सौंदर्यामधुन नित्य ती चालते

प्रशांत उदय मनोहर's picture
प्रशांत उदय मनोहर in विशेष
14 Mar 2010 - 1:52 pm
छंदशास्त्र

लॉर्ड बायरन् यांची "शी वॉक्स इन् ब्यूटी" ही कविता इंटरनेटवर मिळाली. आणि स्वैर अनुवाद करण्याची हुक्की पुन्हा आली. यात प्रत्येक ओळीसाठी बाराक्षरी छंद (६+६) वापरला असून शेवटल्या अक्षरांच्या आकार-इकार-उकारांमध्ये मूळ कवितेनुसार (१२१२१२; ३४३४३४; ५६५६५६) यमकांची मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे. मूळ कवितेच्या आशयाशी या कवितेचा आशय कितपत जुळतोय हे तुम्हीच सांगा.

सौंदर्यामधुन नित्य ती चालते,
निरभ्र आकाशी चांदण्यांची रात.
कृष्णधवलांचे लावण्य नांदते,
तिच्या असण्यात, तिच्या नयनांत.
लाभले रात्रीस मंद चांदणे, जे
स्वर्गे नाकारले दिनास प्रदीप्त!

ओज होता न्यून छटा वा अधिक
नासेल क्षणात अमोल रूप, जे
वाहे काळेभोर कुरळ केसांत,
नी तिचा चेहरा मंद तेजाळते.
किती ते लाघवी, निर्मळ, निश्चित!
व्यक्त विचारांचे जणु आगर ते!!

तिच्या गालांवरी नी भुवयांवरी
शांत, हळुवार, तरीही सुस्पष्ट
तेजस्वी कटाक्ष नी हास्य लाघवी
जगले सुखाचे क्षण जे, कथत
सर्वलाभे शांती आत्म्यां लाभलेली
निखळ प्रेमे वा मानस जे व्याप्त.

मूळ प्रकाशन माझ्या ब्लॉगवर.

हा अनुवाद करण्यास प्रोत्साहन दिल्याबद्दल शुचि यांचे विशेष आभार.

प्रतिक्रिया

शुचि's picture

14 Mar 2010 - 3:43 pm | शुचि

मस्त जमलीये ...... ही माझी सर्वात लाडक्या कवितांपैकी एक.
>>किती ते लाघवी, निर्मळ, निश्चित!
व्यक्त विचारांचे जणु आगर ते>>>>

आगर शब्द मस्त

***********************************
हॅपीनेस चूझेस इट्स ओन टाइम.

प्रशांत उदय मनोहर's picture

14 Mar 2010 - 4:14 pm | प्रशांत उदय मनोहर

धन्यवाद शुचि
आपला,
(मिपाकर) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

प्राजु's picture

14 Mar 2010 - 11:15 pm | प्राजु

तिच्या गालांवरी नी भुवयांवरी
शांत, हळुवार, तरीही सुस्पष्ट
तेजस्वी कटाक्ष नी हास्य लाघवी
जगले सुखाचे क्षण जे, कथत
सर्वलाभे शांती आत्म्यां लाभलेली
निखळ प्रेमे वा मानस जे व्याप्त.

मस्त!!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.com/

स्पंदन's picture

29 Mar 2010 - 8:06 am | स्पंदन

अप्रतिम...!!!

मस्त!!

स्पंदन.

अविनाशकुलकर्णी's picture

3 May 2010 - 4:48 pm | अविनाशकुलकर्णी

She Walks In Beauty like the night a poem by Lord Byron

She walks in beauty, like the night
Of cloudless climes and starry skies;
And all that's best of dark and bright
Meet in her aspect and her eyes:
Thus mellowed to that tender light
Which heaven to gaudy day denies.

One shade the more, one ray the less,
Had half impaired the nameless grace
Which waves in every raven tress,
Or softly lightens o'er her face;
Where thoughts serenely sweet express
How pure, how dear their dwelling place.

And on that cheek, and o'er that brow,
So soft, so calm, yet eloquent,
The smiles that win, the tints that glow,
But tell of days in goodness spent,
A mind at peace with all below,
A heart whose love is innocent!

GR* भावानुवाद..मस्त जमलिय

स्वैर परी's picture

4 Oct 2010 - 2:19 pm | स्वैर परी

जमलयं!!! :) :) :)

यशोधरा's picture

4 Oct 2010 - 2:23 pm | यशोधरा

मस्त!