आमचे तुल्यबळ शत्रु श्री. पुण्याचे पेशवे ह्यांच्या 'इतिहासाचे पुनर्लेखन कराच' ह्या आव्हानाला सामोरे जाण्याचे आम्ही ठरवले आहे. तसे त्यांना कळवल्याबरोब्बर त्यांनी आपल्या वाड्यातील एक ओसरी आम्हास नेमस्त करुन दिली आहेच.
असो..
तर नुसत्या बहुजनांच्या इतिहासाचेच नाहीतर राम-लक्ष्मणापासुनच्या संपुर्ण इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचे आम्ही ठरवलेले आहे. त्यासाठी मिपावरील मान्यवर अभ्यासु सदस्यांची मदत मिळाल्यास आमचे कार्य अधिक सुखकर होईल.
आमचे चालु इतिहासा विषयीचे काही आक्षेप :-
१) सर्व देवांना (पुरुष) मग ते अगदी ब्रम्हा-विष्णु-महेशा पासून ते किन्नर गंधर्वांपर्यंत कायम जान्हवे घालुन का दाखवले जाते ? सर्व देव हे ब्राम्हण असल्याचे जनमानसावर ठसवण्याचे हे प्रयत्न का खपवुन घेतले जात आहेत ? ह्याउलट राक्षस व देव विरोधी लोकांना मात्र ब्राम्हणेतर दाखवले जाते. रावण, बिभिषण वगैरे सोडल्यास कुठल्याच राक्षस वा असुराच्या अंगात कधी जान्हवे बघितले आहे का? काही काही हलकट लोकांनी तर शिवाजीराजांना देखील काही चित्रपटात जान्हवे घालुन समोर आणले आहे. हा खोटेपणा कशासाठी ?
ब्रम्हा-विष्णु- महेश ह्या देवतांनी घेतलेले बहुदा सर्व अवतार देखील ब्राम्हण कुळातच घेतल्याचे सतत का लिहिले गेले ? हा खोटा इतिहास का लादला गेला ?
२) राम-लक्ष्मण (हे देखील कायम जान्हवी घातलेलेच) हे १४ वर्षे खरच वनवासात राहिले होते काय ? वालीचा पराभव झाल्यानंतर हे दोघेही सुग्रीवाच्या आश्रयास असल्याचा स्पष्ट उल्लेख आढळतो. ह्याचाच अर्थ ते देखील सुग्रीवासह राजमहालातच निवास करत होते असा होत नाही का ? हे सत्य दडवण्यामागे काय कारण असावे ?
३) द्रौपदीला नावे ठेवणारे कुंतीला आणि माद्रीला का माफ करतात ? कुंतीला आणि माद्रीला पुत्रप्राप्ती कशी झाली हे लोक का विसरतात ?
४) एकलव्य आणि कर्ण हि बहुजनांवर / ब्राम्हणेतरांवर एका विशीष्ठ जातीकडून पुर्वांपार चालु असलेल्या अन्यायाची उदाहरणे नाहीत काय ? त्याविषयावर कोणीच काही का बोलत नाही ? एकलव्याचे तर पुढे काय झाले हे देखील स्पष्ट करताना भले भले दमलेले दिसतात. त्याचा उल्लेख देखील सहसा कुठे पुढच्या भागात आढळत नाही.
५) दादोजी आणि समर्थांचे उदोउदो करणारे आणि इतरांना खरा इतिहास शोधा म्हणुन अक्कल शिकवणारे ज्ञानेश्वरांच्या समाधिची तपासणी करायची मागणी होताच सापासारखे फुत्कार का सोडायला लागतात ? शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे मागणारे ज्ञानेश्वरांनीच ज्ञानेश्वरी लिहिली ह्याचे पुरावे देतील काय ?
गहनीनाथ हे निवृतीनाथांचे गुरु, त्यांच्याच आज्ञेवरुन निवृत्तीनाथांनी गीतेवर प्रवचने दिली तीच पुढे ज्ञानेश्वरी ठरली हे खोटे आहे का ? ज्ञानेश्वरी मध्ये निवृत्तीनाथांसदर्भाचा खालील श्लोक काय दर्शवतो ?
आधीच तो तव कृपाळू । वरी गुरू आज्ञेचा बोलू । जाला जैसा वरिषा काळू । खवळणे मेघा ।।
आर्ताचेनि वोरसे । गीतार्थ ग्रंथनमिसे । वरिखला शांतरसे । तो हा ग्रंथू ।।
तेथ पुढा मी बापिया । माडिला आर्ती आपुलेया । की ययासाठी येवडेया । आणिलो यशा ।।
५) संभाजीराजांवर बदफैलीपणाचा आरोप करणारे बाजीराव-मस्तानीच्या प्रेमाचे मात्र 'अद्वितीय' , 'दैवी' अशी विशेषणे लावुन गोडवे का गातात ? हा दुटप्पीपणा न्हवे काय ?
ह्या आणि अशा अनेक खोट्या संदर्भांचे वस्त्रहरण करणे हाच आमचा ह्या लेखनामागील उद्देश आहे. येथील जाणकार अजुन मुद्दे उपस्थीत करुन इथल्या दांभिक लोकांना घाम फोडतीलच. तुम्हा सर्व जाणकारा अभ्यासुंच्या मदतीने लवकरच नव्या इतिहास सुर्याची पहाट उगवणार आहे हे निश्चीत.
प्रतिक्रिया
3 Sep 2010 - 6:23 pm | llपुण्याचे पेशवेll
चूक. पहील्या बाजीरावालाही रावबाजी म्हणायचे. दुसर्यालाही अर्थात त्याच्या नावामुळे रावबाजी म्हणायचे. दुसर्याला बाजीरायी असेही म्हणायचे.
3 Sep 2010 - 8:19 pm | सूड
>>एक छोटी चुक
रावबाजी हे दुसर्या बाजीरावाला म्हणायचे पहील्या नाही.
Dipankar या गोष्टी तुमच्या पेक्षा पेशव्यांनाच जास्त नाही का माहीत असणार...उगीच हुज्जत घालू नका. ;)
3 Sep 2010 - 3:44 pm | अर्धवट
>>सर्व देवांना (पुरुष) मग ते अगदी ब्रम्हा-विष्णु-महेशा पासून ते किन्नर गंधर्वांपर्यंत कायम जान्हवे घालुन का दाखवले जाते ?
आम्हाला काय माहीत, सर्व चित्रकार, छायाचित्रकार ब्राम्हण आहेत असा उपआरोप समजायचा का? हा प्रश्न त्यांनाच विचारलेला बरा नाही का?
>>रावण, बिभिषण वगैरे सोडल्यास कुठल्याच राक्षस वा असुराच्या अंगात कधी जान्हवे बघितले आहे का?
कधिही कुठल्याही असुराशी प्रत्यक्ष भेटीचा प्रसंग आला नाही, कृपया पत्ता कळवणे.
>>काही काही हलकट लोकांनी तर शिवाजीराजांना देखील काही चित्रपटात जान्हवे घालुन समोर आणले आहे. हा खोटेपणा कशासाठी ?
मीपावर कुणाचे तरी नाव हलकटशी समानार्थी समजले जाते असं ऐकुन आहे. हा प्रश्नाला ते उत्तर देतील काय?
>>ह्याचाच अर्थ ते देखील सुग्रीवासह राजमहालातच निवास करत होते असा होत नाही का ?
राजमहाल वनात असू शकत नाही काय?
>>द्रौपदीला नावे ठेवणारे कुंतीला आणि माद्रीला का माफ करतात ?
हा न्याय करायला कुठले न्यायाधीश आणायचे. वळसे घालुन कोळसे उगाळणारे का?
>>कुंतीला आणि माद्रीला पुत्रप्राप्ती कशी झाली हे लोक का विसरतात ?
कशी झाली ब्वॉ?
उर्वरीत प्रतिसा(वा)द ब्रेक के बाद
3 Sep 2010 - 4:23 pm | मृत्युन्जय
>>कुंतीला आणि माद्रीला पुत्रप्राप्ती कशी झाली हे लोक का विसरतात ?
कशी झाली ब्वॉ?
उगाच वेड पांघरुन पेडगावला जाउ नका. नियोगातुन पुत्रप्राप्ती झाले हे तर सर्वज्ञात आहे. त्या काळी योग्य होते ते. केले तसे तर बिघडले कुठे? फक्त कुंती माद्रीच का, अंबिका अंबालिका यांना सुद्धा पुत्रप्राप्ती तशीच झाली ना? त्यांच्याबाबतीत तर त्यांच्या मनाविरुद्ध झाली. मला या प्रश्नाचा रोखच कळाला नाही.
हा धागा नक्की कशासाठी आहे पराशेठे कळेल का?
ब्राह्मणांबद्दल आहे, कुंती - द्रौपदी बद्दल आहे, की अजुन कशाबद्दल?
3 Sep 2010 - 4:12 pm | प्रकाश घाटपांडे
लोकांना ब्राह्मणी मैना, ब्राह्मणी स्वैपाक वगैरे गोष्टी माहित असतील. मला या लेखनात ब्राह्मणी कावा दिसतो.
ब्राह्मणी काव्या विषयी आम्ही पुरोगामी वैचारिक मासिक आजचा सुधारक ला लिहिले आहे. वाचा
आता क्षत्रिय राम जानव घातलेला का दाखवतात? आमच्या मते पाठ खाजवण्यासाठी जानव्यासारखे दुसरे उत्तम साधन उपलब्ध नाही
3 Sep 2010 - 4:14 pm | ऋषिकेश
आणि किल्ल्या अडकवण्यासाठीही! :)
3 Sep 2010 - 4:19 pm | परिकथेतील राजकुमार
वनवासात कसल्या किल्ल्या ? हा बाणाचा भाता वगैरे बांधायला एकवेळ वापरले जात असेल.
3 Sep 2010 - 4:21 pm | ऋषिकेश
अयोध्येतील महालातील पर्सनल तिजोरीच्या ;)
अयोध्या सोडली तरी सगळ्या किल्ल्या दिल्याचा उल्लेख रामायणात कुठे आहे?
3 Sep 2010 - 4:34 pm | मृत्युन्जय
अहो सीतेने सगळे अलंकार काढुन दिले. वल्कले नेसली. तर आता किल्ल्या घेउन कुठला खजिना जपणार होती ती. उद्या म्हणाल राज्य सोडले पण सिंहासन राम बरोबर घेउन गेला कारण त्याने सिंहासन परत दिल्याचा कुठलाच उल्लेख नाही म्हणुन. :P
3 Sep 2010 - 4:42 pm | ऋषिकेश
बरोबर.. म्हणूनच ती जानवे घालत नसावी ;) :P
3 Sep 2010 - 6:18 pm | असुर
>>>हा बाणाचा भाता वगैरे बांधायला एकवेळ वापरले जात असेल<<<
जानवे होते की नाही इथपासूनच सुरुवात आहे ना! आधी हे सिद्ध करा की जानवे होते!
राम उजवा होता असा उल्लेख आहे रामायणात सीता-स्वयंवराच्या वेळेस. म्हणजे बाण उजव्या हातानेच काढणार भात्यातून! म्हणजे भात्याची दोरी उजव्या खांद्यावरुन जात असणार! मग ते जानवे सव्य घालायचे सोडून भाता बांधायला सोपे जाईल म्हणून कोणी अपसव्य का करेल का? अपसव्य करायला त्यांचे तात तेव्हा हयात होतेच की!
(मायला, जानव्यावर इतका विचार??? आवरा!)
आणि किल्ल्यांचं म्हणाल तर त्या राजवाड्याच्या असतील हो. आमच्या मते जानव्याचा मुख्य उपयोग कानावर किंवा खुंटीवर (संदर्भ: बावन्नखणी) टांगण्यासाठी होतो! :-)
3 Sep 2010 - 6:22 pm | मेघवेडा
बरं रामाचं सोडा.. अर्जुनाला सव्यसाचि हे नावं यावरूनच पडलं असावं! सव्यापसव्याचा हा खेळ तो लीलया करत असणार! :)
3 Sep 2010 - 6:37 pm | यशोधरा
हे लय भारी मेव्या! :)
3 Sep 2010 - 6:46 pm | असुर
अर्जुनाला परवानगी असली पाहिजे, कारण त्यांचे तीर्थरूप सव्यापसव्याचा भार त्याच्या (दोन्ही) खांद्यावर टाकून गेले होते. :-)
3 Sep 2010 - 6:26 pm | अवलिया
>>>>राम उजवा होता असा उल्लेख आहे रामायणात सीता-स्वयंवराच्या वेळेस.
काय सांगता ? रामायणात आणि चक्क राम सीता स्वयंवरात ? जरा डीट्टेल देता का त्याचे नक्की काय काय झाले तेव्हा !!
3 Sep 2010 - 6:29 pm | नरेश धाल
3 Sep 2010 - 6:41 pm | असुर
असं गृहित धरुन की आपण एकाच रामाबद्दल बोलतो आहोत, सीता-स्वयंवराच्या वेळी रामाने शिवधनुष्य उचलले ते डाव्या हाताने (जी एखाद्या उजव्या हाताच्या व्यक्तीसाठी नैसर्गिक गोष्ट आहे) आणि उजव्या हाताने प्रत्यंचा जोडायचा प्रयत्न केला असता ते धनुष्य तुटले. वाल्मिकिरामायणात हे वर्णन आहे. माझ्याकडे याचा श्लोक सद्ध्या उपलब्ध नाहिये, त्यामुळे पुरावा नाही असा दावा तुम्ही करु शकता. सद्य परिस्थितीत तो अगदीच गैरवाजवी नाही.
तो श्लोक मिळाला की इथे च्योप्य पस्ते करतो!
