पुण्याचे महापौर माननीय यानी जाहीर केल्याप्रमाणे लाल महालातून अखेर पुतळा हलणार तर!
माननीय एका जबाबदार पक्षाचे असल्यामुळे ते दिलेली वाणी खरी करणारच. शेवटी दिलेला शब्द पाळणे महत्वाचे. त्या पुतळ्याचे काय करणार? सन्मानाने विसर्जीत करावा अशी एक सुचना (जर कुणाच्या भावना दुखत नसतील तरच!)
---
आणखी काही सूचना. (हे सर्व केल्याने कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची खात्री असावी)
१. पुणे आणि इतर महत्वाच्या शहरातील पुतळ्यांची खानेसुमारी करावी आणि एक मोठा मास्टर प्लान बनवून असे भावना दुखवणारे सर्व पुतळे त्वरीत हलवावेत किंवा विसर्जन करावेत (ज.कु.भा.दु. न.त)
२.महाराजांचा जयंती उत्सव सुरू झाला तो उल्लेख इतिहासातून काढून टाकावा.
३.पूण्यातील इतिहासा चे पुर्न्लेखन करावे.
हे सर्व शक्य आहे. जर 'पलायना ' मुळे शालेय पुस्तके बदलू शकतात तर ही गोष्ट किती महत्वाची असणार?
तसे आपण काहीही करू शकतो फक्त राजकीय इच्छाशक्ती असणे.
(हा वाद अट्टाहासाने आत्ताच पुढे येण्याचे का 'लवासा' तर नसावे?)
प्रतिक्रिया
25 Aug 2010 - 9:28 pm | शेलार मामा मालुसरे
लवासाच्या मुद्यात दम आहे.
25 Aug 2010 - 10:57 pm | मृत्युन्जय
इतिहास घडवा कसला इतिहास बदला लेको. **ची जय यांच्या.
मि पा वर शिव्या दिल्या तर चालतात का? कचकुन शिव्या द्यायची इच्छा होत आहे आत्ता. शेपुट्घाले, कणाहीन लोक साले. आणि निर्णय कोण घेणार तर तो yz राजपाल. त्याला मराठ्यांचा इतिहास तरी माहिती आहे का विचारा आधी.
26 Aug 2010 - 3:48 am | विश्वनाथ मेहेंदळे
इतिहास काय आहे या पेक्षा तो काही झुन्डींना कसा ऐकायला ऐकायला आवडेल हे महत्त्वाचे. आता ज्ञानेश्वरी ला भंपक साबित केले किंवा ती ज्ञानेश्वरांनी कुणाकडून तरी (कुणा ब्राह्मणेतराकडून) ढापली हे सिद्ध केले कि ताबूत थंडे होतील यांचे.
असो, त्यांना इतिहास बदलू दे, ज्यांच्या अंगात धमक आहे ते नवीन इतिहास घडवतील मग त्यांची जात काहीही असो.
26 Aug 2010 - 7:36 am | हुप्प्या
शिवरायांबद्दल यापुढे फक्त बहुजन बोलतील, लिहीतील, वाचतील आणि ऐकतील असे बघावे.
26 Aug 2010 - 8:56 am | गांधीवादी
हुप्प्या भाऊ, जास्त घेत जाऊ नका, त्रास होतो त्याने.
4 Jan 2017 - 11:48 am | llपुण्याचे पेशवेll
१. तसेच पुणे व अन्य ठिकाणी राजांच्या नावाने संपत्ती जमवलेल्या भटांची संपत्ती जप्त करावी.
२. शनिवार वाडा हे बहुजनांच्या शोषणाचे प्रतिक आहे म्हणून तो पाडून उलटा बांधावा. (कारण बांधणार्यांना आता उलटे टांगणे शक्य नाही म्हणून)
३. सारसबाग गणेश मंदीर हे ब्राह्मण पेशव्यांनी बहुजनांचे शोषण करून बांधलेले आहे म्हणून ते पाडून टाकावे तिथे सर्वप्रेमी आलमगीराची कबर बांधवी.
26 Aug 2010 - 8:49 am | नगरीनिरंजन
ज्या लोकांनी नको त्या कंड्या पिकवल्या ते राहिले बाजूलाच आणि आता सरसकट भुई धोपटण्याचा प्रकार चालू आहे. वर्तमान 'सुजाण' राज्यकर्त्यांकडून दुसरी अपेक्षा नाहीचे म्हणा.
शिवाजी महाराज जन्मलेच नसते तर बरं झालं असतं असं म्हणायची वेळ आणली आहे दोन्हीकडच्या काही लोकांनी.
धन्य ती मराठी अस्मिता आणि धन्य ते मराठी जन.
26 Aug 2010 - 10:33 am | sagarparadkar
तुम्ही पुणेकर अभिजन २१ व्या शतकातल्या 'जाणत्या राजा' ला मानत नाही ; पण १७ व्या शतकातल्या जाणत्या राजापुढे कायम नतमस्तक होता, त्यांच्या पायाची धूळ अजूनही आपल्या कपाळावर लावता. आणि इथे सध्याच्या जित्या-जागत्या, कर्त्या-सवर्त्या, आशास्थान, भारतवर्षाचे भावी आणि एकमेव आधारस्तंभ अश्या महान 'जाणत्या राजा'पुढे मान तुकवत नाही म्हणजे काय? मग आम्ही १७व्या शतकातल्या जाणत्या राजाची आठवणच एक्-एक करून पुसून टाकतो, आम्हाला कोण आडवणार?
26 Aug 2010 - 10:44 am | अमोल केळकर
विनाकारण वाद घालण्याचा राज्यकर्त्यांचा डाव आहे. सुजाण पुणेकरांनी उधळून लावायला पाहिजे
अमोल
26 Aug 2010 - 11:51 am | मृगनयनी
हा ह हा.... 'मोहनसिन्ग राजपाल' हे पुण्याचे महापौर आहेत... याची आठवण "काल"च आम्हाला पुन्हा झाली... ;)
(मध्यंतरी आम्ही चुकुन महापौर राजपाल म्हणजे- "राजपाल यादव"च मानायचो! हीहीही! ... शेम ऑन अस! ;) राजपाल यादवचा अपमान होतो म्हणजे काय ? ;) )
___ जाउ देत! .......
मध्यंतरी पुण्यात झालेल्या कुठल्याशा "मिका"च्या की "दलेर (की दिलेर) मेहंदी" च्या प्रोग्रॅम मध्ये ... "राजपाल दादाजी"ना नाचताना पाहिले होते..... ;) ;)
त्याआधी किन्वा त्यानन्तर "पुणे"शहराच्या विकासासाठी किन्वा त्यासंदर्भात "दादाजी"चा उल्लेख कुठे दिसलाच नाही हो!
उल्लेख सोडा... साधा त्यांचा 'फोटो' पेप्रात द्यायचे सौजन्यही वृत्तपत्र वाल्यांनी दाखवले नाही! :|
_____________________
(दीप्ती चौधरी' ताई पुण्याच्या महापौर झाल्या- कलमाडी साहेबांच्या कृपेने... obviously ;) .. तेव्हा मात्र रोज त्यांचा एकतरी फोटो असायचा.... वेगवेगळ्या पोजमध्ये! ;) )
असो... सांगायचा मुद्दा इतकाच.... की काल माननीय "दादोजीं"चा पुतळा हटवण्यासाठी "दादाजींनी" म्हणे आयुक्तांना आदेश दिले... की २४ घंटे के अंदर अंदर पुतला हटना चाहिये.. (वरना मेरी जान को खतरा हय! ;) )
"दादाजींना" तर हेही माहित नाहीये.. की लाल महल कुणी बांधला.... शिवाजी महाराजांचा इतिहास काय ? .. सई-ताई निम्बाळकर कोण होत्या? :( :( :(
त्यामुळे "दादाजींनी" हे कृत्य कुणाच्या आग्रहा'वरून केले... हे काही पुन्हा सांगायची गरज नाही... ;)
कारण सगळ्यांनाच माहित आहे... सम्भाजी सीग्रेड.. वगैरे... लोकांना कुणाचा पाठिम्बा आहे... ते! ;)
संभाजी सीग्रेड.. वगैरे अतिरेकी सन्घटना या रा.वा. काँ. चे पा__ले _त्रे आहेत!.. ;) .. असं कुठेतरी ऐकल्याचे स्मरते!!..
... कालच्या प्रसंगामुळे आम्हाला "बर्याच" गोष्टी स्मरायला लागल्या आहेत... ! ;)
असो... पण कालच्या प्रसंगावरून आम्हाला पुन्हा प्रकर्षाने कळले की "सरदार लोकांवर सर्वात जास्त जोक्स का बरं होतात"
धबड धबड धबड धबड धबड धबड धबड ! || सुरीन्दर बाबा की जय || ;) (सौजन्य : सोनी टीव्ही.. - कॉमेडी सर्कस ) :)
___________________
काल आय बी एन- लोकमत वर कोळसे-पाटील, मिलिन्द एकबोटे आणि निखिल वागळे यांची चर्चा पाहिली आणि ऐकली! :)
अम्मळ मौज वाटली...... प्रवीण गायकवाड.. यांनी चर्चेच्या शेवटी का होईना... पण "बामन लोकानी शिवरायान्च्या राज्याभिशेकाला विरोधा केला.. आनि दादोजी कोन्डदेव- हे बामन होते.. " इ. इ. मुक्ताफळे उधळली.. ज्याचा कालच्या चर्चेशी काहीएक सम्बन्ध नव्हता!... पण त्यामुळे का होईना.... गायकवाडांनी सम्भाजी ब्रिगेड'ची "चीप पब्लिसिटी" करायची सन्धी बिल्कूल सोडली नाही!...
आणि कोळसे -पाटील यांना तर "मिलिन्द एकबोटें" च्या प्रश्नांना उत्तरे देता देता... दम लागला.. आणि "काही" उत्तरे न सुचल्यामुळे त्यांचा राग अनावर झाला! :|
आणि अगदीच संयम सुटल्यावर कोळसे पाटील , मिलिन्द एकबोटेंना उद्देशून म्हणाले ,"
" त्याच्याईच्चा..****#$% ... त्या मिलिन एकबोटेला म्हनावं.... तुज्याईचा पुतला करून लाव म्हना... त्या दादोजीच्या श्येजारी! " &&**#$%^ " ... मन्ग बोल!
" माज्या जास्ती नादी लागू नकोस... ठेवणार नाय तुला... हात पाय तोडून ठेवेन. बर्याच लोकान्ला सरळ केलाय!!!!!!!!!!!!.. ब्ला ब्ला ब्ला ब्ला ब्ला ब्ला ब्ला ब्ला ब्ला "
ओह माय गॉड्ड्ड्ड्ड्ड!!! ..
पुन्हा एकदा सम्भाजी सीग्रेड्'ची लायकी सिद्ध करायची एकही सन्धी सोडली नाही त्यांनी !
