दहीबुत्ती

मितान's picture
मितान in पाककृती
20 Sep 2010 - 6:29 pm

रावणपिठले, शेवभाजी अशा जळजळीत आणि झणझणित जेवणात शेवटी दहीबुत्ती असली की पोटात कसे गार वाटते !
अशी ही माझी आवडती दहीबुत्ती-

सामग्री : -
भात
दही
फोडणीसाठी जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिंग, अर्धा चमचा उडीद डाळ, तेल किंवा तूप.

कृती:
१ वाटी तांदळाचा भात शिजवून घ्यावा.
थोडा गार झाल्यावर त्यावर दीड वाटी दही भातावर पसरून घावे.
फोडणी तयार करताना मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता तडतडू दयावा. गॅस बंद करून त्यात उडीद डाळ घालावी. ती गुलाबी रंगाची झाली की ही फोडणी दह्यावर घालावी. अगदी खाण्याच्या वेळी चवीनुसार मीठ घालून हाताने चांगले मिसळून घ्यावे. कोथिंबीर घालावी.
थोडी तिखट चव हवी असल्यास फोडणीसाठी गरम केलेल्या तेलात वाळलेली लाल मिर्ची किंवा तळणी मिर्ची तळून घावी. ती कुस्करून भातात घालावी.
हा भात थोडावेळ फ्रीजमध्ये थंड होऊ द्यावा. जास्त छान लागतो. :)
Dahibhat

फक्त हेच जेवण असेल तर मी यात किसलेली काकडी पण मिसळते. आणि पाहुण्यांसाठी असेल तर कोथिंबीरी सोबत डाळिंबाचे दाणे पेरून सजवते.
काल कोथिंबीर आणि डाळिंब घरात नव्हते म्हणून साधाच केला. त्याचा फोटो तुमच्यासाठी.. :)

प्रतिक्रिया

अनामिक's picture

20 Sep 2010 - 6:42 pm | अनामिक

वा व्वा... छानच दिसतेय दहीबुत्ती! नावही भारीच वाट्टंय!!

वेताळ's picture

20 Sep 2010 - 6:44 pm | वेताळ

असाच छान लागतो.

मदनबाण's picture

20 Sep 2010 - 6:45 pm | मदनबाण

वा... हे खाउन नक्कीच गार वाटेल... :)

धमाल मुलगा's picture

20 Sep 2010 - 6:45 pm | धमाल मुलगा

च्यायल्ला!
दहीबुत्तीसाठी आपण खूनपण करायला तयार है. :)

मी तर बुवा त्या फोडणीत थोडे शेंगदाणेही घालतो. मस्त लागतात.

अवांतरः दहीबुत्तीसोबत घोंगुरा पिक्कल खाऊन पाहणे. नाय तिच्यायला समाधी लागली तर सांगा. :)

नगरीनिरंजन's picture

20 Sep 2010 - 6:48 pm | नगरीनिरंजन

एकदम बरोबर! शेंगदाणे घालून फार छान लागतं.
बाकी फोटो जबरा आहे. तों.पा.सु.आ.

रेवती's picture

20 Sep 2010 - 6:45 pm | रेवती

मस्त फोटू!
माझा आवडता प्रकार!
पावभाजी नंतर तर हवाच हा भात!

अस्मी's picture

21 Sep 2010 - 10:47 am | अस्मी

मस्त...माझाही आवडता प्रकार :)

अस्मिता

अवलिया's picture

20 Sep 2010 - 6:47 pm | अवलिया

मस्त !

रावणपिठले, शेवभाजी अशा जळजळीत आणि झणझणित जेवणात शेवटी दहीबुत्ती असली की पोटात कसे गार वाटते

हा त्या रावण पिठल्याचा, झणझणीत मिसळीचा/शेवभाजीचा घोर अपनाम आहे असे मी मानतो.
तिखट खाता येत नाही तर त्या वाटे जाऊ नये ;)

हां असा दहीभात नुसता आणुन द्या पातेलभर हाणु आपण. :D
बाकी फोटो आणि पाकृ १०० पैकी १००. :)

मेघवेडा's picture

20 Sep 2010 - 6:59 pm | मेघवेडा

उत्तरार्धासारखेच म्हणतो.

>>>हा त्या रावण पिठल्याचा, झणझणीत मिसळीचा/शेवभाजीचा घोर अपनाम आहे असे मी मानतो.
तिखट खाता येत नाही तर त्या वाटे जाऊ नये

संदर्भासह स्पष्टीकरण द्या !

