ईडली -चटणी--

निवेदिता-ताई's picture
निवेदिता-ताई in पाककृती
30 Sep 2010 - 7:54 am

साहित्य :-
तीन वाट्या तांदूळ, एक वाटी उडीद्डाळ,(दोन्ही रात्रभर भिजत घालावे, सकाळी मिक्सरमधून वाटून ठेवावे.)
साधारण सहा-सात तासात ईडली पीठ तयार होते.), नारळ एक, भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी, चार-पाच हिरव्या मिरच्या,कोथिंबीर एक वाटी बारीक चिरुन, साखर्,मिठ चविनुसार्,
जिरे-मोहरी,हिग्,हळद, तेल ई. साहित्य... फोडणीसाठी.
दही दोन टेबल स्पून.

कॄती :-ईडली पिठात थोडेसेच मीठ व चिमूट्भर खायचा सोडा घालून, ईडलीपात्रातून ईडल्या करुन घ्याव्यात.

From !! माधुर्य !!

चट्णीचे सर्व साहित्य एकत्र करुन बारीक वाटून घ्यावे,त्यात दही घालावे, सरसरीत करावे,वरुन खमंग फोडणी द्यावी.

From !! माधुर्य !!

एका प्लेट मध्ये ईडली - चटणी ठेवुन सर्व्ह करावी.

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

30 Sep 2010 - 8:01 am | शिल्पा ब

वाह!!! मी परवाच केली होती..
मी २:१ प्रमाण घेते...पण माझी इडली वाफवून तयार होण्यासाठी १५मि. पेक्षा बराच जास्त वेळ लागतो...१५मि. काढली तर बरीच कच्ची राहते..
कोणी कारण आणि उपाय सांगू शकेल का?

निवेदिता-ताई's picture

30 Sep 2010 - 8:12 am | निवेदिता-ताई

इडली तयार झाली हे ओळखण्याची खूण म्हणजे इडली मध्ये सुरीचे टोक घालावे-बाहेर काढ्ल्यावर, त्यास काही कण चिकटले नाहीत तर इडली झाली असे समजावे.ढोकळाही असाच पहावा.

प्रियाली's picture

30 Sep 2010 - 6:39 pm | प्रियाली

कारण हॉटप्लेट असणे शक्य आहे. घरात गॅस आहे का हॉटप्लेट?

बेसनलाडू's picture

1 Oct 2010 - 1:35 am | बेसनलाडू

म्हणजे मायक्रोवेवेबल इडलीपात्र. सध्या तर कम्बाइन्ड इडलीपात्र/मोदकपात्र/ढोकळापात्र मिळते. अर्थात मिळते ते इडली+ढोकळापात्रच; बायको आणि मी त्यात जरासे वेरिएशन करून मोदकपात्र म्हणूनही वापरतो.
(कस्टमाइज्ड्)बेसनलाडू
मात्र यात झालेल्या इडल्या गरमागरमच खाव्यात. थंड झाल्यावर (गॅसवर केलेल्यांच्या तुलनेत) वातड लागतात. तीच गोष्ट उकडीच्या मोदकांची. एकंदरीतच हे पदार्थ गरमागरम खाण्यात मजा आहे.
(खवय्या)बेसनलाडू

प्रियाली's picture

1 Oct 2010 - 3:26 am | प्रियाली

मायक्रोवेवेबल पदार्थांत तेवढी मजा नसते पण

बायको आणि मी त्यात जरासे वेरिएशन करून मोदकपात्र म्हणूनही वापरतो.

बेलाला हल्ली अर्धकच्च किंवा वातड वगैरे (स्वतःच्या हातचं हो - बायकोच्या हातचं खाणं असं असतं असं चुकूनही म्हणायचं नाहीये.) खाण्यातही मजा येत असेल. ;)

मिसळभोक्ता's picture

1 Oct 2010 - 5:57 am | मिसळभोक्ता

किती दिवस चालतं हो असं ?

प्रियाली's picture

1 Oct 2010 - 6:21 am | प्रियाली

चालले तितके दिवस तरी नक्कीच. ;)

घरोघरी तीच इडलीची पात्रं आणि पिठं, त्यानंतर घरकी मुर्गी दाल बराबर.

मिसळभोक्ता's picture

1 Oct 2010 - 10:36 pm | मिसळभोक्ता

आमच्याकडे अजूनही अधून मधून चालू असते ;-)

आणि घरकी दालही मुर्गीबराबर असण्याचे दिवस आलेत हल्लीतर.

