धागा उपयोगाचा आहे. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. गुगलून केवळ इंग्रजाळलेली माहीती मिळते. अन अशा विषयात तर नाहीच नाही. मागे दही कसे जमवावे हा धागाही उपयोगीच होता. पानभर लिहायचे अन खाली 'अशा या झुरळांचा बंदोबस्त कसा करायचा ते सांगा?' असे लिहीण्यापेक्षा टु द पॉइंट एकोळी धागा फारच उपयुक्त ठरतो.
हां, आता ' अमुक राशीवरून डोक्यात कोंडा आहे की नाही ते सांगा' हा धागा खरोखरीच एकोळी होवू शकतो.
आवांतरः स्वारी तुमच्या समस्येच १००% समाधान नाही माझ्याकडे. पण मी तरी पेस्ट कंट्रोल करुन घेतल होतं वर्षामागे. अजुन पर्यंत त्रास नाही.
वाटल्यास ओडोनिलच्या गोळ्या ठेवत जा ट्रॉलीत.
लेल्या नंतर तुम्हाला उपाय सांगता येईल.सर्वात प्रथम झुरळांचे वजन,त्यांचे आकारमान,त्यांची संख्या,त्यांची जात,त्याची पिल्लावळ,,तसेच नर व मादी झुरळांचे वर्गिकरण करा.सर्व डाटा तयार झालेवर सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर जा. तिथे कुणी मानवतावादी किंवा सर्वसामान्याचा कळवळा असणार्याने झुरळ हत्येविरोधात न्यायालयात अर्ज केला आहे का किंवा त्याविषयी सर्वोच्च न्यायालयाने आपली नाराजी व्यक्त केली आहे का तपासा. नंतर त्याना मारण्याची सुपारी द्या. नाहीतर झुरळ मारण्याच्या नादात तुम्हाला शिक्षा होण्याची शक्यता आहे.
आपल्या देशातल्या प्रमाणे आपली महान लोकशाही त्यांच्यात रुजू करण्यासाठी प्रयत्न करा, आणि त्यांच्यात निवडणुका होतील असे बघा. केवळ निवडून आलेलेच मलिदा खातील असे त्यांना ठासून सांगा. मग बघा ते आपापसातच भांडून-भांडून , एकमेकाना मारून टाकतील.
मी एक सोपा उपाय सुचवू का?
कणके मध्ये थोडी बोरिक पावडर, साखर आणि पाणी घालून पीठ भिजवावे. त्याच्या छोट्या-छोट्या गोळ्या करून त्या किचन ट्रॉलीमधे कोपऱ्या-कोपऱ्यात ठेवाव्या. काही दिवसातच झुरळांचा नायनाट होईल. स्वानुभवाने सांगत्ये.
फक्त एक काळजी घावी. घरात लहान मुल असेल तर त्याच्या पासून दूर ठेवावे.
बंदोबस्त कशाला?
देवाघरची फुलं म्हणावं आणि सुखनैव बागडू द्यावं त्यांना.
झालंच तर, आपल्याला कंटाळा आला की कर्कटक घेऊन बसावं आणि झुरळावर नेमबाजीची प्र्याक्टिस करावी. छान मजेत जातो वेळ.
अवांतरः पेस्ट कंट्रोलवाल्यांना बोलवा, जातील साडेचार-पाचशे रुपये, पण जरा चार-पाच महिने डोक्याला शांतता राहील. :)
घरात स्व्छचता हवी.
रात्री सिन्क मधे भान्डी साठवुन ठेवु नका.
लगेच घासुन मोकळ्या व्हा.
सिन्कमध्ये १ महिन्यानी ड्रेनेज पावडर टाकत चला.
सिन्कच्या पाइपमधुन सुढ्हा झुरळे ये जा करीत असतात.
ट्रोली १५ दिवसातुन तरी बाहेर ओडुन स्व्च करीत जा.
भान्दी बाहेर वाळली किच ट्रोलीत कोम्बा.
स्व्तला वेळ नसेल तर नोकर ठेवा न कामे करुन घ्या.
पैसे जातात पण असला ताप डोक्याला होत नाही.
तुम्हाला दम्याच्या औषधाचा व्यवसाय करता येईल.
