गाभा:
साहित्य संमेलनाध्यक्षाच्या निवडणूका येऊन राह्यल्या. वाद-विवादाचा धुराळा उडाला लागलाय. साहित्यिक गिरिजा कीर आयबीएन लोकमतमधल्या एका चर्चेत म्हणल्या ''झोपडपट्टील लोकांकडे साहित्य प्रतिभा नसते'' आन काल स्टार माझाच्या चर्चेत त्या म्हणल्या ''माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला''कोण चूक बोल्लं कोण बराबर बोल्लं ह्याच्यावर काथ्याकूट नाय कराचा मला. कोटीच्या घरात मराठी बोलणारी मंडली हाय आन साडेसातशे लोक जे साहित्य परिषदांचे निवडलेले मोजकेच सदस्य हायेत ते साहित्य मंडलाचे अध्यक्ष ठरतो ही गोठ काय बरी वाटत नाय. ज्यायला ज्यायला मराठी लेखन कराची, वाचाची हौस हाये अशा लोकायला मद्दान करुन दिले पाहिजेन. तुम्हाला काय वाट्टे ?
प्रतिक्रिया
19 Aug 2010 - 10:09 am | उग्रसेन
'झोपडपट्टीमधी राहणार्या लोकांकडे साहित्य प्रतिभा नसते' असे वाचावे.
बाबुराव :)
19 Aug 2010 - 10:51 am | पाषाणभेद
तसे असते तर भरलेल्या पोटी जन्म घेणार्या गोड गोड शब्दांचेच साहित्य असते.
19 Aug 2010 - 1:19 pm | इन्द्र्राज पवार
श्री.बाबुराव.... मी तर आता या मताचा झालो आहे की, निवडणुकीला उभे राहणार्यांनी (वा त्यांच्या बगलबच्च्यांनी) आपल्या उमेदवारीच्या प्रसिद्धीसाठी केलेले जे काही "स्टंट" असतात त्यापैकी हमखास यशस्वी होणारा म्हणजे साहित्येतर बाबीवर एकदोन वाक्ये अशी उच्चारायचे की तिचा धुरळा निश्चितच उडणार आणि त्या खकाण्यात बाकी काही होवो ना होवो त्या व्यक्तीचे नाव झटकन प्रसिद्धी माध्यमाद्वारे जिथे पोचायची ती पोहोचतातच.
गिरिजा कीर इतक्या का मूर्ख आहेत का की आपण झोपडपट्टीमध्ये राहाणार्या लोकांविरूद्ध (भले ते साहित्याच्या दर्जाबद्दल का असेना) जे काही विधान करणार आहोत तिचे परिणाम काय होतील हे त्यांना माहित नसावे? इतकी वर्षे साहित्याच्या प्रांतात काढलेल्या विदुषीला ही बाब माहित नसेल तर तिची उमेदवारी यशस्वी जरी झाली तरी त्यांच्या हातून मराठी भाषेची काय उन्नती होणार आहे?
पण नाही, त्या हुशारच असणार....आणि त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देणार्यांनाही त्यांची अशी फुकटात प्रसिद्धी झाली तरी हवीच आहे ना? विधान करायचे आणि दुसर्या दिवशी "मी असे म्हटलेले नाही, माध्यमांनी वेगळा अर्थ काढला..." ही या धंद्याची बाजारमोलाने कार्यवाही असते. असो.
धाग्याचा मूळ मुद्दा आहे तो परिषदेच्या साताठशे सदस्यांनी अध्यक्ष निवडायचा की खुल्या मतदानाने? याला उत्तर असे आहे की, वर्षानुवर्षे या रितीबाबत भिंतीवर डोके आपटून झाले आहे आणि परत डझनावरी वर्षे गेली तरी परिषद निवड पद्धत बदलणार नाही म्हणजे नाही. त्यामुळे संमेलनाच्या तारखेपर्यंत होणारा प्रतिवर्षाचा तमाशा पाहणे, मराठी साहित्यिकांसाठी नाही तर मराठी भाषेसाठी शक्य झाल्यास पुस्तके खरेदी करण्याच्या निमित्ताने त्या त्या गावी जावून येणे....नेहमी ठरल्याप्रमाणे शेवटच्या दिवशी हमखास चर्चेला येणार्या "निपाणी-संकेश्वर-भालकी-बिदर-बेळगांवसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे" या ठरावावर होणारी व्याख्यानाची लक्तरे थोडावेळ ऐकणे....आणि संध्याकाळच्या रा.प.म.च्या बसने आपल्या गावची वाट धरणे.
काळाराम काय किंवा गोराराम काय.... भक्ताला देवळात जाण्यासाठी निमित्त हवे असते.
झाले मराठी साहित्य संमेलन !
19 Aug 2010 - 5:30 pm | सहज

तसेच
एका विधानाचा विपर्यास करुन त्याच्यावर चर्वितचर्वण करण्यात काय अर्थ आहे?
सहमत.
माझ्या मते या बाबतीत मिपाचा आदर्श प्रसिद्धी माध्यमांनी ठेवावा.
