गाभा:
आज सगळ्यांची आत्यंतिक गरज बनलेला मोबाईल फोन हा संदेशन आणि करमणुकीचे साधन म्हणून विकसित झाला. अजून ५ वर्षांनी जन्माला येणार्या मोबाईल फोन मध्ये काय असायला हवं याचा विचार करत होतो. तेव्हा काही कल्पना डोक्यात आल्या. मोबाईल फोन हे धारकाच्या आरोग्यावर गस्त घालणारे उपकरण बनणं शक्य नाही का?
स्मार्ट फोन, बिझनेस फोन याच्या पलिकडे जाउन मोबाईलचे नवं रुप हेल्थफोन म्हणून असित्वात यायला काय हरकत आहे.
- रक्तदाब आणि शर्करा मोबाइल फोन वर मोजता यायला हवी
- हृदयाच्या गतीवर तसेच रक्तातील प्राणवायुवर मोबाईलने देखरेख ठेवायला हवी
- झोपेच्या दर्जावर मोबाईलने देखरेख ठेवता यावी.
वर व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अगोदरच तंत्रज्ञान विकसित झालेले आहे. या तंत्रज्ञानाचा मोबाईल बरोबर संकर घडवून आणणे का शक्य नसावे?
प्रतिक्रिया
1 Oct 2010 - 9:47 am | गुंडोपंत
ते सोडा हो...
शुगर वगैरे पाहतील आमचे डॉक्टर.
त्यापेक्षा आम्हा म्हाताऱ्यांना वाचता येतील आणि चष्मा न लावता सापडतील अशी बटने बनवली तरी खुप झाले!
शिवाय हे बारके फोन कुठे हरवून जातात तेही कळत नाही. तुम्ही कुणाला सांगणार असाल तर चांगले मोठे फोन बनवा म्हणा त्यांना. हातात धरता येतील असे.
सारखा फोन हरवणारा
1 Oct 2010 - 3:19 pm | गणपा
हॅ हॅ हॅ पंत वॉक्या टॉक्या वापरा ;) हाकाअनाका.
2 Oct 2010 - 11:27 am | गुंडोपंत
तसाच हवा फोन. शिवाय त्याला गोलसर केला आणि चांगले तगडे व्हायब्रेटर लावले तर निम्म्या समाजात झकास खप होईल त्याचा अशी आम्हाला खात्रीच आहे! ;)
2 Oct 2010 - 11:30 am | Nile
खात्री स्वानुभवाने झालेली दिसते, गुंडो (आता पंत तरी कसे म्हणावे ब्वॉ?)
2 Oct 2010 - 11:41 am | गुंडोपंत
गुंडोपंत असे संबोधन मला बरे वाटते!
तरुण असतांना आमचा भर बोलण्यापेक्षा कृतीवर असे. पण हल्लीचे तुमच्या सारखे तरूण कृती करण्यापेक्षा मिपावरच पडीक दिसतात...
राहिला मुद्दा स्वानुभवाचा - अर्थातच स्वानुभव! मी तर नेहमीच वापरतो कारण व्हायब्रेटरने मानदुखी जरा कमी होते. तेव्हा माने जवळ गोलसर आकाराचा व्हायब्रेटर खरोखर बरा पडतो. तुम्ही वापरला नसेल तर वापरून पाहा.
2 Oct 2010 - 11:46 am | Nile
आधी ठरवा ब्वॉ काय लिहायचे आहे ते.
आधी म्हणता म्हातारे आहात, मग म्हणता पडत नाही का काय, मग हे सगळेच संपादित काय करतात. साठी बुद्धी की काय?
असो, अश्लिल बोलायचे असाल तर ते बोला की पण मग मान दुखीची फुटकळ सबब कशाला?
2 Oct 2010 - 11:55 am | गुंडोपंत
आता पुरे! कशाला म्हातार्याला छ्ळताय?
1 Oct 2010 - 6:44 pm | संदीप चित्रे
http://www.squidoo.com/mobilephoneforseniors
1 Oct 2010 - 10:01 am | वेताळ
मोबाईल गळ्यात अडकवण्यासाठी दोरी मिळते ती वापरा.मोबाईल त्याला बांधुन खिशात ठेवला तरी चालेल.
