born insomniac....! झोप हविये झोप....!

जाई अस्सल कोल्हापुरी's picture
जाई अस्सल कोल्हापुरी in काथ्याकूट
22 Aug 2010 - 2:19 am
गाभा: 

झोप नाही येत यार!
sometimes i feel like i am born insomniac!
बेड मध्ये जाण्याआधी असं वाटतं की आज तरी थोडा वेळ झोप लागेल्,,..पण नाही...सहज चुळबुळ म्हणुन घड्याळ पाहिलं जातं..रात्रीचे २-३० वाजलेले असतात...
असं वाटतं कि बराच वेळ गेला...आणि थोड्या वेळानी परत घड्याळ पाहिलं जातं ...२.१४...
का होतं आहे असं!
बरं दिवसा झोपावं तर कितीही प्रयत्न केला १५ मिनिटांपेक्षा जास्ती झोप लागतही नाही..
म्हणजे मला महिनोन महिने १-३ तास झोप पुरेशी होते आहे? is it so?
i need help friends!
असा निद्रानाश का होतो?
FYI..मी जास्ती विचारात असते/ चिंतेत असते( जाई आणि चिंता?????)
मग मी तो वेळ वाचण्यात्/गाणी ऐकण्यात तत्सम आवडते कार्यक्रम करण्यात घालवते.पण तरिही..असं का होतं? याचा विचार त्रास देत राहतो,
मित्रांनो,
प्लीज मदत करा..
झोप येण्यासाठी काय करावे?
प्लीज ...!

प्रतिक्रिया

शानबा५१२'s picture

22 Aug 2010 - 2:33 am | शानबा५१२

चला तर फक्त आम्हीच फालतु लेख लिहत नाही.
थॅन्क यु,जाई मॅडम्

असो.......१०० ते १ हे आकडे उलट्या क्रमाने मोजावेत.
सावलीतले उंट चालत जात असतानाचे चित्र डोळ्यासमोर आणणे.
सुर्यप्रकाश व काही विटामिन्सची कमतरता झोप कमी करते.चहा व कॉफी संध्याकाळी ६-७ वाजल्यानंतर पिउ नका.
अत्यल्प व्यायाम व आहार.

सर्वात बेस्ट पहीला उपाय.

कोणत्याही शब्दाला आक्षेप असल्यास सॉरी.
बाकी आपले नाव जाई आहे का? म्हणुन तर झोप..............????

नाहीतरी तुम्ही निद्रानाशाचा वेळ वाचण्यात / गाणी ऐकण्यात घालावताच तर जरा जे. कॄष्णमूर्ती, सार्त्र, कार्ल मार्क्सचे "दास कॅपिटल" , आणि अशाच काही नावाजलेल्या तत्ववेत्त्यांची भयंकर बोअर मारणारी पुस्तके वाचत जा. वाचता वाचता कधी झोप लागेल कळणार पण नाही.

मी स्वतः हे उपाय यशस्वीपणे वापरून बघितले आहेत ...

शिल्पा ब's picture

22 Aug 2010 - 2:40 am | शिल्पा ब

इथे लेख टाकण्यापेक्षा डॉक्टरकडे जा...ते काहीतरी उपाय सांगतीलच.
(तरी म्हंटलं अजुन कसा तुमचा एकही लेख नाही )

स्वछंदी-पाखरु's picture

22 Aug 2010 - 2:58 am | स्वछंदी-पाखरु

घ्या कोणाच काय तर कोणाच काय......

इथे लेख टाकण्यापेक्षा डॉक्टरकडे जा...ते काहीतरी उपाय सांगतीलच.

मदत मागणार्‍याला मदतीची गरज असते.... उपदेशाची नाही........

->(तरी म्हंटलं अजुन कसा तुमचा एकही लेख नाही->.......

लाकूड जळतयं कस पहा...... :)

मी काSSSय नाSSSय केलं.........

मग तुम्ही जरा वेगळेपणा दाखवून उपाय सांगायचे होते...
तुमचं तरी लाकूड का जळतंय?

स्वछंदी-पाखरु's picture

22 Aug 2010 - 3:12 am | स्वछंदी-पाखरु

valium 0.5 mg हा उपाय आम्हीच दिला............
बिचारी काही वेळी तरी शातं झोपते ही.........

शिल्पा ब's picture

22 Aug 2010 - 3:19 am | शिल्पा ब

तुम्ही डॉक्टर आहात का?
नसाल तर ही लिंक पहा...
http://www.medicinenet.com/diazepam/article.htm

कृपया डॉक्टरी सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत..

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

22 Aug 2010 - 3:02 am | जाई अस्सल कोल्हापुरी

valium 0.5 mg पासून सगळं try केलं आहे गं
पण नाही म्हणजे ना... ही..!

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

22 Aug 2010 - 3:02 am | जाई अस्सल कोल्हापुरी

valium 0.5 mg पासून सगळं try केलं आहे गं
पण नाही म्हणजे ना... ही..!

गरम दूधात साखर आणि किंचित हळद घालून झोपण्याआधी प्या.
संध्याकाळी जेवणखाण आटोपले कि घरातले दिवे मंद असू द्या.
थोडक्यात, स्वत:ला झोपेकडे नेण्यासाठी असे निरुपद्रवी प्रयत्न करून बघा.
रात्री दूरदर्शन पाहू नका, वाचन करू नका.
मी तरी झोपण्याआधी वाचन करत नाही फारसे. तेच विचार डोक्यात असतात नाहीतर!
तुम्हाला जे काय होते आहे तसे मला एकदा आठ पंधरा दिवस झाले होते.
घड्याळ (वेळ)चक्क थांबल्यासारखे वाटते. वेळ सरता सरत नाही.
चहा कॉफीची सवय फार लावून घेतली नाही ना हे तपासा.
झोपण्याआधी थोडे दिर्घश्वसन वगैरे करा (याचा मला अजिबात उपयोग झाला नाही.);)
श्लोक म्हणून बघा.

