नमस्कार मंडळी,
सध्या मिपावर पितृपंधरवड्यावर लेख येत आहेत त्यातच माझीही एक भर. पण विषय केवळ पितृपंधरवड्यात मर्यादित नाही तर कर्मकांडांमध्ये पूर्वीच्या ब्राम्हणांचे हितसंबंध कसे गुंतले होते असे माझ्यासारख्या ’एकारान्ती कोकणस्थ ब्राम्हणाला’ काय वाटते हा आहे. हा लेख ’जातीय तेढ’ वाढविणारा आहे असे वाटल्यास जरूर त्यात बदल करावेत किंवा लेख पूर्णपणे काढावा. त्या परिस्थितीत मी लेख केवळ माझ्या ब्लॉगवरच लिहेन.
मिपावर भिक्षुकी करणारे कोणी आहे का याची कल्पना नाही आणि असले तरीही त्यांच्याशी वैयक्तिक कोणतेही वैर नाही. पण या institution विषयीची माझी मते या लेखात लिहिली आहेतच. जसे काही लोकांना आय.आय.एमचे MBA (Finance) हे लोकांना लुबाडायला बसलेले चोर वाटत असले तरीही अशा लोकांना माझ्याविषयी वैयक्तिक पातळीवर हेवादावा असेल असे वाटायचे कारण नाही.तसेच थोडेसे.
अनेक लोक कृतज्ञता व्यक्त करतात आणि मुख्य म्हणजे त्यात कर्मकांडादी फापटपसाऱ्यापासून दूर राहतात हे चांगलेच आहे. कृतज्ञता व्यक्त करण्यावर कोणाचाही आक्षेप असायचे कारण नाही.आणि त्यासाठी दर वर्षी एखादा दिवस नेमून ठेवणे याविषयीही कोणाची तक्रार असायचे कारण नाही. पण बहुसंख्य लोक कर्मकांडे करतात याचे मात्र वाईट वाटते.
गोष्टींमध्ये ’एक गरीब ब्राम्हण होता’ असा उल्लेख नक्की असतो.मला वाटते अशाच गरीब ब्राम्हणांनी स्वत:च्या दक्षिणेची सोय व्हावी म्हणून अशा अनेक रूढीपरंपरा घुसडून दिल्या आहेत.माझ्या वडिलांचे दशमीच्या दिवशी निधन झाले.त्यानंतर भटजींनी सांगितले की ’पंचक लागले’. म्हणजे काय तर दशमीच्या दिवशी एखाद्याचा मृत्यू झाल्यामुळे इतर पाच लोकांचा मृत्यू होईल. आणि त्यावर उपाय काय? तर पंचकशांती करा म्हणजे भटजींना दक्षिणा द्या! बरं ही पाच माणसे कोण-- नातेवाईक, मित्रमंडळी, ओळखीचे की आणखी कोणी असा प्रश्न मी भटजींना विचारला होता.त्यावर त्यांचे उत्तर--’शास्त्रात तसा उल्लेख नाही’. माझा पुढचा प्रश्न होता की ही पाच माणसे मरायची Timeframe किती? जर पुढच्या ५० वर्षांत पाच माणसे मरतील असे त्यांचे म्हणणे असेल तर ते सांगायला भटजी का हवेत? मी सुध्दा Law of averages वापरून ते सांगू शकतो कारण परक्या माणसांपैकी सोडाच आमच्या जवळच्या नात्यातील ५ पेक्षा जास्त मंडळी त्या वेळी ५० पेक्षा जास्त वयाची होती. त्यावर भटजींचे उत्तर--’शास्त्रात तसा उल्लेख नाही’. एका माणसाचा अमुक एका तिथीवर झालेला मृत्यू आणि त्या कारणाने इतर पाच जणांचा मृत्यू होणे या गोष्टी परस्परावलंबी असतात यावर सुशिक्षित लोकांचा विश्वास बसूच कसा शकतो?मी घरातील सर्वात लहान होतो तरीही मी हे मुद्दे माझे वडिल नुकतेच गेलेले असतानाही मांडून पंचकशांती अजिबात करू नये असे म्हटले. पण आपल्या ’महान’ भारतीय संस्कृतीच्या परंपरेप्रमाणे लहानांनी स्वत:ची मते मांडणे नव्हे स्वत:ची स्वतंत्र मते ठेवणे हेच मोठे पाप असते आणि मोठे लोक जे ठरवतील तेच लहानांनी करणे अपेक्षित असते! तेव्हा ’तू लहान आहेस तुला काही कळत नाही’ असे म्हणून माझी बोळवण करण्यात आली आणि मी मृत व्यक्तीचा मुलगा म्हणून मलाच पंचकशांतीला बसून भटजी सांगतील तेव्हा सव्य-अपसव्य करायची सक्ती केली गेली होती.
