गाभा:
एक डबडेस्ट पुणेरी पाटी
पॅथॉलॉजी लॅब च्या बाहेर ही पाटी होती
ईट मे बी युरीन अॅन्ड स्टूल्स फॉर यू...बट इट्स अवर ब्रेड अॅन्ड बटर "
"आमचे येथे सायकलचे टायर पंक्चर काढून मिळेल. स्पोक्स बसवून मिळतील , मुळव्याधीवरचे औषध मिळेल "
( ही पाठी पुणे स्टेशन बस स्टॅन्ड च्या जवळ पहावयास मिळेल )
आमचे येथे काजू ,अमसुल ,आणि परकर मिळतील
( स पेठेत मोदी गणपतीजवळ)
तुम्हाला अजून अशा काही पुणेरी पाट्या माहीत असतील तर सांगा.
प्रतिक्रिया
14 Sep 2010 - 5:19 pm | विनायक प्रभू
येथे
१. परकर
२.
३.
४. नाइटी मीळतील....फक्त स्त्रियांकरिता.
कौपिनेश्वर,बाजार गल्ली ठाणे.
14 Sep 2010 - 5:31 pm | परिकथेतील राजकुमार
आईsssssssss ग !
विजुभौ तुम्ही सुद्धा झटपट प्रसिद्धीच्या मागे लागलात ? यु टु??
14 Sep 2010 - 5:42 pm | llपुण्याचे पेशवेll
म्हण्जे? कधी नव्हते? ;)
14 Sep 2010 - 6:23 pm | अवलिया
सहमत आहे.
बाकी विजुभौ परकर "मोठ्या घेराचे" हे विसरलात !
15 Sep 2010 - 2:12 pm | मराठमोळा
हाहाहाहाहा...
=)) =))
14 Sep 2010 - 5:41 pm | स्पा
खतरनाक पाट्या विजुभाऊ.....
आमच्या येथे २५ रुपयात २५ पासपोर्ट मिळतील......
(कदाचित त्याला पासपोर्ट फोटो म्हणायचं असावं)
चित्रा फोटो studio
डोंबिवली
14 Sep 2010 - 5:44 pm | बिपिन कार्यकर्ते
माझे पैसे १००+ वर.
14 Sep 2010 - 11:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
"आता तरी सफाई करा"
(गाडीवरच्या धुळीत लिहीलेलं असतं. हे वाक्य संपादकांना उद्देशून नाही.)
15 Sep 2010 - 1:43 am | असुर
"आता तरी सफाई करा"
(गाडीवरच्या धुळीत लिहीलेलं असतं. हे वाक्य संपादकांना उद्देशून नाही.)
हा हा हा हा आ आ आ ...
आँ? आवाज गेला की हसून हसून! आता जीव जायची वेळ येतेय बहुतेक!
ओ, ३_१४ तै, जरा दमानं की वो! ;-)
15 Sep 2010 - 12:27 pm | llपुण्याचे पेशवेll
अंमळ सुधारणा.
'आता तरी पुसा' असे लिहीलेले असते. ;)
15 Sep 2010 - 3:55 pm | धमाल मुलगा
हॅ हॅ हॅ! मी हीच्च सुधारणा टाकायला आलो होतो. कष्ट वाचवल्याबद्दल मंडळ काच्चकन आभारी आहे.
अवांतरः बाई 'न्यु औंधकर' आहेत हो, घ्या सांभाळुन. ;)
15 Sep 2010 - 4:00 pm | llपुण्याचे पेशवेll
चालायचंच. अहो हल्ली पुण्यात राहूनही पुण्याला शिव्या घालायची फॅशन आहे. ( हे वाक्य आजकल बापू को गाली देनेकी फॅशन है च्या चालीवर वाचावे) :)
15 Sep 2010 - 6:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
काय संबंध?
एक बोर्ड लिहीला म्हणजे पुण्याला शिव्या दिल्या? आयला, पुण्याला शिव्या घालणं येवढं सोपं आहे होय! उगाच गुर्जींनी येवढा लांबलचक लेख लिहीला! शिका गुर्जी, शिका काहीतरी यातून!!
