल. yes दिराच्या लग्नात केले होते..!
हे वर सांगितलेले प्रकार tried and tested आहेत्...and trust me....they really works!
8 Oct 2010 - 3:29 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
जाहिर आळशीपणा!
अग पण पार्लर मध्ये तास तास भर जायला वेळ कोणाला आहे?
आणि मला तर जाम बोर होत तिथे तोंड वर करुन पडुन रहायला.
त्यापेक्षा घरी TV बघता बघता ..स्वयपाक करता करता काय बाय ट्राय करत असते. आणि ४-५ मिनटं वेळ तोड धुण्याआधी काहितरी साबणा ऐवजी लावते.
thats it
8 Oct 2010 - 10:49 am | शिल्पा ब
छान..यातले माझ्या स्किनला सुट होणारे प्रकार करुन बघेन..हायकिंग केल्याने त्वचा जरा काळसर झालीये पण आता थंडीत परत पूर्ववत होईल त्यामुळे ते लिंबू वगैरे नाही करणार पण चेहर्याचे जरूर करून बघेन...
8 Oct 2010 - 3:52 pm | परिकथेतील राजकुमार
वा वा ! लिखाण आवडले.
8 Oct 2010 - 9:49 pm | प्रियाली
नुसते वा!वा! करण्यापेक्षा लेप लावा. कोणजाणे बेला स्वानपेक्षाही त्वचा फटफटीत पडेल. ;)