कडधान्यांचे धिरडे -------------

निवेदिता-ताई's picture
निवेदिता-ताई in पाककृती
27 Sep 2010 - 4:19 pm

साहित्य :--सर्व प्रकारची कडधान्ये (मूग, मटकी, चवळी, हुलगा, मसुर, हरबरे, प्रत्येकी दोनशे ग्रॆम,व तांदूळ एक पावशेर, उडीद डाळ अर्धा पावशेर, जिरे अर्धा वाटी, धने अर्धा वाटी... हे थोडेसे गरम करुन दळून आणावे.टॊमॆटो सॊस, साजूक तूप, तेल, मीठ-मिरची पावडर चवीप्रमाणॆ.

कॄती :- दळून आणलेले पिठ दोन वाट्या,मिरची पावडर मिठ चवीप्रमाणे घालून पिठ सरसरीत भिजवावे,
From माधुर्य

निर्लेप तव्यावर थोडेसेच तेल पसरवून धिरडे घालावे...कडेने थोडे तेल सोडावे.

From माधुर्य

दोन-चार मिनिटांनी उलटावे

From माधुर्य

चांगले भाजू द्यावे.
From माधुर्य
गरम गरम धिरडे , साजूक तूप व सॊस बरोबर खायला द्यावे.
ह्यात सर्व कडधान्ये असल्याने हे अतिशय रुचकर लागते.

प्रतिक्रिया

पिंगू's picture

27 Sep 2010 - 4:42 pm | पिंगू

निवेदिता ताई,

धिरडे खुपच पौष्टीक आहेत ह्यात शंकाच नाही... फक्त एक अवांतर प्रश्न की ह्यात टमाट्याचे तुकडे घातले तर चालतील का?

- पिंगू

निवेदिता-ताई's picture

27 Sep 2010 - 5:11 pm | निवेदिता-ताई

चालेल, टोमॅटो चालेल, बारिक चिरुन कांदा, कोथिंबीर मिरची तुकडे घातलेत तरी चालेल.

परिकथेतील राजकुमार's picture

27 Sep 2010 - 4:43 pm | परिकथेतील राजकुमार

शॉल्लेट !!

प्लिज मला कुणीतरी हे गोल आकाराचे (निदान गोल सारखे दिसणारे) धिरडे / डोसा तव्यावर कसा टाकायचा ह्याचा सोपा उपाय सांगेल का ?

उपायः
१) हे पीठ साधारण घट्ट भिजवून पेल्याने पॅनवर मध्यभागी ओतून त्या पेल्याच्या बुडाने बाहेरच्या दिशेने गोलाकार पसरवा.
२) पीठ पातळ भिजवा आणि पॅनवर ओतून पॅन अशा तर्‍हेने फिरवा की ते पॅनभर पसरेल.

दिपाली पाटिल's picture

27 Sep 2010 - 10:13 pm | दिपाली पाटिल

लग्न करावे... बायको आयते बनवून देइल.

आता लग्न करायचे आहे म्हणून तर शिकतोय तो! ;)

(जिज्ञासू)बेसनलाडू
धिरडी बाकी छान + पौष्टिक!
(तंदुरुस्त)बेसनलाडू

दिपाली पाटिल's picture

28 Sep 2010 - 2:57 am | दिपाली पाटिल

तो आयटी मधला नॉन आयटी आहे... पण खरा प्रश्न हा आहे की परा तु आय टी बायको करणारेस की नॉन आय-टी... :D

परिकथेतील राजकुमार's picture

28 Sep 2010 - 11:30 am | परिकथेतील राजकुमार

मला आत्महत्येला प्रवृत्त करणार नाही अशी बायको चालेल.

चिंतामणी's picture

28 Sep 2010 - 7:29 am | चिंतामणी

दिपाली- लै भारी सल्ला

:))

छान पाककृती :)

हुलगा म्हणजे काय ?

मनि२७'s picture

27 Sep 2010 - 5:30 pm | मनि२७

मस्तच ....

पण एक शंका....
पीठ भिजत घालण्या पेक्षा डाळी भिजवून मग दळून पण धिरडी करता येतात का?
माझी आजी मुगाचे धिरडे डाळ भिजून करते म्हणून विचारलं....

छान दिसताहेत धिरडे!

अवांतर - तवा बदला हो निवेदिता-ताई. (ह. घ्या)

निवेदिता-ताई's picture

28 Sep 2010 - 10:16 pm | निवेदिता-ताई

अनामिक.........अवांतर - तवा बदला हो निवेदिता-ताई. (ह. घ्या)

तुच एक नवा निर्लेप तवा दे पाठ्वून.............हा हा हा .
लय भारी.

याक नंबर !! आमची या विकांताची खादाडी फिक्क्ष झाली ..

पैसा's picture

27 Sep 2010 - 8:19 pm | पैसा

असेच म्हणते!

मेघवेडा's picture

27 Sep 2010 - 8:26 pm | मेघवेडा

नीट करता आली असती तर असेच म्हणलो असतो! :D

रेवती's picture

27 Sep 2010 - 10:50 pm | रेवती

खी खी खी!

स्मिता चावरे's picture

27 Sep 2010 - 8:50 pm | स्मिता चावरे

मितान, हुलगा म्हणजे कुळीथ ...

शिल्पा ब's picture

28 Sep 2010 - 12:11 am | शिल्पा ब

मस्त दिसताहेत....करुन बघेन.

चक्शु's picture

28 Sep 2010 - 7:06 am | चक्शु

खुप छान पाकक्रुती...... हे पीठ तयार करुन ठेवल्यास आयत्या वेळी धीरडे करता येतील.....कडधान्य भीजवुन करण्यासाठी पुर्वतयारी लागते...... पीठाचे धीरडे लगेच करता येतिल..... मस्त पाकक्रुती..... :)

स्वैर परी's picture

28 Sep 2010 - 5:34 pm | स्वैर परी

पीठ किती वेळ आधी भिजवुन ठेवावे??

आइ करायची ..
छान लागते ना खुप ..

धन्यवाद येथे सांगितल्या बद्दल

विलासराव's picture

28 Sep 2010 - 8:38 pm | विलासराव

तर काय बनवता येत नाहीत.
पण कालच डब्यात आले होते मेसमधुन.
अगदी असेच होते अन चविलाही मस्त होते.

शुचि's picture

30 Sep 2010 - 9:26 pm | शुचि

मस्तच