खमण ढोकळा

प्राजक्ता पवार's picture
प्राजक्ता पवार in पाककृती
8 Sep 2010 - 10:48 pm

साहित्य : डाळीचे पीठ - २ वाट्या
बारीक रवा - पाव वाटी
हिरवी मिरची,आले , लसुण यांचे वाटण - २ चमचे
मीठ
साखर - १/२ चमचा
तेल - २ चमचे
लिंबाचा रस - २ चमचे
खायचा सोडा - १/२ चमचा

फोडणी - तेल , मोहरी, कढीपत्ता , कोथिंबीर

- डाळीचे पीठ , रवा , हिरवे वाटण , मीठ , साखर ,लिंबाचा रस एकत्र करावे. त्यात तेल व गरजेनुसार पाणी घालुन जाडसर असे पीठ भिजवावे.हे मिश्रण अर्धा तास तसेच राहु द्यावे. नंतर त्यात खायचा सोडा घालुन एकत्र करावे.
तेल लावलेल्या थाळीमध्ये हे मिश्रण घालुन एकसारखे पसरावे व कुकरमध्ये १५ मिनीटे वाफवुन घ्यावे.
थंड झाल्यावर तुकडे कापुन घ्यावेत. तेल ,मोहरी , कढीपत्ता यांची फोडणी वरुन घालावी.
कोथिंबीर व ओले खोबरे घालुन सर्व्ह करावे.

प्रतिक्रिया

हायला एवढं सोप्पंय होय ढोकळा करणं.. सह्हीच!

फोटो दिसत नाहीये.

हा घ्या..

पैसा's picture

8 Sep 2010 - 11:15 pm | पैसा

पाकृ सोपी आणि छान. पण फोटू instant कुठे मिळाला?

मेघवेडा's picture

9 Sep 2010 - 1:24 pm | मेघवेडा

फोटो असतातच हो.. फक्त ते शोधावे लागतात! :D
परा, आता इथे अन्नपूर्णा मंडळाने आम्हा ब्याचलर लोकांवर अन्याव कराचं ठरवलंच आहे म्हटल्यावर आता काय आनि.. ;)
पण येऊ द्या अजून.. निदान फोटोंवर तरी समाधान मानू.. तुका म्हणे त्यातल्या त्यात.

असुर's picture

9 Sep 2010 - 4:08 pm | असुर

वा! ढोकळा! लैच मस्त की!

दर येळी णीसेद करुन थकलो राव आता! आना तो ढोकळा खातो मी!

या मिळून सार्‍याजणी काय काय अवघड पाककृती टाकत राहतात, पण आमंत्रणाचे एक साधे सोप्पे वाक्य लिहित नाहीत. समस्त मिपा ब्याचलर मंडळातर्फे तमाम अन्नपूर्णातैंचा णीसेद!

पाकॄबरोबर त्याचे फॉटू आणि आमंत्रण नसेल तर दर वेळी प्रतिसादात णिसेद करण्यात यावा असे एक पत्रक आज जारी करीत आहोत. इच्छुकांनी लाभ घ्यावा!

--असुर
जॉईंट सेक्रेटरी,
समस्त मिपा ब्याचलर मंडळ

विलासराव's picture

9 Sep 2010 - 9:32 pm | विलासराव

निशेध णिषेध.

चिंतामणी's picture

9 Sep 2010 - 11:58 pm | चिंतामणी

परा, आता इथे अन्नपूर्णा मंडळाने आम्हा ब्याचलर लोकांवर अन्याव कराचं ठरवलंच आहे

परा ची स्थिती काय?

(मंडळ खुलासा करु इच्छिते. परिस्थीतीला मराठीत stauts असे म्हणतात)

परिकथेतील राजकुमार's picture

10 Sep 2010 - 11:12 am | परिकथेतील राजकुमार

परा ची स्थिती काय?

हम अविवाहीत है लेकीन ब्रम्हचारी नही है !

पराबिहारी वाजपेयी

सुनील's picture

8 Sep 2010 - 11:02 pm | सुनील

प्राजक्तातै मिपावर पाकृत फोटो मस्ट असतो बर्रका!! (इतर लेखन प्रकारातदेखिल चालतो म्हणा!) पण पाकृत पाहिजेच!

