अप्रतिम चवीचे mediterranean salad - तबूले (tabouleh)

जाई अस्सल कोल्हापुरी's picture
जाई अस्सल कोल्हापुरी in पाककृती
29 Sep 2010 - 9:45 pm

साहित्य :
१ वाटी दलिया (दलिया तासभर गरम पाण्यात भिजवून घ्यावा.)
१ वाटी बारीक चिरलेली पार्स्ली
१ वाटी बारीक चिरलेला पुदीना
१ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
१ वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात
१ वाटी बारीक चिरलेली काकडी
१ वाटी बारीक चिरलेला टोमॅटो
मीठ चवीपुरते
३ चमचे जिरेपूड (जिरे खमंग दरवळेपर्यंत भाजुन घ्यावेत.मग त्याची पुड करावी)
२-३ चमचे लिंबाचा रस
ऑलिव्ह ऑईल ३-४ चमचे

कृती:
१) दलिया + पार्स्ली +पुदीना + कोथिंबीर + कांद्याची पात + काकडी + टोमॅटो बाउलमध्ये मस्त एकत्र करावे.
२) चवीपुरते मीठ घालुन व्यवस्थित कालवून घ्यावे.
३) लिंबाचा रस घालावा.
४) ऑलिव्ह ऑईल हळु हळु मिक्स करावे.
५) प्लेट मध्ये घेउन serevr करावे किंवा स्वतः खावे.

**
खुप छान colourful दिसते.
चव वेगळी पण मस्त लागते.
पोट्भरीचे आणि fibres , carbs, vitamins,anti-oxidents भरपूर असल्याने अतिशय nutricious salad आहे.

प्रतिक्रिया

गणपा's picture

29 Sep 2010 - 9:54 pm | गणपा

colourful दिसते

मी रातांधळा झालो की काय..
मला तर कायबी दिसुन न्हाई राह्यलं.

काय वाकड आहे देव जाणे माझं आणि त्याचं.
पण तरीही....
ingredients : वरून असं visualise करायचं!

निवेदिता-ताई's picture

29 Sep 2010 - 10:34 pm | निवेदिता-ताई

१ वाटी बारीक चिरलेली
पार्स्ली..........म्हणजे काय???????????

कसे लागते.........

प्लेट मध्ये घेउन
स्वतः खावे.
हे जास्त चांगले...तसेच करीन.

पैसा's picture

29 Sep 2010 - 10:49 pm | पैसा

पार्स्ली म्हणजे कोथिंबिरीसारखी दिसणारी एक वनस्पती. तिची पानं थोडी मोठी अस्तात.
parsley

ती साधारणपणे मोठ्या शहरांत मिळते. फलटणला मिळणं थोडं कठीण दिसतंय.

कवितानागेश's picture

29 Sep 2010 - 11:07 pm | कवितानागेश

(दलिया तासभर गरम पाण्यात भिजवून घ्यावा.)>>>>
यामुळे शिजल्यासरखा मऊ होईल का?
चिकट होणार नाही ना?

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

30 Sep 2010 - 11:59 am | जाई अस्सल कोल्हापुरी

दलिया २-३ वेळा धुवून घ्यावा. आणि त्यावर उकळते पाणी (साधारण दुप्पट) ओता. आणॉ झाकुन ठेऊन द्या.
अगदी मऊ होतो. आणि तो पुर्ण शिजला नसल्याने जास्ती nutricious असतो. अश्या form मध्ये दलिया कधी खाल्ला जात नाही. आणि मस्त तो पिळुन घ्या. नंतर मग लिंबाचा रस ,जिरेपूड सगळे फ्लेवर्स स्पंज सारखे अब्सोर्ब करतो.

शिल्पा ब's picture

29 Sep 2010 - 11:14 pm | शिल्पा ब

दलिया का कुसकुस?
आणि फोटो कुठाय?

मितान's picture

29 Sep 2010 - 11:38 pm | मितान

मी या सॅलडमध्ये कुसकुस वापरते. दलिया खूप वेळ शिजवल्याशिवाय मऊ होत नाही. यात मऊ लागणे अपेक्षित नाही का ?

शेखर's picture

29 Sep 2010 - 11:40 pm | शेखर

कुसकुस म्हणजे?

कुंदन's picture

29 Sep 2010 - 11:47 pm | कुंदन

अरे कुसकुस म्हणजे आपण शिर्‍यासाठी वापरतो त्या प्रकारचा रवा.
ट्युणिशिया नामक देशातील एक प्रसिद्ध पा कृ आहे ती.

