आज बाप्पाला निरोप द्यायचा आहे आणि त्यासाठी आहे खास नैवेद्य चिकू मोदक.. तर चला तयारीला लागू या.
साहित्यः
६ चिकू, २०० ग्राम साखर, १ खवलेला ओला नारळ, कोको पावडर २ चमचे, दुध १ वाटी, खवा २०० ग्राम, चांदी वर्ख सजावट करायला..
प्रथम चिकूचा गर काढून घ्यावा.
दुध, कोको पावडर, चिकूचा गर व खवलेला नारळ एकत्र करून मिक्सरमधून फिरवून घ्यावे.
नंतर त्यात खवा मोडून घालावा आणि साखर घालून एका भांड्यात काढून घ्यावा.
मिश्रण विस्तवावर ठेवून आटवून घ्यावे आणि कडेने सुटू लागल्यावर भांडे उतरवून मिश्रण घोटत राहावे.
मिश्रण किती घट्ट झाले आहे ते बघून मोदक साच्यात टाकून मोदक बनवावेत.
वरून चांदीचा वर्ख लावून सजवावेत...
प्रतिक्रिया
22 Sep 2010 - 10:42 am | सविता
वाह्....वाह.........
22 Sep 2010 - 10:43 am | नंदन
वेगळीच, मस्त पाककृती!
22 Sep 2010 - 11:18 am | मदनबाण
वा... :)
22 Sep 2010 - 11:41 am | चिंतामणी
एक वेगळी पाकृ.
सध्या मिपाकरांची चंगळ चालू आहे.
पण खायला बोलवत नाही कुणी. बोलावले तर अजून छान वाटेल.
22 Sep 2010 - 1:01 pm | यशोधरा
वेगळीच आहे पाकृ. करुन बघेन.
22 Sep 2010 - 1:24 pm | गणपा
मस्त बाप्पाला जाता जाता शिदोरी बांधुन देता येईल. :)
22 Sep 2010 - 4:15 pm | कुक
करायचा विचार करतोय पण बाजारात सध्या चिकुच्च दिसत नाही
22 Sep 2010 - 5:43 pm | नावातकायआहे
मोदक (चविला सुंदरच असेलच पण) चिक्कु दिसतोय...
अवांतरः (१च बनवला वाट्टे फोटो पुरता. ह.घ्या)
23 Sep 2010 - 7:02 am | रेवती
वेगळीच पाकृ आहे.
आम्हाला प्रसादाला बोलावले असते तर तिथेच प्रतिक्रिया देता आली असती.
असो, पुढच्या वर्षी!;)
24 Sep 2010 - 5:08 pm | गणेशा
आज पासुन पाककृती पाहण्यास सुरुवात केली.
पहिलेच मोदकाचा मेनु म्हणजे मस्त वाटले.
छान आणि वेगळा प्रकार कळाला. कधी ऐकण्यात नव्हता हो ..
--
कसा लागतो ते पण सांगा ना .. जरा वेगळा पदार्थ आहे म्हणुन म्हणालो