माझा प्रश्न: सुशिक्षित लोकसुध्दा अशा भूलथापांना बळी कसे पडतात? याचे कारण म्हणजे ’चुकून पाच लोक खरोखरच गेले तर त्याचे बालंट आपल्यावर येईल’ ही भिती. आणि पंचकशांती करूनही असे पाच लोक गेले तर परत हे हात वर करायला मोकळे की बघा आम्ही पंचकशांती केली होती तेव्हा झाले त्यात आमचा काही दोष नाही!
पुढे पंचक या प्रकरणाची माहिती गोळा केली.तेव्हा मला कळले की केवळ दशमीच नाही तर इतर चार तिथ्यांच्या दिवशी (नक्की तिथ्या कोणत्या हे लक्षात नाही) पण एखाद्याचे निधन झाले तरी पंचक लागते. इतकेच काय तर पंचकाप्रमाणेच ’तीन लोक मरतील’ असे त्रिपाद (की तत्सम काहीतरी) आणि ’दोन लोक मरतील’ असे काहीतरी (नक्की शब्द आठवत नाही) असते आणि त्यांचीही ’हक्काची’ पाच नक्षत्रे असतात. म्हणजे २७ पैकी १५ नक्षत्रांवर कोणीही गेले (५५.५५% मृत्यू) तरी त्याची शांत व्हावी आणि म्हणजेच आपली दक्षिणेची सोय व्हावी अशी सोय तत्कालीन ब्राम्हणांनी करून ठेवली आहे.
मी स्वत: अगदी ’एकारान्ती’ कोकणस्थ ब्राम्हण आहे आणि माझ्या पूर्वजांनी भिक्षुकीच केली.पण पंचक प्रकरणानंतर भटजी या संस्थेविषयीच एक तिडीक माझ्या डोक्यात गेली आहे. कारण अगदी सुशिक्षित लोकांनाही ’आपण शांत करून घेतली नाही तर आपल्याला पाप लागेल, आपण नरकात जाऊ किंवा पाच लोक मरतील’ असे वाटत असेल तर या भूलथापा दाखवून अशिक्षित लोकांना लुबाडणे खूपच सोपे आहे. आणि असा भितीचा बागुलबोवा दाखवून लोकांना लुबाडणे आणि रामलिंग राजूने सत्यममधील शेअरहोल्डर्सचे पैसे ढापणे यात फार फरक आहे असे वाटत नाही.
अशा काहीतरी बुध्दीला न पटणाऱ्या गोष्टी घुसडून देणे केवळ पंचकापुरते मर्यादित नाही. मधूनमधून सत्यनारायणासारख्या पुजा, मूळ नक्षत्रावर मुलीचा जन्म झाल्यास ’ती घराण्याच्या मुळावर येते’ असे म्हणत शांत करून घेणे, आपल्या हातून मांजर मेल्यास भटजींना दक्षिणा देऊन पापाचे परिमार्जन करणे, पहिली तीन वर्षे करणे अपेक्षित असलेली श्राध्दे, पक्ष, दहावे-तेरावे आणि इतर अनेक गोष्टींचा त्यात समावेश होतो!
जर आपल्या वडिलांविषयी, आजोबा-पणजोबांविषयी कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर त्यांनी केलेली चांगली कार्ये आणखी पुढे नेणे किंवा सत्पात्री दान देणे यासारख्या गोष्टी केल्या तर त्यातून चांगले घडेल असे वाटते.पुण्यात मी डॉ.आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी एक अत्यंत किळसवाणा प्रकार बघितला होता.एका टेंपोवर डॉ.आंबेडकरांचा फोटो लावून त्याला हार घातले होते आणि त्याभोवती दोन तास लोक ’झुठ बोले कव्वा काटे’ यासारख्या गाण्यांवर न थांबता नाचत होते.ते बघून आंबेडकरांच्या आत्म्याने कपाळाला हात मारून घेतला असेल.त्यापेक्षा आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या गोष्टी (शिक्षण घेणे, स्वावलंबी होणे इत्यादी) करणे अधिक योग्य नाही का? तसेच थोडेसे पितरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याबद्दल!
