Departed एक छान movie

utkarsh shah's picture
utkarsh shah in काथ्याकूट
28 Aug 2010 - 9:48 pm
गाभा: 

Departed हा मला खुप आवडलेला चित्रपट आहे. कितीजनांनी तो पाहिला आहे ते माहित नाही, पण नसेल पाहिला तर एकदा आवर्जुन पहा. ज्यांनी पाहिला असेल त्यांना ही तो नक्कीच आवडला असेल.
चित्रपटात खलनायक बाजु भक्कम आहे.आणि या चित्रपटाचा शेवट पाहून मी पण गुंग झालो होतो. पोलिस डिपार्टमेंट वर याची पुर्ण कथा आहे.खलनायक हा स्मार्ट , हुशार असुन त्याची भरती पोलिसात सहज होते. नायकाला मात्र घेताना टाळाटाळ केली जाते कारण त्याचे फॅमिली बॅकग्राऊंड. तरी पण त्याला घेण्यात येते, पण underground agent म्हणून.
त्याला गुंडाच्या टोळीत सामिल होउन त्यांच्या बातम्या पुरवणे हे त्याची जबाबदारी. पुढे थोडा bollywood style ने जातो. म्हणजे ज्या पोलिस अधिकार्याने याला गुप्त पोलिस बनवले असते त्याचा म्रुत्यू वगैरे.
त्यातच नायक जिच्या प्रेमात पडतो ती आधीच खलनायकाची प्रेमिका असते.(हा थोडा वेगळा भाग वाटतो नेहमीच्या bollywood styleपेक्षा..) तसेच नायक ज्या टोळीसाठी काम करत असतो त्याचा म्होरक्या हा नायकाला आपल्या मुलासमान मानत असतो. थोडक्यात नायक गुंड असुन पोलिसांसाठी काम करतो, तर खलनायक हा पोलिस असुन गुंडांसाठी काम करतो.
पुढे काय होणार याची पुर्ण चित्रपटात उत्सुकता लागुन राहते.आणि चित्रपट पण आपल्याला देखिल अनपेक्षित धक्के देत राहतो.
शेवट सांगण्यासारखा नाहिये, कारण तो फारच अनपेक्षित आहे.चित्रपट नक्की पहा. ज्यांनी पाहिला असेल त्यांनी आपली मते जरूर द्यावित.
सविस्तर लिहीण्याची अजुन सवय नाहिये म्हणुन लवकर आवरते घेतोय. प्रयत्न करेन थोडे मोठे लेख लिहायचा......

प्रतिक्रिया

मेघवेडा's picture

28 Aug 2010 - 9:59 pm | मेघवेडा

नक्की प्रयत्न करा. चित्रपटांचं परीक्षण लिहिलंत ते टीव्ही सीरीयलच्या लांबीचं.. (तेही जाहिराती वगळून :P)
साला निकल्सन, डॅमन, डीकॅप्रिओ असली तगडी स्टारकास्ट आहे. मस्त बैजवार लिहिता येईल की.. प्रत्येकावर एक एक परिच्छेद नक्कीच! लिहाच.. डीट्टेलमध्ये लिहाच राव.. मजा येईल वाचायला.. :)

बाय द वे, गेट मी अ क्रॅनबेरी ज्युस! ;)

ऋषिकेश's picture

28 Aug 2010 - 10:32 pm | ऋषिकेश

चित्रपट पाहिला आहे.. तोही थेटरात..
ब्रॅड पिट्टची निर्मीती असलेला हा वेगवान चित्रपट मला आवडला होता.. तुम्ही म्हणता तसे काहि धक्के अनपेक्षित आणि नेमक्या वेळी दिलेले आहेत..

सहज's picture

29 Aug 2010 - 6:19 am | सहज

सिनेमा छान आहे पण हाँगकाँगच्या "इन्फर्नल अफेअर्स" या सिनेमाची कॉपी आहे. त्यामुळे कथानक, संवाद, मांडणी, काही तरी हटके असे वाटलेले जे काही ह्या सिनेमात आहे त्याचे सगळे श्रेय त्या ओरीजीनल सिनेमाला जाते.

डिपार्टेड एक छान कॉपी / रिमेक आहे इतकेच! ओरीजीनलला खाउन टाकेल इतका खास मला तरी नाही वाटला.

मुक्तसुनीत's picture

29 Aug 2010 - 6:49 am | मुक्तसुनीत

सिनेमा छान आहे पण हाँगकाँगच्या "इन्फर्नल अफेअर्स" या सिनेमाची कॉपी आहे.
+१
ओरीजीनलला खाउन टाकेल इतका खास मला तरी नाही वाटला.
-१
-----

- मुसेश वालावलकर.

सहज's picture

29 Aug 2010 - 8:00 am | सहज

ज्यांनी आधी इन्फर्नल अफेयर्स पाहीला आहे त्यांना डिपार्टेड बघताना काय होणार हे माहीत असल्याने फारसे विशेष असे थ्रील नव्हते. बरेचसे प्रसंग तसेच असल्याने ओरीजीनल ते श्रेय ओरीजीनलचे द्यायलाय हवे ना? निदान मला तरी तसे वाटते.

