टोल भरा प्रवास करा (आपण असेच भरडणार)

टग्या टवाळ's picture
टग्या टवाळ in काथ्याकूट
5 Sep 2010 - 5:12 pm
गाभा: 

नमस्कार मित्रांनो, काल मी पुणे ते कोल्हापुर असा प्रवास करत असतांना जाता येता ३०० रु टोल पोटी खर्च झाले सहज विचार करता अस लक्शात आल की आज महाराष्ट्रत कोठे ही प्रवास करतांना आपल्याला प्रत्येक जागी टोल द्यावा लागतो तो का कशा साठी. मित्रांनो मला काही प्रश्नाची उत्तर सापड्त नाहीयेत तेव्हा मला जरा मदद करा

१) आपण कोणती ही गाडी घेताना ओन रोड अर्थात रोड Tax भरुन घेत असतो,सरकार हा tax का घेते ?
२) सरकार हा tax घेउन आपणांस जर रोड उपल्ब्ध करुन देत असेल तर टोल का घेते?
३) महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत दरसाल लोकांन कडुन रोड Tax पोटी जमा होणारी कोट्यावधी रक्कम जर रस्ते विकसा साठी वापरली जात नसेल तर आपण रोड Tax का भरावा.
४) सरकार लोकांन कडुन रोड Tax घेउन जर रस्ते विकसा साठी B.O.T तत्वा वर कुणा कंपनी देत असेल तर आपण टोल भरण योग्य आहे का ?
५) शेवटी सर्व सामन्यांची होणारी हि लुट कशी थांबवता येइल . कुपया खुलासा करावा.

प्रतिक्रिया

सुनील's picture

5 Sep 2010 - 5:30 pm | सुनील

पुणे-कोल्हापूरचे ठाऊक नाही परंतु मुंबई-पुणे प्रवास जुन्या रस्त्यावरून करण्यापेक्षा एक्स्प्रेस वेने जास्तीचा टोल भरून जाणे मी पसंत करीन. वेळ आणि पेट्रोल बचतीच्या तुलनेत टोल परवडेल असे वाटते.

चतुरंग's picture

5 Sep 2010 - 5:45 pm | चतुरंग

रस्ते विकास, बांधणी ही सरकारचे काम असले तरी पूर्वापार चालत आलेल्या संकल्पनेनुसार केवळ रस्ते कर घेऊन हा निधी उभारणे अशक्य होत गेले. सरकारी तिजोरीवरचा ताण कमी करण्यासाठी BOT (Build Operate Transfer)तत्वाचा वापर केला जातो. ह्यात रस्त्याची देखभाल, दुरुस्ती, सुधारणा इ. कामे प्रायवेट सेक्टर कंपनीला दिलेली असतात त्यासाठी आलेला खर्च ती कंपनी टोल वसूल करुन परत मिळवते - त्या टोलचा काही भाग राज्यसरकारलाही मिळतो. ही व्यवस्था केवळ भारतातच नसून अनेक प्रगत देशात सर्रास वापरली जाते.
कंपनी रस्त्यांसंबंधी तिचे काम उत्तम करुन वापरणार्‍याला रस्ते उच्च दर्जाचे देते आहे की नाही आणि त्यासंबंधी खातरजमा कशी केली जाते हे मात्र मला नेमके माहीत नाही आणि भ्रष्टाचाराला मुख्य वाव तिथेच असू शकेल असे वाटते आहे.

पण तुम्ही हे सुद्धा लक्षात घ्या की पूर्वी पुणे कोल्हापूर प्रवासाला एस्टीने जवळपास ६ तास लागत तो वेळ आता चक्क ४ तासावर आला आहे. खाजगी गाडीने तर अक्षरशः ३ तासात तुम्ही पोचू शकता. उत्तम रस्ते हवेत, जलद जाताही यायला हवे आणि पैसेही द्यायला नकोत असे कसे काय भाऊ? :)

इथे अमेरिकेत अनेक रस्त्यांवर हे टोल असतात आणि रस्ते उत्तम ठेवले जातात. इथेही काहीवेळा टोल वाढले की लोक ओरडतात. अगदी ताजा किस्सा - मी मॅसाच्यूसेट्स मधे राहतो. आमच्या उत्तरेला लागून असलेले लगतचे राज्य न्यू हँपशर, हे करमुक्त राज्य आहे म्हणजे राज्य सरकारचा कर तिथे नाही. मॅसाच्यूसेट्स परिसरात काम करणारे अनेक लोक तिथे राहतात आणि तिकडून रोज ये जा करतात. ते येतात त्या इंटरस्टेट ९३ ह्या राष्ट्रीय महामार्गावर मॅसाच्यूसेट्सच्या सीमेवर टोलनाका उभारावा असा प्रस्ताव आला आता रोज टोल भरावा लागणार ही लूट आहे असे तिकडच्या लोकांचे म्हणणे तर ते इथला रस्ता वापरतात तर त्यांनीही त्याच्या व्यवस्थेचा काही भार उचलावा असे इकडच्यांचे म्हणणे. इतकी वर्षे हा रस्ता आहे, लोकही प्रवास करताहेत तर आत्तापर्यंत हा वाद का झाला नाही? एक मुख्य कारण मला असे वाटते की सरकारी तिजोरीवरचा ताण वाढत जाणे हे झाले की अशाप्रकारे पैसा उभा करणे हे अनिवार्य होते आणि कोणत्याही बदलाला आणि विशेषतः पैसे देण्याला लोक नाके मुरडतातच पण त्याला इलाज नसतो.

