गणपती विसर्जन

शिशिर's picture
शिशिर in काथ्याकूट
22 Sep 2010 - 10:03 am
गाभा: 

आज अनंत चतुर्दशी दुपारी १२.२९ पर्यन्त आहे. त्यानंतर पॉर्णिमा सुरु होते. गणपती विसर्जन १२.२९ च्या आत करावे की संध्याकाळी केलेले चालेल? जाणकारांनी मार्गदर्शन करावे....

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

22 Sep 2010 - 10:22 am | पाषाणभेद

घरचा गणपती असेल तर १२.२९ च्या आत करा. सार्वजनीक कामात सुसुत्रता आपण कधी बाळगतो?

अवांतर: आमच्या कॉलेजच्या एका लॅबच्या बाहेर गेल्या दोन वर्षापासून प्रयोग चालू आहे. लॅबबाहेर उघड्यावर चारदोन गणपती ठेवलेले आहे. त्यांचे रंग उडालेले आहेत पण अजूनही त्या मुर्त्या मातीत मिसळलेल्या नाहीत. प्लास्टर ऑफ पॅरीस दुसरे काय!

नदीचे प्रदूषण किती भयानक होते! जाणीव असलेल्या माणसाला ते पाहवत नाही. दरवर्षी POP च्या मुर्त्या आणून प्रदुषण वाढवण्यापेक्षा एकच धातूची मुर्ती घेतली अन तिचे प्रतिकात्मक विसर्जन केले तर? पुरोगामी म्हणवणार्‍या महाराष्ट्रात अशी प्रथा पाळायला काय जाईल?

सार्वजनिक गणपती चालले गावाला |
चैन पडेल आता आम्हाला ||

बाकी जाणकार नसल्याने मार्गदर्शन करु शकत नाही..क्षमस्व !

अवलिया's picture

22 Sep 2010 - 12:24 pm | अवलिया

सुर्योदयाच्या वेळेस अनंत चतुर्दशी होती त्यामुळे आजची तिथी अनंत चतुर्दशीच मानली जाते. जी कार्ये मुहुर्त अथवा कालाशी संबंधित नसतात आणि फक्त तिथीला करायची असतात ती ज्या दिवशी ती तिथी असते त्या दिवशी केली जातात. प्रत्यक्ष ते कार्य करतेवेळी ती तिथी संपून दुसरी लागली तरी फरक पडत नाही. त्यामुळे सकाळी सूर्योदयापासुन उद्या सूर्योदय होईपर्यंत विसर्जन केले तरी चालेल.

अविनाशकुलकर्णी's picture

22 Sep 2010 - 12:25 pm | अविनाशकुलकर्णी

्विसर्जन लवकर आटपा म्हणजे झाले