16 Sep 2010 - 1:41 am | विश्वनाथ मेहेंदळे
च्यामारी !!! हे तर धार्मिक भावना दुखावण्यापेक्षा पण सोपे आहे.
अशा वागण्याला आमच्या कडे एक म्हण आहे, "मीठ लाया माका खाया" => गरज नसताना स्वतःवर एखादी गोष्ट ओढवून घेणे. बाकी चालू द्या....
16 Sep 2010 - 9:49 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
म्हण आवडली!
=)) =))
17 Sep 2010 - 11:22 am | विजुभाऊ
आत्ताच एक पाटी पाहीली.
वरच्या मजल्यावरील लोकांबद्दल खाली चौकशी करू नये.
जेवताना ढेकर देऊ नये.
23 Sep 2010 - 8:10 pm | विकास
गाडीवरच्या धुळीत लिहीलेलं असतं. हे वाक्य संपादकांना उद्देशून नाही.
म्हणजे? इथली धूळ तशीच ठेवायची की काय? ;)
14 Sep 2010 - 6:02 pm | शुचि
काजू, आम्सूल आणि परकर =)) =)) काहीतरी बेअकली संच बनवायचे झालं.
पण मग वाटतं - आता ते लोक या ३ गोष्टी विकत अशीत तर ते तरी काय २/२ पाट्या बनवायचा खर्च करणार?
14 Sep 2010 - 6:31 pm | मृत्युन्जय
काजू, आम्सूल आणि परकर
कदाचित तिन्ही कोकणातुन येत असेल.
आता ते लोक या ३ गोष्टी विकत अशीत तर ते तरी काय २/२ पाट्या बनवायचा खर्च करणार
अवो मी तर असेही ऐकुन आहे की पुण्यातले लेले शिक्का सुद्धा फक्त ले एवढाच बनवुन पैसे वाचवतात. तुम्हे तर आख्ख्या पाटीची गोष्ट करुन राहिलात शुचितै.
14 Sep 2010 - 7:22 pm | बिपिन कार्यकर्ते
आणि नेने तर फक्त न एवढाच शिक्का बनवून चार वेळा वापरतात.
15 Sep 2010 - 1:31 pm | शहराजाद
हहपुवा
14 Sep 2010 - 6:39 pm | अविनाशकुलकर्णी
राम मंदिराच्या बाहेर पाटी लावली होति... देवळास रंगकाम चालु असल्याने या वर्षी रामजन्म होणार नाहि
चहाच्या कपात सिगारेट विझवल्यास चहा अॅशट्रेमध्ये दिला जाईल.....
संयमाने आणि हळू बोला. आपले पूर्वज माकड असले तरी आपण आता माणसं आहोत.
14 Sep 2010 - 6:46 pm | गणपा
ह्या घ्या निवांतपणे वाचत बसा इजुभौ. :)
कधी कधी खालच्या प्रतिक्रिया पण खुमासदार असतात.
http://www.busybeescorp.com/puneripatya/thumbnails.asp
नमुन्या दाखल ....
16 Sep 2010 - 4:04 am | शुचि
त्या स्पीकना वर फिदीफिदी हसणारे आपण देखील तर "धन्स" आणि "वीकान्त" सारखे शब्द आजकाल सर्रास वापरून राहीलोय :-/
17 Sep 2010 - 1:59 pm | तिमा
इंग्लिश स्पीकना लर्ने असं लिवायला पायजेल.
14 Sep 2010 - 6:26 pm | पाषाणभेद
येथे थुंकू नये
14 Sep 2010 - 7:17 pm | मनि२७
http://www.busybeescorp.com/puneripatya/index.html
वाटेल तेवढ्या पाट्या वाचा...
14 Sep 2010 - 7:31 pm | चिगो
ते देवळास रंगकाम, लिंबु सरबत कोकम, कुत्रा झक्कास हं... च्यायला, ह्यांचं रंगकाम आणि त्रास रामाला...
14 Sep 2010 - 10:14 pm | अनामिक
त्रास रामाला की कौशल्येला?
15 Sep 2010 - 12:28 pm | llपुण्याचे पेशवेll
कौसल्येला.
16 Sep 2010 - 1:27 pm | सविता
हहपुवा
14 Sep 2010 - 7:49 pm | Dhananjay Borgaonkar
वैकुंठातली पाटी.