मिसळभोक्ता's picture

24 Aug 2010 - 1:31 am | मिसळभोक्ता

हे करा, पेक्षा हे करू नका हीच यादी मोठी.

त्यापेक्षा "झोपू नका", हे सोपे.

जाईतै,
कुठल्याही बांधकामाच्या ठिकाणी किंवा कुठल्याही आयटी कंपनीमध्ये रोजंदारीवर काम करा. तुम्हाला इतके राबवून घेतील की रात्रीच काय, भरदिवसासुद्धा गाढ झोप लागेल. ;-)

हा उपाय 'ट्राईड अँड टेस्टेड' आहे. अगदीच रामबाण, जालीम आणि खात्रीलायक उपाय आहे.

डिसक्लेमर: या उपायाचे काही दुष्परिणाम आहेत, त्यामुळे स्वतःच्या जबाबदारीवर उपाय करुन पहावा. अनिष्ट परिणांमास आम्ही जबाबदार नाही.

Pain's picture

23 Aug 2010 - 12:29 am | Pain

सहमत.
पण आळशी लोक हे करून पाहू शकणार नाहीत.

प्राजक्ताचि फुले's picture

28 Aug 2010 - 12:13 pm | प्राजक्ताचि फुले

कुठल्याही बांधकामाच्या ठिकाणी किंवा कुठल्याही आयटी कंपनीमध्ये रोजंदारीवर काम करा. तुम्हाला इतके राबवून घेतील की रात्रीच काय, भरदिवसासुद्धा गाढ झोप लागेल.

१००% सहमत!!!!

ऑर्गॅज़म!!
कुणाचाही कसलाही अपमान वा टर उडवयचा हेतु नहिए, पण शास्त्रीय संशोधनानुसार इट शुड वर्क.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

22 Aug 2010 - 5:31 am | विश्वनाथ मेहेंदळे

आयला, हे भारी आहे. एक तीर, दो निशान !!!

धमाल मुलगा's picture

23 Aug 2010 - 3:30 pm | धमाल मुलगा

=)) =))
ओ मेहेंदळे,
तुम्ही द्वर्थी नाय ना टाकला? ;)

असो, पण गंभीरपणे विचार केला तर खरंच गोगोल ह्यांनी दिलेला सल्लादेखील खुप उपयोगी आहे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

24 Aug 2010 - 2:14 am | विश्वनाथ मेहेंदळे

धमू साहेब, ते द्वर्थी नाही. त्याला एकच अर्थ आहे. तुमच्या मनात जो पहिला येईल तो. हाहाहा !!!

पण मला उपाय खरच आवडला. ते म्हणतात ना, "आम के आम, गुठलीयोन्के भी दाम" तसे आहे हे. साधारणत: अनेक उपाय हे एकतर बोरिंग असतात किंवा निर्बंध घालणारे. त्यामुळे लोक ते करणे टाळतात. हा उपाय असला भारी आहे, एकतर तो अवलंबणे सहज शक्य आहे. आणि दुसरे म्हणजे त्याचा काही खास असा sideeffect नाही. हा उपाय अवलंबायला मिळावा म्हणून निद्रानाश होऊ दे अशी इच्छा लोक करायला नाही लागले म्हणजे मिळवली.
(वरचे विचार विनोदी असले तर मी उपायाची खिल्ली उडवतो आहे असा अर्थ काढू नये)

धमाल मुलगा's picture

24 Aug 2010 - 4:37 pm | धमाल मुलगा

साहेब गेला हो देश सोडुन...साहेबाला मारा गोळी. :)

>>तुमच्या मनात जो पहिला येईल तो. हाहाहा !!!
_/\_ मंडळ साष्टांग नमस्कार घालीत आहे.

>>पण मला उपाय खरच आवडला. ते म्हणतात ना, "आम के आम, गुठलीयोन्के भी दाम" तसे आहे हे.
ठ्ठो! =)) =)) =))
ओ तुम्ही म्हणी नका वापरु हो...निदान ह्या प्रतिसादात तरी....माझं इकडं हसुन हसुन माकड झालं! :D

बाकी, ह्या वाक्यानंतरच्या सर्व मजकुराशी पुर्ण सहमत.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

23 Aug 2010 - 10:31 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

ऑ!
To : गोगोल
CC : संपादक सो||

??///.....!....???
"..." ?
.........!

धन्यवाद.
गुरु आहात!

राजेश घासकडवी's picture

22 Aug 2010 - 5:39 am | राजेश घासकडवी

अपुरी झोप झाल्यामुळे अपघातांची शक्यता वाढते. शिवाय मानसिक संतुलनही बिघडू शकतं. मी डॉक्टर नाही, अनुभवांतून सांगतो आहे. तेव्हा काही साधे घरगुती उपाय करून फायदा होत नसेल तर लवकरात लवकर डॉक्टरकडे जा.