तर ए़कूण सारांश असा की ही 'टोलवाटोलवी' जगात बरेच ठिकाणी आहे तुम्ही इतके वाईट वाटून घेऊ नका! :)

(टोलकर)चतुरंग

विश्वनाथ मेहेंदळे's picture

6 Sep 2010 - 2:14 am | विश्वनाथ मेहेंदळे

तुमचे बरोबर आहे. जगातील अनेक देशात, (प्रगत देशातही) टोल भरावा लागतो. आपल्याला इतकी वर्षे टोल भरावा लागत नसल्यामुळे आता थोडे वाईट वाटणे साहजिकच आहे. पण टोल किती असावा यावर बंधने घालणार का?

अमेरिकेपुरते बोलायचे झाले तर, मी आजवर ऐकलेला सर्वात जास्त टोल होता $८. तुम्हाला माहित असेलच हो, तुमच्या ईशान्येकडून न्यूयॉर्क ला येताना भरावा लागतो तोच. बाकी सर्व ठिकाणी यापेक्षा कमी पाहिला आहे. (कुठे जास्त असेल तर माहित नाही). अनेक ठिकाणी अंतरानुसार भरावा लागतो. त्यामुळे तो याहून जास्त होऊ शकतो. पण शेवटी अंतर आणि किंमत याचे गुणोत्तर तेच राहते (जे फार महाग नाही वाटले मलातरी).

अमेरिका आणि भारत यातील किमतीची तुलना करताना १० ने गुणाकार केला जातो (५० ने नाही) असे ऐकून आहे. अर्थशास्त्रातले purchasing power parity सारखे कठीण प्रकार वापरून हा आकडा काढला आहे म्हणे. त्या हिशोबाने अमेरिकेतील सर्वात महागडा टोल ८० रु चा (equivalent) होतो. ते पण न्यूयॉर्क ला जायला (आर्थिक राजधानी वगैरे वगैरे) मग कोल्हापूर-पुणे रस्त्यासाठी १५० रु मला थोडे जास्त वाटले. बरे, रस्त्याची किंमत वसूल झाली की हा टोल कमी करणार आहेत का?

चिंतामणी's picture

6 Sep 2010 - 7:01 pm | चिंतामणी

पण तुम्ही हे सुद्धा लक्षात घ्या की पूर्वी पुणे कोल्हापूर प्रवासाला एस्टीने जवळपास ६ तास लागत तो वेळ आता चक्क ४ तासावर आला आहे. खाजगी गाडीने तर अक्षरशः ३ तासात तुम्ही पोचू शकता. उत्तम रस्ते हवेत, जलद जाताही यायला हवे आणि पैसेही द्यायला नकोत असे कसे काय भाऊ?

टोल द्यायचा. पण किती? त्या टोलनाक्यांवर किती वेळ जातो हे कधी बघितले आहे का? रस्ते खरोखरच मेंटेंन करतात का?

पुणे कोल्हापुर प्रवासाठी जरी ४ तास लागत असलेतरी नाक्यांवर एकतासांपेक्षा जास्तवेळ वाया जातो. पुरेश्या लेन्स/केबीन्सनाक्यांवर नाहीत. पुण्यापासुन सारोळ्यापर्यन्त एकही बायपास, सर्व्हिस रोड इत्यादी काहिही नाही. तरीसुध्दा एका वेळेसाठी रू.३००/- द्यायचे.

पुणे-नगर-औ.बाद रस्त्याची कामे अपुर्ण आहेत. पुरेश्या लेन्स नाहीत, तरिही हा जिझीया कर भरायला लागतो. हे कितपत योग्य आहे?

पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्वावर फक्त २६ कि.मि.चा मार्ग ४ पदरी आहे. त्याला बायपास, सर्व्हिस रोड इत्यादी काहिही नाही. तरीसुध्दा एका वेळेसाठी रू.१५/- द्यायचे.

उगाच एक्सप्रेस वेशी आणि परदेशातील रस्त्यांशी तुलना नको.

एक महत्वाची गोष्ट राहिली. या रस्त्यांवर उलटे येणारे ट्रक आणि ट्राक्टरवाले. याचे अनेक जिवघेणे अनूभव पुणे-कोल्हापुर, पुणे-सोलापुर आणि पुणे-नगर मार्गावर घेतले आहेत. याची जबाबदारी कोणाची????

चतुरंग's picture

6 Sep 2010 - 8:24 pm | चतुरंग

उलटे येणारे वाहनचालक, मधूनच अनधिकृत रस्ते काढून जाणारे चालक, धोकादायकरीत्या (क्वचित गुरांना घेऊन) महामार्ग ओलांडणारे गावकरी हे सगळे लोकशिक्षणातूनच कमी होणार.

५ किमी जायचे असो किंवा ५०० किमि. सरसकट एकच टोल हेही योग्य नाहीच. अमेरिकेत ज्यावेळी टोलचे रस्ते बरेच लांब असतात त्यावेळी प्रथम त्या रस्त्यावर शिरताना थेट टोल घेण्याऐवजी तिकिट देतात ज्यावर पुढे तुम्ही जिथून त्या रस्त्यावरुन बाहेर पडणार आहात त्या सर्व एक्झिट पॉइंट्सचे टोल दर लिहिलेले असतात. तुम्ही जेवढे अंतर महामार्गावरुन जाल तेवढ्या प्रमाणात त्या त्या एक्झिटपाशी टोल घेतला जातो. हे जास्त न्याय्य वाटते. परंतु भारतात अनधिकृत फाटे काढून महामार्गावरुन परस्पर बाहेर पडणे वगैरे शक्य असल्याने हे आत्तातरी कितपत जमू शकेल हे माहीत नाही.

