रसिया मुठिया

मितान's picture
मितान in पाककृती
16 Sep 2010 - 12:57 am

सध्या एका गुजराती मैत्रिणीच्या सासूबाई बेल्जियम भेटीला आल्या आहेत. या गुजराती सुगरणीच्या हातचा एक पदार्थ परवा खाल्ला. चटकन होणारा , रुचिपालट म्हणून चविष्ट आणि रसदार असा हा पदार्थ माझ्या सर्व खवैय्या मित्रमैत्रिणींसाठी -
सामग्री -
शिजवलेला भात - २ कप ( दुपारचा उरलेला असेल तर अजून उत्तम )
बेसन - अर्धा ते पाऊण कप
ताक - ५ ते ६ कप
आले लसूण पेस्ट - २ चमचे
लाल तिखट - १ चमचा ( आवडीनुसार कमीजास्त करा)
हळद - अर्धा चमचा
हिंग , मोहरी, जिरे, कढिपत्ता, तेल फोडणीसाठी
अर्धा चमचा साखर, एक चमचा तूप

कृती -
एका कढईत तेल गरम करा. त्यात जिरे, मोहरी घाला. मोहरी तडतडल्यावर एक चमचा आलं लसूण पेस्ट व कढिपत्ता घाला. थोडी हळद आणि लाल तिखट घाला.वरून चमचाभर बेसन ताकात मिसळून ते फोडणीत घाला. गॅस बंद करून टाका.
आता मुटक्यांसाठी भात घ्या. त्यात बेसन, उरलेली आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, मीठ आणि चिमुटभर हिंग घाला. हाताला थोडे तेल लावून हे मिश्रण चांगले मळून घ्या. त्याचे मुटके वळता यावे एवढे मऊ मळून घ्या. प्रत्येक वेळी हात पाण्यात बुडवून मुटके वळून घ्या.
कढई ठेवलेला गॅस चालू करा. फोडणी घातलेले मिश्रण चांगले उकळू लागले की त्यात हळू हळू एकेक मुटका सोडा. मुटके सोडल्यावर न हलवता कढईवर झाकण ठेवा.
जेवणाची तयारी करा. ५ मिनिटात मुटके शिजून वर आलेले दिसतिल. त्यात अर्धा चमचा साखर आणि चमचाभर तूप घाला.असेल तर कोथिंबिर पेरा. एका वाडग्यात तयार रसिया मुठिया घ्या. वर अजून एक चमचाभर तूप घ्या आणि खा.

ज्यांना कढीभात आवडतो त्यांना हा पदार्थ नक्की आवडेल. तुमच्या प्रतिक्रीया भलानी मावशींना कळवतेच :)

प्रतिक्रिया

आईशप्पथ काय टायमिंग हाय! जेवण बनवायलाच चाललो होतो तेवढ्यात ही पाकृ दिसली! 'सोपे नि झटपट' क्याटेगरीतली दिसते आहे. भातसुद्धा उरलेला आहेच! आत्ताच करून फोटोरूपी पर्तिसाद देतो. :D
मितान, लै भारी गो!

पुष्करिणी's picture

16 Sep 2010 - 1:14 am | पुष्करिणी

मस्त दिसतेय, करून पहाणारच

उरलेल्या बेसनाच काय करायचं?

मेघवेडा's picture

16 Sep 2010 - 1:17 am | मेघवेडा

तूप-साखरसुद्धा मुळात जास्त घेतली तर उरेल. मग बेसनाचे लाडू वळा. हाकानाका!

मितान's picture

16 Sep 2010 - 1:19 am | मितान

नीट वाच की बयो, भातात मिसळायचे आहे !

बिरयाणी सोडून भात तसा आवडत नाय..पण कढी आवडते...

करून बघायला हवा कधीतरी.. :)

छान दिसतोय पदार्थ अन सोपा.

मितान's picture

16 Sep 2010 - 1:50 am | मितान

@ पुष्का, मेव्या,
मी बेसन आणि भात मिसळण्याची पायरी लिहायची विसरले. :(

>>आता मुटक्यांसाठी भात घ्या. त्यात बेसन आणि उरलेली आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, मीठ आणि चिमुटभर हिंग घाला. हाताला थोडे तेल लावून हे मिश्रण चांगले मळून घ्या.