मला निद्रानाश झाला होता तेव्हा मला डॉक्टरने दिलेली पथ्यं खालीलप्रमाणे.
- सकाळी विशिष्ट वेळेला उठणे
- दुपारी शक्यतोवर न झोपणे
- सकाळी अगर दुपारी किमान अर्धा तास चालण्याइतपत व्यायाम करणे
- सूर्यप्रकाशात काही वेळ काढणे. हे अतिशय महत्त्वाचं आहे.
- चहा, कॉफी झोपण्याआधी पाच ते सहा तास न पिणे
- सिगरेटबाबतही तसंच
- झोपण्याआधीचं एक रूटीन ठरवून ठेवणे, व ते कसोशीने पाळणे.
- झोपायच्या तासभर आधी गरम पाण्याने आंघोळीचा फायदा होऊ शकतो.

यातली बहुतेक पथ्यं नियमितपणे पाळली तर तीनेक आठवड्यात झोपेचं चक्र सुधारू शकतं. ते पटकन् मार्गाला लागण्यासाठी डॉक्टर गोळ्या वगैरे देऊ शकतील. कधी कधी झोप टाळणं हे डिप्रेशनचं चिह्नही असू शकतं. तेव्हा शक्य तितक्या लवकर डॉक्टरचा सल्ला घ्या. मिपाकरांचा नको.

मीनल's picture

22 Aug 2010 - 7:29 am | मीनल

मला ही होतं असं क्वचित. विशेषतः दुपारी झोप काढली तर.
मी तरी नामस्मरण करते. कधी तरी होतो उपयोग.

अजून एक उपाय वाचला/ अवलंबला होता.
बिछान्यात पडल्या पडल्याच श्वास आत घेताना सो S S आणि श्वास बाहेर सोडताना हंमS S असे मनात म्हणत राहायचे. या सोहंमS S या चा अर्थ आहे माझ्यातच ईश्वर आहे.

आजारी लोकांची सेवा केली तर ही झोपेवर फायदा होऊ शकेल.

अती शारीरिक काम ही योग्य नाही. बुध्दीचे असेल तर झोप लागयालाच हवी.

तू काहीतरी काळजी /चिंतेत असशील तर काहीही करून झोप लागणार नाही. त्या चंतेचे मूळ शोधून काढ आणि त्यावर काही उपाय योजना कर. काही उपाय हातात नसतील तर आहे ती स्थिती मान्य कर आणि देवावर हवाला टाकून निश्चिंत हो.

कुठलेही औषधी उपचार शक्यतो टाळ. हवेच असल्यास अर्थात वैद्यकिय मार्गदर्शन उत्तम. अमेरिकन `नॅचरल फूड` दुकानात मधे ही काही औषधे मिळतील अथवा रामदेव बाबांच्या औषधांचे साईड इफेक्ट्स नाही असे ऐकले.

विंजिनेर's picture

22 Aug 2010 - 8:35 am | विंजिनेर

शालेय भुगोल, इतिहासाची पुस्तकं वाचा.
तात्काळ, हमखास झोप लागेल.

बेड मध्ये जाण्याआधी असं वाटतं की आज तरी थोडा वेळ झोप लागेल्,,..पण नाही...सहज चुळबुळ म्हणुन घड्याळ पाहिलं जातं..रात्रीचे २-३० वाजलेले असतात...
असं वाटतं कि बराच वेळ गेला...आणि थोड्या वेळानी परत घड्याळ पाहिलं जातं ...२.१४...

नक्की भानगड काय आहे? कालयंत्राचा वापर करून घड्याळ उलटे फिरवता की काय जाई ताई?

चिरोटा's picture

22 Aug 2010 - 9:32 am | चिरोटा

बहुदा हा लेख लिहिताना जाईताईना झोप आलेली दिसतेय.!!
जाईताई- Economist चे अंक विकत आणा. न आवड्णर्‍या एखाद्या टॉपिक वरचा एखाद्या तज्ञाचा लेख वाचायचा. नंतर ६/७ तासाची निश्चित झोप.!!असो.
वर निद्रानाशाची कारणे सांगितली आहेतच. आहार हे महत्वाचे कारण असावे.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

22 Aug 2010 - 3:16 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

....म्हणुनच तातडीचा सल्ला हवा आहे..
घड्याळ पाहताना पण घोळ..

भारतीय's picture

22 Aug 2010 - 10:46 am | भारतीय

हृतिक रोशन नावाचे कुणीतरी सदगृहस्थ आहेत व त्यांचा काईट्स नावाचा सिनेमा बघताना हमखास झोप लागते असा अनुभव आहे...

तिमा's picture

22 Aug 2010 - 11:07 am | तिमा

जायफळ घातलेले पुरण वा जायफळ घातलेली कॉफी रात्री घेऊन पहा. गाढ झोप लागते.

पैसा's picture

22 Aug 2010 - 3:00 pm | पैसा

एखाद्या कौटुंबिक धारावाहिक मालिकेचे 6 भाग बहुधा रविवारी एकामागोमाग एक लागतात ते बघा नाहीतर 12 वी चं अर्थशास्त्राचं पुस्तक पहिल्या धड्यापासून वाचायला सुरुवात करा

मनीषा's picture

22 Aug 2010 - 4:20 pm | मनीषा

born insomniac..... म्हणजे खूप पूर्वी पासूनचा आजार आहे का ?

तुम्ही आस्था किंवा संस्कार चॅनल वरील प्रवचनं का ऐकत नाही ? त्या मुळे खरच मन खूप शांत होतं आणि मग अपोआप झोपही चांगली लागते ...