अमेरिकेशी किंवा इतर देशांशी तुलना करु नका असे कसे शक्य आहे. एखादी सिस्टिम आपण अंगिकारतो आणि ती बर्‍याच वेगवेगळ्या ठिकाणी लागू असते तेव्हा तुलना अपरिहार्य आहे. फक्त त्या त्या ठिकाणच्या काही विशिष्ठ गरजांपुरते फरक असू शकतात परंतु मूळ आराखडा फारसा बदलू शकत नाही.

चिंतामणी's picture

8 Sep 2010 - 2:08 pm | चिंतामणी

आजची ताजी बातमी वाचली का?

सातारा रस्त्यावर बसणार टोलवाढीचा दणका

रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीचा सावळागोंधळ सुरू असतानाच सातारा रस्त्यावर वाहनचालकांना आता टोलवाढीचा दणका बसणार आहे. येत्या गुरुवारपासून खेडशिवापूर आणि आणेवाडी येथील टोलमध्ये तब्बल 40 टक्के वाढीचा बोजा वाहनचालकांच्या माथ्यावर बसणार असून, त्याविरोधात नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नव्या सातारा रस्त्यावर वाहनचालकांना टोल भरावा लागतो. मात्र, गुरुवारी मध्यरात्रीपासून (ता. 9) या टोलमध्ये 40 टक्के वाढ होणार असल्याचे फलक टोलनाक्‍यांवर लावण्यात आले आहेत. खेडशिवापूर येथील नाक्‍यांवर पूर्वी मोटारींना 45 रुपये टोल द्यावा लागत असे, आता तेथे 65 रुपये टोल भरावा लागणार आहे, तर ट्रकसाठी 165 रुपयांचा टोल वाढवून 210 रुपये करण्यात आला आहे. त्यापुढे आणेवाडीमध्येही दुसरा दणका बसणार आहे. तेथे मोटारींसाठी आता 25 ऐवजी 45 रुपये टोल भरावा लागेल, तर ट्रकला 85 रुपयांऐवजी 145 रुपये टोल भरावा लागेल.

आधी टोल; मग रस्ता?

सर्वसाधारणपणे नवा रस्ता उपलब्ध करून दिला, किंवा त्या रस्त्यावर नव्या सुविधा ग्राहकांना पुरविल्यानंतर त्या खर्चापोटी टोल वसूल करण्यात येतो; परंतु येथे सहापदरी रस्त्याचे काम सुरू होण्यापूर्वीच टोल वसूल करण्याच्या अजब पद्धतीबद्दल आश्‍चर्य व्यक्त करण्यात आले आहे. "रिलायन्स इन्फ्रा'ने काढलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार जुलै 2012 पासून नव्या टोलची आकारणी होईल, असे जाहीर करण्यात आले होते; पण त्यापूर्वीच टोलवाढीचा दणका ग्राहकांना बसणार आहे.

ही बातमी येथे सविस्तर वाचा.

http://www.esakal.com/esakal/20100908/4699894709848201131.htm

संबंधीत बातम्या वाचा.

टोल वसुलीला शिवसेनेचा विरोध
पिंपरी - रस्तेविकासाची कामे अपूर्ण असताना पुणे-मुंबई महामार्गावर (क्रमांक चार) टोल वसुलीला तीव्र विरोध करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. सोमाटणे फाटा, पनवेल आणि खोपोली येथील टोलनाकी बंद करण्याचा इशारा खासदार गजानन बाबर यांनी दिला आहे. या आंदोलनाला पनवेलमधील दहा ग्रामपंचायतींनी ठराव करून पाठिंब्याची पत्रे दिली आहेत.

द्रुतगती महामार्गाबरोबरच चार क्रमांकाच्या मार्गावर निगडी ते पनवेल या टप्प्यात तीन ठिकाणी टोल वसूल केला जात आहे. वास्तविक हा टोलच बेकायदेशीररीत्या वसूल केल्याचा आरोप श्री. बाबर यांनी निवेदनात केला आहे. हे निवेदन रस्तेविकास आणि परिवहन राज्यमंत्री जयदत्त क्षीरसागर यांना दिले आहे. या महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यांचे चौपदरीकरण आणि त्या अनुषंगाने कामे झालेली नाहीत. सुमारे 93 कोटी रुपयांची कामे प्रलंबित आहेत. ही कामे अपूर्ण असल्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याचे श्री. बाबर यांचे म्हणणे आहे. कामे अपूर्ण असतानाही सरकारने निगडी ते पनवेल दरम्यान सोमाटणे फाटा, पनवेल आणि खोपोली या ठिकाणी टोल प्लाझा सुरू केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. आजिवली येथे पनवेलला जोडणाऱ्या महामार्गावरील पुलाचे कामही अपूर्ण स्थितीत आहे. सुमारे एक किलोमीटर लांबीच्या पुलावर केवळ खांब उभारले आहेत. त्यामुळे पनवेलला येणारी वाहतूक अपूर्ण कामामुळे एकेरी सुरू आहे. वाहतुकीच्या कोंडीमुळे हे क्षेत्रच अपघातप्रवण बनले आहे. प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाची हमी न देता टोल वसूल करणे योग्य नाही, अशी मागणीही श्री. बाबर यांनी केली आहे.

