राजू परूळेकरांची मतं

रम्या's picture
रम्या in काथ्याकूट
8 May 2008 - 5:20 pm
गाभा: 

राजू परूळेकरांचा लोकप्रभामधील लेख वाचून फार बरं वाटलं.
पण राजू परूळेकरांचा या विषयावरील हा एकमेव लेख नाही असं लक्षात आलं. राजू परुळेकरांनी एक वर्षापुर्वी हीच भूमिका मांडली होती.
हे लेख मिपाच्या वाचकांपर्यंत पोहोचावेत असं वाटलं.
या लेखांचे दुवे खालील प्रमाणे.

http://www.loksatta.com/lokprabha/20070216/good.htm
http://www.loksatta.com/lokprabha/20070323/good.htm

पण तात्या एकाच प्रकारचे लिखाण म्हणून हे उडवू नयेत ही विनंती. :)

प्रतिक्रिया

अभिरत भिरभि-या's picture

8 May 2008 - 7:31 pm | अभिरत भिरभि-या

दोन्ही लेख उत्तम आहेत ..
मनापासून धन्यवाद ..

अक्षरशः कोट्यावधींची लोकसंख्या असताना मराठीसारखा एक भाषिक समाज दुस-याच्या आधिपत्याखाली इतका सहजपणे कसा दबला जातो याचे राहून राहून नवल वाटते ...

सुवर्णमयी's picture

8 May 2008 - 11:11 pm | सुवर्णमयी

परूळेकरांचा आताचा नवीन लेखही उत्तम आहे, तुम्ही दुव्यात दिलेले लेखही आवडले.

इनोबा म्हणे's picture

9 May 2008 - 3:37 am | इनोबा म्हणे

या दूव्यांबद्दल धन्यवाद रे!

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

नीलकांत's picture

9 May 2008 - 1:57 pm | नीलकांत

राजू परूळेकर आणि इतरांचे मराठी विषयी नक्की वाचावेत असे काही लेख खाली देत आहे. जरूर वाचा.

http://www.loksatta.com/lokprabha/20080425/good.htm
http://www.loksatta.com/lokprabha/20080328/good.htm
http://www.loksatta.com/lokprabha/20080307/good.htm

http://www.loksatta.com/lokprabha/20080229/good.htm
http://www.loksatta.com/lokprabha/20080215/good.htm
http://www.loksatta.com/lokprabha/20080222/cover.htm

http://www.loksatta.com/lokprabha/20080307/cover02.htm

नीलकांत

रम्या's picture

9 May 2008 - 4:47 pm | रम्या

सगळेच लेख फार छान आहेत.
यापुर्वीही मी जोपासत असलेल्या प्रांतवादाची व्याप्ती आणि त्याचा अर्थ एवढा विशाल आहे हे मात्र आताच कळलं.
सारेच दुवे फारच माहीतीपुर्ण आहेत.

इनोबा म्हणे's picture

9 May 2008 - 6:28 pm | इनोबा म्हणे

नीलकांता, मस्तच रे! माहीतीपुर्ण लेख आहेत.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

चिन्या१९८५'s picture

14 May 2008 - 2:51 pm | चिन्या१९८५

राजु परुळेकरांच्या लेखाबद्दल माझी मते -

**तुम्ही तुमच्या लेखात आंबेडकर्,अत्रे यांचे वारसदार दिवाळखोर निघाले म्हटले आहे.आंबेडकरांचे राहु द्या पण अत्र्यांचे वारसदार म्हणजे आजचे पत्रकार('मर्‍हाटा'काढल्यामुळे अत्र्यांनाही पत्रकार म्हणायला हरकत नसावी) तर नंबर एकचे दिवाळखोर आहेत.एव्हढेच नव्हे तर 'पत्रकार धर्म' विसरुन राजकीय कंपुबाजीत सगळे धन्यता मानत आहेत. राजु परुळेकरही त्यातलेच.'१९९० पासुन बाळासाहेबांनी महाराष्ट्र धर्माला नख लावायला सुरुवात केली' म्हणतात्.मग तुम्ही १८ वर्ष मुग गिळून का बसला होता???राज ठाकर्‍यांनी सेना सोडण्यापुर्वी(सोडल्यानंतरही) तुम्ही अनेकदा सेनाप्रमुखांवर स्तुतीसुमने उधळली होती.तेंव्हा कुठे गेला होता तुमचा 'महाराष्ट्र धर्म'??अत्र्यांनी त्यांच्या वृत्तपत्रातुन सतत मराठीचा मुद्दा धगधगत ठेवला.पण राजु परुळेकर मायावाती,मोदी व इतर अनेकविध विषयांवर आपली मते मांडत होते. अरे मराठीची इतकी वाईट परिस्थिती असताना तुम्हाला ती पुढे आणण्यासाठी आंदोलनाची गरजच का पडते??आंदोलन नव्हते तेंव्हा तुम्ही का लोकांना या विषयावर जागरुक केले नाही???तुमच्याकडे बंदुकिपेक्षाही घातक लेखणी नावाचे अस्त्र होते ते तुम्ही म्यानात ठेवुन 'चिल्लर' गोष्टींवर स्वतःचा स्तंभ भरवत होता.कधी राजकारण तर कधी काय. सगळ नॉन सेंस.मायमराठी भरडली जात असताना तुम्ही स्वतः त्याबद्दल लिहुन जनजागृती केली असती त्याला काही अर्थ होता.**

