आईचे, बापाचे, मित्रांचे, बायकांचे त्यांच्या जिवंतपणी आम्ही दिवस घालत नाही.
कोणाचे प्रेम दाखवून द्यायचे असेल तर, मी ते 'वेळोवेळी', गरज असेल तेव्हा, तिथल्यातिथेच दाखवून देतो. एखाद्या विशिष्ट दिवसाची गरज वाटत नाही. मला कोणताही दिवस चालतो.
हलके घ्यालच :
आई वडिलांना पायातील वाहन बनविण्यासाठी अंगावरचे कातडे देखील काढून देईन, पण सध्या माझे आई-वडील एका नामांकित कंपनीचे जोडे वापरतात. त्यामुळे तूर्तास अंगावरची कातडी बचावून आहे. बरं मी जर का आज आईला, मला जन्म दिला म्हणून शुभेच्छा वगेरे द्यायला गेलो तर आईकडूनच एक सणसणीत कानाखाली बसेल.
प्रतिक्रिया
8 Sep 2010 - 10:10 pm | असुर
अनुमोदनाचा प्रतिसाद!
--(२) असुर
8 Sep 2010 - 10:14 pm | सुनील
मदर्स डे मे महिन्यात होऊन गेला की? हा कुठला (अनधिकृत) मदर्स डे?
सुचना - अनधिकृत हे विशेषण डेचे आहे, मदर्सचे नाही!
8 Sep 2010 - 10:16 pm | प्रियाली
आज पिठोरी अमावास्या असावी. मी कॅलेंडर चेक केलेले नाही.
त्यानुसार आज मातृदिन आहे.
असो. आमच्या मातोश्रींना शुभेच्छा.
8 Sep 2010 - 10:23 pm | सुनील
अस्सं होय? मग सरळ मातृ दिन म्हणावं की? नको तिथे भाषांतर कशाला?
8 Sep 2010 - 10:27 pm | शुचि
होय होय कालच मी वाचत होते . आज पीठाच्या सप्तमातृका बनवतात वगैरे माहीती आहे आंतरजालावर उपलब्ध. आज दुर्गेची देखील पूजा करतात वाटतं.
9 Sep 2010 - 5:49 am | गांधीवादी
आईचे, बापाचे, मित्रांचे, बायकांचे त्यांच्या जिवंतपणी आम्ही दिवस घालत नाही.
कोणाचे प्रेम दाखवून द्यायचे असेल तर, मी ते 'वेळोवेळी', गरज असेल तेव्हा, तिथल्यातिथेच दाखवून देतो. एखाद्या विशिष्ट दिवसाची गरज वाटत नाही. मला कोणताही दिवस चालतो.
हलके घ्यालच :
आई वडिलांना पायातील वाहन बनविण्यासाठी अंगावरचे कातडे देखील काढून देईन, पण सध्या माझे आई-वडील एका नामांकित कंपनीचे जोडे वापरतात. त्यामुळे तूर्तास अंगावरची कातडी बचावून आहे. बरं मी जर का आज आईला, मला जन्म दिला म्हणून शुभेच्छा वगेरे द्यायला गेलो तर आईकडूनच एक सणसणीत कानाखाली बसेल.
9 Sep 2010 - 5:58 am | सुनील
पायातील वाहन बनविण्यासाठी
तुम्हाला वहाण असे म्हणायचे आहे असे गृहित धरतो!
9 Sep 2010 - 9:14 am | इंटरनेटस्नेही
हे हे हे हे... असेच म्हणतो!
(माझी आई बाटा तर बाबा वुडलँड वापरतात)