" एक वेळ स्वतः हरवलास तरी चालेल पण पासपोर्ट हरवू नको."
प्रथम परदेशी जाताना माझ्या जवळच्या मित्राने दिलेला हा बहुमोल सल्ला आत्ताच प्रकर्षाने आठवण्याचे कारण म्हणजे एक आलेला (का आलेली?) इमेल.
हे ढकलमेल (Mass forward) किंवा चकमा (hoax) मेल समजू नये ही विनंती
आत्तापर्यंत अश्या अनेक मेल येत असतात आणित्याना फाट्यावर कसे मारायचे हे आपणासर्वाना आता चांगलेच ठावूक आहे.
(उदा:-इमेल रूपी संतोषी माता किंवा तत्सम)
पण विषय महत्वाचा आणि चिंताजनक होता म्हणून हा लेखन प्रपंच. तर विषय आहे पासपोर्ट (पारपत्र) चा.
सारांश असा.म्हणे की मुंबइ आणि हैद्राबाद एयर पोर्ट वर--
ब्ला ब्ला ब्ला
At the time of the passenger's departure, if the passenger is not looking at the officer while he is stamping the exit, the officer very cleverly tears away one of the pages from the passport. When the passenger leaves the immigration counter, the case is reported on his computer terminal with full details. Now all over India they have got full details of the passenger with Red Flag flashing on the Passport number entered by the
departure immigration
On arrival next time, he is interrogated. The price to get rid of the problem is settled by the Police and Immigration people. If someone argues, his future is spoiled because there are always some innocent
fellows who think the honesty is the basis of getting justice in India .
ब्ला ब्ला ब्ला
आता मुद्दे असे
१) हे सर्व खरे असेलच असे का? शक्यता फारच कमी ; पण पूर्ण नाकारता येईल का?
२) काळजी वाटून आपण ही मेल जवळच्या मित्राला पाठवली तर या अश्या कामामद्ये आपण पण सह भागी होणे हे अनैतिक नाही का?
३)स्पॅम रिपोर्ट केले तर आपले मित्रांचे आणि ईतर महत्वाच्या आयड्या पण ब्लॉक होतील.
यावर उपाय काय? दुर्लक्ष करणे हा सर्वोत्तम उपाय हे मान्य; पण हे क से शोधता येईल? अकॅडेमीकली?
मदत मिळावी आणि माहितीत भर पडावी ही विनंती.
प्रतिक्रिया
22 Sep 2010 - 3:44 pm | चिरोटा
भारतात माहित नाही पण आफ्रिकेत(मोझांबिक वगैरे) देशात हे घडले आहे.भारतातून आलात म्हंटले की काही पैसे मागतात. नाही दिले तर पान फाडले जाते.माहितीत असलेल्या एका व्यक्तीवरच असा प्रसंग आला होता.
22 Sep 2010 - 11:29 pm | पक्या
माझ्या जवळच्या नातेवाइकाबाबत हे घडले आहे ...पुणे एअरपोर्ट वर.
आंम्ही त्यांना सोडायला लोहगाव एअरपोर्ट वर गेलो होतो. मुंबईची फ्लाईट होती . आणि तिथून पुढे परदेशी रवाना व्हायचे होते. इमिग्रेशन झाल्यावर नातेवाईक फोन करून कळवणार होते की आत नीट पोहोचलो वगैरे. पण बराच वेळ फोन आला नाहि त्यामुळे आम्हाला जरा साशंक वाटत होते. शिवाय त्यांचे ५-६ महिन्याचे छोटे बाळ ही होते. त्यामुळे बाळाला काही त्रास झाला की काय म्हणून फोन नाही केला असे वाटले.
