मुसलमानांसाठी राखीव

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
17 Sep 2010 - 8:27 am
गाभा: 

मुसलमानांसाठी राखीव
काल आय बी एन मधे एक सनसनाटी बातमी बघत होतो..एका गुप्त चौकशी मधे असे आढळले कि मुसलमान लोकांना कुणीच फ्लाट विकत ना्ही, व जागा हि भाड्याने देत नाहि..मुंबई व दिल्लीच्या लोकांची पहाणी केल्यावर असे आढळून आले कि ८०% मालक मुसलमानाना जागा देण्यास तयार नसतात..
यात अनेक शिकलेल्या घर मालकांचा हि लोकांचा पण भरणा आहे.

.इमरान ला ..सैफ़ ला भाड्याने घर मिळत नाहि.....

यावर मार्ग काय?
नविन होणाऱ्या इमारतीत काहि जागा मुसलमानांसाठी राखीव असाव्यात काय??
धर्म निरपेक्षतेच्या तत्त्वास अश्या वागण्या मुळे बाधा येति का?.

प्रतिक्रिया

सुनील's picture

17 Sep 2010 - 4:49 pm | सुनील

मीरा रोड येथिल काही सोसायटींमध्ये मुस्लिमांखेरीज अन्य लोकांना जागा मिळत नाही.

प्रश्न असा आहे की, हे असे होणे योग्य आहे काय? की मिश्र वस्त्या चांगल्या?

माझ्या मते, वस्ती मिश्र असावी.

विकास's picture

17 Sep 2010 - 5:04 pm | विकास

मला कल्पना नाही म्हणून हा प्रश्नः आपल्याकडे कायद्याने जागा वगैरेंच्या व्यवहारात धर्म बघायला बंदी आहे का? नसल्यास करायला हवी. तेच जातींबद्दलही. त्याने असला तर सगळा प्रश्न सुटणार नाही पण जरा "टेन्शन" राहू शकते...

आपण आपल्यापुरते बोलूया: "मी असे करेन का?" माझ्या पुरते उत्तर नाही असे आहे. मला शेजारी कोणत्या धर्माचा राहतोय याने काही फरक पडणार नाही. केवळ तो शेजार हा "शेजारधर्म" पाळणारा असल्याशी कारण आणि त्यापुरते नक्कीच बघायचा/निवडायचा प्रयत्न करेन...

प्रसार माध्यमे जेंव्हा "सनसनाटी" रिपोर्ट तयार करतात तेंव्हा त्यात नक्की काय संशोधन करतात कोण जाणे!

  1. मुसलमान बिल्डर्स पण मुसलमान खरेदी करणार्‍यांस जागा देत नाहीत का?
  2. जसे जैन धर्मियांच्या मुंबईतील सोसायट्यांमधे (ज्या भागात मुळचे कोळी राहत/राहतात) त्यांनी येथे मांसाहार चालणार नाही अशा प्रकारच्या नोटीसा लावत घरे विकल्याचे ऐकले आहे. तसे काही मुसलमानांबद्दलही झाले आहे का?
  3. जेंव्हा सगळे मुसलमान (मुंबईतील) मुंब्रा, कुर्ला, मीरा रोडला गेलेत असे म्हणले जाते ते केवळ त्यांना धर्मामुळे जागा न मिळाल्याने का त्यात अर्थकारणपण आहे? कधीकाळी गिरगाव हे मराठी वस्तीचे ठिकाण होते... नंतरच्या काळात (आत्ताच्या जागांच्या भयानक भावाच्याही आधी) तेथील अनेक मराठी उठून डोंबिवलीला गेलेच ना? मग प्रत्येकानी (अनेकांनी) डोंबिवलीच का सिलेक्ट केली? अर्थात समान शीले.. आता मुंबईतील अनेक मराठी परदेशात जातात आणि आईवडील पुण्याला जातात. या प्रत्येकास जात-धर्म-भाषा सगळ्याचाच रंग देत विश्लेषण केले तर ते योग्य ठरेल का?
  4. इमरान-सैफ ला जागा मिळाल्या नाहीत तर ते देखील मुंब्र्याला रहायला गेले का? ज्या इमारतींमध्ये मान्यवर (सधन, प्रसिद्ध वगैरे) मुसलमान रहातात त्यांच्या सोसायट्यांमध्ये त्यांना वागणू़क कशी असते? मुंबईच्या जनगणणेत किती मुसलमान कुठे राहतात आणि इतरत्र किती हे पहाता येईल. तेच इतर जात-भाषा-प्रांत-धर्म या वर्गांनी शक्य होईल..
आमोद शिंदे's picture

17 Sep 2010 - 5:24 pm | आमोद शिंदे

मला कल्पना नाही म्हणून हा प्रश्नः आपल्याकडे कायद्याने जागा वगैरेंच्या व्यवहारात धर्म बघायला बंदी आहे का? नसल्यास करायला हवी. तेच जातींबद्दलही. त्याने असला तर सगळा प्रश्न सुटणार नाही पण जरा "टेन्शन" राहू शकते...

आपण आपल्यापुरते बोलूया: "मी असे करेन का?" माझ्या पुरते उत्तर नाही असे आहे. मला शेजारी कोणत्या धर्माचा राहतोय याने काही फरक पडणार नाही. केवळ तो शेजार हा "शेजारधर्म" पाळणारा असल्याशी कारण आणि त्यापुरते नक्कीच बघायचा/निवडायचा प्रयत्न करेन...

पूर्ण सहमत!

चिरोटा's picture

17 Sep 2010 - 5:58 pm | चिरोटा

मला शेजारी कोणत्या धर्माचा राहतोय याने काही फरक पडणार नाही

हम्म.माझ्यामते तो ईतरांनाही पडत नसावा. बर्‍याच वेळा विरोध हा विशिष्ट पंथा/धर्माबाबतचे समज्/गैरसमजातून होतो असे वाटते.बेंगळूरमध्ये भाड्याचे घर बघताना बर्‍याचवेळा भाडेकरुची जात उघडपणे विचारली जाते."only veg" असे सरळ सांगतात.ह्याचा अर्थ घरमालक जातियवादी आहे असे नसून त्यांना भाडेकरु शाकाहारीच पाहिजे असतो,धार्मिक भावनांमुळे.
असेच पुढे जावून एखाद्या घरमालकाने मला परधर्मिय भाडेकरु नको असे म्हंटले तर कायदेशीर ठरते का?

चिरोटा's picture

17 Sep 2010 - 5:09 pm | चिरोटा

होवून जावू द्या आता एक कौल- तुम्हाला तुमचा शेजारी कुठच्या धर्माचा आवडेल-
१)हिंदु
२)मुस्लिम
३)ख्रिश्चन
४)ज्यु
५)ईतर्(ईतर कोण ते स्पष्ट करा)

समंजस's picture

17 Sep 2010 - 5:10 pm | समंजस

>>> " .इमरान ला ..सैफ़ ला भाड्याने घर मिळत नाहि....."