3 Sep 2010 - 6:49 pm | अवलिया
सीता स्वयंवराच्या वेळी राम होता की सीता स्वयंवर झाल्यावर कुणीही पण न जिंकल्याने अविवाहित राहिलेल्या सीतेच्या त्या स्वयंवराची माहिती मिळाल्यावर ते शिवधनुष्य आहे तरी कसे हे पहायला बर्याच काळाने राम मिथिलेला गेला होता?
3 Sep 2010 - 6:54 pm | असुर
आमचे मत वर एकदा सांगून झाले असल्याने पुनर्लेखित करीत नाही! आपणास काही वेगळी माहीती असल्यास सांगावी. माझ्या ज्ञानात भर पडेलच, अधिक प्रस्तुत लेखकाचा विषय इतिहासाचे (+/- पुराणांचे देखील) पुनर्लेखन आहे, त्यांनाही एक वेगळा दृष्टीकोन मिळेल! कसे?
3 Sep 2010 - 6:56 pm | अवलिया
असे भडकु नका. अज्ञ लोकांना शहाणे करा.. इतिहास असा भडकुन लिहिला जात नाही.
3 Sep 2010 - 7:19 pm | असुर
असं भपकन (!) भडकायला मी त्या बाबतीत इतका प्रवीण नाही हो!
उलट पुनर्लेखन चालूच आहे तर आपणही आपल्या पोतडीत काही जादुई माहीती असेल तर बाहेर काढा असा घाऊक आग्रह आहे हा! यात चिडाण्याजोगं काही आहे का आता..
असो, तुम्ही माहीती देत होता!
4 Sep 2010 - 5:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
इतिहासाचार्यांचा एकेरी उल्लेख खटकला.
4 Sep 2010 - 5:13 pm | असुर
ओ ३_१४ तै,
ते राजवाडे वायले ओ! तेनला मदे आनू नका तुमी!
हे राजवाडा बद्दल चाललंय..
काय ना म्हणजे, कोन काय सोचेल काय भरवसा नाय!
3 Sep 2010 - 4:37 pm | प्रियाली
कारण ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे तीनही वर्ण पूर्वी मुंज करत. तिथून मुंजीचा प्रवास फक्त ब्राह्मण्यापर्यंत कसा झाला ते ठाऊक नाही. बहुधा मध्ययुगाचा महिमा असावा.
नाही याचा अर्थ ते राजमहालात होते असा होतोच असे नाही (नक्की सांगता येत नाही) कदाचित, सुग्रीव किंवा वानरांमुळे सुरक्षित असणार्या किष्किंधा नगरीजवळील वनात त्यांचे वास्तव्य असावे.
बहुधा द्रौपदीची महती मोठी. ;-) किंवा तिला पाच पतिव्रतांमध्ये स्थान मिळाले म्हणूनही असेल. अर्थातच, वरील तिघींना नावे ठेवणारे मूर्ख आहेत असे मला वाटते. असो.
बोलायची मुभा आणि शक्ती मिळाल्यावर अनेक लोक बोललेले आहेत असे वाटते. प्रश्न काळाला अनुसरून वाटला नाही.
५ वा प्रश्न दोनदा आला आहे तो ५ वा आणि ६ वा असावा असे धरते. दोन्ही प्रश्नांत मला दोन्ही बाजूंचा थोडाफार द्वेष दिसतो. इतिहासाचा अभ्यास द्वेषाने करू नये हेच खरे. असो.
3 Sep 2010 - 4:46 pm | अरुण मनोहर
>>कारण ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तीनही जाती पूर्वी मुंज करत. तिथून मुंजीचा प्रवास फक्त ब्राह्मण्यापर्यंत कसा झाला ते ठाऊक नाही.<<
या काळात देखील क्षत्रीय आणि वैश्य लोकांमधे मुंज होते. मी अशा मुंजींना गेलो आहे.
3 Sep 2010 - 4:53 pm | प्रकाश घाटपांडे
अशा गोष्टी अपवादात्मक असतात प्रातिनिधिक नव्हे. बाबा महाराज सातारकरांनी मुलाची मुंज केली होती किंवा तसा घाट घातला होता त्यावर टीका झाली होती.
मुंजीच माहित नाही पण लग्नाअगोदर म्हणे सोडमुंज करतात त्यावेळी कुठली आचमने हल्ली घेतात कुणास ठाउक? ;)
3 Sep 2010 - 7:22 pm | मिसळभोक्ता
मुंजीच माहित नाही पण लग्नाअगोदर म्हणे सोडमुंज करतात त्यावेळी कुठली आचमने हल्ली घेतात कुणास ठाउक?
ह्या सोडमुंजीला हली ब्याचलर पार्टी असे नाव आहे.
अधिक माहिती साठी आमचा अत्यंत आवडता चित्रपट "द हँगओव्हर" बघावा.
3 Sep 2010 - 9:31 pm | असुर
हँगओव्हर चित्रपटातील नवरोबाची मुंज झालेली होती याचा पुरावा सादर करावा!
सोडमुंज म्हणजे ब्याचलर प्यार्टी हा मुद्दा (व्यक्तिशः मला मान्य असला तरीही) त्यानंतरच ग्राह्य धरण्यात येईल. ;-)
एकदा हा मुद्दा क्लियर झाला की अशी सोडमुंज ही तीर्थक्षेत्री (पक्षी: लास व्हेगास) करावी की नाही याबाबत मिपाकरांना एक कौल लावता येईल. :-)
3 Sep 2010 - 4:58 pm | llपुण्याचे पेशवेll
सहमत आहे. आमच्या वर लिहीलेल्या प्रतिसादातही तसे लिहीले आहे. सदर धाग्याचा उद्देश आपली संस्कृती कशी वाईट आहे हे दाखवणेच दिसतो आहे.
3 Sep 2010 - 4:44 pm | अरुण मनोहर
>>सर्व देवांना (पुरुष) मग ते अगदी ब्रम्हा-विष्णु-महेशा पासून ते किन्नर गंधर्वांपर्यंत कायम जान्हवे घालुन का दाखवले जाते ? सर्व देव हे ब्राम्हण असल्याचे जनमानसावर ठसवण्याचे हे प्रयत्न का खपवुन घेतले जात आहे>>
माझ्या माहितीप्रमाणे पुर्वीपासून मुंज आणि जानवे हे ब्राह्मण, क्षत्रीय आणि वैश्य लोकांमधे आहे. ज्ञानार्जनाची सुरवात करतांनाचा विधी म्हणून मुंजीचे महत्व आहे. जुन्या काळच्या दुर्दैवी समाजकारणाने शूद्र वर्णीयांना शिक्षणापासून वंचीत ठेवले, म्हणून मुंज विधी पण नाकारला. असे इतर तीन वर्णांमधे नाही.
3 Sep 2010 - 6:26 pm | चिंतामणी
ज्ञानार्जनाची सुरवात करतांनाचा विधी म्हणून मुंजीचे महत्व आहे.
सहमत.
3 Sep 2010 - 7:36 pm | मिसळभोक्ता
ज्ञानार्जनापेक्षा, मामाच्या मुलीवर पहिला क्लेम करण्यासाठी मुंजीचे महत्त्व आहे.
4 Sep 2010 - 9:37 am | llपुण्याचे पेशवेll
ओ ते मुंजीचे नाही सोडमुंजीचे.
मुंजीत लंगोटी लावून भिक्षावळीला बसायचं अन नंतर ब्रम्हचारी होऊन गुरुगॄही जायचं. सोडमुंजीत मामाची मुलगी वगैरे.
3 Sep 2010 - 4:45 pm | इंटरनेटस्नेही
कूल!
(परा साहेबांचा फॅन)
3 Sep 2010 - 4:45 pm | चतुरंग
लक्ष ठेवून आहे धाग्यावर. बाकी आपला इतिहासाचा एवढा अभ्यास नाही की ह्यावर काही बोलावे. चालू द्या.
रंगा
4 Sep 2010 - 1:26 am | बेसनलाडू
धागा छान होता. सविस्तर प्रतिसाद देण्याइतपत माहिती आणि वादविवाद, चर्चेइतपत मुद्दे होते. पण अनावश्यक, अवांतर प्रतिसाद पाहून प्रतिसाद द्याची इच्छाच मरून गेली. त्यामुळे धाग्यावर लक्ष ठेवूनच आहे/असणार आहे.
असो. चालू द्यात.
(सुस्पष्ट)बेसनलाडू
4 Sep 2010 - 4:39 am | भारी समर्थ
का उगा नसतं कातडं पांघरताय राव.....
हे म्हंजी रविंद्र जाडेजा टीममधी असल्यामुळं सचिननी क्रिकेट सोडण्यासारखंय....
तुमचं काम तुम्ही करा ना...का उगा दुसर्याच्या पाण्याव डोळा?
भारी समर्थ
4 Sep 2010 - 4:56 am | बेसनलाडू
हरकत असल्यास सांगावी. दूर करता आल्यास पाहतो.
हरकत नसल्यास, कृपया आपले काम करा.
(आगाऊ)बेसनलाडू
3 Sep 2010 - 4:49 pm | विंजिनेर
साफ चूक. विष्णूचा पहिला अवतार हा ब्राम्हण कुळातला होता (आणि हे कळल्यापासूनच आजकालचे ब्राम्हण 'ते' चापताना आढळतात)अशी धूळफेक तुम्हाला करायची आहे का?
पहिल्याच मुद्द्यावर क्लिन बोल्ड झाल्यामुळे फुडे कण्टिन्यु करण्यात हशील नाही.
अवांतर: सौंफुमध्ये ब्राम्हण जास्त का ब्राम्हणेतर? ;)
3 Sep 2010 - 4:52 pm | परिकथेतील राजकुमार
3 Sep 2010 - 5:14 pm | चतुरंग
सौंफु मधे सौंला महत्त्व बाकीच्या गोष्टी फाट्यावर! ;)
(आगीतला)रंगा
3 Sep 2010 - 5:34 pm | कापूसकोन्ड्या
काही अर्थबोध झाला नाही.असो.
या वरून एक विनोद आठवला. ब्राह्मण (किंवा ब्राह्मणेतर) हा शब्द कसा लिहायचा या वर वाद सुरू होता. म्हणजे ह अर्धा नी म पूर्ण, की म अर्धा आणि ह पूर्ण.?? अगोदर ह की म वगैरे.
5 Sep 2010 - 3:23 am | शुचि
सौंदर्यफुफाटा !!
म्हणजे काय मलाही नीटसं माहीत नाही.
5 Sep 2010 - 3:49 am | शिल्पा ब
सगळीकडे प्रचंड सौंदर्य..म्हणजे सौंदर्य फुफाटा..
5 Sep 2010 - 9:26 am | सूड
हा असा अर्थ असेल तर 'आगीतून उठून फुफाट्यात' हे बर्या गोष्टीतून उत्तम गोष्टीकडे जाणे असे होईल.
3 Sep 2010 - 4:51 pm | बाप्पा
अर्धवटराव, नावाप्रमाणेच शंका विचारलीत..
3 Sep 2010 - 4:57 pm | मेघवेडा
सर्व देवांना (पुरुष) मग ते अगदी ब्रम्हा-विष्णु-महेशा पासून ते किन्नर गंधर्वांपर्यंत कायम जान्हवे घालुन का दाखवले जाते ? सर्व देव हे ब्राम्हण असल्याचे जनमानसावर ठसवण्याचे हे प्रयत्न का खपवुन घेतले जात आहेत ? ह्याउलट राक्षस व देव विरोधी लोकांना मात्र ब्राम्हणेतर दाखवले जाते. रावण, बिभिषण वगैरे सोडल्यास कुठल्याच राक्षस वा असुराच्या अंगात कधी जान्हवे बघितले आहे का? काही काही हलकट लोकांनी तर शिवाजीराजांना देखील काही चित्रपटात जान्हवे घालुन समोर आणले आहे. हा खोटेपणा कशासाठी ?
सर्वप्रथम उपनयन संस्कार हा केवळ ब्राह्मणांसाठीच होता/आहे ही समजुतच मुळात चुकीची आहे. या शब्दाचा अर्थ जाणून घेणे आधी महत्त्वाचे आहे. चातुर्वर्णीय संस्था ही खूप अलिकडची आहे हो त्यामानाने. तरीही चातुर्वर्णीय संस्थेतही ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य तिघांनाही उपनयन संस्कार सांगितलेला आहेच. मुळात गुरुगृही शिक्षण घेण्यास इच्छुक असणार्यांचा उपनयन संस्काराने विद्यारंभ होत असे. यज्ञोपवीत हे त्या काळी शिक्षणाचा पासपोर्टच होता म्हणा ना. ज्याला शिकायची इच्छा असेल त्याने यज्ञोपवीत धारण करणे अनिवार्यच होते. विवाहाप्रमाणेच उपनयनातही मनुष्याला शपथा घ्यायच्या असतात. म्हणजेच यज्ञोपवीत धारण केलेल्याने उपनयनात घेतलेल्या शपथांचे, ब्रह्मचर्याचे पालन केलेले आहे आणि योग्य ते शिक्षण घेतलेले आहे!
पण प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असणारच. आजच्याप्रमाणेच त्याकाळीदेखील विरोधक हे असणारच. ज्यांना उपनयनाच्या शपथा पटल्या नाहीत, त्यांनी ब्रह्मचर्याचे पालन केले नाही, मग तेच असुर ठरले असावेत. त्यांनी आपल्या मुलांवरदेखील आपल्याच विचारांचे संस्कार केले असावेत! म्हणून कुणाच असुराच्या अंगात यज्ञोपवीत दाखवले जात नसावे. आणि रावण बिभीषण हे चांगले म्हटलेले ब्राह्मण होते राव. आणि महाराजांचाही उपनयन संस्कार झालेलाच होता.
यावरून तोच जुना श्लोक आठवला - "अग्रतश्चतुरो वेदा: पृष्ठतः सशरं धनु। इदं ब्राह्मं इदं क्षात्रं, शापादपि शरादपि॥
3 Sep 2010 - 4:57 pm | कापूसकोन्ड्या
माननीय श्री. परिकथेतील राजकुमार यांस विनंती. आणखी काड्या घालू नका.
