आपण त्यांच लेखन वाचुन आनंद घेवुया
बाकी गोष्टीशी का देण घेण.
मी तर मुळातच म्हणतो की दुसर्या माणसाला त्याची विचारसरणी आहे त्याप्रमाणे जगु द्यावे.
की फरक पेंदा.
जर त्याने तुमच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर हल्ला केला तरच चुक नाहीतर काय गरज.
"देवाची" देणगी वगैरे बोलल्याचं ऐकलेलं नाही. ते नेहमी निसर्ग म्हणत. शिवाय मुहूर्त बघणे, नारळ फोडणे ह्यावर सुद्धा विश्वास कमीच होता असे म्हणतात. मात्र इतरांची देवभक्ती म्हणा, श्रद्धा म्हणा, त्यांनी कधीही हसण्यावारी नेली नाही.
मात्र इतरांची देवभक्ती म्हणा, श्रद्धा म्हणा, त्यांनी कधीही हसण्यावारी नेली नाही.
खर आहे, "का?" नावाची एक लघुपट ईएम आर सी च्या मदतीने अंनिस ने काढला होता. त्यात पुलंचे दैववाद व बुवाबाजीवर मार्मिक भाष्य असणारी दृष्यफीत शेवटी दाखवली आहे.

होय माझ्या कडे त्याची सीडी उपलब्ध आहे. पुण्यात साधना मिडिया सेंटर, शनिवार पेठ पोलिस चौकि समोर पुणे येथे ती उपल्ब्ध आहे. नसल्यास मिळवून देण्याची जबाबदारी माझी.
प्रकाश घाटपांडे

म्हणजे उपलब्ध अाहे! मी नोव्हेंबरात मुंबईत येतो अाहे. बहुतेक मिळेल . . .
खरं तर ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही. पण व्यक्ति आणि वल्ली चा मी फ्यान आहे, त्यातच मी मागच्या आठवड्यात "हर मे हरी को देखा" ही अमिर खुस्रो लिखीत कव्वाली बर्याच दिवसांनी ऐकली. आपल्यातच कुठे हरवलेल्या अंतू बर्वा, हरितात्यांना व्यक्त करून आपल्या समोर आणणार्याचा देवावर विश्वास असावा, देवत्वाची व्याख्या मात्र त्यांची का ती तेच जाणोत.
देव आणि शक्ती 19 Sep 2007 - 6:49 am | सर्किट (not verified)
आजवर पुलंनी लिहिलेला, बोललेला प्रत्येक शब्द माझ्या संग्रही असवा (पुरुषराज अळुरपांडेंसकट) मी प्रयत्न केला आहे. त्या वाचना वरून सांगतो. पुलंचा देव ह्या मूर्त स्वरूपावर विश्वास नाही. (म्हणजे आधी होता, पण हे विचार अर्थातच नंतर म्हणजे सुनिताबाईंकडून आलेले आहे, हे स्पष्ट आहे.) पण एक अज्ञात शक्ती विश्वावर राज्य करते, ह्यावर त्यांची शेवटपर्यंत गाढ श्रद्धा होती. सुनिताबाई ह्या जरा संजोपराव, प्रकाश घाटपांडे ह्यांच्या वळणावर गेलेल्या ;-) पण पुलं हे नेहमीच बॅलन्स्ड राहिलेत. जोगेश्वरीच्या चाळीत कुणी शेंदूर लावूना दगड ठेवला, तर त्या चाळकर्यांच्या मन:शांतीसाठी मनात नसले तरी गावदेखला नमस्कार करणारे.
अहो, मनात नसताना आपण कितीतरी गोष्ह्टी करतो. फक्त कौटुंबिक स्वास्थ्यासाठी. पुलंनीही तेच केले.
अथीइस्ट ही व्यक्ती देवाचे अस्तित्वच मान्य करत नाही. त्यामुळे पुलं अथीइस्ट नव्हते, हे नक्की. कारण देवाचे अस्तित्व सामन्य माणसाला मान्य आहे, आणि सामान्य माणूस त्यांना मान्य होता. त्यामुळे वरवर देवाच्या संकल्पनेला मान्यता देऊन, स्वतः मात्र देव नव्हे, शक्ती ह्या स्वतःच्या मताच्या जवळपासच ते राहिले.