ह्या मागे या दोघांचा धर्म नाही तर कदाचीत या दोघांची जन सामान्यांत निर्माण झालेली प्रतिमा असावी :)
[ हे दोघे सोसायटीत राहत असतांना कोण्या सुंदर स्त्रीचा नवरा किंवा सुंदर मुलीचा बाप निर्धास्तपणे घराबाहेर/शहरा बाहेर राहणार ;) ]

>>> " एका गुप्त चौकशी मधे असे आढळले कि मुसलमान लोकांना कुणीच फ्लाट विकत ना्ही, व जागा हि भाड्याने देत नाहि..मुंबई व दिल्लीच्या लोकांची पहाणी केल्यावर असे आढळून आले कि ८०% मालक मुसलमानाना जागा देण्यास तयार नसतात.. "

ही बातमी नवी नाही किंवा हे तथ्य सुद्धा नवं नाही. अश्या घटना फक्त मुस्लिमांच्या बाबतीच होत नाहीत तर मुंबई मध्ये अश्या प्रकारच्या घटना ईतरांच्याही बाबतीत घडतात. जसे की शक्य असल्यास जैनांच्या सोसायटी मध्ये बिगर-जैनांना प्रवेश नाही, गुजराथींच्या सोसायटी मध्ये बिगर-गुजराथींना प्रवेश नाही, तामिळींच्या सोसायटी मध्ये बिगर-तामिळींना प्रवेश नाही, ख्रिश्चनांच्या सोसायटी मध्ये बिगर-ख्रिश्चनांना प्रवेश नाही. बोहरी मुस्लिमांच्या सोसायटी मध्ये बिगर-बोहरी मुस्लिमांना प्रवेश नाही आणखीही उदाहरणे आहेत परंतु मला वाटतं एवढी उदाहरणे पुरेशी असावीत हे समजून घ्यायला की मुंबईत हा दुजाभाव फक्त मुस्लिमांच्या बाबतीत होत नाही तर इतर समाजाच्या/धर्माच्या/जातीच्या/भाषेच्या/प्रांताच्या व्यक्तींबाबत सुद्धा होतो. मुस्लिमांना ईतर सोसायटींमध्ये प्रवेश मिळत नाही या वर एवढा गदारोळ उडवणे आवश्यक नाही, गदारोळ उडवायचाच झाल्यास वर उल्लेखलेल्या आणि ईतरांच्या बाबतीत अश्याच होणार्‍या घटनांबाबत का उडवू नये ?

धागा कर्ते अविनाश साहेब यांना काही प्रश्ने कारण हा धागा टाकल्यावर परत त्यांचा सहभाग दिसून आलेला नाही :)
१) सोसायटीत प्रवेश देताना म्हणजेच जागा भाडयाने/विकत देताना ईतरांच्या बाबतीत सुद्धा जो भेदभाव होतो त्या बद्दल आय बी एन ने काही गुप्त चौकशी केली का ? आपण बघितली का ?
२) बर्‍याच सोसायटींमध्ये बॅचलर्सना(विद्यार्थी किंवा नोकरी करणारे परंतु अविवाहीत) यांना सुद्धा प्रवेश दिला जात नाही या बद्दल काय म्हणणे आहे ?
३) " नविन होणाऱ्या इमारतीत काहि जागा मुसलमानांसाठी राखीव असाव्यात काय?? "
फक्त मुस्लिमानांच आरक्षण द्यावे का ? हे कितपत व्यवहार्य आहे ?
४) " धर्म निरपेक्षतेच्या तत्त्वास अश्या वागण्या मुळे बाधा येति का? "
धर्म निरपेक्षता आणि वरील घटनेचा काय संबंध ? धर्म निरपेक्षता पाळणे हे सगळ्यांनाच बंधन कारक आहे का ? धर्म निरपेक्षता म्हणजे काय ?

विकास's picture

17 Sep 2010 - 6:37 pm | विकास

धागा कर्ते अविनाश साहेब यांना काही प्रश्ने कारण हा धागा टाकल्यावर परत त्यांचा सहभाग दिसून आलेला नाही

मला पुलंची म्हैस गोष्ट आठवते. म्हणजे त्यात कशी इतरजण फुकाची चर्चा वाद करत बसतात आणि ती कथानायीका खाटा उडवून निघून गेलेली असते तसेच काहीसे. ;) अर्थात हे मी काही या चर्चेपुरते अथवा लेखकापुरतेच म्हणत नाही आहे, पण असे अनेकदा दिसून येते हे मात्र खरे...

कानडाऊ योगेशु's picture

17 Sep 2010 - 6:51 pm | कानडाऊ योगेशु

धागा कर्ते अविनाश साहेब यांना काही प्रश्ने कारण हा धागा टाकल्यावर परत त्यांचा सहभाग दिसून आलेला नाही

हॅ हॅ हॅ.अविनाशकाका नॉनस्ट्रायक्रर एण्ड ला उभे राहुन लौकरच सेंन्चुरी मारतायेत पाहा.!

>>.इमरान ला ..सैफ़ ला भाड्याने घर मिळत नाहि.....यावर मार्ग काय?
त्यांनी महेश भट कडे पेइंग गेस्ट म्हणुन राहावे.

इन्द्र्राज पवार's picture

17 Sep 2010 - 6:06 pm | इन्द्र्राज पवार

"आय बी एन मधे एक सनसनाटी बातमी बघत होतो...."

सर्वप्रथम मुळात धागाकर्त्याचे वरील विधानच द्विरुक्ती दर्शविते...म्हणजे असे की, आय.बी.एन. (आणि तिचे मराठी पिल्लू 'लोकमत') यांनी चॅनेल स्थापनेपासून 'साध्या' बातम्या कधी दिलेल्याच नाहीत, दिल्या त्या कशाही 'सनसनाटी' करूनच. त्यामुळे श्री.अविनाश कुलकर्णी यांनी "काल आयबीएनमध्ये एक बातमी बघत होतो.." असे जरी लिहिले असते तरी हाच १०० नंबरी धागा इफेक्ट झाला असता. असो.

मी पाहिली ती बातमी. खरेतर गणपतीच्या दिवसात विनाकारण असले 'मुसलमान' विषय [गरज नसताना] पुढे आणून दोन धर्मीयांच्यात हकनाक तंग वातावरण निर्माण करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न करण्यार्‍या असल्या भडकाऊ चॅनेल्सवर त्यांच्या संघटनेने काहीतरी निर्बंध लादण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. 'मुसलमानाना आमच्या सोसायटीत जागा नाही..." ही बातमी का कालची/आजची आहे? नाही...! अगदी १९९३ पासून ही मनोवृत्ती महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरात होत आली आहे... आणि त्याला प्रमुख कारण कुठले असेल तर "मुसलमान्=दहशतवादी वा त्याचे दहशतवाद्यांशी या ना त्या निमित्ताने कुठे ना कुठे तरी संबंध असणारच हा सरळसोट विचार." यामुळे जे मुसलमान तनमनधनाने खरेखुरे भारतीय आहेत त्यांच्या मनी या देशाबद्दल असलेली भावना कोणते रूप धारण करत असेल याचा विचार आज आपण करीत नाही, हीच बाब 'सोसायटीत जागा नाही' अधिक स्पष्ट करते.

आयबीएनने ज्या सोसायटीमध्ये आपली व्हॅन नेली होती, ती सोसायटी समस्त शहराचे प्रतिनिधीत्व करते काय? ४ लोकांना विचारले, तिघांनी "नाही" असे उत्तर दिले म्हणून चला "या शहरात ८०% सोसायट्या मुसलमानाना घरे भाड्याने देत नाही..." हा प्रमेय झटदिशी सुटला. कोणती सायंटिफिक मेथड लावली होती? कोणता सर्व्हे एरिया त्या टीमला असाईन केला होता? काय प्रश्नावली त्या लोकांना दिली होती? दोन धर्मीयांच्या संदर्भात असा सर्व्हे घेण्यास कलेक्टरची पूर्वपरवानगी काढली होती का? असे प्रश्न या चॅनेलवाल्यांना पडत नाहीत कारण त्यांना आपल्याकडे 'फार मोठी ताकद' आहे असा जो गर्व झाला आहे त्याचा परिपाक म्हणजे असल्या आगलावू बातम्या घरंगळू द्यायच्या....आणि बसा चर्चा करत....पाठवा एसएमएसचा पाचुंदा,, भरा त्या सेल कंपन्यांच्य तिजोर्‍या !

