काय ? काय ! द्यावे बहिणीला भेट म्हणुन ???

संजयशिवाजीरावगडगे's picture
संजयशिवाजीरावगडगे in काथ्याकूट
23 Aug 2010 - 11:22 pm
गाभा: 

आपल्या संस्कृतीत प्रमुख सणामध्ये 'रक्षाबंधन' हा सण - भाऊ-बहिणीचा
स्नेह,प्रेम व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो.
कृष्‍णाच्या बोटाला जखम होऊन त्यातून रक्त वाहत होते. द्रौपदीने साडी किनार फाडून बांधले होते. तेव्हापासून कृष्णाने द्रोपदीचे रक्षण करण्‍याचा संकल्प केला व आजीवन तिचे रक्षण केले.
भारतीय इतिहासात रक्षाबंधन संदर्भात अनेक उदाहरणे आहेत.चित्तौढगडची राणीने बहादुरशाहपासून रक्षा करण्यासाठी हुमायूला राखी बांधल्याचे उदाहरण आहे. व हुमायूने राणीचे रक्षण केले !
"रक्षाबंधन"
या सणात काळानुरूप जरासा बदल झालेला आहे. आता तर हे पर्व भाऊ-बहिणीच्या अतुट नात्याचे, प्रेमाचे, स्नेहाचे व बंधनाचे पर्व म्हणून देशात साजरे होते. लाडकी बहिण आपल्या भावाच्या उजव्या हाताला राखी बांधते व भाऊ आपल्या लाडक्या बहिणीच्या रक्षणाचे दायित्त्व स्विकारतो.
आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगात 'रक्षाबंधण' या सणाचे महत्त्व कायम आहे.
बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन! या दिवशी बहिण राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकते. सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असते. पूर्वजांनी या नात्यातील निस्पृहता आणि पवित्रतेचा महिमा जानला आहे. भारतीय संस्कृती मानव जीवनाच्या महानतेचे दर्शन घडविणारी संस्कृती आहे. स्त्रीला भोगवस्तू न समजता तिची पूजा करणारी संस्कृती आहे.
भारतीय संस्कृतीने स्त्रीची पूजा केली आहे.
'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:'
जिथे स्त्रियांची पूजा, तिचा सम्मान केला जातो तिथे देवांचा वास असतो असे म्हटले आहे.
बहिण भाऊरायास भक्तीभावाने ओवाळते व मनगटावर राखी बांधते. भाऊ तीला भेट देऊन संकटसमयी धावून येण्याचे वचन देतो. राखीपौर्णिमा आली की, बहिणीप्रती आपले प्रेम, स्नेह, आदर व्यक्त करण्यासाठी नेमकी कोणती भेट तिला देऊ ? हा माझ्या मते माझ्या सारख्याच बहुतेक भावांचा यक्ष प्रश्न ? तुम्हांला काय वाटते ? काय द्यावे बहिणीला भेट म्हणुन ???

प्रतिक्रिया

बहिणीला विचारून बघा तिला काय हवंय ते...

आणि तुमचे लग्न झाले असेल तर तुमच्या बायकोला विचारूनच द्या...नाहीतर "आता काय करावे" असा धागा काढावा लागेल..

संजयशिवाजीरावगडगे's picture

24 Aug 2010 - 1:53 pm | संजयशिवाजीरावगडगे

छान ...... सुरेख !! टोमना ! पण लग्न झाले असेल तर तुमच्या बायकोला विचारूनच द्या.??????????????????????..
लग्न झाले असेल तर

पण

अजुन

मी नशीबवान आहे त्या बाबतीत ! ?!

आगाऊ कार्टा's picture

24 Aug 2010 - 11:42 am | आगाऊ कार्टा

यत्र नार्यस्तु पू.......
यत्र नार्यस्तु पू.......
.
.
.
.मरन्ते तत्र देवता:

काय ? काय ! द्यावे बहिणीला भेट म्हणुन ???
मला पण हाच प्रश्न पडला आहे...

संजयशिवाजीरावगडगे's picture

24 Aug 2010 - 1:05 pm | संजयशिवाजीरावगडगे

काय ! द्यावे बहिणीला भेट म्हणुन ? छान ! समविचारी मिळाला !!!!

अनिल २७'s picture

24 Aug 2010 - 1:23 pm | अनिल २७

भेटवस्तूपेक्षा बहिणीला हि जाणीव करून द्या कि तिच्या सुखदु:खात तुम्ही तिच्यासोबत कायम असणार आहात.. बाकी मग भेटवस्तू काहिही दिलीत तर तिला फरक पडत नाही.. आनंदच होतो.. (याचे कारण असे कि समस्त स्री जातीला भेटवस्तू मिळण्याशी मतलब, मग ते काहीही असो!!.. त्यांना शक्यतो सरप्राईज देण्याचा प्रयत्न करावा, जाम खुश होतात.. फॉर अ चेंज, जर सरप्राईज म्हणून तिच्यावर एखादी जेम्तेम कविता करून ऐकवलीत तरीही ती खुश होईल..)

संजयशिवाजीरावगडगे's picture

24 Aug 2010 - 2:00 pm | संजयशिवाजीरावगडगे

सुखदु:खात तिच्यासोबत कायम आहेच !