इथे माझा गोवेकरपणा आड येत असेल. पुढे ज्याची दारू बनू शकते अशा कुठल्याही गोड द्रवाला गोव्यात निरा म्हणतात.
उदा : काजूच्या बोंडांचा निरा, माडाचा निरा, ताडाचा निरा
मी ताडाचा निरा काढतानाची प्रक्रिया जवळून बघितलेली नाही, म्हणून माडाचे सांगतो.
झाडाच्या बुंध्यातून फुले असलेला एक दांडा बाहेर पडतो, त्यातील प्रत्येक फुलाचा एक-एक नारळ होतो. त्या दांड्याला मी "फुलोरा" म्हटले (चुकला तर सुधारा - इंग्रजीत इन्फ्लोरेसेन्स).
सर्व फुलांना तसेच सोडले तर बहुधा सर्व नारळ लहान होतात - कोणास ठाऊक. पण त्या फुलांच्या दांड्याचे टोक कापतात, म्हणजे दांड्याला आणखी फुले फुटणे बंद होते. पण कापलेल्या टोकातून एक द्रव स्रवते, ते लटकवलेल्या मडक्यात जमा करतात, तो माडाचा निरा. त्याची दारू माडी.
ताड हे वनस्पतीशास्त्राच्या दृष्टीने माडासारखे असते, म्हणून मला वाटते, त्यातूनही असाच निरा काढत असावेत.
माडाच्या आणि ताडाच्या झाडात एक 'पोय' नावाचा भाग असतो.त्याचा नेमका अर्थ माहित नाही;पण ती कोवळी असताना कापल्यावर त्यातून स्रवणार्या द्रवाला 'नीरा' म्हणतात आणि हीच नीरा आंबली की त्याची ताडी/माडी होते.
कोकणात हे काम 'भंडारी' जातीचे लोक करतात. त्यांना 'पोयकापे' असेही विशेषण लोक वापरतात. ह्या लोकांचा दारु(देशी) गाळण्याचा धंदा असतो. ह्यांना 'कलाल' असेही म्हणतात.
ही सर्व माहिती ऐकीव आहे. ह्या बाबतीत नेमके सत्य तात्यासारखा अस्सल कोकणीच काही सांगू शकेल.
प्रतिक्रिया
6 Oct 2007 - 12:44 am | मनिष
'नीरा' (दीर्घ 'नी') माझ्या माहितीप्रमाणे ताडाच्या/माडाच्या झाडापासून तयार करतात व ताजीच प्यावी असे म्हणतात कारण नीरा नासल्यावर त्याची ताडी बनते.
http://knowaboutyourfood.blogspot.com/2007/05/blog-post_1228.html
6 Oct 2007 - 12:46 am | मनिष
इतरत्रही नीरा मिळते.
6 Oct 2007 - 1:11 am | प्राजु
ताडाच्या आणि माडाच्या झाडापासून बनवतात. आणि ती ताजीच प्यायची असते. ताजी असताना प्याल्यास तब्बेतीला अतिशय चांगली असते असे सांगतात.
- प्राजु.
6 Oct 2007 - 1:22 am | विकास
नीरा ताडाच्या झाडावरून सुर्योदयाच्या आधी काढतात. एकदाका (झाडांवरील त्या फळांवर) सूर्यप्रकश पड्ला की नंतर निघणारा रसा हा त्डी असते.
6 Oct 2007 - 1:27 am | कोलबेर
..ह्यामध्ये नक्की काय फरक असतो? आमच्या माहीती प्रमाणे माड म्हणजे नारळाचे झाड, पण मग ताडाच्य झाडाला कोणते फळ लागते?
6 Oct 2007 - 1:34 am | विकास
.ह्यामध्ये नक्की काय फरक असतो? आमच्या माहीती प्रमाणे माड म्हणजे नारळाचे झाड, पण मग ताडाच्य झाडाला कोणते फळ लागते?
ताडगोळा. मला वाटते नीरा फक्त ताडाच्या झाडातूुनच होते.
6 Oct 2007 - 3:24 am | धनंजय
ताडातून ताडी आणि माडातून माडी नावाचे द्रव पेय मिळते. झाडाच्या फुलोर्याचे टोक कापतात, आणि त्यातून स्रवणारा रस मडके लटकवून गोळा करतात.
6 Oct 2007 - 3:26 am | कोलबेर
मग निरा म्हणजे ताडी, माडी की दोनीही? झाडाचा फुलोरा म्हणजे काय? माझ्या समजुतीप्रमाणे निरा ही झाडाच्या बुंध्यातून काढतात बहुदा!
6 Oct 2007 - 4:13 am | धनंजय
इथे माझा गोवेकरपणा आड येत असेल. पुढे ज्याची दारू बनू शकते अशा कुठल्याही गोड द्रवाला गोव्यात निरा म्हणतात.
उदा : काजूच्या बोंडांचा निरा, माडाचा निरा, ताडाचा निरा
मी ताडाचा निरा काढतानाची प्रक्रिया जवळून बघितलेली नाही, म्हणून माडाचे सांगतो.
झाडाच्या बुंध्यातून फुले असलेला एक दांडा बाहेर पडतो, त्यातील प्रत्येक फुलाचा एक-एक नारळ होतो. त्या दांड्याला मी "फुलोरा" म्हटले (चुकला तर सुधारा - इंग्रजीत इन्फ्लोरेसेन्स).
सर्व फुलांना तसेच सोडले तर बहुधा सर्व नारळ लहान होतात - कोणास ठाऊक. पण त्या फुलांच्या दांड्याचे टोक कापतात, म्हणजे दांड्याला आणखी फुले फुटणे बंद होते. पण कापलेल्या टोकातून एक द्रव स्रवते, ते लटकवलेल्या मडक्यात जमा करतात, तो माडाचा निरा. त्याची दारू माडी.
ताड हे वनस्पतीशास्त्राच्या दृष्टीने माडासारखे असते, म्हणून मला वाटते, त्यातूनही असाच निरा काढत असावेत.
6 Oct 2007 - 8:09 am | प्रमोद देव
माडाच्या आणि ताडाच्या झाडात एक 'पोय' नावाचा भाग असतो.त्याचा नेमका अर्थ माहित नाही;पण ती कोवळी असताना कापल्यावर त्यातून स्रवणार्या द्रवाला 'नीरा' म्हणतात आणि हीच नीरा आंबली की त्याची ताडी/माडी होते.
कोकणात हे काम 'भंडारी' जातीचे लोक करतात. त्यांना 'पोयकापे' असेही विशेषण लोक वापरतात. ह्या लोकांचा दारु(देशी) गाळण्याचा धंदा असतो. ह्यांना 'कलाल' असेही म्हणतात.
ही सर्व माहिती ऐकीव आहे. ह्या बाबतीत नेमके सत्य तात्यासारखा अस्सल कोकणीच काही सांगू शकेल.
अस्सल मुंबईकर(पुलंच्या व्याख्येप्रमाणे)
प्रमोद देव.
7 Oct 2007 - 12:47 am | व्यंकट
सगळ्यांचे माहिती पुरवल्याबद्दल आभार!
ताडा-माडाच्या झाडांना इंग्लिश मधे काय म्हणतात?