'घर देत नाही....' हा काय फक्त मुसलमानांचाच प्रश्न आहे? लंडनमध्ये खुद्द 'महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व श्री.पु.ल.देशपांडे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुनीता देशपांडे' यांना काय अनुभव आला होता? जाईल त्या ठिकाणी "फ्रॉम इंडिया" असे म्हटले की, 'सॉरी नो अकॉमोडेशन..." दार बंद व्हायचे. एके ठिकाणी जागा रिकामी आहे असा बोर्ड पाहुन दार वाजविले तर या जोडप्याल्या पाहुन त्या इंग्लिश यजमान बाईने 'नो रूम्स..." असे म्हणतास सुनीताबाई चवताळून म्हणाल्या..."नो रूम म्हणून तुम्ही आम्हाला सांगता, ते आम्ही काळे आहोत म्हणून सांगा ना..." असे म्हटल्यावर त्या इंग्रज बाईने शांतपणे त्या दोघांना आत नेले व त्या बिल्डिंगमधील काही खोल्या त्यांना उघडून दाखविल्या ज्या भारतीय विद्यार्थ्यांना दिल्या होत्या. खोल्यांकडे बोट दाखवुन ती बाई म्हणाली, "बघा, यासाठी आम्ही निर्णय घेतला आहे की, इथून पुढे इंडियन्सना खोल्या द्यायच्या नाहीत." त्या खोल्यांची अशी काही गटारगंगा अवस्था आपल्या देशबांधवानी केली होती की ती पाहून देशपांडे पतीपत्नींना काहीच उत्तर सुचेना व ते परत फिरले. त्यामुळे 'मुसलमाना' ना जागा नाही हे जरी बातमीत असले तरी कमीजास्त प्रमाणात हिंदू घरमालक तसले मीटर हिंदुतीलच अनेक शाखांना विविध कारणास्तव लावत असला तर त्याला दोष देता येणार नाही.

काही प्रतिसादानंतर धाग्याचा कल निवडणुकांकडे त्यामुळे तो मतदार संघ रचनेकडे घसरला असल्याचे दिसत आहे. मुसलमान वस्ती खूप म्हणुन उमेदवार त्यांचाच निवडून येणार, असला युक्तीवाद 'आपल्या कार्यकर्त्यात उत्साह नाही किंवा उमेदवाराकडे विकासाची ठोस आणि विश्वासार्ह कार्यक्रमपत्रिका नाही' असा अर्थ आहे. मतदार संघाची बांधणी कशीही असली तरी मतदार इतका जागरूक आहे की त्याला डावेउजवे बरोबर कळतेच कळते....भले जामा मशिदीतून इमाम फतवा काढू दे अगर गप्प बसू दे. महाराष्ट्राची चर्चा थोडावेळ बाजूला ठेवा....आणि भारताच्या राजधानीतील - नवी दिल्लीतील चित्र पहा :

६९ आमदारांची क्षमता असलेल्या "दिल्ली" या केंद्रशासित राज्यात लोकसंख्येतील धर्मनिहाय विभागणी कशी असेल ते तुम्ही तर जाणत असालच. 'नवी दिल्ली असो वा जुनी दिल्ली' म्हणजे मुस्लिमांची किती संख्या असणार आणि तेथील समाजजीवनावरदेखील मुस्लिम संस्कृतीचा किती प्रभाव आहे हे आपल्या राज्यातील सुशिक्षितांपासून लपून राहिलेली बाब नाही...तरीही या राज्याच्या विधानसभेत केवळ ३ मुस्लिम आमदार आहेत. त्यातही सुलतानपूर माजरा, तुघलकाबाद, मेहरौल्ली यासारख्या मुस्लिमांचा स्ट्राँग होल्ड मानल्या गेलेल्या वस्तीतून तर हिंदूच उमेदवार निवडून आले आहेत. मी दिल्ली एरियातच राहत असल्यामुळे खूप जवळून इथल्या समाज रचनेकडे आणि भाईचार्‍याकडे पाह्ता येते....शामीलदेखील होता येते.

त्यामुळे केवळ काही सोसायट्यांमधून मुसलमानाना घरे दिली नाहीत म्हणून भारताच्या समाज जीवनात वा राजकीय जीवनात प्रचंड उलथापालथ होईल याची सुतराम शक्यता नाही, हे आयबीएनलाच सुनावले पाहिजे.

इन्द्रा

सुनील's picture

17 Sep 2010 - 6:24 pm | सुनील

त्यामुळे केवळ काही सोसायट्यांमधून मुसलमानाना घरे दिली नाहीत म्हणून भारताच्या समाज जीवनात वा राजकीय जीवनात प्रचंड उलथापालथ होईल याची सुतराम शक्यता नाही, हे आयबीएनलाच सुनावले पाहिजे.

जाउ द्या हो!

त्यांना तिकडे त्यांचा TRP मिळतोय आणि आम्हा रिकामटेकड्यांना चघळायला एक विषय!!!

आमोद शिंदे's picture

17 Sep 2010 - 7:23 pm | आमोद शिंदे

"मुसलमान्=दहशतवादी वा त्याचे दहशतवाद्यांशी या ना त्या निमित्ताने कुठे ना कुठे तरी संबंध असणारच हा सरळसोट विचार."

सरळसोट आणि भिकारचोट* विचार!

* हे मिपावर चालतेका? पूर्वी चालयचे नविन नियमांचे माहित नाही.

वेताळ's picture

17 Sep 2010 - 6:31 pm | वेताळ

मस्त रे इंद्रा.....
निव्वळ पुर्वग्रदुषित नजरेने दुसर्‍याना बघणार्‍या हिंदुना सगळे मुसलमान देश द्रोहीच वाटतात. पण ह्यातला एक ही त्याना समजावुन घेवुन त्याना देशाच्या मुळप्रवाहात सामिल करुन घेत नाही.आपल्या राजकारण्यानी निवडुन येण्याकरिता ज्यावेळी पासुन जातीपातीचे राजकारण करायला सुरुवात केली त्या पासुन आपल्या देशाची वाट लागली आहे.भारतात असणारे बहुसंख्य हिंदु एकमेकाबरोबर सांमज्यसाने राहतात काय? हिंदु धर्मात जातीभेद पुर्णपणे संपला आहे काय?उच्चनीच भेद संपुष्टात आला आहे काय? विविध राज्यातील हिंदु एकमेकाना समान समजतात काय? ह्या सगळ्याचे उत्तर नाही असेच आहे. मुळातच आपल्या धर्मात अजुनही खुप सुधारणेला वाव असताना इतरांच्या वर दगड फेकायला ह्या हिंदुना मज्जा येते.दोनदोन बायका,स्वःताचा कचरा दुसर्‍याच्या दारात टाकणे,रस्त्यावर मंडप घालण्याकरिता रस्ता उकरणे,सांडपाणी बिनधास्त रस्त्यावर सोडुन देणे ह्या गोष्टीत हिंदु करत नाहीत का?करतात. दोन दोन बायका कायदेशीर पणे फक्त मुसलमान लोकाना करता येतात म्हणुन हिंदु डान्सबार व वेश्यालये फुल्लफॉर्म चालवतात.
फक्त नावे ठेवायला पाहिजेत म्हणुन नावे ठेवायची हे मनाला पटत नाही.आपल्याला सुधारणेसाठी खुप वाव आहे . मागे सातार्‍या जिल्ह्यातल्या काळुबाईच्या यात्रेत तेल व नारळ वाहण्याच्या निसरडी मुळे जवळजवळ १५०/२०० लोक मेले ते काय मुसलमान होते का?मुंबईत सुरु असणारे साथीचे रोग फक्त मुस्लिम वस्तीपुरते सिमीत आहेत काय?सार्वजनिज स्वच्छतागृहे काय फक्त मुस्लिम लोकच वापरतात काय?हे सगळे दृष्टीआड करायचे व मुस्लिम म्हणुन फक्त टिका करायची हा दुट्टप्पी पणा बरा नव्हे.

