खारे शंकरपाळे

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
11 May 2008 - 6:09 pm

आमचे जर्मन आजी आजोबा शंकरपाळ्यांचे दिवाने आहेत.त्यांच्या मते वाईन बरोबर शंकरपाळे ए वन काँबिनेशन!
आजोबा दर वसंतात त्यांच्या ५,६ जिवलग मित्रांबरोबर एखादा आठवडा कुठेतरी सहलीला जातात. ह्या सहलीला फक्त आजोबा मंडळीच असतात हं , (आजी मंडळी त्यांची वेगळी सहल वेगळ्या वेळी काढतात).
तर ह्या 'आजोबा स्पेशल' सहलीचे नाव.."रोट वाईन टूअर"! अर्थात रेड वाईन शिवाय ही सहल 'सुफल संप्रूण' होत नाही. आणि त्यामुळेच ह्या सहलीसाठी खारे शंकरपाळे कर अशी आजोबांची फर्माईश असतेच असते.
हे खारे शंकरपाळे खास त्यांची फर्माईश म्हणून केले होते.

साहित्य-१वाटी रवा,१ वाटी मैदा,१/४वाटी डाळीचं पीठ,
२ टेबल स्पून तूप किवा ३ टेबल स्पून तेलाचे मोहन(म्हणजेच तेल गरम करुन)
१/२ वाटी दही घुसळून,तिखट,मीठ,ओवा,जिरे प्रत्येकी १चहाचा चमचा
तळणीसाठी तेल
कृती-मैदा,रवा,डाळीचे पीठ एकत्र करा,त्यात तिखट,मीठ,ओवा,जिरे घाला व नीट मिसळून घ्या.तूप फेसून त्यात घाला किवा तेलाचे मोहन घाला,घुसळलेले दही घाला व कमीतकमी पाणी घालून घट्ट भिजवा.१०/१५ मिनिटे झाकून ठेवा.पोळ्या जरा जाड लाटून शंकरपाळे कापा,तळा.

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

11 May 2008 - 8:42 pm | मदनबाण

अत्ता पर्यंत फक्त गोड शंकरपाळे खाल्ले आहेत.. शंकरपाळे कापुन देणे हे तर माझे आवडीचे काम,आमच्या मातोश्रींना सांगतो आता खारे शंकरपाळे करायला.....

(फराळ प्रेमी)
मदनबाण.....

देवदत्त's picture

11 May 2008 - 10:05 pm | देवदत्त

शंकरपाळे कापुन देणे हे तर माझे आवडीचे काम..
अरे बापरे...
मी ७वीत असताना आई वडील दिवाळीच्यावेळी बाहेर गेले होते. तेव्हा मी आणि बहिणीने शंकरपाळे बनवायचा प्रयत्न केला. पीठात काय काय टाकले ते आठवत नाही. पण ऐकून माहित होते की शंकरपाळ्याचे पीठ चिवट असते. आम्ही बनविलेले ते पीठ असे चिवट होते की पोळी लाटल्या लाटल्या ती लहान होऊन जाई. त्यामुळे मग कापण्यासाठी मी ते दोन्ही हातांनी पकडून ठेवले होते :D

स्वाती राजेश's picture

11 May 2008 - 9:13 pm | स्वाती राजेश

मस्त रेसिपी आहे.
चहा बरोबर खायला काहीतरी चटपटीत...
प्रवासात बरोबर न्यायला सुद्धा मस्त.

यशोधरा's picture

11 May 2008 - 9:18 pm | यशोधरा

अरे वा!! मजा आहे की जर्मन आजोबा लोकांची!! :)
माझी आज्जी करायची हे शंकरपाळे. कसले मस्त असतात चवीला!! कित्ती दिवसांत खाल्ले नाहीत... आता मधे घरी गेले तर आईला सांगेन बनवायला :) नाहीतर स्वातीताई, तुम्हांला माझा पत्ता इमेल करुन कळवू का?? ;) :)

स्वाती दिनेश's picture

12 May 2008 - 6:59 pm | स्वाती दिनेश

दे की..नाहीतर ये इकडे फ्राफुला :)

मन's picture

11 May 2008 - 9:39 pm | मन

मस्त रेसिपी आहे स्वाती दिदि.
पुढला युरोप मिपाचा कट्टा जर्मनीलाच ठेउयात....