सवीस्तर बातमी येथे वाचा.
http://www.esakal.com/esakal/20100426/5515164296739476571.htm

-------------------------------------------------------------------

रांजणगावला टोलदरवाढीविरोधात आंदोलन

रांजणगाव व कोरेगाव भीमा येथील टोलनाक्‍यांवर 1 जुलैपासून सुरू केलेली दरवाढ रद्द करावी व वाहनचालकांवर दाखल केलेले खटले काढून घ्यावेत, या व इतर टोलविषयक प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे व टोलचालकांचे लक्ष वेधण्यासाठी क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी बुधवारपासून रांजणगावच्या टोलनाक्‍यावर उपोषण सुरू केले. ग्राहक पंचायत व शेतकरी संघटनेबरोबरच अनेक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

सवीस्तर बातमी येथे वाचा.
http://www.esakal.com/esakal/20100715/5756550435445343082.htm

संजय अभ्यंकर's picture

8 Sep 2010 - 7:55 pm | संजय अभ्यंकर

चिंतामणीजिंशी सहमत!
सर्वत्र भाववाढ अटळ!

चिंतामणी's picture

8 Sep 2010 - 8:04 pm | चिंतामणी

आता टोलची दरवाढ.

बाकी गोष्टींच्या दरवाढीबद्दल बोलायलाच नको.

टोले पडत आहेत.

चतुरंगभाऊ,
भारतात केवळ टोल वसुल केला जातो, देखभाल, दुरुस्ती नाही.

ह्या पावसाळ्यात मुंबई ते पुणे, नाशीक, औरंगाबाद, अहमदनगर असा अनेकदा प्रवास करतोय (आपल्या गाडीने) टोल रोड सगळेच चांगले नाहीत. औरंगाबाद - नाशीक, अहमदनगर - नाशीक, मुंबई - नाशीक ह्या रस्त्यांची दुर्दशा आहे.

प्रत्यक्ष मुंबई शहरातले रस्ते उपरोल्लेखीत रस्त्यांपेक्षा अत्यंत हलाखीच्या परीस्थीतीत आहेत. लोअर परळ ते बोरिवली प्रवासाला संध्याकाळी २-१/२ ते ३ तास, तर सकळी किमान २ तास लागतात. सध्या कंपनी कामाच्या वेळा बदलायचा विचार करतेय. सकाळी सातला घर सोडूनही ९.३० ला कंपनीत पोहोचू शकणे लोकांना अशक्य झालय.
दादर(पश्चीम) स्टेशन बाहेरच्या पुलाला केवळ आरपर भोकं पडायची शिल्लक आहेत.

मुंबईबाहेरच्या लोकांची समजूत असते की मुंबईतले रस्ते उत्तम असतील. परंतु मुंबईतल्या रस्त्यांची दुरवस्था सांगताना स्वतःला लाज वाटते की आपण मुंबईकर आहोत.

चतुरंग's picture

7 Sep 2010 - 8:50 am | चतुरंग

एकूण टोल रस्तेही यथातथाच आहेत हे ऐकून वाईट वाटले....

---------------
कामाच्या वेळा बदलण्याचा प्रयोग करुन बघायला हरकत नाही. सांगलीला स्टार रेडिओ म्हणून माझ्या आजोळकडून एका आजोबांचा बिझनेस आहे. ते सकाळी ७ ते १२ आणि दुपारी २.३० ते ५.३० असे ऑफिस ठेवत. त्यांच्याकडे कामाला येणारे अर्थात जवळपासचेच असत त्यामुळे त्यालोकांना जेवायला घरी जाता येई, बँकेची, पोस्टाची कामे, क्वचित मुलांची शाळांची कामे करुन लोक पुन्हा कामावर हजर होत. त्यांच्याकडे तीस तीस वर्षे काम केलेले लोक होते ह्याचे कारण मला वाटते हे माणूस जपण्याचे धोरण.

रस्ते गेल्या दहा एक वर्षात खराब झालेत का? आधी एवढे खराब नसावेत मुंबैचे रस्ते! अर्थात मी काही फार फिरलेली नाही. एअरपोर्टचा रस्ता मात्र कमालीचा तुंबलेला असतो. लवकर निघुनही फ्लाईट चुकते कि काय अशी शंका नेहमी येते. गेल्यावेळी तर ट्रॅफिकमध्ये बराच वेळ घालवल्यावर आमची अस्वस्थता पाहून ड्रायव्हरने कुठल्यातरी भरपूर कचरा असलेल्या रस्त्याने का होइना जेमतेम वेळेत पोहोचवले होते.

चिरोटा's picture

5 Sep 2010 - 9:48 pm | चिरोटा

टोल असायला हरकत नाही पण पुणे-कोल्हापूर अंतराच्या मानाने ३००(१५०+१५०) रुपये टोल जास्त वाटतो.
टवाळ, पुणे-कोल्हापूर रस्त्यांविषयी/ट्रॅफिकविषयी आपला अनुभव सांगा. मग काही सांगता येईल.!!

इंटरनेटस्नेही's picture

5 Sep 2010 - 11:57 pm | इंटरनेटस्नेही

टोल नसेल भरायचा तर विमानाने प्रवास करा!