आणि ब्राम्हण समाज गरीब होता म्हणून अशी दक्षिणेची सोय करून ठेवणे हे अजिबात समर्थनीय नाही असे मला वाटते.ही छुप्या मार्गाने केलेली चोरीच झाली! ब्राम्हणांना intellectual कामांमध्ये (शाळेत शिक्षकाचे काम करणे, आयुर्वेदाचा अभ्यास करून वैद्यकी करणे यासारखी) गती होतीच कारण लहानपणापासून शिक्षणाचे महत्व त्यांच्यावर बिंबवले जायचे ना?मग अशी समाजोपयोगी कामे सोडून लोकांना भिती दाखवून स्वत:चे खिसे भरणे समर्थनीय कसे?
आमच्या आय.आय.एम मध्ये दररोज संध्याकाळी इस्त्रीचे कपडे न्यायला आणि इस्त्री करून झालेले कपडे परत द्यायला एक बाई येते. एकंदरीत ती फारशी शिकलेली नाही हे तिच्याकडे बघून लगेच लक्षात येते.आमच्या डॉर्ममध्ये आणि आजूबाजूला काही भटके कुत्रे आहेत.त्या कुत्र्यांनी इस्त्रीचे कपडे फाडू नयेत, घाण करू नयेत म्हणून ती खूपच दक्ष असते. एकदा मी इस्त्रीचे कपडे देत असताना तिने मला सांगितले की जर कुत्र्यांनी कपडे फाडले तर झालेले नुकसान मी माझ्या पैशाने (अर्थातच परवडत नसताना) भरून देईन पण कुत्र्यांना कधीच मारणार नाही. याचे कारण--’कुत्र्यांना मारले तर मला पाप लागेल’. तेव्हा दुसऱ्याचे वाईट केले तर आपल्याला पाप लागेल असे वाटणे ही पापाच्या संकल्पनेची एक चांगली बाजू झाली. आणि कुठल्याकुठल्या पुजा आणि शांत केल्या नाहीत तर तुम्हाला पाप लागेल असे कळत नकळत बिंबवले जाणे ही पापाच्या संकल्पनेची वाईट बाजू झाली. ही अशी भिती दाखवूनच स्वत:च्या दक्षिणेची सोय करणाऱ्यांना आपल्याला पाप लागेल ही भिती वाटत नाही का?
क्लिंटन
प्रतिक्रिया
4 Oct 2010 - 1:52 pm | क्लिंटन
if at all पाच लोक गेल्याची अनुभूती कोणाला आली तरी शांत केल्यामुळे पाच लोकांचे प्राण वाचतील याची अनुभूती कायम येईल अशीच व्यवस्था आहे ही. याचे कारण ते पाच लोक कोण आणि ते कधी जातील याची टाईमफ्रेम सांगितलेली नाही.म्हणजे
१. पंचकशांती केली नाही आणि कोणी गेले तर म्हणायचे शांत केली नाही म्हणून ते गेले.
२. पंचकशांती केली नाही आणि तरी कोणी गेले नाही तर म्हणायचे की ’थांबा. अजून ’ती’ टाईमफ्रेम उलटलेली नाही आणि त्यापूर्वी कधीही लोक जाऊ शकतात’.
३. पंचकशांती केली आणि कोणी गेले तर म्हणायचे ’अरे तो या पाच जणांमधला नव्हताच’.
४. पंचकशांती केली आणि कोणी गेले नाही तर म्हणायचे ’पंचकशांती केली म्हणून कोणी गेले नाही’
तेव्हा कोणत्याही परिस्थितीत ’पाच लोक वाचतील’ ही अनुभूती येणारच आहे. प्रश्न एवढाच की अशी यंत्रणा योग्य आहे का?
तसा प्रचार तुम्हीही तुमच्या मताचा (प्राणायाम, भगवद्गीता) करत असता. मग त्या माणसाने तो तसा केला तर त्याच्यावर भिती दाखवून पैसे उकळल्याचा आरोप कसा.