*शेवटी दाल असो किंवा मुर्गी, पचायला तर पाहिजे ना ?*

प्रियाली's picture

1 Oct 2010 - 10:38 pm | प्रियाली

आणि घरकी दालही मुर्गीबराबर असण्याचे दिवस आलेत हल्लीतर.

हॅहॅहॅ! तुमच्या ह्या मिपावर लॉग इन करायला लागलेल्या दिसतात. ;)

*शेवटी दाल असो किंवा मुर्गी, पचायला तर पाहिजे ना ?*

अरेरे! असं वय झालेल्या काकांसारखं ;) काय बोलू लागलात एकदम?

मिसळभोक्ता's picture

1 Oct 2010 - 10:42 pm | मिसळभोक्ता

असं वय झालेल्या काकांसारखं काय बोलू लागलात एकदम?

हम बोलेगा तो बोलोगे की बोलता है !

शिल्पा, इडलीसाठी नेहमी ३:१ प्रमाण घ्यावे. तुझ्या प्रमाणात डाळ जास्त झाल्यामुळे वेळ लागतो.
हॉटप्लेट किंवा गॅस असण्याचा काही संबंध असावा असे वाटत नाही. माझी इडली दोन्हीवर हलकी आणि मऊ होते.

इडल्या वाफवण्यासाठी हॉटप्लेट आणि गॅस चा काही संबंध नाहीये. (मी दोन्ही वापरून इडल्या केलेल्या आहेत.)
पीठ योग्य प्रमाणात फर्मेन्ट व्हायला पाहिजे. पीठ कमी फुगले तर इडल्या चांगल्या होतच नाहीत. पण जास्त फुगले (ओवर फर्मेन्ट) तरीदेखील इडल्या व्हायला वेळ लागतो आणि इडल्या थोड्याशा चिवट पण होतात. (ओवर फर्मेन्ट पीठाला थोडासा उग्र वास येतो...त्यावरुन आपण ओळखू शकतो की हे पीठ ओवर फर्मेन्ट झाले आहे )
पीठ व्यवस्थित फुगले असेल तर ५ ते ७ मिनीटात इडल्या वाफवून होतात. ईडली साठी शक्यतो उकडीचा तांदूळ च वापरावा. बासमती नको . उकडीचा तांदूळ न मिळाल्यास ईडली रवा चांगला. डाळ भिजल्यावर ती वाटून मग रवा मिक्स करून पीठ फुगायला उबदार जागी ठेवणे..जसे की बंद ओवन मध्ये.

प्रियाली's picture

1 Oct 2010 - 3:24 am | प्रियाली

इडल्या वाफवण्यासाठी हॉटप्लेट आणि गॅस चा काही संबंध नाहीये. (मी दोन्ही वापरून इडल्या केलेल्या आहेत.)

मीही दोन्ही वापरून इडल्या केल्या आहेत.

हॉट प्लेट तापायला आणि तापल्यावर थंड व्हायला वेळ लागतो. त्यामु़ळे जर इडली १०-१५ मि. वाफवा असे पाककृतीत लिहिले असेल तर त्यावेळात हॉटप्लेटवर इडली बनणार नाही हे निश्चित. तसेच, हॉटप्लेटवर अगदी 'हाय'वर कुकर किंवा इडली पात्र ठेवले की प्लेट फार तापून पाणी उडून जाते पण इडली शिजत नाही असा प्रकारही होतो. त्यामानाने गॅसची ज्योत हायवरही कमी तीव्र असते.

परिकथेतील राजकुमार's picture

1 Oct 2010 - 6:31 pm | परिकथेतील राजकुमार

काय मी मी लावलय ? हे सगळे जेकब ब्लॅकचे फॅन्स असलेच ;)

परावर्ड कलिन्स

प्रियाली's picture

1 Oct 2010 - 8:56 pm | प्रियाली

जेक ब्लॅकला काही बोलायचं कारण नाही हं!

तुमच्या वँपायरसारखा कोल्ड नाही तो. आमच्या हॉटप्लेटसारखा हॉट आहे. ;)

अश्विनीका's picture

5 Oct 2010 - 12:40 pm | अश्विनीका

मी भांड्यातील पाणी उकळले की भांड्यात ईडली पात्र ठेवते आणि वरून झाकण ठेवते. पाण्याला उकळी आल्यानंतर बरोबर ५ ते ७ मिनिटात ईडल्या वाफवून होतात. त्यामुळे गॅस आणि हॉट्प्लेट काहीही असले तरी ईडल्या वाफवायला ५- ७ मिनिटापेक्षा कधी जास्त वेळ लागला नाही. आणि पाणी उडून जाते असे वाटत असेल तर जरा जास्त पाणी भांड्यात ठेवावे.