जाती मोडा असे मोठे लोक सांगून गेले आहेत त्यांचा आदर राखा.
हा धागा नसून काडी आहे असे वाटते. ( काडी - दोन अर्थानी - घालणे आणि लावणे) .जातीच्या पूर्वग्रह दुषित विचाराने बरबटलेला धागा वाटतो. उदाहरणच द्यायचे झाले तर धाग्याचा विषय.
हा पहा
धोरण
मांडणी
संस्कृती
वावर
धर्म
विनोद
इतिहास
समाज
जीवनमान
तंत्र
राहणी
राजकारण
शिक्षण
मौजमजा
प्रकटन
मत
विचार
संदर्भ
चौकशी
बातमी
सल्ला
प्रश्नोत्तरे
माहिती
प्रतिक्रिया
वाद
प्रतिभा
विरंगुळा
आपल्या इतिहास लेखनास हार्दिक शुभेच्छा !!
आपले लेखन करण्याच्या अधिकाराची पूर्ण जाणीव आणि आदर ठेवून हा माझा प्रतिक्रिया देण्याचा हक्क बजावत आहे.
अवांतर चला आता २२६ चे रेकॉर्ड मोड्ण्याची 'तोड ' झाली.
इतिहासप्रेमी कापूसकोन्ड्या
3 Sep 2010 - 6:28 pm | llपुण्याचे पेशवेll
जाती मोडा असे मोठे लोक सांगून गेले आहेत त्यांचा आदर राखा.
ते कितीही मोठे असले तरी ते चुकले. आणि त्यांनी शक्याशक्यतेचा विचार केला नाही असे म्हणावे लागते आहे.
3 Sep 2010 - 5:03 pm | सहज
मनात आलेले वाट्टेल ते लिहून टाकणारे लेख(न) थांबवा!
नुकतेच असे रेसीडेंट इव्हील आपलं रेसीडेंट इतिहास तज्ञांनी सांगीतले होते ना.
3 Sep 2010 - 7:24 pm | मिसळभोक्ता
श्री सहजरावांचा एक धागा पापुलर झाल्याने त्यांना आता इतर पापुलर धागे बघवत नाहीत.
3 Sep 2010 - 6:13 pm | भाऊ पाटील
युद्ध परा-पुपे करणार | समर्थ-दादोजी मूळ आधार |
ढगफुटी प्रतिसाद येणार |राघा रडणार निश्चित ||
3 Sep 2010 - 6:16 pm | यशोधरा
:D सह्ही आहे!
3 Sep 2010 - 6:39 pm | मृत्युन्जय
१) सर्व देवांना (पुरुष) मग ते अगदी ब्रम्हा-विष्णु-महेशा पासून ते किन्नर गंधर्वांपर्यंत कायम जान्हवे घालुन का दाखवले जाते ? सर्व देव हे ब्राम्हण असल्याचे जनमानसावर ठसवण्याचे हे प्रयत्न का खपवुन घेतले जात आहेत ? ह्याउलट राक्षस व देव विरोधी लोकांना मात्र ब्राम्हणेतर दाखवले जाते. रावण, बिभिषण वगैरे सोडल्यास कुठल्याच राक्षस वा असुराच्या अंगात कधी जान्हवे बघितले आहे का? काही काही हलकट लोकांनी तर शिवाजीराजांना देखील काही चित्रपटात जान्हवे घालुन समोर आणले आहे. हा खोटेपणा कशासाठी ?
महेश हा पुर्वापार द्राविडांचा (राहुला द्रवडांचे पुर्वज नव्हे. हे वेगळे) देव मानला जातो. त्यामुळे शिवाचे सर्व अवतार अब्रह्मण्य आहेत. उदाहरणार्थे - हनुमान. शिवाय शंकराने असे विष्णुसारखे अवतार घेतल्याचे ऐकीवात नाही. तर मग हा शोध कुठुन लावलात की त्याचे अवतार ब्राह्मण म्हणुन दाखवले गेले आहेत. ब्रम्हाने सुद्धा असे अवतार घेतल्याचे ऐकीवात नाही. तुम्ही नक्की कुठल्या अवतारांबद्दल बोलत आहात?
शिवाजीराजांना जान्हवेधारी दाखवले असेल तर त्यात चुक ते काय? त्यांची मुंज आणि सोडमुंज झालीच होती ना? केवळ त्यासाठी त्यांचे एक लग्न देखील करवण्यात आले होते म्हणे.
ब्रम्हा-विष्णु- महेश ह्या देवतांनी घेतलेले बहुदा सर्व अवतार देखील ब्राम्हण कुळातच घेतल्याचे सतत का लिहिले गेले ? हा खोटा इतिहास का लादला गेला ?
पुप्यांनी म्हणल्याप्रमाणे विष्णुचे बरेच अवतार अब्राह्मण्य होते. त्यात पशु पण आले. आता विष्णुने गाढवाचा अवतार न घेउन गाढवांचा अपमान केला असे म्हणाल उद्या तुम्ही.
२) राम-लक्ष्मण (हे देखील कायम जान्हवी घातलेलेच) हे १४ वर्षे खरच वनवासात राहिले होते काय ? वालीचा पराभव झाल्यानंतर हे दोघेही सुग्रीवाच्या आश्रयास असल्याचा स्पष्ट उल्लेख आढळतो. ह्याचाच अर्थ ते देखील सुग्रीवासह राजमहालातच निवास करत होते असा होत नाही का ? हे सत्य दडवण्यामागे काय कारण असावे ?
ते दोघे सुग्रीवाच्या आश्रयास नव्हते. उलट जेव्हा सुग्रीव बरेच दिवस निरोप धाडेना तेव्हा स्वतः लक्ष्मण जाउन त्याची कानौघडणी करुन आला होता.
३) द्रौपदीला नावे ठेवणारे कुंतीला आणि माद्रीला का माफ करतात ? कुंतीला आणि माद्रीला पुत्रप्राप्ती कशी झाली हे लोक का विसरतात ?
उत्तर आधीच दिले आहे. तसे मग तुम्ही अंबिका , अंबालिकेला देखील नावे ठेवणार काय?
४) एकलव्य आणि कर्ण हि बहुजनांवर / ब्राम्हणेतरांवर एका विशीष्ठ जातीकडून पुर्वांपार चालु असलेल्या अन्यायाची उदाहरणे नाहीत काय ? त्याविषयावर कोणीच काही का बोलत नाही ? एकलव्याचे तर पुढे काय झाले हे देखील स्पष्ट करताना भले भले दमलेले दिसतात. त्याचा उल्लेख देखील सहसा कुठे पुढच्या भागात आढळत नाही.
एकल्व्याला पुढे कृष्णाने म्हणजे एका क्षत्रियाने मारले. त्याचा अंगठा देखील एका क्षत्रियाच्या जळफळाटामुळे गेला.
५) दादोजी आणि समर्थांचे उदोउदो करणारे आणि इतरांना खरा इतिहास शोधा म्हणुन अक्कल शिकवणारे ज्ञानेश्वरांच्या समाधिची तपासणी करायची मागणी होताच सापासारखे फुत्कार का सोडायला लागतात ?
मग काय समाध्या उकराव्या की काय आता?
शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे मागणारे ज्ञानेश्वरांनीच ज्ञानेश्वरी लिहिली ह्याचे पुरावे देतील काय ?
काय पुरावे पुरावे चालवले आहे. पुरुन टाका एकदाचे दोघांच्याही आठवणींना म्हणजे सगळे सुखेनैव राहायला मोकळे.
काय पुरावा हवा तुम्हाला. पुरावा म्हणजे काय ते आधी स्पष्ट करा.
गहनीनाथ हे निवृतीनाथांचे गुरु, त्यांच्याच आज्ञेवरुन निवृत्तीनाथांनी गीतेवर प्रवचने दिली तीच पुढे ज्ञानेश्वरी ठरली हे खोटे आहे का ? ज्ञानेश्वरी मध्ये निवृत्तीनाथांसदर्भाचा खालील श्लोक काय दर्शवतो ?
आधीच तो तव कृपाळू । वरी गुरू आज्ञेचा बोलू । जाला जैसा वरिषा काळू । खवळणे मेघा ।।
आर्ताचेनि वोरसे । गीतार्थ ग्रंथनमिसे । वरिखला शांतरसे । तो हा ग्रंथू ।।
तेथ पुढा मी बापिया । माडिला आर्ती आपुलेया । की ययासाठी येवडेया । आणिलो यशा ।।
हेच हेच उरले होते आता. व्यासांनी पण महाभारत कोणाकडुन तरी चोरले असे जाहीर करुन टाका ना एकदाचे.
५) संभाजीराजांवर बदफैलीपणाचा आरोप करणारे बाजीराव-मस्तानीच्या प्रेमाचे मात्र 'अद्वितीय' , 'दैवी' अशी विशेषणे लावुन गोडवे का गातात ? हा दुटप्पीपणा न्हवे काय ?
यात मस्तानी मुसलमान होती ना. ;) आता कळाले ते दैवी का ते?
3 Sep 2010 - 6:45 pm | अवलिया
ते दोघे सुग्रीवाच्या आश्रयास नव्हते. उलट जेव्हा सुग्रीव बरेच दिवस निरोप धाडेना तेव्हा स्वतः लक्ष्मण जाउन त्याची कानौघडणी करुन आला होता.
अगदी अगदी
यावरच आम्ही टणत्कार लेख लिहिला होता, तेव्हा अनेकांच्या मनात धडकी भरली होती असे आमचे गुप्तहेर कळवतात.
3 Sep 2010 - 6:45 pm | sagarparadkar
सौंफु म्हणजे काय याचा अजूनही उलगडा झालेला नाही ... कमीत कमी वेळात जास्तीत जास्त प्रतिसाद मिळवणार्या धाग्यांना मिसळ्पावतर्फे काही बक्षिस मिळते का हो?
3 Sep 2010 - 7:05 pm | ज्ञानोबाचे पैजार
ते बराक ओबामा पण जानवे घालते का हो?
नसल घालत तर ते कोण? क्षत्रीय, वैश्य, की क्षृद्र ?
त्याचा पण खुलासा काय तो अत्ताच करा,
पैजारबुवा
3 Sep 2010 - 7:20 pm | llपुण्याचे पेशवेll
सध्या ते मुसुलमान असल्याचे कळते. ख्रिस्चन असल्याचा संशय आहे. पुढे मागे त्यांनी हिदू धर्माचा ऑफिशियली स्विकार केला तर इथेच त्यांना कोणत्या जातीत टाकायचे यावर धागा झालेच तर कौलही काढता येईल. आधी त्यांनी हिंदू होणे गरजेचे आहे.
3 Sep 2010 - 7:24 pm | sagarparadkar
ती बया आता हिंदू धर्माचे पालन करते म्हणे ... मग तिला कोणत्या जातीत टाकणार आहात ...
3 Sep 2010 - 7:33 pm | llपुण्याचे पेशवेll
कौल काढा. तिथे लोकशाही मार्गाने निर्णय करता येईल.
6 Sep 2010 - 2:55 pm | सुहास..
सध्या ते मुसुलमान असल्याचे कळते >>>
हा 'मुसुलमान' नावाचा कोणता धर्म आहे ते कळेल का ??
6 Sep 2010 - 2:57 pm | अवलिया
ते "मुसु लमाण" असे असावे काय असा विचार मनात आला.
6 Sep 2010 - 3:50 pm | llपुण्याचे पेशवेll
मुसुलमान म्हणजे मुसलमान. हल्ली एका विशिष्ठ धर्माबद्दल काहीही लिहीले तरी उगा टीकेचे धनी व्हावे लागते म्हणूस सदर शब्द एक उकार वाढवून वापरला आहे. म्हणजे झी मराठी वाले काही कॉपीराईट असलेली गाणी कशी चाल बदलून दुसर्या गायकाकडून गाऊन घेतात तसे.
6 Sep 2010 - 7:04 pm | परिकथेतील राजकुमार
पण म्हणजे एक उकार बदलल्याने ह्या धर्माची 'चाल' देखील बदलेल असा भाबडा विश्वास पुपे ह्यांना आहे का ?
3 Sep 2010 - 7:39 pm | sagarparadkar
समाजात दुहीची बीजे पेरण्याचे काही समाज्कंटकांचे उद्योग कायमच का यशस्वी होतात ? मी येथील कोणत्याही सदस्याला समाज्कंटक संबोधत नाहीये याची कॄपया नोंद घ्यावी ...
पण माझ्या लहानपणी कमी होत चाललेले जातीभेद २१ व्या शतकात असे परत उफाळून का यावेत?
3 Sep 2010 - 10:00 pm | ज्ञानेश...
पण माझ्या लहानपणी कमी होत चाललेले जातीभेद २१ व्या शतकात असे परत उफाळून का यावेत?
तुम्ही (बहुधा श्रामोंचा सल्ला मनावर घेऊन) मोठे झालात हेच त्याचे कारण असावे.
3 Sep 2010 - 8:21 pm | अर्धवटराव
मिपा वर जाती-धर्माच्या नावावर अतीरेकी विचार-चर्वेणे होताहेत, असा सूर काहि दिवसापूर्वी वाचनात आला. जुने जाणते सदस्य देखील याच द्वेशाने पछाडले जाताहेत, याच सखेद आश्चर्य वाटतं. धाग्यावर आगोदरच अनेक योग्य प्रतीसाद आले आहेत. प.रा साहेबांच्या अनेक शंका एव्हाना मिटल्या असतील असे वाटते... अर्थात, त्यांना खरच शंका असतील तर. झोपेचे सोंग घेणार्याला कोण उठवणार ??