मोठ्ठे झुरळ एक ग्लासभर पाण्यात उकळवून ते पाणी निम्मे आटवावे. त्यानंतर ते एका फडक्यावरुन गाळून ते पाणी फ्रीज मधे थंड करावे. (वास कमी येण्यासाठी) त्यानंतर हे पाणी दम्याच्या रोग्यास प्यायला द्यावे. फक्त ३ दिवसांत दमा पूर्ण बरा होतो असे एका माणसाने शपथेवर सांगितले आहे. प्रत्येकाने आपल्या जबाबदारीवर करुन पहावे.
खालील प्रकार लागू होतो.
१०० ग्राम बोरिक Acid पावडर (कॅर्रोम बोर्ड ला वापरतो ती)
५० ग्राम गहू पीठ,
१ कप दुध ,
१ चमचा साखर ,
हे सगळे एकत्रित करून छोटे छोटे झाकणात (जुने बाटलीचे चालतील) भरून ते प्रत्येक कॉर्नर जाली किचन ठीक ठिकाणी ठेऊन द्या.
३-४ दिवसात नक्कीच झुरळ मरतात.
(दुसरे कोणी ग्चाकले तर मी जबाबदार नाही)
कणकेचे छोटे छोटे गोळे करावे साधारणपणे २५ ग्रामचे. ते पिठीसाखरेत मिसळुन कडक उन्हात वाळत ठेवावेत.
हरभरा डाळ, मसूर, उडद डाळ आणि ज्वारीच्या समप्रमामातील मिश्रणात (प्रत्येकी १०० ग्राम) ५० मिली सुर्यफुलाचे तेल घाला. थोडेसे रसरशीत मिश्रण करावे. यात कणकेचे साखरमिश्रीत गोळे रात्रभर भिजवत ठेवावेत. सर्व द्रावण एकत्रि होउ द्यावे. त्यानंतर सुर्यफुलाच्याच तेलात हे गोळे तळुन घ्यावेत. या गोळ्यांवर हिट किंवा बॅगोनचा स्प्रे मारावा. नंतर लक्ष्मणरेखेच्या एका कांडीचा भुगा करुन तो या गोळ्यांवर भुरभुरावा.
नंतर एक एक करुन झुरळ पकडावेत आणि त्यांच्या तोंडात हा एक एक गोळा टाकावा. हिट, बेगोन आणी लक्ष्मणरेखेमुळे नाही मेले तरी पोट जास्त भरल्यामुळे तरी झुरळ नक्की मरतील.
वैधानिक सुचना: या प्रयोगाची कुठलीही शारिरीक, नैतिक, मानसिक जबाबदारी आम्ही घेणार नाही. झुरळ अथवा कुठल्याही इतर प्राण्याच्या(माणुस धरुन) मृत्युची जबाबदारी देखील माझ्यावर नसेल हे मी जाहीर नमूद करु इच्छितो. सदर प्रयोग ज्याचा त्याने स्वतःच्या जबाबदारीवर करवा.
प्रतिक्रिया
24 Sep 2010 - 5:32 pm | सविता
अवो.... पेस्ट कंट्रोल नामक एक प्रकार आहे....
आजच्या पेप्रात बघा..... किमान १० जाहिराती असतील.
दर सहा महिन्याने करून घ्यायचं.....
24 Sep 2010 - 5:34 pm | सविता
गुगलण्यासारख्या... किंवा कुठेही उपलब्ध होऊ शकणा-या माहिती साठी असे एकोळी धागे निघतात.... तेव्हा आम्हाला अंमळ आश्चर्य वाटते....
26 Sep 2010 - 8:02 pm | पाषाणभेद
धागा उपयोगाचा आहे. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. गुगलून केवळ इंग्रजाळलेली माहीती मिळते. अन अशा विषयात तर नाहीच नाही. मागे दही कसे जमवावे हा धागाही उपयोगीच होता. पानभर लिहायचे अन खाली 'अशा या झुरळांचा बंदोबस्त कसा करायचा ते सांगा?' असे लिहीण्यापेक्षा टु द पॉइंट एकोळी धागा फारच उपयुक्त ठरतो.
हां, आता ' अमुक राशीवरून डोक्यात कोंडा आहे की नाही ते सांगा' हा धागा खरोखरीच एकोळी होवू शकतो.
24 Sep 2010 - 5:33 pm | कुक
ति जाहीरात नाही का पाहीलीत?
३ आठवडे आणि एकही झुरळ नाही मिळाला?
त्या जाहीरातीत जे प्रोडेक्ट वापरल आहे ते वापरा नाव आठवत नाही
हिट वापरा.