चिगो's picture

17 Sep 2010 - 6:48 pm | चिगो

लढत रंगतेय..
पवार साहेबांशी सहमत...
१. लोक आपल्यासारखा शेजार प्रिफर करतात. हे म्हणजे लग्नाच्या वेळी स्वधर्मीय, स्वजातीय मुलगी बघण्यासारखं आहे. सोय आधी.. ह्यातून "वस्ती" प्रवृत्ती जन्मास येते व वाढते.
२. माझा अनुभव मुस्लिमांच्या बाबतीत चांगला आहे. बहुतेक मुस्लिम लोक हिंदु सणात सहभागी होतात, एन्जॉय करतात. "फेमस " उदाहरण द्यायचं झालं तर सलमानच्या घरचा गणपती.. माझा मुस्लिम मित्र आमच्या रूममधे सकाळी
भजनं, भुपाळ्या, आरत्या कॉम्पवर, मोबाईलवर वाजवायचा. इन फॅक्ट, त्याच्याकडे माझ्यापेक्षा जास्त कलेक्शन होतं त्यांचं.. म्हणून "सगळे मुस्लिम" असं जनरलाईझेशन करायची गरज नाही असं मला वाटतं..
३.बाकी मिडीयाची "पेटवून गंमत पहा" वृत्ती मजेशीर आहे, नाही का ?

बरीचशी सहमत!
आम्हाला तीनवेळा मुसलमान शेजार लाभला आणि ते वागायला, बोलायला बरे होते.
तीन पैकी दोन घरे ही व्यवस्थित स्वच्छता पाळणारी व टापटिपीचे होती. हैदराबादवाल्यांची जी काही अस्वच्छता होती ती घरात असायची. बाहेर कुणाला त्यांचा त्रास नव्हता. सतत कुणाचीतरी खिल्ली उडवायचे पण ती भाषा मला समजत नसल्याने चालत असे. ;) नंतर ते हिंदीत सांगाचा प्रयत्न करायचे पण मलाच नको असायचे. मी माझे घर मात्र 'वोन्ली व्हेज' वाल्यांनाच भाड्याने देवू शकेन.;)
एक शेजार गुज्जु आहे आणि ते चांगले आहेत. कोणी आम्हाला चिडवायचा प्रयत्न केला म्हणून लग्गेच सगळ्या गुजराथी लोकांना नावं ठेवण्याची शिकवण न मिळाल्याने चांगले असणार्‍यांना चांगले लोकच म्हणणार आहे.;)

इन्द्र्राज पवार's picture

17 Sep 2010 - 8:14 pm | इन्द्र्राज पवार

"बाकी मिडीयाची "पेटवून गंमत पहा" वृत्ती मजेशीर आहे, नाही का ?"

~~ हेच खरे सत्य आहे श्री.चिगो... आणि त्या आगीच्या धगीत बाकीचे रंगारी आपापल्या मगदुरीने मग भींतीवर फराटे मारत बसतात. वर श्री.सुनील म्हणतात त्याप्रमाणे खरं तर ही अशी भुतावळ उठवायची ती कुणाच्या कल्याणासाठी नव्हे तर आपापले टीआरपी जपण्यासाठी व त्यातून निर्माण होणार्‍या उत्पन्नाच्या चढत्या आलेखासाठी.

~~ आजच कोल्हापुरच्या मित्रांचा ई-मेल आला व त्यात शिवाजी पेठेतील "संभाजी तरूण मंडळा"ची आजची गणपतीची आरती मोईनुद्दीन मणेर या त्या भागातील एका टिंबर व्यापार्‍याच्या हस्ते ठेवली आहे याचा उल्लेख आहे (काल एका जैन डॉक्टरना आमंत्रीत केले होते...) ~~ पेठेचे नाव 'शिवाजी'...मंडळाचे नाव 'संभाजी' आणि प्रमुख पाहुणा आहे मोईनुद्दीन ! काय दर्शविते ही भावना? कुणाला हवी आहे दोन धर्मीयांत तेढ ? अशा कार्यक्रमाला आयबीएन लोकमतच्या व्हॅनला रस्ता का दिसत नसेल?

इन्द्रा

आमोद शिंदे's picture

17 Sep 2010 - 11:27 pm | आमोद शिंदे

>>पेठेचे नाव 'शिवाजी'...मंडळाचे नाव 'संभाजी' आणि प्रमुख पाहुणा आहे मोईनुद्दीन ! काय दर्शविते ही भावना? कुणाला हवी आहे दोन धर्मीयांत तेढ ? अशा कार्यक्रमाला आयबीएन लोकमतच्या व्हॅनला रस्ता का दिसत नसेल?

काय उदाहरण दिलेत इंद्राज!
सामान्य हिंदू आणि मुसलमान लोकांच्यात हीच भावना असते.
बबलु, धमाल मुलगा वगैरे सहज चिथावले जाणारे लोक कमी असतात.

llपुण्याचे पेशवेll's picture

18 Sep 2010 - 7:16 pm | llपुण्याचे पेशवेll


सामान्य हिंदू आणि मुसलमान लोकांच्यात हीच भावना असते.
बबलु, धमाल मुलगा वगैरे सहज चिथावले जाणारे लोक कमी असतात

असहमत.

अवलिया's picture

21 Sep 2010 - 11:25 am | अवलिया

असहमतीशी सहमत.

रेवती's picture

17 Sep 2010 - 8:02 pm | रेवती

आता अविनाश कुलकर्णी हे धागाकर्ते सहभागी होइपर्यंत कुणी प्रतिसाद देउ नका रे!;)
नेहमी पळून जातात.

धमाल मुलगा's picture

17 Sep 2010 - 8:06 pm | धमाल मुलगा

आयला..पण बेगानी शादी में लांबून हाका मारुन मारुन आणलेले दिवाने नाचयला लागल्यावर काय करता? :D

टिउ's picture

17 Sep 2010 - 8:43 pm | टिउ

धर्मनिरपेक्षता, राखीव जागा वगैरे माहीत नाही.
पण माझा पुण्यातला फ्लॅट मी एका मुसलमान दांपत्याला भाडेतत्वावर दिला होता. दोघे आयटीवाले होते आणि माझी त्यांच्याशी प्रत्यक्ष ओळखही नव्हती. हे दोघं मुळचे मुंबईचे. मुलगा युके मधे होता आणी एक आठवड्यानी पुण्यातल्या ओफिसात रुजु होणार होता. त्याची पत्नी पुण्यातच नोकरी करत होती. तो यायच्या महीनाभर आधीपासुन ती पुण्यात फ्लॅट शोधत होती. पण एकाही एजंटने कुठला फ्लॅट दाखवलासुद्धा नाही. एजंट शिवाय फ्लॅट मिळण्याचा तर प्रश्नच नव्ह्ता. माझ्या एका मैत्रिणिच्या ओफिसात हा मुलगा काम करत असे. तिच्याकडुन ही माहीती समजल्यावर मी फ्लॅट दिला. अर्थात मी पण भारताबाहेर होतो आणी फ्लॅट रिकामा पडुन होता त्यामुळे मलाही फार खटपट न करता भाडेकरु मिळाल्याचा आनंदच झाला. त्यांनी फ्लॅट सोडला त्यावेळेस पहिल्यांदा मी दोघांना भेटलो. वर्षभर ते तिथे होते पण एकदाही त्यांच्याकडुन किंवा सोसायटीतल्या इतर कुणाकडुन मला कुठल्याही प्रकारची तक्रार आली नाही...

