गाभा:
आपण लोकांचा उन्माद वाढविणारे जे सण साजरे करतो, उदा गणेशोत्सव, दिवाळी त्यात मानवी मृत्युचा दर वाढतो का तसाच राहतो हे जाणून घ्यायचे कुतुहल मला निर्माण झाले आहे. मला निर्माण झालेल्या कुतुहलाला सांख्यिकीचे असंख्य पदर आहेत (आणि या त्याविषयात मी कच्चा आहे). असा अभ्यास करण्यासाठी वैकुंठ आणि तत्सम स्मशाने इथे विदा गोळा करावा की रुग्णालयात हा देखिल माझ्या मनात संभम आहे. तसेच असा अभ्यास कोणत्या बॅनर खाली करावा हा एक प्रश्न आहेच ( ज्योतिषाची चाचणी आयुका आणि अनिसच्या बॅनर खाली झाली होती).
आपण या संदर्भात जर काही सूचना (तसेच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत ) करू शकलात तर मला आनंद होईल.
कळावे
युयुत्सु
प्रतिक्रिया
14 Sep 2010 - 3:13 pm | विसोबा खेचर
मला वाटतं की यात सणांनाच सगळा दोष देता येणार नाही..उन्माद वाढवायला काय हो, काहीही पुरतं.. कुणाकुणाला अगदी एखाद् क्वार्टरही पुरते..! :)
प्रत्यक्षात किंवा टीव्हीवर, चित्रपटात इत्यादी अनेक ठिकाणी तंग कपडे घातलेल्या किंवा मादक/उन्मादक हालचाली काणार्या अनेक स्त्रिया आपल्या नजरेस पडतात.. माझ्यासारख्या इसमांचा त्या स्त्रियादेखील उन्माद वाढवतात.. मग मी सणांना का दोष द्यायचा बरे? :)
उदाहरणच द्यायचं झालं तर 'चल छैय्या छैय्या' गाण्यातली मलायका अरोरा, किंवा 'अप्सरा आली..' मधली सोनाली कुलकर्णी यांसारख्या उन्मादक स्त्रिया पाहून अंमळ चाळवायला होतं.. हा काय सणांचा दोष? गणपतीबाप्पा किंवा दसरा-दिवाळी या सणांचा यात काय दोष?! :)
माझं ऐका उपाध्ये, नका करू असले काही विचार..! :)
असो..
तात्या.
14 Sep 2010 - 4:49 pm | युयुत्सु
तात्या
मी आत्ता फक्त माझी उत्सूकता व्यक्त केली आहे कोणताही निष्कर्ष काढलेला नाही. सणांना पण दोष दिलेला नाही.
काही जणाना चित्रवाणी वरचा 'उन्माद' वैफल्य आणू शकतो.
14 Sep 2010 - 4:49 pm | युयुत्सु
तात्या
मी आत्ता फक्त माझी उत्सूकता व्यक्त केली आहे कोणताही निष्कर्ष काढलेला नाही. सणांना पण दोष दिलेला नाही.
काही जणाना चित्रवाणी वरचा 'उन्माद' वैफल्य आणू शकतो.
14 Sep 2010 - 3:13 pm | लीना सचिन चौधरी
आपण लोकांचा उन्माद वाढविणारे जे सण साजरे करतो, उदा गणेशोत्सव, दिवाळी त्यात मानवी मृत्युचा दर वाढतो, का?
मानवी मृत्युचा दर का तसाच राहतो ?
यावर आपन विचार करावा.
धन्यवाद.
14 Sep 2010 - 3:25 pm | चिरोटा
मृत्युचा दर माहित नाही पण रक्तदाब वाढणे,कानाने कमी ऐकू येणे असले प्रकार निश्च्नितच वाढत असावेत.