24 Sep 2010 - 5:36 pm | परिकथेतील राजकुमार
किचन ट्रॉलीवर रॉकेल टाका आणि काडी लावा.
24 Sep 2010 - 5:41 pm | सविता
रॉकेल उपलब्ध नसल्यास पेट्रोल पण चालेल.....
25 Sep 2010 - 11:05 am | चिगो
:-)) --)))
समस्येचा समूळ नायनाट... हाय का नाय !?
24 Sep 2010 - 5:43 pm | गणपा
एकाद्या चिनी माणसाला पाळा. ;)
चिलटांच्या धाग्याची आठवण झाली. :)
24 Sep 2010 - 5:48 pm | अभिमोहित
अहो मारण्यासाठी नाहि.. न होण्यासाठी काय करावे. बाकी गुगल करुन असे मनोरंजन होते का?
24 Sep 2010 - 6:01 pm | गणपा
किचन (पर्यायाने घर) बदल).
आवांतरः स्वारी तुमच्या समस्येच १००% समाधान नाही माझ्याकडे. पण मी तरी पेस्ट कंट्रोल करुन घेतल होतं वर्षामागे. अजुन पर्यंत त्रास नाही.
वाटल्यास ओडोनिलच्या गोळ्या ठेवत जा ट्रॉलीत.
खुलासा: आम्ही ओडोनोलची एजंसी घेतलेली नाही.
24 Sep 2010 - 7:18 pm | मृत्युन्जय
वाटल्यास ओडोनिलच्या गोळ्या ठेवत जा ट्रॉलीत.
वरील वाक्य, त्याच्या खाली फोटो आणि त्याच्या खाली "माझी खादाडी" . मजा आहे :P
24 Sep 2010 - 6:18 pm | गणपा
.
24 Sep 2010 - 5:50 pm | नावातकायआहे
पाली पाळा
24 Sep 2010 - 5:54 pm | वेताळ
लेल्या नंतर तुम्हाला उपाय सांगता येईल.सर्वात प्रथम झुरळांचे वजन,त्यांचे आकारमान,त्यांची संख्या,त्यांची जात,त्याची पिल्लावळ,,तसेच नर व मादी झुरळांचे वर्गिकरण करा.सर्व डाटा तयार झालेवर सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर जा. तिथे कुणी मानवतावादी किंवा सर्वसामान्याचा कळवळा असणार्याने झुरळ हत्येविरोधात न्यायालयात अर्ज केला आहे का किंवा त्याविषयी सर्वोच्च न्यायालयाने आपली नाराजी व्यक्त केली आहे का तपासा. नंतर त्याना मारण्याची सुपारी द्या. नाहीतर झुरळ मारण्याच्या नादात तुम्हाला शिक्षा होण्याची शक्यता आहे.
24 Sep 2010 - 7:20 pm | गोरिला
वेताला मि एक दम सहमत आहे.
24 Sep 2010 - 5:54 pm | परिकथेतील राजकुमार
नसबंदी मोहिम राबवता येईल, अथवा झुरळांना योग्य ते 'मार्गदर्शन' करुन प्रबोधनावर भर द्यावा.
24 Sep 2010 - 7:44 pm | भारी समर्थ
एकतर ते झ्युरळ किती ल्हान प्राणी वो, त्यातून आस्लं काही म्हंजे कामात 'प्रिसिजन' हवं. त्यापेक्षा 'गर्भारोध' गोळ्या मिठाईत मिसळून पहाव्यात.
भारी समर्थ
24 Sep 2010 - 6:00 pm | अवलिया
समाजाला मार्गदर्शन करणारा धागा. डोळे पाणावले.
24 Sep 2010 - 6:12 pm | परिकथेतील राजकुमार
समाजाचे का झुरळांचे ?
24 Sep 2010 - 6:16 pm | सुनील
झुरळपाव डॉट कॉम ह्या सायटीवर जा. तिथल्या पाकॄ विभागात झुरळाच्या अनेक पाकृ मिळतील. त्यातील जमेल तितक्या, जमेल तशा करीत रहा!
सुचना - ही साईट चिनी भाषेत आहे. पण आता चिनी (इंचा-इंचानी) येताहेत म्हटल्यावर चिनी यायलाच पाहिजे, नै का?
24 Sep 2010 - 6:23 pm | परिकथेतील राजकुमार
झुरळपाव पेक्षा झुरळखाव जास्ती शोभेल मग ;)
24 Sep 2010 - 6:25 pm | अवलिया
झुरळप्रेमी कसे राहिल?