_______
अर्थात या गर्दी मुळे काल आम्हाला घरी पोचायला अम्मळ उशीर झाला! शेम शेम शेम.... :| ;) ;)
_______
पण अमोल केळकर'जी , खरोखर आता आपल्यासारख्या सामान्य आणि शान्तिप्रिय पुणेकरांनीच सुजाण बनून काहीतरी केले पाहिजे! :)
26 Aug 2010 - 11:54 am | प्रचेतस
याच गायकवाड महोदयांनी बाबासाहेब पुरंदरे, समर्थ रामदास यांचाही एकेरी भाषेत अतिशय घृणास्पदरीत्या हीन उल्लेख केला.
अर्थात त्यांच्याकडून यापेक्षा दुसरे काय अपे़क्षित असणार म्हणा. त्यांना या महान व्यक्तींचे कार्य माहितीच नाही.
ज्या बाबासाहेबांनी सदोदीत महाराजांचा ध्यास घेतला, ज्यांनी उन, वारा, पाउस यांची तमा न बाळगता सह्याद्रीच्या निबिड दर्याखोर्यांतून, काट्याकुट्यातून प्रवास केला, शिवचरित्राचा प्रसार केला त्या व्यक्तीबद्दल असे हीन उद्गार ऐकून खरोखर वाईट वाटले.
कोळसे पाटलांबद्दल आम्ही पामर काय बोलणार, कोळसा जितका उगाळावा तितका काळाच.
26 Aug 2010 - 4:06 pm | कापूसकोन्ड्या
हेच का ते कोळसे १९७२-७३ मध्ये जोशी अभ्यंकर खुन खटल्यामध्येआरोपींचे वकिल होते?
26 Aug 2010 - 12:05 pm | llपुण्याचे पेशवेll
काय सांगता मिलिंद एकबोटेंना बोलावलं होतं चर्चेत? मी नेमका मुकलो त्या चर्चेला.
एकबोटे एक सच्चे कार्यकर्ते आहेत. बघूया त्यांना आम्ही सांगितलं आहे मुद्द्द्यापासून गुद्यापर्यंत सगळ्याची तयारी आहे. काय करायचं तर आताच करा.
26 Aug 2010 - 1:08 pm | अर्धवट
च्यायला चुकली की रे चर्चा ती माझीपण..
काय काय झालं ते पण सांग रे.. जालावर मिळेल का कुठं.
26 Aug 2010 - 1:15 pm | सुहास..
ह हा.... 'मोहनसिन्ग राजपाल' ................शान्तिप्रिय पुणेकरांनीच सुजाण बनून काहीतरी केले पाहिजे !
=)) =))
अगगा !! काय प्रतिसाद आहे का चप्पल !!
ह्यापुढे काय लिहायची जरज नसावी
26 Aug 2010 - 2:06 pm | मेघवेडा
__/\__
क ड क प्रतिसाद गो नैने!
26 Aug 2010 - 10:54 am | विसोबा खेचर
काकोंशी सहमत..
विश्वनाथाशी सहमत..
तसेच हुप्प्याच्या प्रतिसादाशीही सहमत..
आपला,
(शिवभक्त) तात्या.
26 Aug 2010 - 1:10 pm | परिकथेतील राजकुमार
वा वा वा !
हलवणार का एकदाच तो पुतळा ? बर्र झालं.
तिथे पलिकडेच एक बामणी वाड्याचे अवशेष अजुन शिल्लक आहेत, शनिवार वाडा काय काय ते. ते पाडुन तिथे भांडारकरच्या धर्तीवर एक मोठी संस्था उभारुन बहुजनांचा खरा इतिहास जो आजवर दाबुन ठेवण्यात आला आहे तो उकरुन काढण्याचे कार्य करता येईल.
26 Aug 2010 - 2:32 pm | llपुण्याचे पेशवेll
अहो कसला भांडारकर आणि इतिहास घेऊन बसला आहात. शरद पवाराना ती भांडारकरची जमिन पाहीजे होती पैशासाठी म्हणजे तिथे त्यांनी कॉम्प्लेक्स उभारून तिथल्या जागा मारवाडी धंदेवाल्याना विकून 'विकास' केला असता ना! आहात कुठं?
कशी काय तुम्हाला विकासाची भाषा कळत नाही हो?
26 Aug 2010 - 3:27 pm | परिकथेतील राजकुमार
काय हे दुर्दैव !
एका प्रतापी राजावर नाही नाही ते शिंतोडे उडवुन झाले, आता आमच्या बारामतीच्या जाणत्या राजावर उडवा. पेशवे कुठे फेडाल हि पापं ?
26 Aug 2010 - 3:43 pm | शेलार मामा मालुसरे
जिभ हासडावी त्या सर्व नराधमांची जे कोणत्याही बाजारबसव्याला जाणता राजा म्हणतात.
26 Aug 2010 - 4:09 pm | परिकथेतील राजकुमार
सहमत आहे हो जाणते मामा आपलं सॉरी शेलार मामा.
28 Aug 2010 - 9:31 am | मृण्मयी दीक्षित
त्या बारामातीवाल्याला जाणता राजा बोलून शिवरायांचा अपमान करू नये.
11 May 2012 - 11:36 pm | सोत्रि
ऑ..., धम्याला कोण शिंचा 'जाणता' राजा म्हणाला बरं ?
- (जाणता रंक) सोकाजी
26 Aug 2010 - 3:35 pm | यशोधरा
अहो, काहीही काय बोलता? भांडारकरमध्ये आहेच काय? तिथे काय ग्रन्थ भांडार आहे का? उगा आपली बामणांची थेरं!
26 Aug 2010 - 4:35 pm | llपुण्याचे पेशवेll
सहमत आहे. भांडारकर च्या जागी एखादा चांगला पब वैग्रे बांधला तर आयपील च्या पुणे वॉरीयर टीमसाठी पार्टीला जागा तरी होईल.
26 Aug 2010 - 4:42 pm | यशोधरा
खरय, खरय! बामणंच ती! त्यांना हे असले शौक कुठून कळायला!
26 Aug 2010 - 1:31 pm | अविनाश कदम
आपल्याकडील विद्वानांनी जरा इतिहास निट सुधरून घेण्यासाठी एकत्र यावे. इतिहास लिहिण्याची व तपासण्याची काही शास्त्रीय पद्धत आहे की नाही?
सबळ पुराव्यानीशी सिद्ध झाले की दादोजी कोंडदेव महत्वाचा माणूस नव्हता. तर
संबंधितांवर पुतळा हलवण्याचे आपोआप बंधन येईल. निदर्शने, मोर्चे, हुल्लडबाजीने इतिहास
बदलण्याचा प्रयत्न हा मुर्खपणाचा आहे. कोळसेपाटलांचं ठिक आहे. पण न्या. पी.बी.सावंतही त्यांच्या
नादाला? याचं आश्चर्य वाटतं. महाराष्ट्रातल्या विचारवंतांना काय झालंय?
सगळीडेच ‘राडा’ संस्कृती माजलेली आहे.
अविनाश
26 Aug 2010 - 3:19 pm | आम्हाघरीधन
आपल्या कडे शास्त्र पद्धतीने सत्य इतिहास बदलण्याची पद्धत पेशवाई पासुन सुरु आहे... उगाच काहीही उफराटे आरोप केल्याने पुतळा लाल महालात राहणार नाही..... तो उचलण्याची तयारी केंव्हाच सुरु झाली आहे...
पेशवाई गेली पण शेपुट राहिले वळवळ करायला...
26 Aug 2010 - 4:10 pm | मृगनयनी
ह्म्म्म तरीच म्हटले... सम्भाजी सीग्रेड्'ला सगळे शिव्या घालतायेत.. आणि "हे" रडतराऊत अजून आलं कसं नाही ! ? !
कुजलेल्या प्रेताच्या वासाने कशी गिधाडे जमतात... तसे "संभाजी ब्रिगेड्"ची चर्चा चालली, की आपण येता... आम्हा घरी धन! उर्फ राऊत राय उर्फ रडत राऊत!
ही ही ही ! (ग्ल्याआक्क्क्क्क...... )
असो! ... दादोजी कोन्डदेवांचा पुतळा तिथून हटवण्यापेक्षा "शहाजी राजें"चा पुतळा तिथे आणून बसवणे.. सगळ्यांच्याच हिताचे नव्हते का?
पण नाही! ... बामनद्वेष कुटं तरी दिस्ला पायजेल ना!
आणि अकलेने काम करतील ते सम्भाजी ब्रिगेड (उर्फ सीग्रेड") चे सच्चे कार्यकर्ते कसले? (हा हा हा)
आपला मेंदू अजून पायाच्या करंगळीच्या नखातून वरती सरकलाच नाहीये... हे दाखवायचा केवढा हा अट्टाहास्स!!
अरे ब्रह्मदेवा! का रे असा अन्याय केला या "रडतराऊतां"वर! ;) ;)
______________
आणि आता तर काय "मिडियम" म्हणून अजून एक "सरदार" मिळालाये ना! ... ;)
जसं माकडाच्या हाती कोलीतच! (माकडांनो माफ करा... तुमची तुलना खूपच हीन दर्जाच्या अतिरेकींबरोबर केली जातेय!)
किन्वा आधीच माकड... त्यात त्याला दारू पाजली!! .. (जाऊ दे... माकडांचा जरा जास्तच अपमान होतोये! ;)
_______________
बाय द वे! .. तुमचे ते प्रवीण गैकवाड, कोळसे पाटील... इ. मुळे आमची काल रात्री फार करमणूक झाली बरं का!
;)
ते मिलिन्दजी एकबोटे आणि निखील वागळ्यांचाच डाव होता हो... तुम्हाला उचकवून तुमच्या तोन्डून सणसणीत शिव्या मिडियासमोर आणायच्या... म्हणून तर मिलिन्दजी वेळात वेळ काढून आले! ;)
आणि या कुटील कारस्थानाला तुमचे गैकवाड आणि पाटील बळी पडले!....
नसती इज्जत घालवून बसले बिचारे! :) .. करंगळीच्या नखात मेन्दू असल्यावर काय होणार दुसरे! :-?
________________
जाऊ दे.. पुढल्या वेळी काळजी घ्यायला सांगा हं त्यांना.... :)
26 Aug 2010 - 4:15 pm | अर्धवट
मृगनयनीतै.. जंगी सहमत..
ही स्वाक्षरी ठेवायच्या विचारात आहे. :)
“I learned long ago, never to wrestle with a pig, you get dirty; and besides, the pig likes it.”
(प्रताधीकार - George Bernard Shaw)
26 Aug 2010 - 4:24 pm | मृगनयनी
ही स्वाक्षरी ठेवायच्या विचारात आहे.
“I learned long ago, never to wrestle with a pig, you get dirty; and besides, the pig likes it.”
ठेवा हो! अर्धवट'जी! ... पण डुकरांना (पक्षी : pig) इन्ग्रजी कुठे कळतय ? ;)
शेवटी दिसने आनि असने यामधे एकच अन्तर : मणाचा भाव! नाही का?
;) ;)
बाय द वे.... श्रीमन्त पेशवे... त्यांच्याकडच्या हत्तींना १० मणाचे चांदीचे साखळदन्ड घालायचे म्हणे!!