(ड्रायवर)

राजेश घासकडवी's picture

6 Sep 2010 - 12:05 am | राजेश घासकडवी

रस्ता असण्यासाठी खर्च येणारच. मग तो सरकारने वर्षाअखेरीला तुमच्या टॅक्समधून वळता करून घ्यायचा की जे लोक तो रस्ता वापरतात त्यांनी वापरताना द्यायचा हा सोयीचा मुद्दा आहे. काही सुविधांसाठी फक्त वापरणाऱ्यांना पैसे भरावे लागणं जास्त न्याय्य होतं. जर सरकारने सर्वांना रेल्वे प्रवास फुकट उपलब्ध करून व त्यामुळे सर्वांचाच टॅक्स वाढला तर जे लोक रेल्वे वापरत नाहीत ते बोंब मारणार ना. त्यापेक्षा प्रत्येक प्रवाशाने प्रत्येक वेळी तिकीट काढणं बरोबर ठरतं. टोल हे एक प्रकारे तिकीटच.

हुप्प्या's picture

6 Sep 2010 - 3:18 am | हुप्प्या

असे ऐकून आहे की आमदार, खासदार, मंत्री आणि त्यांचे नातलग ह्यांना टोल माफ असतो.
महापौर, नगरसेवक, सरपंच, स्थायी समिती ह्यांनाही टोल माफ आहे का?
टोल टाळायला अशा मातब्बर जमातीशी काही संधान साधणे हा एक उपाय होऊ शकतो.

अर्थात समाजसेवेचे कंकण हाती बांधलेल्या राजकीय पुढार्‍यांना आणि कुटुंबियांना टोल माफ असायलाच हवा.

समंजस's picture

8 Sep 2010 - 2:21 pm | समंजस

बरोबर.
आमदार, खासदार, मंत्री यांना टोल माफ आहे परंतु ती व्यक्ती स्वतः गाडीत उपस्थीत असेल तरच अन्यथा नाही. नातेवाईकांना टोल माफ नाही परंतु प्रत्यक्षात काय होतं हे वेगळे सांगायला नको :)

धमाल मुलगा's picture

8 Sep 2010 - 4:32 pm | धमाल मुलगा

हॅ हॅ हॅ!!!
अप्पर डिप्पर मारुन खिडकीतुन फक्त एक हात वर केला की दांडकं आपोआप वर जातं ;) मग तिथे गाडीला लाल दिवा असला काय अन नसला काय!

दुसरा प्रकारः दांडक्याला अगदी खेटुन गाडी उभी करायची आणि काच खाली घेऊन 'काय रे...माजला का? लांबुन गाडी कुठली कळंना का?' असं गुर्मीत विचारलं की बर्‍याच नाक्यावरचा टोल क्यान्सल ;)

(अर्थात हे प्रकार ज्यानं त्यानं स्वतःच्या जबाबदारीवर करायचे असतात. नाक्यावर फटके पडल्यास आम्ही जबाबदार नाही.)

इन्द्र्राज पवार's picture

8 Sep 2010 - 6:59 pm | इन्द्र्राज पवार

"दुसरा प्रकारः दांडक्याला अगदी खेटुन गाडी उभी करायची आणि काच खाली घेऊन 'काय रे...माजला का? लांबुन गाडी कुठली कळंना का?"

~~ अरेच्या !! हा प्रकार मी स्वतः डोळ्यांनी पाहिला आहे, त्याबद्दल चौकशीही केली... सातारा-पुणे रस्त्यावर असलेल्या एका नाक्यावर. आमच्या कारच्या पुढे तीन होत्या...पहिली टोल भरून पुढे गेली, अन दुसरी (जी लाल दिव्याची नव्हती) तशीच गीअर टाकून मागोमाग चालली तर गार्डने हात पुढे करून थांबविली, लागलीच गॉगल काच खाली करून चालक केबिनकडे तोंड देवून तो काहीतरी गुरकावला (त्या मागेही एक कार होती, त्यामुळे आम्हाला नेमके वाक्य ऐकायला मिळाले नाही, त्या गार्डने त्याला उत्तर दिले नाही...सलाम तर केला नाही (आमदार, खासदार असले की एक कडक सलाम जातोच...) पण चार्जेसही घेतले नाहीत, उलट आत केबिनमध्ये तोंड घालून काहीतरी पुटपुटला व ती कार पुढे रुबाबात गेली. ज्यावेळी आमची कार पुढे आली त्यावेळी आमच्या चालकाने ५० ची नोट दिली व पावतीची वाट पाहत असतानाच मी कुतुहलाने त्या गार्डाला विचारले, 'का हो, भाऊ, त्या कारमध्ये काय सरकारी अधिकारी होते का?" त्याला उत्तर, 'नाही नाही, लई माजल्याली टोळी हाया ती इथली, कोण नादाला लागायचं?"

आता या "लई माजल्याली टोळी..." जर रोज तिथून ये-जा करीत असेल तर त्यांचा बंदोबस्त का होत नसेल हे विचारण्यात काहीच हशील नव्हता (कोण नादाला लागणार?). त्यामुळे, थोडक्यात, जे टोल देतात त्यांच्याच मागे वाढीचे शुक्लकाष्ठ लागते, हेच खरे ! 'टोळीवाल्यां'ना ४०% दरवाढ झाली काय किंवा ८०%...काय फरक पडतो ?

इन्द्रा

धमाल मुलगा's picture

8 Sep 2010 - 7:28 pm | धमाल मुलगा

जर रोज तिथून ये-जा करीत असेल तर त्यांचा बंदोबस्त का होत नसेल हे विचारण्यात काहीच हशील नव्हता (कोण नादाला लागणार?)