वाहतुकीचे नियम पाळा आणि ईथे यायचे टाळा. :P
एक नंबर पाटी आहे ही.
14 Sep 2010 - 7:57 pm | सुहास..
लक्ष्मी नारायण येटरच्या आसपास ..
दोन टपर्या शेजारी-शेजारी ,अगदीच खेटुन नाही पण दहा-पंधरा फुटावर.
दोन्ही कडे रेट , टपर्यांची ठेवण, रंग,आत ठेवलेले भांडे,मेनु, ऊभे राहुन खाण्याची पध्दत, अगदी सगळ काही जुळ.
पहिल्या टपरीवरील पाटी :
" कृपया आधी टोकन घ्यावे "
दुसर्या टपरीवरील पाटी :
" ईथे टोकन-पध्दत नाही "
14 Sep 2010 - 8:07 pm | एक अनामी
१. "पूलाचे काम चालू आहे सावधान"
२. "रेल्वेरूळ ओलांडून जीव धोक्यात घालू नका"
ह्या दोन पाट्या थोड्या थोड्या अंतरावर...
कळवा स्टेशन... (खूप महिन्यांपूर्वी होती)
14 Sep 2010 - 9:12 pm | गणेशा
मस्त
14 Sep 2010 - 10:26 pm | राजेश घासकडवी
"पुण्याचे नसाल तर पुण्याविषयी काही गैर बोलू नये. पुण्याबाहेर केवळ औरंगजेब राहातात"
म्हणजे, मला आधी कधी ही पाटी दिसली नव्हती, पण आता दिसते आहे. :)
15 Sep 2010 - 11:02 am | प्रदीप
आता तुमचे काही खरे नाही. पुणेरी ऑपेरा पहायला मिळणार लवकरच!
16 Sep 2010 - 1:43 am | विश्वनाथ मेहेंदळे
अहो अजून एक पाटी असते खाली.
"पुण्याचे असाल तर काहीही बोललात तरी चालेल, कारण मांजरीचे दात तिच्या पिल्लांना....."
14 Sep 2010 - 11:44 pm | चन्द्रशेखर सातव
" इथे कचरा टाकणारिचा नवरा मरेल"
"इथे गाडी लाऊ नये अन्यथा घोडा लावण्यात येईल "
14 Sep 2010 - 11:47 pm | धमाल मुलगा
अग्गायायायाया.....
गाडी लावायला आलेला एकवेळ गाडी बोकांडी घेऊन फिरेल असली धमकी वाचल्यावर! =))
15 Sep 2010 - 11:18 am | आनंदयात्री
आन ती एक रे धम्या ..
"येथे लघवी करु नये .. अन्यथा कायमचा इलाज करण्यात येईल !!"
15 Sep 2010 - 3:56 pm | धमाल मुलगा
खॅ खॅ खॅ....
अरे गप की जरा. :D
15 Sep 2010 - 4:02 pm | गणपा
कायमचा इलाज
=)) =)) =))
15 Sep 2010 - 1:02 am | नाटक्या
बर्याच पाट्या (पुणेरी लोकांनाही फिक्या पाडतील अश्या) ईथे आहेत... वानगी दाखल काही:
15 Sep 2010 - 1:54 am | चतुरंग
हे एकदमच पोचलेले निघाले की सगळे, पुणेरी लोक लाजून चूर झाले! ;)
Shakespeare Lingerie Club म्हणजे 'ज्ञानेश्वर रद्दी केंद्र' च्याही पुढचे झाले. (तरी बरं Shakespeareचं स्पेलिंग बरोबर लिहिलंय! ;) )
15 Sep 2010 - 11:05 am | प्रदीप
ह्यातील बर्याच पाट्या इंग्लिश भाषेतून लिहीण्याच्या गोंधळामुळे विनोदी झालेल्या आहेत. चीनमधून असे बरेच काही काढता येईल.
16 Sep 2010 - 12:13 am | धनंजय
मला "शेक्सपियर लाँजेरी क्लब" पाटीमधील गोम कळली नाही.
शेक्सपियर बहुधा रंगेल होता. (म्हणजे ज्ञानेश्वर रद्दी केंद्र सारखा प्रकार नाही.)