अहाहा!... काय तो थाट!... काय ती श्रीमन्ती !
उगीच नाही "शाही थाटाला" , "शाही भोजनाला", "शाही संस्कारांना", "शाही संस्कृतीला" आजही (सुसंस्कृत)लोक "पेशवाई" म्हणतात! :) :)
______
चिखलात लोळणार्या आणि आपल्या अंगावरचा चिखल इतरांवर उडवून त्यात धन्यता मानणार्या "डुकरांना" काय कळणार पेशवाईचा अर्थ! ;)
26 Aug 2010 - 3:29 pm | Dipankar
शास्त्रीय पध्दतीने एका जातीला बदनाम करण्याची वळवळ चालु झाली आहे
26 Aug 2010 - 3:32 pm | टग्या टवाळ
परिकथेतील राजकुमार सर्व प्रथम आपण बहुजनांचा हुशार नेता आज कोण आहे ते दाखवा मग बहुजनांचा इतिहास शोधा तस ही महाराजांन नंतर शनिवार व ब्राम्हणानाच इतिहास आहे.
हुप्प्या हुप्प च बसायच काय तर बहुजनातले विद्वान लोक उचित मानधन देऊन याकरता नेमावेत. नीदान बहुजना न साठी बहुजनांनी फुकट हे काम कराव व खर्या इतिहासाची नव्याने मांडणी करावी (असल्यास).
आपण काय बोलतोय काय नाही ते पहा उगाच गायकवाड/ कोळसे/ खेडेकर अशा भपंक लोकाच्या नादी लागु नका. (वीनायक मेठे मराठा आरक्शना साठी बाहेर पड्ले आमदार झाले पुठे काय ? ) मराठ्यांशी त्याला काहीही देण घेण नाहीये आपल्य आमदारकीत मस्त आहेत तेव्हा सबुरी ने घ्या. पुढील शंभर वर्षे उच्चवर्णीयच शिवरायांचे नाव घेणार आहेत.असो
26 Aug 2010 - 3:38 pm | परिकथेतील राजकुमार
अहो तुम्ही वर येउ दिलेत तर कोणीतरी नेता होईल ना ? सगळी सत्तास्थाने तुम्ही लोकांनी स्वतःच्या दावणीला बांधुन ठेवली आहेत. आणि मायावती/ आठवले सैब/ काशीराम/ छगनभौ हे थोर नेते तुमच्या डोळ्याला दिसत नाहीत का ? आणि ब्राम्हणांना कुठे आहे हो इतिहास ? आणि शनिवारचा इतिहास सांगा बर जरा. त्या वाड्यासाठी पैसा कुठुन आला ते पण सांगा. आणि महाराजांतर संभाजीराजे झाले, ताराराणी झाल्या, शाहु झाले हे सगळे येवढ्यात विसरलात का ? का आता हा पण इतिहास दाबुन टाकणार आहात ?
आमचे थोर नेते आणि तज्ञ सध्या तेच करत आहेत. एकदा आमच्या ब्रिगेडी सभांच्या बाहेरची पत्रक वाचा म्हणजे डोळे उघडतील तुमचे.
आम्हाला पण त्यांच्याशी काय घेणे देणे नाही !
26 Aug 2010 - 4:40 pm | छोटा डॉन
परिकथेतल्या राजकुमाराच्या सगळ्या प्रतिसादांशी सहमत आहे.
बास झाली आता मुस्कटदाबी !!!
परा, तु लढ रे, वेळ आलीच तर आम्ही ही येऊ मैदानात ;)
- छोटा डॉन
26 Aug 2010 - 4:42 pm | llपुण्याचे पेशवेll
परिकथेतील राजकुमार यांणी इतिहासाचे पुनर्लेखन करावे यासाठी पाठिंबा आहे. हवं तर आम्ही एक ओसरी देऊ शनिवार वाड्याची. ;)
26 Aug 2010 - 4:45 pm | अर्धवट
च्यायला.. आमचा चानस गेला म्हनायचा.. ठिकाय काही हरकत नाही, आमी आणखी ५-१० वर्षं थांबुन पुनर्पुनर्लेखन करू.
पुप्या पुढची विलेक्षन लागली की आठवण कर रे..
26 Aug 2010 - 4:50 pm | यशोधरा
त्यावेळी दुसरं एखादं "लवासा" ही काढा शोधून. लग्गेच संधी मिळेल तुम्हाला हव तेवढ्या इतिहासाचं हवं तसं पुनर्लेखन करायची!
26 Aug 2010 - 4:48 pm | परिकथेतील राजकुमार
श्री. पेशवे तुम्ही देणारे कोण ? अहो खरेतर त्या वाड्यावर आमचाच खरा हक्क आहे. शेवटी आमच्या शाहूराजांच्या पैशातुन उभारलेला वाडा आहे तो. वाड्यात काय काय थेरे करुन पार सगळ्या मराठी दौलतीची इभ्रत घालवली ती तुम्ही बामणांनी, आणि वर म्हणे ओसरी देउ वापरायला. काय पण मिजास !
श्री. छोटा डॉन,
माझय लेखनानी तुमच्या सारखे अजुन लोक जागे होतील आणि आपला खरा इतिहास बाहेर काढतिल तोच खरा सोनियाचा दिन.
26 Aug 2010 - 4:54 pm | यशोधरा
इटलीच्या सोनियाचा का? हल्लीचे सगळेच दिन त्यांचे नसतात का?
26 Aug 2010 - 5:13 pm | टग्या टवाळ
शेवटी आमच्या शाहूराजांच्या पैशातुन उभारलेला वाडा आहे तो. मान्य पण मला १ सांगा कि तुमच्या शाहूराजांनी पेशवाइ चे वस्त्र बाळाजी विश्वनाथ यांनाच का दीली. शाहुराजांना तेव्हा कुणी बहुजनांचा एखादा सरदार दिसला नाही ?
शाहुमहाराज आमचे तुमचे नसुन सर्वाचे आहेत कुपया आमच्या आसा शब्द वापरु नका.
26 Aug 2010 - 5:22 pm | परिकथेतील राजकुमार
अहो ते सहिष्णु होते. तुम्हा भटा बामणांसारखे स्वतःच्याच जातीचा उत्कर्ष व्हावा म्हणुन प्रयत्न करणारे न्हवते.
ऑ ऑ ऑ ऑ .... मगाशी तर महाराजांनंतर तुमचा इतिहास संपला होता की हो :) तेंव्हा तुम्हाला शाहुराजांच नाव पण आठवले न्हवते. आणि आता ते तुमचे पण झाले का ? अर्र वा र वा !!
26 Aug 2010 - 5:28 pm | llपुण्याचे पेशवेll
श्री. पेशवे तुम्ही देणारे कोण ? अहो खरेतर त्या वाड्यावर आमचाच खरा हक्क आहे. शेवटी आमच्या शाहूराजांच्या पैशातुन उभारलेला वाडा आहे तो.
अहो मनाचा मोठेपणा कसा असतो ते आमच्याकडे बघून शिका हो. ;)
वाड्यात काय काय थेरे करुन पार सगळ्या मराठी दौलतीची इभ्रत घालवली ती तुम्ही बामणांनी, आणि वर म्हणे ओसरी देउ वापरायला. काय पण मिजास !
खरं आहे खरं आहे. शांतम् पापम् । असो. आम्ही याप्रीत्यर्थ काशीस जाऊन प्रायश्चित्त घ्यायचे म्हणतो आहे. तत्पूर्वी एकदा पूनमतिर्थी आचमने करावा असा मानस आहे. तिथे १२ बहुजनांना विप्र म्हणून भोजनघालून सव्वा रुपया दक्षीणा द्यायचा विचार आहे. तर जेवणार्यांच्या यादीत तुमचे नाव घालायचे का?
26 Aug 2010 - 5:31 pm | परिकथेतील राजकुमार
हॅ हॅ हॅ आता परवानगी कशाला ? कॅमेर्यासमोर मारामार्या करुन झाल्या की दरयेळी आपण तिकडच जातो की श्रमपरिहार का काय त्याला.
26 Aug 2010 - 5:35 pm | llपुण्याचे पेशवेll
हॅ हॅ हॅ आता परवानगी कशाला ? कॅमेर्यासमोर मारामार्या करुन झाल्या की दरयेळी आपण तिकडच जातो की श्रमपरिहार का काय त्याला.
हां आता कसं.
हवं तर एकदा त्या लालमहलापाशी पण जाऊन येऊ. तिथे पुढेमागे कुठेतरी काबुली चणा लई भारी मिळतो. तिर्थी जाण्याआधी तिथे जाऊन चणे घेऊन येऊ. आमच्या शनिवारवाड्याच्या आसपासच आहे तो लालमहाल.
ते जाऊद्या.
ते पुर्नर्लेखनाचं काम कधीपासून हाती घेता? त्या कामी काही मद्याची वगैरे सोय करावी लागेल की त्या कोळसेपाटलांसारखं उत्स्फूर्तपणे जमेल तुम्हाला?
26 Aug 2010 - 5:46 pm | मृत्युन्जय
वाड्यात काय काय थेरे करुन पार सगळ्या मराठी दौलतीची इभ्रत घालवली ती तुम्ही बामणांनी
हो ना. मस्तानीच्या नादी लागुन बाजीरावाने दौलत घालवली असे उगाच का म्हणतात लोकं?
26 Aug 2010 - 5:49 pm | परिकथेतील राजकुमार
अहो मस्तानी काय, घटकंचुकी काय... काही विचारु नका.
26 Aug 2010 - 6:04 pm | llपुण्याचे पेशवेll
अहो उलट बाजीरावाने दौलत आणली.. कित्ती कित्ती दौलत आणली होती बाजीरावाने.
26 Aug 2010 - 6:13 pm | परिकथेतील राजकुमार
हो का ? कुठे गेली मग ती ? पेशवाई तर बघाव तेंव्हा कर्जातच बुडालेली असायची की !
आता ति दौलत कुठे गेली असेल हे पेशवाईतल्या एकेक पंगती आणि इतर गोष्टी वाचुन लक्षात येते म्हणा.
26 Aug 2010 - 6:31 pm | llपुण्याचे पेशवेll
अहो तुमच्या सारखे अनेक लोक जेऊन गेले की हो पंगती मधे. किती वेळेला गाव जेवणावळी झाल्या होत्या तेव्हाही.
भुरके मारून मारून बासुंदी ओरपायचात विसरलात का?
26 Aug 2010 - 6:40 pm | मृत्युन्जय
फक्त बासुंदी नाही काही. रावण पिठलं सुद्धा. पण काय आहे तेव्हा यांचे लक्ष सगळे मस्तानीकडे असायचे. त्यामुळे बाकी काही लक्षात नाही राहिले त्याला आता काय करणार. त्यामुळे आजही ते मस्तानी शिवाय काहीही पीत नाहीत बघा.