:) त्यापेक्षासुध्दा महत्वाचं, हे टोळीवाले कुणाच्या जीवावर मग्रुरी करतात, त्यांची कामं हे टोळीवाले अशा सवलती नाही मिळाल्या तर करतील का असाही प्रश्न आहेच की. ;)

समंजस's picture

9 Sep 2010 - 11:23 am | समंजस

ही टोल सुट त्यांना मिळणार्‍या विशेष भत्त्यात येते म्हणे ;)

[टोल नाक्याचं कंत्राट मिळालेल्या कंपनीला ह्या सगळ्या गोष्टी ईतर खर्च या प्रकारात टाकाव्याच लागतात. सांगून सांगणार कोणाला? पुढील वर्षी परत नुतनीकरण करून घ्यायचं असतं भौ :) ]

चांगले रस्ते हवे असतील तर टोल भरणे आवश्यक आहे हे मलाही पटते. माझ्या गावी जायला २० वर्षांपुर्वी एसटीने १५ तास लागायचे तेच आता ७ तासांत स्वतःच्या गाडीने पोचता येते. पण जेवढा टोल घेतात तेवढे रस्ते तेवढे चांगले आहेत का??

१. वाशी खाडीपुलावर १९९७ साली येऊनजाऊन टोल ८ रुपये होता तो आता फक्त एकाच वेळेचा ३० रुपये आहे. पण टोलच्या आधीचा रस्ता, टोलनाक्यावरचा रस्ता, खाडीपुलाचा रस्ता वगैरेंवर पावसाळ्यात जास्त आणि इतरवेळी कमी खड्डे असतात. बाराही महिने गुळगुळीत रस्ता नसतो. मग वाहनामागे ३० रुपये इतके पैसे जातात कुठे?

२. एक्स्प्रेसवेवरुन गेले ६ वर्षे नियमित महिना एकदा जातेय. मला आता नीटसे आठवत नाही, पण आधी टोल बहुतेक ८० रुपये होता, तो १२० रु केला आणि सध्या १४० रुपये आहे. एक्स्प्रेसवे ब-यापैकी चांगला आहे, पण तो आता एक्स्प्रेसवे राहिलेला नाही कारण दोन -तिन ठिकाणी त्याला फाटे फुटलेत - आणि हे अनऑफिशियल फाटे आहेत, खोपोली, खंडाळा, लोणावळा, सोमाटणे सोडुन इतरत्र. शिवाय काही ठिकाणी खड्डेही आहेत, कॉंक्रिटच्या रस्त्याला मोठे तडे गेलेत. फक्त मुंबईत खड्ड्यांमध्ये रस्ता शोधण्याची सवय असल्याने तिथले खड्डे जाणवत नाहीत :)

३. पुणे-बँगलोर रस्त्यावरुन पण गेल्या ३-४ वर्षांत बरेचदा गेलेय. सुरवातीला तवंडी घाट येईपयंत साधारण ३५० रु टोल जायचा, आता तोच ६५० रु पर्यंत गेलाय. हा रोड अर्थातच चांगलाच आहे, नावे ठेवण्यासारखे काही नाहीच यात. पण तरीही एवढा टोल?? ?????

हा रस्ता जरी चांगला असला तरीही तिथे इतर त्रास आहेत. सातारा, कोल्हापुर, कराड, सांगली इ. शहरे या रोडवर असल्याने दिवसाच्या दुचाकी गाड्या खुप असतात. ट्रकची वाहतुकही खुप आहे. रस्ता फक्त दोनच लेनचा असल्यामुळे दुचाकी समोर आली की ट्रकवाला आपल्यासमोर येतो. त्यामुळे खुप काळजी पुर्वक गाडी चालवावी लागते. मी तर हल्ली ह्या रस्त्यावर रात्रीच प्रवास करते. दुचाकीवाल्यांचा त्रास थोडा कमी असतो रात्रीच्या वेळी.

दुसरा खुप मोठा त्रास म्हणजे उसतोडणी हंगामात या रस्त्यावर लोक उसाने भरलेले ट्रॅक्टर घेऊन विरुद्ध दिशेने पण दोनलेनच्या रस्त्यावर फास्टलेनमधुन प्रवास करतात.. काय धाडसी लोक आहेत...... आपण १०० च्या स्पिडने सरळसोट असलेल्या रस्त्याने चाललोय आणि अचानक समोर ट्रॅक्टरवाला येताना दिसतो आणि तो आपल्याकडे पाहायचे कष्टही घेत नाही. तो नेहमी न चुकता बाजुच्या विरुद्ध रस्त्याकडे पाहात असतो. आपणच स्पिड कमी करुन, बाजुची इतर वाहने बघुन, आपली गाडी बाजुला घ्यायची आणि त्याला जायला द्यायचे. क्वचित त्याने दिवसा दिवे वगैरे लावलेले असले तर लांबुन कळते की साहेब येताहेत ते नाहीतर हे सगळे अचानक आयत्या वेळीच होते.

रस्त्याची किंमत वसूल झाली की हा टोल कमी करणार आहेत का?

आपल्याकडे असल्या फालतु पद्धती नाहीत. एकदा एकाद्या गोष्टीची क्ष किंमत ठरली की मग फक्त क्ष गुणिले शुन्य सोडुन इतर अंक हेच समिकरण अनंत काळापर्यंत चालु राहते.

पुणे-बँगलोर रस्त्यावर एकाच ठिकाणचा टोल बुथ काढलाय. मला वाटते खेड-शिवापुर इथला किंवा तिथलाच आसपासचा. कारण ठाऊक नाही.