माझ्या (पोरकट) मित्रमंडळात वाटेल त्या शब्दात दुसरा अर्थ काढून खिक्क् करून हसत असू. शेक-स्पियर म्हणजे "भाला हलव." वेळी-अवेळी भाला हलवण्याबाबत त्या वयात फारच विचार होत असे. प्रौढपणी (किंवा धाकटेपणी) तितका एकमार्गी/एकाकी विचार होत नाही (किंवा होत नसे). पण "शेकस्पियर"चा तसा टीनेजर अर्थ घेतला तरी लाँजेरी क्लबसाठी पाटी ठीकच वाटते.
16 Sep 2010 - 5:15 am | एक
Shakespere च्या ऐवजी Shakesphere असं हवं होतं का? मग ते त्या क्लबला सुटेबल वाटतं..
चायनीज लोकं स्पेलिंग चुकू शकतात ;)
12 Sep 2013 - 11:17 pm | विजुभाऊ
इथे अफ्रीकेत एक पाटी बघितली. खाजगी विमानतळाच्या बाहेर.
"बीवेअर ऑफ लो फ्लाइंग प्लेन्स."
फोटो काढायचा राहीला
15 Sep 2010 - 11:04 am | मृत्युन्जय
ठाण्याला एक यशवंत भोजनालय आहे. तिथे फक्त राहण्याची सोय केली जाते. तशी पाटीच आहे तिथे "यशवंत भोजनालय - येथे फक्त राहण्याची सोय केली जाते".
15 Sep 2010 - 1:02 pm | llपुण्याचे पेशवेll
पूर्वी सकाळ प्रेस च्या दारात खूप वाहने पार्क केली जात, त्यामुळे आतमधे जाताना त्रास होई. म्हणून तिथे भिंतीवर लिहीले येथे वाहने लावू नयेत. तिथे लोकांनी गाड्या लावणे बंद केले आणि फेरीवाल्या विक्रेत्यांनी रात्री हातगाड्या , सायकली आणून लावायला सुरुवात केली. मग परत भिंत रंगवली, लिहीले येथे कोणत्याही प्रकारची वाहने लावू नयेत. उदा. स्कूटर, चारचाकी, सायकली, हातगाड्या
एका टारगट माणसाने विटेच्या तुकड्याने हातगाड्यांच्या पुढे २ शब्द खरडले. आता असे दिसू लागले. येथे कोणत्याही प्रकारची वाहने लावू नयेत. उदा. स्कूटर, चारचाकी, सायकली, हातगाड्या आणि विमाने
15 Sep 2010 - 3:34 pm | विजुभाऊ
एका टारगट माणसाने विटेच्या तुकड्याने हातगाड्यांच्या पुढे २ शब्द खरडले
तो टारगट इसम नक्की शनीवार पेठेतला सकाळ ऑफीसच्या जवळच रहात असणार.
असो.
ही घ्या चिंचवडमधील एक पाटी
येथे ष्टो दुरुस्ती, नाडी बंडल, घरगुती परकर आणि ताजा काळा मसाला मिळेल.
15 Sep 2010 - 3:56 pm | धमाल मुलगा
>>तो टारगट इसम नक्की शनीवार पेठेतला सकाळ ऑफीसच्या जवळच रहात असणार.
ह्म्म्म...कळतायत बरं टोमणे. ;)
15 Sep 2010 - 4:09 pm | llपुण्याचे पेशवेll
धम्या ते विजुभौंनी म्हटलेंलं मोदी गणपती स पेठेत कुठं आहे रे. पत्ता मिळाला तर आम्हाला पण सांग.
15 Sep 2010 - 6:02 pm | धमाल मुलगा
मोदी गणपती ठाऊक नाय?
मेल्या लाज आणतोस चारचौघात. स्वतःला पुणेकर म्हणवुन घ्यायच्या लायकीचा न्हाईस लेका.
चित्रशाळेपासून सरळ नो वेंट्रीतुन गाडी नारायणपेठेत घातली की जिथं रस्ता संपतो तिथं डाव्या बाजूला मोदी गणपती.
15 Sep 2010 - 6:12 pm | llपुण्याचे पेशवेll
आयला ते होय पण ते तर नारायण पेठेत आहे. हे भौ तर म्हणून राहीले सदाशिव पेठेत.