मग नंतर त्यांच्याकडून समजले ते असे. नातेवाईकाच्या पासपोर्टची शिवण थोडी उसवली होती. आणि हे निघायच्या दिवशी लक्षात आले . त्याला आम्ही ते बुकबाईंडर कडून शिवून घेऊ असे सांगितले पण नंतर आवराआवर करण्यात खूप घाई झाली. शिवाय बाळ लहान असल्याने त्याचे आवरण्यात वेळ गेला. नातेवाइ़क म्हणाला तिकडे पोहोचलो की ईंडियन कॉन्सुलेट ला विचारून बघतो मी. कदाचित नवीन पासपोर्ट देतील. आपण मनानेच काही नको करायला. आता एवढा काही वाईट स्थितीत नाहिये पासपोर्ट.
मग इमिग्रेशन च्या वेळेस म्हणजे काऊंटर वर जायच्या आधी हॉल च्या दारात एक हवालदार उभा होता. तो सर्वांचे पासपोर्ट चेक करून प्रवाशांना त्या हॉल मधे सोडत होता. नातेवाईकाचा पासपोर्ट बघून त्याला आयतेच हातात कोलीत मिळाल्यासारखे झाले. त्याने तो पासपोर्ट हातात घेतला. हे काय , फाटला की काय असे म्हणून जिथे थोडेसे फाटल्यासारखे दिसत होते तिथे अजून जोर लावून ओढून ते पान फाडले आणि पासपोर्ट खिळखीळा केला. (पण दाखवत असे होता की तुमचा पासपोर्ट आधीच खिळखीळा झाला आहे. ) तुम्हला प्रवास करता येणार नाही , असा पासपोर्ट चालणार नाही वगैरे बडबडू लागला. मग म्हणाला या माझ्या मागोमाग. फॅमिलीला बरोबर येऊ दिले नाही ..त्यांना इथेच थांबा बाळाबरोबर असे सांगितले. मग तो हवालदार नातेवाईकाला घेउन एका लांबच्या बाथरुम मधे गेला. तिथे वर्दळ नव्हतीच. तिथे अमेरिकेन डॉलर द्या अशी मागणी केली. (किती तो आकडा आता आठवत नाहिये) .नातेवाईका कडे ते नव्हते. मग ज्या देशात जात आहात तिथले पैसे द्या, डॉलर मध्ये किंमत करून द्या, पैसे दिले तर साहेब काही न बोलता आत सोडतील , तसाही तुम्हाला आता नियमाप्रमाणे प्रवास करता येणार नाहीच , पण पैसे दिलेत तर जाऊ शकाल असे सांगितले.
नातेवाईकाची रजा संपलेली होती. ऑफिसमध्ये जॉइन व्हावेच लागणार होते . शिवाय प्रवास नसता केला तर फॅमिली सकट सर्वांच्या तिकीटाचे पैसे वाया गेले असते. आणि ह्याही पेक्षा अजून आपल्याला कशात गुंतवले, आणखी काही आरोप ठेवले , तिथे मारहाण केली तर काय ,फॅमिली तिकडे वाट बघत उभी, बाळ लहान , त्यांना काहिच माहित नाही मला कुठे नेले का नेले, किती वेळ असेच डांबून ठेवतील , पासपोर्ट फाटला म्हणून मीच हवालदाराला लाच देण्यासाठी इकडे घेउन आलो असा बोभाटा त्या हवालदाराने केला तर.... वगैरे गोष्टीची भीती वाटून खिशात असलेल्या करन्सीची कॅश त्या हवालदाराच्या हातावर ठेवली. (आणी तशी ती बरिच कॅश होती ...शिवाय रुपयातले मूल्य पण बरेच होते.)
मग पुढे इमिग्रेशन वगैरे नीट पार पडले. पुढे परदेशी गेल्यावर इंडियन कोन्सुलेट मधून नवीन पासपोर्ट मिळाला पण हा अनुभव मात्र बेकार आला. आणि ही घटना फार जुनी नाहिये तर अडिच ३ वर्षापूर्वीची आहे.
22 Sep 2010 - 11:48 pm | शुचि
शी! काय बकवास एकेकजण भेटतात आयुष्यात. खरच.
