बुद्धी प्रामाण्य वाद म्हणजे नेमके काय?....प्रत्यक्ष प्रमाण वाद व बुद्धी प्रामाण्य वाद यात नेमका फरक आहे काय ...जेंव्हा आधुनिक विज्ञान नव्हत तेंव्हा माणुस बुद्धीप्रामाण्यवादी नव्हता का? .. बुद्धीप्रामाण्यवाद हा वैज्ञानिक कसोट्यांवर अवलंबून असतो का? ..बुद्धिप्रामाण्य म्हणजे 'केवळ स्व बुद्धीचा वापर आणि स्व बुद्धीच प्रमाण' असे असते का ?
बुद्धीप्रामाण्यवाद सांगतो..विश्वाची व्याप्ती ही ज्याच्या त्याच्या बुद्धीवर अव्लंबून असते. विश्वाची निर्मिती देवाने केली हे बुद्धीप्रामाण्यवादास नामंजूर आहे.. देवाची निर्मिती मानवी मेंदूने केली आहे असं बु.प्रा. मानतो....एक मत....
' स्वरूपज्ञानाच्या वेळी बुद्धीचे डोळे झाकतात. ज्याप्रमाणे नाव नदीच्या तीराला टेकली असता पुढे सरकत नाही , त्याप्रमाणे जेथे बुद्धीचा प्रवेश होत नाही व विचार जेथून मागे फिरतो आणि ज्यांच्या संबंधाने तर्काचे चातुर्य चालत नाही , अर्जुना , त्याचे नाव ज्ञान होय. .श्री अभ्यंकर..आणखि एक मत..
अनेक मते..मग..बुद्धी प्रामाण्य वाद म्हणजे नेमके काय?
प्रतिक्रिया
30 Sep 2010 - 9:56 am | शिल्पा ब
???????
30 Sep 2010 - 12:20 pm | अनिल २७
+१०० % सहमत ... बुद्धीप्रामाण्य वाद हा असाच असतो.. काही कळतच नाही..
30 Sep 2010 - 10:01 am | मिसळभोक्ता
..बुद्धिप्रामाण्य म्हणजे 'केवळ स्व बुद्धीचा वापर आणि स्व बुद्धीच प्रमाण' असे असते का ?
होय.
बाकी उत्तरे आपॉप मिळतील.
30 Sep 2010 - 10:58 am | रणजित चितळे
स्व बुद्धी पेक्षा सु बुद्घी पाहिजे, जि सदसदविवेक बुद्धी ने विचार करुन येते असे वाटते.
30 Sep 2010 - 10:22 am | चिरोटा
स्वतःच्या बुद्धीला प्रमाण मानून घातलेला वाद म्हणजे बुद्धीप्रामाण्यवाद.
30 Sep 2010 - 10:27 am | राजेश घासकडवी
हे श्री अभ्यंकर कोण?
30 Sep 2010 - 11:38 am | प्रकाश घाटपांडे
त्यान्ला भौतेक विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर म्हणायचे असावं. वाईचे डॉ शरद अभ्यंकर नाही. ते बुप्रा वाले आहेत
असो हल्ली बुद्धीप्रामाण्यवाद असा शब्दाऐवजी विवेकवाद असा शब्द वापरला जातो. कुणाची बुद्धी प्रमाण मानायची असा प्रश्न पडतो. नको ते प्रामाण्य आपला विवेक बरा!
30 Sep 2010 - 12:24 pm | अनिल २७
ती कॉपी-पेस्ट च्या सुयोग्य वापरातून घडलेली क्षुल्लक चूक असावी..
30 Sep 2010 - 12:03 pm | अवलिया
>>>बुद्धी प्रामाण्य वाद म्हणजे नेमके काय?....
बुद्धीला पटणारे तेच स्विकारणे.
>>प्रत्यक्ष प्रमाण वाद व बुद्धी प्रामाण्य वाद यात नेमका फरक आहे काय ...
प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे जे ज्ञानेंद्रियांना आकळले जाते (कृत्रिम साधनांच्या सहाय्याने किंवा तसेच)
बुद्धी प्रामाण्यात अनुमान, उपमेय (भारतीय विचारसरणीत शब्द, अर्थवाद, अभाव) इत्यादी प्रमाणे सुद्धा स्विकार्य आहेत.
>>>जेंव्हा आधुनिक विज्ञान नव्हत तेंव्हा माणुस बुद्धीप्रामाण्यवादी नव्हता का? ..
असे काही नाही. उलट जास्त बुद्धीप्रामाण्यवादी होता.. आजकाल केवळ अंधविज्ञानवादी झाला आहे (हे माझे वैयक्तिक मत आहे, लगेच अंगावर धावु नये)
>>>बुद्धीप्रामाण्यवाद हा वैज्ञानिक कसोट्यांवर अवलंबून असतो का? ..
बुद्धीप्रामाण्यवादाला वैज्ञानिक कसोट्यांची गरज नाही.
>>>बुद्धिप्रामाण्य म्हणजे 'केवळ स्व बुद्धीचा वापर आणि स्व बुद्धीच प्रमाण' असे असते का ?
येस्स
>>>बुद्धीप्रामाण्यवाद सांगतो..विश्वाची व्याप्ती ही ज्याच्या त्याच्या बुद्धीवर अव्लंबून असते. विश्वाची निर्मिती देवाने केली हे बुद्धीप्रामाण्यवादास नामंजूर आहे.. देवाची निर्मिती मानवी मेंदूने केली आहे असं बु.प्रा. मानतो....एक मत.... स्वरूपज्ञानाच्या वेळी बुद्धीचे डोळे झाकतात. ज्याप्रमाणे नाव नदीच्या तीराला टेकली असता पुढे सरकत नाही , त्याप्रमाणे जेथे बुद्धीचा प्रवेश होत नाही व विचार जेथून मागे फिरतो आणि ज्यांच्या संबंधाने तर्काचे चातुर्य चालत नाही , अर्जुना , त्याचे नाव ज्ञान होय. .श्री अभ्यंकर..आणखि एक मत..
{झोप आली }
>>>अनेक मते..मग..बुद्धी प्रामाण्य वाद म्हणजे नेमके काय?
वर सांगितले आहे. कळाले असावे.
30 Sep 2010 - 5:24 pm | विनायक प्रभू
ZZZZzzzzzzzzzzzz
30 Sep 2010 - 2:49 pm | अविनाशकुलकर्णी
प्रकाशराव...अवलिया..धन्यवाद