>>>अथीइस्ट ही व्यक्ती देवाचे अस्तित्वच मान्य करत नाही. त्यामुळे पुलं अथीइस्ट नव्हते, हे नक्की. कारण देवाचे अस्तित्व सामन्य माणसाला मान्य आहे, आणि सामान्य माणूस त्यांना मान्य होता. त्यामुळे वरवर देवाच्या संकल्पनेला मान्यता देऊन, स्वतः मात्र देव नव्हे, शक्ती ह्या स्वतःच्या मताच्या जवळपासच ते राहिले>>
देवाचे अस्तित्व सामन्य माणसाला मान्य आहे, आणि सामान्य माणूस त्यांना मान्य होता.
हे काहिसे कळले नाही! सामान्य माणूस मान्य आहे म्हणजेच सामान्य माणूस आणि त्याचे सर्व विचार मान्य आहेत असेच काय? मला नाही वाटत 'सामान्य माणसाच्या' सर्वच विचारांशी पु.लं. सहमत असतीलच असे. अर्थातच हा आपला एक अंदाज!
श्री.आजानुकर्ण यांनी "एक शून्य मी" (ले. पु.ल. देशपांडे) या पुस्तकाचा उल्लेख केला आहे. त्या पुस्तकात "धर्म,अंधश्रद्धा नि तुम्ही आम्ही." या शीर्षकाचा एक लेख आहे. त्यातील पृष्ठ. १२८ वरील काही वाक्ये : (ही वाक्ये सलग आहेत. संदर्भ सोडून दिलेली नाहीत.)
**************
"एक तर धर्म,ईश्वर,पूजा-अर्चा ह्यांत मला (पु.ल.यांना) कधीही रस वाटला नाही. शिल्पकारांचे कौशल्य म्हणून मला मूर्ती पाहायला आवडतात..समजू लागलेल्या वयापासून माझा कोणत्याही मूर्तीला नमस्कार घडलेला नाही..पूर्वजन्म,पुनर्जन्म वगैरे थोतांडांवर माझा विश्वास नाही. देव,धर्म या कल्पना धूर्त सत्ताधार्यांनी दहशतीसाठी वापरल्या आहेत, याविषयीं मला यत्किंचितही शंका नाही.
.....धर्म धर्म करणार्या लोकांइतके सत्याचे आणि वास्तवाचे दुसरे शत्रू नसतील.......देऊळ बांधणे हा सत्तेवरच्या राजकीय पक्षात जाण्याइतकाच किफायतशीर धंदा झाला आहे.........
मला कुठल्याही संतापेक्षा ,अऍनेस्थियाचा शोध लावून वैद्यकीय शस्त्रक्रिया वेदनारहित करणारा संशोधक हा अधिक मोठा वाटतो. "
*************************
संदर्भः एक शून्य मी. ...लेखकःपु.ल.देशपांडे. दुसरी आवृत्ती:२००२,....मूल्यः एकशेंपंचवीस रुपये.
प्रकाशकः मौज प्रकाशन गृह,मुंबई
*************************
हे पुस्तक विनोदी नाही. विविध विषयांवरील पुलंच्या वैचारिक लेखांचा हा संग्रह आहे. हे पुस्तक सर्वांनी वाचावे असे मला वाटते.
...........यनावाला.
आणि उलटे देखील 19 Sep 2007 - 10:15 pm | सर्किट (not verified)
धर्म धर्म करणार्या लोकांइतके सत्याचे आणि वास्तवाचे दुसरे शत्रू नसतील
आणि "वास्तव, वास्तव करणार्या लोकांइतके धर्माचे आणि देवांचे दुसरे शत्रू नसतील".
श्री. टीकाकार यांचा मूळ प्रश्न आहे :पु. ल. हे Atheist होते हे खरे अहे का?
.......या प्रश्नाला माझे उत्तर आहे : "हो. हे शत प्रतिशत (१००% ) खरे आहे."
......यनावाला.
नरहर कुरुंदकर म्हणायचे,' माझा देवावर विश्वास नाही, माझा धर्मावर विश्वास नाही. पण माझ्या सभोवती असंख्य लोक जे देवावर व धर्मावर विश्वास ठेवतात त्यांच्यापासुन तुटून जाण्यावर ही माझा विश्वास नाही. पुलंच ही तसेच होते.