मिसळभोक्ता's picture

24 Aug 2010 - 1:33 am | मिसळभोक्ता

तुम्ही आस्था किंवा संस्कार चॅनल वरील प्रवचनं का ऐकत नाही ? त्या मुळे खरच मन खूप शांत होतं आणि मग अपोआप झोपही चांगली लागते ...

अगदी . अगदी.

(झासारामजी बापू)

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Aug 2010 - 4:49 pm | llपुण्याचे पेशवेll

>>सहज चुळबुळ म्हणुन घड्याळ पाहिलं जातं..रात्रीचे २-३० वाजलेले असतात...
>>असं वाटतं कि बराच वेळ गेला...आणि थोड्या वेळानी परत घड्याळ पाहिलं जातं ...२.१४...
आय्ला तुम्ही उलट्या काळात कशा काय झोपता? आधी २:३० वाजतात आणि मग २:१४
कदाचित द्राक्षासवाच्या मात्रेत वाढ केल्याने काहि मदत होण्याची शक्यता आहे. ;)

अविनाशकुलकर्णी's picture

22 Aug 2010 - 5:09 pm | अविनाशकुलकर्णी

आमची हवी असेल तर घ्या ..झोपण्या शिवाय आयुष्यात आम्हास काहि जमले नाहि

डॉ.श्रीराम दिवटे's picture

22 Aug 2010 - 5:23 pm | डॉ.श्रीराम दिवटे

निद्रानाशावर एक धागाच टाकावा म्हणतो.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

23 Aug 2010 - 2:41 am | जाई अस्सल कोल्हापुरी

कृपा करा....!
लवकर टाका...!

तेजोमय's picture

22 Aug 2010 - 5:30 pm | तेजोमय

ताई
विचार करणे सोडून द्या.....डोक्यातली चक्र काही काळ थांबवा

तुम्ही झोप येत नाही याची चिंता करण्यापेक्षा तो वेळ सत्कारणी लावा.म्हणजे असे की जोपर्यन्त झोप येत नाही तोपर्यन्त जागे रहा व कहीतरी न आवडणारं काम करा. शक्य असेल तर एक / दोन दिवस झोप नाही आली तर झोपू नका , काही बिघडत नाही. त्यानंतर आपोआप झोप येते. झोपेच्या विचारानेच झोप न येण्याची शक्यता आहे.सर्वात महत्वाचे म्हणजे जर सकाळी तूम्हाला फ्रेश वाटत असेल,स्मरणशक्ती व्यवस्थीत काम करत असेल तर तूमची झोपेची गरजच कमी आहे असे अनुमान येऊ शकेल .अर्थात डॉक्टरांच्या सल्ल्याने.

माझीही शॅम्पेन's picture

23 Aug 2010 - 12:02 am | माझीही शॅम्पेन

अरेच्चा पब्लिकनी इथे टर उडवालिये (नेहमीप्रमाणे) ! :)
माझा मते भरपूर व्यायाम करा , सध्या आम्ही पायाचे तुकडे पर्यंत बैठका मारतोय (१००+) , त्याला ईंग्लिश मध्ये स्क्वॅट अस काही म्हणतात.
बाकी सोप्पे उपाय ( तुमच्या जबाबदारीवर) :)
१. किशन कुमार नामे सुपर-स्टार यांचे जे मिळेल ते चित्रपट पाहावे , नसतील तर सुभाष घई आहेतच
२. डाल-बाटि + भरपूर तूप या वर आडवा हात मारावा
३. शक्य असतील तेवढे इन्दोरी गोड पदार्थ (रबडी , माल-पोवा ई. ) ओरपावे किवा चॉकलेट टार्ट सूप वा हॉट ब्राउनी फास्ट करावी

राजेश घासकडवी's picture

23 Aug 2010 - 1:08 am | राजेश घासकडवी

हॉट ब्राउनी फास्ट करावी

सगळ्यांनाच झोपा आलेल्या दिसतात. तुम्ही हे हॉट ब्राउनी 'फस्त' करून लिहिलं होतंत का? कारण फास्ट या शब्दाचा अर्थ उपास असा होतो. :)

लेका कुणाला काय सल्ला देशील. त्याना कश्या काय आता बैठका मारता येतील.त्यात खांद्यावर वेटलिफ्टिंगचा बार घेवुन स्कॉट मारणे त्याना जमायला पाहिजे.आणी बैठका मारल्या कि झोप येते हे पण नवीनच एकले. पैलवान व्यायाम झाला कि त्याची थंडाई पितात. त्यात जायफळ,बदम,पिस्ता,खारीक इत्यादी मुळे त्याना झोप येते.
झोप न येण्यामागे मानसिक कारणच जास्त करुन असते.ज्यादा एकाद्या गोष्टीवर विचार करणे,२०१२ ला जग नष्ट होणार का अश्या चिंता करणे,सतत मनात असुरक्षिततेची भावना असणे इत्यादी कारणामुळे देखिल झोप उडु शकते.

सुहास..'s picture

23 Aug 2010 - 5:08 am | सुहास..

ऊरकुन टाका !!

प्रियाली's picture

23 Aug 2010 - 5:12 am | प्रियाली

या धाग्यावर असल्या प्रतिक्रिया?

जाई, तुम्ही रोज काय करता? म्हणजे दररोजच्या जीवनात काय काय करता? ते थोडक्यात सांगता का?