हुप्प्या's picture

17 Sep 2010 - 10:17 pm | हुप्प्या

पुलंच्या एका पुस्तकात (नाव आठवत नाही) एक मध्यमवयीन मराठी पात्र एकदा कुठेतरी प्रवासाला निघते. तेव्हा ते म्हणते की "गाडीत मी एका मुसलमानाला चक्क बटाटेवडा खाताना बघितला!". एक निव्वळ विनोदी वाक्य वाटले तरी ह्यातून एक कायम आढळणारी मानसिकता अधोरेखित होते (झेनोफोबिया). मुसलमान माणूस हाही आपल्यासारखाच माणूस असतो हे अनेक लोक विचारात घेत नाहीत. महाराष्ट्रात असे अनेक भाग आहेत जिथे मुसलमानांशी फारसा संपर्क नसतो. त्यामुळे इतिहासातील खलनायक ही प्रतिमा, अतिरेकी, पाकिस्तानप्रेमी असल्या प्रतिमा एवढीच त्या जमातीविषयी माहिती असते आणि त्यातून एक भीती, तिटकारा निर्माण होतो. पण ह्यातला बराचसा अज्ञानापोटी असतो असे वाटते.

अनेक मुस्लिम लोक असे असतीलही की जे वरवर अगदी सामान्य माणसासारखे वागतात पण जिहाद वगैरे डोकेफिरू विचार बाळगून असतात. किंबहुना जे अतिरेकी विध्वंस घडवण्यात यशस्वी होतात ते समाजात बेमालूमपणे मिसळल्यामुळेच. पण मला वाटते अशांची संख्या कमी असावी. जीवावर उदार होऊन, संसारावर निखारा ठेवून सर्वस्वाचा होम करायला सामान्य माणूस सहसा तयार होणार नाही. मात्र मुस्लिम म्हणून कायम संशयाने बघणे, तिरस्कारणे असे होत असेल तर असल्या डोकेफिरूंची संख्या नक्कीच वाढेल.

अविनाशकुलकर्णी's picture

17 Sep 2010 - 10:19 pm | अविनाशकुलकर्णी

आम्हि सरकारी वसाहतित रहात होतो त्या वेळी आमच्या खालच्या मजल्यावर एक ्मुसलमान परीवार रहात होता..तो शुक्रवारी..कुरान पढायचा..नंतर त्याचे मित्र येवु लागले हळुहळु स,ख्या ३० वर पोहोचली व एक त्रासच झाला ब्लॉक लहान असल्याने सारे जिना अडवुन बसायचे..काय करावे कुणालाच कळत नव्हते..शेवटी त्याची बदली झाली अन आम्ही सुटलो

तुमचे कौतुक करावे तितके कमीच आहे.आता फक्त मला सांगा गणपती उत्सवाच्या काळात तुम्ही लोक खड्डे करुन सार्वजनिक रस्त्याचे काय हाल करता? कर्णकर्कश आवाजात स्पिकर लाउन किती लोकांचे मनोरजंन होते?प्रंचड आकाराच्या मुर्ती पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतात बुडवुन तुम्ही लोकाच्या जीवावरच उठता ना? मग नमाज पडण्यावरुन नाराज होण्यापेक्षा आपल्या धर्मात जरा चांगले बद्दल घडवुन आणा.
सार्वजनिक आरती करताना रस्त्यावरच्या वाहतुकीची कोंडी केल्यावर एकाद्या मुस्लिमाने त्यावर कधी आक्षेप घेतला आहे काय?

llपुण्याचे पेशवेll's picture

19 Sep 2010 - 8:05 am | llपुण्याचे पेशवेll

वेताळा ते रस्त्यात नाही म्हणत आहेत.. जिन्यात म्हणत आहेत. तुम्हि घरापर्यंत जायला वापरता ना तो.

अविनाशकुलकर्णी's picture

17 Sep 2010 - 10:24 pm | अविनाशकुलकर्णी

आज जरा काम असल्याने घरी नव्हतो..त्या मुळे लिहु शकलो नाहि..अत्ता घरी आलो अन वाचले..क्रुपया आम्हास वाळीत टाकु नका..गावकिचे नियम आम्हास मान्य आहेत

रेवती's picture

17 Sep 2010 - 11:25 pm | रेवती

या या!!
आम्हाला वाटलं संपादकांना कामाला लावण्याचा धागा काढून मजा बघताय कि काय?
पण तसं नव्हतं तर!
चला तर मंडळी ,प्रतिसादाचं काम सुरु ठेवा......त्यांना गावाचे नियम माहिती आहेत्......साहेबांना आपलं म्हणा!;)

गांधीवादी's picture

18 Sep 2010 - 5:49 am | गांधीवादी

What are the problems of Islam?

http://en.wikipedia.org/wiki/Controversies_related_to_Islam_and_Muslims
http://markhumphrys.com/islamic.world.html
http://islamistheproblem.blogspot.com/ (ह्यातील पानाच्या शेवटी हसणाऱ्या मुलाचे हास्य बघा, हा पुढे जाऊन कसाब नाही होणार तर काय ?)
http://www.islam-watch.org/Sami/Islam-is-the-Problem.htm
http://www.amilimani.com/index.php?option=com_content&task=view&id=47&It...
http://www.freerepublic.com/focus/f-bloggers/2587616/posts
http://answers.yahoo.com/question/index?qid=20090707050336AAxM2Gi

'I don't hate Muslims. I hate Islam,' says Holland's rising political star

http://truecongresspolitics.wordpress.com/2007/10/18/how-islam-and-musli...

Can Hindu men have more than one wife?
The Muslim Personal Law (Shariat) Application Act
केवळ एका विशिष्ट जमातीसाठी भारताच्या कायद्यात अशी सूट का ? कायदा सगळ्यांना सारखा का नाही ?

I NEVER HATE MISALPAV BUT I HATE ID NAME AS "GANDHIWADI" - गांधीवादी
AND THIS ID IS DEFINATELY NOT WORTH TO GIVE HIM ANY CLARIFICATION OR ANY EXPALINATION

WHY THE HELL HE IS BOTHERED ABOUT WHAT IS HAPPENING IN ISLAM AND IN MUSLIM SOCIETY ?? अहो गांधीवादी की आगलावूवादी आम्ही आमच्या धर्मात काय करावे हे तुम्ही कोण सांगणारे - टिक्कोजीराव ?? आम्ही आमचे पाहून घेऊ अन हो If you are really bothered about this Leave your contact Details
~ वाहीदा

हिंदु धर्मातील लोकाना किती टक्के आरक्षण दिले जाते?मग इतरांच्या कडे बोट दाखवा.जवळ्जवळ ५०% आरक्षण हे हिंदु धर्मातील जाती व पोटजातीना दिले जाते. मग त्यात मुस्लिमांची भर पडली तर तुमच्या पोटात का खड्डा पडला?