26 Aug 2010 - 7:40 pm | जयंत कुलकर्णी
ब्राह्मणांनी मराठी दौलतीची ईभ्रत घालवली ! खरंच घालवली का ? माझ्या मते मराठी दौलतीची खरी इभ्रत ज्यांनी घालवली त्या मराठा सरदारांची ही पहा खाली यादी. या सर्व सरदारांनी महाराजांच्या विरुध्द कटे कारस्थाने करण्यात व त्यांच्या (महाराजांच्या) विरूध्द मोगलांना व मुसलमानांना मिळून लढण्यात धन्यता मानली. यात एकही महार, मांग, माळी इ. नाही. सर्व ९६ कुळीच आहेत. आता प्रवीण गायकवाड यांच्या सध्याच्या वंशजांच्या घरादारावरून गाढवाचा नांगर फिरवणार का ? आहे का त्यांच्यात एवढी ताकद ? फटके बसतील.
ज्या दादोजी कोंडदेवांनी आपली हयात महाराजांची सेवा करण्यात घालविली त्यांचे चांगलेच पांग फेडतोय आपण. यांच्या डोक्यात हे शिरत नाही आहे की ते त्यांचा पुतळा काढून जेम्स लेनच्या म्हणण्यालाच पुष्टी देत आहेत. हा पुतळा का काढला असे जर भविष्यात विचारले तर काय सांगणार गायकवाड ?
असो वाचूया.............
१ जावळीचे मोरे
२ यशवंतराव वाड्वे
३ मुधोळचे घोरपडे
४ सिधोजी पवार
५ मंबाजी भोसले
६ मालोजी पवार
७ तुळोजी पवार
८ मनाजीराजे घाट्गे
९ बाळाजी हैबतराव
१० बजाजी राजे नाईक निंबाळकर ( महाराजांचे सख्खे मेव्हणे)
११ माने ( विजापूर)
१२ संभाजी मोहिते ( सावत्र मामा)
१३ नाईकराजे पांढरे
१४ खंडोजी खोपडे ( मावळ)
१५ जगदाळे देशमूख ( मसूरचे)
१६ शंकराजी मोहिते
१७ नाईकजी खराटे
१८ कल्याणजी यादव
१९ सरदार सर्जेराव घाटगे
२० सूर्यराव सूर्वे ( श्रूंगारपूर)
२१ पालवणीचे जसवंतराव
२२ संवतवाडीचे राजे भोसले
२३ गोंदाजी पासलकर
२४ केदारजी देशमूख खोपडे
२५ सुरजी गायकवाड
२६ दिनकरराव काकडे
२७ संभाजीराव पवार
२८ कमळोजीराव कोकटे
२९ त्रंबकराव खंडागळे
३० कमळोजीराव गाडे
३१ अंताजीराव खंडागळे
३२ त्रंबक्जीराजे भोसले ( भाऊबंद)
३३ जिवाजीराजे भोसले ( भाऊबंद)
३४ बाळाजीराजे भोसले ( भाऊबंद)
३५ परसोजीराजे भोसले ( भाऊबंद)
३६ माहूरचे उदाराम भोसले
३७ सिंदखेडचे दत्ताजीराजे जाधवराव
३८ रुस्तूमरावराजे जाधवराव
३९ संभाजीराजे स्वतः ( दिलेरखान)
अजून्ही बरेच् आहेत, पण जाऊदेत....
हे सर्व त्या काळातील मोठे सरदार होते. हे नुसते स्वार्थासाठी महाराजांविरूध्द लढले नाहीत तर त्यांनी आपल्या सैन्यातल्या सर्व मराठ्यांना महाराजांविरुध्द लढायला लावले. महाराजंची मला वाटते निम्म्याच्या वर शक्ती यांच्याशी लढण्यातच खर्ची पडली असणार.
महाराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत ब्राह्मणांचा असा इतिहास नाही आणि पुढेही नाही.
शाहूमहाराजांच्या काळात तर त्यांच्या विरूध्द असंख्य मराठा सरदार होते. त्यांची यादी तर आपल्याला अचंबितच करेल.
उरला प्रश्न पेशव्यांचा. शाहू महाराजांना पेशवे पदाच्या लायक दुर्दैवाने एकही मराठा सरदार सापडला नाही हे सत्य आहे. दुसरे म्हणजे शाहू महाराजांचा त्यांच्या एकाही सरदारावर विश्वास नव्हता. पुढे शाहूमहाराजांचे सर्व सरदार केव्हा ना केव्हा तरी कुठल्या तरी कारणाने शाहू महाराजांशी लढले पण पेशवे शेवट पर्यंत त्यांच्याशी एकनिष्ठ राहिले. त्या मुळेच पेशव्यांचे संस्थान नाही. इंदूर नाही, ग्वाल्हेर नाही आणि बडोदाही नाही. पेशवे सारखे कर्जबाजारी रहायचे त्याचे मूख्य कारण म्हणजे त्यांनी भारतभर चालवलेल्या मोहिमा. त्या मोहिमेसाठी शाहूमहाराज त्यांना पैसे देत नसत. उलट मोहिमेवरून आल्यावर त्यांना ठराविक खंडणी शाहूराजांना द्यावी लागे. त्यामुळे त्यांनी शनिवार वाड्याला पैसे दिले हा दावा हास्यास्पद आहे.
असो. त्या काळात या लोकांना जसे वागावे लागले तसे ते वागले त्या बद्दल त्यांना दोष देता येणार नाही. ज्या प्रमाणे आपण हा विचार या महाराजांच्या विरूध्द कारस्थाने करण्यार्या सरदारांबाबत आणि त्यांच्या जातीतल्या सध्याच्या समाजाबाबत करतो, तर एका मूर्ख माणसाने महाराजांबद्द्ल काहिही घाणेरडे लिहिले म्हणून ज्या माणसाने आपले आयूष्य महाराजांना वाहिले आणि ज्या माणसाबद्द्ल प्रत्यक्ष महाराजांना आदर होता त्यांच्या बद्द्ल अशी वागणूक आपल्याला शोभा देत नाही. आणि ते सुध्दा का ? या मूठ्भर क्षुद्र राजकारण्यांसाठी आणि त्यांच्या स्वार्थासाठी. उद्या कोणीही उठेल आणि काहिही लिहील मग काय करणार................
26 Aug 2010 - 9:24 pm | विसोबा खेचर
सहमत..
27 Aug 2010 - 12:52 pm | टग्या टवाळ
जयंत कुलकर्णी मी आपल्या लेखनाशी पुर्ण सहमत आहे.
मोहिमेवरून आल्यावर ठराविक खंडणी शाहूराजांना द्यावी लागे हे आपण सांगितले त्या व्यतिरीक्त शाहूराजांना अजुन काय द्यावे लागे ह्याचा उल्लेख झाला असता तर बरे झाले असते. असो पुठे कधी तरि ह्याचा उल्लेख आमच्याच लेखनांत होइल.
27 Aug 2010 - 12:58 pm | मृत्युन्जय
अजुन काय द्यावे लागे म्हणजे?
27 Aug 2010 - 4:04 pm | मालोजीराव
सहमत !
कुलकर्णी काका आमचं नाव टाकल्याबद्दल धन्यवाद, चला कुणीतरी आमचा उल्लेख केला !
तुम्ही दिलेली यादी सुद्धा बरोबर आहे, पण यातील बहुसंख्य सरदारांनी समोरासमोर शत्रुत्व पत्करला होता (आम्हीपण )
तुम्ही यादी देताना फक्त स्वराज्यात राहून गद्दारी आणि फसवणूक करणाऱ्यांची द्यायला हवी होती.
(उदा. शिर्के ,खोपडे ई. )
कारण नंतर याच जाधवराव ,निंबाळकर ,गायकवाड ,पवार ई. नि स्वराज्यासाठी नंतर च्या काळात अफाट पराक्रम केला होता.
आणि आमचं शत्रुत्व प्रतापगड युद्धानंतर संपुष्टात आलेला होतं (प्रतापगड युद्धात भाग घेतल्याबद्दल मी पूर्वजांकडून दिलगिरी व्यक्त करतो :) )
पण तुमच्या गोष्टीशी सहमत आहे कि बरेच मराठे महाराजां विरुद्ध लढले !
27 Aug 2010 - 7:39 pm | जयंत कुलकर्णी
सरदार मालोजीराजे जगदाळे,
मराठ्यांविषयी मला वाटणारा आदर माझ्या सर्व लेखनात आपल्याला आढळून येईल. मला असा आदर का वाटतो याची कारणेही मी त्या त्या वेळी माझ्या प्रतिसादात दिलीच आहेत. यातले एक प्रमूख कारण म्हणजे या महाराष्ट्राचे जे काही चांगले वाईट व्हायचे आहे ते मराठ्यांच्या हातूनच व्हायचे आहे.
वरच्या यादीतले सरदार समोरासमोर लढत होतेच पण वाईट म्हणजे कट कारस्थानात मोगलांना सामील होते. खरे तर त्यात त्यांची काहीच चूक नव्हती. हे सर्वजण महाराजांइतकेच शूर होते. ( तुम्हाला खूष करण्यासाठी हे म्हणत नाही आहे) आणि त्यांचे स्पर्धकही होतेच.
महाराजांचे वडील जर मुसलमानांचे सरदार होते तर बाकिचे पण असल्यास कुणाला काही म्हणता येईल असे वाटत नाही.
माझा प्रतिसाद ब्राह्मणांचा उल्लेख ज्याप्रमाणे करण्यात आला त्याला उद्देशून होता. अर्थात शेवटी मला जे नेहमी म्हणायचे होते ते मी म्ह्टले होतेच.
मला आशा आहे आपण माझे मराठा लाईट इन्फ़ंट्रीवरची लेखमाला वाचली असेल. नसेल तर ती येथे आहे. तसेच मी पवारांच्या लेखावर दिलेली एक प्रतिक्रियाही जरूर वाचा. ती येथे आहे. पुढचे भाग माझ्या ब्लॉगवर आहेत. (www.jayantpune.wordpress.com )
मुद्दा असा आहे की इतिहासात घडून गेलेल्या गोष्टींकडून आपण फक्त शिकायचे असते नाहीतर माझे नेहमीचे वाक्य आहेच -
History is a Dangerous Past.
राहिला प्रश्न दिलगिरीचा. :-) त्याची खरंच आवश्यकता नाही, का, ते कारण मी वरच्या प्रतिसादात ( link) दिले आहे.
,
29 Aug 2010 - 11:21 am | मितभाषी
माझ्या मते मराठी दौलतीची खरी इभ्रत ज्यांनी घालवली त्या मराठा सरदारांची ही पहा खाली यादी. या सर्व सरदारांनी महाराजांच्या विरुध्द कटे कारस्थाने करण्यात व त्यांच्या (महाराजांच्या) विरूध्द मोगलांना व मुसलमानांना मिळून लढण्यात धन्यता मानली.
बहुजनसमाज जे कॄत्य करतो ते अज्ञानामुळे करतो. ब्राह्मण प्रत्येक गोष्ट जाणिवपूर्वक करतो.
3 Sep 2010 - 11:07 am | मृण्मयी दीक्षित
जयंतजी तुमच्याशी पूर्णतः सहमत.
मी पानिपत हि वाचले आहे आणि त्या एकाकी लढ्यात देखील पेशव्यांना न मराठी कामी आले न प्रतिबद्ध जाट व राजपूत.........