24 Sep 2010 - 6:28 pm | परिकथेतील राजकुमार
भाड्या
तरी म्हणले अजुन तुला आठवण कशी झाली नाही.
बाकी ते तुझ्या उडालेल्या सर्व प्रतिसादांचे माहेरघर अवलियाप्रेमी काय म्हणतय ?
24 Sep 2010 - 6:29 pm | अवलिया
ते टिंग्यालाच माहित.. अॅडमिन पासवर्ड त्याच्याकडेच आहे
24 Sep 2010 - 7:20 pm | मृत्युन्जय
तिथे एक आयडी पण असेल - झुरळकथेतील ओडोनिलकुमार
24 Sep 2010 - 6:26 pm | सुनील
झुरळखाव पण आहेच! झुरळपावातून फुटलेल्या काही असंतुष्टांनी काढलेली! (तशी झुळझूळपुरी ह्या नावाची पण साईट आहे, असे ऐकिवात आहे)
24 Sep 2010 - 6:41 pm | निखिलेश
पुरे आता झुरळ पुरण. ...!
24 Sep 2010 - 7:27 pm | अनामिक
झुरळांच "पुरण" करतात? आँ आँ ??
24 Sep 2010 - 6:48 pm | निवेदिता-ताई
हा हा हा ............लय भारी....
24 Sep 2010 - 6:55 pm | गांधीवादी
आपल्या देशातल्या प्रमाणे आपली महान लोकशाही त्यांच्यात रुजू करण्यासाठी प्रयत्न करा, आणि त्यांच्यात निवडणुका होतील असे बघा. केवळ निवडून आलेलेच मलिदा खातील असे त्यांना ठासून सांगा. मग बघा ते आपापसातच भांडून-भांडून , एकमेकाना मारून टाकतील.
24 Sep 2010 - 7:25 pm | अडगळ
.
24 Sep 2010 - 8:26 pm | अप्पा जोगळेकर
तिथे बंदोबस्त करत नाहीत. तिथे तर झुरळं पोसतात.
24 Sep 2010 - 8:34 pm | अडगळ
अहो .. तिथं आता चिनी राहतात. त्यामुळं झुरळ आटोक्यात राहतात.
25 Sep 2010 - 11:55 am | अप्पा जोगळेकर
काही चिनी कुर्ल्यात इंपोर्ट केले पाहिजेत. रोज जावं लागत हो त्या घाणीतून.
24 Sep 2010 - 8:06 pm | अशक्त
http://lmgtfy.com/?q=how+to+get+rid+of+cockroaches
24 Sep 2010 - 8:21 pm | सानिका पटवर्धन
मी एक सोपा उपाय सुचवू का?
कणके मध्ये थोडी बोरिक पावडर, साखर आणि पाणी घालून पीठ भिजवावे. त्याच्या छोट्या-छोट्या गोळ्या करून त्या किचन ट्रॉलीमधे कोपऱ्या-कोपऱ्यात ठेवाव्या. काही दिवसातच झुरळांचा नायनाट होईल. स्वानुभवाने सांगत्ये.
फक्त एक काळजी घावी. घरात लहान मुल असेल तर त्याच्या पासून दूर ठेवावे.
24 Sep 2010 - 8:31 pm | धमाल मुलगा
बंदोबस्त कशाला?
देवाघरची फुलं म्हणावं आणि सुखनैव बागडू द्यावं त्यांना.
झालंच तर, आपल्याला कंटाळा आला की कर्कटक घेऊन बसावं आणि झुरळावर नेमबाजीची प्र्याक्टिस करावी. छान मजेत जातो वेळ.
अवांतरः पेस्ट कंट्रोलवाल्यांना बोलवा, जातील साडेचार-पाचशे रुपये, पण जरा चार-पाच महिने डोक्याला शांतता राहील. :)
24 Sep 2010 - 9:09 pm | ईन्टरफेल
आनि त्यापेक्षा बिएचसी वापरुन बघा
फरक (रिझल्ट) लवकर मिळेल
बघा बघा लवकर परयत्न करुन
ना रहेगा बास.................
दिवसा दिसत नसलेला <<<<<<<<<<
25 Sep 2010 - 8:05 am | नरेश धाल
त्यांना कविता वाचून दाखवा.
25 Sep 2010 - 10:59 am | पर्नल नेने मराठे
घरात स्व्छचता हवी.