15 Sep 2010 - 6:18 pm | धमाल मुलगा
नाय, पोकळ शब्दात पकडायलायस म्हणुन विचारतो हां.
पुणे-व्हाया-मुंबई-व्हाया-होसुर-व्हाया-बारामती-व्हाया-सातारा असा प्रवास झाल्यानंतर एव्हढी तेव्हढी गडबड व्हायचीच की हो. घ्या सांभाळुन. आपलंच हैत ते बी.
15 Sep 2010 - 6:19 pm | परिकथेतील राजकुमार
अभिनंदन हो विजुभौ.
अवांतर :- कितीची सुपारी फुटलिये ?
15 Sep 2010 - 4:48 pm | विजुभाऊ
मोदी गणपती स पेठेत कुठं आहे रे
पेशवे अभ्यास कमी पडतोय तुमचा
जेथे नारायण पेठ सदाशिव पेठेला मिळते तेथे ( जिथे सागरा धरणी मिळते च्या चालीवर ) हा घ्या एक्झॅक्ट पत्ता Coordinates: 18°28'38"N 73°57'20"E ...
मोदी गणपती ला बोंबल्या गणपती असेही एक नाव आहे
( Legend has it that Modi Ganpati temple got its name since the temple idol was found in a farm next to Khushrooshet Modi’s garden (how it landed there we do not know). A lesser known name for this charming temple is Bomblya Ganpati (which sounds both fishy and loud)! The story goes that this name got associated with it due to fisher folk selling Bombil (a fish also known as Bombay Duck) nearby. In colloquial Marathi Bomblya also means – one who speaks loudly.
This temple from the Peshwa era dates back to before 1811. Bhat (a Maharashtrian surname) from Ratnagiri, later settled in Pune and built the temple. The idol is thought to be 200 years old )
15 Sep 2010 - 5:27 pm | llपुण्याचे पेशवेll
जेथे नारायण पेठ सदाशिव पेठेला मिळते तेथे
हा हा हा हा हा . उगा काहीतरी फेका मारू नका सवईनुसार.. मोदी गणपती अंमळ नारायण पेठेतच आहे फार्फार पूर्वीपासून. सदाशिव पेठ चांगली दूर आहे तिथून. लक्ष्मीरोडच्या पल्याड सदाशिव पेठ आहे आणि अल्याड नारायणपेठ आहे. उगा आपलं कैच्याकै बरळायचं.
आणि जालावर (पुणे हेरीटेज ब्लॉगवर) शोधून माहीती कोणीही देईल हो.. ओरिगिनल करा कधीतरी.
14 Sep 2013 - 11:28 pm | पिशी अबोली
जातीयवादी गणपती!
15 Sep 2010 - 5:12 pm | पर्नल नेने मराठे
आमच्या गिरगावात ब्राम्हणसभेत महिला मंडळाने भरविलेले विविध वस्तुंचे प्रदर्शन होते.
एका मित्राच्या आइचा त्यात स्तॉल असल्याने आम्ही मित्र मैत्रीणी मिळुन सगळे गेलो.
बाहेर मोठी पाटी लावली होती "येथे बायकांचे भव्य प्रदर्शन व वि़क्री" :(
15 Sep 2010 - 5:19 pm | सुनील
नशीब "भव्य बायकांचे......" असे नव्हते!
"नेटके"पणाचा अभाव, दुसरे काय?
15 Sep 2010 - 6:34 pm | धमाल मुलगा
हाण्ण तिच्यायला!!!!
=)) =)) =))
अवांतरः पाटी वाचुन प्रदर्शन पहायला झुंबड उडाली होती का? :P
15 Sep 2010 - 6:37 pm | रेवती
बायकांचे? आँ?
धन्य जाहले!;)
15 Sep 2010 - 8:03 pm | सूड
येथे बायकांचे भव्य प्रदर्शन व वि़क्री
हे वाचून मला भव्य महिलांचे कबड्डी सामने चा बोर्ड आठवला
16 Sep 2010 - 1:48 am | सुहास..
येथे बायकांचे भव्य प्रदर्शन व वि़क्री >>.
=)) =))
=)) =))
=)) =))
=)) =))
मार डाला !! ही चुचु पण ना !!