4 Oct 2010 - 1:34 pm | vinitraje
१) कृष्णा भास्कर कुलकर्णी
२) राज्याभिषेकाला विरोध करणारे ब्राम्हण
३) दिलेरखान जिंकावा म्हणून यज्ञ करणारे ब्राम्हण
४) आदिलशहा विरोधात पुंडाई करू नये म्हणून पत्र लिहिणारा कोंडदेव
५) नेताजी पालकर ला हिंदू धर्मात पुनःप्रवेश देण्यास विरोध करणारे ब्राम्हण
६) शुद्राच्या हाताखाली काम करतोय असे म्हणणारा मोरोपंत पिंगळे
७) शाहिस्तेखानाकडून लढणारी रायबाघीन
८) मिर्झाराजे जयसिंगाचा सचिव उदयराज
९) औरंजेबाचा प्रधान रघुनाथदास
१०) औरंगजेबाचा शिवनेरीवरचा किल्लेदार आबाभट
११) सिद्दीला मदत करणारा मुरुड-नांदगाव येथील जोशी
१२) बापूखानाला मदत करणारा नागोजी पंडित
१३) राज्याभिषेक प्रसंगी स्वराज्याचा पैसा लुटणारा गागाभट्ट
१४) शिवाजी-व्यंकोजी यांच्यात भांडणे लावणारा रघुनाथपंत हणमंते
१५) हैदराबादचे बादशहाचे अधिकारी मादन्ना-आकन्ना
१६) संभाजीराजांना मुगलांच्या ताब्यात देणारा कवी कुलेश
१७) शिवशक बंद करून फसली शक सुरु करणारे पेशवे
आणि आताचे latest शिवद्रोही:
१) तारीख तिथीचा वाद निर्माण करणारे पुरंदरे आणि साळगावकर
२) खोटा इतिहास, कादंबर्या लिहिणारे य.दि.फडके
३) जेम्स लेनला मदत करणारे भांडारकरी ब्राम्हण
४) संभाजीराजांविषयी कथा, कादंबर्या, चित्रपट यातून चुकीचा इतिहास पसरवणारे ब्राम्हण
५) शिवरायांचा मृत्यू अन्थ्रेक्स ने झाला असं पसरवणारा निनाद बेडेकर
ह्याचं नावही जोडायला पाहिजे…
हि लिस्ट अत्यंत मोठी आहे स्थलाअभावी पूर्ण देता येत नाही…
4 Oct 2010 - 2:26 pm | जयंत कुलकर्णी
मी इथे दिलेला प्रतिसाद स्वतःहून काढत आहे. कारण यावर कोणी उत्तर देऊ नये असे मी सुचवले होते आणि मीच लिहीले हा विरोधाभास नको.
स्त्याशोधक, फक्त एकच गोष्ट लक्षात असू द्या. ब्राह्मणांनी कोणाचेही पुतळे काढा असा आग्रह धरलेला नाही.
:-)
असो.
6 Oct 2010 - 2:19 am | अर्धवटराव
थोडं करेक्शन...
१४) शिवाजी-व्यंकोजी यांच्यात भांडणे लावणारा रघुनाथपंत हणमंते
-- व्यंकोजी नेहमी आदिलशहाशी इमानी राहिला. हणमंते इतका हुशार नक्कीच नव्हता कि ज्यामुळे भावा-भावात, तेही शिवाजी सारख्या राजाच्या मनात कलह निर्माण करेल
१५) हैदराबादचे बादशहाचे अधिकारी मादन्ना-आकन्ना
-- शिवाजी आणि संभाजीला शिवशाही + आदिलशाही + कुतुबशाही अशी मुघलांविरुद्ध आघाडी करायला मादण्णा-आक्कांणांनीच मदत केली. त्यांचा खुन झाला आणि कुतुबशाही पडली. परिणामी स्वराज्याच्या गळ्याला नख लागलं
१६) संभाजीराजांना मुगलांच्या ताब्यात देणारा कवी कुलेश
-- संभाजीला गणोजी शिर्केनि पकडुन दिले. कवी कलश संभाजी सोबत मृत्युच्या उंबरठ्यापर्यंत सावलीसारखा होता.
बाकी चालु द्या
(इतीहासप्रेमी) अर्धवटराव
26 Aug 2010 - 4:44 pm | टग्या टवाळ
प्रथम मि तुम्हाला सांगतो प्रत्येक माणुस हा स्व कक्तुत्वाने मोठा होत असतो.
आता नेत्याच म्हणाल तर..............................
१) मायावती - ज्या आपलेच पुतळे उभारण्यात गुंग आहेत (ब.स.प मध्ये आजही मायावती नंतर सतीश मिश्रां च वजन जास्त आहे )
२) आठवले सैब - ते काय बोलतात हे कुणालाच कळत नाही.(सोनीया गांधी च्या मागे फोटोत दिसण्या साठी धडपड करण्यात धण्यता मानणारे )
३) काशीराम :- ० तुन पक्श उभारणारे अतभुत व्यक्तिमत्व. ( मात्र त्यांच्या मागे कीति बहुजन उभे राहिले हे तुम्हीच सांगा)
४) छगनभौ - तळ्यात मळ्यात असलेले नेते (शिवसेना सोड्ल्या पासुन ते अशेच आहेत)
26 Aug 2010 - 3:33 pm | येडबंबू
आत्ताच हाती आलेल्या बातमी प्रमाणे ... 'तो' पुतळा हलवू नये म्हणून संभाजी ब्रिगेड च्या लोकान्नी लय राडा केला आहे म्हणे.
आणी आता समीती स्थापन करून निर्णय घेणार आहेत.
लोकशाही जिंदाबाद :)
---
26 Aug 2010 - 3:59 pm | मृगनयनी
हा हा हा! "अम्हा घरी धन" यांनी इथे प्रतिसाद दिल्यापासून सध्याच्या स्थितीला मिपावरील "पाहुण्यां"ची संख्या वाढतच चाललीये! ... सध्या १३९ पाहुणे "कार्यरत" आहेत हो! ..वाढूही शकतो हा आकडा!
अर्ध्या तासापूर्वी ७५-८० पाहुणे होते! बरंच फास्ट नेटवर्किन्ग दिसतंय !!! ;) ;) ;)
(लाल महाल सोडून सगळे इकडे काय करत आहेत बरं!! ... की "पाहुणे" मुम्बै'चे आहेत ? "भैय्या पाटलां"नी पाठवलेले)
;) ;) ;)
मिपा- जोरात आहे!!! आज! ! !
26 Aug 2010 - 4:27 pm | आम्हाघरीधन
=)
निरर्थक उक्तिवाद..
26 Aug 2010 - 4:38 pm | llपुण्याचे पेशवेll
=)) =))
उक्तीवाद...
26 Aug 2010 - 4:26 pm | नावातकायआहे
>>सध्या १३९ पाहुणे "कार्यरत" आहेत हो! ..वाढूही शकतो हा आकडा!
आत्ता १५६.....
26 Aug 2010 - 4:48 pm | बेभान
त्यातून ही बातमी हातात लागली. सरळ आहे जिथे पैसा तिथे साहेब. अरे इथल्या समस्यांच काय..? साहेबांच चप्पलफेकीपासून संरक्षण हो.
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प: १०४६९८ कोटी रु. क्षेत्रफळ :३०७६९० चौ. कि.मी.
लवासा : ७३००० कोटी रु. क्षेत्रफळ :१०० चौ. कि.मी.
श्रीकृष्णानं अधर्म, पापाचा नाश करण्यासाठी पुन्हा अवतार घेण्याचं वचन काय दिलं. या राजकारण्यांना, राज्यकर्त्यांना त्याची घाई झालेली दिसते.
26 Aug 2010 - 7:06 pm | प्रशु
लवासाचे प्रकरण गाजत असतानाच हे प्रकरण कसे काय सुरु झाले???
26 Aug 2010 - 7:09 pm | यशोधरा
लवासाला लोकांनी विसरावे म्हणून.
26 Aug 2010 - 7:15 pm | अवलिया
आमची तर मागणी आहे की मागचा सगळा इतिहास हा खोटा असुन भारताचा खरा इतिहास हा इ.स. १९२० पासुन सुरु होतो. त्याच्या आधीच्या सर्व खुणा पुसुन टाकल्या पाहिजेत. गो-या इंग्रजांनी काळी माकडे घेवुन त्यांवर प्रयोग करुन काळी माणसे तयार केली ज्यांना लोक भारतीय असं म्हणतात. २०-२५ वर्षे झाल्यावर महात्मा गांधीजींच्या (कानाच्या पाळीला हात) प्रयत्नाने ब्रिटिश इंग्लंडमधुन भारताचा कारभार पाहु लागले. पण काही मुर्ख आणि अर्धवट लोकांना भारताला स्वातंत्र्य मिळाले असे वाटते. अहो पारतंत्र्य नव्हतेच तर स्वातंत्र्य कुठ्ले मिळणार? गप्पा नुसत्या तंमाखु खाउन पचापच थु़कणार्यांच्या ! तरी बरे आमच्यासारखे काही विचारवंत त्यांना शहाणे करत आहेत. येईल ! यश येईल प्रयत्नांना !!
लवकरच हा खरा इतिहास आम्ही लोकांसमोर आणणार आहोत ... नक्की वाचा "भारतीय इतिहासाची चंदेरी पाने अर्थात भारत एक समृद्ध वसाहत "
मागणी नोंदवा .. आज मागणी नोंदवणार्यास आमच्या सहीसह पहिल्या आवृत्तीची प्रत बिना पोस्टेज खर्चाची २० टक्के सवलतीत.
26 Aug 2010 - 7:17 pm | अर्धवट
मागणी नोंदवली आहे.
त्या समीतीवर येण्यासाठी काय करावं लागेल?
26 Aug 2010 - 7:17 pm | बिपिन कार्यकर्ते
कॉम्प्लिमेंटरी कॉपीची लाईन कुठे आहे?
26 Aug 2010 - 7:44 pm | छोटा डॉन
अवलियांच्या सपुर्ण प्रतिसादाशी सहमत.
हे पुस्तक बाजारात यावे हीच इच्छा !!!
सदर पुस्तकास आम्ही "प्रस्तावना" लिहु असे कबुल करतो, "लोकशाही म्हणजे काय?" ह्यावर आमची आणि नानाची एकदा चर्चा झाली होती, त्याचाही ह्या पुस्तकात उल्लेख येईल अशी अपेक्षा.
आणि हो, प्रकाशानपुर्व मागणी नोंदवत आहे.
- छोटा डॉन
26 Aug 2010 - 7:53 pm | मृत्युन्जय
"ब्राह्माण - जगण्याची एक समृद्ध अडगळ" असा उपसंहार वाटल्यास आम्ही पण लिहु. तेवढे आमचे पण नाव समितीत टाका की.
26 Aug 2010 - 11:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
सदर पुस्तक प्रस्तावनेशिवाय बाजारात येईल असं सरळच लिहा की!