टोलमाफी सर्वसामान्य जनता सोडुन इतर सगळ्यांना आहे... :) सर्वसामान्य जनतेमधे फक्त मिलिटरीतल्या जवानांना टोलमाफी आहे. त्यासाठी तो जवान स्वतःच्या स्मार्टकार्ड आणी ओळखपत्रासोबत स्वतः गाडीत असावा लागतो. यावेळी गावी जाताना सोबत स्मार्टकार्ड होते आणि मिलिटरी जवानाचा त्याचासारखाच दिसणारा भाऊ होता. त्यामुळे काही टोलवर पैसे वाचले. काही ठिकाणी ओळखपत्राची विचारणा झाली तिथे शांतपणे टोल भरला... :) हे बंधन राजकारण्यांना नाहीये. नुसता लाल दिवा पेटलेला असला की झाले.

निखिल देशपांडे's picture

6 Sep 2010 - 5:47 pm | निखिल देशपांडे

१. वाशी खाडीपुलावर १९९७ साली येऊनजाऊन टोल ८ रुपये होता तो आता फक्त एकाच वेळेचा ३० रुपये आहे. पण टोलच्या आधीचा रस्ता, टोलनाक्यावरचा रस्ता, खाडीपुलाचा रस्ता वगैरेंवर पावसाळ्यात जास्त आणि इतरवेळी कमी खड्डे असतात. बाराही महिने गुळगुळीत रस्ता नसतो. मग वाहनामागे ३० रुपये इतके पैसे जातात कुठे?

वाशी खाडी पुलावरचा टोल त्याच पुलासाठी आहे का???
माझ्या मते मुंबई महानगर पाहिलीकेच्या हद्दीत प्रवेश करण्याचा तो टोल आहे. मुलुंड दोन, दहिसर, ऐरोली आणि वाशी अशा पाच ठीकाणी हे टोल नाके आहेत. प्रत्येक ठीकाणी एल एम व्ही कॅटेगीरीत मोडणार्‍या वहानांसाठी टोल ३० रुपये आहे.

सुनील's picture

6 Sep 2010 - 7:08 pm | सुनील

गोरेगाव चेक नाका विसरला? (शिवाय ठाण्याहून मुलुंडला टोल न भरता जाता येते! जायचेच असेल तर!)

निखिल देशपांडे's picture

7 Sep 2010 - 1:44 pm | निखिल देशपांडे

गोरेगाव चेक नाका या सदरात मोडत नाही.
संदर्भ :- http://www.dnaindia.com/mumbai/report_toll-contract-of-mumbai-awarded-to...

अविनाशकुलकर्णी's picture

6 Sep 2010 - 1:20 pm | अविनाशकुलकर्णी

आगगाडी

परिकथेतील राजकुमार's picture

6 Sep 2010 - 7:06 pm | परिकथेतील राजकुमार

आपण तर बॉ कोंडुसकरनी जातो आणि येतो. त्यामुळे असल्या जागतीक प्रश्नाकडे आपले कधी लक्ष गेले नाही.

टोल आणि रस्ते यांचा संबंध नसावा असे वाटते... ;) नाहीतर अशा रस्त्यांवर खड्डे कसे दिसतील ? ;)
मुलुंड्-ऐरोली ब्रिजवर रात्री बर्‍याच वेळेला लाईट नसतात,म्हणजे या दिव्यांच्यामुळे मिळणार्‍या प्रकाशासाठी वेगळा टोल भरायचा की काय ? ;)
बाकी मुदत संपुन देखील काही ठिकाणी टोल आकारणी होते असे कुठेतरी वाचले होते.
टोलनाक्यांवर मोठ्या अक्षरात टोल आकरणीची मुदत कधी संपते ते का लिहीत नाहीत? म्हणजे लिहीत असतील तर मला तसे अजुन कधी दिसले नाही. ;)

परिकथेतील राजकुमार's picture

7 Sep 2010 - 11:25 am | परिकथेतील राजकुमार

श्री. मदनबाण ह्यांनी वरिल प्रतिसादात कुठलाही तु-नळी चा दुवा दिलेला नसल्याने त्यांचा हा प्रतिसाद फाउल समजावा.

हलकट
पराबाण

टग्या टवाळ's picture

7 Sep 2010 - 12:35 pm | टग्या टवाळ

मी टोल द्यायला तयार आहे म्हणजे तो देतोय महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत दरसाल लोकांन कडुन रोड Tax पोटी जमा होणारी कोट्यावधी रक्कम जर रस्ते विकसा साठी वापरली जात नसेल तर ती कशा साटी वापली जाते ? बर सरकार जर B.O.T तत्वा वर कुणा कंपनी देत असेल तर टोल आकारणी किती दिवस करावी दर किती असावे ह्या वर सरकारचे नियंत्रन आहे का नाही.
असेल तर त्यांच्या कडुन दर पत्रक का लावले जात नाही. काल परवा च उस्मानाबाद येधे पोलीसानी कारवाइ केली असता ७कोटी चे बनावट पावत्या जप्त केल्या . सरकारी धोरणा नुसार चारचाकी साठि दर हा १५ रु होता पण टोल वसुल करणारे चारचाकी साठि ७० रु आकारत होते आणी हे गेले १० वर्ष चालु होते आता बोला.