ज्यांनी आधी डिपार्टेड पाहीला आहे (किंवा जो सिनेमा आधी पाहीला असेल) त्यांच्या मनावर त्याच सिनेमाची छाप आहे, त्यांनी परत इन्फर्नल अफेयर्स पहावा तरी पहील्यांदा सिनेमा पाहील्याने जे संस्करण झाले आहे ते पुसुन दुसर्‍या कलाकृतीला (इथे ओरीजीनल सिनेमाला) श्रेय देणे अवघड असते. आता दोन्ही सिनेमात ४०-५० वर्षाची गॅप असती किंवा एक ब्लॅक एन्ड व्हाईट एक रंगीत सिनेमा असा काळातला फरक असता तर काही वेगळेपण वाटले असते पण दोन्ही तसे एकाच जमान्यातील असल्याने मी म्हणतोय की मला तरी ओरीजीनल सिनेमा प्रभावी वाटतो.

असो ज्याची त्याची ... मी डिपार्टेडला वाईट म्हणले नाही आहे. तोही सिनेमा मी एन्जॉय केला आहे. इथे फक्त ओरीजीनल सिनेमाचा उल्लेख व श्रेय तसेच इच्छुकांना/सिनेमा अभ्यासकांना दोन्ही सिनेमे बघायला व वर उल्लेख केल्याप्रमाणे कोणत्या सिनेमाला श्रेय द्यावेसे वाटते अश्या अभ्यासाला प्रोत्साहन म्हणुन प्रतिसाद व हा खुलासा.

कदाचित चिंतातूर जंतू इ. आधीक प्रकाश टाकू शकतील.

विकास's picture

29 Aug 2010 - 8:25 am | विकास

काही ना काही कारणाने, हा चित्रपट बघणे राहून गेले आहे, आता नक्कीच लक्षात ठेवीन.

डिपार्टेड एक छान कॉपी / रिमेक आहे इतकेच! ओरीजीनलला खाउन टाकेल इतका खास मला तरी नाही वाटला.

चित्रपट कसा केला यावर अर्थातच मी काही लिहू शकणार नाही. मात्र तो निव्वळ कॉपी/रिमेक आहे असे म्हणता येत नाही. कदाचीत काही सनसनाटी भाग कॉपी केलेला असेल ही. पण यातील गोष्ट ही बॉस्टनमधील सत्यकथा आहे. हा चित्रपट बॉस्टनच्या "व्हाईटी बल्जर" नामक एफ बी आय च्या (ओसाम बीन लादेन येई पर्यंत) मोस्ट वाँटेड लिस्ट वर सगळ्यार वर असलेल्या गुन्हेगारासंदर्भात आहे. समरव्हील या शहरात त्याने विंटरहील नावाच्या भागात तयार केलेल्या "विंटरहील गँगने" येथे ३०-४० वर्षांपुर्वी घातलेल्या हैदोसाने अजूनही जुने लोकं घाबरतात. एफबीआयच्या अंडरकव्हरला मारले गेल्यावरून खटला तर आत्ता आत्तापर्यंत चालू होता.

अवांतरः येथे (विंटरहिल वरील) एका आतल्या रस्त्यावर मला वाटते द. अमेरिकन स्थलांतरीतांनी आत्ताच एक चर्च बांधले आहे. इथल्या जुन्या जाणत्या व्यक्तीने सांगितले - ते चर्च म्हणजे काही वर्षांपुर्वीपर्यंत एक रिपेअर गराज होते. त्यात या व्हाईटी महाशयांचा अड्डा होता आणि तेथेच न आवडणार्‍या लोकांसाठी अक्षरशः खड्डा होता...आजतागायत हा व्हाईटी परागंदा आहे आणि त्याला पकडण्यासाठी जंगजंग पछाडले जाते, पण मिळलेला नाही... या व्हाईटीचा धाकटा भाऊ म्हणजे मॅसॅचुसेट्स राज्याच्या राजकारणातील मोठे प्रस्थ होते. विल्यम बर्जर म्हणजे मॅसॅच्युसेट्स राज्याच्या स्टेट हाऊसचा प्रेसिडेंट होता तसेच युनिव्हर्सिटी ऑफ मॅसॅच्युसेट्स चा प्रेसिडेंट होता..

शिल्पा ब's picture

29 Aug 2010 - 11:37 am | शिल्पा ब

पाहीलायं...भारी खुनाखुनी ए ...शेवट तर भन्नाट..

योगी९००'s picture

29 Aug 2010 - 2:31 pm | योगी९००

त्याला गुंडाच्या टोळीत सामिल होउन त्यांच्या बातम्या पुरवणे हे त्याची जबाबदारी. पुढे थोडा bollywood style ने जातो. म्हणजे ज्या पोलिस अधिकार्याने याला गुप्त पोलिस बनवले असते त्याचा म्रुत्यू वगैरे.
डॉन (अमिताभचा) ची आठवण झाली...

मालोजीराव's picture

31 Aug 2010 - 8:01 pm | मालोजीराव

झक्कास चित्रपट आहे निकल्सन, डेमोन आणि डिकॅप्रियो यांची तिकडी मस्त जमलीये, godfather style खून खराबा वाटला !