असो. डान्राव किंवा बिकांची प्रत घेऊन वाचेन मी!
27 Aug 2010 - 8:16 am | llपुण्याचे पेशवेll
अवलियाजी,
आपल्या उपक्रमासही आमचा पाठिंबा आहे. चला तुम्हालाही एक ओसरी दिळी शनिवारवाड्याची. किंवा झालंच तर तो पुतळा काढून झाला की ती रिकामी जागा आहे तिथं राहुटी बांधून देऊ. तिथे तुमची साधना चालूदे. पाहीजेच तर सरकारातून शिधा आणि सोवळ्यात स्वैकाक करणारा आचारी देऊ. उदंड साहित्य निर्मीती करा.
27 Aug 2010 - 4:12 am | अर्धवटराव
सदा सर्वकाळी एतद्देशियांनी एकमेकांचे उणे दुणे काढुन, पाय ओढुन आत्मघात करुन घेतला... स्वातंत्र्यप्राप्ती नंतर अवघा हिंदुस्तान (आणि हिंदु विशेषकरुन) एक होइल/व्हावा अशी आशा स्वा. सावरकरांसारख्याना वाटली. पण हि हजारो वर्षाची सवय आहे हो. हे वाकडे शेपुट सरळ होणे नाहि.
पण शिव-समर्थ भक्त या प्रसंगाला पुरुन उरतील. तयारीला लागा.
(दुरुन मजा पाहणारा) अर्धवटराव
27 Aug 2010 - 5:23 am | गांधीवादी
वसुंधरा माझा ग्रह आहे.
सारे वसुंधरा वासी माझे बंधू भगिनी आहेत,
माझ्या वसुंधरेवर माझे प्रेम आहे.
माझी वसुंधरा महान.
माझ्या वसुंधरेशी एकनिष्ठ राहण्याची पात्रता (लायकी) माझ्यात यावी म्हणून मी नेहमी प्रयत्नशील राहील.
27 Aug 2010 - 11:15 am | मालोजीराव
पण जेम्स लेन आणि एका विकृत विनोदाची पार्श्वभूमी या वादाला आहे , म्हणून तो पुतळा याला खतपाणी घालतोय असा बर्याच लोकांच मत आहे . दादोजीन चा पुतळा तेथून काढू नयेच, पण ते शिल्प अधिक widescope करावा आणि त्यात शहाजीराजे, कान्होजी जेधे, बाजी पासलकर यांचीही शिल्पे अंतर्भूत करावीत , म्हणजे आपोआपच दोन्ही बाजूंचे वाद शमतील आणि तोडगा निघेल !
यावर तुमचे मत काय आहे !
27 Aug 2010 - 11:37 am | मृत्युन्जय
घ्या. उद्या दुसरा कोणी जेम्स लेन त्यातुनही काही विकृत विनोद निर्माण करणार नाही किंवा कुठली राजाराम ब्रिगेड काही धुमाकुळ घालणार नाही याची काही खात्री आहे का?
27 Aug 2010 - 11:59 am | मालोजीराव
विकृत विनोद तयार करणारी माणसे पण आपलीच आणि जेम्स लेन ला माहिती पुरवणारी पण मनसे आपलीच !
हि विकृती पसरण्याच्या आतच थोपवायला हवी ! शेवटी इतिहास हा भुतकाळ असला तरी तोच भविष्य घडवतो ..!
पेशवाईत कोणीही उठसुठ बखरी लिहिल्या आहेत आणि त्यावर प्रकाश टाकणे गरजेचे सुद्धा आहे असा इतिहास संशोधक आणि सरकारचाही मत आहे ! हा आपलाच इतिहास आहे , त्याला आपण नाही जपायचा तर कोणी जपायचा , सो पुढे काय होईल यावर चर्चा करण्यापेक्षा आताच्या वादावर तोडगा काढायला हवा कि नाही (दोन स्पेसिफिक जातींचा वाद बाजूला ठेवून :) )
27 Aug 2010 - 12:08 pm | मृत्युन्जय
उठसुट म्हणजे कोणी ते कळु शकेल काय?
27 Aug 2010 - 11:44 am | llपुण्याचे पेशवेll
१. हा ही उपाय चांगला आहे. मूळात दादोजी कोंडदेव शिवाजीमहाराजांचे शिक्षक होते, रामदास आणि शिवाजी यांच्यातही दृढ संबंध होते असं मानणारा मोठा समुदाय महाराष्ट्रात आहे. याची जाणीव ठेवायला हवी.
२. या लोकांची जी काही संशोधनं आहे ती बहुतेक समाज मानणारच नाही म्हणून म्हणून हा दंडेलशाहीचा मार्ग अवलंबला जात आहे. दोनशे लोक रस्ता अडवून बसणार आणि म्हणणार हे काढा आणि ते पाडा हे सगळ्यात वाईट आहे. २०० लोक म्हणजे काही संपूर्ण समाज नव्हे. जर शिवगुरु दादोजींचा पुतळा काढल्याने सर्वच प्रश्न सुटणार असतील चालण्यासारखे पण ते होणार नाही. तसे होणार असेल तर मी तर म्हणेन पुण्यातले सगळेच पुतळे काढून टाका अगदी सावरकरांपासून सणसापर्यंत सगळ्यांचे. पण ते होणार नाही. लवासासारख्या मुद्यांवरून लोकांचे लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी चाललेला हा सारा खटाटोप आहे. कारण त्या तथाकथित आंदोलनात सहभागी असलेले लोक एकाच भागातून आणलेले वाटत होते. (आणि तसे वेष पुण्यात तरी कोणी येवढ्या मोठ्या प्रमाणात वापरत नाहीत. ते पुण्याबाहेरचे शेतकरी लोक असावेत. एकतर त्यांना फसवून आणले किंवा पैसे देऊन आणले). त्यामुळे ते २०० लोक म्हणजे समाज नव्हे.
३. पुण्यात असलेल्या पुतळ्याचं काय करायचं हे पुण्यातले लोक ठरवतील त्यावर बाहेरच्या कोणी काही दबाव आणण्याचे कारण नाही. अन्यथा हे आज पुतळा पाडणारे लोक उद्या शनिवार वाडा पाडायला निघतील.
27 Aug 2010 - 12:10 pm | प्रकाश घाटपांडे
सहमत आहे
27 Aug 2010 - 1:16 pm | बेभान
हे माहिती असेल तर "साप भी मरें और लाठी भी ना टूटे" (Disclaimer: हा साप हा मनुष्यरुपी असुन याचे काम स्वार्थासाठी समाजातल्या काही मनुष्यरुपी गुंड उंदरांना सोबत घेवुन भ्रष्टाचाराचे विष पसरविणे आहे. बाकी आम्हांस ख-या सर्पांविषयी आदर आहे.) असं काही करता येईल काय?
पुतळ्याच्या राजकारणावर चर्चा करणे म्हणजे त्यांच्या विषारी रोपट्याला खतपाणी घालण्यासारखे आहे. सुशिक्षीत शहाण्या ब्राम्हण-मराठ्यांनी वेळीच सावध होवुन आपापसात न लढता यावेळी समाजकंटकांना धडा शिकवणे गरजेचे आहे.
[चांगले वागणे, चांगले असणे, सुसंकृत असणे हा कुठल्याही जातीचा, धर्माचा, देशाचा मक्ता नाहीये. सर्व जातीत, धर्मात, देशात चांगली माणसे आहेत, नीचसुद्धा आहेत. गुणाला गुण म्हणताना मन मोठे करायला हवे. दोषाला दोष देतानाही हिंमत दाखवायला हवी! 'जातीसाठी माती खावी' या म्हणीसारखा आपल्या जातीच्या लोकांचा वाईटपणा झाकून ठेवण्याचा दांभीकपणा आणि हिनपणा कुठेही नसेल.]
जगन्नाथ कुंटे यांच्या नर्मदे हर हर मधुन.
27 Aug 2010 - 2:09 pm | मालोजीराव
विचारांना विचारांनीच मारल पाहिजे !
जर काही चुकीचा असेल तर सरकार इतिहास संशोधकांची समिती नेमून निर्णय घेईलच !
27 Aug 2010 - 12:38 pm | इन्द्र्राज पवार
"रामदास आणि शिवाजी यांच्यातही दृढ संबंध होते असं मानणारा मोठा समुदाय महाराष्ट्रात आहे."
सुमारे ८० प्रतिसादामधील सर्वात शहाणपणाचा (आणि समंजसपणाचा) श्री.पु.पे. यांचा हा प्रतिसाद. मागील जनगणनेत महाराष्ट्राची लोकसंख्या ९ कोटी ६८ लाख नोंदविली गेली आणि समाजनिहाय एक निष्कर्ष असा निघाला की, या जवळपास दहा कोटीच्या लोकसंख्येत "मराठा (आणि कुणबी)" समाज ४० टक्के आहे. याचाच अर्थ अदमासे पावणेचार कोटी मराठ्यांपैकी "पुतळे काढा, फोडा, इतिहास जाळा, ग्रंथभांडारांचा विध्वंस करा" आदी नाझी परंपरा चालविण्याची खुमखुमी असणारे पाऊणहजार वेगळे केले तर बाकीचे ९९% पेक्षा जास्त मराठे "रामदास आणि दादाजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु होते, दैवत होते" हेच मानतात.
मुंबई-पुणे वगळता अगदी कालपर्यंत लेनलागण राज्याच्या बाकीच्या ३५ जिल्ह्यांना शिवलीदेखील नव्हती. पण जातीचे कावेबाज राजकारण करण्याचे विलक्षण कसब असलेल्या मुरब्बींना महाराजांविषयी बेगडी प्रेम दाखवायला एक आयते कोलित मिळाले (ज्याला टीआरपीची खाज असलेल्या वाहिन्यांनी सुफला खत घातले), आणि त्याचे परिणाम काय होत आहेत हे आपण पाहतच आहोत.
मिपावर या विषयांवर वारंवार चर्चा होत आहेत. धागे आणखीनही निघतील आणि वाभाडे काढणारेही बाह्या सरसावून आपली मराठी भाषा धारदार करीत राहतील. तेव्हा विनंती एकच की, संभाजी ब्रिगेड वा त्या प्रणालीचे समर्थन करणारे म्हणजेच "समस्त मराठा समाज" अशी गृहितके कृपया मांडू नका. शिवाजी महाराजांना मानणारा जसा ब्राह्मणवृंद आहे तसाच सावरकरांना मानणाराही मराठा वर्ग आहेच आहे.
इन्द्र पवार
27 Aug 2010 - 1:17 pm | मालोजीराव
इन्द्र पवार यांच्याशी सहमत !
कोळसे पाटील यांसारख्या माणसाने ज्यांनी enron , daw , लवासा सारख्या जिव्हाळ्याच्या आणि लोकहिताच्या प्रश्नामध्ये शांततेनी लढा दिला त्यांनी तोड फोडी ची भाषा करणं पटलं नाही.
यातून काहीच सध्या होणार नाही उलट राज- युपी बिहारीन सारखे संबंध ब्राम्हण- ब्राम्हणेतर यांचे होतील.
