मानेचे व्यायाम करा, मानेचे व्ययाम करताना मान पुढे वाकवु नका. जाड उशी न वापरता दोन मऊ उश्या वापरा. त्या पायरी प्रमाणे एकावर एक ठेवा.
एवढ्याने बर्यापैकी आराम मिळेल.
मानेचे व्यायाम डॉक्टरांनी सांगितले असतिलच ,नसल्यास एखाद्या फिजिशियनचा सल्ला घ्या. अथवा स्पोर्टस मेडिसिनवाल्या एखाद्या व्यक्तीला भेटा.
पुण्यात डॉ. राजीव शारङ्गपाणी म्हणून आहेत. कोणतेही वेदनाशामक औषध न देता फक्त व्यायाम करून ते स्पाँडिलायसिस बरा करतात. पुणेरी उध्दटपणा आणि तापटपणा यांचा अर्क असावेत अशा रीतीने ते रुग्णांशी बोलतात, पण गुण हमखास येतो. पत्ता-दूरध्वनी वगैरे माहिती येथे मिळेल.
हेच सुचवणार होतो.
शहाणा माणूस आहे. त्यांना मी भेटलोय, बोललोय.
परखड आणि थेट आहेत बोलायला, जवळजवळ अपमानास्पद वाटेल इतके. परंतु रुग्णाच्या हिताचेच सांगतात.
भावना बाजूला ठेवून शांत डोक्याने ऐकले तर त्यांचे म्हणणे योग्य असल्याचे जाणवते.
व्यायामाने आणि फिजिओथेरपीने स्पॉण्डेलायसिसवर निश्चित उपचार करु शकतील असे वाटते.
(डॉ.कडे अपवादात्म दिसणारी अशी त्यांची स्वतःची तब्बेत सुद्धा उत्कृष्ठ आहे एखाद्या अॅथलीटसारखी! ;) )
जागुताई तुम्ही डॉ.श्रिधर चिपळूणकर यांना भेटा..
शारंगपाण्याच्या १८० डिग्री उलटा माणूस आहे..स्वानुभव आहे.. त्यांच्याशी नुसते बोलण्याने निम्मा त्रास कमी होतो..३० सेकदांचे अतिशय सोपे सोपे व्यायाम शिकवतात.. http://www.beproactive.in/contactus.htm
पुण्यात डॉक्टर करंदिकर आहेत. ते व्यायाम करून ते स्पाँडिलायसिस तसेच मणक्याचे दुखने बरे करतात. त्यांचा दवाखना कबीर बागेत (नारयण पेठ, माती गणपति जवळ) आहे. वेळ सायंकाळी ७ ते ९.
होमिओपॅथिसाठि डॉक्टर अरुण महाजन - पाटिल आर्केड कर्वे रोड.
वर उपाय सांगितले आहेतच.शिवाय-
१)संगणकासंबधीत काम असेल तर पाठ पूर्ण टेकेल अशी खुर्ची हवी.
२)दर ३०-४५ मिनिटांनी मान दोन्ही बाजुंना ९० अंशात वळवणे.
३)दर एक तासाने हाताच्या मुठी गोलाकार फिरवणे.(repeatated strain injury) साठी योग्य.
डॉ. राजीव शारङ्गपाणी याम्चे कडे जाताना जर वेदनासशामक गोळ्या घेत असाल तर त्या दिवशेी गोळ्या न घेता जा..नाहितर ते तपासत नाहि..(त्या दिवशी म्हनजे ज्या दिवशी तपासायला जाताल तो दिवस*)
डॉ. करंदीकर आहेत पुण्यात किंवा ईतर डॉ. ही ...पण ऊशी न घेता,चटईवर किंवा थेट जमीनीवर (माती चालेल , पण टाईल्स फक्त ऊन्हाळ्यात) दिवसातुन एखादा तासभर पहुडल तरी फरक पडतो .........
तुम्ही मुंबईत असाल तर माटुंगा (पूर्व) येथे महेश्वरी उद्यानाच्या अगदी जवळच श्री. जेकब नावाचे नावाजलेले फिजीयोथेरापिस्ट आहेत. माझ्यासकट घरातील व परिचयातील अनेकांना त्यांच्या उपचारामुळे चांगला गुण आलेला आहे. पत्ता हवा असल्यास कृपया व्य. नि. करावा.
स्पॉन्डीलिसिसवर हमखास उपचार बाबु म्हस्के करतात.ते सध्या अहमदाबाद येथे राहतात.उपचार फक्त तुमच्या मानेला दोन--तीन दिवस हात लावणार,अनेकांचे पट्टे गेले आहेत ,कोणतीही फि नाही .विश्वास ठेवणे न ठेवणे आपल्या हाती.अत्यंत प्रामाणीकपणे उपचार होतात.खात्री करून घ्या
स्पॉन्डीलिसिस या आजारात मणक्यात गॅप पडणे ही सामाविष्ट होते काय? नसेल तरीही वरील घरगुती उपाय लागू होतील काय?