हाच प्रश्न मला कोणी विचारला तर मी सांगेन -

नोकरी करते. घरकाम करते. बागकाम करते. नेटावर टवाळक्या करते*. फावल्या वेळात टिव्ही-सिनेमा पाहण्याचे काम करते*. व्यायाम करते.*

* ही कामे नाहीत. विरंगुळे आहेत पण पहिल्या तीन कामांतून दिवसात फारशी फुरसत मिळत नाही. जेव्हा मिळते तेव्हा इतर तीन कामे ;) करते.

या धर्तीवर तुम्ही रोज काय करता ते सांगा म्हणजे मी तुम्हाला साजेसा उपाय सुचल्यास सांगते.

तुमच्या निद्रानाशाचे कारण तुम्ही ओळखले नसेल किंवा तुम्हाला ते मांडायचे नसेल तर इतरांनी सल्ले देऊन फारसा उपयोग होईल असे वाटत नाही. जर, निद्रानाशाचे कारणच तुम्हाला माहित नसेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे हे सर्वात उपयुक्त ठरेल.

नितिन थत्ते's picture

23 Aug 2010 - 8:05 am | नितिन थत्ते

एक उपाय

फसवणूक प्रकरण १ ते ?? वाचा. (काळेकाका मारतायत आता)

आता थोडंसंच सिरिअस...

कधीकधी कामाच्या किंवा तत्सम टेन्शनने झोप येत नाही. उदा काही प्रॉमिस केले आहे पण ते पाळलेले नाही.
अशावेळी असा विचार करायचा.....
जे काही झाले आहे ते झाले आहे. आत्ता जागे राहून परिस्थितीत काही फरक पडणार आहे का? सकाळी बघू काय करायचे ते.
बघा नक्की झोप लागेल.

इंटरनेटस्नेही's picture

23 Aug 2010 - 8:21 am | इंटरनेटस्नेही

जाई मॅडम,

मला तुमच्या बद्दल सहानुभुती वाटते. हा आमचा जुना धागा बघा.. आमचीदेखील अशीच टर उडवली काही लोकांनी पण काही सदस्यांनी मात्र चांगले उपाय सुचवले आहेत.

http://www.misalpav.com/node/11392

आपल्या समस्येचे शीघ्र निराकरण होईल अशी आशा करतो.

इन्द्र्राज पवार's picture

23 Aug 2010 - 11:19 am | इन्द्र्राज पवार

जाई, तू अस्सल कोल्हापुरी असल्यामुळे तुला हे नव्याने सांगण्याची गरज नाही की आपल्या कोल्हापुरातील लोक रंकाळ्यात, राजाराम तलावात, पंचगंगेत मनसोक्त पोहण्याचा किती आनंद घेतात. या दोन स्थळांव्यतिरिक्त आज कोल्हापुरात एक नाही दोन नाहीत तर चक्क सहा जलतरण तलाव झाले आहेत आणि ते सदोदित कार्यरत आहेतच. या विविध ठिकणी जलतरणाचा आनंद घेणार्‍यांमध्ये समान सूत्र कोणते असेल तर हे सर्व खास आपल्या लाडक्या कोल्हापुरी भाषेत म्हणतात, "च्यायला, काल लई पोवलो व्ह्तो, रात्री मेल्यासारखं झोपलो बगं !"

'मेल्यासारखं झोपणं' हे त्या इन्सोम्नियाला शेकडो मैल दूर पळवतं. थोडक्यात तुला सांगायचं तर रोज किमान अर्धा तास जर तू जलतरणासाठी देवू शकलीस तर एका महिन्यातच तू देखील त्या मेल्यासारखं झोपणं गटाची सन्माननीय सदस्य होऊ शकशील. (अर्थात आता "अंकल सॅम"च्या ज्या शहरात तू आहेस तिथे स्विमिंग टॅन्कची सोय असणारच हे गृहीत धरले आहे... तसेच जरी तुला पोहायला येत नसले, तरीदेखील कोणत्याही वयोगटासाठी स्वीमिंग हे सर्वदूर मान्य व्यायाम आहे. ~~ वयाची सत्तरी ओलांडल्यानंतर रविन्द्रनाथांनी कथकली शिकायला सुरूवात केली होती अन् तू तर अजून सतराची असशील.)

समजा या ना त्या कारणाने तू जलतरणाला जावू शकली नाहीस तर पहाटे किंवा सायंकाळी (रिकाम्या पोटी) किमान अर्धा तास 'वॉकिंग' (स्पोर्टस शूज घालून) करणे हा देखील एक "चलेगा" जैसा व्यायाम होतो जो तुला झोपेसाठी सहाय्यभूत ठरू शकेल. ~~ आता इथे "नाही रे इन्द्रादादा, मला कामातून चालायला जाण्यास एक मिनिटही मिळत नाही" ही सबब सांगू नकोस, प्लीज. ओके?

बेस्ट लक रंकाळा गर्ल !

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

23 Aug 2010 - 10:15 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

पण सध्या रंकाळा त र शक्य नाहिये.पण घरासमोर एमिरेट्स ड्रायव्हिन्ग शाळेचे प्रशस्त गाउंड आहे. पण heat मुळे जायला कंटाळा येतो...आणि मी कंटाळा करते चालायचा.
तरी प्रयत्न करुन पाहते

विसोबा खेचर's picture

23 Aug 2010 - 12:13 pm | विसोबा खेचर

लग्न करण्यायोग्य वय असेल तर कृपया लग्न करण्याचा उपाय करून पाहा. रोजच्या रोज थकून गेल्यामुळे छानशी झोप येऊ लागेल.. ;)

तात्या.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

23 Aug 2010 - 10:19 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

.....लग्न्?... आणि दुसर्‍यांदा?
माणसाने आपल्या चुकांतुन शिकावे. परत तिच चुक कोण करणार बाबा?
आहे हे ठिक आहे!
परत नाय रे बाबा! :)

झक्कास प्रतिक्रिया आहेत.. शेवटची फर्मास..