27 Aug 2010 - 2:17 pm | जयंत कुलकर्णी
पवार साहेबांशी एकदम सहमत.
मला फक्त कळत नाही आहे हे ९९ % पेक्षा जास्त संख्येने असलेले मराठे काय करत आहेत ? त्यांना या नतद्रष्टांना आवरायला कितीसा वेळ लागणार ? का करत नाहीत ते तसे ? खोटे लाख वेळा संगितले की पुढच्या पिढीला तेच खरे वाटू लागेल. तो पर्यंत फार उशीर झालेला असेल.
हिच काळजी आहे.
www.jayantpune.wordpress.com
27 Aug 2010 - 3:22 pm | इन्द्र्राज पवार
"मला फक्त कळत नाही आहे हे ९९ % पेक्षा जास्त संख्येने असलेले मराठे काय करत आहेत ?"
श्री.जयंतराव, सहमतीबद्दल धन्यवाद. आता या तुमच्या वरील प्रश्नासाठी माझी (उत्तर नसले तरी) भूमिका अशी राहिली आहे की कोणत्याही समस्येकडे (भले ती राजकारणाशी संलग्न असो वा समाजकारणाशी) पाहताना माझ्यासारखी व्यक्ती ती घटनात्मक मर्यादांच्या बाहेर गेलेली नाही हे प्रथम पाहणे, यास प्राधान्य देते. संभाजी वा जिजाऊ ब्रिगेडच्या दृष्टीने हा कचखाऊ धोरणाचा भाग झाला, त्यांच्या या मताचे परिवर्तन त्यांच्या भाषेत वा कृतीत मी करू शकणार नाही कारण परत तेच...मी घटनेचे पावित्र्य मानतो. याच चौकटीत राहून रचनेचे कोन सांभाळण्यासाठी मला (व माझ्या विचारांशी सहमत असलेल्या अनेकाना) कोणते पाऊल उचलणे शक्य आहे याचा लेखाजोखा केल्यानंतर मी "ब्रिगेडची भूमिका किती चुकीची आहे" याबद्दल अगदी ज्ञानेश महाराव, अ.ह.साळुंखे ते पुरुषोत्तम खेडेकर यांच्याशी त्या त्या वेळी पत्रव्यवहार केला आहे. श्री.साळुंखे यांचे कोल्हापुरात ज्या ज्या वेळी व्याख्यानानिमित्ताने आगमन होते त्या त्या वेळी नेमस्त मार्गानेदेखील जटील प्रश्नांची उकल काढता येते का याबाबत सविस्तर चर्चा केल्या आहेत (अगदी ब्रिगेड सदस्यांच्या गराड्यात).
असे जरी असले तर तुम्ही जाणू शकता की तुमच्यासारखी एखादी सरळमार्गी अभ्यासू व्यक्ती अशा चर्चेत कधीही "हमरीतुमरी" वर येऊ शकत नाही, किंबहुना तो तुमचा उद्देश कदापिही असू शकत नाही. निष्कर्षाप्रत जरी चर्चा आली नाही तरी अनेक "मराठ्यांचे" मी प्रतिनिधीत्व करीत होतो हे श्री.साळुंखेसारख्या नेत्यांना पटले तरी मी बरेच कमावले असे मानेन.
वरील अनेक प्रतिसादात "शरद पवार" यांचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष उल्लेख आला आहे. त्यांची भूमिका ही (कोणत्याही विषयावर) कायमपणे एका राजकीय पुढार्याच्या प्रतिमेशी सुसंगत राहिली आहे पण म्हणून शरदराव समस्त "मराठा लॉबी" ची प्रतिमा आहे असे मानणे म्हणजे स्वतःचीच फसगत केल्यासारखे आहे. मी स्वतः "पवार" असूनही गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला विजयी करण्यात पुढाकार घेतला होता कारण स्थानिक कॉन्ग्रेसच्या नेत्यांनी तथाकथीत "राजघराण्या"चे चालविलेले कोडकौतुक. आमचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाला. पण पुढे याच शिवसेना आमदाराने बेळगावच्या कन्न्ड वेदिकेच्या (सीमा प्रश्नांबाबत कोल्हापुरात चर्चेला आले होते त्यावेळी) दोघा पदाधिकार्यांना 'झी स्टुडिओ' मध्ये गुंडशाहीने ठोकले होते त्यावेळी आमदारांचा निषेध करण्यास पुढे मी आणि माझे मित्रच होतो. इतकेच काय पण त्या जखमी कार्यकर्त्यांना स्थानिक दवाखान्यात योग्य ते उपचार होऊन त्यांना सुखरूपपणे बेळगांवी पाठविण्याची दक्षता घेण्यार्यांसमवेत होतो. (इथे "दक्षता घेणारे" अनेक मराठेच होते हेदेखील सांगतो.)
थोडक्यात हे जे ९९% आहेत ते सनद्शीर मार्गाने जे काही करता येण्यासारखे आहेत ते करीत असतात आणि मला वाटते ते एका सुजाण समाजातील सामंजस्याचे लक्षण आहे. धन्यवाद.
इन्द्रा
27 Aug 2010 - 6:30 pm | कापूसकोन्ड्या
हे ९९% बद्दल थोडेसे माझे विचार असे आहेत.
हे लोक सर्व प्रांतात आणि सर्व समाजात असतात.हे निसर्गदत्त शहाणपण येते कोठून? हा एक मोठ्ठा जगन्नाथाचा रथ आहे. कुणाचे ऐकावे आणि कुणाचे नाही हे त्यांना बरोबर समजते.
भारतीय राजकिय व्यवस्थे मध्ये तीच एक समाधानकारक बाब आहे.आणि त्याचा आपणा सर्वाना आभिमान हवा.
27 Aug 2010 - 7:57 pm | जयंत कुलकर्णी
इंद्रराज,
आपल्या समंजस भुमिकेचे आणि वस्तूनीष्ट विचारांचे कौतूक मी पूर्वीही जाहीरपणे केलेले आहेच. ते परत एकदा करतो.
आपण जर घटनेचा विचार केला तर आपल्याला लोकशाहीवर विश्वास ठेवावा लागेल. जर लोकशाहीवर विश्वास ठेवला तर आपण निवडून दिलेले लोकप्रतिनीधी आपले प्रतिनिधीत्व करतात यावरही विश्वास ठेवावा लागेल. म्हणजे हे लोकप्रतिनिधी जे निर्णय घेतात ते आपणच निर्णय घेतला असे मानले पाहिजे. हे जर खरे असेल तर शालेय पुस्तकातील दादाजी कोंडदेवांचा उल्लेख व त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार जर आपल्या लोकप्रतिनिधींनी रद्द केला तर काय समजायचे ? त्यावेळी किती लोकांनी यांचा विरोध केला ? (सत्तेतल्या ) कोणीही नाही. नाहीतर हा निर्णय झालाच नसता. मग बहुसंख्य जनतेचा याला पाठिंबा होता असेच म्हणावे लागेल. याचाच अर्थ हे वीष जनतेच्या मनात कालवण्यात हे नालायक यशस्वी झाले आहेत. मला हीच काळजी आहे.
मला वाटते मला काय म्हणायचे आहे ते मी सांगू शकलेलो आहे. नसल्यास परत प्रयत्न करेन.
माझा राजकारणाचा अभ्यास आपल्या एवढा नाही हे मी आत्ताच मान्य करतो.
27 Aug 2010 - 3:42 pm | मृत्युन्जय
कुलकर्णी साहेब मीदेखील इन्द्राज पवारांशी सहमत आहे. माझे बरेच मराठा मित्र आहेत. त्यातील काही तर अगदी जिवाभावाचे आहेत. कोणीच या संभाजी ब्रिगेड सारखे वांझोटे नाहीत. जातीपातीवरुन राजकारण कोणालाच आवडत नाही. पण त्या ब्रिगेडींच्या नादी कोण लागणार? त्यांना(ब्रिगेडींना) काहीच फरक पडत नाही. ? सामान्य माणुस त्यांना समजावयाला गेला तर ते हमरीतुमरी वर येउन मारामारी करु शकतात. सामान्य माणुस पण मारामारी करु शकतो पण त्याला सार्वजनिक जागेत तमाशा नको असतो. समाजात जसे थोडे गुन्हेगार असतातच. आपण त्यांना जाउन समजावयाचा प्रयत्न करतो का? तसेच ९९% मराठा समाज पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करणेच पसंत करत असणार ना?
27 Aug 2010 - 8:23 pm | जयंत कुलकर्णी
नमस्कार !
माझे सर्वच मित्र मराठा आहेत. :-) त्यांचे कुठे आणि काय चुकत आहे हे सांगणे मी माझे कर्तव्य समजतो.
27 Aug 2010 - 6:14 pm | क्लिंटन
पवार साहेब आपल्या प्रतिसादाबद्दल आपले आभार मानावेत तेवढे थोडे आहेत.मी कधीच कोणाची जात विचारायला जात नाही पण आपल्याच समाजात लहानाचा मोठा झाल्यामुळे अमुक एक अडनाव म्हणजे अमुक एक जात हे ठोकताळे मला पण कळायची इच्छा नसूनही कळत गेले.तर सांगायचा मुद्दा म्हणजे माझे काही मराठा मित्र आहेत आणि ते विचारी आणि सज्जन असेच आहेत हे वेगळे सांगायला नकोच. संभाजी ब्रिगेड या गुंड संघटनेला जितकी मी नावे ठेवतो तितकीच ते ही ठेवतात.पण अनेक (विशेषत: पुणे २९ आणि ३० यासारख्या भागांमधील) लोकांच्या परिचयात तितक्या प्रमाणात मराठा लोक आले नसतील तर संभाजी ब्रिगेडमुळे त्यांना ’सगळे मराठा संभाजी ब्रिगेड समर्थक’ असेच वाटायचा संभव आहेच ना? यातूनच वातावरण अजून गढूळ व्हायची शक्यता आहे.
आधीच जातीपाती, भाषा, पोटजाती आणि इतर अनेक अनंत मुद्द्यांवर आपला समाज विभागला गेलेलाच आहे.त्यात संभाजी ब्रिगेडसारखे महामूर्ख लोक ब्राह्मण विरूध्द मराठा या काल्पनिक वादाला नवीनच तोंड फोडत आहेत. या आणि अशा विविध फाटाफुटींमधूनच भारताच्या शत्रूंचे काम सोपे होणार आहे. त्याला आपल्या प्रतिसादाने आपण उत्तर दिले आहेत.मला वाटते की हाच प्रतिसाद वर्तमानपत्रात प्रसिध्द व्हायला हवा. आपल्या समाजात फाटाफूट पाडायच्या कोणत्याही प्रवृत्तीला असेच उत्तर दिले गेले पाहिजे.
क्लिंटन
27 Aug 2010 - 1:19 pm | कापूसकोन्ड्या
पवार साहेब अगदी बरोबर मांडलेत.
उत्तम आणि शांतपणे दिलेल्या प्रतिसादाबद्दल शतशः आभारी आहे.एकूणच प्रतिक्रिया देण्यार्या (माझ्या सह) सर्वाना आपण ताळ्यावर आणलेत.
