वृत्तांविषयी माहीती हवी आहे

अमोल मेंढे's picture
अमोल मेंढे in काथ्याकूट
8 Sep 2010 - 1:59 pm
गाभा: 

मला मराठी भाषेतील सगळ्या वृत्तांविषयी माहीती हवी आहे. त्यांच्या मात्रा, चरण वगैरे. उदाहरणांसकट. आणि ते काय असतं सलाते सलानाते? जाणकारांनी कृपया लक्ष द्यावे.

प्रतिक्रिया

कानडाऊ योगेशु's picture

8 Sep 2010 - 2:04 pm | कानडाऊ योगेशु

सलातेसलानाते हे वृत्तात येत नाही हो.!
ते द्वितियेचे आणि चतुर्थीचे विभक्तीप्रत्यय आहेत.
तुम्हाला कदाचित""य र त न भ ज स म" हे गण अपेक्षित असावेत.

कोदरकर's picture

8 Sep 2010 - 2:14 pm | कोदरकर

म भ न त त गा ग नी मंद चाले.... एवढेच आठवते आता....

कानडाऊ योगेशु's picture

8 Sep 2010 - 2:31 pm | कानडाऊ योगेशु

मंदारमाला म भ न त त गा ग नी मंद चाले

मंदारमाला नव्हे तर मंदाक्रांता म भ न त त ग ग गणी मंद चाले.
मंदारमालेविषयी सातातकारीच मंदारमाला गुरु एक त्याच्या अंती वसे असा रट्टा मारला होता हे आठवतेय.
(रट्टामारु) योगेशु

आम्हाला अनावृत्त हेच एक वृत्त माहित आहे. फटु दिला असता पण उडेल म्हणुन देत नाही. अधिक माहितीसाठी पराला विचारा

सुनील's picture

8 Sep 2010 - 9:05 pm | सुनील

"मुक्त" छंदासाठी अनावृत वृत्त एकदम फिट!

परिकथेतील राजकुमार's picture

9 Sep 2010 - 11:33 am | परिकथेतील राजकुमार

अधिक माहितीसाठी पराला विचारा

अनावृत्त वृत्त म्हणजे अ न आ व रु त त....

उदा :- ममता कमतरता |
शेरावता सावंता ||

ओळखीच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांकडून मराठी विषयाची पाठ्यपुस्तके घ्या. बहुदा ८वी ते १०वी या इयत्तांची.
मला आठवणारी काही: मालिनी, मंदाक्रांता, शार्दूलविक्रीडित*

उदा. आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक| देई ठेऊन ते कुठे अजून हे नाही कुणा ठाउक||

प्रत्येक वृत्त, ल ग वगैरे आणि उदाहरण तुम्हाला मिळेल.

चिंतामणी's picture

8 Sep 2010 - 2:24 pm | चिंतामणी

विकिपेडीयावर जुजबी माहिती मिळेल.

http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4...

कर्कवृत्त , रेखावृत्त , अक्षवृत्त , मकरवृत्त , विषुववृत्त ......................... :)

हे अस्सल उत्तर! टाळ्या!!
स्पा यांना व्याकरणमहर्षी पुरस्कार देण्यात यावा.

- जाकुझी.

"आम्हाला अनावृत्त हेच एक वृत्त माहित आहे" असे उदगार काढणा-या "अवलीया" यांना कुठला पुरस्कार देता ते सांगा.

हायला.. स्पेन मध्ये मारलेला चेंडू फ्रान्समधून परत आला! सह्हीच! पार्टनरशिप भारीये! :D

असो. 'अवलिया' हे आद्य व्याकरणमहर्षी आहेत! त्यांना पुरस्कार देण्याची गरज वाटत नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही देऊ शकता. धन्यवाद.

आणखी येक राहीले प्रवृत्त

यांना स्पाणिनी म्हणावे का ??

८वीचे कि ९वीचे कुमारभारती (की युवकभारती, अजुन कुठली भारती)चे पुस्तक घ्या. आम्ही कधी वाचलं नाही, पण त्या वृत्तं फार छान समजावुन दिली होती. तिथली उदाहरणं तर मस्तच.
(उदा. तुकोबांचा हा अभंग पहा, अन अभ्यास करुन वृत्त ओळखा.