1 Oct 2010 - 10:16 am | विजुभाऊ
त्यापेक्षा मोबाईल फोन चारजरच्या कनेक्षनलाच अडकवून ठेवावा.
म्हणजे फिक्स मोबाइल कनेक्षन मिळेल. मोबाईल जागेवरच सापडेल.
1 Oct 2010 - 10:20 am | गुंडोपंत
दोरी वापरतोच.
पण आंघोळीला जातांना कुठे तर काढून ठेवला तो सापडेचना...
त्यातच तो ढिस्चार्ज झाला.
म्हंट्लं, मरोत तो मोबाईल.
ज्याला असेल गरज तो येईल धडपडत. तेव्हढीच डोक्याला शांतता,
आणि लगेच १० मिनिटात सापडला हो!
आंघोळीहून आल्यावर चुकून मीच त्याच्यावर अंगपुसायचा टावेल टाकला होता. आमच्या हीने तो वाळत घालायला उचलला तर खाली मोबाईल.
चालायचेच!
1 Oct 2010 - 10:25 am | वेताळ
पण मोबाईल हरवल्यावर खुपच मोकळे मोकळे वाटते.मोबाईल जितका महत्वाचा तितका वैताग आणणारा आहे.
1 Oct 2010 - 11:49 am | स्वैर परी
आगदी बरोबर! माझा मोबाईल एकदा मुम्बई हुन पुण्याला येताना मझ्या हातातुन सटकुन बस खाली आला. सम्पूर्ण एक आठवदा माझ्याकडे फोन नव्हता. कित्त्त्त्त्ती बर वाटल म्हणुन सान्गु!!!
2 Oct 2010 - 9:52 am | पाषाणभेद
आधी धाग्याचे नाव वाचले अन नंतर....
>>>दोरी वापरतोच.
हॅ हॅ हॅ
>>> पण आंघोळीला जातांना कुठे तर काढून ठेवला तो सापडेचना...
हॅ हॅ हॅ... हॅ हॅ हॅ....
>>> त्यातच तो ढिस्चार्ज झाला.
हॅ हॅ हॅ...हॅ हॅ...हॅ हॅ हॅ...
>>> म्हंट्लं, मरोत तो मोबाईल.
हॅ हॅ हॅ...हॅ हॅ...हॅ हॅ हॅ...हॅ... हॅ... हॅ....
>>> आंघोळीहून आल्यावर चुकून मीच त्याच्यावर अंगपुसायचा टावेल टाकला होता. आमच्या हीने तो वाळत घालायला उचलला तर खाली मोबाईल.
हॅ हॅ हॅ...हॅ हॅ...हॅ हॅ हॅ...हॅ... हॅ... हॅ....हॅ हॅ हॅ...हॅ हॅ...हॅ हॅ हॅ...हॅ... हॅ... हॅ....
अवांतर: तुम्हाला लागणार्या गोष्टींनीयुक्त मोबाईल (फोन हो) चेनै च्या एका कंपनीने काढलेला आहे. नाव विसर्लो. मार्केटात येईलच. तवा तोच घ्या.
तुमचा मोबाईल वाजतोय खनाखना...
1 Oct 2010 - 10:11 am | विजुभाऊ
गुंडोपंताशी सहम्त.
बहुतेक मोबाईल फोनचे फॉन्ट्स फारच लहान असतात विषेशतः इन्कमिंग फोन चा नंबर चष्मा लावल्याशिवाय वाचताच येत नाही.
मोबाईल फोनमध्ये काय काय हवे.
माझ्या मते.
१)मोबाईल फोनम्मध्ये रहायला जागा मिळाल्यास मुम्बैतील जागांचे प्रश्न एकदम निकालात येतील.
२) माणसाला मोबाईलफोन तर्फे प्रवासाची सोय झाली पाहिजे. ( इकडून फोनमध्ये लॉगिन्न केले की तिकडून बाहेर पडता आले पाहिजे )
३) एकाच फोनमध्ये नवरा आनि बायको या दोघानाही रहाण्याची सोय असावी. म्हणजे मतभेद झाल्यास कोणालाही सर्रळ डीलीत करता येईल
४) मोबाइल मध्ये बोलणार्या माणसाचा चेहेरा दिसायला हवा. म्हणजे तो नक्की कोठून बोलतोय ते कळू शकेल
५) मोबाइल मध्ये बोलणाराभोवतालचे वातावरण बदलायची सोय असायला हवी म्हणजे आपण कुठे आहोत हे ऐकणाराला कळणार नाही
६) मोबाईलवरून थापा मारणाराना मोबाईलने डीटेक्ट करायला हवे.