अजबराव's picture

30 Sep 2010 - 8:42 am | अजबराव

शनिवारचा मेनु हाच आहे आम्च्याकडे...

निवेदिता ताई हल्ली इडलीचा रवा मिळतो बाजारात. तो आपण जेंव्हा उडीद डाळ वाटल्यानंतर मिक्स करुन ठेवतात. म्हणजे वाटणाचा त्रास कमी होतो. जेंव्हा मोठ्या प्रमाणावर इडल्या करायच्या असतात तेंव्हा रवा वरदानच ठरतो.

शिल्पा तु कुठल्या भांड्यात वाफवतेस इडल्या ? पिठ किती तास भिजवतेस ?
इडलीसाठी काही टिप्स :

* गॅस मिडीयम ठेवायचा.
* वाफेसाठी खाली पुरेसे पाणी ठेवायचे.
* भजीसारख सैलसर असत ना पिठ अगदी घट्ट पण ठेवायचे नाही आणि पातळ्पण ठेवायचे नाही.
* पिठ जर जास्त पातळ झाल तर वेळेवर थोडे पोहे वाटून घालायचे.
* शक्यतो उकडीचे तांदुळ किंवा कोणतेही जाडे तांदुळ घ्यायचे.
* वाटून मिक्स करतानाच मिठ घायाच.
* थंडीच्या दिवसात पिठ लवकर येण्यासाठी मिरची ठेवायची पिठात.
* लहानमुलांसाठी पौष्टीक म्हणून पिठात गाजराचा किस, मटार, पालक किंवा इतर आवडत असलेल्या भाज्या घालता येतात.

शिल्पा ब's picture

30 Sep 2010 - 10:25 pm | शिल्पा ब

तांदूळ बासमती घेते...पण आता हा रवा वापरून बघेन..
ढोकळ्याचे पण पीठ / रवा मिळतो ...कुणी वापरलाय का?

परिकथेतील राजकुमार's picture

30 Sep 2010 - 3:43 pm | परिकथेतील राजकुमार

शॉल्लेट !!!

फटु एकदम कातिल.

रेवती's picture

30 Sep 2010 - 5:38 pm | रेवती

रेवती

मेघवेडा's picture

30 Sep 2010 - 7:17 pm | मेघवेडा

एकदम शॉलीट! फोटू लै लै भारी! :)

शुचि's picture

30 Sep 2010 - 9:14 pm | शुचि

तोंपासु

प्रभो's picture

30 Sep 2010 - 9:16 pm | प्रभो

इडली-चटणी.......... आहाहा!!

दीपा माने's picture

30 Sep 2010 - 10:33 pm | दीपा माने

निवेदिताताई व जागुताई आपल्या माहिती बद्दल फार आभारी आहे.

अजबराव's picture

1 Oct 2010 - 5:39 am | अजबराव

थंडीच्या दिवसात पिठ लवकर येण्यासाठी मिरची ठेवायची पिठात..हे माहिति नव्ह्ते..हिरवि मिरचि का?

हो हिरवी मिरची ठेवायची. सुकी ठेवलीत तर तिचा रंग उतरेल इडलीत. ओली मिरची मोडून ठेवलीत तर अजुन चांगले.

गुंडोपंत's picture

1 Oct 2010 - 7:11 am | गुंडोपंत

चित्रावरूनच चविष्ट दिसते आहे.
चटणीचा स्वादच तोंडात तरळला माझ्या!

वा वा वा! एकदा तुमच्याकडे इडली खायला आले पाहिजे!

विसोबा खेचर's picture

1 Oct 2010 - 11:23 am | विसोबा खेचर

वॉव..!

--
काही नगण्य अपवाद वगळता मराठी भावसंगीताची हल्ली बोंबच आहे!

मनि२७'s picture

1 Oct 2010 - 5:10 pm | मनि२७

काय मस्त दिसतेय इडली...!!
सांबर पेक्षा चटणी जास्त आवडते..त्यामुळे पाकृ जास्तच आवडली...
:-)

धमाल मुलगा's picture

1 Oct 2010 - 6:14 pm | धमाल मुलगा

कधी येऊ इडल्या खायला? :)

वसुधा विनायक जोशी's picture

1 Oct 2010 - 10:26 pm | वसुधा विनायक जोशी

चटणी नकोत ,कारण शेंगदाण्यामुळे
वजन वाढते .शेंगादाण्यायेवजी दाळव वापरा .चटणी छान होते.