प्रकाश घाटपांडे
प्रतिक्रिया
17 Sep 2007 - 4:06 pm | आजानुकर्ण
१. atheist म्हणजे काय?
२. पु.ल. म्हणजे काय?
३. अहे म्हणजे काय?
17 Sep 2007 - 4:13 pm | टिकाकार
क्रुप्या हे प्रश्न दुसर्या विशयात टाका.
ज्यान्न्ना पु. ल. आनि Atheism ह्या विशयि महिति आहे त्यान्च्या साठि वरिल प्रशन अहे.
टिकाकार
17 Sep 2007 - 4:15 pm | आजानुकर्ण
माझे सर्व प्रश्न चर्चा विषयाशी निगडीत आहेत. शिवाय तुम्ही तसे डिस्क्लेमर टाकले नव्हते.
17 Sep 2007 - 4:08 pm | टिकाकार
http://en.wikipedia.org/wiki/Atheism
टिकाकार
17 Sep 2007 - 4:14 pm | आजानुकर्ण
पण पु.ल. हे निरीश्वरवादी होते अशी शंका कशी काय आली? " एक शून्य मी" वाचून का?
17 Sep 2007 - 4:48 pm | उग्रसेन
निरीश्वरवादाचा मह्या भाईकाकाच्या इचाराशी काय बी संबध नाय.
त्येन्ला फकस्त मिसळीत खडे टाकून याची सूपारी दिलेली हाये.
18 Sep 2007 - 12:22 am | रंजन
पु. ल किति सुंदर लिह्यचे .. मला बट्टयाची च्अळ खूप अवडते.
18 Sep 2007 - 3:56 pm | झकासराव
आपण त्यांच लेखन वाचुन आनंद घेवुया
बाकी गोष्टीशी का देण घेण.
मी तर मुळातच म्हणतो की दुसर्या माणसाला त्याची विचारसरणी आहे त्याप्रमाणे जगु द्यावे.
की फरक पेंदा.
जर त्याने तुमच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर हल्ला केला तरच चुक नाहीतर काय गरज.
19 Sep 2007 - 12:51 am | जगन्नाथ
"देवाची" देणगी वगैरे बोलल्याचं ऐकलेलं नाही. ते नेहमी निसर्ग म्हणत. शिवाय मुहूर्त बघणे, नारळ फोडणे ह्यावर सुद्धा विश्वास कमीच होता असे म्हणतात. मात्र इतरांची देवभक्ती म्हणा, श्रद्धा म्हणा, त्यांनी कधीही हसण्यावारी नेली नाही.
19 Sep 2007 - 5:17 pm | प्रकाश घाटपांडे
मात्र इतरांची देवभक्ती म्हणा, श्रद्धा म्हणा, त्यांनी कधीही हसण्यावारी नेली नाही.
खर आहे, "का?" नावाची एक लघुपट ईएम आर सी च्या मदतीने अंनिस ने काढला होता. त्यात पुलंचे दैववाद व बुवाबाजीवर मार्मिक भाष्य असणारी दृष्यफीत शेवटी दाखवली आहे.
प्रकाश घाटपांडे
19 Sep 2007 - 7:13 pm | जगन्नाथ
खर आहे, "का?" नावाची एक लघुपट ईएम आर सी च्या मदतीने अंनिस ने काढला होता. त्यात पुलंचे दैववाद व बुवाबाजीवर मार्मिक भाष्य असणारी दृष्यफीत शेवटी दाखवली आहे.
मिळवून बघता येईल का?
20 Sep 2007 - 10:00 pm | प्रकाश घाटपांडे
होय माझ्या कडे त्याची सीडी उपलब्ध आहे. पुण्यात साधना मिडिया सेंटर, शनिवार पेठ पोलिस चौकि समोर पुणे येथे ती उपल्ब्ध आहे. नसल्यास मिळवून देण्याची जबाबदारी माझी.