Pain's picture

18 Sep 2010 - 10:01 am | Pain

हिंदु धर्मातील लोकाना किती टक्के आरक्षण दिले जाते?मग इतरांच्या कडे बोट दाखवा.जवळ्जवळ ५०% आरक्षण हे हिंदु धर्मातील जाती व पोटजातीना दिले जाते.

मी जातीच्या आधारे आरक्षणाशी सहमत नाही पण ते देण्याची सुरुवात झाली कारण त्यांच्यावर अन्याय झाला होता म्हणून.

आणि मुस्लिमांचा हजार वर्षांचा इतिहास इतक्यात विसरलात ? किमान राजा शिवछत्रपतीची सुरुवातीची पाने (शिवजन्मापर्यंत) वाचा आणि मग तरफदारी कराविशी वाटते का ते बघा.

गांधीवादी's picture

18 Sep 2010 - 11:41 am | गांधीवादी

अहो वेताळ बाबा, जरा मी UNDERLINE केलेली वाक्ये वाचा ना राव, माझ्या मते कोणालाच आरक्षण नको. न तुम्हाला , न मला, न इतरांना. ते आरक्षण देणारे आज हयात असते तर त्यांनी प्रथम हेच केले असते,
मी आत्ता ह्या क्षणी माझी (जी काही आहे) जात पुसून फक्त भारतीय लावण्यास तयार आहे,(तशी माझी तयारी खूप अगोदर पासूनच होती) तुम्ही ज्यांचा पुळका घेत आहात, त्यांच्या एकाच्या तरी तोंडून तुम्ही "आज पासून माझी जात संपली, इथून पुढे मी केवळ आणि केवळ भारतीय आहे" असे नमूद करून दाखवा.

वेताळ's picture

18 Sep 2010 - 10:37 am | वेताळ

हजारो वर्षाच्या इतिहास चाळायचा झाला तर फक्त मुस्लिमांचे अत्याचार न बघता हिंदु धर्मातील उच्चवर्णियानी केलेले अत्याचार देखिल त्यात घेतले पाहिजेत. हजारो वर्षापासुन जर हिंदुसमाज एकसंघ असता तर आजचे वर्तमान खुप वेगळे असते.मुळातच आपण आपल्या धर्मबांधवांवर अत्याचार करायचे व नंतर दुसरा आपल्यापेक्षा बलशाली निघाल्यावर त्याच्या नावाचा टाहो फोडायचे हे किती दिवस चालणार?
पुर्वी जर आपल्या पुर्वजानी जातीभेद मानले नसते तर आज आरक्षण देण्याची किंवा मागण्याची वेळच आली नसती.आज जे आरक्षण देत आहोत ते आपल्या पुर्वजाचे पाप आहे हे मान्य करा.मुस्लिम आक्रमक ज्यावेळी भारतात आले त्यावेळी त्याचे सगळे सगेसोयरे घेवुन इथे स्थिरस्थावर व्हायला आले नव्हते. त्यानी इथल्या जातीभेदात अडकलेल्या समाजातील खालच्या घटकाना सामाजिक व राजकिय उन्नतीचे आमिष दाखवुन आपल्या धर्मात येण्यास भाग पाडले. मग काय अगोदर झालेले अत्याचार व चीड ह्यातुन त्यानी परत उच्चवर्णिंयाच्यावर अत्याचार केले.आजचे असणारे भारतिय मुस्लिम हे पुर्वाश्रमीचे हिंदुच आहेत. हिंदु धर्मियानी बौध्दधर्मियाना कशी वागणुक दिली?
त्याचे अस्तित्वच भारतातुन जवळ्जवळ पुसुन टाकले .त्यामुळे सगळे हिंदु सज्जन व मुस्लिम हे वाईट हे समीकरण मला मान्य नाही.आपण सगळे एकाच माळेचे मणी आहोत.आपला धर्म सुधारायचा सोडुन आपण अजुनही दुसर्‍याना टोमणे मारण्यात वेळ वाया घालवत आहोत हेच मला सांगायचे आहे.काही मुस्लिम युवक बॉम्ब फोडतात म्हणुन आपणच आपल्या देशात बॉम्ब फोडुन त्याना विरोध करायचा असला मुर्खपणा करणारे थोर हिंदु मला बनायचे नाही.

गांधीवादी's picture

18 Sep 2010 - 11:49 am | गांधीवादी

>>काही मुस्लिम युवक बॉम्ब फोडतात म्हणुन आपणच आपल्या देशात बॉम्ब फोडुन त्याना विरोध करायचा असला मुर्खपणा करणारे थोर हिंदु मला बनायचे नाही.
तसे करायला इथे कोण येडे बसलेले नाहीयेत.
(हा पाकमध्ये म्हणत असाल तर, विचार करायला काही हरकत नाही)

Pain's picture

18 Sep 2010 - 2:18 pm | Pain

हिंदु धर्मातील उच्चवर्णियानी केलेले अत्याचार
उच्चवर्णीयांनी नव्हे, सत्ताधार्‍यांनी.

फक्त मुस्लिमांचे अत्याचार न बघता हिंदु धर्मातील उच्चवर्णियानी केलेले अत्याचार देखिल त्यात घेतले पाहिजेत
सत्ताधार्‍यांनी केला तो फार तर अन्याय म्हणता येईल. काही अपवाद आहेत. पण मुस्लिम लोकांनी केवळ द्वेषापोटी केलेले अत्याचार भयावह आहेत. दोन्हीची तुलनाही होत नाही.

हजारो वर्षापासुन जर हिंदुसमाज एकसंघ असता तर आजचे वर्तमान खुप वेगळे असते
प्रत्येक धर्मात उच्चनीचतेच्या संकल्पना आहेत. उदा. मुस्लिम लोकांमधे शिया-सुन्नी. पण म्हणून हिंदू लोक इराण्-इराक-जेरुसलेम मध्ये गेले नाहीत त्यांच्यावर अत्याचार करायला.

पुर्वी जर आपल्या पुर्वजानी जातीभेद मानले नसते तर आज आरक्षण देण्याची किंवा मागण्याची वेळच आली नसती.आज जे आरक्षण देत आहोत ते आपल्या पुर्वजाचे पाप आहे हे मान्य करा

हे मी कधी अमान्य केले? उलट माझ्या प्रतिसादातच तसे लिहिलेले आहे. माझाच मुद्दा मलाच का पटवून देता ?

मुस्लिम आक्रमक ज्यावेळी भारतात आले त्यावेळी त्याचे सगळे सगेसोयरे घेवुन इथे स्थिरस्थावर व्हायला आले नव्हते. त्यानी इथल्या जातीभेदात अडकलेल्या समाजातील खालच्या घटकाना सामाजिक व राजकिय उन्नतीचे आमिष दाखवुन आपल्या धर्मात येण्यास भाग पाडले. मग काय अगोदर झालेले अत्याचार व चीड ह्यातुन त्यानी परत उच्चवर्णिंयाच्यावर अत्याचार केले.आजचे असणारे भारतिय मुस्लिम हे पुर्वाश्रमीचे हिंदुच आहेत.