पाकृ छान.

सहसा खमण ढोकळा हा जोडशब्द, हा एकच पदार्थ असल्याच्या आभास निर्माण करतो. वास्तविक हे दोन वेगळे पदार्थ आहेत. बेसनापासून बनवतात तो खमण (पिवळा) आणि तांदूळ + उडीद डाळ यांच्यापासून बनवतात तो ढोकळा (पांढरा)

प्राजक्ता पवार's picture

8 Sep 2010 - 11:11 pm | प्राजक्ता पवार

मी फोटो टाकला होता पण दिसत नव्हता. तोच फोटो मेघवेडा यांनी कसा आणला. काही कळत नाही. अळुवडीच्या पाकृ मध्ये देखील असेच झाले होते.

सुनील's picture

8 Sep 2010 - 11:14 pm | सुनील

त्यांच्याकडे पाशवी शक्ती असावी!

पैसा's picture

8 Sep 2010 - 11:22 pm | पैसा

नक्कीच! तुम्हाला माहिती नाही? कोकणातले आहेत ते!

प्रीत-मोहर's picture

9 Sep 2010 - 2:41 pm | प्रीत-मोहर

तुका गो कोणी सांग्ल्यान?

हैसर नव्या रेशिप्या ईल्यार सगळ्या मुंज्यांच्या पाशवी शक्त्या जागृत होतंत !!
पाशवी लिवला काय ?? नाय नाय मायावी !!
पाशवी शक्त्या चेटकीणींसाठी रिझर्व हत !!

सुनील's picture

9 Sep 2010 - 8:55 pm | सुनील

प्रश्न गोमंतकीय कोंकणीत असा मूं? उत्तर त्याच भाशेत दी. मालवणीत न्हय. न येता जाल्यार प्रमाण मराठी चालता. कळ्ळँ?

माका काय ता म्हायत नाय!! माका जमला ता लिवला.

पैसा's picture

9 Sep 2010 - 9:48 pm | पैसा

पाशवी शक्तीन!

छान पाकृ!
मगाशी येउन गेले धाग्यावर पण फटू नव्हता......

मदनबाण's picture

9 Sep 2010 - 8:57 am | मदनबाण

वा... :)

नेहरिन's picture

9 Sep 2010 - 9:38 am | नेहरिन

ढोकळा मस्तच, सोड्याच्या ऐवजी इनो घातला तर चालेल का???कारण प्रत्येक वेळी खायचा सोडा चांगला मिळतोच असे नाहि.

सुनील's picture

9 Sep 2010 - 10:18 am | सुनील

सोड्याच्या ऐवजी इनो घातला तर चालेल का???
हो, नक्की चालतो. मिपावर अनेकांना त्याची जरुरी आहे!

नेहरिन's picture

9 Sep 2010 - 9:42 am | नेहरिन

"मुगाच्या डाळीचा ढोकळा" करतेस का ??? तो पण खूप छान होतो. करत नसलीस तर सांग रेसिपी उद्या देइन.

रेसिपी इथे पहा.ही लिन्क घ्या.
http://www.vahrehvah.com/

परिकथेतील राजकुमार's picture

9 Sep 2010 - 11:58 am | परिकथेतील राजकुमार

वाह वाह वाह !
सकाळ सकाळ असे काही बघितले की आम्हाला स्वर्गसुख मिळते.

फोटु टाकायला परत जमले नाही का काय ? ;) साला मेव्यानी सगळ्यांच्या आधी फोटु बघितला म्हणजे त्याला सगळ्यात आधी जळजळ झाली असणार हे पाहुन आनंद झाला.

मि बरयाच वेळा प्रयत्न केला ढोकळा बनवायचा पण कधिच चागला फुलत नाही

भानस's picture

9 Sep 2010 - 9:08 pm | भानस

थोडासा ओलसर, स्पाँजी मस्तच दिसतोय गं. :)

स्पंदना's picture

10 Sep 2010 - 8:43 pm | स्पंदना

मला कधीही न जमलेला पदार्थ्---ढोकळा!
आता परत एकदा घरच्यांची कम्बख्ती!! नविन प्रकारे , नविन प्रकारे म्हणुन आणि एकदा ट्राय करायलाच पाहिजे नाही का?