लाहानपण दे गा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥ १ ॥
ऐरावत रत्‍न थोर । तया अंकुशाचा मार ॥ ध्रु ॥
ज्याचे अंगीं मोठेपण । तया यातना कठीण ॥ २ ॥
तुका म्हणे ज़ाण । व्हावें लाहनाहुनी लाहन ॥ ३ ॥

टीपः उदाहरणाच किरकोळ चुका असु शकतात, जया की ज्याचे , लहानपण वगैरे)
)

अधिक माहीतीसाठी हा दुवा पहा.
http://www.misalpav.com/node/2358

जिप्सी's picture

8 Sep 2010 - 2:35 pm | जिप्सी

मला फक्त उदाहरणच आठवतात !
आर्या :- सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची !
ओवी ज्ञानेशाची किंवा आर्या मयूरपंतांची !

भुजंगप्रयात :- मनासज्जना तू कडेनेची जावे !न होउनही कोणासही दुखवावे !
जरी कोणी दुष्ट अंगास लाविल हात ! तरी दाखवावा भुजंगप्रयात !

अमोल मेंढे's picture

8 Sep 2010 - 3:09 pm | अमोल मेंढे

ओळखीच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांकडून मराठी विषयाची पाठ्यपुस्तके घ्या. इथे राजस्थानात मिळत नाही हो मराठी पुस्तके..

नितिन थत्ते's picture

8 Sep 2010 - 4:09 pm | नितिन थत्ते

पुण्याहून अ ब चौकातून मागवा.

तुमचा पत्ता कळवा. एक पुस्तक " व्रुत्त दर्पण " माझ्याकडे आहे. छायाप्रत काढून पाठवतो.

मी-सौरभ's picture

11 Sep 2010 - 1:09 am | मी-सौरभ

अवांतर...
पाठवताना पाकीटावर स्टँप चिकटवणार की... :)

चिंतामणराव's picture

16 Sep 2010 - 11:16 am | चिंतामणराव

कशाला जाहीर ठिकाणावर "अनावृत्त" होताय राव....

मिहिर's picture

8 Sep 2010 - 3:19 pm | मिहिर

आम्हाला आठवीमध्ये होती वृत्ते. आत्ता काही फारसे आठवत नाही.

चिंतामणराव's picture

8 Sep 2010 - 3:24 pm | चिंतामणराव

शार्दूलविकीडीत

लक्षण
आहे वृत्त विशाल ज्यास म्हणती शार्दूलविकीडीत
मासाजास तताग गण हे पादास की जोडित

गण
मानावा समरा जनास समरा ताराप ताराप ग

उदाहरण
साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे
नित्याच्या अवलोकने जन पहा होती कसे आंधळे

उच्चारांच्या आघातांप्रमाणे फोड
साध्याही विषया तआश यकधी मोठाकि तीआढ ळे
नित्याच्या अवलो कनेज नपहा होतीक सेआंध ळे

अमोल भाऊ, शाळेमध्ये मराठी विषयाच्या तासाला व्याकरण शिकताना झोपा काढत होता काय?

दहावी पर्यंतची मराठी व्याकरणाची पुस्तके वाचा, कळेल. कारण प्रतिक्रिया संपादन करताना keyboard वर बोटांची कसरत होते, तुम्हाला शिकवणे म्हणजे मोठी सर्कस होईल.
क्षमा असावी..!!

सुहास..'s picture

8 Sep 2010 - 6:01 pm | सुहास..

अरेच्या ,हे वृत व्हय ? आम्हाला सकाळी पेपरात(पक्षी: पत्रात) लिहुन येणार्‍याशिवाय दुसर नाय माहीत !!

य मा ता रा ज भा न स ल गं
असं काहीतरी पाठ केल्याचं धूसर आठवतय.

धनंजय's picture

9 Sep 2010 - 9:16 am | धनंजय

४४ सामान्य वृत्तांची संस्कृत उदाहरणे आणि हिंदीत वर्णने मी ध्वनिमुद्रित केलेली आहेत.
हिंदी/संस्कृत भाषांमधील वर्णने चालत असतील, तर या दुव्यावर मुद्रणे बघावीत :
http://www.esnips.com/web/shrutabodha

("क्र. २३ उपजाती छंद"च्या ठिकाणी चुकीचे ध्वनिमुद्रण चढलेले आहे, क्षमस्व.)

इन्द्र्राज पवार's picture

9 Sep 2010 - 11:28 am | इन्द्र्राज पवार

श्री. केशवसुमार आणि श्री.धनंजय....

