साहीत्य : अळुची पाने ५ - ६
डाळीचे पीठ - २ वाट्या
तांदळाचे पीठ - २ चमचे
हिरव्या मिरचीचे वाटण
लाल तिखट
तीळ - २ चमचे
मीठ
चिंचेचा कोळ - २-३ चमचे
गुळ
अळुच्या पानांची देठे आणी जाड शीरा कापुन घ्याव्यात.
डाळीचे पीठ , तांदळाचे पीठ , मिरचीचे वाटण , लाल तिखट , मीठ ,तीळ , गुळ व चिंचेचा कोळ एकत्र करावे. त्यात थोडे पाणी घालुन जाडसर असे पीठ भिजवावे.
अळुच्या पानाला मागच्या बाजुने हे पीठ लावावे. त्यावर दुसरे पान ठेवुन पुन्हा पीठ लावावे. अश्याप्रकारे ३-४ पाने झाल्यावर एका बाजुने गुंडाळी करत त्याचा रोल ( उंडा ) तयार करावा. हा रोल कुकर अथवा स्टीमर मध्ये १५ मिनीटे वाफवुन घ्यावा. थंड झाल्यावर त्याच्या वड्या कापुन शॅलो फ्राय कराव्यात.
प्रतिक्रिया
2 Sep 2010 - 11:19 am | प्राजक्ता पवार
फोटोची लींक टाकुनही फोटो दिसत नाही
2 Sep 2010 - 11:20 am | वेताळ
वर फोटो दिसत नाहीत.
आळुची वडी मला खुप आवडते.अजुन माझ्या मित्राच्या घरी एकदा पुर्ण तळुन काढलेली आळुची वडी मी खाल्ली होती. ती देखिल एकदम मस्त चवीला लागते.आळुची वडी व टोमॅटोसॉस खावुन बघा ,मस्त लागते.
2 Sep 2010 - 11:22 am | मदनबाण
अळुवडी मला फार आवडते,बर्याच दुकानात बनवलेली अळुवडी हादडली आहे,पण ठाण्याच्या खंडेलवालमधे मिळणारी अळुवडी जबरदस्त असते. :)
2 Sep 2010 - 11:28 am | प्राजक्ता पवार
2 Sep 2010 - 11:28 am | परिकथेतील राजकुमार
हा घ्या तुमचा फोटु.
पाकृ भन्नाट आहे.
2 Sep 2010 - 11:30 am | विसोबा खेचर
फोटो?
2 Sep 2010 - 11:31 am | वेताळ
मला पण हा प्रश्न पडतो,कि अळुवडी हा महाराष्ट्राचा पदार्थ आहे कि राजस्थानचा? मिठाईच्या दुकानात अळुवडी एकदम झक्कास बनवतात.
2 Sep 2010 - 12:08 pm | प्राजक्ता पवार
धन्यवाद परा , फोटो शोधुन प्रकाशित केल्याबद्दल.
2 Sep 2010 - 12:19 pm | मनि२७
मला पण अळूवडी आवडते मस्त आंबट गोड.....आणि तिखट पण..!!!
2 Sep 2010 - 3:45 pm | स्मिता_१३
छान पाकृ.
अळुवडी म्हणजे अगदी वीकपॉइंट.
2 Sep 2010 - 6:52 pm | मेघवेडा
कट टू कट असेच बोल्तो.. :)
2 Sep 2010 - 6:57 pm | स्वाती दिनेश
अळूवडी झक्कास !
वडीसाठीचे अळू वेगळे असते. त्याची देठे काळपट असतात आणि पानेही भाजीच्या अळूपेक्षा किंचित जाड असतात. भाजीच्या अळूचे देठ हिरवट असतात.
देठांचे भरीत- देठीही मस्तच लागते.
तसेच अळूचे कंद- अळकुड्या/अरवी यांचे भरीत आणि भाजी दोन्हीही फार छान होते.
स्वगत- अळूची भाजी,वड्या खायला कधी मिळणार?
स्वाती
2 Sep 2010 - 8:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>देठांचे भरीत
देठांचे भरीत लय भारी लागतं....!
-दिलीप बिरुटे
2 Sep 2010 - 7:07 pm | सुनील
किंचित कच्चे तेल सोडलेल्या स्टीम्ड अळूवड्यादेखिल चांगल्या लागतात (तव्यावर परतल्याच पाहिजेत असे नाही)
बाकी पाकृ एकदम परफेक्ट!
2 Sep 2010 - 8:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अळूवड्या मस्तच..
-दिलीप बिरुटे
3 Sep 2010 - 2:37 am | चतुरंग
मस्तच! एकदम खमंग दिसताहेत वड्या!! :)
(अळुमाळू) चतुरंग
3 Sep 2010 - 4:34 pm | प्राजक्ता पवार
धन्यवाद :smile:
3 Sep 2010 - 9:36 pm | अजबराव
देठांचे भरीत कधि खाल्ले नाहि....कसे बनवायचे?
3 Sep 2010 - 9:38 pm | मिसळभोक्ता
अळूवडी ह्या शब्दाचा एक वेगळाच अर्थ आम्हाला माहिती होता.
(तरूण मुलेमुली एकत्र क्यांपला गेल्यावर बर्याचदा ऐकू यायचा तो.)
त्यामुळे, पास.
4 Sep 2010 - 6:48 pm | स्मिता चावरे
पाक कृती आवडली.
अळूच्या देठांची देठी / भरीत बनवणे सोपे आहे. देठांवरील पातळ पापुद्रा काढून टाकावा.
मग ही देठे बारिक चिरुन कुकर मधे वाफवून घ्यावीत. त्यात थोडे मीठ, चवीपुरती चिमुट्भर साखर, थोडे शेंगदान्याचे कूट घालावे.
दही घालावे. वरून तूप्,जिरे आणि हिरव्या मिरचीची फोडणी द्यावी. चविष्ट देठी तयार !