स्पंदना's picture

23 Aug 2010 - 3:08 pm | स्पंदना

सांगु नको सांगु , आणखी कोणी सांगेल म्हणुन वाट पाहुन शेवटी लिहिते आहे.
काही वर्षापुर्वी एका घटनेन मी जवळ जवळ एक महिना डो़ळे मिटु नव्हते शकत.
रात्र रात्र मी कुठे पेपर वाच , टी व्ही बघ अस काय काय करत दिवस रात्र घालवले. मग मी इनसोमनिया बद्दल वाचायला सुरु केल. त्यानी सांगितलेले उपाय.
झोप ही शरीराला विश्रांती साठी आवश्यक असते. तर ती विश्रांती शरीराला द्या. आता कशी?
ठराविक वेळेला झोप येवो अथवा न येवो बिछाना गाठणे. अन पुरे विचार थांबवुन श्वासावर लक्ष केन्द्रित करणे.
तुम्ही झोपा अथवा न झोपा सारी कवाड बंद करुन शरीराला ठराविक वेळ विश्रांती देण महत्वाच.
रात्री झोपताना स्वच्छ होउन झोपणे, तेन्व्हा पासुन मला बेड मध्ये शिरायच्या आधी पाय धुवायची सवय लागली ती आज तोवर.
झोपेचा विचार करुनच तुम्ही जास्त थकता, तेंव्हा तो विचार च नको करु. झोप अथवा न झोप सकाळी ठराविक वेळी उठायच म्हणजे उठायच. सार्‍या गोष्टी रात्रीचा विचार न करता पुर्‍या पाडायच्या, दिवस भर ,"अग मी झोपलेच नाही "म्हणुन वैतागत घालवण्या ऐवजी साधा सरळ नॉर्मल घालव. एकदा तु झोपेचा विचार सोडुन फक्त विश्रांतीचा विचार केलास तर तु या अ‍ॅबनॉर्मेलिटि वर विजय मिळवलास.
मी तरी झोप लागो न लागो ताजी तवानी होउन उठते, सांगते कोणाला? तिघ जण माझ्याकड पहात उभी असतात.
आणखी एक, तुला थोड जड जाइल. अती चोकलेट!! चॉकलेट कमी कर. अन दही भात वाढव, नाही तर तुझ्या पतिराजांची फेमस कढी रोज रात्री तडस लागे पर्यंत पी, बघ कशी झोपशील ते!

झो. सा. शु.

पाय धुणे,शॉवर घेणे,दुध पून झोपणे हे कर्ते आहेच..
बाकी अजुनही सुचवलेले उपाय करुन पाहिन..!

धमाल मुलगा's picture

23 Aug 2010 - 3:29 pm | धमाल मुलगा

जाईकाकू,

आमच्या वैद्यबुवांनी सांगितलेला उपाय :
रोज सकाळी किमान ४५ मिनिटे भरभर चालणे. इतकं की घामानं शर्ट भिजला पाहिजे आणि घरी आल्यावर दहा मिनिटं पडुन रहावंसं वाटलं पाहिजे. आणि रात्री झोपताना एक ग्लास गरम दुध+चिमुटभर सुंठ घ्यावी, झोपण्यापुर्वी डोक्याला आणि तळपायाला तेलानं मालिश करावं...

सध्या काहीदिवस झोपताना डोळ्यात काजळ घालतात तसं 'कैलासजीवन' घालुन डोळे मिटुन वर पापण्यांवर पुन्हा कैलासजीवन लाव.... आयच्यान सांगतो, पाच मिनिटात एकेक पापणी दहा किलोची असल्यासारखी जड होते आणि डोळेच उघडायची इच्छा होत नाही...एकदम मेल्यासारखं झोपतो मी तर. :)

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

23 Aug 2010 - 10:26 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

कै.जी. ट्राईड
डोळे मेणचट्ट झाले..आणि परत चेहरा धुवून झोपेपर्यंत पार उडुन गेली झोप!
मालिश आपलं आपण करणं फार बोर होतं
नवरा झोपेच्या बाबतीत लई सुखी आहे...साडेतिनाव्या मिनटाला घ्र्र्र्र्र्र्र्...घ्र्र्र्र्र्र
अजुन नविन काय असेल तर सांग.
बाय थ वे...काल फॉर अ चेंज भारतात आल्यावर फार थकव्यामुळे मी दिवसा पेंगत होते..
पण त्यावेळी झोपता आले नाही..
आज पाहु काय होते!

नवरा झोपेच्या बाबतीत लई सुखी आहे...साडेतिनाव्या मिनटाला घ्र्र्र्र्र्र्र्...घ्र्र्र्र्र्र >>>>
=)) =))=))

अगागा !! हे आमच्या बाबतीत ऊलट आहे !! फक्त 'घ्र्र्र्र्र्र्र्...घ्र्र्र्र्र्र'' सोडुन

धम्या, अजुन एका ध्यान्याची चाहुल लागली रे !!

धमाल मुलगा's picture

24 Aug 2010 - 4:32 pm | धमाल मुलगा

खी खी खी!