७) मोबाइल थेट मेंदूशी कनेक्ट करता यायला हवा. म्हणजे हवी ती महिती/पुस्तके वगैरे डायरेक्ट डाऊनलोड /अपलोड करता येतील ( मॅट्रीक्स ष्टाईल)
८) ..... अजून आठवले की साम्गतो
1 Oct 2010 - 8:02 pm | शेखर
विजुभाऊ,
तुमचा स्वप्नप्रवास चालु झालेला दिसतोय. ;)
1 Oct 2010 - 10:53 pm | टिउ
अश्लील प्रतिसाद!
4 Oct 2010 - 7:22 pm | धमाल मुलगा
टिऊल्या...मेल्या.... =)) =))
1 Oct 2010 - 10:17 am | अनिल २७
मला नवीन मोबाईल पाहीजे...
1 Oct 2010 - 10:24 am | गुंडोपंत
मला नवीन मोबाईल पाहीजे... कशाला म्हणे?
आहे त्या मोबाईल मधून आवाज जातो - आवाज येतो ना?
पाहिजे त्याला (क्रेडिट असेल तर) फोन करता येतो ना?
हे महत्त्वाचे आहे. अजून काय हवे?
शिवाय एस एम एस करता येतात हेच खूप झाले.
किती वाढवायच्या गरजा? आणि कशासाठी?
1 Oct 2010 - 10:33 am | अनिल २७
नाही, मला पाहिजे म्हणजे पाहीजेच नवीन मोबाईल..
1 Oct 2010 - 10:26 am | नितिन थत्ते
त्यातून फोन करता आला पाहिजे.
बाकी काही नसले तरी चालेल.
(एच टी सी तल्या ९९% गोष्टींचा वापर न करणारा)
1 Oct 2010 - 10:30 am | गुंडोपंत
एच टी सी ही काय भानगड काय अस्ते?
आम्हाला आपला मोबाईलच माहिती आहे.
त्यात कोणत्या १०० गोष्टी असतात?
तुम्ही काय वापरता फक्त कॉल घेणे?
1 Oct 2010 - 10:36 am | अनिल २७
तुमच्याकडे एचटीसी आहे? ग्रेट.. माझ्याकडेही तोच आहे.. त्याचा पुर्ण क्षमतेने वापर करा हो, मग कळेल विंडोज मोबाईल काय चीज आहे...
1 Oct 2010 - 10:43 am | गुंडोपंत
अच्छा!
तुम्हा दोघांना असे सांगायचे आहे की तुमच्याकडे लई भारीतले मोबाईल आहेत...
वोक्के! आत्ता कळले.
1 Oct 2010 - 10:50 am | अनिल २७
तुम्हाला कळले हे वाचून अत्यानंद झाला... हेतू सफल झाला.. दिवस कारणी लागला.. मन भरून आले.. डोळे पाणावले..
1 Oct 2010 - 10:41 am | नगरीनिरंजन
१. रहदारीवर लक्ष ठेवणारी आणि त्याप्रमाणे वाहन नियंत्रण करणारी यंत्रणा म्हणजे गाडी चालवताना सुखेनैव बोलता येईल.
२. मोबाईल वापरणारा ठराविक मर्यादेपेक्षा जास्त मोठ्याने बोलू लागल्यास त्याचा गळा आवळण्याची यंत्रणा.
३. रिंग वाजण्यापुर्वी वेळ आणि आजूबाजूची शांतता याचा अंदाज घेऊन रिंगचा व्हॉल्युम नियंत्रित करणारी यंत्रणा.
४. अवेळी फोन आल्यावर पलीकडून सेल्समन बोलत असल्यास त्याचे तोंड फोडण्याची यंत्रणा.