१) सर्व देवांना (पुरुष) मग ते अगदी ब्रम्हा-विष्णु-महेशा पासून ते किन्नर गंधर्वांपर्यंत कायम जान्हवे घालुन का दाखवले जाते ? सर्व देव हे ब्राम्हण असल्याचे जनमानसावर ठसवण्याचे हे प्रयत्न का खपवुन घेतले जात आहेत ? ह्याउलट राक्षस व देव विरोधी लोकांना मात्र ब्राम्हणेतर दाखवले जाते. रावण, बिभिषण वगैरे सोडल्यास कुठल्याच राक्षस वा असुराच्या अंगात कधी जान्हवे बघितले आहे का? काही काही हलकट लोकांनी तर शिवाजीराजांना देखील काही चित्रपटात जान्हवे घालुन समोर आणले आहे. हा खोटेपणा कशासाठी ?
--- जानवे आणि मुंज याबद्दल योग्य प्रतीसाद अगोदरच आले आहेत. माझ्या एक महार जातितल्या मित्राने थाटात मुंज केली होती. मला सुद्धा मुंज हा केवळ ब्राह्मणी संस्कार वाटायचा. पण मग थोडी माहिती काढली असता हा संस्कार सर्वांना उपलब्ध असल्याचे कळले. तेंव्हा जानवे आणि ब्राह्मणजात यांचा तसा काहि संबंध नाहि.
ब्रम्हा-विष्णु- महेश ह्या देवतांनी घेतलेले बहुदा सर्व अवतार देखील ब्राम्हण कुळातच घेतल्याचे सतत का लिहिले गेले ? हा खोटा इतिहास का लादला गेला ?
-- असा कुठलाहि इतीहास लिहीलेला नाहि. मुळात विष्णुचे दशावतार आणि काहि शिव अवतार या पलिकडे आपण पुराण साहित्य वाचत नाहि. आणि मुळात हे दैवी अवतार केवळ सामाजीक अंगाने अभ्यासणे हेच चुक आहे. त्यांचा अध्यात्मीक संदर्भ लक्षात न घेता केवळ जातीव्यवस्थेच्या चश्म्याने या गोष्टींकडे बघणे म्हणजे एखाद्या कवीने उपग्रह तंत्रज्ञान बघण्या सारखे आहे. त्याला त्या वैज्ञानिक सामुग्रीचा रंग, आकार दिसेल... बाकि बोंब.
२) राम-लक्ष्मण (हे देखील कायम जान्हवी घातलेलेच) हे १४ वर्षे खरच वनवासात राहिले होते काय ? वालीचा पराभव झाल्यानंतर हे दोघेही सुग्रीवाच्या आश्रयास असल्याचा स्पष्ट उल्लेख आढळतो. ह्याचाच अर्थ ते देखील सुग्रीवासह राजमहालातच निवास करत होते असा होत नाही का ? हे सत्य दडवण्यामागे काय कारण असावे ?
-- असा अर्थ निघण्याचे काहिही कारण दिसत नाहि. काढतोच म्हटल तर कुठल्याही गोष्टीचा काहिही अर्थ निघु शकतो हो... मुळात "राम" हा विषय इतका गहन गुढ आहे कि त्याच्या एखाद्या कृतीच्या अभ्यासाला उभा जन्म पुरायचा. आणि पराशेठ तर तडक निश्कर्षाप्रत पोचलेत. पराशेठ सत्य दडवण्याचे म्हणताहेत... अहो या सत्यपरिक्षणाच्या चरम सिमेवर रामाची सुरुवात होते... खैर, यावर बोलायची आमची लायकी नाहि राव..पण मित्रत्वाचा सल्ला अवश्य देउ. राम हे अमृत तुम्हा-आम्हाला जीवन रस देण्याकरता आहे... त्याचा असा गटारा सारखा उपयोग करु नका. अधीक काय बोलावे...
३) द्रौपदीला नावे ठेवणारे कुंतीला आणि माद्रीला का माफ करतात ? कुंतीला आणि माद्रीला पुत्रप्राप्ती कशी झाली हे लोक का विसरतात ?
-- दौपदीला कोणिही नावे ठेवली नाहित. ती पंचकन्यांमध्ये लिस्टेड आहे. एखाद्या अडाणी माणसाला पडणारे असे प्रश्न परा सारख्यांना का पडतात हाच प्रश्न मला पडलाय.
४) एकलव्य आणि कर्ण हि बहुजनांवर / ब्राम्हणेतरांवर एका विशीष्ठ जातीकडून पुर्वांपार चालु असलेल्या अन्यायाची उदाहरणे नाहीत काय ? त्याविषयावर कोणीच काही का बोलत नाही ? एकलव्याचे तर पुढे काय झाले हे देखील स्पष्ट करताना भले भले दमलेले दिसतात. त्याचा उल्लेख देखील सहसा कुठे पुढच्या भागात आढळत नाही.
-- एकलव्यावर नक्कीच अन्याय झाला, आणि कर्णावरही. सामाजीक उतरंडीत एका स्तरावरच्या लोकांवर अन्याय का होतो आणि तो टाळायला काय करायला हवे हा प्रश्न नेहमीच समाजकारणाच्या ऐरणीवर राहिला आहे. आज सर्वात जास्त अन्याय सुस्थीतीत आलेल्या बहुजनांकडुन (क्रीमी लेयर) गरीब बहुजनांवर होत आहे.
५) दादोजी आणि समर्थांचे उदोउदो करणारे आणि इतरांना खरा इतिहास शोधा म्हणुन अक्कल शिकवणारे ज्ञानेश्वरांच्या समाधिची तपासणी करायची मागणी होताच सापासारखे फुत्कार का सोडायला लागतात ? शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे मागणारे ज्ञानेश्वरांनीच ज्ञानेश्वरी लिहिली ह्याचे पुरावे देतील काय ?
-- दादोजी आणि समर्थांचे राजकीय, शैक्षणीक कार्य हे ज्ञानेश्वरांच्या योगीक समाधीपेक्षा अगदी भिन्न स्वरुपाचे आहे. त्यांची तुलनाच मुर्खपणाची आहे. ज्ञानेश्वरांच्या समाधीची तपासणी करुन काय शोधायचे आहे? ओब्जेक्टीव्ह क्लीअर आहे काय ? मुळात आपण एका योगीक घटनेनची छानबीन करायची मागणी करतोय, तेही स्वतःला त्यातले काहिही कळत नसताना.. हे बिंडोकपणाचे नाहि काय?
आणि शिवप्रभुंच्या पराक्रमाचे पुरावे मागणारे करंटे लोकही आहेत हे मला आजच कळले. अश्या लोकांना तुम्ही काहिच पुरावा देउ शकत नाहि. कोणाला सूर्य दिसत नसेल तर तो आंधळा तरी आहे किंव्हा त्याने डोळे तरी झाकले आहेत...
गहनीनाथ हे निवृतीनाथांचे गुरु, त्यांच्याच आज्ञेवरुन निवृत्तीनाथांनी गीतेवर प्रवचने दिली तीच पुढे ज्ञानेश्वरी ठरली हे खोटे आहे का ? ज्ञानेश्वरी मध्ये निवृत्तीनाथांसदर्भाचा खालील श्लोक काय दर्शवतो ?
आधीच तो तव कृपाळू । वरी गुरू आज्ञेचा बोलू । जाला जैसा वरिषा काळू । खवळणे मेघा ।।
आर्ताचेनि वोरसे । गीतार्थ ग्रंथनमिसे । वरिखला शांतरसे । तो हा ग्रंथू ।।
तेथ पुढा मी बापिया । माडिला आर्ती आपुलेया । की ययासाठी येवडेया । आणिलो यशा ।।
---- तुम्हीच सांगा काय दर्शवतो ?? मुळात ज्ञान हे एका अभ्यासकाकडुन दुसर्या अभ्यासकाकडे पाझरत असते. ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांकडुन ज्ञान मिळवले आणि ते सामन्य लोकांन कळेल असे समजावुन सांगितले... मग प्रोब्लेम काय ? ज्ञानदेवांनी कुठे म्हटले कि या ज्ञानावर त्यांचे पेटंट आहे ? अहो ज्यांना अवघा महाराष्ट्र माउली म्हणतो त्यांना तरी आपल्या क्षुद्र जातिद्वेशा पासुन मुक्त ठेवा.
५) संभाजीराजांवर बदफैलीपणाचा आरोप करणारे बाजीराव-मस्तानीच्या प्रेमाचे मात्र 'अद्वितीय' , 'दैवी' अशी विशेषणे लावुन गोडवे का गातात ? हा दुटप्पीपणा न्हवे काय ?
-- संभाजीराजे हे इतीहासाने अन्याय केलेल्यांच्या रांगेतले. या छाव्याला अजुनही म्हणावं तितकं महत्व इतीहासाने दिले नाहि. इतीहासापासुन योग्य बोध घेण्याची वृत्ती असती तर आज हिंदुस्थान अश्या दु:स्थीतीत रहाता ना... राहिले बाजीरावाचे... मी तरी त्यांच्या मस्तानी संबधाला कोणि दैवी म्हटलेले ऐकले नाहि. अरे कुठे तो बाजीराव, कुठे तो संभाजी.. आणि त्यांच्या नावावर गळे काढणार्यांची लायकी ति काय. सूर्यापासुन तेज घेणे, प्रकाश घेणे.. आणि आपला मार्ग नीट चालणे. हे सोडुन उगाच या मोठ्या लोकांच्या नावाने कोल्हेकुई का करायची ?? रिकामटेकड्या टोळभैरवांनी असे केले तर त्यात काहि नवल नाहि... पण परा सारख्यांनाही हा मोह व्हावा ??
ह्या आणि अशा अनेक खोट्या संदर्भांचे वस्त्रहरण करणे हाच आमचा ह्या लेखनामागील उद्देश आहे. येथील जाणकार अजुन मुद्दे उपस्थीत करुन इथल्या दांभिक लोकांना घाम फोडतीलच. तुम्हा सर्व जाणकारा अभ्यासुंच्या मदतीने लवकरच नव्या इतिहास सुर्याची पहाट उगवणार आहे हे निश्चीत.
---इतीहास सुर्य नेहमीच मार्गदर्शन करायला तत्पर आहे पराशेठ. पण तुम्हाला जो सूर्योदय अपेक्षीत आहे तो ज्ञानाधारीत नाहि तर द्वेशाधारीत आहे... आणि या समाजद्रोहाचा एकच परीणाम... तो म्हणजे आत्मघात.
(इतीहासाचार्य) अर्धवटराव
3 Sep 2010 - 8:50 pm | अर्धवट
अती उत्तम आणि संयत प्रतिसाद..
अवांतर - एका अर्धवटाशी दुसरा अर्धवट सहमत असल्यामुळे आता ह्याला संपुर्ण ज्ञान मानावे का?
3 Sep 2010 - 10:26 pm | अर्धवटराव
कमितकमि अर्धवटांच्या राज्यात तरि तसं मानायला हरकत नाहि... ;)
(ज्ञानि) अर्धवटराव
4 Sep 2010 - 9:39 am | llपुण्याचे पेशवेll
+१ म्हणजे प्रतिसादाला आणि हाफ + हाफला देखील.
3 Sep 2010 - 10:22 pm | भारी समर्थ
आ जाऊ द्या मनं. कुणी का आसना, चार गोष्टी येकाद्यानं केल्या चांगल्या तर आपणबी तश्श्याच कराव्या. जात-धर्म काय उपेगाचं राव... चांगली श्याळा-कालीजं शिकल्याली माणसं न्हवं तुमी?
आर्दवटरावाची प्रतिक्रिया आवाडली आपल्याला...आन् तुमाला सांगू का, नवं जुनं काय नसतय बगा असल्या जातीच्या भानगडीत. ती टक्कुर्यातच आसती येकेकाच्या. नवं काय आन् जुनं काय, समदी वड्यालाच येतेत राव हगायला.
गण्या, दांडकं आण रं हिकडं. जात-जात बोंबालणार्याच्या ढुंगणावरच हाणुत आज.
भारी समर्थ
4 Sep 2010 - 12:12 pm | यशोधरा
>>हाणुत >> चर्च करताना हातापायी कशाला? बाकी ही लिहायची इष्टायल ओळखीची वाटते.
4 Sep 2010 - 4:28 pm | भारी समर्थ
तायडे,
कसंय बरका की आमी पडलू गावात्ली माणसं. त्यामुळं आमाला नाय आसलं मुद्देसूद पाणी शेंदायला जमत. आमी कुणाला मानतो तर, गाडगे बाबाला आन् तुकारामाला. ते काय करून आन् सांगून गेल्यात म्हायताय का?
गाडगे बाबांच्या येकादा पाया पडाय गेल्याव लगीच काटीनं हाणायचे ते.
तुकोबा म्हणतेत, "नाठाळाचे माथी हाणू काठी".
ज्ये चांगलंय तेच्याबदल हिकडची आन् तिकडची मतं आसली तर समजतय बगा. आमच्या बैलजोडीला लय जीव लावतो आमी, पण यकादा कटाळ्या घुसला कनाय वावरात, की त्याला हाकलाय दंडूकंच लागतं हातात.
आसलं जातीवरन कुणी बोलाय लागलं की आमचा गण्या गेलाच म्हणून समजा कोपर्यातलं दांडकं आणाया...
बाकी, हिवाळ्यात कधी आले नगरकडं तर या आमच्या वावरात, हुर्डा खाऊ...आन् आमच्या गावात समदे आस्संच बोलाणारे हायती बरका... जातो आता. लाइट आलीय, पाणी सोडून येतो वावरात.
भारी समर्थ
5 Sep 2010 - 6:52 am | llपुण्याचे पेशवेll
>> चर्च करताना हातापायी कशाला?
हे हातापायी काय असतं बॉ? आमच्या मराठीत त्याला हाणामारी , मारामारी, धक्काबुक्की असे शब्द आहेत.
3 Sep 2010 - 10:12 pm | बबु
परिकथेतील राजकुमारा..
पराचा कावळा केलास का करतोस बाबा?