चतुरंग's picture

16 Sep 2010 - 4:00 am | चतुरंग

दुरुस्ती केली आहे!

धन्यवाद !
नाहीतर सगळ्यांचा मेव्या झाला असता ;)

मेघवेडा's picture

16 Sep 2010 - 2:32 am | मेघवेडा

झाले! आत्ताच हादडले! लै भारी गो मितान! मला मी हा आयटम बनवीत असताना मला सतत मार्गदर्शन करणार्‍या मितानबैंचा 'ऑल इंग्लंड ब्याचलर पाकृ मंडळा'तर्फे आगामी 'लंडन कट्ट्या'च्या वेळी जाहीर सत्कार करण्यात येईल आशे मी जाहीर करीत आहे!

फोटू नीट आला नाहीये. पण प्रूफ म्हणून पुरेसा आहे! ;)

धनंजय's picture

16 Sep 2010 - 2:38 am | धनंजय

सोपा असावासे वाटते. आणि चविष्टही.

चतुरंग's picture

16 Sep 2010 - 3:58 am | चतुरंग

फटू आलाय मितान! :)
पाकृ सोपी आणि झटपट दिसते आहे.

(मुठियाप्रेमी)रंगदास

सहज's picture

16 Sep 2010 - 4:42 am | सहज

मस्तच!

रेवती's picture

16 Sep 2010 - 6:08 am | रेवती

फोटू आणि पाकृ वेगळीच दिसतीये.
पहिल्यांदाच ऐकला हा प्रकार्....म्हणजे वाचला!
चविष्ट असणार!

गणपा's picture

16 Sep 2010 - 1:49 pm | गणपा

अगदी असच म्हणतो.

मदनबाण's picture

16 Sep 2010 - 7:44 am | मदनबाण

वाह... :)

मनि२७'s picture

16 Sep 2010 - 10:01 am | मनि२७

नक्की करून बघीन..
छान दिसतेय...आणि करायला पण सोपी पाकृ...
आवडली ग ... :-)

प्राजक्ता पवार's picture

16 Sep 2010 - 12:32 pm | प्राजक्ता पवार

छान आणी सोपी पाकृ :)

ज्योति प्रकाश's picture

16 Sep 2010 - 4:22 pm | ज्योति प्रकाश

छान व सोपी रेसिपी आहे आजच करुन बघते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Sep 2010 - 4:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आधी फक्त नाव ऐकलं होतं ("राहुल, नाम तो सुना होगा" सारखं!)
आता करूनही पहाते.

स्वाती२'s picture

16 Sep 2010 - 5:29 pm | स्वाती२

छान! सोपा प्रकार आहे.

कुसुमिता१२३'s picture

16 Sep 2010 - 9:08 pm | कुसुमिता१२३

मस्त! नक्की करुन बघणार! मला अशाच पाककृती आवडतात! सोप्या,झंझट नसलेल्या आणि पटकन होणार्‍या...

प्राजु's picture

16 Sep 2010 - 10:49 pm | प्राजु

आई शपथ्थ!!!
आता हा प्रयोग होणारच.. :)

भानस's picture

16 Sep 2010 - 11:05 pm | भानस

सोपी आणि सुटसुटीत पाकृ आहे गं मितान. लगेचच करून पाहते. :)

सुनील's picture

17 Sep 2010 - 6:55 am | सुनील

उद्या मुद्दामून भात उरवणार आहे!

बर्‍याच जणांनी मुठिया करणार म्हटले होते. केले कि नाही ? आवडला का हा पदार्थ ?

दिपाली पाटिल's picture

22 Sep 2010 - 3:10 am | दिपाली पाटिल

सही दिसतंय, नक्की करून पाहीन...

स्वाती दिनेश's picture

22 Sep 2010 - 9:23 am | स्वाती दिनेश

वेगळी दिसते आहे पाकृ, करुन पाहिले पाहिजे. तसेही भात उरतो तेव्हा फोभा, दहीबुत्ती करुन खायचाही कधीतरी कंटाळा येतो..
स्वाती

९तसेही भा