मुस्लिम इथे आले ते जीव बचावण्यासाठी (बाबर). इथल्या खालच्या घटकांची उन्नती वगैरे त्यांची उद्दिष्टे नव्हती. केवळ आपला धर्मप्रसार, तोही तलवारीच्या जोरावर; जे विरोध करतील त्यांना ठार करणे.

मग काय अगोदर झालेले अत्याचार व चीड ह्यातुन त्यानी परत उच्चवर्णिंयाच्यावर अत्याचार केले
नाही, तसे असते तर फक्त अन्याय करणार्‍यांचा बदल घेतला असता. पण तसे न करता त्यांनी सर्व हिंदू लोकांवर (यात त्यांचे ज्ञातिबांधवही आले) अत्याचार केले. यात बदला हा हेतू न दिसता त्यांची कमकुवत मने, मुस्लिम धर्माचे ब्रेनवॉशिंग याचे एकत्रित परिणाम दिसतात. आपल्या संभाजी महाराजांनी धर्मांतरणाला विरोध करून हाल हाल होत मरण पत्करले. त्यांच्याइतकी अपेक्षा सामान्य लोकांकडून ठेवू शकत नाही पण या लोकांनी धर्मांतरण झाल्यावर खरोखरच मूळच्या मुस्लिम लोकांसारखे वागायला सुरुवात केली, ते खेदजनक आहे.

आजचे असणारे भारतिय मुस्लिम हे पुर्वाश्रमीचे हिंदुच आहेत

याला कारण म्हणजे एकदा सक्तीने धर्मांतरण केल्यानंतर पुन्हा आपल्या धर्मात घ्यायची सोयच नाही आणि परिस्थितीप्रमाणे अशी कुठली सुधारणाही केली गेली नाही. अपवाद अगदी आत्ताचा, शिवाजी महाराज-नेताजी पालकर

हिंदु धर्मियानी बौध्दधर्मियाना कशी वागणुक दिली?

हिंदू लोक मूळचेच सहिष्णू. त्यामुळेच तर बौद्ध धर्माची स्थापना होउ शकली आणि राजाश्रय लाभल्याने जोमाने प्रसार होउ शकला. मुस्लिम धर्मात असे उदाहरण दिसते का ? ( शिया-सुन्नी ही फूट आहे, नवीन धर्म नाही.) असो. तर या बौद्धांनी परकीय आक्रमणाच्या वेळी देशाशी दगाबाजी करून शत्रूला* साथ दिली. पुढे शत्रूनेही* यांची पत्रास ठेवली नाही आणि संधी मिळाल्यावर हिंदूंनीही वचपा काढला. यासदंर्भात अधिक तपशील देउ शकतो. तुमच्याकडे असतील आणि माझे म्हणणे पटले नसेल तर द्या.

त्यामुळे सगळे हिंदु सज्जन व मुस्लिम हे वाईट हे समीकरण मला मान्य नाही.आपण सगळे एकाच माळेचे मणी आहोत.

आजतागायत हिंदूंनी दुसर्‍या धर्मावर आपण होउन कधीही अत्याचार केलेले नाहीत आण्नि मुस्लिमांचे अगदी उलटे आहे. ख्रिश्चनांचेही तेच.

आपला धर्म सुधारायचा सोडुन आपण अजुनही दुसर्‍याना टोमणे मारण्यात वेळ वाया घालवत आहोत हेच मला सांगायचे आहे.
नाही, तुमचे म्हणणे हिंदूही तितकेच वाईट असे आहे जे पूर्णपणे चूक आहे. एखाद्या माणसात्(हिंदू धर्मात) दोष (जाती-भेद) असणे हे वाईट. त्याने ते सुधारावेच. पण म्हणून त्याच्याशी संबंध नसणार्‍या उपर्‍यांना (मुस्लिम) त्याचा खून करण्याचा अधिकार मिळत नाही.

काही मुस्लिम युवक बॉम्ब फोडतात म्हणुन आपणच आपल्या देशात बॉम्ब फोडुन त्याना विरोध करायचा
येथील कोणीही याचे समर्थन करत नाही किंवा अशास्वरूपाचे बोलतही नाही.

वेताळ's picture

18 Sep 2010 - 10:54 am | वेताळ

अरे बाबा ते आता शक्य नाही आहे. मुळातच हिंदु लोकानी मुलीना जन्म द्यायचे बंद केले आहे.आपल्या भारतातच एक पत्नी मिळणे अगदी दुरापस्त झाले आहे,मग बहुपत्नीत्व मिळाले तर इतर धर्मात शिरावे लागणार.
मुलीचे दर हजारी प्रमाण १०००:८६५ असे आहे. हरियाना,राजस्थान,मध्यप्रदेश व इतर हिंदीबहुल प्रदेशात तर महाराष्ट्रातुन येवुन आदिवासी मुलींशी लग्न करण्याचे प्रमाण लक्षणिय असे वाढले आहे.हिंदिबहुल राज्यातील कट्टर हिंदुनी मुली झाल्यावर त्याना मारण्याचे पवित्र कार्य केले त्याच्यावर आज काळ असा सुड घेत आहे.

अरेच्च्या! अजून चालूच आहे काय चर्चा? आँ?
आणि अविनाशसाहेब "आलो, आलो" म्हणत पुन्हा गायब झालेत.
कंटाळा नाही का आला या (संपादकांसाठी राखीव!) विषयाचा?;)
सतत कुणा एका संपादकाला या कामावर नेमल्यासारखे हजर रहावे लागत आहे.;)
चला, आता विकांताची दोन दिवस सुट्टी घेउयात!;)

पैसा's picture

18 Sep 2010 - 7:13 pm | पैसा

तू पण अधेमधे प्रतिसाद टाकत जा ग म्हणजे कंटाळा नाही येणार! का संपादक असताना तो फाऊल धरला जातो?

संजयशिवाजीरावगडगे's picture

18 Sep 2010 - 9:21 pm | संजयशिवाजीरावगडगे

इमरान ला ..सैफ़ ला भाड्याने घर मिळत नाहि... हे प्बलीसिटी स्टंट आहे !!!
काहि जागा मुसलमानांसाठी राखीव असाव्यात काय?? मला नाही वाटत !!

चिंतामणी's picture

19 Sep 2010 - 1:03 am | चिंतामणी

का.यो. म्हणाला होता की अवीनाशकाका नॉनस्ट्रायकर एंडला उभे राहून सेंचुरी करणार.

आता डबल सेंचुरी व्हायला आली.

आता अविनाश कुलकर्णी हे
प्रेषक रेवती दि. शुक्र, 17/09/2010 - 20:02.
आता अविनाश कुलकर्णी हे धागाकर्ते सहभागी होइपर्यंत कुणी प्रतिसाद देउ नका रे!
नेहमी पळून जातात.

रेवती

असे म्हणल्यावर १२४वी रन (पोस्ट) काकांनी टाकली. (आज जरा काम असल्याने घरी नव्हतो..त्या मुळे लिहु शकलो नाहि..अत्ता घरी आलो अन वाचले..क्रुपया आम्हास वाळीत टाकु नका..गावकिचे नियम आम्हास मान्य आहेत). पुन्हा पहीले पाढे.........

आत्तापर्यन्त रनर घेतात हे माहीत होते. इथे नॉट आउट बॅसमनसाठी स्ट्रायकर आहेत.

आता मात्र म्हणावेसे वाटते की कितीची सुपारी/ नारळ दिला होता???????????????????

इन्द्र्राज पवार's picture

19 Sep 2010 - 12:02 pm | इन्द्र्राज पवार

या धाग्यावर आतापर्यंत झालेल्या अनेक मतांच्या आणि बातम्याच्या दंगलीत खालील बातमीचे महत्व काय आहे हे हिंदू-मुसलमान संबंधाबाबत विचारात घ्यावे.