2 Oct 2010 - 8:48 am | शुचि
>> अवेळी फोन आल्यावर >>
अश्लील प्रतिसाद ;)
2 Oct 2010 - 11:08 am | गुंडोपंत
म्हणजे 'पॉइंट ऑफ नो रिटर्न' वर असतांना?
;)
हल्ली अशी वेळच येत नाही हो काय सांगणार... सगळा व्यायाम वाया जातो! ;)
4 Oct 2010 - 7:01 pm | sagarparadkar
>> रहदारीवर लक्ष ठेवणारी आणि त्याप्रमाणे वाहन नियंत्रण करणारी यंत्रणा म्हणजे गाडी चालवताना सुखेनैव बोलता येईल. <<
१०००% सहमत.
याशिवाय मोबाईल फोन जी.पी.एस. नेविगेटर सारखा वापरता येतो का सध्या? नसेल तर तो नेविगेटर म्हणून वापरता यायला हवा. किमान शहरात तरी जी.पी.एस. नेटवर्क ऐवजी मोबाईल सेवा पुरवणार्या कंपन्यांच्या नेटवर्कचा वापर करता येईल का? असा विचार येतो डोक्यात जेव्हा रस्ता चुकतो तेव्हा ...
(अनेकदा रस्ता चुकणारा) सागर
5 Oct 2010 - 12:31 pm | Nile
अश्या सुविधा असलेले फोन सद्ध्या उपलब्ध आहेत.
-स्मार्ट(फोनवाला)
1 Oct 2010 - 10:46 am | चिरोटा
म्हणजे आवडत्या व्यक्तिचा फोन आला की बघता येईल दिल की धडकन कशी आहे ते. विवाहित व्यक्ती तरी हा फोन घेणार नाहीत. न जाणो हापिसातून यायचा कोणाचा तरी फोन कुटुंब बरोबर असताना आणि व्हायचा सत्यानाश.
झोपेचा दर्जा मोबाईल कसा चेक करेल माहित नाही.घोरणे रेकॉर्ड केले तर ठीक आहे.पण घोरणे म्हणजे चांगली झोप् हा गैरसमज आहे.
1 Oct 2010 - 10:59 am | निवेदिता-ताई
हा हा हा ..............लय भारी..............
चालूद्यात..........तुमचे लिहिणे ....आमचे वाचणे...........
वेळ उत्तम जातोय.
1 Oct 2010 - 11:10 am | नितिन थत्ते
गुंडोपंत म्हणतात त्या रक्तदाब साखर वगैरे मोजण्याच्या सोयी झाल्या तर चांगलेच आहे.
स्वगत : त्या सोयी वापरायची वेळ जवळ येत चाललीच आहे. ;)
(प्रौढ)
1 Oct 2010 - 11:17 am | गुंडोपंत
छे हो एच टी सीवाले साहेब.
मी तर म्हणालो की,
वाचता येतील आणि चष्मा न लावता सापडतील अशी बटने लावा त्या फोनच्या काडेपेटीला.
चांगले मोठे फोन बनवा म्हणा त्यांना, हातात धरता येतील असे.
शिवाय कानाच्या जागी चांगली मऊ गादी लावून घेता आली तर पाहा, फार वेळ बोलून कानच दुखायला लागतो कधी कधी.
त्यामुळे आहेत ते फोन सुधारले की मग त्यात काय घालायचे हे पाहता येईल...
असो तुमच्या त्या भारीतल्या फोन मध्ये काय काय गंम्मत जम्मत करता येते ते सांगितले नाही आम्हाला?
1 Oct 2010 - 11:57 am | नितिन थत्ते
>>असो तुमच्या त्या भारीतल्या फोन मध्ये काय काय गंम्मत जम्मत करता येते ते सांगितले नाही आम्हाला?
हे हे हे. ते मला कळले की तुम्हाला पण सांगेन. ;)
(मठ्ठ)
1 Oct 2010 - 11:53 am | विनायक प्रभू
जास्त हवी वाय्ब्रेटर मोड वर.
2 Oct 2010 - 8:49 am | शुचि
खी: खी:
2 Oct 2010 - 11:11 am | गुंडोपंत
व्हायब्रेटर चा तुम्हाला काय उपयोग?