23 Sep 2010 - 4:35 pm | पर्नल नेने मराठे
आज अजुन एक पाटी वाचली.
विसा रिनिवलसाठी मेडीकल टेस्ट होती.
खुप दारं शोधली आत जायला.
शेवटी एका दारावर मेडिकल फिटनेस टेस्ट( फिमेल कलेक्शन)
जरा उडालेच मग खाली अजुन लिहिलेले वाचले ब्लड कलेक्शन
मग आत गेले..
23 Sep 2010 - 6:20 pm | विजुभाऊ
स पेठेतली आणखी पाठी
जेवणाच्या ऑर्डरी घेतल्या जातील.
आजची स्पेश्यालिटी : श्राधाची थाळी
बापट उपाहार गृह पुने येथे असलेले स्टॅन्डर्ड पाटी
आमचे लस्सी प्यायची नसते खायची असते.
23 Sep 2010 - 6:34 pm | धमाल मुलगा
>>आजची स्पेश्यालिटी : श्राधाची थाळी
काहीही फेकू नका भौ!
इथं काय सरदारजी जमलेत का सगळे? च्यायला...
15 Sep 2010 - 5:37 pm | विजुभाऊ
सातार्यात एक पाटी आहे
बालाजी मिल्क्...अद्ययावत म्हशींच्या गोठ्यातील दूध.
माझ्या एका इरसाल मित्राची कॉमेन्ट " कोण अद्ययावत ?म्हशी की गोठा?"
23 Sep 2010 - 8:05 pm | रेवती
सातार्यात एक पाटी आहे
सातार्यात? शक्य आहे का हे? पुण्यातच असेल नीट आठवून मग सांगा.
15 Sep 2010 - 6:15 pm | शेखर
हा ५० वा प्रतिसाद विजुभाऊ :)
16 Sep 2010 - 10:19 am | इन्द्र्राज पवार
~~~~~
15 Sep 2010 - 11:13 pm | चिगो
झक्कास देवा... हाणा आणखी..
16 Sep 2010 - 11:24 am | शैलेन्द्र
डोंबिवलीतील रेतीबंदरवर, खाडीकीनारी असलेली, खास आगरी पाटी.
"येते जोरप्यांनी वाय्हात चाले करु नये, पकरल्यास पोकल बांबुचे फटके परतील."
16 Sep 2010 - 12:27 pm | Dipankar
तशीच पाटी भोपर टेकडी, डोंबिवलीला आहे
16 Sep 2010 - 12:37 pm | अवलिया
तरीच कुंद्या मागल्या भारत भेटीत पोकल बांबुचे फटके पडलेअसं कोकलत होता !
16 Sep 2010 - 5:57 pm | कुंदन
आचरट ...
16 Sep 2010 - 1:23 pm | विजुभाऊ
पार्ल्यात बायकोसमवेत आलेल्या एका पुणेकराने भेळपुरीच्या गाडीवर ऑर्डर केली होती
हीला चाट आणि मला रगडा..
16 Sep 2010 - 1:34 pm | सविता
ठ्यो......
16 Sep 2010 - 1:39 pm | गणपा
इजुभौ हे कैच्याकैच हा.
हा जुना जोक पुणेकरांच्या नावावर खपवताय. ;)
हाच जोक आम्ही शाळेत असताना मारवाड्यांच्या बाबतीत ऐकलाय.
16 Sep 2010 - 6:28 pm | llपुण्याचे पेशवेll
अहो चालायचंच मार्केटात चालतो तो माल ते खपवतात. :)
16 Sep 2010 - 2:45 pm | विजुभाऊ
हा जुना जोक पुणेकरांच्या नावावर खपवताय.
नाय ओ.... मी तो पार्ल्यातला किस्सा सांगितला.
मला पुण्यातली स पेठेतली एक पाटी कधीच कळाली नाही
वात ! वात !! वात !!!
जिवाला खा जिवाला खा...अनरसे सामोसेवाले.
या दोन्ही पाट्या ज्ञानप्रबोधिनी च्या बाहेर आहेत
स प महाविद्यालायच्या समोर एस पीज असे एक भेळ वगैरे चे दुकान होते/आहे तेथे येथे हात धुवावेत असा उलट्या अक्षरातील बोर्ड आहे. तो बेसीनवरच्या आरशात सुलटा दिसतो.