चुचुकाकू पार्ट-२ :D
लोकेशनही तेच. ;)

धमाल मुलगा's picture

23 Aug 2010 - 10:38 pm | धमाल मुलगा

>>डोळे मेणचट्ट झाले..आणि परत चेहरा धुवून झोपेपर्यंत पार उडुन गेली झोप!
=)) =)) आयला, तु काय कै.जी. लाऊन बाहेर हिंडायला जाणार होतीस का? चेहरा धुवायचा ते डायरेक्ट सकाळीच. पुन्हा ट्राय माड री..

>>मालिश आपलं आपण करणं फार बोर होतं
झोपण्यापुर्वी टिव्ही पाहतेस का? पाहता पाहताच पायाला तेल चोळत बसायचं...

>>नवरा झोपेच्या बाबतीत लई सुखी आहे...साडेतिनाव्या मिनटाला घ्र्र्र्र्र्र्र्...घ्र्र्र्र्र्र
हा हा हा.....साडेतिनाव्या मिनिटाला... :D मस्तच.

>>अजुन नविन काय असेल तर सांग.
च्यायला! एक ट्राय कर, दुधात तुळशीचं बी भिजवुन ठेव आणि ते घे. शिवाय रात्री झोपताना गरम दुध+चिमुटभर सुंठ हे कर.

आणखी एकः डोळे मिटुन पडल्यावर स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित कर..पुर्ण सायकलकडे लक्ष दे..श्वास घेतला ->श्वास फुफ्फुसांपर्यंत पोचला -> उच्छ्वास सोडला असं...आणि त्यावेळी १०० ते १ असे आकडे हळुहळु मोजायला सुरु कर...
फँटॅस्टिक गुंगी चढते.

>>पण त्यावेळी झोपता आले नाही..आज पाहु काय होते!
तु चलच ट्रेकला..तुला १५-२० किलोमिटर पिदडवतो...मग बघ कशी गाडीतर घुर्रर्रर्र...घुर्रर्रर्र करत झोपशील. :)

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

23 Aug 2010 - 10:46 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

जर ट्रेक ला जौन आल्यावर छान झोपले ना मी तर मस्त होइल रे..
तुझ्यासाठी डबाभर चॉकलेट मूस बक्षिस जाहीर करेन...!

धमाल मुलगा's picture

23 Aug 2010 - 10:47 pm | धमाल मुलगा

डबा तयार ठेवणे ही णम्र इनंती. :)

संकेत's picture

23 Aug 2010 - 4:39 pm | संकेत

लोक मारे सल्ले देताहेत आणि जाईतै काही बोलतच नाहीत. भारीतून भारी सल्ले ऐकून त्यांना झोप आलेली दिसते. :)

सूड's picture

23 Aug 2010 - 5:41 pm | सूड

जाईतै, पोटभर जेवा, विशेषत: गोड (म्हणजे तुमच्या रावण पिठल्याची पाकृ पण छान आहे), आणि डोक्यावर महाभृंगराज (माक्याचं तेल) तेलाने मसाज करा झोप यायलाच पाह्यजे.

स्वगत: मी महाभृंगराज फक्त विकांतालाच लावतो डोक्याला, निद्रादेवी आमच्यावर आधीच प्रसन्न आहेत ईतर दिवशी लावलं तर आधीच मर्कट तशातच.....

वाटाड्या...'s picture

23 Aug 2010 - 8:56 pm | वाटाड्या...

मलाही असाच त्रास सतत ६ महीने होत होता..आता गेला. मी काय केलं ते सांगतो...(म्हणतात ना स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाय..)

१. कॉफी १००% बंद,
२. १.३० तास कसुन व्यायाम (संध्याकाळी ६.३० - ८ / ७ - ८.३०),
३. सकाळी लवकर उठणे (५.३० ला सरळ),
४. नियमीत व वेळेत जेवणे,
५. संध्याकाळी ५.३० नंतर साखरयुक्त पदार्थांच सेवन बंद,
६. झोपताना शांत असे शास्त्रीय संगीत ऐकणे,(आमच्या वसंतरावांचा मारवा ऐका..मन शांत झालंच पायजे.)
७. चिंता न करणे (अवघड आहे..पण सरावाने जमते ..)
८. सकाळी ७५० मिली काटामोड गरम पाणी प्या...
९. कधीही ७ तासांपेक्षा जास्त झोपु नका (जेव्हा येइल तेव्हा),

ह्यातील जास्तीत जास्त उपाय करुन पहा. मला १५ दिवसांमधे फरक पडला...

- वाटाड्या...

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

23 Aug 2010 - 10:40 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

रजा घेते आहेंआहे आली झोप तर प॑रत येईनच मि.पा वर! दोन तीन तासात!
धन्यवाद

सुहास..'s picture

23 Aug 2010 - 11:17 pm | सुहास..

मि.पा वर! दोन तीन तासात! >>

गुड नाईट !! मी ही चाललो गप्पा मारायला !!

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

24 Aug 2010 - 4:22 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

आणि तेही काहिही न करता....... ना गोळी, ना कै.जी,ना गाणी......काहिही न करता मला झोप लागली आणि तीहि बेशुद्ध पडल्यासारखी!
घरच्यानीही किरकोळ प्रयत्न केला जागं करायचा.पण नंतर त्यानीहि विचार केला की इतक्या दिवसांनी झोपते आहे झोपु द्यावे!
१५ तास?
कदाचित मि.पा.कर मित्रांच्या शुभेच्छांमुळे असेल्....पण मला खरच मेल्यासारखी झोप लागली होती!
उद्याचं उद्या पाहु..पण काल मी झोपले!
धन्यवाद!