वडाची साल पिंपळाला लावुन इतिहासाचे पुनर्लेखन होत नसते.
3 Sep 2010 - 11:59 pm | जिप्सी
बाया ठेवल्या जायच्या. महाराजांच्याही ३ उपस्त्रिया होत्या म्हणतात. :- मृत्युंजयराव, अशी विधान ईतक्या बेधडकपणे कशी काय करता तुम्ही? महारांजांचा असा उल्लेख करताना तुम्हाला काहीच कसे वाटलं नाही, आणि बाकीचे लोक पण हे विधान वाचून सोडून देतात? तुमच्या देवांबद्दलच्या चर्चेत मला अजिबात रस नाही पण फक्त प्रतिसाद खेचक धाग्यात तरी महाराजांना आणू नये ही विनंती !
बहुत काय लिहिणे आपण सुज्ञ आहातच !
4 Sep 2010 - 5:14 am | भारी समर्थ
कोणीतरी काहीतरी बोललं म्हणून त्याने माथी भडकवून घेणार्यापैकी आपण नक्कीच नाही..
त्यातून पेटलाच असेल एखादा महाराजांविषयीच्या शंकांनी, तर त्याला आमचे एकच सांगणे:
"आमचा अश्वमेध उधळला आहेच. सहकुटुंब येणे करावे."
महाराजांचे नाव घेण्याएवढीही पुण्याई नसलेल्या लोकांच्या वक्तव्यांनी व्यथित होण्याचे काहीच कारण नाही.
भारी समर्थ
4 Sep 2010 - 10:29 am | मृत्युन्जय
पहिल्यांदा खव वाचली त्यामुळे खवमधुन उत्तर दिले आहे. परत इथे देत नाही. नसत्या चर्चांना तोंड फुटायचे. त्या चर्चांना भितो असे नाही. पण त्यामुळे जी चर्चा करायची इच्छाच नाही ती चर्चा करायला लागेल. असो. महत्वाच्या मुद्द्याला केवळ उत्तर देतो तरीसुद्धा:
बाया ठेवल्या जायच्या. महाराजांच्याही ३ उपस्त्रिया होत्या म्हणतात
२ वाक्ये मुद्दाम तोडली आहेत.
विधान त्या अर्थीचे नव्हतेच ज्या अर्थीचे ते समजले जाते आहे. तरीदेखील कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा असावी. महाराजांबद्दल प्रचंड आदर बाळगुन आहे.
4 Sep 2010 - 12:19 am | कवितानागेश
पेटलेत सगळे!!
आता माती फिरवावी की तेल ओतावे की पाणी??
4 Sep 2010 - 12:48 pm | सोम्यागोम्या
मुळात प-या सारखे लोक ब्राह्मणांच्या नावाने कंठशोष करत आहेत जसे की मराठा लोक फार धुतल्या तांदळाचे आहेत. मराठा लोकांनीही सवर्ण म्हणवून घेवून बहुजनांवर अन्याय केले आहेत. झालेल्या अन्यायास ते ही तितकेच जबाबदार आहेत.त्यांनी ही स्पृश्यापृश्यता पाळलेली आहे. आता मोठा बहुजन उद्धाराचा आव आणून ब्राह्मणांवर चिखलफेक करुन काय साधत आहेत यांनाच ठाऊक. गरीब मराठा समाजाची परिस्थिती फार वाईट आहे असे फिडींग मराठा तरूणाला केले जाते. त्याला सुद्धा आरक्षणा शिवाय पर्याय नाही असे वाटायला लागते व तो पेटून उठतो. मेटे खेडेकर सारखे लोक उभे करुन रा. कांग्रेस हे घाणेरडे जातीयवादी खेळ खेळत आहे हे सर्वांना ठाऊक आहेच.
संभाजी ब्रिगेड हे संभाजी राजांचे नाव खराब करते असे माझे मत आहे. तिथे प्रसवणा-या ब्राह्मण विरोधी विचारांना वेळीच आळा घातला पाहिजे. एखाद्या जातीचा तिरस्कार करुन तुम्ही मोठे होणार नाही. ही वृत्ती सोडा. दुस-याचे पाय कापण्यापेक्षा स्वतची उंची वाढवून मोठे व्हा.
ब्रिगेडी मटेरिअल मी स्वतः वाचले आहे आणी त्यातल्या वाक्या वाक्यात ब्राह्मण द्वेष आहे. उदाहरणा दाखल. खेडेकराने स्वतःची पत्रिका ब्राह्मणा कडून करुन घेतली. त्यात तो मराठा असल्याने त्याचा राक्षस गण टाकला, ब्राह्मण लोक मुद्दाम असे करतात असे यांचे म्हणणे आहे.
या बेअकली लोकांना हे सुद्धा माहित नाही की राक्षस गण कोणाचाही असू शकतो. जातीवरुन गण ठरवला जात नाही. गुढी पाडवा साजरा करु नका कारण बळीराजाला त्या दिवशी बामनाने फसवले (वामनावतार) म्हणून मराठ्यांनी पाडव्याला गुढ्या उभारू नयेत असे यांचे मत आहे.
दिवाळी हा देखील सण साजरा करु नये असे त्यांचे मत आहे. थोडक्यात द्वेषाधारित व ब्राह्मण द्वेषाने बरबटलेली यांची शिकवण आहे. व तिला कधीच जनमान्यता मिळ्णार नाही हे त्यांनी लक्षात घ्यावे.
खेडेकर व मेटे सारखे लोक समाज कंटक आहेत. जातींमध्ये द्वेष पसरवणारे आहेत. खेद याचा वाटतो की शिकलेली मंडळी सुद्धा त्यांच्या नादी लागत आहेत. जे काही केले ते ब्राह्मणांनीच व मराठा कसा सामील नव्हता हे थोतांड थांबवा. झालेल्या अन्यायास प्रत्येक सवर्ण समाज तेवढाच जबाबदार आहे.
मराठ्यांना यातून आम्ही नामानिराळे आहोत असे दाखवता येणार नाही.
जनार्द्न वाघमारेंचा महापुरुषांचा पराभव हा लेख फार आठवतो. महापुरुषांना त्यांच्या जातीत बंदिस्त करून त्यांच्या अंध अनुयायांनी त्यांचाच पराभव केला आहे.
4 Sep 2010 - 6:25 pm | इन्द्र्राज पवार
"खेद याचा वाटतो की शिकलेली मंडळी सुद्धा त्यांच्या नादी लागत आहेत."
~~ ब्रिगेड आणि तत्सम प्रणाली विचारांच्या नादी लागणार्यात मराठा समाजातील 'सर्वच' शिकलेली मंडळी येत नाहीत, इतकेच म्हणतो.
कोल्हापुरात माझा अगदी नजिकचा असा म्हटला जाणारा सुमारे ३० मराठा मित्रांचा एक गट आहे, त्यातील माझ्यासह ९ पदव्युत्तर तर १६ पदवीधारक तर ५ पदविकाधारक आहेत (त्यामुळे 'शिकलेली मंडळी' हे लेबल आम्हाला लागू शकेल)....आपापल्या क्षेत्रात नोकरीधंद्यात अग्रेसर आहेत....आणि या सर्वांनी स्वतंत्रपणे तसेच एकत्रीतपणे संभाजी ब्रिगेड (आणि शिवसेना+मनसे) च्या आत्यंतिकपणाच्या धोरणाचा वेळोवेळी विरोध केला आहे -- लेखी आणि चर्चेतसुद्धा (धमक्या आणि मारही खाल्ला आहे ~ मात्र मार दिलेला नाही, कारण तो आमचा मार्ग नाही.)
सबब प्रतिसादकर्ते श्री.सोम्यागोम्या यांनी सरसकट सर्व मराठ्यांना "त्या" प्रश्नाबाबत एकाच तागडीत बसवू नये ही विनंती.
इन्द्रा
4 Sep 2010 - 6:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आपल्या शिक्षणाची जाहिरात करण्याचा क्षीण प्रयत्न एवढेच म्हणेन. असो.
4 Sep 2010 - 6:54 pm | सोम्यागोम्या
>>आपल्या शिक्षणाची जाहिरात करण्याचा क्षीण प्रयत्न एवढेच म्हणेन. असो.
मला तसे वाटले नाही.
4 Sep 2010 - 7:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
माझ्या प्रतिसादाचा विषय आपण वाचलेला दिसत नाही. हरकत नाही ... हाही प्रतिसाद आपण ह. घ्यालच!
4 Sep 2010 - 7:30 pm | सोम्यागोम्या
आता वाचला ! माफ करा.
4 Sep 2010 - 7:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हरकत नाही. तेवढाच पर्याचा धागा प्रसिद्ध होतो आहे! ;-)
4 Sep 2010 - 7:14 pm | sagarparadkar
अहो त्यांना त्यांच्या शिक्षणाची जाहिरात करण्याची काहीच गरज नाही. त्यांची शैक्षणिक उंची आणि समज त्यांच्या वेळोवेळच्या प्रतिसादांतून व लेखनातून दिसतेच आहे की.
उलटपक्षी असे हिणवणारे प्रतिसाद हीच मला बाह्मणी वृत्ती (जात नव्हे) वाटते ...
4 Sep 2010 - 7:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
लोक हो, इंद्रराज हे माझे मित्र असून त्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक, मानसिक इ.इ. पात्रतेवर मला अजिबात संशय नाही. कृपया प्रतिसाद देण्यापूर्वी तो नीट वाचा.
आणि हा प्रतिसाद अजिबात ह. घेऊ नका.
4 Sep 2010 - 7:56 pm | sagarparadkar
हलकेच घ्या .... हे लिहायला विसरलो, क्षमस्व ...
4 Sep 2010 - 9:57 pm | इन्द्र्राज पवार
लोक हो, अदितीताई या माझ्या येथील मार्गदर्शक असून त्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक, मानसिक इ.इ. पात्रतेवर मला अजिबात संशय नाही. (त्यामुळे त्या श्री.स्पा यांना 'भयकथे'साठी बिल्ला क्रमांक ३०५ च्या खरडवहीकडे जाण्याचा सल्ला देण्याच्या बेतात होतो, पण दरम्यानच्या काळात दुसरीकडे आपल्या लाडक्या सचिन धाग्यामध्ये गुंतून गेलो व ते कामे अधुरे राहिले.)
राहता राहिला शैक्षणिक बाबीचा त्या प्रतिसादात उल्लेख करण्याच्या औचित्याचा मुद्दा....त्याबाबत (जरी अदिती यांनी तो गंमतीचा भाग म्हणून घेतला असला तरी...) माझी भूमिका अशी होती की, 'शिकलेला' समाज ब्रिगेडच्या मागे जात आहे असे काहीसे श्री.सोम्यागोम्या यांच्या प्रकटनातून प्रतीत होत होते, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज त्या मनोवृत्तीचा नाही आणि त्यातही सुशिक्षित म्हटला जाणारा एक वर्ग आहेच आहे....म्हणून ती थोडीशी आकडेवारी (जी प्रातिनिधिक स्वरूपाची मानली तर 'शिकलेला समाज' या व्याख्येची व्याप्ती वाढेल, असे वाटले). ~~ शिवाय शैक्षणिक, नोकरी, व्यवसाय, स्थान, आदीबाबत आपण मिपाच्या 'वैयक्तीक' पानावर माहिती दिलेली असतेच.
असो...माझ्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून अदितीताईंच्यावर कारवाई व्हावी यासाठी स्वतंत्र्यरित्या चोटा दोन यांच्याशी संपर्क साधत आहे.
इन्द्रा
4 Sep 2010 - 7:28 pm | सोम्यागोम्या
इंद्रा,
एकाच तागडीत बसवायचे नव्हते मी ब्रिगेडी विचारसरणींच्या मराठ्यांबद्दल बोलत होतो. माझे अनेक मराठा मित्र आहेत. त्यात काही ब्रिगेडी विचारसरणीचे आहेत. शाळेत असताना ते चांगले मित्र होते. आधी जात पात कधी आमच्या बोलण्यात आली नसेल. आता पदोपदी येते. त्यांचा दृष्टी दूषीत झाल्याचे जाणवते. आता त्यातलाच माझा एक मित्र करिअर चा बट्ट्याबोळ करुन गावोगाव व्याख्याने द्यायला जातो.
अशा लोकांना भीक न घालणारे असेही माझे मराठा मित्र आहेत. कुठल्याही विशिष्ट जातीला झोडा असं ते करत नाहीत. ते मवाळ आहेत अशातला भाग नाही. कोणाचे ऐकावे कोणाचे नाही इतपत समज त्यांना आहे. उच्च शिक्षित व कमी शिकलेले असे दोन्ही प्रकारचे मित्र अशा विचरांचे आहेत.
>>(धमक्या आणि मारही खाल्ला आहे)
मार बिर खाल्ला नसला तरी वादावादीत मी जवळच्या मित्रांना दुखावलं आहे.
मूळ लेखासः
वीष पेरल्याने वीषच उगवते.
"अभ्यासुंच्या मदतीने लवकरच नव्या इतिहास सुर्याची पहाट" उगवण्यापेक्षा द्वेषरहित व एकमेकांचे चांगले गुण घेणारा आपला समाज कसा होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. राहून राहून ती ग्राफिटी आठवते. जगात विज्ञानात शोध लावले जातात आपल्याकडे इतिहासात.
4 Sep 2010 - 7:31 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ग्रफिटी आवडली.
4 Sep 2010 - 7:09 pm | चिंतामणी
पॉपकॉर्नचे पुडे खूप संपले आणि बसून बसून रग लागली.
पुडे येणे बंद झाले आहे आणि फांदी मोडायला आली.
व्दिशककाला ७ च कमी असल्याने आता आगाउ (म्हणजे Advace. गैरसमज नको) अभीनंदन करून रजा घेतो.
4 Sep 2010 - 7:43 pm | मृत्युन्जय
द्विशतक उलटले. हाही धागा विक्रमाच्या मार्गावर. अभिणंदन.
