http://img1.orkut.com/images/chhota/1283586494/1285121832158/546100837/Z...
साहित्य:- एक वाटी आख्खा मसूर, एक कांदा, पाच-सहा लसूण पाकळ्या,एक छोटा तुकडा सुके खोबरे,एक चमचा जिरे,गोडा मसाला एक चमचा, कांदा लसूण मसाला अर्धा चमचा, तेल, फ़ोडणीचे साहित्य, कोथींबीर.
कॄती :- प्रथम आख्खा मसूर निवडून घ्या.कुकरला शिजवुन घ्या.
खोबरे,जिरे,लसुण एकत्र वाटण करा,
कांदा बारीक चिरा, कोथिंबीर बारीक चिरा.
थोडे तेल घालून फ़ोडणी टाका,त्यावर कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या,लसूण-खोबरे वाटण टाका,परत चांगले परतून घ्या, त्यात शिजलेले आख्खा मसुर घाला, चवीनुसार मिठ,थोडासाच गुळ घाला.चांगले उकळू द्यात.नंतर वरुन कोथिंबीर घालून गरम गरम सर्व्ह करा.
हे तुम्ही चपाती,ब्रेड, रोटी, बाजरीची भाकरी कशाबरोबरही खाऊ शकता.
जोडीला कांदा..........नुसता हाताने फ़ोडून व आवड्त असल्यास हिरवी मिरची (तळून), घ्या.
मस्त आख्खा मसूर तयार.
हल्ली बर्याच धाब्यावर, होटेलात ही स्पेशल डिश मिळते. जोडीला गोड दही असेल तर मस्तच.
प्रतिक्रिया
22 Sep 2010 - 9:15 am | अजबराव
मस्त भाजि....चविला खुप छान लागते हि भाजि....
22 Sep 2010 - 9:19 am | पैसा
22 Sep 2010 - 11:42 am | निवेदिता-ताई
http://img1.orkut.com/images/chhota/1283586494/1285121832158/546100837/Z...
22 Sep 2010 - 12:50 pm | निवेदिता-ताई
22 Sep 2010 - 12:57 pm | चिंतामणी
निवेदिता-ताई जमला की फोटु टाकायला.
हे भारी काम झाले.
आता बघा प्रतिक्रीया येतील.
22 Sep 2010 - 3:44 pm | बबु
पुण्यात सातारा रोडला सिटी प्राईड समोर " जगात भारी कोल्हापुरी" हे हॉटेल या डिश साठी फेमस झाले आहे. रीसिपिबद्दल धन्यवाद.
22 Sep 2010 - 4:06 pm | कुक
मोड आलेली अखी मसुरची नुसती कान्दा लसुन घालुन तव्यावर केलेली सुकी भाजि मला खुप आवडते.
तसेच मसुरडाळ चि कोकम टाकुन केलेली तिखट आमटी मला खुप आवडते
22 Sep 2010 - 4:54 pm | रेवती
फोटूमुळे पाकृ मस्त दिसते आहे.
लगेच मसून भिजत टाकते.
या पाकृमध्ये तुम्ही मसूर भिजवत नाही का?
22 Sep 2010 - 5:21 pm | चिंतामणी
मसूरसुध्दा ६-७ तास भिजवायला लागतात.
निवेदीताताईंनी भिजवलेलेच आणले असतील किंवा घाई गडबडीत विसरल्या लिहायच्या.
22 Sep 2010 - 5:26 pm | निवेदिता-ताई
नाही , आम्ही मसूर कधीच भिजवत नाही, जरा कुकरच्या शिट्ट्या एक-दोन जास्त करते, छान शिजतात मसुर.
22 Sep 2010 - 9:14 pm | माझीही शॅम्पेन
१०० सहमत ! पा.क्रु मस्त !
23 Sep 2010 - 12:40 am | प्राजु
मी कालच केला होता मसूर. अख्खाच होता तो ही. मात्र मी आपली साधी मसूराची उसळ केली होती. :)
आज काल बर्याच हॉटेल्स मध्ये ही डीश मिळते.
23 Sep 2010 - 1:17 am | शुचि
ही उसळ अ-प्र-ति-म लागते. मी लहानपणी दह्यात घालून नुसती गट्ट करायचे. मसूर कुकरमधे शिजतो. भीजवावा लागत नाही.