टोमॅटो ची कोशिंबीर करायची होती.छान बारीक बारीक चिरून घेतला.टोमॅटो बारीक चिरला की त्याला जरा जास्त पाणी सुटतं त्यामुळे तो थोडा पिळुन घेतला आणि कोशिंबीर केली. नंतर सवयीप्रमाणे त्या रसात थोडासा मध घातला,चिमुट भर हळद घातली.आणि चेहर्याला लावला.बाकी सारी कामं होईपर्यंत छान सुकुन गेला मास्क्.आणि चेहरा धुताना विचार केला की हे तुम्हा लोकांबरोबर share करावं.
या रेसिपीज च आहेत ..पण flawless skin साठी!
मी मुद्दाम रेसिपीज अशासाठी म्हटलं आहे कारण यासाठी लागणार्या सगळ्या वस्तू आपल्या स्वयंपाक घरातच मिळणार्या आहेत. आणि त्यापासून बनणार्याकाही रेसिपीज तुम्हालाही complexion साठी किंवा healthy skin साठी मस्त useful ठरू शकतील.
आणि बरेच जण म्हणतात की हे सगळं करायला वेळ कोणाला आहे?....तर मला नाहि वाटत की यासाठी तुम्हाला काही वेगळा वेळ काढावा लागेल्.रोजची कामं होईपर्यंत्...TV पाह्ता पाहता....किंवा झोपायच्या आधी फक्त पाच एक मिनिटं जर दिलीत तरी खूप आहे.
... आजकाल पोरं पण salon चे उंबरे झिजवायला लागली आहेत्. कारण छान ,तजेलदार ,नितळ skin असणं हे छान तब्येतीच लक्षण आहे. आणि त्यासाठी वय किंवा इतर कोणताही (मुलं/मुली) criteria नसावा.
So anyone can try these recipes.
आणि regularly follow केलंत तर तुम्हाला तुमच्याच स्किन मध्ये मस्त फरक जाणवू लागेल.
या काही आजीकडुन घेतलेल्या,आणि काही कोणाकडून मिळालेल्या आणि काही invent केलेल्या resipes.
Try them out!
(**यामध्ये मात्र एक गोष्ट लक्षात ठेवावी : काही जणांना हळद किंवा अन्य कशाची जर allrgy \असेल तर काळजी घ्यावी)
A) १)बाथरूम मध्ये एका छोट्या डब्यात थोडेसे बेसन थोडीशी हळद मिक्स करुन ठेउन द्यावे.रोजच्या आंघोळीच्या वेळी किंवा दिवसातुन कधिही एकदा साबणाऐवजी चमचाभर (तेवढे पुरते) चेहर्याला लावावे ,साबण्/फेस वॉश जितका वेळ लावतो तितका वेळच लावावे आणि धुवून टाकावे.
२) दिवाळीच्या वेळी जे उटणे आपण आणतो ते नेहमी बाथरूम मध्ये ठेवा. कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात जाऊन घेउ शकता. मी हे खालचे मिक्स करुन आणुन ठेवते.
चंदन + गुलाबपाकळी + खस (वाळा) + आंबेहळद +कचोरा + संत्रा साल हे सगळे प्रत्येकी ५० ग्रॅम्स. हळद सूट होत नसेल तर घालू नका.
आणि दोन्-तीन दिवसातून एकदा मिनिट्भर मसाज करुन धुवून टाका.
B)omemade scrub recipes :
scrubbing नी डेड स्किन निघुन जाते आणि inner layer ब्रीद करु शकतो almost everyone knows this. But no need to waste money scrubs when you can make them easily @ home.
1) बटर आणि साखर : unsalted butter किंवा आपले नेहमीचे लोणी १ चमचा + साखर १ चमचा एकत्र करुन चेहर्याला दोन मिनिट्स मसाज करा (circular motion) आणि कोमट पाण्याने धुवून टाका. स्किन unbelivebally soft होते.
हे बॉडी scrub म्हणुन पण वापरून पहा. पण लगेच साबण किंवा body wash वापरून नका. वीकेंड ला करु शकता.
२) २-३ चमचे दूध + रवा- एकत्र करून scrub करा.
३) दुध + लिंबाचा रस २-३ थेंब + ओट्स ... यानेही मस्त होते स्किन.
४) २-३ चमचे बेकिंग सोडा आणि किंचित पाणी मिक्स करून हलके scrub करा.
५) दही + मध + रवा....यात थोडेशी दालचिनी घालु शकता. pigmentation (बारीक काळे डाग) कमी व्हायला मदत होते.
६) कोणतेही हेवी क्रीम ,अगदी साय सुद्धा चालेल + बारीक चहापूड(dust tea) एकत्र करुन मसाज करा.धुवून टाका.
सुंदर मऊ आणि refresh होते स्किन. can be used as Body scrub as well.
क्रमशः ..............
(skin lightinening masks & फेस पॅक्स पुढील भागात....) .... :)
प्रतिक्रिया
6 Oct 2010 - 5:21 pm | स्पंदना
फोटु कुठाय सुन्दरीचा?
6 Oct 2010 - 5:24 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
माझा छापू म्हणतेस की काय आता? :)
6 Oct 2010 - 5:26 pm | गणेशा
येवुद्या आनखिन ...
वाचत आहे ..