4 Sep 2010 - 8:26 pm | हुप्प्या
सुसंस्कृत, सुविद्य मराठा समाजात संभाजी ब्रिगेड विचारसारणीला फारसे स्थान नाही हे वाचून आनंद झाला. पण संभाजी ब्रिगेड विचारसारणी दिवसेंदिवस प्रबळ होत आहे. अनेक सत्ताधारी त्यांच्या बाजूने आहेत. त्यामुळे त्यांना हवे तसे बदल ते घडवून आणू शकतात. आर्थिक, राजकारणी पाठबळ त्यांच्या बाजूचे आहे. हे रोखायचे असेल तर मवाळ विरोध फार प्रभावी ठरणार नाही. जहाल विरोध व्हायला हवा. आमच्या जातीचे नाव घेत इतका कोतेपणा करणार्याविरुद्ध तसे न मानणार्या मराठा लोकांनी काहीतरी केले पाहिजे. मग ते लिखाण असो, भाषण असो वा अन्य काही मार्ग. राजकीय क्षेत्रातही असे मराठा लोक यायला हवेत. मगच ब्रिगेड वृत्तीला शह मिळेल.
जसे मुस्लिम अतिरेक्यांविरुद्ध सरळमार्गी मुस्लिमांनी नुसते आम्ही विरोध करतो म्हणणे पुरेसे नाही. काहीतरी ठोस केले पाहिजे जसे अशा लोकांविरुद्ध तक्रार करणे, पोलिस वा गुप्तचर संस्थांना खबर देणे वगैरे.
संभाजी ब्रिगेड आणि लष्करे तोयबा वा अल कायदा यात फार फरक नाही. हळूहळू तो फरक कमी कमी होतो आहे.
बाकी हा मुद्दा उपस्थित करणारे एक काडी शिलगावून पेटलेले दारुकाम, रोषणाई बघत बसले आहेत असे वाटते. मीही थोड्या ठिणग्या उडवतो!
4 Sep 2010 - 11:42 pm | इन्द्र्राज पवार
"सुसंस्कृत, सुविद्य मराठा समाजात संभाजी ब्रिगेड विचारसारणीला फारसे स्थान नाही"
~~ ही वस्तुस्थिती बहुतांशी जिल्ह्यात अगदी तळागाळापर्यन्त आहे, पण ज्या दोनचार हलग्या वाजतात त्यांच्या कर्णकर्कश आवाजाने सत्ताधारी पक्षाला नाही म्हटले तरी थोडीशी चिंता वाटते कारण साखर कारखान्याच्या राजकारणाशी (आणि त्यातील विस्तारीत जनसंख्येमुळे) असलेली 'मराठा' समाजाची घट्ट वीण त्या आवाजामागोमाग जाईल आणि आज मॅक्रोचे रूप असलेला तो 'वामन' उद्या मेगाचे रूप घेईल, त्यामुळे ब्रिगेड असो वा तत्सम घटक तो 'आपल्या मतदारा'ला कह्यात घेणार नाही याची दक्षता धुरंधर राजकारणी घेतात आणि विरोधाची धार थोडी मवाळ एवढ्यासाठी ठेवतात की, ब्रिगेड्+शिवसेना+मनसे यांना सरकारी कारवाईमुळे इन्स्टंट प्रोटीन्स मिळू नयेत.
ब्रिगेड मनोवृत्तीची वाढ होण्याचे दुसरे कारण "मिडीया" बजावत असलेली खाटक्याची भूमिका. आजच नव्हे तर ७०-८० वर्षापूर्वी खुद्द महात्मा गांधी यांनीच "यंग इंडिया" तील एका लेखात 'वर्तमानपत्र आणि पत्रकार हा एक चालता प्लेग झालेला आहे; जो असत्याचा आणि निंदा पसरविण्याचे काम करीत असतो." असे परखड मत एका प्रसंगी व्यक्त केले होते. ही त्या महात्म्याच्या काळातील स्थिती...तर आज काय आहे? कुठल्याही चॅनेलला गंगेने शांतपणे आपला प्रवाह चालू ठेवावा असे कदापिही वाटत नाही....'ब्रेकिंग न्यूज' ची ढास असो वा श्री.निखिल वागळे यांच्यासारख्यांची 'हल्ला बोल' धर्तीची पत्रकारिता असो, ही कलमे राज्यातील जातीजातीचे राजकारण भडकाविणे आणि पुढारलेल्या म्हणविल्या जाणार्या दोन जातीतील तेढ वाढीला कशी लागेल हेच पाहात असतात.
शिवाय दोन्हीकडील पुढार्यांना "मी जातीसाठी काहीतरी करून दाखवितो.." हे सिध्द करण्याची वारंवार उसळणारी उर्मी आहेच जी द्वेषाचा अग्नी सतत तेवत राहण्याचे कार्य करीत असते. मतासाठी 'रामाय स्वस्ति, रावणाय स्वस्ति' असे म्हणून दोन्ही गटाकडून दक्षिणा उपटण्यात तरबेज झाल्येत ही नेते मंडळी.
त्यामुळे वर श्री.सोम्यागोम्या असोत वा श्री.हुप्प्या (आणि त्यासम विचारप्रणाली राखणारे) म्हणतात त्याप्रमाणे खर्या अर्थाने सुशिक्षित आणि विवेकबुद्धी ठेवणार्यांनी राज्यात भेदाची ही दरी वाढू नये अशारितीनेच खाजगी आणि सार्वजनिक पातळीवर प्रयत्न करणे नीतांत गरजेचे आहे.
इन्द्रा
5 Sep 2010 - 12:20 am | अर्धवटराव
मित्र इंद्रा,
हे जे काहि चाललयं ते कुठल्याहि डोके शाबुत असणार्या माणसाला अस्वस्थ करणारे आहे. तू (आता आपण तुम्ही-आम्ही चि औपचारिकता बाजुला ठेऊया...) या वादाचे सर्व पैलु जवळून बघितलेस असं दिसतय. या विषवृक्षाचं मूळ काय असावं ?? राजकारण, झुंडशाहि, हि फार जनरलाईझड् कारणं झालित. दलित वर्गात सवर्णांविषयी आकस असावा, के मला समजु शकतं. पण मराठा तर राज्यकर्ती जात होती/आहे. सैन्यात त्यांच्या तोडीचा पराक्रम कोणाचा नाहि. महाराष्ट्रात मराठा समाजाच्या हाती बर्यापैकी संपत्ती आहे. सत्ता तर आहेच आहे. आणि सर्वात मुख्य म्हणजे दलितांच्या वाटेला आलेलि उपेक्षा मराठ्यांच्या वाट्याला कधिच आलि नाहि. रणांगण असो वा राजकारण, अर्थकारण असो वा इतर सामाजीक चळवळी, सर्वत्र मराठ्यांचा बोलबाला राहिला आहे. मराठी ब्राम्हणांच्या तुललेत मराठ्यांची संपत्ती, संख्या कितीतरी जास्त आहे. मराठ्यांनी आपले कर्तुत्व वेळोवेळी सिद्ध केलं आहे. तेंव्हा कुठल्याहि न्युनगंडाचा वगैरे प्रश्नच येत नाहि. कुठल्याहि कारणाने मराठा आणि ब्राह्मण एकमेकांच्या वाटा रोखत नाहि, रोखु शकत नाहि. इतीहासाच्या पानांवर मराठ्यांचं नाव ठसठशीत कोरल्या गेलयं (चांगल्या आणि वाईट, दोन्ही अर्थाने... तेच ब्राह्मणांचेहि) बरं कुणा मराठ्याला राजकारणी फायदा उचलायचा असेल तर त्याकरता अनेक मुद्दे/ऑप्शन्स् आहेत जे ब्राम्हणद्वेषापेक्षा कितीतरी जास्त इफेक्टीव्ह असतील....
थोडक्यात काय, तर या द्वेषकारणामागे जि काहि सर्वसाधारण कारणं आहेत ति मला गैरलागु दिसतात. मग असं का ? यावर वेगळा धागा काढुन काथ्याकुट करावं असहि मला वाटलं. पण ते पुढे कधितरी. सद्ध्या मला एक्स्पर्ट कमेंट्स् हवेत...
(शोधक) अर्धवटराव
5 Sep 2010 - 5:19 am | हुप्प्या
उत्तर सोपे आहे. जात म्हणून जास्त प्रबळ बनायचे असेल तर खरा वा खोटा बागुलबुवा उभा करुन त्याची भीती घालून आपल्या गटाला घट्ट करता येते. ब्राह्मण समाज बहुतांशी सुशिक्षित खाऊन पिऊन सुखी असला तरी राजकीय दृष्ट्या अत्यंत दुबळा आहे. त्यांना शिव्या घातल्या तरी ते काही मोर्चे, दगडफेक करणार नाहीत ही खात्री आहे. असला दुबळा शत्रू एक पंचिंग बॅग म्हणून खूपच चांगला आणि उपयुक्त आहे.
बाकी कुठली जात असल्या शिव्या ऐकून घेणार नाही. त्याचे घातक राजकीय परिणाम होऊ शकतात.
पवार वगैरे स्वार्थी नीच नेते अब्जावधी रुपये खिशात घालून आपली श्रीमंती वाढवत आहेत. लवासासारखे प्रकल्प बनवून हजारो एकर खाजगी जहागीर असल्याप्रमाणे लाटत आहेत. त्यांच्या विरुद्ध रोष होऊ नये म्हणून असला मिथ्या शत्रू खूप सोयीचा असतो.
अर्थात हे बदलायची वेळ आलेली आहे. ब्राह्मणांनी संघटित होणे आवश्यक आहे. त्या जातीतल्या थोर लोकांवर केवळ ब्राह्मण होते म्हणून गलिच्छ चिखलफेक होत असेल तर त्याविरुद्ध आवाज उठवणे आवश्यक आहे.
10 Sep 2010 - 12:08 pm | मालोजीराव
शंभू राजांचा केलेला घात आणि १६८० ते १६८९ च्या काळात अनेक मराठा सरदारांनी स्वराज्याला पाठ दाखवली हि मराठ्यांच्या नाकर्तेपणाची धड धडीत उदाहरणं असताना (याचा पुरावा पाहिजे असल्यास आमच्याच घराण्याचा तत्कालीन जगदाळे कैफियतनामा इ.सं.मं. जावून वाचावा) ब्रिगेड वाले फक्त एकाच जातीला जबाबदार का धरतात कळत नाही.
ब्रिगेड वाले हि गोष्ट जाणतात...आणि इथे मला सांगावसं वाटता कि दिसतात तितकेच लोक या संघटनांच्या मागे नाहीत तर काही अतिशय पावरफुल मराठा नेतेही यांना मदत करतात.जे कुठेही दिसत नाहीत पण अंडर ग्राउंड काम करतात !
5 Sep 2010 - 10:06 am | वेताळ
नष्ट व्हायला हव्या होत्या पण त्या प्रबळ होताना दिसत आहेत.घटनाकाराना वाटत होते कि जातीव्यवस्था नजीकच्या काळात पुर्णपणे मोडकळीस येतील पण घडले ते उलट घडले आहे.जेव्हढा मोठा धार्मिक संघर्ष आहे त्या कैकपटीने मोठा आपल्या इथे जातीसंघर्ष आहे. त्याला जितके आपले पुढारी कारणीभुत आहेत तितकेच आपण सर्व लोक कारणीभुत आहोत.आपल्या दररोजच्या जीवनात कितीतरी वेळा ह्या जातीभेदाला खतपाणी घालत असतो. इथे कोणी संभाजी ब्रिगेटला शिव्या घालतो तर दुसरा ब्राम्हणाना शिव्या घालतो. हे सतत चालुच राहिल्याने ह्या संघर्षाची धार काही केल्या कमी होत नाही.
मिसळपाववर हे वाद कोण ना कोण सतत उकरुन काढत असतात. आता वरच काहीचा उल्लेख आहे कि ब्राम्हण समाजाला नेतृत्व नसल्यामुळे तो राजकारणात मागे पडला आहे. पण आखिल भारतिय ब्राम्हण मंच का कोणती संघटना आहे(ज्याचे मागिल वर्षी पुण्यात संमेलन झाले होते) तिचे विचार किती सुशिक्षित ब्राम्हणाना पटलेत?तसेच संभाजी ब्रिगेट बद्दल मराठा समाजात आहे.संभाजी ब्रिगेटला पाठिंबा देणारे बहुतांश लोक स्वतंत्र्य विचार करु शकत नाहीत असेच लोक आहेत.ह्या संघटनांचे नेत्रुत्व करणार्या लोकाना कार्यकर्ते कमी फक्त मेंढरे हवी आहेत. मग आपण काय बनणार हे प्रत्येकाने ठरवायचे आहे.
5 Sep 2010 - 10:20 am | अर्धवट
>>आखिल भारतिय ब्राम्हण मंच का कोणती संघटना आहे(ज्याचे मागिल वर्षी पुण्यात संमेलन झाले होते) तिचे विचार किती सुशिक्षित ब्राम्हणाना पटलेत?
खुप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. अत्यंत पोरकटपणाचं नेतृत्व आणि त्याहुनही पोरकट ठराव आले होते त्या कार्यक्रमात. आधी तेथे मोठ्या अपेक्षेने गेलेले कित्येक लोक हा करंटेपणा बघुन उलट पावली आलेले पाहिलेत मी. तिथेही पुन्हा मेढरांचंच राजकारण.. एक विचार म्हणुन बोंबच
5 Sep 2010 - 12:08 pm | प्रकाश घाटपांडे
ब्राह्मण म्हणजे काय? ब्राह्मण कोणास म्हणावे?
ब्राह्मण्य म्हणजे काय? ते कसे ओळखावे?