प्रकाश घाटपांडे
20 Sep 2007 - 10:51 pm | जगन्नाथ
होय माझ्या कडे त्याची सीडी उपलब्ध आहे. पुण्यात साधना मिडिया सेंटर, शनिवार पेठ पोलिस चौकि समोर पुणे येथे ती उपल्ब्ध आहे. नसल्यास मिळवून देण्याची जबाबदारी माझी.
म्हणजे उपलब्ध अाहे! मी नोव्हेंबरात मुंबईत येतो अाहे. बहुतेक मिळेल . . .
नाही मिळाली तर देतो त्रास तुम्हाला!
19 Sep 2007 - 5:19 am | व्यंकट
खरं तर ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही. पण व्यक्ति आणि वल्ली चा मी फ्यान आहे, त्यातच मी मागच्या आठवड्यात "हर मे हरी को देखा" ही अमिर खुस्रो लिखीत कव्वाली बर्याच दिवसांनी ऐकली. आपल्यातच कुठे हरवलेल्या अंतू बर्वा, हरितात्यांना व्यक्त करून आपल्या समोर आणणार्याचा देवावर विश्वास असावा, देवत्वाची व्याख्या मात्र त्यांची का ती तेच जाणोत.
19 Sep 2007 - 6:49 am | सर्किट (not verified)
आजवर पुलंनी लिहिलेला, बोललेला प्रत्येक शब्द माझ्या संग्रही असवा (पुरुषराज अळुरपांडेंसकट) मी प्रयत्न केला आहे. त्या वाचना वरून सांगतो. पुलंचा देव ह्या मूर्त स्वरूपावर विश्वास नाही. (म्हणजे आधी होता, पण हे विचार अर्थातच नंतर म्हणजे सुनिताबाईंकडून आलेले आहे, हे स्पष्ट आहे.) पण एक अज्ञात शक्ती विश्वावर राज्य करते, ह्यावर त्यांची शेवटपर्यंत गाढ श्रद्धा होती. सुनिताबाई ह्या जरा संजोपराव, प्रकाश घाटपांडे ह्यांच्या वळणावर गेलेल्या ;-) पण पुलं हे नेहमीच बॅलन्स्ड राहिलेत. जोगेश्वरीच्या चाळीत कुणी शेंदूर लावूना दगड ठेवला, तर त्या चाळकर्यांच्या मन:शांतीसाठी मनात नसले तरी गावदेखला नमस्कार करणारे.
अहो, मनात नसताना आपण कितीतरी गोष्ह्टी करतो. फक्त कौटुंबिक स्वास्थ्यासाठी. पुलंनीही तेच केले.
अथीइस्ट ही व्यक्ती देवाचे अस्तित्वच मान्य करत नाही. त्यामुळे पुलं अथीइस्ट नव्हते, हे नक्की. कारण देवाचे अस्तित्व सामन्य माणसाला मान्य आहे, आणि सामान्य माणूस त्यांना मान्य होता. त्यामुळे वरवर देवाच्या संकल्पनेला मान्यता देऊन, स्वतः मात्र देव नव्हे, शक्ती ह्या स्वतःच्या मताच्या जवळपासच ते राहिले.
- सर्किट
19 Sep 2007 - 6:56 am | विकास
>>>अथीइस्ट ही व्यक्ती देवाचे अस्तित्वच मान्य करत नाही. त्यामुळे पुलं अथीइस्ट नव्हते, हे नक्की. कारण देवाचे अस्तित्व सामन्य माणसाला मान्य आहे, आणि सामान्य माणूस त्यांना मान्य होता. त्यामुळे वरवर देवाच्या संकल्पनेला मान्यता देऊन, स्वतः मात्र देव नव्हे, शक्ती ह्या स्वतःच्या मताच्या जवळपासच ते राहिले>>
आपले विचार पटले.
19 Sep 2007 - 8:02 am | कोलबेर
देवाचे अस्तित्व सामन्य माणसाला मान्य आहे, आणि सामान्य माणूस त्यांना मान्य होता.
हे काहिसे कळले नाही! सामान्य माणूस मान्य आहे म्हणजेच सामान्य माणूस आणि त्याचे सर्व विचार मान्य आहेत असेच काय? मला नाही वाटत 'सामान्य माणसाच्या' सर्वच विचारांशी पु.लं. सहमत असतीलच असे. अर्थातच हा आपला एक अंदाज!