याचे कारण परत एकदा सांगतो की प्राणायाम करून तुमचे चांगले होईल असे मी म्हणतो. प्राणायाम केला नाहीत तर तुमचे वाईट होईल असा उलटा प्रचार करत नाही.आणि प्राणायाम करून दिवसभर जास्त energetic वाटते याचे अक्षरश: लाखो अनुभव आहेत आणि त्याचवेळी प्राणायाम करून काही फायदा झाला नाही असे म्हणणारे लोकही सापडतीलच.तेव्हा समोरच्या माणसाला दोन्ही बाजू ऐकून घेऊन योग्य ते मत बनवता येते. पण इथल्या व्यवस्थेत वर म्हटले तरी कोणत्याही परिस्थितीत ’पाच लोकांचा मृत्यू टाळल्याची’ अनुभूती येणारच आहे. उलट शांत केली नाही तर ’ती’ टाईमफ्रेम उलटायच्या आत कोणाचा नंबर लागणार ही भिती असणार आहे. हा बोगस प्रकार नाही का?आणि म्हणूनच तसे करणाऱ्यावर फसवणुकीचा आरोप मी करतो. असो.
बाकी पेशवे एक गोष्ट सांगतो की यावर आपले एकमत होणे कठिण दिसते.आणि ही चर्चा indefinitely चालू राहू शकते.तेव्हा आपण ही चर्चा आता इथे थांबविणे इष्ट असे मला वाटते कारण तेच तेच मुद्दे परत परत येणार आणि कोणीच दुसऱ्याचे ऐकणार नाही.तेव्हा let's agree to disagree. थोड्या वेळापूर्वी तात्यांना ऑफर दिलीच आहे हॉटेलात जाऊन सूप प्यायची. नुसते सूपच काय आपण चांगला पुख्खा झोडून येऊ आणि बिल मी भरणार. तेव्हा आपण उरलेली चर्चा तिथे करू. How about that?
क्लिंटन
4 Oct 2010 - 3:04 pm | llपुण्याचे पेशवेll
असो तुमची इच्छा नाही तर इथेच थांबू.
बाकी पुख्खा झोडायला झोडायला कुठेही येऊ शकतो पण शुद्ध शाकाहारी असल्याने तशी व्यवस्था व्हावी. :)
4 Oct 2010 - 3:30 pm | योगप्रभू
(दोघांनीही ह. घ्या.)
भलतीच अपेक्षा काय करता? तुम्ही पुण्याचे पेशवे. तुम्हाला जेवणावळींची सवय. तो एकारान्त कोकणस्थ. स्वतः पोटभर जेवला तरी खूप झाले म्हणायचे.
4 Oct 2010 - 4:01 pm | क्लिंटन
अहो पेशवेही ’एकारान्त’ नसले तरी कोकणस्थच होते की. :) नाही हो पेशवे योगप्रभूंचे एकू नका. मी अगदी पोटाला तडस लागेपर्यंत खातो आणि मी ही शाकाहारीच. ह.घ्या. हे सांगणे न लागे.
क्लिंटन
4 Oct 2010 - 4:06 pm | llपुण्याचे पेशवेll
सहमत आहे. मी पण पोटाला तडस लागेपर्यंत शाकाहारी खाणे खातो. अंबळ पुण्यात कधी येताय बोला ;) भेटूच.
4 Oct 2010 - 7:15 pm | मृत्युन्जय
मी पण शाकाहारीच आहे. वर पुण्यातच राहतो.
4 Oct 2010 - 7:23 pm | यशोधरा
अरेच्या! शेवटी पुख्खे झोडण्यासाठीच का केला होता दोघांनी हा अट्टाहास? उगाच त्या भटाभिक्षुकांना उचक्या लावून दिल्यात राव!
दोघांनीही हलके घेणे :) चर्चा वाचनीय होती हे वेगळे सांगायची गरज नाही :)
4 Oct 2010 - 5:08 pm | स्वैर परी
@ क्लिन्टन : मला तुमचा अभ्यास आणि हिरिरी याची दाद द्याविशी वाटते. तुम्ही नमूद केलेल्या सर्व मतांशी मी सहमत आहे.