अवांतर: मिपा व्यवस्थापकांना मागेच विनंती केली होती की आजारपणासाठी/ औषोधोपचारासाठी एक वेगळी टॅब पाहीजे. ती मागणी पुन्हा उचलून धरतोय.
डॉक्टरकडे जाण्याखेरीज सुचवले गेलेले उपाय हे सप्लिमेंटरी समजावे डॉक्टरकडे जाण्याला पर्याय समजू नयेत. शिवाय ते करण्यापूर्वी त्या डॉक्टरांकडून अॅप्रूव करून घ्यावे.
शिवाय ते करण्यापूर्वी त्या डॉक्टरांकडून अॅप्रूव करून घ्यावे.
बरेचसे डॉक्टर असल्या विषयांवर मौन धारण करतात् आणि विषय बदलु पाहतात.घरगुती/आयुर्वेदिक उपचारांकडे तुछ्छ्तेने बघण्याचा(जेणेकरुन आपला व्यवसाय भरभराटीस येईल) बर्याच डॉक्टरांचा दृष्टिकोन असतो.
मणक्यांच्या मधून बाहेर पडणार्या चेतासमूहावर अवाजवी दाब आल्याने हाताला, पायाला किंवा शरीराच्या इतर भागाला मुंग्या येणे, बधीरता येणे म्हणजे स्पाँडिलायसिस/स्पाँडिलोसिस. ऑस्टिओआर्थ्रायटिसचाच हा एक प्रकार आहे.
प्रतिक्रिया
13 Sep 2010 - 3:12 pm | नेहरिन
मानेचे व्यायाम करा, मानेचे व्ययाम करताना मान पुढे वाकवु नका. जाड उशी न वापरता दोन मऊ उश्या वापरा. त्या पायरी प्रमाणे एकावर एक ठेवा.
एवढ्याने बर्यापैकी आराम मिळेल.
मानेचे व्यायाम डॉक्टरांनी सांगितले असतिलच ,नसल्यास एखाद्या फिजिशियनचा सल्ला घ्या. अथवा स्पोर्टस मेडिसिनवाल्या एखाद्या व्यक्तीला भेटा.
होमिओपॅथि यासाठि खूपच उपयोगी आहे.
13 Sep 2010 - 3:14 pm | जागु
नेहरिन धन्यवाद.
मानेच्या मणक्यातुन हात लावल्यावर कट कट असा आवाज येतो आणि हाताच्या बोटाला मुंग्या येउन हात पण दुखत आहे. हे जास्त प्रमाणात आहे का ?
13 Sep 2010 - 3:27 pm | चिंतातुर जंतू
पुण्यात डॉ. राजीव शारङ्गपाणी म्हणून आहेत. कोणतेही वेदनाशामक औषध न देता फक्त व्यायाम करून ते स्पाँडिलायसिस बरा करतात. पुणेरी उध्दटपणा आणि तापटपणा यांचा अर्क असावेत अशा रीतीने ते रुग्णांशी बोलतात, पण गुण हमखास येतो. पत्ता-दूरध्वनी वगैरे माहिती येथे मिळेल.
13 Sep 2010 - 5:34 pm | चतुरंग
हेच सुचवणार होतो.
शहाणा माणूस आहे. त्यांना मी भेटलोय, बोललोय.
परखड आणि थेट आहेत बोलायला, जवळजवळ अपमानास्पद वाटेल इतके. परंतु रुग्णाच्या हिताचेच सांगतात.
भावना बाजूला ठेवून शांत डोक्याने ऐकले तर त्यांचे म्हणणे योग्य असल्याचे जाणवते.
व्यायामाने आणि फिजिओथेरपीने स्पॉण्डेलायसिसवर निश्चित उपचार करु शकतील असे वाटते.
(डॉ.कडे अपवादात्म दिसणारी अशी त्यांची स्वतःची तब्बेत सुद्धा उत्कृष्ठ आहे एखाद्या अॅथलीटसारखी! ;) )
14 Sep 2010 - 11:18 am | केशवसुमार
जागुताई तुम्ही डॉ.श्रिधर चिपळूणकर यांना भेटा..
शारंगपाण्याच्या १८० डिग्री उलटा माणूस आहे..स्वानुभव आहे.. त्यांच्याशी नुसते बोलण्याने निम्मा त्रास कमी होतो..३० सेकदांचे अतिशय सोपे सोपे व्यायाम शिकवतात..
http://www.beproactive.in/contactus.htm
13 Sep 2010 - 3:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
डॉक्टरकडे जाण्यास बायपास नाहीच. पण नेहेमी मान जर खालच्या दिशेत असेल तर वरच्या दिशेत किंवा समपातळीत राहिल अशी तुमच्या बसण्याची, कामाची सोय करा.