त्याच आरशावर आरशात बघून भांग पाडून नये असाही बोर्ड आहे. तो मात्र सुलटा आहे
16 Sep 2010 - 2:59 pm | बिपिन कार्यकर्ते
जंगली महाराज रस्ता, मथुरा हॉटेलच्या एंट्रंसच्या अगदी बाजूला त्या इमारतीचा एंट्रंस आहे तिथे...
16 Sep 2010 - 4:44 pm | मृत्युन्जय
काय बिका? आता ही पण पुणेकरांचीच चुक का?
या बिचार्याला शाळेत किती त्रास झाला असेल नाही?
16 Sep 2010 - 4:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
बघ बिका, पुणेकरांना किती लगेच शिव्या घातल्यासारखं वाटतं ते! ;-)
16 Sep 2010 - 5:10 pm | मृत्युन्जय
या शिव्या होत्या? मला कळलेच नाही.
16 Sep 2010 - 5:08 pm | विजुभाऊ
ओ ठणेवाल्या ताई
यमक जुळवायला
पुणे तेथे काय उणे असे म्हंटले जाते.
पण ठाणे तेथे काय उणे असे का म्हंटले जात नाही.
16 Sep 2010 - 5:43 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ठाण्यात हाय काय तिच्या****? सगळीकडे नुस्ती तळी होती ती बुजवत सुटले आहेत कधीचे, एक पागलखाना होता तो हलवला ... आता ठेवलंय काय तिथे, तर गर्दी? हॅट, ठाणं बेक्कार आहे एक लंबर!!
पुण्यात पहा जागोजागी तळी आहेत, जागोजागी नवीन निर्माण होत आहेत, पागलखाना अजून सुरू आहे ... पुण्यात गर्दीही नाही!!
16 Sep 2010 - 5:51 pm | मृत्युन्जय
काय आहे. ठाण्यातले सगळ्यात डेंजर येडे उठुन पुण्यात आले. त्यामुळे गरज उरली नसावी बहुधा पागलखान्याची. पण एकुण ठाण्यात पागलखाना होता तेव्हा(च) ठाण्यात काही शान होती हा विचार आवडला.
16 Sep 2010 - 5:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
छे छे, ठाण्यात शान कधीच नव्हती; चान्सच नाही! ते आपलं उगाच बोंबलायला लोकं काय वाट्टेल ते बोंबलतात हो, तुम्ही नका लक्ष देऊ! पागलखाना होता तेव्हा ठाण्यात जरातरी काहीतरी सांगण्यासारखं होतं. आता काय आहे, तो टीचभर मासुंदा तलाव आणि आक्रमण झालेला इंचभर आंबेघोसाळे तलाव आणि अतिक्रमणयुक्त येऊर?? हॅट...
त्यापेक्षा तळतळाटांचं (भरपूर तळी असलेलं) आणि पागलखाना असलेलं पुणं खूप चांगलं!!
16 Sep 2010 - 6:01 pm | मृत्युन्जय
अवो तो पागलखाना चालु हाये म्हणे अजुन. पुन्यांदा तपासुन बगा जरा. कदी बंद जाला?
बाकी ठाणे म्हणजे देसाची शान हाय. कोनालाबी गुनेगाराला पकडलं की तो पिच्चर मधला हवालदार्र म्हनतो ना - चल ठाण्याला म्हननु.
आनि उपवन ल्याक आहे ना तिथे अजुन?
16 Sep 2010 - 6:38 pm | विजुभाऊ
आणखी एक....
ठाणेरी पाट्या अजून कुणी प्रसीद्ध केल्या नाहीत.
16 Sep 2010 - 6:42 pm | मृत्युन्जय
घ्या वरतीच लिहिली आहे एक ठाणेरी पाटी. इथे परत लिहितो
"यशवंत भोजनालय - येथे फक्त राहण्याची सोय केली जाइल "
17 Sep 2010 - 12:37 pm | गांधीवादी
ढकल पत्रातून मिळालेल्या अजून काही.
चहाच्या दुकानात हेअरकटिंग!
