तिक्खा कबाब
चिकन पीसेस ना खूप सारे तिखट मीठ लिंबू रस लावा. किमान ४ तास फ्रिज मुरत ठेवा. वाट बघायची तयारी असेल तर रात्रभर हे चिकन फ्रिड्ज मधे ठेवा. ;)
आता हे चिकन फ्रिड्ज मधून काढा. एका वेगळ्या भांड्यात दही,वितलेले बटर किंवा मोहोरीचे तेल घाला. मग त्यात थोडा रंग व चिकन मसाला घाला. थोडे अजुन मीठ घाला.[आधीच चिकेनला मीठ लावले आहे विसरू नका..नाहीतर खारट होतील कबाब.]
ओवेन प्री हिट करावा. आणि त्यात हे चिकेन कबाब २०-२५ मिनिट भाजून काढावेत. आणि ईव्निंग स्नॅक म्हणून खावे.
प्रतिक्रिया
5 Oct 2010 - 12:11 pm | सहज
क्या केहने!!
5 Oct 2010 - 12:21 pm | पिवळा डांबिस
सहज,
तू पण अंमळ येड*वाच आहेस का रे!!!
:)
5 Oct 2010 - 12:13 pm | प्रभो
मस्तच!!!
5 Oct 2010 - 12:21 pm | विसोबा खेचर
सुसाट..!
तात्या.
--
मिथुनदा अंमळ चिंताग्रस्त वाटताहेत, पण मुनमुन मात्र सुखाने विसावली आहे त्यांच्यावर! :)
5 Oct 2010 - 12:24 pm | अश्विनीका
छान फोटो.
दही ऐनवेळी वापरायच्या ऐवजी दह्याचेच मॅरिनेशन केले तर अजून छान होतील कबाब. कारण फ्रिज मध्ये ठेवल्यावर चिकन पिसेस ला लावलेले दही वाळल्यासारखे होते. पण ऐनवेळी लावल्यास ते ओवन मध्ये / ग्रिलवर भाजताना चिकन पासून सुटून गळू लागते.
5 Oct 2010 - 12:29 pm | जासुश
पुढच्या वेळी तसे ट्राइ करते.. :) बाकी सगळ्याना धांकू..
5 Oct 2010 - 1:40 pm | गणपा
बाजारातल (शक्यतो परदेशात असाल तर) दही वापरणार आसाल तर रात्रभर दही लावुन नका ठेवु. १-२ तास खुप होतात.
रात्रभर दही लावुन ठेवल तर कबाब रेश्मी कबाब सारखे मऊसुत होतात आणि तोंडात वितळतात.
5 Oct 2010 - 1:29 pm | स्पंदना
. बाकी सगळ्याना धांकू..???????????/
खा नाही तर ?? असा धाक??
खाऊ बाइ, खाऊ तुझे कबाब!
अवांतरः - नुसते कबाबच नाही तर बाई सुद्धा 'तिखी' दिसते.
5 Oct 2010 - 1:33 pm | सूर्य
मार डाला .... !!
(चिकनप्रेमी) सूर्य.
5 Oct 2010 - 1:35 pm | गणपा
झक्कास :)
(चिकन का दुष्मन)- गणा
5 Oct 2010 - 6:08 pm | सुनील
ओवेन प्री हिट करावा. आणि त्यात हे चिकेन कबाब २०-२५ मिनिट भाजून काढावेत
ओवन किती तापमानाला प्री हीट करावा? माझ्या अंदाजाने ३५० F ला १५-२० मिनिटे पुरेशी व्हावीत. चिकन फार बेक झाले तर कोरडे होते.
आणि ईव्निंग स्नॅक म्हणून खावे
चहा बरोबर? छ्य्या!!
5 Oct 2010 - 6:12 pm | गणपा
आणि ईव्निंग स्नॅक म्हणून खावे
चहा बरोबर? छ्य्या!!
सुनिल भौ सांच्याला तुम्ही च्या घेता ? छ्या !! ;)
5 Oct 2010 - 6:15 pm | सुनील
जोवर आकाशात सूर्य असतो तोवर आम्ही "सूर्यवंशी" पेये घेतो. नंतर "सोमवंशी" पेये!
5 Oct 2010 - 10:19 pm | दीपा माने
जासुश,
आपली पाकक्रुती आवडली.
दुसर्या प्रकारे म्हणजे रात्री चिकनच्या तुकड्यान्ला रे़डीमेड तन्दुरी पेस्ट लावुन मेरीनेड करुन खाण्या अगोदर ३० मि. म्हणजे ३५० फ. वर २० मि. करुन चिकन पिसेस उलटून परत ८-१० मि. बेक करुन गरम गरम सर्व्ह करता येतील.
6 Oct 2010 - 10:44 am | जागु
वा. मस्त खुप सोप्पा आणि चटपटा प्रकार.