-- ( ट्युणिशिया रिटर्न्ड) कुंदन.

शेखर's picture

29 Sep 2010 - 11:49 pm | शेखर

धन्यवात.

प्रभो's picture

29 Sep 2010 - 11:52 pm | प्रभो

तो पण गव्हाचा..

अरे प्रभो, अशी तयार पा कृ नाही द्यायची , जरा शोधु दिले असतेस की शेखरला.

शेखर's picture

30 Sep 2010 - 2:00 am | शेखर

तुझा प्रतिसाद बघितल्यावर लक्षात आले की मला शोधायची होती. ;)

प्रभो's picture

30 Sep 2010 - 2:58 am | प्रभो

नेक्स्ट टाईम.. :)

शिल्पा ब's picture

30 Sep 2010 - 5:24 am | शिल्पा ब

आपण ट्युनिशियाला गेला होता का? अरे वा!!! नवीन संकृती अन जुनी संस्कृती यांचा असाच मेळ घातला पाहिजे...

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

30 Sep 2010 - 12:01 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

अगदे मस्त मऊ होतो. तुम्हाला वाटणार ही नाही कि तुम्ही raw form मध्ये दलिया खाता आहात.

मनि२७'s picture

30 Sep 2010 - 12:20 pm | मनि२७

जाई ,
फोटो डकवला का नाही ग....?

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

30 Sep 2010 - 12:43 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

जाउ दे.... करुन पाहते खट्पट...!

प्राजक्ता पवार's picture

30 Sep 2010 - 12:28 pm | प्राजक्ता पवार

नविन पाकृ . नक्की करुन बघेन :)

जाई ऑलिव्ह ऑइल कच्चच खातात का ?

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

30 Sep 2010 - 1:13 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

ऑलिव्ह ऑईल ला एक वेगळा फ्लेवर असतो. त्यात्ल्या त्यात vergin olive oil ला (काहिही केमिकल प्रोसेस न केलेले) तो जास्ती deep असतो. त्यामुळे salad मध्ये कच्चे वापरतात.
आणि बर्‍याचदा काही डिशेस मध्ये फक्त पॅन ला स्प्रे करण्यासाठी वापरतात.

परिकथेतील राजकुमार's picture

30 Sep 2010 - 1:03 pm | परिकथेतील राजकुमार

फोटु नाही म्हणुन प्रतिक्रीया नाही आणि वाचन पण नाही.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

30 Sep 2010 - 1:17 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

कोणीतरी छापु शकेल का? असेल तर ID द्या. आणि मग चढवा इथे.
(तेवढ्यासाठी बाहेर जाणं 'आज' जमेल असं वाटत नाहिये.(permission येन इल्ले)

स्वछंदी-पाखरु's picture

30 Sep 2010 - 5:53 pm | स्वछंदी-पाखरु

जाई तै...
मी तुम्हाला माझा पत्ता दीला तर चालेल का हो?????

छायाचित्र देण्यापेक्षा ती पाकृ पार्सल केली तर अति उत्तम......

स्व्.पा.
"माझी आई म्हणत्ये... ऊतु नये मातू नये आणि फुकटची पाकृ सोडु नये......."
ता.क. : पाकृ खाल्यानंतर (जबरी दुष्परीणाम न झाल्यास ) प्रतिक्रिया देण्यात येईल........

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

30 Sep 2010 - 6:52 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

कशाला कष्ट घेता? मीच माझा पत्त्या देते.तुम्ही घरीच या ना खायला! सह टुकुंब या.
.... इतके घाबरु नका.काही होणार नाही तब्येतीला.!
(काय झालंच तर उतारा ही सुचवला जाईल) ;)

पैसा's picture

30 Sep 2010 - 10:22 pm | पैसा

जाईच्या सिस्टीमला कायतरी प्रोब्लेम आहे. तस्मात मी अपलोड करते आहे.

photo

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

30 Sep 2010 - 10:25 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

...... खरच मनापासून धन्यवाद!

जाईला फोटू चढवता आला नाही म्हणून तूनळीवर याची चित्रफित पाहिली.
फारच कलरफुल प्रकार आहे.
आत्ता चढवलेला फोटूही तसाच आलाय.

स्वाती२'s picture

1 Oct 2010 - 6:49 pm | स्वाती२

मस्त लागते हे सॅलड.