रेवती's picture

24 Aug 2010 - 5:15 pm | रेवती

अभिनंदन जाईताई!

कानडाऊ योगेशु's picture

24 Aug 2010 - 6:42 pm | कानडाऊ योगेशु

आता मी पंधरा पंधरा तास झोपते.झोप कशी कमी करु? असा धागा काढणार का काय? :D

(झोपाळु) योगेशु

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

24 Aug 2010 - 10:27 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

मला तेच मनात आले होते. कि मिपा वर परत नव्या धाग्याची चाहुल...
झोप कमी करायची आहे....
हिहहहह :)

प्रभो's picture

24 Aug 2010 - 7:15 pm | प्रभो

जेटलॅगचा परिणाम असावा. :)

धमाल मुलगा's picture

24 Aug 2010 - 7:18 pm | धमाल मुलगा

तीन तासाची फ्लाईट आणि जेटल्याग? =))

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

24 Aug 2010 - 10:30 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

अरे धम्या...पहिल्यांदा रे एअर इंडिया भोगले रे!
डायरेक्ट पुणे च्या मोहात....
तुला उद्या फोटो पाठवते....गम्मत म्हणुन

रेवती's picture

24 Aug 2010 - 10:56 pm | रेवती

ए, आता झाली ना १५ तासांची झोप?
मग दुसरा धागा सुरु कर नव्या विषयासाठी!;)

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

24 Aug 2010 - 11:25 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

आता नविन धागा कोणता टाकु...याचे विषय सुचवा म्हणुन टाकु का एक नवा धागा?
;) ;)

उपेन्द्र's picture

24 Aug 2010 - 11:12 pm | उपेन्द्र

मी आडवा पडलो तर ५ मिनीटात झोप लागते. बसून काही करत राहिलो तर रात्री २-३ वाजे पर्यन्त जागा रहातो. हा झोपेचा प्रोब्लेम म्हणजे काय आहे यार .. ?

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

24 Aug 2010 - 11:22 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

... हुश्शार मानुस ऐ तुमी..
पण जावे त्यांच्या (म्हणजे आमच्या) वंशा तेव्हा कळे....
गम्मत बाजुला..
खरच सुखी आहात..
तसेच रहा

उपेन्द्र's picture

27 Aug 2010 - 11:09 pm | उपेन्द्र

जाईताई,

एकदाच गाडी सहकुटुम्ब चालवताना २ सेकन्द झोपलो होतो. आता आठ्वले तरी अन्गावर काटा येतो. अजून सगळे सुखरूप आहोत. तेव्हा पासून झोप alert झाली आहे.

असो...

चतुरंग's picture

27 Aug 2010 - 11:50 pm | चतुरंग

अरे देवा!! स्पीड किती होता?
ताशी ८० किमी स्पीड असेल तर २ सेकंदात गाडी तब्बल ४५ मीटर गेलेली असते एवढ्या अंतरात काहीही होऊ शकते!
खरोखरच नशीबवान आहात म्हणायचे.

उपेन्द्र's picture

28 Aug 2010 - 9:43 pm | उपेन्द्र

शेजारी 'जाग्रुत' बायको होती आणि समोर कोणतीच गाडी नव्हती म्हणून ठीक.. डोळे उघडले तेव्हा गाडी पूर्ण उजव्या हाताला होती. रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या सिमेन्टच्या पोलवरून उड्या मारत तिला जागेवर आणली. पुढचा बम्पर बदलावा लागला. आम्हा कोणाचेही स्पेअर पार्ट बदलावे लागले नाहीत.

तेव्हापासून बायको गाडीत झोपायची बन्द झाली. !!!

जाई ताई,
झोप न लागणे ही गोष्ट मेंदूशी संबधित आहे. मला झोप लागत नाही अशी मानसिकता आपणच तयार करत असतो आणि आपला मेंदू ह्या गोष्टीचे आज्ञापालन करतो. मला झोप येत नाही असे म्हणण्यापेक्षा, मला खूप गाढ झोप लागते, असे सतत जाणीव ठेवली तर काही दिवसात गाढ झोप येणे सुरु होते.
फक्त झोपच नाही, तर आपल्या स्वभावातल्या चांगल्या किंवा वाईट गोष्टीं ह्या मेंदूशी संबधित असतात. म्हणून स्वतःमध्ये चांगले बदल घडवायचे असतील तर अगोदर चांगली मानसिकता तयार करणे गरजेचे आहे.

प्रणवजोशी's picture

19 Feb 2016 - 1:35 pm | प्रणवजोशी

नाशिकला आरोग्यधाम आश्रमात योगनिद्रेची सिडी मिळते. २ १/२ तासाची आहे. ती ऐकताना हमखास झोप लागते.

कविता१९७८'s picture

19 Feb 2016 - 2:21 pm | कविता१९७८

कष्टाची कामे करा, जमल्यास झोपण्याआधी ७-८ मजले जिने चढा, ७-८ मजले नसतील तर दोन मजली जिने २-४ वेळा चढ उतर करा, ते ही नसतील तर दोन तास फास्ट चाला. नक्कीच झोप लागेल.

नाना स्कॉच's picture

19 Feb 2016 - 9:51 pm | नाना स्कॉच

अहो २०१० मधील धागा आहे हो! लै पाणी गेले पुलाखालुन त्यानंतर!

आरोह's picture

20 Feb 2016 - 12:14 am | आरोह

मनापासून हसलो.....2010 चा धागा आणि अजून हि उपाय सुचवतायत