ब्लॉगर्स साठी - अत्यंत महत्वाचे ...

विनायक पाचलग's picture
विनायक पाचलग in काथ्याकूट
25 Aug 2010 - 7:21 pm
गाभा: 

नमस्कार
महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत ब्लॉगींग हा प्रकार चांगला स्थिरावला आहे. रोज नव्या नव्या ब्लॉगची भर मराठीतही पडते आहे. ब्लॉगवर तयार होणाऱया आशयाची सुरक्षितता (कन्टेन्ट सेफ्टी) आणि त्याचा गैरवापर होऊ नये, यासाठी महाराष्ट्रातील ब्लॉगर्सची तज्ज्ञांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात येत आहे.

यामध्ये कॉपीराईट, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट आणि सायबर क्राईम या तीन विषयांतील तीन तज्ज्ञ ब्लॉगर्सना मार्गदर्शन करतील.

महाराष्ट्रात मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, सोलापूर आणि जळगाव या नऊ ठिकाणी सकाळ माध्यम समुहाच्या मुख्य कार्यालयांमधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मराठी ब्लॉगर्सना यामध्ये भाग घेता येईल.

या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे दोन उद्देश आहेत:

१. ब्लॉगर्सना व्यावसायिक तज्ज्ञांकडून मार्गदर्शन
२. ब्लॉगर्सना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एकत्रित जोडणे

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची तारीख शनिवार, ४ सप्टेंबर २०१० आणि वेळ संध्याकाळी चार ते सहा अशी आहे.

आपल्यापैकी ज्यांना या विषयात रस आहे, त्यांनी आपली उपलब्धता तातडीने कळवावी, ही विनंती. आपले नाव, ई मेल, मोबाईल नंबर, पूर्ण पत्ता आणि ब्लॉगचे नाव या पाच गोष्टींचा आपल्या ई मेलमध्ये समावेश करावा. मोबाईल नंबर आवश्यक. त्यामुळे ऐनवेळच्या सूचना एमएसएसद्वारे कळविता येतील.

(व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सदस्यांची संख्या मर्यादित ठेवावी लागते. प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य यानुसार प्रवेश द्यावा लागतो. त्यामुळे कृपया आपली उपलब्धतता लवकरात लवकर कळवावी.)

मुळ निवेदन - सम्राट फडणीस

आपली माहिती मला व्य नि करावी अशी नम्र विनंती.......
विनायक

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

25 Aug 2010 - 7:28 pm | विसोबा खेचर

धन्यवाद..

यशोधरा's picture

25 Aug 2010 - 7:32 pm | यशोधरा

हे शब्दबंध विषयी आहे की त्याहून वेगळे?

विनायक पाचलग's picture

25 Aug 2010 - 8:05 pm | विनायक पाचलग

याचा आणि शब्दबंध चा कोणताही संबंध नाही ...
गेल्या रविवारच्या सकाळ मध्ये आपण कंटेंट चोरीचा प्रकार वाचला असेलच ..
नसेल तर तो इथे पाहता येईल ..
http://www.mogaraafulalaa.com/2010/08/content-thief-bokya-satbande.html
त्या अनुषंगाने या भेटीचे ठरले आहे ..
यानिमित्ताने ब्लॉगर्स ना मार्गदर्शन मिळेल व आपल्या हक्कांबद्दल जाणता येइल ,असे वाटते ..

कांचन ने आपली माहिती अभिजीत थिटे किंवा सम्राट फडणीस यांना व्यनी करायला सांगीतली आहे. तु हि माहिती स्वतःच्या ईमेल मधे का मागवतोयेस?

यशोधरा's picture

25 Aug 2010 - 8:36 pm | यशोधरा

अनामिक, ह्या खुलाशासाठी धन्यवाद.

ह्यासाठी कोणी अ‍ॅडमिनचे काम करत असल्यास, एखादा वेगळा आयडी तयार करुन तो इथे देता येईल, म्हणजे त्या आयडीवर इच्छूकांना माहिती पाठवता येईल व वैयक्तिक इतर कोणालाच पाठवायची गरज राहणार नाही. तसेच सम्राट वा अभिजित थिटे ह्यांचे इमेल आयडीही इथे द्यायची गरज पडणार नाही.

ह्या आयडीचा अ‍ॅक्सेस ठराविक लोकांनाच द्यावा, की जे प्रत्यक्ष ह्यासाठी काम करत आहेत.

छोटा डॉन's picture

25 Aug 2010 - 8:15 pm | छोटा डॉन

सदर कार्यकक्रमाची अधिक माहिती हवी आहे.

म्हणजे कसे करणार ?
व्हिडिओ कॉन्फरसिंग हे अत्यंत गोड नाव असले तरी प्रत्यक्षात ते करताना भयानक शॉट लागतो, ह्याचा आम्हाला वैयक्तिक अनुभव आहे.
तशी तयारी आहे का ऑलरेडी, की प्रायोगिक तत्वावर हे होणार आहे ?

व्हिडिओ सोडा पण साधी ऑडिओ कॉन्फरंस घ्यायची म्हटली तरी १०० लफडी होतात.
आय होप आयली सर्व चाचणी वगैरे झाली / सुरु असेल.

उपक्रमास शुभेच्छा !!!
योग्य पुर्व-माहिती मिळाल्यास कार्यकरमात सामिल होऊ इच्छितो :)

- छोटा डॉन

अनामिक's picture

25 Aug 2010 - 8:32 pm | अनामिक

डॉन... कांचनच्या ब्लॉगवर अभिजीत थिटे आणि सम्राट फडणीसचा ईमेल आहे. तु अधीक माहिती प्रत्यक्ष त्यांनाच विचारू शकतोस.

विनायक पाचलग's picture

25 Aug 2010 - 10:50 pm | विनायक पाचलग

अभिजित आणि सम्राट यांना तुम्ही डायरेक्ट काँटॅक्ट करु शकता ..
माझ्याशी सम्राट शी आज झालेल्या फोन नुसार सध्या तरी तुझ्याकडे डाटा घे असे तो म्हणाला होता ...
जाता जाता
सकाळ मध्ये दररोज व्हिडिओ कॉन्सफरींग वरुन मीटींग होतात ...सो त्याचा काहीही प्रॉब्लेम नाही आहे ...

अमोल केळकर's picture

26 Aug 2010 - 10:53 am | अमोल केळकर

चांगली माहिती

अमोल