(तिखटखाऊ) मितान

हे तुम्हाला उद्देशुन नव्हत हो तै :)

सूड's picture

20 Sep 2010 - 7:15 pm | सूड

अरे वा !! दहीबुत्ती हजर !!
असो. रेशिपी, फोटो दोन्ही छान आहे मितानतै.

पैसा's picture

20 Sep 2010 - 7:57 pm | पैसा

मी हॉटेलात जाऊन पण हेच खाते!

निवेदिता-ताई's picture

20 Sep 2010 - 8:56 pm | निवेदिता-ताई

आम्ही यात मेतकूट घालतो व फ़ोडणीसाठी तळणीची मिरची वापरतो..व्वा काय लागतो हा दही-भात,
आम्ही दही-भात म्हणतो याला...

बेसनलाडू's picture

20 Sep 2010 - 10:36 pm | बेसनलाडू

नेहमीची, अनेक बदल करून चवदार बनवता येणारी अशी आवडीची पाककृती!
(खवय्या)बेसनलाडू

प्राजु's picture

20 Sep 2010 - 10:51 pm | प्राजु

मस्त!!

चतुरंग's picture

20 Sep 2010 - 10:57 pm | चतुरंग

बरं झालं जेवण झाल्यावरच धागा उघडायचा निर्णय अंबळ बरोबर ठरला! ;)

(दहीबुत्तीप्रेमी)रंगान्ना मिरजकर

उपेन्द्र's picture

20 Sep 2010 - 11:01 pm | उपेन्द्र

सुरेख दिसतोय आणि लागेल पण... फोडणीत लसुण असेल तर आणखीच मस्त..

रश्मि दाते's picture

20 Sep 2010 - 11:28 pm | रश्मि दाते

मलाहि खुप आवडतो दहिभात्,पण शेव भाजी सोबत साघा भातच हवा रश्याबरोबर ओरपायला,हवेतर नंतर ग्लास ग्लास ताक प्यावे तिख्ट झेपत नसेल तर

शिल्पा ब's picture

21 Sep 2010 - 12:11 am | शिल्पा ब

मस्त...मी यात फोडणीत हिरवी मिर्ची घालते.

विजुभाऊ's picture

21 Sep 2010 - 10:01 am | विजुभाऊ

गणपा आनि धम्याशी सह्मत

स्वाती२'s picture

21 Sep 2010 - 5:07 pm | स्वाती२

व्वा! नुसता फोटो पाहुनच तोंडाला पाणी सुटले.

प्राजक्ता पवार's picture

21 Sep 2010 - 5:09 pm | प्राजक्ता पवार

माझा आवडता पदार्थ आहे हा . :)

मस्त ! गार पाक्रु पण रश्मी ताईशी सहमत ! "साघा भातच हवा रश्श्याबरोबर ओरपायला,हवेतर नंतर ग्लास ग्लास ताक प्यावे "

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Sep 2010 - 7:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

व्वा! दहिभात्/दहिबुत्ती काही म्हणा! असं काही सुंदर खाणं समोर दिसलं की एकदम कडकडून भूक लागते. मितान, भगवंतास्टीक!!

मिपाच्या तांत्रीक समीतीचा तीव्र निषेध मिपाच्या तांत्रीक समीतीचा तीव्र निषेध
मिपाच्या तांत्रीक समीतीचा तीव्र निषेध मिपाच्या तांत्रीक समीतीचा तीव्र निषेध
मिपाच्या तांत्रीक समीतीचा तीव्र निषेध मिपाच्या तांत्रीक समीतीचा तीव्र निषेध
मिपाच्या तांत्रीक समीतीचा तीव्र निषेध मिपाच्या तांत्रीक समीतीचा तीव्र निषेध
मिपाच्या तांत्रीक समीतीचा तीव्र निषेध मिपाच्या तांत्रीक समीतीचा तीव्र निषेध
मिपाच्या तांत्रीक समीतीचा तीव्र निषेध मिपाच्या तांत्रीक समीतीचा तीव्र निषेध

असे सुंदर धागे वाचनखुण म्हणून साठवता येत नाही अजुन म्हणून

असा धाग्यांवर निषेध करण मिपाच्या धोरणात बसत का ;)
मान्य आहे तुम्ही ही मागणी तांत्रिक समीतीकडे आधीच धा वेळा नोंदवली असेल पण म्हणुन इतका त्रागा :)

कुक's picture

22 Sep 2010 - 3:52 pm | कुक

काल केलेल ,
दुपारी गणपती पाहुन आल्यावर येताना सोबत दही आणले ,
व करुन खाले मस्त झालेला सोबत चटणी होती