तुमच्याविषयी असलेला पूर्वग्रह (चांगला) ध्यानात धरून तुमच्या प्रतिसादाचीच वाट पहात होतो.इतर प्रतिसाद पाहता धागा का काढला असे वाटू लागले होते.
पण मग कुणीतरी काढलाच असता ना? असो.
आज समाजात तुमच्या सारखे संयत विचार आणि आचार असणारे बहूसंख्य आहेतच म्हणून तर आपण टिकून आहोत.
अवांतर
लेनलागण हा शब्द खुप आवडला. मनाचे आरोग्य उत्तम असेल तर असल्या रोगांची लागण लवकर होउ शकत नाही.
27 Aug 2010 - 3:20 pm | इन्द्र्राज पवार
"लेनलागण हा शब्द खुप आवडला. मनाचे आरोग्य उत्तम असेल तर असल्या रोगांची लागण लवकर होउ शकत नाही."
सहमतीबद्दल मनापासून धन्यवाद ! "स्वाईन फ्लु" किंवा "डेंग्यू" यांची लागण लागते जिच्यावर सुदैवाने मायबाप सरकार कसे का होईना औषधपाणी शोधून काढते, पण "लेन" सारख्या रोगांची लागण आपण स्वतःच लावून घेतो वा आपले बांधवच दारात तिला दावणीला बांधून ठेवून आपल्यालाच विचारतात, "दादा, आत्ता रं काय करायचं?"
अशावेळी त्या रोगाची लागण वाडीत पसरू नये म्हणून चूड घेऊन जागच्याजागीच जाळून टाकावी हे उत्तम. (आत्ताच वर काही प्रतिसादात बघा....थोरल्या महाराजांपासून झालेली ही लागण शाहू महाराजांपर्यन्त आली आहे... पुढे कुठे येऊन थांबणार? आणि काय मिळविणार आपण त्यातून?)
इन्द्रा
27 Aug 2010 - 11:01 pm | इन्द्र्राज पवार
सर्वश्री जयंत कुलकर्णी (ज्यांच्या 'मराठा लाईट इन्फंट्री' मालेचे मी मित्रांत जाहीर वाचन केले होते), , क्लिंटन, मृत्युंजय आणि धागाप्रवर्तक कापूसकोंडा.... या चौघांच्या समतोल प्रतिक्रियांचे कुणीही सारासार विवेकबुद्धी व्यक्ती स्वागतच करेल कारण त्यांच्या शब्दात ते प्रतीत झाले आहे ती खरी काळाची गरज आहे. काही मुद्यांचे निराकरण किंवा अधिक स्पष्टीकरण या संदर्भात आवश्यक आहे आणि ज्या अर्थी हा विषय आता वैचारिक पातळीवर घेतला गेला आहे त्याचे स्वरूप रुंदावण्याची काळजी घेत आहे.
चांगले असो वा वाईट, पण भारतीय समाजरचनेतील अनन्यसाधारण वैशिष्ट्यांमुळे लोकशाहीतील 'जनतेच्या सहभागाचे' रुपांतर 'जातींच्या सहभागात' झाले व जातीय पातळीवर उभे केलेले राजकीय पक्ष एकमेकांशी आपल्या जातीला अधिक प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी भांडू लागले. हिंदु महासभा आणि रा.से.संघ जसे जन्माला आले तसेच मुस्लिम लीग आणि जमाते इस्लामीही जन्मल्या. आरक्षणाच्या नावाने द्रमुकने मिळविलेले राजकीय यश अन्य राज्यातील एस.सी.,एस.टी.ना हुरूप देवून गेले. आता हे जातीचे राजकारण नेत्यांनी जनतेच्या "हिता"साठी केले की जनतेने "आम्हाला असे जातिनिहाय उन्नतीसाठी वागवा" म्हणून नेत्यांना निवडून दिले हा वादाचा जरी नसला तर तार्किक मुद्दा होऊ शकतो.
आजची कोणतीही निवडणुक (अगदी टिनपाट ग्रामपंचायतीपासून ते दिल्लीपर्यंत) प्राधान्याने जातीच्या ढालीवर लढविली जाते हे नाकारण्यात अर्थ नाही (मी दिल्लीत आहे आणि पुढील दोन महिन्यात कोल्हापूर महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक आहे. सहज आमच्या भागातील मतदार संघाचा कानोसा घेण्यासाठी तेथील दोनचार मित्रांना ई-मेलद्वारे विचारले, त्यापैकी एकाने मला लिहिले, "तू काय आता इकडे येऊ नकोस. आपला मतदार संघ रिझर्व्ह झाला". त्याला मी पत्रातून झाडले, तर हा माझ्यावरच वैतागला आणि वर "तुझ्यासारखी दोनचार टाळकी मराठ्यांत आहेत म्हणून आपली प्रगती होईना" हा शेरा. काय बोलायचे या युक्तीवादावर? म्युनिसिपालिटीच्या निवडणुकीवर जर 'मराठा' समाजाची प्रगती अवलंबून आहे तर ती कशा प्रकारची प्रगती असेल हे सांगण्यास कुठल्या रमलज्ञाची गरज भासणार नाही. फासेच काय लायकीचे खुळखुळणार आहे हे त्याच्या वाक्यातच आहे.). कॉलेजच्या वर्ग प्रतिनिधीच्या निवडणुकीतदेखील तो किंवा ती "आपल्या" जातीतीलच आहे का हे विद्यार्थीच नव्हे तर संबंधित "मॅनेजमेन्ट" देखील पाहते. हे कटू असले तरी सत्य आहे. ही लागण (दुर्दैवाने) कलाक्षेत्रालाही लागली आहे. अमुक एका स्पर्धकालाच "एसएमएस करा" असा कुठल्यातरी गडावरून हुकूम सुटतो आणि साखर कारखान्यांचे चेअरमन आणि त्यांचे बगलबच्चे शेअरहोल्डर शेतकर्यांना तसे आदेश देतात. फार विचित्र स्थितीत आलो आहोत आपण या क्षणी.
दादोजी कोंडदेवांचा धडा क्रमिक पुस्तकातून काढून टाकणे किंवा त्या नावाने दिला जाणारा पुरस्कार रद्द करणे ह्या घटना वा निर्णय एका गटाने "इतिहासाला विरोध" केला म्हणून नव्हे तर बहुजन समाजाच्या "फिक्स्ड व्होट बँके" ला नजरेसमोर ठेऊन घेतलेल्या बाबी आहेत हे समजणारा वर्ग आज इथे या क्षणी मिपावरही आहे, पण जसे सुभाषित आहे 'कावळ्यांच्या कलकलाटापुढे राजहंसही मानससरोवर सोडून जातो'.... नेमकी हीच हतबलता नेमस्त विचारांच्या झाडाखाली वाढलेल्या तुम्हाआम्हामध्ये आली आहे. त्यामुळे एक सच्चा लोकशाहीप्रेमी म्हणून नियत मार्गाने जितके करता येईल तितके आपण करीत आहोतच.
ज्या लोकप्रतिनिधींकडे आपण आशेने पाहतो तेदेखील एकाच टांकसाळीत तयार झाल्याचे चित्र समोर येत आहे. संभाजी ब्रिगेङच्या कृत्याचा निषेध करणार्यामध्ये बीजेपीचे आमदार होतेच. पण वेळ आली तर "आपणही अशा मनगटगिरीमध्ये मागे नाही" हे दाखविण्याची संधी ही मंडळी सोडत नाही. जामनेर (जि.जळगांव) चे बीजेपीचे आमदार श्री.गिरिश महाजन, ही एक अभ्यासू आणि संतुलित भूमिका मांडणारी सुशिक्षित अशी व्यक्ती मानली जाते. पण मिडियाच्या कॅमेरे आपल्यावर रोखले जाणार आहेत हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी ब्रिगेडच्याच आवेशात आज जळगांव सिव्हील सर्जनच्या इमारतीवर हल्ला बोल केला आणि 'हॉस्पिटलची मॅनेजमेंट व्यवस्थित नाही" म्हणून सर्वासमक्ष सर्जनना बांगड्यांचा आहेर दिला. त्यावर कडी म्हणजे "स्टार माझा" सारखे एकेकाळी सारासार विचार करून बातम्या देणारे चॅनेलही "स्टार माझाच्या बातमीचा दणका. सिव्हील सर्जनला बांगड्या भरल्या..." असा ब्रेकिंग न्यूजचा फ्लॅश देत राहिले. का? तर, आदल्या दिवशी लोकमत "आमच्या बातमीचा दणका" असा दिवसभर थयथयाट करीत होते. ही रॅट रेस आज नागरी जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहे.
अशिक्षित, निमशिक्षित, उच्चशिक्षित आमदार हे जर अशाच तराजूच्या पारड्यात (एकत्रीत) बसून अशा मार्गाने आपल्या मतदारांना वारा घालणार असतील तर झाली महाराष्ट्र राज्याची सर्वांगाने प्रगती !
संत रामदासांनी करुणाष्टके लिहिताना हीच अगतिकता व्यक्त केली आहे :
"स्व-जन-जन-धनाचा कोण संतोष आहे |
रघुपतिविण आता चित्त कोठे न राहे ||
जिवलग जीव घेती प्रेत सांडोनि देती |"
~~ हे जीव घेणारे जिवलग आपलेच आणि आपल्यातच आहेत.
इन्द्रा
28 Aug 2010 - 9:12 am | जयंत कुलकर्णी
जाहीर वाचना बद्दल आभार ! आता कोल्हापूरला येतो फी वसूल करायला. फार काही नाही..... १/२ बीअर आणि तांबडा पांढरा रस्सा व गप्पा. :-)
4 Sep 2010 - 6:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चर्चा आणि प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत. धन्यु...!
-दिलीप बिरुटे
11 May 2012 - 11:04 pm | कापूसकोन्ड्या
सर्व चर्वीत चर्वण झाले पण तो पुतळा सध्या कुठे आहे?
पुण्यातील लोकांनी खुलासा करावा. कुठे तरी धूळ खात पडण्या पेक्षा त्याचे विसर्जन करावे.(ज.कु.भा.दु.न.त.)
3 Jan 2017 - 12:41 pm | कापूसकोन्ड्या
सर्व चर्वीत चर्वण झाले पण तो पुतळा सध्या कुठे आहे?
पुण्यातील लोकांनी खुलासा करावा. कुठे तरी धूळ खात पडण्या पेक्षा त्याचे विसर्जन करावे.(ज.कु.भा.दु.न.त.)
4 Jan 2017 - 12:04 pm | हतोळकरांचा प्रसाद
जेव्हा हलवण्यात आला होता तेव्हा पु.ल. देशपांडे उद्यानात ठेवण्यात आला होता. त्यानंतरहि तो पुतळा पुण्याच्या बाहेरच हलवा (किंवा त्यांच्या मूळ गावी हलवा) अशा मागण्या करण्यात आल्याचं ऐकिवात आहे (खरं कि खोटं ते माहित नाही )! पुढे काय झालं माहित नाही.