13 Sep 2010 - 3:38 pm | जागु
चिंतातुर, आदिती धन्स. हा त्रास माझ्या मिस्टरांना झालाय. डॉ. ने पट्टा दिला आहे लावायला. पण अजुन हात दुखत आहे ३ दिवस झाले तरि.
13 Sep 2010 - 4:19 pm | श्रीकान्त ताकवले
पुण्यात डॉक्टर करंदिकर आहेत. ते व्यायाम करून ते स्पाँडिलायसिस तसेच मणक्याचे दुखने बरे करतात. त्यांचा दवाखना कबीर बागेत (नारयण पेठ, माती गणपति जवळ) आहे. वेळ सायंकाळी ७ ते ९.
होमिओपॅथिसाठि डॉक्टर अरुण महाजन - पाटिल आर्केड कर्वे रोड.
13 Sep 2010 - 5:57 pm | जयंत कुलकर्णी
नमस्कार !
मला हा अनुभव आलेला आहे. तुमच्या नवर्याला हा उपयोगी पडेलच याची खात्री नाही. पण करून बघायला हरकत नाही कारण याचे काहिच साईड एप्फेक्टस नाहीत,
१ सतरंजी वर किंवा चटईवर झोपणे. उशी न घेता पाठीवर. मला स्वतःला ( broad shouldered) कुशीवर झोपायची सवय असल्यामुळे हे फार जड गेले पण सवय होते.
2 पोहणे : याने मला फारच म्हणजे फारच फरक पडला. पाठीवर जास्त पोहणे व तरंगणे.
बघा करून ! मी हे ६/७ महिने केले त्यानंतर अजूनतरी डॉ. कडे जायला लागलेले नाही. आणि आता पोहणेही बंद आहे.
जयंत कुलकर्णी.
13 Sep 2010 - 6:33 pm | चिरोटा
वर उपाय सांगितले आहेतच.शिवाय-
१)संगणकासंबधीत काम असेल तर पाठ पूर्ण टेकेल अशी खुर्ची हवी.
२)दर ३०-४५ मिनिटांनी मान दोन्ही बाजुंना ९० अंशात वळवणे.
३)दर एक तासाने हाताच्या मुठी गोलाकार फिरवणे.(repeatated strain injury) साठी योग्य.
13 Sep 2010 - 6:59 pm | अविनाशकुलकर्णी
डॉ. राजीव शारङ्गपाणी याम्चे कडे जाताना जर वेदनासशामक गोळ्या घेत असाल तर त्या दिवशेी गोळ्या न घेता जा..नाहितर ते तपासत नाहि..(त्या दिवशी म्हनजे ज्या दिवशी तपासायला जाताल तो दिवस*)
अनुभवि
13 Sep 2010 - 7:09 pm | सुहास..
अरेरे . जागुताई घरीच ईश्यु झालाय का ?
डॉ. करंदीकर आहेत पुण्यात किंवा ईतर डॉ. ही ...पण ऊशी न घेता,चटईवर किंवा थेट जमीनीवर (माती चालेल , पण टाईल्स फक्त ऊन्हाळ्यात) दिवसातुन एखादा तासभर पहुडल तरी फरक पडतो .........
बाकी ..बहीणीच्या यातनेत सहभागी आहोत..
13 Sep 2010 - 7:23 pm | अविनाशकुलकर्णी
हा प्रयत्न करुन बघा
/////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////
13 Sep 2010 - 7:31 pm | अविनाशकुलकर्णी
http://lh3.ggpht.com/_e1WTPhGfnMU/TI4r_cmr4xI/AAAAAAAACCs/e9CvP_oX5Dc/s8...
13 Sep 2010 - 7:27 pm | अविनाशकुलकर्णी
13 Sep 2010 - 7:27 pm | अविनाशकुलकर्णी
13 Sep 2010 - 7:29 pm | अविनाशकुलकर्णी
13 Sep 2010 - 7:29 pm | अविनाशकुलकर्णी
13 Sep 2010 - 7:38 pm | प्रदीप
तुम्ही मुंबईत असाल तर माटुंगा (पूर्व) येथे महेश्वरी उद्यानाच्या अगदी जवळच श्री. जेकब नावाचे नावाजलेले फिजीयोथेरापिस्ट आहेत. माझ्यासकट घरातील व परिचयातील अनेकांना त्यांच्या उपचारामुळे चांगला गुण आलेला आहे. पत्ता हवा असल्यास कृपया व्य. नि. करावा.