समंजस's picture

8 Sep 2010 - 2:44 pm | समंजस

टग्याभौ. आपणांस टोल भरायचा नसल्यास एक सोपा उपाय सांगतो. बाकी आपले ईतर प्रश्न पास :)

'गाडीच्या मागच्या नंबरप्लेट वर एखाद्या राजकीय पक्षाचा झेंडा रंगवा, समोरच्या काचेवर त्याच पक्षाचा झेंडा रंगवा किंवा घोषवाक्य लिहा. गाडीच्या खिडक्यांवर सुद्धा त्याच पक्षाचा झेंडा किंवा घोषवाक्य टाका. आणि बिनधास्त फिरा. फक्त एवढीच काळजी घ्या की ज्या पक्षाचा वापर तुम्ही करणार तो पक्ष एकतर राज्यात सत्ताधारी असायला हवा किंवा त्या त्या महानगरपालिकेत सत्ताधारी असायला हवा किंवा राडेबाज म्हणून नावाजलेला असावा. कुठल्याही टोलनाक्यावर तुम्हाला थांबवले जाणार नाही. तुम्ही बिनधास्त आपली गाडी पुढे न्या कोणीही मागून आवाज देणार नाही' :)

नाही ही चेष्टा नाही. जो उपाय वर सुचवेलेला आहे तो सर्रास वापरल्या जात आहे. मी स्वतः रोजच बघत असतो आणि अनुभव सुद्धा घेतलेला आहे. मुलुंड - नवीमुंबई - पेण - महाड - रत्नागिरी या मुंबई-गोवा महामार्गावर मी स्वतः हा अनुभव घेतला आहे अश्या प्रकारच्या गाडीत बसून. कोणत्याही टोल नाक्यावर टोल न भरता मी प्रवास पुर्ण केला आहे :) [गंमत म्हणजे अश्या प्रकारची कुठलीही गाडी येताना दिसली की टोल नाक्यावरचा पैसे घेणारा माणून या गाडीकडे चक्क दुर्लक्ष करतो आणि मागून येणार्‍या दुसर्‍या गाडी वर त्याचे लक्ष केन्द्रित करतो. ]

चिंतामणी's picture

8 Sep 2010 - 2:52 pm | चिंतामणी

समंजसने लिहीले आहे त्यात भर घालतो.

नंबरप्लेटवर ९चा भरणा असलेला अथव सिंगल डिजीटचा नंबर असावा.

उदा. ९,९९, २२९९ वगैरे.

चिंतामणी's picture

8 Sep 2010 - 2:52 pm | चिंतामणी

समंजसने लिहीले आहे त्यात भर घालतो.

नंबरप्लेटवर ९चा भरणा असलेला अथव सिंगल डिजीटचा नंबर असावा.

उदा. ९,९९, २२९९ वगैरे.

Arun Powar's picture

8 Sep 2010 - 6:47 pm | Arun Powar

रस्ते बांधायचा खर्च आणि रस्त्याची देखभाल, दुरुस्तीसाठी लागणारा खर्च तेवढाच असतो का? दोन्ही गोष्टींसाठी लागणारा खर्चाचा हिशोब कोणाला मिळायला का आजपर्यंत?? राजकारणी लोक आणि रस्ते बनवणार्‍या कंपन्या, "टोल" रुपी मेवा खात आहेत गेली कित्येक वर्षे.!! टोल आकारण्याची मुदत संपून गेली तरी टोल ची रक्कम काही कमी होत नाही. असे का?

चिंतामणी's picture

8 Sep 2010 - 6:57 pm | चिंतामणी

प्रश्न बी तुमीच विचारता आन उत्तर बी तुमीच देत. फकस्त उत्तर आधी आले.

टोल आकारण्याची मुदत संपून गेली तरी टोल ची रक्कम काही कमी होत नाही. असे का? याचे उत्तर

राजकारणी लोक आणि रस्ते बनवणार्‍या कंपन्या, "टोल" रुपी मेवा खात आहेत गेली कित्येक वर्षे.!!

ह्येच हाये.

चिंतामणी भाऊ, आधी आले ते ऊत्तर म्हणून सांगितले नव्हते, ते माझे एक मत होते. काही प्रश्नांची ऊत्तरे एकच असतात असे नाही, म्हणून विचारले शेवटी..!! आणखी कोणाला तरी "छुपी" ऊत्तरे माहीत असावीत ह्यासाठीच होता तो प्रश्न..!

मैत्र's picture

13 Sep 2010 - 5:58 pm | मैत्र

विकांताला कर्नाटक आणी तमिळनाडू मध्ये सुमारे १५० किमी अंतर राष्ट्रीय महामार्गावर प्रवास केला.
सुमारे ८० - १०० रुपये टोल भरला. शिवाय बंगळूरात एलेव्हेटेड ब्रिजचा ३५ रुपये.
अतिशय उत्तम रस्ता, सर्व वळणे, बाण, रस्त्यावरील रबरी मार्किंग्ज, वळणांवरचे ते छोटे रिफ्लेक्टर वजा उंचवटे (जे रस्त्याच्या मध्ये असतात - जर वळण लेन तोडून घेतलं तर त्यावरून जाताना गाडीला छोटा हादरा बसतो)
मध्ये असलेला पूर्ण डिव्हायडर, त्यावर अतिशय नीट ठेवलेली झाडे / फुलझाडे (लोक त्याला कीटकनाशक घालताना, छाटणी करताना दिसत होते).

एन एच ७ आणि त्याहून उत्तम तमिळनाडू मधला एन एच ४६ यावर प्रवास झाला. इतक्या चांगल्या रस्त्यासाठी टोल योग्य आहे असं वाटलं. एकूणात राज्यावर / परिस्थिती वर अवलंबून असावं.