गाभा:
नमस्कार लोकहो,
आमच्या कंपनी ने आम्हाला क्लायंट लोकेशन (डेन्व्हर हामेरीका ) ला पाठवण्याचा असा कंपनीच्या द्रुष्टीने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे ;-) , तर आमची विजा मुलाखत(L1-B) ह्या महीन्याच्या २७ ला (चेन्नई) ठरली आहे.
पण नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार ,कंपनीने आमच्याच अकाउंट च्या ५ आणखी लोकांचा विजा ईनिशीयेट केला होता (L1-B - 4 , L1-A -1) आणी पाचही लोकांचा विजा रिजेक्ट झाला.
आता आम्ही आमचा विजा मिळण्याबद्द्ल थोडे निराशावादी झालो आहोत..
एक प्रयत्न म्हणुन मिपाकरांची मते ( विजा मुलाखतीची तयारी ,विचारल्या जाणार्या प्रश्नाचे स्वरुप आणि आणखी काही विशेष तयारी) जाणुन घ्यायला आवडेल.
तुमचे स्वताचे अनुभव शेअर केले तरी चालेल तेवढीच माहीतीत भर...
आभारी (नि३).
प्रतिक्रिया
23 Aug 2010 - 9:29 am | अशक्त
मुलाखत घेणारे बरयाचदा उपकार केल्या साऱखे वागतात. मुलाखत देताना सावध रहा. तुमचि कागद पत्र निट वाचुन जा. तुम्हि जे लिहिल आहे तेच प्रश्न ते विचारतात. उदा. तुमच वेतन सध्या किति आहे , युयस मधे किती मिळेल ईत्यादि...तुम्हिच का योग्य हे तुम्हाला पटवुन द्यावे लागेल. धिटाई दाखवा.
"not technically good" हे कारण L1B नाकारण्यास देऊ शकतात. तेव्हा ज्या technology साठी जाणार आहात त्याविषयी बोला. कंपनीची PRODUCTS असतील तर उत्तम. जेनेकरुन काम तुमच्यावर 'च' अवलंबुन आहे असा आभास निर्माण करा.
मुलाखत फक्त ५-७ मिनिटे चालते तेव्हा उत्तरे ताणु नका.
बाकी "all the best"
23 Aug 2010 - 5:06 pm | चतुरंग
हा तुमच्या कंपनीने त्यांच्याच अमेरिकेतल्या ऑफिसमध्ये पाठवायला वापरला जातो.
You qualify for an L-1 visa if you have been employed outside the U.S. as a manager, executive or person with specialized knowledge for at least one out of the past three years, and you are transferred to the U.S. to be employed in a similar position. The U.S. company to which you are transferring must be a branch, subsidiary, affiliate or joint venture partner of your non-U.S. employer. The non-U.S. company must remain in operation while you have the L-1 visa. When we use the term non-U.S. company we mean only that it is physically located outside the U.S. Such a company may well be a foreign division of an American-based business or it may have originated in a country outside the U.S. Either one fits our definition of non-U.S. company.
१ - तुम्ही अमेरिकेत जिथे जाऊ इच्छिता त्या कंपनीशी तुमच्या भारतातल्या कंपनीचे नाते वर उल्लेखलेल्या ह्या नियमात बसत नसले तर वीजा रिजेक्ट होणार.
२ - तुमच्याकडे जे ज्ञान आहे ते स्पेशलाईज्ड नॉलेज ह्या प्रकारात कसे बसवायचे ते तुमच्या कंपनीचे वरिष्ठ आणि कागदपत्रे तयार करणारे वकील ह्यांच्याशी बोलून ठरवा. तुम्ही अमेरिकेत जाऊन जे काम करणार आहात ते तिथेच दुसरे कोणी करु शकणार नाही असे तुम्हाला दाखवता यायला हवे.
३ - आत्मविश्वासाने आणि शांतपणे बोलणे आवश्यक.
४ - प्रश्न नीट ऐकून घ्या, समजला नसेल तर पुन्हा विचारा आणि थोडक्यात मुद्देसूद उतरे द्या.
शुभेच्छा! :)
23 Aug 2010 - 7:19 pm | येडा अण्णा
खाली काही लिंक्स दिल्या आहेत. त्यावर तुम्हाला उपयोगी महिती मिळू शकेल.
http://www.immihelp.com/experience/view-24-l1visa_l2visa.html
http://www.path2usa.com/immigration/visitorvisa/inter_preparation.htm#1
मी स्वतः ह्या लिंक्स वापरल्या आहेत आणि L1-B मिळवला आहे.
२ - तुमच्याकडे जे ज्ञान आहे ते स्पेशलाईज्ड नॉलेज ह्या प्रकारात कसे बसवायचे ते तुमच्या कंपनीचे वरिष्ठ आणि कागदपत्रे तयार करणारे वकील ह्यांच्याशी बोलून ठरवा. तुम्ही अमेरिकेत जाऊन जे काम करणार आहात ते तिथेच दुसरे कोणी करु शकणार नाही असे तुम्हाला दाखवता यायला हवे.
हा मुद्दा मात्र महत्वाचा आहे. हे कसेही करुन पचवून द्यावे लागेल.
- अण्णा
23 Aug 2010 - 8:40 pm | वाटाड्या...
>> ३ - आत्मविश्वासाने आणि शांतपणे बोलणे आवश्यक. --- सर्वात महत्वाचं आहे हे....अगदी थोडीशी बेफिकीरी दाखवा..जणु काही मला जाण्यात काही मजा नाही पण नोकरी टिकवण्यासाठी जातोय वगैरे...
>>२ - तुमच्याकडे जे ज्ञान आहे ते स्पेशलाईज्ड नॉलेज ह्या प्रकारात कसे बसवायचे ते तुमच्या कंपनीचे वरिष्ठ आणि कागदपत्रे तयार करणारे वकील ह्यांच्याशी बोलून ठरवा. तुम्ही अमेरिकेत जाऊन जे काम करणार आहात ते तिथेच दुसरे कोणी करु शकणार नाही असे तुम्हाला दाखवता यायला हवे. --- ह्यामधे बरीच रिक्स (रीस्क) आहे कारण भारतातल्या आउटसोर्सिंगच्या कंपन्या इतकी तयारी आणि त्यावर कष्ट घेत नाहीत. अजुनही त्यांना हा बिनधास्त प्रकार वाटतो. अर्थात हा स्वत:चा अनुभव. ह्या उलट इथे जणु काही भारतीय कंपनींविरुद्ध मोहीमच उघडली आहे. अर्थात त्यांचही काही १००% चुक नाही.
शेवटी अमेरिकेला येणं म्हणजे काय आयुष्य धन्य झालं वगैरे नाही..नाही मिळाला तर निराश वगैरे होऊ नका...
23 Aug 2010 - 10:45 pm | चिरोटा
सहमत आहे. चेन्नईला बरेच विसा फेटाळले जाण्याची उदाहरणे आहेत. कंपन्या L1 विसाचा उपयोग नक्की कशासाठी करतात हे कॉन्सुलेटवाल्यांनाही माहित असते!.त्यामुळे विसा ऑफिसर कधीकधी माज दाखवतात .धीटपणे उत्तरे द्या.
28 Aug 2010 - 6:24 pm | नि३
रिजेक्टेड.
ध्न्यवाद.
28 Aug 2010 - 11:06 pm | शाहरुख
आपला अनुभव वाचण्यास उत्सुक !