सहित्य : मैदा - १/२ वाटी
रवा - २ चमचे
तेल
खोबरा कीस - १ वाटी
खडीसाखर
वेलची पावडर
चारोळी
बदाम व काजु पावडर
- मैदा व रवा एकत्र करुन त्यात २ चमचे तेलाचे कडकडीत मोहन घाला. त्यात थोडे पाणी घालुन घट्टसर पीठ मळुन घ्या्. पीठ झाकुन अर्धा तास ठेवुन द्या.
सारण -खोबरा कीस मंद आचेवर हलकासा भाजुन घ्या. बदाम व काजु पावडर देखील भाजुन घ्या. खडी साखर थोडी कुटुन घ्या. खोबरा कीस , बदाम व काजु पावडर, खडी साखर , वेलची पावडर , चारोळी एकत्र करुन सारण तयार करा.
पीठाची पारी लाटुन त्याला मुखर्या पाडुन त्यात सारण भरुन त्याला मोदकाचा आकार द्या. तयार झालेले मोदक मंद आचेवर तळुन घ्या.
चला मंडळी बाप्पाचा प्रसाद खायला या.
प्रतिक्रिया
12 Sep 2010 - 3:45 pm | सुनील
धन्यवाद! उकडीच्या (किचकट) मोदकाला चांगला (सोपा) पर्याय!
12 Sep 2010 - 3:51 pm | मी-सौरभ
बनवता येत नाहीत म्हणून उकडीचे मोदक किचकट ???
तळलेले मोदक आम्ही दिवळीत खातो करंजी बरोबर :) आत्ता उकडीचेच मोदक सही वाटतात...
12 Sep 2010 - 3:53 pm | शानबा५१२
दुर्बीण नाही दीलीत.
13 Sep 2010 - 9:28 pm | सविता
13 Sep 2010 - 9:36 pm | मेघवेडा
छे हो.. ही उलटी आहे. शानबांना बघण्यासाठी दुर्बीण काय करायचीय? :D
12 Sep 2010 - 4:16 pm | कुक
तळलेले मोदक खातना थोडे चिवट वाटतात,
मला उकडीचे मोदक आवडतात, मि काल ६ त ७ खाल्ले
12 Sep 2010 - 7:23 pm | प्राजक्ताचि फुले
तळलेले मोदक खाताना थोडे चिवट वाटतात,
जर फक्त मैदा वापरुन मोदक बनवले तर ते चिवट होतात.
त्यासाठी थोड्या दुधात रवा भिजवुन घ्यावा, आणि तो मैद्यात एकत्र करुन पीठ छान मळुन घ्यावे.
नंतर हे पीठ थोडा वेळ कुटावे. नंतर त्याची पोळी लाटुन घ्यावी व तिला तुपाचा हात लावावा. त्याची गुंडाळी करुन साधारण बाकरवडी एवढे काप करावे. आणि मग त्याचे मोदक बनवुन घ्यावेत.
अवांतरः माझी आई असेच करते मोदक... आणि मला तर कधीच चिवट मोदक खायला लागले नाहीत. :)
12 Sep 2010 - 7:11 pm | प्राजक्ताचि फुले
तळ्लेल्या मोदकांमध्ये जर ओल्या नारळाचे सारण टाकले तर मोदक चविष्ट होतात.
गुळ,खसखस, ओले नारळ,वेलची, काजू,बदामाचे तुकडे,खवा परतुन घ्यावे, व मोदकात सारण भरावे.
12 Sep 2010 - 8:22 pm | प्राजु
मला तळलेले आवडतात.. पण उकडीचे आणि तळलेले यात निवड करायची असेल तर उकडीचेच.. :)
असो.. पाकृ. छान आहे.
12 Sep 2010 - 9:39 pm | रेवती
तळलेले मोदक छान दिसताहेत.
मला उकडीचे आणि तळलेले दोन्ही प्रकार आवडतात.
ज्यांच्याकडे पाच दिवस किंवा १० दिवस असे बप्पा असतात त्यावेळेस आरास मांडताना फराळाच्या पदार्थांबरोबर तळणीचेच मोदक लागतात.
13 Sep 2010 - 4:02 am | शुचि
मला हे देखील आवडतात. छान पाकृ.