19 Sep 2007 - 8:19 am | आजानुकर्ण
१. आमचे आमच्या सरांवर प्रेम आहे.
२. सरांचे त्यांच्या मुलीवर प्रेम आहे.
या दोन समीकरणांचा वापर करून तिसरे भलतेच फाजील समीकरण शोधणार का?
19 Sep 2007 - 9:35 am | सर्किट (not verified)
प्रेमाची बदलती व्याख्या ही ट्रान्झिटिव्ह नाही.
काय राव ?
ट्रान्झिटिव्ह रिलेशन साठी दोन्ही रिलेशन्स ची व्याख्या एकच असायला पाहिजे कमीत कमी.
आता हे पण आम्हीच सांगायला हवे ?
- सर्किट
19 Sep 2007 - 9:42 am | टग्या (not verified)
प्रेमाची व्याख्या निश्चितपणे बदललीच, असे गृहीत धरता येणार नाही.
सदर व्यक्ती ही सरांच्या मुलीवर पुत्रीवत् प्रेम करत असण्याची शक्यता जमेस धरायला हवी.
(उलटपक्षी... जाऊद्या!)
19 Sep 2007 - 9:44 am | आजानुकर्ण
आम्हीही हेच लिहिणार होतो (अशी फिल्डिंग लावून क्याच पकडणे आम्हाला हल्ली जमते) पण तुम्ही आधीच त्रिफळाचीत करून टाकले सर्किटरावांना
19 Sep 2007 - 9:31 am | जगन्नाथ
>> देवाचे अस्तित्व सामन्य माणसाला मान्य आहे, आणि सामान्य माणूस त्यांना मान्य होता.
>
> हे काहिसे कळले नाही!
काहीतरी बोलावं लागतं, म्हणून. बोलण्याइतकं बोलून झालं. अाणखी खोलात जाता येत नाही . . .
कुणाला atheist म्हटल्याने त्याची बदनामी होते असला "अमरीकी" भाबडेपणा मात्र अापण नाही करायचा.
19 Sep 2007 - 9:38 am | सर्किट (not verified)
ट्रान्झिटिव्हिटी बद्दल आपलेही नेह्मीच सापडणारे गैरसमज आहेत असे दिसते.
- सर्किट
(मिसळपावच्या पंचायत समितीत ट्रान्झिटिव्हिटी समजणार्या सदस्यांना मते मिळावीत... ह्याचे मी समर्थन करतो.)
19 Sep 2007 - 9:46 am | जगन्नाथ
(मिसळपावच्या पंचायत समितीत ट्रान्झिटिव्हिटी समजणार्या सदस्यांना मते मिळावीत... ह्याचे मी समर्थन करतो.)
वरील मताचे मी समर्थन करतो.
19 Sep 2007 - 3:03 pm | यनावाला
श्री.आजानुकर्ण यांनी "एक शून्य मी" (ले. पु.ल. देशपांडे) या पुस्तकाचा उल्लेख केला आहे. त्या पुस्तकात "धर्म,अंधश्रद्धा नि तुम्ही आम्ही." या शीर्षकाचा एक लेख आहे. त्यातील पृष्ठ. १२८ वरील काही वाक्ये : (ही वाक्ये सलग आहेत. संदर्भ सोडून दिलेली नाहीत.)
**************
"एक तर धर्म,ईश्वर,पूजा-अर्चा ह्यांत मला (पु.ल.यांना) कधीही रस वाटला नाही. शिल्पकारांचे कौशल्य म्हणून मला मूर्ती पाहायला आवडतात..समजू लागलेल्या वयापासून माझा कोणत्याही मूर्तीला नमस्कार घडलेला नाही..पूर्वजन्म,पुनर्जन्म वगैरे थोतांडांवर माझा विश्वास नाही. देव,धर्म या कल्पना धूर्त सत्ताधार्यांनी दहशतीसाठी वापरल्या आहेत, याविषयीं मला यत्किंचितही शंका नाही.
.....धर्म धर्म करणार्या लोकांइतके सत्याचे आणि वास्तवाचे दुसरे शत्रू नसतील.......देऊळ बांधणे हा सत्तेवरच्या राजकीय पक्षात जाण्याइतकाच किफायतशीर धंदा झाला आहे.........