1 Oct 2010 - 12:31 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
इ. इ. इ.
1 Oct 2010 - 1:07 pm | नितिन थत्ते
>>छोटा, मनगटी घड्याळ्याच्या आकाराचा फोन आला तर उत्तम
हे हे हे. आम्हाला (मला आणि गुंडोपंताना) वयानुरुप वाचता येत नाही. मनगटी घड्याळाच्या आकाराचे मोबाईल म्हणजे त्यात आम्ही लोक काय पाहणार आणि काय वाचणार?
(वर्ड फाईल १६०% झूम करून वाचणारा)
1 Oct 2010 - 1:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आंतरजालावर सगळ्या गोष्टी सगळ्यांना कळल्या पाहिजेतच असं नाही तद्वत, फोनची सगळीच मॉडेल्स सगळ्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण करणारी असली पाहिजेतच असं नव्हे!
-- रा.को, चोता दोन
बर्याचदा मला ऑफिसात फोन हातात ठेऊन फिरावं लागतं जे गैरसोयीचं वाटतं! स्त्रियांच्या पारंपारीक भारतीय वेषांमधे खिसा नसल्यामुळे जगाच्या साधारण १/१२ जनतेची गैरसोय होते. त्यांच्या सोयीसाठी असा मनगटी घड्याळ्याएवढा फोन आला तर एवढी का हो तुम्हाला जळजळ?
-- अदित्सु
फोन हा पुस्तकाप्रमाणे वापरू नका, गैरसोय होणार नाही. तुमच्या घरात आलेल्या लँडलाईनवर सुरूवातीला काय वाचता येत होतं? आताही फोन लँडलाईन आहे समजा आणि वापरा.
-- आगकथेतील काड्याकुमारी
1 Oct 2010 - 1:22 pm | सविता
> आगकथेतील काड्याकुमारी
1 Oct 2010 - 1:27 pm | सहज
स्त्रियांच्या पारंपारीक भारतीय वेषांमधे खिसा नसल्यामुळे जगाच्या साधारण १/१२ जनतेची गैरसोय होते.
१२ मधली १ बाई भारतीय असे समजले तरी खिशाचे फायदे अजुन जगाच्या त्या १/१२ जनतेपर्यंत का पोहचले नाही? 'खिसा द्या' आंदोलनाची गरज आहे? आजवर अन्य कोणा पारंपारीक वेशभूषा करणार्या खिसा नाही म्हणून गैरसोय म्हणल्याचे आठवत नाही. मिपावर गेल्या तीन वर्षात ह्या प्रश्नाला का बरे पाशवी वाचा फुटली नाही?
भारतात महीला फॅशन डिझायनर असुनही आजच्या जगात ही गैरसोय का खपवुन घेतली जात आहे?
(लेडीज टेलर सिनेमा पाहीलेला) सहज
1 Oct 2010 - 6:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आयला, तुम्हाला नवीन फोन छोटा बनवता येत नाही तर उगाच आमच्या फॅशनच्या आड येऊ नका. हे म्हणजे फालतू कौलांवर क्लीक करून हात दुखतो म्हणून हात कापा असा उपाय सांगताय तुम्ही! उगाच आम्हाला नको ती आंदोलनं आमच्यावर लादू नका. सहजमामांचा नि षे ध.
(फॅशनेबल) अदिती
1 Oct 2010 - 1:33 pm | विजुभाऊ
स्त्रियांच्या पारंपारीक भारतीय वेषांमधे खिसा नसल्यामुळे जगाच्या साधारण १/१२ जनतेची गैरसोय होते
पारंपारीक पोशाखात सुधारणा करा.
धम्याची ती खिशाखिशाची प्यान्ट होती तशा खिशाखिशाच्या साड्याची फॅशन शोधून काढा की
किंवा चष्याच्या काडीत बसवता येईल असा फोन शोधून काढा.
( माझ्या डोळ्यासमोर बिका च्या चष्म्याला काचांऐवजी दोन एच टी सी मोबाईल बसवलेले आहेत असे आले )
1 Oct 2010 - 6:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
चष्म्यातच बसवायचा फोन तर मग रिस्ट वॉच काय वाईट आहे? बांगडी, कडं, ब्रेसलेट, घड्याळ अशा वेगवेगळ्या फॅशनमधे वापरता येईल फोन!