पुर्ण लेख वाचा-
http://gandharvablog.blogspot.com/

"काय" म्हटलयं ते पहा.
त्याच्या म्हणण्यात तथ्य आहे ना.(भले त्यानं त्यासाठी काही केलं नसेल.)
त्याचे आणि राज ने उपस्थित केलेले मुद्दे चुक ठरतात का?
नाही ना?मग त्या बद्दल बोला ना.इथे चर्चा केवळ व्यक्तिची नाही तर त्या व्यक्तिनं मांडलेल्या मतांचीही चालु आहे.

आपलाच,
मनोबा
(जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!'
)

चिन्या१९८५'s picture

16 May 2008 - 2:23 am | चिन्या१९८५

कृपया माझा ब्लॉग वाचा म्हणजे सर्व मुद्दे व्यवस्थित कळतील.
'त्या' व्यक्तीने पक्षपातीपणा,द्वेशभावनेवर आधारीत मुद्दे लिहुन दिशाभुल केली आहे. तुम्ही माझा ब्लॉग वाचा,त्यात सर्व सविस्तर लिहिले आहे.मुळात प्रश्न त्यांच्या आंदोलनाचा नाहीये.प्रश्न 'त्याने' लिहिलेल्या 'त्या' लेखाचा आहे.

प्राची संत-देशपांडे's picture

16 May 2008 - 3:59 pm | प्राची संत-देशपांडे

नमस्कार.

मी आधी च हे दोन्ही लेख वाचले आहेत. मला असे वाटते की महाराष्ट्राला राजकीय नेत्यांच्या अकलेची दिवाळ्खोरी नवीन नाही पण सध्या महाराष्ट्राच्या लोकांचे हित न पहाता केवळ उत्तर भारतियांची दादागिरी खपवुन घेणारे आणि त्यांची चमचेगिरी करणारे नेते महाराष्ट्राला काय प्रगतीपथावर नेणार?

राजू परुळेकरांवर कदाचित निष्क्रियतेचा आरोप असेल ही ....पण त्यांचे मुद्दे डावलता येणे खरेच कठीण आहे...वर उल्लेखिल्याप्रमाणे "इथे चर्चा केवळ व्यक्तिची नाही तर त्या व्यक्तिनं मांडलेल्या मतांचीही चालु आहे"

विचारांची काहीच दिशा नसलेले नेते फक्त महाराष्ट्राला अधिकाधिक खड्ड्यात घालत आहेत...आणि त्यान्ना निवडून देणारे आम्ही "सुजाण नागरिक" फक्त तमाशा पहात आहोत.....

त्यामुळे माझ्या मते आपण आपल्या परीने स्वभाषेचा आग्रह, स्व-प्रांताचा अभिमान आणि उपर्या न्ना विरोध ही त्रिसूत्री आचरणात आणावी इतकीच विनंती.

चिन्या१९८५'s picture

16 May 2008 - 9:16 pm | चिन्या१९८५

तेच तर मी सांगतोय की त्या व्यक्तीने चुकिचि मते मांडली आहेत. तुम्ही माझा ब्लॉग वाचा. मी त्यात त्या व्यक्तीने 'काय' चुकिचे लिहिलेय ते लिहिले आहे.
वाचा- http://gandharvablog.blogspot.com/