कोलेस्टेरॉल कसे कमी करावे ?

तात्या विंचु's picture
तात्या विंचु in काथ्याकूट
24 Aug 2010 - 11:06 pm
गाभा: 

सध्या माझे कोलेस्टेरॉल (LDL) फार वाढले आहे. simvastatin घेत आहे. एका चर्चेत वाचला कि एक मिसळपावकर फक्त diet वर कोलेस्टेरॉल कमी करतात. मला ति चर्चा सापडत नाहीये. ते मिसळपाव कर मला मदत करतील का?

प्रतिक्रिया

तुमची काळजी वाटल्याने शोधले असता खालील लिखाण मिळाले...
http://www.misalpav.com/node/9480

बाकी डाक्टरी सल्ला वगैरे आहेच :-)

तात्या विंचु's picture

25 Aug 2010 - 5:02 am | तात्या विंचु

Doctor चा सल्ला चालु आहे, पण अजुन काही माहिती अनुभवी मंडळींकडुन मिळते का ते पाहत आहे.

सर्वात आधी म्हणजे पांढरा भात कमी करावा (बासमती तर नकोच, ब्राऊन राईस चालेल) आणि व्यायाम करावा (चालणे , जॉगिंग किंवा इतर व्यायाम प्रकार..जसे झेपतील तसे) आणि कमीत कमी ८ तास झोप आवश्यक. बाकी डॉक्टर सांगतिलच.

प्रियाली's picture

25 Aug 2010 - 1:33 am | प्रियाली

भात खाल्ल्याने (कर्बोदकांमुळे) जाडेपणा येतो असे म्हणतात पण कोलेस्ट्रॉलचा भाताशी घनिष्ठ संबंध आहे का?

भातात कोलेस्ट्रॉल नाहिये. पण जाडेपणा कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्यास कारणीभूत ठरू शकतो. कारण जास्तीच्या फॅटमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलचा आणि ट्रायग्लिसेराईड्स चा घट्ट्पणा/ दाटपणा (concentration) वाढतो.
त्यामुळे नुसता भातच नाही तर इतर तेलकट तुपकट पदार्थ पण टाळले पाहिजेत. पण सर्वसाधारणपणे आपण (भारतीय त्यातही मराठी आणि दक्षिणी लोक ) भात रोजच खातो. परदेशात असू तर बासमतीच खाल्ला जातो. कित्येक वेळा पोळ्यांचा कंटाळा आला , पटकन होतो म्हणून भात केला जातो आणि खाल्ला जातो. जर भात फारसा खाल्ला जात नसेल तर भात टाळण्याचे कारण नाही. पण जनरली डॉक्टर कडे गेल्यास आधी भात कमी करा असाच सल्ला मिळतो.
LDL जास्त असलेल्या लोकांनी रोजच्या जेवणात व्हाईट ब्रेड, बटाटे , पांढरा भात , मैद्याचे पदार्थ , प्रोसेस करुन बनवलेल्या साखरेचे पदार्थ टा़ळले पाहिजेत. वॉलनट (आक्रोड) , ओटमील हे कोलेस्ट्रॉलची पातळी खाली आणण्यात मदत करतात.

Pain's picture

25 Aug 2010 - 9:13 am | Pain

भातात कोलेस्ट्रॉल नाहिये. पण जाडेपणा कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्यास कारणीभूत ठरू शकतो. कारण जास्तीच्या फॅटमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलचा आणि ट्रायग्लिसेराईड्स चा घट्ट्पणा/ दाटपणा (concentration) वाढतो.
त्यामुळे नुसता भातच नाही तर इतर तेलकट तुपकट पदार्थ पण टाळले पाहिजेत.

जास्तीच्या फॅटमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलचा आणि ट्रायग्लिसेराईड्स चा घट्ट्पणा/ दाटपणा (concentration) वाढतो.
(रक्तवाहिन्यांमधे ते साचून राहतात, हृदयावरचा ताण वाढतो) त्यामुळे इतर तेलकट तुपकट पदार्थ पण टाळले पाहिजेत हे मान्य. पण यात भाताच दोष नाही. भातातून फॅट्स येत नाहीत, फक्त कार्बोहायड्रेटस् ( कर्बोदके) मिळतात.

एका कार्ब पासून सुमारे ४ तर स्निग्ध पदार्थांपासून ९ किलो़कॅलरी इतकी ऊर्जा/ उष्णता मिळते. भात पचायला अतिशय हलका असतो. पचनासंबंधीच्या तक्रारी असल्यास पोळ्यांऐवजी भात खा असे सांगितले जाते.

कोलेस्टोरॉल कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे सगळे जंक फूड बंद/ अगदी कमी केले पाहिजे आणि नियमित कार्डियोचा व्यायाम केला पाहिजे. (म्हणजे चालणे, पळणे, मैदानी खेळ इ.)

सुनील's picture

25 Aug 2010 - 3:27 pm | सुनील

पांढरा भात कमी करावा (बासमती तर नकोच, ब्राऊन राईस चालेल)
कुतुहल म्हणून दोन्हीं पिशव्यांवरील पौष्टिक विदा पाहिला

पांढरा (बासमती नाही)
कार्बोहाड्रेट्स १२%
फायबर ३%
आयर्न ८%
फॅट ०%

ब्राऊन
कार्बोहाड्रेट्स ११%
फायबर ४%
आयर्न ४%
फॅट २%

(गोंधळलेला) सुनील

शिल्पा ब's picture

25 Aug 2010 - 1:30 am | शिल्पा ब

सगळे डॉक्टर सुट्टीवर वाटतं?

