साहित्य :
१) ब्रेड : ८-९ स्लाईसेस (शिळा सुद्धा चालेल)
२) अंडी : ४
३) दुध : २ कप
४) साखर : १ कप किंवा आवडीनुसार
५) बटर : ३ टे.स्पू
६) जायफळ आणि दालचिनी पूड : फ्लेवरसाठी
७)बेदाणे : आवडीनुसार घालणे
२) दुध + साखर + लोणी गरम करायला ठेवावे. साखर आणि बटर विरघळेपर्यंत गरम करावे. (उकळु देउ नये) चव घेउन साखर कितपत आहे ते पहावे. आवडीनुसार वाढवावी किंवा कमी करावी.
३) अंडी फेटुन घ्यावीत आणि दुध+साखर + बटर मध्ये घालावीत्. पाव जायफळ बारीक किसणीने किसुन घालावे.आणि छान मिक्स करावे.
४) हे सारे मिश्रण आता ट्रे मधिल ब्रेड स्लईसेस वर ओतावे.( सगळी कडे सारखे पसरेल असे) त्यावर हवे असल्यास बेदाणे पेरावे.
जायफळ वरही घालावे (आवडत असेल तर)
५) प्रीहिटेड ओव्हन मध्ये १८०% वर १५-२० मिनिटे बेक करावे.
वर दालचिनीची पुड भुरभुरावी.हे पुडिंग रूम टेंपरेचर लाच सर्व्ह करावे.तसेच छान लागते.
प्रतिक्रिया
19 Aug 2010 - 6:50 pm | रेवती
आणि अंडी?
मधली पायरी चुकून गळाली वाटते.
कि मलाच दिसत नाहिये?
19 Aug 2010 - 6:52 pm | धमाल मुलगा
अंड्यांची भुर्जी करुन खायची असेल. आणि मग उरलेल्या ब्रेडचं पुडिंग :D
19 Aug 2010 - 6:54 pm | रेवती
अच्छा! असा प्रकार आहे तर!
19 Aug 2010 - 6:51 pm | धमाल मुलगा
ह्म्म्म.....
एकदम सोपं दिसतंय प्रकरण.
करुन बघायला हवं. :)
ठ्यांकू जाईताई !
19 Aug 2010 - 7:17 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
पायरी क्र. ३ : दूध + साखर + लोणी यामध्यी अंडी फेटुन घालावीत्..आणि जायफळ ही घालावे ..किसुन. छान मिक्स करुन घ्यावे.
माफीची चुकी असावी...आपलं..चुकीची माफी असावी.
(अति घाई संकटात जाई) ;)
डॉनभाई...ठ्यांकू...
19 Aug 2010 - 6:56 pm | मस्त कलंदर
पण एक शंका आहे.
वाढवावी इतपत ठीक आहे. कमी कशी करावी हे काही कळले नाही. :)
जाता जाता: ते स्टीलचे भांडे स्वच्छ घासायला हवेय.
19 Aug 2010 - 7:00 pm | धमाल मुलगा
किती क्रूर आणि निर्दयी आहे हा प्रतिसाद.
:(
19 Aug 2010 - 7:06 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
जर आपल्याला कमी गोडाची सवय असेल तर घालतानाच कमी घालावी.
पुढल्या वेळी नीट तपशिलात छापेन ...माफ करा.
(गुरु आहात हं बाकी) :)
भांडे : दुध + साखर यांचे थेंब पातेल्याला लागुन ते अति उष्णतेमुळे caramalised झालेले आहेत्.त्यामुळे ......!
नाहीतर आमच्या मेरी च्या स्वच्छतेविषयी शंका....?????
19 Aug 2010 - 7:11 pm | मस्त कलंदर
माझा अत्यंत निरागस प्रश्न होता हो. हा धम्या उगाचच कैतरी बोलतोय. लक्ष नका देऊ त्याच्याकडे. महाबिलंदर आहे तो. (इथे एक अत्यंत निरागस इमोटिकॉन कल्पून घ्यावी)
19 Aug 2010 - 7:28 pm | परिकथेतील राजकुमार
आजकाल स्वतःला निरागस म्हणुन घ्यायची फॅशन आली आहे का मिपावर ?
असो..
छान आणि सोपी आहे पाकृ. खाऊन बघायलाच पाहिजे.
अवांतर :- ह्या पाकृत तिखट न घातल्याबद्दल धन्यवाद ;)
19 Aug 2010 - 9:58 pm | अनामिक
अवांतर :- ह्या पाकृत तिखट न घातल्याबद्दल धन्यवाद
हो, नाहीतर काही लोक फोडणी घालून त्यात दुध घालतात म्हणे!
अवांतर - पुडींग छान आहे!
20 Aug 2010 - 10:25 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
अरे सोप्पंय! IIरावण मरणार निश्चितII ॥इति अनिरुद्ध महावाक्यम॥ असल्यामुळे या पाकृत तिखट (आणि/किंवा मिरच्या) घातल्या नसणार!
पाकृ आवडली. पुढच्या वेळेस साखर कमी कशी करायची याचीही कृपया पाकृ द्यावी.
19 Aug 2010 - 9:59 pm | अनामिक
पण दुध आणि बटर दोन्ही थंडेच दिसताहेत??
20 Aug 2010 - 3:14 am | जाई अस्सल कोल्हापुरी
त्यात घाललेलं बटर वेगळं दिसावं म्हणुन मी आधीच फोटु काढलेलं असतं कि वो..!
अस्सं कस्सं म्हणते की मी कि तुमाला ते हे नाही वापरता एत कि वो.. हे आप्लं कॉमनसेन्स कि काय ते!
आणि दुध आपल्याला उकळायचे नाहीच आहे. साखर विर्घळेपर्यंत तापवायचे आहे.
20 Aug 2010 - 10:56 am | जासुश
साखरेची चव कमी करायची असेल तर दुधाचे प्रमाण वाढवायचे. नंतर रेसिपीतील इतर साहित्याचे प्रमाण ही वाढवावे.
20 Aug 2010 - 5:39 am | चित्रा
पाककृती छान दिसते आहे. अंड्याशिवायही करता येते का?
20 Aug 2010 - 5:54 am | सुनील
सोपी पाकृ.
काहीशा अशाच पाकृमध्ये, ब्रेडवर दुध्-अंड्याचे मिश्रण ओतण्याऐवजी, ब्रेडच्या स्लाईस ह्या मिश्रणात बुडवून, तव्यावर किंचित तेलात परतल्या, की फ्रेन्च टोस्ट बनेल!
20 Aug 2010 - 10:28 am | मनि२७
काय मस्त पुडिंग आहे ग जाई... श्रावण झाला कि नक्की करून पाहीन.....
आमच्याकडे श्रावणात अंडी पण खात नाही अग :-(
अजून छान छान गोडाचे पदार्थ येऊ देत...
मला लई गोड आवडत गडे....... :-)
20 Aug 2010 - 10:01 pm | सोया
यात सोया दुध वापर्ल्यास प्रोटिन यएतात.
25 Aug 2010 - 4:03 pm | इंटरनेटस्नेही
छान आहे.. बनवुन बघेन नक्की!
25 Aug 2010 - 6:52 pm | सन्योगिता
without egg kasa karava?