17 Sep 2010 - 1:49 pm | धमाल मुलगा
क ड क!
कैलास स्मशानभूमीखालच्या बाणासमोरच 'अब मेरा नंबर है' =))
आणि 'रिटर्नसाठी शववाहिनी उपलब्ध होणार नाही' _/\_ हैट्ट आहे!
17 Sep 2010 - 2:12 pm | तिमा
मागे एकदा बडोद्यात असताना बसच्या मागे गुजराथीत 'गमे मनने फावे तनने', अशी ड्रेसेसची जाहिरात होती. ती मराठी अर्थाने वाचली. ठ्ठो!
गुजराथी लिपी येत असेल तर कळेल.
15 Sep 2013 - 7:39 am | रमेश आठवले
'गमे मनने फावे तनने' याचा मराठीत अर्थ असा होऊ शकतो.
(पाहिल्यावर) मनाला (ड्रेस) आवडतो (व परिधान केल्यावर) शरीराला सुखाचा वाटतो.
17 Sep 2010 - 3:02 pm | बरखा
क्रुपया पेश॑टनी नाव नो॑दणी सकाळी ११:१५ च्या आत व रात्री ८:१५ च्या आत करावी,
न॑तर आलेल्या पेश॑ट कडुन ५० रुपये ज्यादा आकारण्यात येतील.
25 Sep 2010 - 8:11 am | नरेश धाल
४ रुग्ण एकत्र आल्यावर काही सूट (discount) होता का ?
25 Sep 2010 - 8:10 am | नरेश धाल
माझी एक पाटी :
पुरावे मागू नयेत, मागितल्यास अपमान करण्यात येईल.
25 Sep 2010 - 8:19 am | शेखर
विजुभाऊ , शतक झाल बरका..
25 Sep 2010 - 2:44 pm | इन्द्र्राज पवार
नुकतीच प्रकाशित झालेली एक जाहिरात.
ही पाटी काही तशी पुणेरी नाही...तरीही भाषेच्या केलेल्या चिंध्या पाहण्यासाठी एक नमुना.
इन्द्रा
25 Sep 2010 - 4:15 pm | मृत्युन्जय
ही पाटी काही तशी पुणेरी नाही...तरीही भाषेच्या केलेल्या चिंध्या पाहण्यासाठी एक नमुना.
पाटी पुणेरी नाही त्यामुळेच भाषेच्या चिंध्या केलेल्या आहेत. :P
बाकी पाटी दिसत नाही आहे त्यामुळे अजुन काही लिहित नाही
25 Sep 2010 - 5:06 pm | इन्द्र्राज पवार
बरे... आता इथे पहा.
इन्द्रा
27 Sep 2010 - 11:18 am | विजुभाऊ
शतकोत्तर प्रतिसांदासाठी धन्यवाद.
पुण्यात चितळेंकडे असलेली पाटी
हे पार्किंग चितळे बंधु मिठाईवालेंच्या ग्राहकांसाठी राखीव आहे.
वाहन फक्त २० मिनिटे पार्क करावे. २० मिनिटांनन्तर वाहन बाजूला करण्यात येईल
27 Sep 2010 - 11:50 am | विकाल
"लाख मोलाचा जीव, यष्टी यष्टी करून घालवू नका...."
स्थळः- दवाखाना
महूद जि. सोलापुर
20 Oct 2010 - 4:57 am | गांधीवादी
पुणेरी पाट्यांच्या स्पर्धेत.....................
12 Sep 2013 - 11:49 pm | खटपट्या
ठाण्याचे बरेच लोक दीसताहेत. ठाणे कट्टा सूरू करायला हवा !!!
14 Sep 2013 - 11:19 am | तिमा
मुंबईकर काही कमी नाहीत. कालच एका टोईंग व्हॅनच्या मागे लिहिलेलं वाचलं.
' चालतो की उचलुं?
14 Sep 2013 - 4:31 pm | रमेश आठवले
हा डबडेस्ट शब्द जरा नवीन वाटला. मला dumbest माहिती आहे.
15 Sep 2013 - 12:36 am | विजुभाऊ
रमेश भाउ मिपावर तुम्हाला असे बरेच शब्द सापडतील.
उदा : वीकान्त , रच्याकने वैग्रे.