तात्या विंचु's picture

25 Aug 2010 - 4:59 am | तात्या विंचु

तुमचा प्रश्न कळला नही. Doctor ने simvastatin घ्यायला सांगीतली आहे (सध्या घेत आहे)..पण मला diet आनि lifestyle बदलुन ते कमी करायचे आहे. काही मिपा करांनी तसे केले आहे म्हणुन विचारले..

एक तर डॉक्टरच्या सल्ल्यानेच वागा...
lifestyle म्हणाल तर रोजच्या रोज किमान तासभर तरी भरभर चला...सवय नसेल तर हळूहळू सवय करा....म्हणजे सुरुवातीला हळूहळू झेपेल तितके चला आणि मग झेपेल त्या गतीने वेग वाढवा.
तेलकट, तुपकट पदार्थ, मैद्याचे पदार्थ टाळा...रोज थोडे थोडे walnut किंवा शक्य असेल तर oatmeal घेत चला...
फळ आणि भाज्या खा... खूप तेलात परतून परतून नको...पण crunchy राहतील अशा भाज्या करून खा..

जाडी कमी झाली कि कोलेस्ट्रोल कमी होईल...तरीसुद्धा डॉक्टरचा सल्ला घ्याच...उगाच आमच्या सल्ल्यावर विसंबू नका.

शेखर काळे's picture

25 Aug 2010 - 2:05 am | शेखर काळे

डॉ. अभय बंग यांचे 'माझा साक्षात्कारी ह्रुदयरोग' हे पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत लिहिलेले आहे.
त्यात त्यांनी त्यांचा स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे.

या लिंकवर अतिशय उत्तम माहिती आहे. तो धागा 'आरोग्यम धनसंपदा' गृपपुरताच मर्यादित असला तर तो ग्रूप जॉइन करून वाचा.
मला तो कंटेंट कॉपी पेस्ट करणे बरोबर वाटले नाही, त्यामुळे लिंक देतीय.
http://www.maayboli.com/node/14106

नितिन थत्ते's picture

25 Aug 2010 - 10:24 am | नितिन थत्ते

इसबगोल घेतल्याने कोलेस्टेरॉल कमी होते असे ऐकले आहे.

अविनाशकुलकर्णी's picture

25 Aug 2010 - 10:26 am | अविनाशकुलकर्णी

कोलेस्ट्रॉल कमी झाले तर माणुस चिडचिडा होतो असे वाचल्या सारखे आठवते.

दीविरा's picture

25 Aug 2010 - 2:52 pm | दीविरा

LDL कमी करायचा आणी HDL जास्ती करणे हे आपल्या आरोग्यासाठी ऊतम आहे.व्यायामा शिवाय दुसरा उपाय नाही.प्रथम आहारातुन तेलकट तुपकट कट करणे.अवघड आहे,पण केले तर उपाय होईल,अपाय होणार नाही.
Dr Hiremath, Dr Abhay Bang लि़खित ह्या वरची पुस्तके जरूर वाचावी.

सुनिल पाटकर's picture

25 Aug 2010 - 3:57 pm | सुनिल पाटकर

marathi.aarogya.com/पोषक-पदार्थ-आणि-अन्न/लिपीड

सुनिल पाटकर's picture

25 Aug 2010 - 3:59 pm | सुनिल पाटकर
इंटरनेटस्नेही's picture

25 Aug 2010 - 4:14 pm | इंटरनेटस्नेही

बीअर प्या भरपुर! (कमीत कमी ५ प्रतिदिन) जेणे करुन भुक कमी लागेल आणि अन्य पदार्थ पोटात कमी जातील आपोआप! ;)

--
अध्यक्ष,
महाराष्ट्र बेवडेबाजी प्रचारक महामंडळ
,
(स. दा. डोलकर मार्ग, मु. पो. तहानलेले गाव.)

इंटरनेटप्रेमी.

सोप्प आहे !!
आधी स्वताला हा प्रश्न विचारा की की वाढवल कस ?

नेमक त्याच्या ऊलट केल की कमी होणार ना !!

अवांतर :वरील वाक्याकरता " घरच्या डॉक्टरची " मदत घेतलेली नाही ह्याची नोंद घ्यावी.

मी-सौरभ's picture

25 Aug 2010 - 8:27 pm | मी-सौरभ

पंचनामा करायचा लै छंद बगा तुमाला...

कोलिती वाले का हो तुमी??

ह्ये बगा ह्येला म्हन्त्यात उपाय....आक्षी झाक !!

अविनाशकुलकर्णी's picture

25 Aug 2010 - 5:55 pm | अविनाशकुलकर्णी

आधी स्वताला हा प्रश्न विचारा की की वाढवल कस ?.
आयआयआयआय..हहपुवा

सन्योगिता's picture

25 Aug 2010 - 6:49 pm | सन्योगिता

आहारात नियमित वान्गि खावित व रोज कच्चा लसुन खावा