13 Sep 2010 - 11:13 am | मदनबाण
मला सर्व प्रकारचे मोदक लयं आवडत्यात... :)
13 Sep 2010 - 12:58 pm | जागु
मस्तच.
13 Sep 2010 - 1:12 pm | परिकथेतील राजकुमार
वाह मस्त पा़कृ.
घरी दिड दिवसाचा गणपती असल्याने मातोश्रींनी कालच तळलेले मोदक आणि डाळ असा मेनु केलेला होता :)
फोटु चढवता आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन ;) फक्त फोटु थोडे अजुन मोठे पाहिजे होते.
13 Sep 2010 - 1:33 pm | निवेदिता-ताई
सुंदर ग... मस्त झालेले दिसतायत....
13 Sep 2010 - 9:17 pm | धमाल मुलगा
च्छ्या:! पाकृमधलं आपल्याला काही कळत नाही. खायला बोलावत असाल तर सांगा. :)
अवांतरः लै वेळा शिर्षक वाचलं, पण आज डोकंच जागेवर नाहीये बहुतेक...दरवेळी 'तळलेले बदक' असंच का वाचतोय मी?
13 Sep 2010 - 9:22 pm | सविता
तळलेले बदक....... फुटले मी इकडे... :D
13 Sep 2010 - 9:35 pm | टिउ
कोण रे तो तिकडे म्हणतोय की धमालराव नुकतेच बदकाच्या शिकारीवरुन परत आलेत!
13 Sep 2010 - 11:20 pm | धमाल मुलगा
तेव्हढा 'बदकाच्या' हा शब्द सपष्टपणॅ ठळ्ळक लिहिला असता तर कुणी फाशी दिलं असतं का रे टिऊल्या बाऊल्या?
आता पब्लिक येतंय आमच्या धोतराला फटाके बांधायला. :(
13 Sep 2010 - 11:08 pm | चतुरंग
ऐन गणपतीत तुला 'तळलेलं बदक' वगैरे आठवतंय?? चीनवरचा एखादा लेख वाचलास की नॅशनल जियॉग्राफिकची डोक्यूमेंटरी बघितलीस चीनवरची?? तुझ्या पाठीत सोंडेनं धपाटा घातला मेल्या!! ;)
(छळणारे मोदक)चतुरंग
13 Sep 2010 - 11:17 pm | धमाल मुलगा
काय करता, नुसतं गोग्गोड खाऊन खाऊन तोंडालाच काय पण विचारांनाही मिठीच बसल्यासारखं वाटतंय.
>>चीनवरचा एखादा लेख वाचलास की नॅशनल जियॉग्राफिकची डोक्यूमेंटरी बघितलीस चीनवरची??
आयला! चीनमध्ये बदकं हादडतात होय? लै भारी लागतं राव बदक. आमच्या एका किरिस्ताव मित्राच्या आईनं खाऊ घातलं होतं एका ख्रिसमसच्यावेळी...
>>तुझ्या पाठीत सोंडेनं धपाटा घातला मेल्या!!
=)) =)) =)) गंपती बाप्पा फ्रेंचकट दाढी ठेऊन फिरताना कसा दिसेल असा विचार करुन फुटलो ना राव. =))
>>(छळणारे मोदक)
सुद्दलेकन चुकतंय.... ;)
13 Sep 2010 - 10:12 pm | अनामिक
तळलेले मोदक छानच लागतात. मी परवा सारण तयार करताना खोबरं, सुकामेवा, साखर, दूध मिसळून तुपात भाजून घेतले, मग त्यात मँगो पल्प घालून परत आटवून घेतले. पारी साठी फक्तं रवा दुधामधे भिजवला, आणि मोदल शुद्ध तुपात तळले. मँगोयुक्त सारणाचे तळलेलेल मोदक लै म्हणजे लै भारी लागले! बाप्पा नक्कीच खूश झाले असणार!
14 Sep 2010 - 7:23 pm | मनि२७
@ धमाल मुलगा..
श्रावण संपलाय...मारा कि हात मग बदकावर....
पण बदक आणि तेही तळलेले ??????
:-)
14 Sep 2010 - 7:59 pm | धमाल मुलगा
हा हा हा...
तोच तर गोंधळ झाला ना! :)