जर मनी वसे तर
जरमनी दिसे!
(जर्मनी दिसे!!)

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

स्वाती दिनेश's picture

12 May 2008 - 7:00 pm | स्वाती दिनेश

मना...कधीही ये जर्मनीला..तसेही मनाला कधीही,कुठेही जाता येतेच.:)

देवदत्त's picture

11 May 2008 - 10:06 pm | देवदत्त

खारे शंकरपाळे खाल्ल्यासारखे वाटतात कुठेतरी.
घरी करावयास सांगतो. :)

विसोबा खेचर's picture

12 May 2008 - 12:03 am | विसोबा खेचर

वा वा! खारे शंकरपाळे सुंदर झाले आहेत गं स्वाती! :)

फोटूही झकास...

तात्या.

अन्जलि's picture

12 May 2008 - 1:54 pm | अन्जलि

ए हे काय नुस्ते फोतो बघुन तोद्दाला पानि सुत्ते त्याचे काय कराय्चे? गरम गरम जिलेबि, शकर्पालि ई. कोनि उपाय सगाल का?

स्वाती दिनेश's picture

12 May 2008 - 4:26 pm | स्वाती दिनेश

गरम गरम जिलेबि, शकर्पालि ई. कोनि उपाय सगाल का?
उपाय-करुन पहा,दोन्हीच्या रेसिपी मिपावर आल्या आहेत,:)

मनस्वी's picture

12 May 2008 - 4:46 pm | मनस्वी

रेसिपी आवडली स्वातीताई.

वरदा's picture

12 May 2008 - 5:42 pm | वरदा

मी त्यात हळद पण घालते..रवा कमी घालते मग पीठ कमी मळायला लागतं आणि दही कधी घालुन नाही पाहिलं पाण्यातच भिजवते..आता पुन्हा करताना दही नक्की घालून पहाते...

गृहिणि's picture

12 May 2008 - 9:58 pm | गृहिणि

धन्यवाद स्वाति,

कालच आम्हि एका इथिओपिअन जोडप्याला चहाला बोलावल होत. त्याना काय आवडेल असा प्रश्न पडला होता. आम्हि शाकाहारि असल्यामुळे हा प्रश्न अश्यावेळि खुपच गहन होवुन जातो. हे शंकरपाळे बघित्लेत आणि तेच करायच ठरवल. त्याना खुप आवडलेत. मी तिखटाऐवजि मिरेपुड घातलि होति. तिहि चव चांगलि लागलि.

वरदा दहि जरूर घालुन बघ. एक वेगळिच (छानशि) चव येते. तु किति घेतेस रवा आणि मैद्याच प्रमाण?

वरदा's picture

12 May 2008 - 10:20 pm | वरदा

आळशी आहे मी एक वाटी मैद्याला १ मोठा चमचा रवा घेते..... =P~

॥ सेनापती ॥'s picture

10 Nov 2012 - 7:57 pm | ॥ सेनापती ॥

आज करून बघतो. :) दिवाळीत फार गोड खाउन कंटाळा येतो. तेंव्हा हे असे काहीतरी खायला बरे वाटते. :)

चार वर्षांपूर्वीचा धागा योग्य वेळी वर आणल्याबद्दल धन्यवाद, सेनापती! आजच करून बघणार आहे.

॥ सेनापती ॥'s picture

11 Nov 2012 - 1:09 am | ॥ सेनापती ॥

वर दिलेल्या प्रमाणात मैदा थोडा जास्त घालावा लागला. :) एकदम खुसखुशीत झालेत. :)

स्वाती दिनेश's picture

11 Nov 2012 - 3:12 pm | स्वाती दिनेश

ही अजून एक पाकृ खार्‍या शंकरपाळ्यांची
स्वाती

रमेश आठवले's picture

11 Nov 2012 - 7:26 am | रमेश आठवले

शंकरपाळे हा शब्द मूळ हिंदी शब्द शक्करपारे यावरून आला आहे असे वाटते. उत्तर हिंदुस्तानात हाच पदार्थ साखरेच्या जागी मीठ घालूनहि करतात व त्याला नमकपारे असे म्हणतात.
आपल्याकडे नमकपार्यासाठी खारे शंकरपाळे हा शब्द प्रचलित झाला आहे.