काठावर बसुन वाचत होते, पण प्रतिक्रिया दिल्यावाचुन राहावले नाहि. :)
10 Oct 2010 - 4:59 pm | प्रभाकर कुळ्कर्णी
हे पहा .-----http://www.newton.dep.anl.gov/askasci/gen99/gen99535.htm
http://www.thisismyindia.com/ancient_india/achievement-of-ancient-india....
http://search.intelius.com/The-Great-Khali/pictures
http://en.wikipedia.org/wiki/List_of_Indian_inventions_and_discoveries
10 Oct 2010 - 5:19 pm | प्रभाकर कुळ्कर्णी
एकुलता एक सम्राट ज्याने पार अफगाणिस्तान पर्यंत एक छत्री भारतीय साम्राज्य तयार केलं होतं आपल्या पराक्रमाने व त्या नन्तर कैक हजार वर्ष कुनी दुश्मन भारता कडे पहायची पन हिम्मत करु शकला नाही. त्या सम्राट चंद्रगुप्त मौर्य चा गुरु आर्य चाणक्य हा ब्राह्मण होता हे काय कमी आहे काय? "भारतीय ईतिहासातील सहा सोनेरी पाने" बाय वीर सावरकर ( खरे खरे ब्राह्मण)ज्याने वाचले नाही त्याला भारतीय ईतिहासच माहीत नाही. माझ्या मते ते पुस्तक अगदी कम्पलसरी केलं पाहीजे पुर्न भारतातील शिक्शनात सर्व भाषांत ट्रान्सलेट करुन कायद्याने. बाय द वे. जेव्हा अलेक्जान्डर भारतात आला होता तेव्हा त्याच्या लोकांनी भारतीय ब्राह्मणांचे काय वर्णन लिहुन ठेवले आहे ते वाचा. मग कळेल ब्राह्मण काय होते ते? आक्सफर्ड डिक्शनरीत कुठल्याच भारतीय जाती बद्दल माहीती नाही. पन ब्राह्मण हा शब्द व त्याची माहीती आहे. का? त्यांना माहीत आहे व होते की ब्राह्मण काय होते काय आहेत काय असु शकतील? गर्व से कहो हम ब्राह्मण है!
हिन्दु कुष पर्वत हे नाव का पडले आहे अफगाणिस्तान मधील पर्वताचे?
10 Oct 2010 - 6:18 pm | क्लिंटन
जरा हा लेख आणि त्यावर झालेल्या चर्चेत मी लिहिलेले प्रतिसाद वेळ काढून वाचा म्हणजे सगळ्या ब्राम्हणांना दोष दिलेला नाही तर कर्मकांडांचे स्तोम माजविणाऱ्यांना दोष दिला आहे हे आपल्या लक्षात येईल.
नाही ना. पण चाणक्याने अतिशय सेन्सिबल असे अर्थशास्त्र लिहिले आणि आदर्श राज्यकारभार कसा करावा ते सांगून ठेवले ते आजच्या काळातही लागू होते. तेव्हा ती गोष्ट जरूर घेण्यासारखी आहे.चाणक्याने कर्मकांडाचे स्तोम माजविले का? नाही ना? असे स्तोम न माजविणाऱ्यांविषयी माझे काहीही म्हणणे नाही.
होय मी ते पुस्तक वाचले आहे. मूळ मराठी नाही पण त्याचे इंग्लिश भाषांतर. आणि वीर सावरकर हे खरे खरे ब्राम्हण हे १००% मान्य. कारण त्यांनी हिंदूंनी विज्ञान हाच धर्म पाळावा असे सांगितले आणि कोणत्याही कर्मकांडांना थारा दिला नाही.
अवांतर: सावरकरांचे हिंदुत्व पटलेल्यांना त्यांचा शास्त्रीय दृष्टीकोन पटला नाही आणि त्यांचा शास्त्रीय दृष्टीकोन पटलेल्यांना त्यांचे हिंदुत्व पटले नाही.त्यामुळे सावरकरांना इतर नेत्यांप्रमाणे अनुयायी मिळाले नाहीत.तरीही ’मी आज जी गोष्ट सांगतो ती लोकांना अनेक वर्षांनी पटते आणि त्यासाठी माझी अनेक वर्षे थांबायची तयारी आहे’ असे म्हणायचे conviction केवळ सावरकरांकडेच होते. आणि आजनाउद्या सगळ्यांना त्यांचे विचार पटतील याविषयी कोणतीही शंका नाही.
क्लिंटन
10 Oct 2010 - 5:34 pm | प्रभाकर कुळ्कर्णी
FACTS TO MAKE EVERY Indian PROUD
Q. Who is the GM of Hewlett Packard (hp) ?
A. Rajiv Gupta
Q. Who is the creator of Pentium chip (needs no introduction as 90% of the today's computers run on it)?
A. Vinod Dahm
Q. Who is the third richest man on the world?
A. According to the latest report on Fortune Magazine, it is Azim Premji, who is the CEO of Wipro Industries. The Sultan of Brunei is at 6 th position now.