असे प्रश्न आम्ही 'आचमन' घेताना विचारीत असु
5 Sep 2010 - 12:12 pm | अवलिया
चला एकंदर इतिहास पुनर्लेखनाचे काम जोरात चालु आहे
जवळ पास सर्वच मुद्दे पराने घेतले आहेत. फक्त एक महत्वाचा मुद्दा राहिला आहे. आर्य अनार्य मुद्दा
यावर परा आणि इतर जाणकारांचे मत वाचायला आवडेल
5 Sep 2010 - 2:14 pm | llपुण्याचे पेशवेll
आर्य अनार्य हा धातांत खोटारडेपणा आहे. गोर्या साहेबाने नेटिवांची बुध्दी भ्रष्ट करण्यासाठी केलेले वरिष्ट (worst) कारस्थान. साला सगळे लोक आर्यच आहेत .
6 Sep 2010 - 8:14 am | अवलिया
काय पुरावा आहे याला?
6 Sep 2010 - 9:25 am | llपुण्याचे पेशवेll
अनेक पुरावे आहेत. शोधलेत तर सापडतील. चेन्नईच्या मद्रास अर्काईव्ह मधले ब्रिटीश अधिकार्यांनी पाठवलेले रिपोर्ट, लंडन अर्काईव्ह मधले रीपोर्ट, जर्मनीतील बर्लिन अर्काईव्हमधील अनेक पोथ्या व त्यांच्याबाबतची टिपणे आणि या सर्वांचा आधार घेऊन जेष्ठ गांधीवादी कार्यकर्ते प्रा. धर्मपाल यांनी लिहीलेले Despoliation and Defaming of India .
त्यांच्याबद्दल माहीती इथे वाचता येईल. थोडेसे मागे जाऊन महाराष्ट्र सारस्वतात वि ल भाव्यांची मतं वाचलीत तर जातीव्यवस्थेबद्दल अजून डिट्टेलवार मतं त्यांनी मांडलेली वाचता येतील.
धर्मपाल यांच्याबद्दल इथे अजून वाचता येईल.
6 Sep 2010 - 12:13 pm | अवलिया
दुव्याबद्दल आभारी. पण लो. टिळकांना ब्रिटिश प्रणित आर्य मुद्दा मान्य असल्याचे काही विचारवंत म्हणतात त्याचे काय?
6 Sep 2010 - 12:19 pm | llपुण्याचे पेशवेll
न. चिं केळकर या त्यांच्या निकटच्या सहकारी असलेल्या गृहस्थांनी टिळकांच्या लिहीलेल्या चरित्रात तो मुद्दा मान्य करणे हि एक चूक होती व तावर याच्या (गीतारहस्य) नंतर काम करायचे आहे असे त्यांच्याशी खाजगीत बोलताना म्हटल्याचे नमूद केले आहे.
आणि केली असेल समजा टिळकांनी चूक एखाद्या गोष्टीत तर ती आपण सुधारु नये असे नाही.
7 Sep 2010 - 11:57 am | अवलिया
अगदी बरोबर. पण त्याचाच आधार घेऊन काही विचारवंत टिळकांच्या देशप्रेमाबद्दल शंका घेतात.. म्हणतात ते तर ब्रिटिशांचीच तळी उचलत होते.. इतिहास काय सांगतो?
7 Sep 2010 - 12:03 pm | परिकथेतील राजकुमार
आम्ही तर सावरकरांनी देखील सुटकेसाठी याचना करणारे पत्र ब्रिटीश सरकारले पाठवले होते असे ऐकुन आहोत.
5 Sep 2010 - 2:59 pm | देव जय
5 Sep 2010 - 4:40 pm | इन्द्र्राज पवार
वरील प्रतिसादांत सर्वश्री अर्धवटराव, हुप्प्या, वेताळ, अर्धवट प्रभृतीनी अभ्यासपूर्ण आणि समाजस्वास्थ्यासाठी जे काही आवश्यक मुद्दे (संयत भाषेत) प्रकट केले आहेत त्याच्या अनुषंगाने असे म्हणता येईल की; राज्याचा (सध्यातरी आपल्या कबुतरांचे पंख महाराष्ट्रापुरतेच ठेऊ या...) गाडा चालला आहे तो राजकारण्यांच्या होडी वल्हविण्याचा कसबावरच, ही हतबलतीची नसली तरी विद्यमान क्रियाशीलता आहे. एक जेआरडी टाटा किंवा अंबानी बंधू करू शकणार नाही ते कार्य राज्य सरकारच जनतेच्या कल्याणासाठी करू शकते (इथे 'कल्याण' ला वक्रोक्ती अलंकार देऊ नये...कारण तो मग वेगळा विषय होईल.) मुकेश वा अनिल याना नकाशावरील दोन जिल्ह्ये सोडले तर या राज्यात गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर वा गोंदिया या नावाची काही स्थळे आहेत हे जसे माहित नसते तद्वतच लताआशा, माधुरी दिक्षित आणि सचिन तेंडुलकर यांच्याखेरीत या राज्यात अजुन कुणीतरी "नाव" घेण्याजोग्या व्यक्ती आहेत का याचा शोध घेण्याचे काम अगर कारणही नसते. थोडक्यात "मनी फॉर मेकिंग मोर मनी..." ही जीवनशैली या उद्योगपतींची (आणि त्यांच्या पत्नींचीही) असल्याने 'जनता' ही फक्त राजकारणाशीच जवळीक (परत एकदा 'कल्याणार्थ') साधू शकते, ही अटळता आहेच आहे.
राजकारण म्हटले की त्यात दगडवीटा, मातीमसण आलेच...मग एका जातीला गोंजारायचे, दुसरीला खिशात घालायचे तर तिसरीशी फटकून वागायचे...परत तो शापग्रस्त असलेला उच्चनीचतेचा पारा वरखाली होत असतोच. या पार्याच्या ताकदीवरच तर धोरणी आणि मतलबी राजकारणी आपापली सत्तेची स्वामिनी कुरवाळीत बसलेले असतात. एक लक्षात घ्या...मंत्रालयात बसल्यानंतर मत प्रदर्शन करणे आणि शिवाजी पार्कवरून घोषणा देणे यातील कार्यकारणभाव टोकाचा असतो. 'सत्तेवर आल्याआल्या एका दिवसात एन्रॉन अरबी समुद्रात भिरकावून देतो..." असे राणा भीमदेव थाटात शनिवारवाड्यासमोर घोषणा करणार्या महाजन्/मुंडेना सत्तेचे खारीकखोबरे खाताना कळाले की, तिथे एकदा बसल्यावर आपल्याला शासनाचा साधा चहाचा कपही "कंडम" करता येत नाही....मग हीच भाषा आता "हो, आम्ही पाहत आहोत...त्यात काय काय भ्रष्टाचार झाला आहे, एनरॉन लवकरच आम्ही गुंडाळू..." इ. इ. मध्ये लिलया बदलून जाते.... लोक तरी काय, एकदोन दिवस सरड्याचे रंग पाहतात, सळसळ ऐकतात अन् परत आपले गॅस सिलेन्डर नोंदणी केल्याकेल्या मिळत नाही म्हणून नव्या सरकारला नव्या लोणच्याच्या शिव्या देत राहतात.
त्यामुळे जातीभेदाचे (प्रगत असो वा मागासलेल्या) विष समूळ नष्ट करणे कालत्रयीही शक्य नसले तरी, वर म्हटल्याप्रमाणे 'सुशिक्षित' समजल्या गेलेल्यांनी तरी किमानपक्षी काही संहिता मानल्या तर ती दरी कमी जरी झाली नाही तरी रुंदावणार नाही इतपततरी दक्षता घेतली तरी पुष्कळ मिळविले असे म्हणता येईल.
वर श्री.हुप्प्या प्रतिसादात म्हणतात "ब्राह्मणांनी संघटित होणे आवश्यक आहे. त्या जातीतल्या थोर लोकांवर केवळ ब्राह्मण होते म्हणून गलिच्छ चिखलफेक होत असेल तर त्याविरुद्ध आवाज उठवणे आवश्यक आहे."
जरूर संघटीत होणे (त्यानीच का पण इतर वर्गानेही) गरजेचे आहे...पण 'ब्राह्मण' संकल्पनेची व्याप्ती ही खुद्द ब्राह्मणातच संकुचीत झालेली आपणास तशा त्या ज्ञातीनिहाय संमेलनात दिसून येतेच ना? किती कोकणस्थ खुलेपणाने देशस्थातील वा कर्हाडे मुलगी आपल्या मुलासाठी निवडतील? (इथे प्रेमविवाहाची उदाहरणे अपेक्षित नाहीत त्यामुळे प्रश्नास प्रत्युत्तर म्हणून ती कृपया कुणी देऊ नयेत ही विनंती..). किती ब्राह्मण घरात प्रभु-सारस्वताकडील जेवणाचे स्वागत होत असते? दैवज्ञांना आपल्या ज्ञातीन न घेण्याचे कोणते कारण उच्चवर्गीय ब्राह्मण करतो...'खरकटे ब्राह्मण' म्हणून एका विशिष्ट वर्गाची थट्टा करणारा हा मराठा नसून ब्राह्मणच आहे ना? धर्म संकल्पनेच्या मूळ तत्वात वा भावनेत काहीही असो, जातीतील या उपप्रकारानीच आपणच आपल्यातील नैतीकतेची धार कमी केली आहे असे वाटते. यात आमचा मराठा समाज कुठे तीळभर मागे आहे असे समजू नये. सरदार घराणी, ९६ कुळी आणि कुणबी यांच्या राड्यात इतके आम्ही (आजही) गुरफटलो आहोत की, 'समाजशास्त्रा'त पीएच.डी. प्राप्त केलेल्या एक तरूणाने एका सुंदर, तितक्याच पातळीपर्यन्त शिक्षण घेतलेल्या मुलीला "नाही रे इन्द्रा, तुला माहित आहेच की, आम्ही ९६ कुळीचे आहोत...त्यामुळे...इ.इ." कारणास्तव नकार दिला, त्यावेळी मला समजून चुकले की फणस झाडावर लटकला पण अजूनही पिकलेला नाहीच.
दुर्दैवाने आज २१ व्या शतकातदेखील मुख्य नव्हे तर हे उपपदर प्रखरतेने दोन्ही समाजात आढळत असल्याने व नेमके तेच राजकारण्यांच्या नजरेत आवश्यक असल्याने त्याची फळे (कटू असली तरी) आपण चाखतच आहोत.
असो... फार प्रदीर्घ चर्चेचा हा विषय आहे.
इन्द्रा
6 Sep 2010 - 9:56 am | मृत्युन्जय
फणस झाडावर लटकला पण अजूनही पिकलेला नाहीच.
हे आवडले आपल्याला. ब्रिगेडी जमिनीत पेरलेले पण न उगवलेले भुइमुग आहेत असे म्हणेन मी. :)
हुप्प्या म्हणतो त्यातही थोडा दम आहेच खरे. फक्त बामणांबद्दल लिहिले म्हणूनच त्याला कोणि विरोध करत नाही. लिहुन दाखवा असे शाहु महाराजांबद्दल. दंगल होइल. जाळपोळ होइल. अर्धी बामण जमात नष्ट होइल.
कोणि एक बरोबर आहे आणि दुसरा फक्त चुक आहे असे मी म्हणत नाही. पण आजची राजकारणी नावची एक आई*व जमात आहे ती जातीचे राजकारण बरोबर खेळत आहे आणि त्या जातीच्या राजकारणात आता बामणांना काही स्थान उरलेले नाही हे नक्क्की.
27 Apr 2012 - 6:15 pm | बॅटमॅन
याला म्हणतात संयत प्रतिसाद. जियो!
6 Sep 2010 - 12:30 am | हुप्प्या
जोवर ब्रिगेड आणि तत्सम लोक ब्राह्मणांना एकाच मापाने तोलत आहेत आणि देशस्थ रामदासांना जितक्या गलिच्छ शिव्या घालत आहेत तितक्याच गलिच्छ शिव्या कोकणस्थ पेशव्यांना मिळत आहेत तोवर ब्राह्मण हे ब्राह्मण म्हणून एकत्र येण्याची शक्यता आहे. जर ब्रिगेड वृत्तीने कोकणस्थाना विशेष स्थान द्यायचे ठरवले आणि जास्तीच्या शिव्या द्यायच्या ठरवल्या तर त्यांच्यात फूट पडेल.
१. संभाजी ब्रिगेड आणि ब्राह्मण संघ ह्यांना एकाच तागडीत तोलणे चुकीचे आहे. खालील फरक बघा
ब्राह्मणांनी कुठला धर्म स्थापन केलेला नाही जिथे अमक्या जातीला प्रवेश नाही हे त्या धर्माचे मूलभूत तत्त्व आहे. ब्रिगेडच्या पिलावळीने शिवधर्म नामक धर्म स्थापला आहे. ज्याच्या मूलतत्त्वात ब्राह्मणांना प्रवेश नाही असे म्हटले आहे.
२. ब्राह्मणांनी ठरवून कुठल्या जातीला बदनाम करण्याकरता आधुनिक शैलीचा इतिहास लिहायला घेतला नाही. ब्रिगेड वृत्तीच्या लोकांची अनेक पुस्तक प्रकाशने आहेत ज्यांचे ध्येय एकच आहे. ब्राह्मण जातीविरुद्ध गरळ ओकणे. अनेक उदाहरणे आहेत. रामदासांना अगदी उघडपणे रंडीबाज म्हणणे, तमाम पेशव्यांना बदफैली म्हणणे, पेशव्यांच्या स्त्रियांचे मराठ्यांशी शरीरसंबंध होते असे म्हणणे (कुठलाही पुरावा नसताना), आणि अशाच गलिच्छ विचारसारणीतले अनेक लेख. जर असे लेख कुठल्या मराठा जातीतल्या व्यक्तीविषयी लिहिले गेले असते तर जाळपोळ, तोडफोड झाली असती. पण ब्राह्मणांविरुद्ध लिहिले जातात आणि जातील. त्या पुस्तकांवर बंदी नाही किंवा त्याविरुद्ध आंदोलने नाहीत. याविषयी कुणाला शंका असल्यास मी हवे तितके पुरावे देऊ शकेन.