वरचे म्हणणे मांडणार्या श्री इंद्राज व माननीय राघागुर्जी दोघांशी सहमत आहे.
19 Aug 2010 - 1:22 pm | परिकथेतील राजकुमार
साहित्य संमेलन ? ते काय असते ?
19 Aug 2010 - 4:15 pm | मृत्युन्जय
मराठी साहित्य संमेलन हे एक विनोदाचा विषय झालेले आहे हे नक्कीच. परंतु सध्या जो काहे राळ किंवा धुरळा उडत आहे तो संपुर्णतया अप्रस्तुत बाबीवरुन उडत आहे हे नक्की.
सुमारे ७५० जणांना मतदानाचा हक्क आहे. हे वाचुन मला तरी हा आकडा उलट मोठाच वाटला. ही काय मुनिसिपाल्टीची निवडणुक आहे की कोण्याही सोम्यागोम्याला मतदानाचा हक्का द्यावा? ज्याला साहित्य कशाशी खातात हे देखील माहित नाही त्याला मतदानाचा हका देउन काय उपयोग? जागतिक सिनेमाच्या मुल्यांकनाची मक्तेदारी मिरवणार्या ऑस्कर साठी सुद्धा केवळ ६००० लोकांना मतदानाचा अधिकार आहे. कलेच्या क्षत्रातील पुरस्कारांसाठी किंवा मानाच्या पदांसाठी केवळ कलेची जाण असणार्या लोकांनीच मतदान करावे हे योग्याच नाही काय?
विधान झोपडपट्टीत राहणार्या लोकांना मतदानाचा हक्क असु नये या अर्थाचे नव्हतेच मुळी. इन्द्राज म्हणाले त्या प्रमाणे गिरीजा कौर तितपत सारासार विवेकबुद्धी वापरुन नक्कीच बोलत असतील. मतदानाचा हक्क तुम्हा आम्हाला तरी कुठे आहे. आपण तर झोपडपट्टीत नाही ना राहत?
झोपडपट्टीत राहुन कलेच्या क्षेत्रात मानाचे स्थान मिळवणारे आज अनेक़जण आहेत (अर्थात आता कदाचित ते झोपडपट्टीत राहत नसतील). त्यांना मतदानाचा हक्क आहेच ना? म्हणजे व्यक्तीच्या सामाजिक स्थानावरुन किंवा प्रतिष्ठेवरुन त्याला मतदानाचा हक्क मिळत नसुन तो त्याच्या साहित्यातील योगदानावरुन किंवा जाणिवेवरुन मिळतो हे तर कोणीही मान्य करेल ना? (किंबहुना करायला पाहिजे). मग तसे असेल तर एका विधानाचा विपर्यास करुन त्याच्यावर चर्वितचर्वण करण्यात काय अर्थ आहे?
19 Aug 2010 - 5:27 pm | राजेश घासकडवी
सहमत.
माझ्या मते या बाबतीत मिपाचा आदर्श प्रसिद्धी माध्यमांनी ठेवावा.
19 Aug 2010 - 5:33 pm | परिकथेतील राजकुमार
माझा आदर्श ठेवला तरी चालेल. मला साहित्य संमेलन म्हणजे काय तेच मुळात माहिती नाही, त्यामुळे असे प्रश्नही पडत नाहीत.
19 Aug 2010 - 6:20 pm | नितिन थत्ते
>>मला साहित्य संमेलन म्हणजे काय तेच मुळात माहिती नाही, त्यामुळे असे प्रश्नही पडत नाहीत.
मला पण.
मला वाटतं साहित्य म्हणजे ग्लास, शेंगदाणे, झालंच तर पापड वगैरे.
4 Sep 2010 - 10:44 am | उग्रसेन
मला वाटतं साहित्य म्हणजे ग्लास, शेंगदाणे, झालंच तर पापड वगैरे.
हॅ हॅ हॅ (श्री घाटपांडे यायच्या सौजन्याने)
साहित्य म्हंजी 'सह' येते त्याला साहित्य म्हणाचं.
साहित्यामधी सह काय काय येते
त्याचा धडा नंतर कधीतरी घेऊ. :)
बाबुराव :)
19 Aug 2010 - 7:53 pm | तिमा
मिपाकरांमधे भरपूर साहित्यप्रतिभा आहे. म्हणून मिपाकरांतर्फेही साहित्यसंमेलनासाठी एक उमेदवार उभा करावा.
19 Aug 2010 - 11:10 pm | चिरोटा
उगाच धुरळा उठवण्यासाठी हे उद्गार काढले असावेत. मुलाखत ऐकली पाहिजे.
ह्यावेळी कुठल्यागावी ठेवलय साहित्य संमेलन? गेल्यावेळी सॅन होजेला कोण कोण स्वतःच्या खर्चाने गेले होते?
गाजर खीर
4 Sep 2010 - 10:41 am | उग्रसेन
संमेलन अध्यक्षाच्या उमेदवाराला जीवे मारायचीबी धमकीबी द्यायला सुरुवात केली लोकायनी
फेमस व्हायचे नवे नाटक इकडंबी सुरु झालं म्हणाव की काय आता ?
बाबुराव :)