23 Sep 2010 - 12:06 am | अश्विनीका
माझे आई वडील आमच्याकडे येत असताना पुण्याहून मुंबईला केके ट्रॅव्हल्सच्या गाडीने येत होते. त्यावेळी ड्रायव्हर्ने गाडीत अजून २ सिट्स घेतले होते. २ दक्षिण भारतीय आयटी तील तरूंण मुले होती. पहिल्यांदाच परदेशी जात होते. त्यांनी अजुनपर्यंत एअरपोर्ट आतून कसा दिसतो तेही पाहिलेले नव्हते. एकाच गाडीत असल्याने आई वडिलांशी ओळख होऊन गप्पाटप्पा मारत होते.
एयर पोर्ट ला चौघे बरोबरच होते. आई वडिलांचे इमिग्रेशन झाल्यावर ते गेटजवळील प्रतिक्षा कक्षात येऊन बसले. मग मागोमाग हि मुले पण आली. जरा काळजी होती त्यांच्या चेहर्यावर. बाबा म्हणाले की काय झाले, सर्व नीट पार पडले ना.
तर त्या मुलांनी त्यांचे पासपोर्टस दाखवले. त्यात यू. एस. व्हिसाचे पान काढून दाखवले. ते पान उजव्या बाजूचे होते , डाव्या बाजूचे पान रिकामे होते. इमिग्रेशन ऑफिसरने विसाचे पान चेक केले आणि डाव्या बाजूच्या रिकाम्या पानावर शिक्का मारताना तो असा मारला की अर्धा शिक्का यूएस विसा च्या फोटोवर उमटला. आणि तो शिक्का ही असा उमटला की फोटोतील चेहरा नीट दिसत नव्हता. आणि हे असे दोघांच्याही पासपोर्ट वर झाले होते. शिवाय तिथून निघताना बंद पासपोर्ट हातात घेउन ते पुढील तपासणी साठी रांगेत उभे राहिले. आणि ते सर्व सोपस्कार पार पडल्यावर मग त्यांनी पासपोर्ट उघडून पाहिले. तोवर ते गेट जवळ आले होते. त्या ऑफिसरच्या ते लक्षात आणुन द्यावे तर आता तिथून मागे पण जाता येत नाही ...
युएस मध्ये आल्यावर इमिग्रेशन करताना आता आपल्याला काहितरि प्रॉब्लेम येणार असे त्यांना सारखे वाटत होते. आइवडिलांना या बाबत फारशी माहिती नव्हती. आणि पुढे फ्लाईट्स च्या वेळा वेगळ्या असल्याने नंतर त्या मुलांनी काय केले , कोणा संबधित अधिकार्याला दाखवले का वगैरे काही समजले नाही.
इमिग्रेशन ऑफिसर कडून पासपोर्ट घेताना तो नीट चेक करून घेणे हेच चांगले. म्हणजे तिथल्या तिथे त्यांच्या लक्षात तरी आणून दिले जाईल. या शिवाय अन्य काही करू शकतो का माहित नाही.
23 Sep 2010 - 7:58 am | रेवती
माझ्या नातेवाईकांचा पासपोर्ट एका कोपर्यात थोडा दुमडला तर त्यांना नवा घ्यावा लागला होता. ही चार महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. पण पाने फाडणे वगैरे अनेकवर्षांपासून सर्रास चालत असल्याचे ऐकिवात आहे.
24 Sep 2010 - 5:15 pm | बजरबट्टु
खालील दुव्यावर जाउन तुम्ही चकमा मेल शोधु शकता.
http://www.hoax-slayer.com/
बघा उपयोग होतोय का .
24 Sep 2010 - 8:45 pm | मस्तानी
... पण मी 'काहीतरीच काय' असं म्हणून दुर्लक्ष केलं होतं, इथे दिलेले अनुभव वाचून वाटतंय ओळखीतल्या सर्वाना खरंच सांगायला पाहिजे.