३. ह. मो. मराठे आणि अन्य ब्राह्मण जातीतल्या व्यक्तींनी हा ब्राह्मणद्वेष हाताबाहेर जातो आहे असे मानून काही पुस्तके छापली आहेत. त्यात कुठे असली गलिच्छ शिवीगाळ नाही. ह्या द्वेषाकडे निव्वळ काही वेडपट लोक म्हणून दुर्लक्ष करू नका असे सांगितले आहे.
४. जाळपोळ, विध्वंस, पुतळ्यंची विटंबना, तोंडाला काळे फासणे असे कार्यक्रम ब्रिगेड हाती घेत असते. ब्राह्मण सभेने असे काही केल्याचे ऐकिवात नाही.
५. आर आर पाटलांसारखे मातब्बर नेते ब्रिगेडचे खंदे समर्थक आहेत. पवारांसारखे छुपे समर्थक तर अनेक आहेत. ब्राह्मणांना समर्थन देणारे कुणी मंत्री मला माहीत नाहीत.
6 Sep 2010 - 2:12 am | इंटरनेटस्नेही
चांगला धागा.. पुढील वाटचालीसाठी शुभकामना.
6 Sep 2010 - 9:59 am | मृत्युन्जय
बाय द वे. आता २३३ झाले. धागा गोठवणार का आता?
6 Sep 2010 - 10:04 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
गोठवून घ्यायचा असेल अजून थोडेसेच 'हट'के प्रतिसाद द्या. काम होऊन जाईल.
6 Sep 2010 - 11:45 am | मृत्युन्जय
गोठवून घ्यायचा असेल
आम्हाला काहीच करायचे नाही आहे. केवळ एक शंका आली म्हणुन विचारले.
6 Sep 2010 - 10:10 am | llपुण्याचे पेशवेll
इथे चाललेली चर्चा इतिहासाबद्दल , इतिहासाच्या पुर्नर्लेखनाबद्दल आहे त्यात ब्राम्हण मराठा वाद का आणल्या गेला हे कळले नाही. त्यासाठी वेगळा धागा उघडता येईल. या धाग्यावर फक्त पुनर्लेखनाची चर्चा करावी असे वाटते.
6 Sep 2010 - 11:07 am | अवलिया
सहमत आहे.
अच्छा ! बौद्ध धर्म भारतातुन ह्द्दपार कसा झाला यावर काय प्रकाश टाकणार आहात?
6 Sep 2010 - 11:38 am | llपुण्याचे पेशवेll
सदर पुनर्लेखनाचा प्रस्ताव परा राजवाडे यांचा असल्याने सदरहू प्रश्न त्यांस विचारला जावा.
6 Sep 2010 - 11:47 am | सहज
बौद्ध धर्म भारतातुन ह्द्दपार नाही तर सर्व बौद्धधर्मीयांना परदेशात एम्प्लॉयमेंट अपोर्ट्युनिटीज मिळाल्यामुळे ते बाहेरच्या देशात वगैरे गेले ना, बर्मा, थायलंड, कंबोडीया, चीन, जपान वगैरे वगैरे सांगा बॉ कोणीतरी.
पराला हवे अजुन बारा (प्रतिसाद)
6 Sep 2010 - 12:11 pm | अवलिया
अच्छा ! मग अमेरिका, आफ्रिका, युरोपात गेलेले कोणत्या धर्माचे?
6 Sep 2010 - 12:17 pm | सहज
कृपया प्रकाश टाका नानाचार्य!
6 Sep 2010 - 12:19 pm | अवलिया
मला माहित नाही म्हणुन विचारणा केली सहजानंद स्वामी
6 Sep 2010 - 12:48 pm | सुहास..
छे !! छे !! त्यांना आधीच कळाले होते की त्यांच्याच ह्याच देशात 'ला देन ' वगैरै पोसल्या जाणार आहेत म्हणुन 'शांतताप्रिय' बौध्द निघुन गेले असावे .....आता त्यांना भविष्य कळत होते की नाही हा भाग वेगळा, पुरावा मिळणार नाही.
6 Sep 2010 - 12:50 pm | llपुण्याचे पेशवेll
पुरावा असता तरी मिळालच असता असे नाही. कोणीतरी आधीच पुरुन टाकलेला असता तर?
6 Sep 2010 - 12:56 pm | सुहास..
कोणीतरी आधीच पुरुन टाकलेला असता तर? >>>
हे आपण पुराव्यानिशी कसे शाबित करणार , आणी जर पुरुन टाकलेल्या पुराव्याशी आपला पुरावा जोडुन त्या पुराव्याशी आपण दिलेल्या उपरोक्क्त वाक्याचा पुरावा कसा गृहीत धरणार आहात ?
6 Sep 2010 - 1:08 pm | अवलिया
तो आमचा प्रश्न आहे आपण वृथा डोके शिणवु नये
6 Sep 2010 - 12:55 pm | अवलिया
पण आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार (अर्थातच हे विचारवंतांनी पुरवलेल्या माहितीवर आधारीत आहे) बौद्धांना आपल्या शुन्यवादी आणि जगत क्षणिक आहे या तत्वज्ञानाचा तथाकथित फोलपणा लक्षात आल्याने "त्याने" सर्व मनुष्यांच्या उपभोगा करताच निर्माण केले आहे असे प्रतिपादन करणार्या धर्माचा मनापासुन स्विकार केला. याबाबत आपले इतिहासाचार्य काय सांगतात?
6 Sep 2010 - 1:01 pm | सुहास..
अर्थातच हे विचारवंतांनी पुरवलेल्या माहितीवर आधारीत आहे >>>
या वर आम्हाला पुरावा अपेक्षित आहे शिवाय माहीती पुरवणारे विचारवंतच आहेत याला पुरावा काय ?
बौद्धांना आपल्या शुन्यवादी आणि जगत क्षणिक आहे या तत्वज्ञानाचा तथाकथित फोलपणा लक्षात >>>
तथाकथित फोलपणा ह्या शब्दाला तीव्र आक्षेप नोंदवित आहे .याच तत्वादानाच्या आधारावर मानवी जीवनातला रस निघुन न जाता प्रत्येक क्षण जगण्यावर भर दिला जातो असे बाबा ओशो सांगतात ...पुरावा मिळेल(आश्रमात अॅडमिशन घ्या)
6 Sep 2010 - 1:05 pm | अवलिया
>>>या वर आम्हाला पुरावा अपेक्षित आहे शिवाय माहीती पुरवणारे विचारवंतच आहेत याला पुरावा काय ?
पुरावा योग्य वेळी विचारवंत सादर करणार आहेत. माहिती पुरवणारे फार गाजलेले पुरातत्व विशारद आहेत त्यामुळे ते विचारवंत आहेत कारण त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.
>>>तथाकथित फोलपणा ह्या शब्दाला तीव्र आक्षेप नोंदवित आहे .याच तत्वादानाच्या आधारावर मानवी जीवनातला रस निघुन न जाता प्रत्येक क्षण जगण्यावर भर दिला जातो असे बाबा ओशो सांगतात ...पुरावा मिळेल(आश्रमात अॅडमिशन घ्या)
इतिहास लेखनाचे काम सोडुन आश्रमात नाक पकडुन बसायला वेळ नाही. आमच्या वाटचे तुम्ही जाउन या, जी काही फी असेल ती देउन टाकु
6 Sep 2010 - 1:16 pm | सुहास..
आमच्या वाटचे तुम्ही जाउन या, जी काही फी असेल ती देउन टाकु >>
आमचे आधीच जाऊन झाले आहे , बाकी फी आपल्याला परवडेल की नाही अशी शंका आहे ..
बाकी -हासा बद्दल शंकराचार्य -नंगे गोसावी - केरळातील परिसर ह्याविषयी आपणास माहीत आहे आपण पुपेच्या कानात असताना पर्याने पाहिले असल्याचे कळते ..मशाल घेऊन प्रकाश टाकावा
6 Sep 2010 - 2:04 pm | अवलिया
>>>आमचे आधीच जाऊन झाले आहे , बाकी फी आपल्याला परवडेल की नाही अशी शंका आहे ..
+१ जरी आम्हाला परवडली नाही तरी आपल्यासारखे सुहृद आम्हास मदत करतीलच. शेवटी इतिहास पुनर्लेखनाचा प्रश्न आहे.
6 Sep 2010 - 1:05 pm | अवलिया
>>>या वर आम्हाला पुरावा अपेक्षित आहे शिवाय माहीती पुरवणारे विचारवंतच आहेत याला पुरावा काय ?
पुरावा योग्य वेळी विचारवंत सादर करणार आहेत. माहिती पुरवणारे फार गाजलेले पुरातत्व विशारद आहेत त्यामुळे ते विचारवंत आहेत कारण त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.
>>>तथाकथित फोलपणा ह्या शब्दाला तीव्र आक्षेप नोंदवित आहे .याच तत्वादानाच्या आधारावर मानवी जीवनातला रस निघुन न जाता प्रत्येक क्षण जगण्यावर भर दिला जातो असे बाबा ओशो सांगतात ...पुरावा मिळेल(आश्रमात अॅडमिशन घ्या)
इतिहास लेखनाचे काम सोडुन आश्रमात नाक पकडुन बसायला वेळ नाही. आमच्या वाटचे तुम्ही जाउन या, जी काही फी असेल ती देउन टाकु
6 Sep 2010 - 1:04 pm | llपुण्याचे पेशवेll
बौद्धधर्म संपला तो त्याचा जनाधार संपल्याने. थोडेफार तसेच महानुभाव पंथाबाबतही झाले होते. बौद्ध तत्वज्ञान कितीही चांगले असले तरी नंतर बौध्दांचा जनाधार अनेक कारणांमुळे गेला. हे कारण आम्हाला सर्वात जास्त पटते.
-वरवर मुलुंडकर
6 Sep 2010 - 1:07 pm | अवलिया
ती अनेक कारणे आपण सांगावीत अशी विनंती
6 Sep 2010 - 1:09 pm | llपुण्याचे पेशवेll
जे कारण आम्हाला पटले ते आम्ही सांगितले. बाकी अनेक कारणांसाठी नवीन उपलब्ध झालेली ऐतिहासिक साधने वापरावीत. :)
6 Sep 2010 - 1:11 pm | अवलिया
तुम्हाला पटलेले बरोबर असेलच असे नाही. ऐतिहासिक साधने असेही सांगतात हिंदू राजांनी बौद्ध मठ आणि स्तुप लुटले. त्याचे काय?
6 Sep 2010 - 12:51 pm | सहज
>अमेरिका, आफ्रिका, युरोपात गेलेले
सुरवातीला गेले ते सगळे विद्यार्थी अथवा गुलाम. स्वातंत्र्यपुर्वकालातील विद्यार्थी जहाल व मवाळ दोघे स्वातंत्र्यसैनिक झाले. स्वातंत्र्योत्तर काळात गेले विद्यार्थी पुढे गुलामच झाले. बरोबर?
आणि हो, ना स्वातंत्र्यसैनिक ना गुलाम दोघांचाही धर्म नसतोच!
6 Sep 2010 - 12:57 pm | अवलिया
माहितीबद्दल धन्यवाद. इतिहास पुनर्लेखनात योग्य बाब स्पष्ट होईल असे वाटते.
6 Sep 2010 - 1:01 pm | परिकथेतील राजकुमार
सहजकाकांनी ह्यावर अजुन माहितीपुर्ण लिखाण करावे अशी विनंती आहे.
6 Sep 2010 - 1:02 pm | मस्त कलंदर
झाले एकदाचे २५०!!!
हा २५१वा प्रतिसाद..
6 Sep 2010 - 1:07 pm | llपुण्याचे पेशवेll
१०० हून अधिक प्रतिसाद आधीच झालेले असेल्याने कॄपया अवांतर प्रतिसाद देऊ नयेत. संपादक हा प्रतिसाद पुसतील का?
कृपया पुनर्लेखनाबाबत आपले काय मत आहे ते कळवणे.
6 Sep 2010 - 1:16 pm | मस्त कलंदर
पुनर्लेखन तर आपण करत आहात, अथवा करायला साहाय्य करत आहात. त्यामुळे तो भार आम्ही आमच्या नाजूक बोटांवर टाकत नाही. तुमचे झाले की जे काही निष्कर्ष निघतील ते कळवण्याची तसदी मात्र तुम्ही घ्याच.
असो... वरील प्रतिसाद अवांतर नाही. तो 'धागा आणि प्रतिसादसंख्या' इतिहासाच्या पुर्नलेखनातील एक मैलाचा दगड आहे.
बाकी, आंतरजालावर प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला कळावीच असा आमचा आग्रह नाही म्हणून तुम्हांस सोडून दिले.
6 Sep 2010 - 1:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
+१
नव्हे, पेशवे फक्त जागेच्या उपलब्धतेचा डंका पिटत स्वत:ची पोळी भाजून घेत आहेत. हा पूर्वीप्रमाणेच एक अब्रह्मण्यम कावा आहे.
6 Sep 2010 - 2:18 pm | परिकथेतील राजकुमार
शत्रुचा शत्रु तो मित्र ! ह्या न्यायाने वरिल प्रतिसादाला +१ देत आहे.
6 Sep 2010 - 2:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तुमच्या या छपरी राजकारणापासून मला लांब ठेवलंत तर उत्तम!
(उद्दाम) अदिती
6 Sep 2010 - 1:05 pm | सुहास..
झाले एकदाचे २५०!!!
हा २५१वा प्रतिसाद.. >>
प्रश्न प्रतिसादांचा नसुन ' पुर्नलेखनाचा' आहे.
असो .२५१ची पावती फाडल्याबद्दल मंडळ आभारी आहे, आपल्याला पुढील रविवारी आरतीचा मान देत आहोत