13 Sep 2010 - 9:40 pm | सुनिल पाटकर
स्पॉन्डीलिसिसवर हमखास उपचार बाबु म्हस्के करतात.ते सध्या अहमदाबाद येथे राहतात.उपचार फक्त तुमच्या मानेला दोन--तीन दिवस हात लावणार,अनेकांचे पट्टे गेले आहेत ,कोणतीही फि नाही .विश्वास ठेवणे न ठेवणे आपल्या हाती.अत्यंत प्रामाणीकपणे उपचार होतात.खात्री करून घ्या
14 Sep 2010 - 2:43 am | चतुरंग
नेमके काय करतात मानेला हात लावून? त्यांच्या उपचाराने बरे झालेले कोणी आपल्या माहितीचे आहे का?
वैद्यकीय उपचाराविना/व्यायाम/फिजिओथेरपीविना ह्यातून बरे झालेले माझ्या बघण्यात तरी कोणी नाही म्हणून विचारतोय.
14 Sep 2010 - 2:30 am | पाषाणभेद
स्पॉन्डीलिसिस या आजारात मणक्यात गॅप पडणे ही सामाविष्ट होते काय? नसेल तरीही वरील घरगुती उपाय लागू होतील काय?
अवांतर: मिपा व्यवस्थापकांना मागेच विनंती केली होती की आजारपणासाठी/ औषोधोपचारासाठी एक वेगळी टॅब पाहीजे. ती मागणी पुन्हा उचलून धरतोय.
सदस्यांनो तुमचे अनुमोदन आहे काय?
14 Sep 2010 - 6:29 am | सहज
आजारपणासाठी/ औषोधोपचारासाठी एक वेगळी टॅब पाहीजे. ती मागणी पुन्हा उचलून धरतोय.
सदस्यांनो तुमचे अनुमोदन आहे काय?
अनुमोदन आहे.
14 Sep 2010 - 7:15 am | मदनबाण
अनुमोदन आहे.
27 Jul 2012 - 5:27 pm | मन१
अनुमोदन आहे.
प्रासंगिक्/चौकशी हा एक आणि आरोग्यविषयक अस्से दोन स्वतंत्र विभाग असले तर बरं होइल.
14 Sep 2010 - 9:50 am | नितिन थत्ते
डॉक्टरकडे जाण्याखेरीज सुचवले गेलेले उपाय हे सप्लिमेंटरी समजावे डॉक्टरकडे जाण्याला पर्याय समजू नयेत. शिवाय ते करण्यापूर्वी त्या डॉक्टरांकडून अॅप्रूव करून घ्यावे.
14 Sep 2010 - 11:34 am | चिरोटा
बरेचसे डॉक्टर असल्या विषयांवर मौन धारण करतात् आणि विषय बदलु पाहतात.घरगुती/आयुर्वेदिक उपचारांकडे तुछ्छ्तेने बघण्याचा(जेणेकरुन आपला व्यवसाय भरभराटीस येईल) बर्याच डॉक्टरांचा दृष्टिकोन असतो.
14 Sep 2010 - 10:54 am | प्राजक्ता पवार
आजारपणासाठी/ औषोधोपचारासाठी एक वेगळी टॅब पाहीजे. ती मागणी पुन्हा उचलून धरतोय.
-अनुमोदन आहे.
नितिन यांच्या प्रतीसादाशी सहमत.
14 Sep 2010 - 10:13 pm | सुनील
ट्रॅक्शन हा प्रकार नक्की काय आहे? त्याचा उपयोग होतो असे ऐकून आहे.
14 Sep 2010 - 10:40 pm | चतुरंग
मणक्यांच्या मधून बाहेर पडणार्या चेतासमूहावर अवाजवी दाब आल्याने हाताला, पायाला किंवा शरीराच्या इतर भागाला मुंग्या येणे, बधीरता येणे म्हणजे स्पाँडिलायसिस/स्पाँडिलोसिस. ऑस्टिओआर्थ्रायटिसचाच हा एक प्रकार आहे.
मणक्यातले अंतर पूर्ववत करण्यासाठी मानेला कॉलर लावून त्याला पुलीमार्फत ठराविक वजन लावून काही काळ ओढ द्यायची अशी ही ट्रीट्मेंट आहे. ह्याला ट्रॅक्शन म्हणतात.
http://www.wisdomking.com/product/overdoor-cervical-traction-set
हा दुवा बघा.
चतुरंग
14 Sep 2010 - 10:49 pm | सुनील
धन्यवाद! चांगली माहिती.
26 Jul 2012 - 4:02 pm | इरसाल
सदासर्वकाळ कॉम्पुटर ला चिकटुन बसलेल्यांसाठी अतिशय उपयुक्त.
26 Jul 2012 - 11:11 pm | आनंदी गोपाळ
उत्तरः नाही.