रात्री सिन्क मधे भान्डी साठवुन ठेवु नका.
लगेच घासुन मोकळ्या व्हा.
सिन्कमध्ये १ महिन्यानी ड्रेनेज पावडर टाकत चला.
सिन्कच्या पाइपमधुन सुढ्हा झुरळे ये जा करीत असतात.
ट्रोली १५ दिवसातुन तरी बाहेर ओडुन स्व्च करीत जा.
भान्दी बाहेर वाळली किच ट्रोलीत कोम्बा.
स्व्तला वेळ नसेल तर नोकर ठेवा न कामे करुन घ्या.
पैसे जातात पण असला ताप डोक्याला होत नाही.
25 Sep 2010 - 12:33 pm | मितभाषी
धन्यवाद कर्नल नेने साहेब.
25 Sep 2010 - 7:23 pm | तिमा
तुम्हाला दम्याच्या औषधाचा व्यवसाय करता येईल.
मोठ्ठे झुरळ एक ग्लासभर पाण्यात उकळवून ते पाणी निम्मे आटवावे. त्यानंतर ते एका फडक्यावरुन गाळून ते पाणी फ्रीज मधे थंड करावे. (वास कमी येण्यासाठी) त्यानंतर हे पाणी दम्याच्या रोग्यास प्यायला द्यावे. फक्त ३ दिवसांत दमा पूर्ण बरा होतो असे एका माणसाने शपथेवर सांगितले आहे. प्रत्येकाने आपल्या जबाबदारीवर करुन पहावे.
26 Sep 2010 - 3:57 pm | बारक्या_पहीलवान
खालील प्रकार लागू होतो.
१०० ग्राम बोरिक Acid पावडर (कॅर्रोम बोर्ड ला वापरतो ती)
५० ग्राम गहू पीठ,
१ कप दुध ,
१ चमचा साखर ,
हे सगळे एकत्रित करून छोटे छोटे झाकणात (जुने बाटलीचे चालतील) भरून ते प्रत्येक कॉर्नर जाली किचन ठीक ठिकाणी ठेऊन द्या.
३-४ दिवसात नक्कीच झुरळ मरतात.
(दुसरे कोणी ग्चाकले तर मी जबाबदार नाही)
27 Sep 2010 - 10:55 am | मृत्युन्जय
हा ही उपाय करुन पहा:
कणकेचे छोटे छोटे गोळे करावे साधारणपणे २५ ग्रामचे. ते पिठीसाखरेत मिसळुन कडक उन्हात वाळत ठेवावेत.
हरभरा डाळ, मसूर, उडद डाळ आणि ज्वारीच्या समप्रमामातील मिश्रणात (प्रत्येकी १०० ग्राम) ५० मिली सुर्यफुलाचे तेल घाला. थोडेसे रसरशीत मिश्रण करावे. यात कणकेचे साखरमिश्रीत गोळे रात्रभर भिजवत ठेवावेत. सर्व द्रावण एकत्रि होउ द्यावे. त्यानंतर सुर्यफुलाच्याच तेलात हे गोळे तळुन घ्यावेत. या गोळ्यांवर हिट किंवा बॅगोनचा स्प्रे मारावा. नंतर लक्ष्मणरेखेच्या एका कांडीचा भुगा करुन तो या गोळ्यांवर भुरभुरावा.
नंतर एक एक करुन झुरळ पकडावेत आणि त्यांच्या तोंडात हा एक एक गोळा टाकावा. हिट, बेगोन आणी लक्ष्मणरेखेमुळे नाही मेले तरी पोट जास्त भरल्यामुळे तरी झुरळ नक्की मरतील.
वैधानिक सुचना: या प्रयोगाची कुठलीही शारिरीक, नैतिक, मानसिक जबाबदारी आम्ही घेणार नाही. झुरळ अथवा कुठल्याही इतर प्राण्याच्या(माणुस धरुन) मृत्युची जबाबदारी देखील माझ्यावर नसेल हे मी जाहीर नमूद करु इच्छितो. सदर प्रयोग ज्याचा त्याने स्वतःच्या जबाबदारीवर करवा.
27 Sep 2010 - 11:10 am | गांधीवादी
एवढे करण्यापेक्षा राहते घर सोडून दुसरीकडे घर घेतलेलं परवडेल,
हॅ हॅ हॅ.
27 Sep 2010 - 8:23 pm | सुहास..
मग गेले का झुरळ ???