~~ तुम्हा दोघांचे आभार मानावेत तितके थोडे आहेत....हा खरा माहितीचा अमोल खजिना, जो मी अक्षरशः लुटीन या एकदोन दिवसात.

श्री.केशवसुमार यांनी आम्हा सर्वांतर्फे 'मनोगत' वरील ते सदस्य श्री.प्रदीप कुलकर्णी यांचे मनःपूर्वक आभार मानावेत ही विनंती.

श्री.मेंढे यांचेही आभार...ते अशासाठी की त्यांनी ही विचारणा केली नसती तर या वृत्तांचा हा गुंता तसाच मनात राहिला असता.

(श्री.धनंजय ~~ 'पांडव दिडकी' या वृत्तातील काही रचना आपणास माहिती आहेत का? ~ हिंदीमधील देखील चालतील. माझ्याकडे कवि यशवंत यांची एकच तशी रचना आहे "गाउं त्यांना आरती" ~ अधिकच्या असल्यास निव्वळ शीर्षक जरी दिले तरी चालेल, त्यावरून कविता मी शोधेन...)

इन्द्रा

मला अधिक रचना माहीत नाहीत. पण कवी यशवंतांचे "गाउं त्यांना आरती" उदाहरण वर्णनासाठी अतिशय उत्तम आहे.

गालगागा गालगागा गालगागा गालगा |
गालगागा गालगा ||
गालगागा गालगागा गालगागा गालगा |
गालगागा गालगा ||

पहिल्या-दुसर्‍या ओळींच्या शेवटी अंत्य-यमक आहे, आणि तिसर्‍या-चवथ्या ओळींच्या शेवटी [वेगळे] अंत्ययमक आहे.

"रतमयर | रतग" असे लेखनही करता येईल. मात्र त्यात ताल तितका स्पष्ट ऐकू येत नाही.

(श्री. इन्द्र्राज पवार यांनी "गाउं त्यांना आरती" असे लेखन केले ते सुयोग्य आहे, त्यातून वृत्ताची लय घट्ट होते. लहानपणी मी ही कविता "गाऊ त्यांना आरती" अशी गद्याळ लिहिलेली वाचली होती. कविता तशी वाचली तर लय बिघडते.)

कलंदर वीरश्रीने युक्त ठेका आहे.

इन्द्र्राज पवार's picture

10 Sep 2010 - 9:00 pm | इन्द्र्राज पवार

"गाउं त्यांना आरती"

~ धन्यवाद धनंजय - फार आनंद झाला, रचना वृत्तबद्ध करून दाखविल्याबद्दल. राजकवि यांची ही रचना पूर्ण स्वरूपात माझ्याकडे आताही आहे (तुम्हास हवी असेल तर खरडीतून पाठवू काय?). अन्य उदाहरणेही अन्यत्र शोधत आहेच. डॉ.रा.चि.ढेरे यांच्या खाजगी संग्रहालयात वृत्त बांधणी उदाहरणांचा चांगलाच ठेवा आहे, असे ऐकून आहे. डॉ.श्रीमती अरुणा ढेरे ~ त्यांची कन्या, ज्या स्वतःही फार उच्च दर्जाच्या लेखिका आहेत, त्या मागील महिन्यात कोल्हापुरात 'सकाळ' च्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या, त्यावेळी त्यांना या संदर्भात भेटता आले असते, पण नेमका मीच त्या काळात इकडे दिल्लीत. पण पाहू.

२. विशेष म्हणजे, ...माझ्याकडून टायपिंगच्या वेगात त्या कवितेचे नाव प्रथम "गाऊ त्यांना आरती" असेच इथे प्रकटले होते...पण प्रतिसाद पोस्ट करण्यापूर्वी माझी सवय आहे की, मॅटर (शुद्धलेखनाची चूक राहू नये म्हणून...) एकदोन वेळा तपासायचेच...ती सवय कामी आली, आणि चटकन लक्षात आले की, खरा शब्द 'गाउं..." असाच आहे, जो वृत्त बांधणीसाठी फार पोषक आहे.

इन्द्रा

चिंतामणराव's picture

10 Sep 2010 - 11:13 am | चिंतामणराव

+१
श्री. केशवसुमार, श्री.धनंजय आणि श्री.प्रदीप कुलकर्णी यांचे मनःपूर्वक आभार