आणि ज्यांना चष्मा नाही त्यांनी काय उगाच चष्मा वापरायचा का? चष्मा काढून सनग्लासेस वापरल्या की पुन्हा "काडीमोड" करायचा का? आणि ज्यांना कॉण्टॅक्ट लेन्सेस वापरायच्या आहेत त्यांचं काय?
मोबाईलमधे व्हायरस घुसला म्हणून मोबाईल डिशवॉशरमधे टाका असले सल्ले देऊ नका.
2 Oct 2010 - 10:56 am | अनिल २७
बरोबर आहे.. एक्-बारांश जनतेच ऐकलेच पाहिजे... हेअर्-पिन मध्ये मोबाईलची सुविधा देता येईल का यावर उल्हासनगर ईथे कार्यशाळा आयोजित केली गेली आहे. जगभरातून अनेक तज्ञ लक्ष ठेऊन आहेत.. निकाल लागल्यास सांगतो..
4 Oct 2010 - 9:26 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हेअर पिनमधे मोबाईल लावणारे, तुम्हीच ते कॉमनवेल्थवाले सिव्हील इंजिनियर ना??
जगातला एक बारांशपेक्षा जास्त जनतेची (स्त्रियांच्या, अनेक संस्कृतीमधील फॅशनच्या कपड्यांना, खिसे नसतात) सोय पहाणारासुद्धा फोन असावा असं लिहीलं तर एवढा का हो तुमचा पूल मोडतो? ('पापड मोडतो'च्या चालीवर हा वाक्प्रचार वाचणे.)
5 Oct 2010 - 10:55 am | अनिल २७
नाय वो आमी ते कॉमनवेल्थवाले नाय, आम्ही त्यानंतर तोच पूल ५ दिवसांत ऊभा करून देणारे (लष्कराचे असले तरी ) "भारतीय" ईंजिनीअर ! बाकी मी तुमच्याच बोलण्याला दुजोरा दिला तर तुमचा का हो पापड मोडतो ? (पूल मोडतोच्या चालीवर हा वाक्प्रचार वाचणे )
2 Oct 2010 - 3:46 pm | इंटरनेटस्नेही
लोल्स!
साहेब अहो आम्हाला तर वयाच्या २१ व्य वर्षीच वर्ड फाईल १९५% झुम करुन पहावी लागते!
1 Oct 2010 - 10:56 pm | टिउ
हा घ्या!
4 Oct 2010 - 9:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
एग्ग-सलंट! आणि ६८ डॉलर्स (साधारण साडेतीन हजार रूपयांत) असा फोन म्हणजे अजिबातच महाग नाही.
1 Oct 2010 - 1:07 pm | गोरिला
रिन्ग तोन नको.
1 Oct 2010 - 1:08 pm | गोरिला
रिन्ग तोन नको.
1 Oct 2010 - 1:27 pm | सविता
तुमि कोनाचे दुप्लिकेत आय्दि?
2 Oct 2010 - 10:58 am | अनिल २७
प्रविनभप्करचे काय झाले ?
1 Oct 2010 - 1:25 pm | Nile
तुम्हा लोकांनी पॉमेग्रॅनेट फोन पाहिलेला दिसत नाही?
1 Oct 2010 - 2:41 pm | निमिष सोनार
काही हॅण्डसेट मध्ये "डॉट जार "एक्क्स्टेन्शन असलेले डिक्शनरी चे जावा प्रोग्राम इन्स्टॉल केले जावू शकतात, हे मला माहिती आहे.
जसे, k800i या सोनी एरिक्सनच्या मॉडेलसाठी (व सोनीचे इतर काही मॉडेल्स) बाबत सांगायचे झाल्यास नेटवर डीक्शनरी , .jar, free असे शब्द गुगलवर सर्च केल्यास फ्री जार फाईल मिळतील. त्या संगणकातून ब्ल्यू टुथ द्वारे मोबाईलमध्ये पाठवल्यास त्या इन्स्टॉल होतात.
डिक्शनरी मिळते.
तथापी, माझी अशी इच्छा आहे की, प्रत्येक हॅण्डसेटमध्ये आपोआपच डिक्शनरी चा अंतर्भाव असावा.