Q. Who is the founder and creator of Hotmail (Hotmail is world's No.1 web based email program)?
A. Sabeer Bhatia
Q. Who is the president of AT & T-Bell Labs (AT & T-Bell Labs is the creator of program languages such as C, C++, Unix to name a few)?
A. Arun Netravalli
Q. Who is the new MTD (Microsoft Testing Director) of Windows 2000, responsible to iron out all initial problems?
A. Sanjay Tejwrika
Q. Who are the Chief Executives of CitiBank, Mckensey & Stanchart?
A. Victor Menezes, Rajat Gupta, and Rana Talwar.
Q. We Indians are the wealthiest among all ethnic groups in America , even faring better than the whites and the natives.
There are 3.22 millions of Indians in USA (1.5% of population). YET,
38% of doctors in USA are Indians.
12% scientists in USA are Indians.
36% of NASA scientists are Indians.
34% of Microsoft employees are Indians.
28% of IBM employees are Indians.
17% of INTEL scientists are Indians.
13% of XEROX employees are! Indians.
Some of the following facts may be known to you. These facts were recently published in a German magazine, which deals with WORLD HISTORY FACTS ABOUT INDIA .
1. India never invaded any country in her last 1000 years of history.
2. India invented the Number system. Zero was invented by Aryabhatta.
3. The world's first University was established in Takshila in 700BC. More than 10,500 students from all over the world studied more than 60 subjects. The University of Nalanda built in the 4 th century BC was one of the greatest achievements of ancient India in the field of education.
4. According to the Forbes magazine, Sanskrit is the most suitable language for computer software.
5. Ayurveda is the earliest school of medicine known to humans.
6. Although western media portray modern images of India as poverty striken and underdeveloped through political corruption, India was once the richest empire on earth.
7. The art of navigation was born in the river Sindh 5000 years ago. The very word "Navigation" is derived from the Sanskrit word NAVGATIH.
8. The value of pi was first calculated by Budhayana, and he explained the concept of what is now k! nown as the Pythagorean Theorem. British scholars have last year (1999) officially published that Budhayan's works dates to the 6 th Century which is long before the European mathematicians.
9. Algebra, trigonometry and calculus came from India . Quadratic equations were by Sridharacharya in the 11 th Century; the largest numbers the Greeks and the Romans used were 106 whereas Indians used numbers as big as 10 53.
10. According to the Gemmological Institute of America, up until 1896, India was the only source of diamonds to the world.
11. USA based IEEE has proved what has been a century-old suspicion amongst academics that the pioneer of wireless communication was Professor Jagdeesh Bose and not Marconi.
12. The earliest reservoir and dam for irrigation was built in Saurashtra.
13. Chess was invented in India .
14. Sushruta is the father of surgery. 2600 years ago he and health scientists of his time conducted surgeries like cesareans, cataract, fractures and urinary stones. Usage of anaesthesia was well known in ancient India .
15. When many cultures in the world were only nomadic forest dwellers over 5000 years ago, Indians established Harappan culture in Sindhu Valley ( Indus Valley Civilisation).
16. The place value system, the decimal system was developed in India in 100 BC.
Quotes about India .
We owe a lot to the Indians, who taught us how to count, without which no worthwhile scientific discovery could have been made.
Albert Einstein.
India is the cradle of the human race, the birthplace of human speech, the mother of history, the grandmother of legend and the great grand mother of tradition.
Mark Twain.
If there is one place on the face of earth where all dreams of living men have found a home from the very earliest days when man began the dream of existence, it is India .
French scholar Romain Rolland.
India conquered and dominated China culturally for 20 centuries without ever having to send a single soldier across her border.
Hu Shih
(former Chinese ambassador to USA )
ALL OF THE ABOVE IS JUST THE TIP OF THE ICEBERG, THE LIST COULD BE ENDLESS.
BUT, if we don't see even a glimpse of that great India in the India that we see today, it clearly means that we are not working up to our potential; and that if we do, we could once again be an evershining and inspiring country setting a bright path for rest of the world to follow.
I hope you enjoyed it and work towards the welfare of INDIA .
Say proudly, I AM AN INDIAN.
Please forward this email to all known INDIANS................
10 Oct 2010 - 5:36 pm | Nile
कुठल्या शाळेत जाता तो तुम्ही? ;-)