14 Sep 2010 - 3:29 pm | विसोबा खेचर
हम्म.. ढोलताश्यांचे असह्य आवाज हा जर मुद्दा असेल तर ठीक. त्यावर चर्चा करता येईल. परंतु उपाध्यांनी 'ध्वनिप्रदुषण' हा शब्द न लिहिता 'उन्माद' ह शब्द लिहिला त्यामुळे मी माझ्या प्रतिसादात 'उन्मादा' विषयीचा एक पदर उलगडून दाखवला.. ;)
तात्या.
14 Sep 2010 - 3:48 pm | चिगो
व्वा तात्या.. उन्मदाचा पदर आणि पदराचा उन्माद, दोन्हीही दाखवले तुम्ही...
16 Sep 2010 - 12:46 am | अन्या दातार
जियो चिगोजी/तै,
अगदी मुंह की बात छीन ली आपने!
14 Sep 2010 - 3:56 pm | मूकवाचक
नाइट क्लब, रेव्ह पार्टी वगैरेला प्रोत्साहन द्यायला हवे. त्या साठी गावकुसाबाहेर खास व्यवस्था करायला हवी. निष्पाप लोकाना त्रास न देता उन्माद बाहेर पडेल. (उत्सवाने उन्माद वाढत नसून, तो त्या निमित्ताने बाहेर पडतो असा आमचा अनुभव आहे.)
14 Sep 2010 - 4:01 pm | सुहास..
नाइट क्लब, रेव्ह पार्टी वगैरेला प्रोत्साहन द्यायला हवे. त्या साठी गावकुसाबाहेर खास व्यवस्था करायला हवी. निष्पाप लोकाना त्रास न देता उन्माद बाहेर पडेल. >>>>
=))=))=))=))
एक नंबर प्रतिसाद रे भौ !!
14 Sep 2010 - 4:13 pm | अवलिया
अरे वा ! आता नवीन झाड पकडलं तर !!
14 Sep 2010 - 5:06 pm | विनायक प्रभू
झाड वडाचे आहे का?
15 Sep 2010 - 10:16 am | प्रकाश घाटपांडे
कदाचित आमची अप्रत्यक्ष मदत होईल.
गणेशोत्सवात एखाद्याला तातडीची वैद्यकिय मदत लागली तर रुग्णवाहिका तिथे पोचु शकत नाही अशी शहरातील दाटवस्तीत परिस्थिती आहे.
आग लागल्यास अग्निशामकदलाचे बंब तिथे तातडीने पोचु शकणार नाहीत.
दिवाळीत फटाक्यामुळे होणार्या दुर्घटना आपण तर नेहमीच वाचतो.
त्या मुळे या काळात मृत्यु दर थोडासा तरी जास्त असणार.
15 Sep 2010 - 6:40 pm | चिरोटा
सहमत आहे. पण संकटाच्या वेळी बाप्पा धावून आले नाहीत तर काय उपयोग? भक्तीप्रेम ओसंडून वाहत असते.अशावेळी यमदूतांना ट्रॅफिक जॅममध्ये फसवून कदाचित गणराय मृत्यूदर कमीपण करत असतील!!
15 Sep 2010 - 6:47 pm | विकास
गणेशोत्सवात एखाद्याला तातडीची वैद्यकिय मदत लागली तर रुग्णवाहिका तिथे पोचु शकत नाही अशी शहरातील दाटवस्तीत परिस्थिती आहे.
इतर वेळची त्यांची तत्परता (असणे अथवा नसणे) देखील या संदर्भात लक्षात घेणे महत्वाचे ठरेल.
बाकी गणेशोत्सव, दिवाळी वगैरे वर्षातून एकदाच येतात... पण उन्माद वाढवणार्या चर्चा-कौलांचे काय करायचे, हा प्रश्न, खरं तर अखिल मिसळपाव महासंघाला पडला पाहीजे. ;)
18 Sep 2010 - 8:55 pm | तिमा
धागा काढण्याचा हेतू व विषय समजला नाही.