वेगळी डिक्शनरी टाकण्याऐवजी हॅण्डसेटसोबत तो प्रोग्राम यावा.
याचा शालेय विद्यार्थ्यांपासून सर्वानाच याचा खुप फायदा होईल.
मी वर उल्लेखलेली मोफत (इंग्लीश- इंग्लीश) कुणाला हवी असेल तर मला इमेल पाठवा, खालील पत्त्यावरः
sonar.nimish@gmail.com
मी आपणांस .jar फाईल पाठवेन.
पण, जो हॅण्डसेट जावा सपोर्ट करतो (सोनी एरिक्सन व काही इतर) त्यातच ते चालेल.
---
माझ्या ब्लॉगला जरूर भेट द्या-
http://thinknimish.blogspot.com
---
नुकतेच मिसळपाववर मी लिहिलेल्या एका गूढ कथेचा जरूर आस्वाद घ्या-
http://www.misalpav.com/node/14260
http://www.misalpav.com/node/14316
http://www.misalpav.com/node/14363
http://www.misalpav.com/node/14416
http://www.misalpav.com/node/14458
http://www.misalpav.com/node/14486
-----
1 Oct 2010 - 5:37 pm | अनामिक
मला कोणत्याही पुरुषावर अन्याय झाल्याची सर्वात पहिले बातमी देणारा मोबाईल हवा!
1 Oct 2010 - 6:51 pm | मितभाषी
@अनामिक. =)) =)) =))
ढन्य झाहलो.याची देही याची दोला.
1 Oct 2010 - 5:49 pm | विनायक प्रभू
तर ऑलरेडी मॅन्युफ्रॅक्चर्ड आहे.
1 Oct 2010 - 6:48 pm | धमाल मुलगा
>>मॅन्युफ्रॅक्चर्ड





1 Oct 2010 - 7:57 pm | तिमा
मोबाईल फोनच्या सहाय्याने दाढी करता आली पाहिजे,
व्हायब्रेटो सारखा वापरता आला पाहिजे.
1 Oct 2010 - 8:08 pm | धमाल मुलगा
आयला, उद्या म्हणाल ओपनर पाहिजे, परवा म्हणाल आख्खी स्विस नाईफ पाहिजे. ;)
>>व्हायब्रेटो सारखा वापरता आला पाहिजे.
काय कॉन्सर्टमध्ये वापरता की काय आता? :D
अवांतरः मोबाईल कोण देणार आहे त्यावर माझ्या अपेक्षा अवलंबून असतील. :)
2 Oct 2010 - 9:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>मोबाईल फोनच्या सहाय्याने दाढी करता आली पाहिजे,
लंबर एक प्रतिसाद....! :)
-दिलीप बिरुटे
1 Oct 2010 - 9:57 pm | चिरोटा
साला,चार आण्याची भांग घेतली की हजार आयडिया सुचतात ते खोटे नाय.
1 Oct 2010 - 10:07 pm | मिसळभोक्ता
बॉडी एरिया नेटवर्किंग साठी "गेटवे/राऊटर" म्हणून वापर.
बाकी सूज्ञांस अधिक सांगणे न लगे.
5 Oct 2010 - 6:05 am | पुष्कर जोशी
मला हे http://bit.ly/2PBKNK हवे.
सर्वांनी हे बघाच
यिंटरनेट येडा
-- ढकल कर
इथे दुवा दाखवत नाही आहे काय करावे ?
PCLinuxOS 2010 + Firefox
5 Oct 2010 - 10:09 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
एक्सलंट! पुष्कर, लिंकबद्दल धन्यवाद.
5 Oct 2010 - 1:21 pm | llपुण्याचे पेशवेll
अदितीने म्हटल्या प्रमाणे मनगटी घड्याळायेवढा झालंच तर अंगठी येवढा मोबाईल पाहीजे. पण वेळेला ओढून लांब (झूम) करता आला पाहीजे . म्हणजे म्हातार्यांनी लांब केल्यावर त्याना नीट दिसेल व उपयोग संपल्यावर परत बारीक करून हातावर बांधला किंवा खिशात टाकला. :)