"काल दिनांक १८ सप्टेंबर २०१० ला पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते एक अभिनव सत्कार समारंभ पार पडला.
आष्टी (ता. मोहोळ) येथील शहानवाझ नजरुद्दीन शेख (गुरुजी) या मुस्लिम शिवभक्‍ताने महादेव मंदिर सभामंडपासाठी स्वतःच्या मालकीची जमीन दान देऊन "वेगवेगळी माती जरी एकची आहे भूमी, हिंदू-मुस्लिम, शीख नि ख्रिश्‍चन सारे एकच आम्ही' या गीतातील आशय कृतीतून व्यक्‍त केला. तसेच 'भागवत व्यवहारे' व्यक्‍तीने आपल्या आयुष्यभराची कमाई व जमीन या मंदिरासाठी देऊन शरीराने अपंग असलो तरी मनाने नाही हे दाखवून दिले...."

या बातमीच्या महतेवर जादा भाष्याची आवश्यकता नाही.

इन्द्रा

chipatakhdumdum's picture

19 Sep 2010 - 8:53 pm | chipatakhdumdum

मुस्लीम शिवभक्त हा उल्लेख बरोबर नाही. कुराणामध्ये सगुण रुपाची पूजा निंद्य आहे. सगुण रुपाची पूजा करणारा हा त्या ग्रंथात नमूद धर्मतत्वानुसार मुस्लीम नसून तो काफर असतो. सबब शेख गुरुजी हे फक्त शिवभक्त आहेत, त्यांना मुस्लीम संबोधून त्या धर्मतत्वांचा अनादर कृपया करू नका.

इन्द्र्राज पवार's picture

21 Sep 2010 - 10:42 am | इन्द्र्राज पवार

"कुराणामध्ये सगुण रुपाची पूजा निंद्य आहे......"

~~ हे अर्थातच माहित आहे, कारण मी कुराण वाचलेले आहे. मात्र 'तो' मजकूर माझा नाही. 'सकाळ' (१९.९.२०१०) च्या अंकातील ती बातमी जशीच्यातशी प्रतिसादात दिली आहे.

अर्थात सगुण रुपाची पूजा निंद्य जरी असली तरी आजकाल आधुनिक विचारसरणीच्या ज्या काही मुसलमान बांधवांनी "गणपती पूजा" ही मान्य केली आहे [इथे कोल्हापुरात तर मुसलमान व्यक्तीच्या हस्ते/उपस्थितीत गणेशोत्सवार सामुदायिक आरती होत असते] त्याना त्यांच्या विचाराला आपण विरोध का करावा, हाही मुद्दा आहेच ना?

इन्द्रा

अर्धवटराव's picture

19 Sep 2010 - 12:24 pm | अर्धवटराव

"भारत माझा देश आहे" या प्रतिज्ञेतील बाकी सर्व कलमे रद्द कसुन करुन "आम्हि ईतिहासापासुन काहि बोध घेणार नाहि. केवळ द्वेशाचि पेरणी करु आणि एकमेकांचे डोके फोडु" अशी सुटसुटीत, खरिखुरी, पचायला सोपी आणि आचरायला सहज अशी प्रतिज्ञा कलमे टाकावीत आणि लवकरात लवकर विनाशाच्या मार्गावर अग्रेसर व्हावे असा प्रस्ताव आम्हि या विराट समाज पुरुषापुढे ठेवत आहोत.

(प्रतिज्ञाबद्ध) अर्धवटराव

अर्धवट's picture

19 Sep 2010 - 2:27 pm | अर्धवट

सहमत..

अवांतर - पुन्हा एकदा संपुर्ण ज्ञान.

या धाग्याच टीआरपी बघता आय बी एन ला सनसनाटी बातमी द्यायचा मोह झाला यात नवल ते काय?
आज काय परिस्थीती आहे मला माहित नाही पण ४-५ वर्षांपूर्वी सैफ माझी नणंद राहाते तिथे वरच्या मजल्यावर राहायचा. तेव्हा तरी सोसायटीतले कुणी त्याच्या बद्दल कुरकुरत नव्हते.
आता मुंबई- दिल्लीत घर मिळवणे ही सर्वांसाठीच कठिण गोष्ट. त्यातून घर भाड्याने द्यायचे म्हणजे इतक्या कटकटी. आता मागणीपेक्षा एखाद्या गोष्टीचा पुरवठा कमी असेल तर झगडावे लागतेच. ४० वर्षांपूर्वी माझ्या आईबाबांनाही एका छोट्या गावात भाड्याने घर मिळायला कठिण गेले होते. कारण मिश्र आहार. जी घरे त्यांना पसंत होती तिथे मांस मच्छी खाता येणार नव्हती. जिथे खाता येणार होते ती घरे त्यांना पसंत नव्हती. तेव्हा हे काही नवे नाही.

chipatakhdumdum's picture

19 Sep 2010 - 7:04 pm | chipatakhdumdum

मुंबईच्या सेशन्स कोर्टामध्ये आज तारखेपर्यत दाखल असलेल्या सर्व खटल्यामध्ये मिळून जेवढे आरोपी आहेत, त्यापैकी ९५ टक्के आरोपी एका विशिष्ट धर्माचे आहेत. ही स्थिती कुलाबा ते दहीसर आणि मुलुंड-वाशी चेकनाका या परिसरातील सर्व सेशन कमिट झालेल्या खटल्यांसंबंधाने आहे....

over to Vaahida....

मृत्युन्जय's picture

20 Sep 2010 - 2:29 pm | मृत्युन्जय

३६५८ वाचने आणि २१४ प्रतिक्रिया. म्हणजे सरासरी १७ वाचनांना एक प्रतिक्रिया पडत आहे.

७८ तासात २१४ प्रतिक्रिया म्हणजे सरासरी दर २२ मिनिटांना एक प्रतिक्रिया पडत आहे. या रेटने अजुन २ दिवस लागतील पराचा विक्रम मोडायला. दुसर्‍या नंबराकडे मात्र वेगाने वाटचाल सुरु आहे.

अभिणंदन.

कर्ण's picture

22 Sep 2010 - 10:45 am | कर्ण

उल्फा, नेपाळी मावोवादी, एल टी टी हे ही मूस्लिमच आहेत का ? आतान्कवादी तुम्हाला फक्त मुस्लिमच दिसतात ...

गुंडोपंत's picture

23 Sep 2010 - 7:26 am | गुंडोपंत

अरेरे! एक दुर्दैवी चर्चा. मिपाचा असा वापर होताना पाहून वाईट वाटले...

नितिन थत्ते's picture

23 Sep 2010 - 10:58 am | नितिन थत्ते

गुंडोपंतांशी सहमत आहे.

१ नंबराकडे आगेकुच करणार्‍या धाग्याचे प्रतिसादरुपी पंख छाटणार्‍या संपादक्/चालक्/मालक यांच्या पैकी ज्या कोणी हे केले त्याचा जाहिर निषेध!

मितभाषी's picture

23 Sep 2010 - 10:51 am | मितभाषी

असेच म्हणतो.

प्रतिसाद संपादित

कर्ण's picture

24 Sep 2010 - 11:43 pm | कर्ण

गोरिला's picture

29 Sep 2010 - 9:28 pm | गोरिला

नको हा त्रास आधिच खुप झुरल झलि आहेत आजुन घान नको रे बाबा.