मला कुठल्याही संतापेक्षा ,अऍनेस्थियाचा शोध लावून वैद्यकीय शस्त्रक्रिया वेदनारहित करणारा संशोधक हा अधिक मोठा वाटतो. "
*************************
संदर्भः एक शून्य मी. ...लेखकःपु.ल.देशपांडे. दुसरी आवृत्ती:२००२,....मूल्यः एकशेंपंचवीस रुपये.
प्रकाशकः मौज प्रकाशन गृह,मुंबई
*************************
हे पुस्तक विनोदी नाही. विविध विषयांवरील पुलंच्या वैचारिक लेखांचा हा संग्रह आहे. हे पुस्तक सर्वांनी वाचावे असे मला वाटते.
...........यनावाला.
19 Sep 2007 - 10:15 pm | सर्किट (not verified)
धर्म धर्म करणार्या लोकांइतके सत्याचे आणि वास्तवाचे दुसरे शत्रू नसतील
आणि "वास्तव, वास्तव करणार्या लोकांइतके धर्माचे आणि देवांचे दुसरे शत्रू नसतील".
- सर्किट
20 Sep 2007 - 2:27 am | जगन्नाथ
धर्म धर्म करणार्या लोकांइतके सत्याचे आणि वास्तवाचे दुसरे शत्रू नसतील
आणि "वास्तव, वास्तव करणार्या लोकांइतके धर्माचे आणि देवांचे दुसरे शत्रू नसतील".
असा कॅलिफोर्न्येत कायदा झाला अाहे का?
19 Sep 2007 - 3:06 pm | टीकाकार-१
म्हणजे श्री. टिकाकार ह्यान्चे म्हनन्ने बरोबर आहे असे आप्नस वाटते क?
20 Sep 2007 - 2:01 pm | यनावाला
श्री. टीकाकार यांचा मूळ प्रश्न आहे :पु. ल. हे Atheist होते हे खरे अहे का?
.......या प्रश्नाला माझे उत्तर आहे : "हो. हे शत प्रतिशत (१००% ) खरे आहे."
......यनावाला.
20 Sep 2007 - 2:04 pm | टीकाकार-१
धन्यवाद!!
पु. ल. विषयी माहिती असलेला १ तरी पु. ल. प्रेमी इथे आहे याचा आनन्द वाटला..
20 Sep 2007 - 2:09 pm | उग्रसेन
लै है भो हिथं पर ते बी मानसं पहून बोल्तेत है का ठाऊक. :)
20 Sep 2007 - 2:11 pm | टीकाकार-१
:)
20 Sep 2007 - 2:26 pm | तर्री
पु.ल. कोन्टिनेन्ट्ल कुल्कर्णयान्बरोबर पन्ढर पूर ला गेले होते.............पान्डूरन्गाच्या चरणी मस्तक टेकवल्यावर काय झाले?
20 Sep 2007 - 10:09 pm | प्रकाश घाटपांडे
नरहर कुरुंदकर म्हणायचे,' माझा देवावर विश्वास नाही, माझा धर्मावर विश्वास नाही. पण माझ्या सभोवती असंख्य लोक जे देवावर व धर्मावर विश्वास ठेवतात त्यांच्यापासुन तुटून जाण्यावर ही माझा विश्वास नाही. पुलंच ही तसेच होते.
प्रकाश घाटपांडे
21 Sep 2007 - 10:05 am | टीकाकार-१
म्हणजे पु.ल. कन्फुयज्ड होते आसे तुम्हास वाटते काय.
क्रुपया मोघम उत्तरे देऊ नका.
21 Sep 2007 - 12:29 pm | जगन्नाथ
क्रुपया मोघम उत्तरे देऊ नका.
प्रेषक: टीकाकार-१
विनोद चांगला अाहे!
21 Sep 2007 - 12:55 pm | टीकाकार-१
तुमचा सेंस ऑफ ह्युमर शुन्य आहे.
23 Sep 2007 - 1:42 am | जगन्नाथ
तुमचा सेंस ऑफ ह्युमर शुन्य आहे.
क्रुपय्या धण्यवाध!