6 Oct 2010 - 5:29 pm | सुहास..
आमची ही एक रेसिपी ::
सर्वात पहिले तोंड घ्या ,त्यावर पाणी शिंपडा,सोबतीला नाक शिकरून घ्या ,पुन्हा पाणी मारा, आता भांडे घासायचा साबण घ्या,आपल्या थोबाडावर फिरवा,दोन्ही हाताने चेहरा चोळुन घ्या ,मग पुन्हा पाणी शिंपडा, आता नारळाच्या शेंड्यापासुन तयार केलेला काथ्या घ्या,तोंडावर,नाकावर चांगला घासा,मग बारीक वाळु घ्या, त्यात भरपुर काळी माती मिसळा, मिश्रण थोबाडावर फासा,वाळु वाळुन घसरायला लागली की पुन्हा तोंड धुवुन घ्या, आधी ओल्या मग सुक्या फडक्याने पुसा..पंधरा मिनीटात गोरामा-गोराम चेहरा तयार...
6 Oct 2010 - 5:56 pm | स्पंदना
गुर्जी कुणाच तोंड घ्यायच?
पु. ल. आठवले हा हा हा ते वर्गात पोरीचा पदर दिसत नाही म्हणुन सांगणारे.
मला वाटतय दुसर्याचच असाव , ज्यांची तोंड परत बघावीशी वाटत नाहित असे..
6 Oct 2010 - 5:31 pm | स्वैर परी
अतिशय उपयुक्त टीप्स दिल्या आहेत. धन्यवाद!
6 Oct 2010 - 5:35 pm | यशोधरा
चांगल्या टीप्स आहेत. टोमॅटोवाली ठाऊक होती. :)
6 Oct 2010 - 5:39 pm | परिकथेतील राजकुमार
Oh My God. खुप खुप Thanx तुम्हाला.
ह्यातल्या so many प्रकारांबद्दल खरच information न्हवती. पण आज only तुमच्यामुळे this much useful information मिळाली. स्पेशली that उटणे thing तर अगदीच new आणि उपयुक्त आहे.
मी तर from today तुमचा fan झालो.
6 Oct 2010 - 5:50 pm | श्रावण मोडक
पुणे - ३०! ;)
6 Oct 2010 - 6:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
स्पेशली हा शब्द especially ह्रुदयास भिडला.
6 Oct 2010 - 7:50 pm | प्राजु
पुणेरी परा!!! :)
6 Oct 2010 - 6:16 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
प्.रा. भाऊ! :)....कळतायत हं....शालजोडीतले!
सुचना अमलात आणण्याचा आणि सुधारण्याचा प्रयत्न करु!
भा.पो....अगदी आरपार.
:)
6 Oct 2010 - 6:34 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
त्याच चालीत हलकट्ट म्हणजे कोण रे भाऊ.... बरोब्बर बसतय की राव! (हसत घ्या.)
आपण बहुमुल्य सुचना केलीत... ती अमलात आणली जाईल.
:)
6 Oct 2010 - 5:53 pm | सुहास..
पुणे - ३७ शी सहमत !!
6 Oct 2010 - 6:11 pm | अवलिया
पुणे -४२० शी सहमत
6 Oct 2010 - 6:19 pm | विनायक प्रभू
पन उटणे थिंग आवडले.
6 Oct 2010 - 6:59 pm | सूड
नवीन रेसिपीजशी आम्हाला फॅमिलिअर केल्याबद्दल थँक्स लॉट. लेट सम मोर रेसिपीज कम बरं का !! (ह घ्या)
6 Oct 2010 - 7:03 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
मेलेल्याला काय पुन्हा मारताय?
एकदा माफ करा!
माफीची चुकी असावी!
6 Oct 2010 - 7:08 pm | परिकथेतील राजकुमार
जाईतै येवढे नका हो मनाला लावुन घेउ :) पोर आपलं समजुन थोडी गंमत करतात येवढेच.
6 Oct 2010 - 7:16 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
..बरें हो! ध्यानात ठेवू .
मनाला लागावेसें जरीं बोललें तरीं आपलीच माणसें बोलतात हो.
केली थोडी चेष्टा मस्करी,थट्टा तर बिघडले कुठें?
आमच्याही बोलण्यात आंग्ल शब्दोच्चार अमळ चढेच आहेत्.....अमान्य कशास करु?
चालु द्या...!
(मै बन का पंछी....वाला ...इ.स. ६० वाल्या सिनेमांमधील टोन्..माफ करा शब्द्स्वर)
हि हि हि हि :)
मजा आली!
7 Oct 2010 - 5:48 am | सद्दाम हुसैन
आपल्याला पटेल तसं आणि जमेल तसं ल्यावं उई , कोण सांगेल म्हणुन आपण दर वेळी बदलत बसलो तर आपली self identity बदलुन जाइन :)
प्रतिसादों से बहुत करमणुक होया उई ... परिकथेतला राकु तर अफलातुन आहे उई ..
7 Oct 2010 - 4:25 am | इंटरनेटस्नेही
धागा आवडला.
(तेलकट त्वचाधारी बाबा) इंट्या.
7 Oct 2010 - 9:52 am | मनि२७
मस्तच धागा काढलाय जाई.....
7 Oct 2010 - 11:32 am | जागु
जाई छान टिप्स आहेत. टोमॅटोची मध घालुण माहीत नव्हती. उटण्याची आणि बेसनची माहीत होती.
अजुन काही टिप्स.
*बटाट्याची, पपईची साल काढ्ली की ती तोंडाला चोळायची.
*संत्र्याची साल सुकवुन त्याची पुड करुन ती साईत घालून त्याचा स्क्रब करावा.
* उडीद, तुर, मुग, चणाडाळ आणि थोडे बदाम घेउन सगळ मिक्सरमधुन काढायच. मग त्यात गुलाबपाणी किंवा दुध घालुन त्याचा स्क्रब करुन हा चेहर्यावर सुकवायचा.
7 Oct 2010 - 8:27 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
अगं इतक्या गोष्टी आपल्या स्वयंपाक घरातच असतात. फक्त जर्रासं लॉजिक वापरलं तर सहज शक्य आहे घरीच आपली स्किन सुधारणं! हो की नाही? :)