संयम आणि सबुरीचा महिना - रमजान!

शाहजहान मगदुम's picture
शाहजहान मगदुम in काथ्याकूट
17 Aug 2010 - 11:13 am
गाभा: 

संयम आणि सबुरीच्या धाग्यावर बेसबरीने झालेली बरीचशी असंयत चर्चा वाचून आता धागा वाचनमात्र करावा असा संदेश संपादकांपर्यंत पोचल्याने धागा वाचनमात्र होत आहे! :)
-संपादक मंडळ

संयम आणि सबुरीचा महिना - रमजान!
– शाहजहान मगदुम
जीवन एक अखंड प्रवास. या प्रवासात मार्गक्रमण करणारा प्रवासी म्हणजे मानव. मानवास या प्रवासात काही अडथळे येऊ नयेत म्हणून अल्लाहनं प्रेषितांद्वारे वेळोवेळी मार्गदर्शनही पाठविलंय. आता मानवास आपल्या प्रवासात येणाNया अडचणींवर मात करण्यासाठी बरोबर न्यायवयाची शिदोरी म्हणजेच ईशपरायणता होय. याच ईशपरायणतेसह मानवाला जीवन व्यतीत करण्यासाठी उत्तम प्रशिक्षणाची सोय अल्लाहनं पवित्र रमजान महिन्याच्या स्वरूपात केलीय. या महिन्यात प्रत्येक मुस्लिमानं रोजा ठेवून या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यास सांगितलं आहे. याच महिन्यात अल्लाहनं आपल्या पवित्र व अंतिम ग्रंथाचं म्हणजेच पवित्र कुरआनचं अवतरण अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर केलंय. याचं पठण या महिन्यात पवित्र मानलं जातं. या सर्व बाबींमुळे लक्षात येतं की, ईशपरायणता, रमजान आणि कुरआनमुळे मानवाला नैतिक व्यवस्थेच्या त्रिकोणी संगमाचा लाभ मिळाला आहे.
रोजाप्रमाणेच पवित्र कुरआन आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या उक्ती आणि कृतींमध्ये ईशपरायणतेला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आलंय. पवित्र कुरआनात सुमारे १५८ पेक्षा अधिक आयतींमध्ये ईशपरायणतेचा संदर्भ आला असून १०० पेक्षा जास्त ‘हदीस’ या विषयाबाबत आढळून येतात. यावरून इस्लाममध्ये ईशपरायणतेला किती महत्त्व आहे हे स्पष्ट होते. ईशपरायणता ही इस्लाममधील सर्व उपयुक्तता आणि सद्गुणांची गोळाबेरीज आहे. ज्या व्यक्तीकडे ईशपरायणता असेल त्यानं सर्वकाही साध्य केलं असं म्हटलं जातं.
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी फर्माविलं आहे की, ‘‘शुद्ध आचरण आणि शुद्ध अंत:करणाची संपत्ती केवळ अशाच स्थितीत मिळू शकते जेव्हा माणसावर प्रत्येक वेळी ही कल्पना आरुढ असावी की, जणू तो ईश्वराला पाहातोय. त्याचं अस्तित्व नेहमीच व प्रत्येक वेळेस ईश्वराच्या दृष्टीत आहे. अथवा असं समजावं की, ईश्वर त्याला पाहातोय. तात्पर्य, तुम्ही स्वत:ला ईश्वरासमोर हजर समजावे अथवा ईश्वर आपल्या जवळ असल्याचा विश्वास असावा. याशिवाय कोणत्याही सत्कार्याला परिपूर्णता येत नाही.’’ (बुखारी, मुस्लिम)
ईशभय आणि ईशकृपा या दोन गोष्टींच्या दरम्यान श्रद्धा असते. ईश्वरीय कृपेची आशा माणसाला सद्कार्याची प्रेरणा देते आणि अपराधांच्या भयानक परिणामांचं भय ईश्वरीय अवज्ञेपासून दूर ठेवते.
आपण अल्लाहच्या प्रसन्नतेपासून आपला बचाव करतो आणि वाईटापासून दूर राहून चांगुलपणा आत्मसात करतो, यालाच ईशपरायणता म्हणतात. या मन:स्थितीमुळे अशी मानसिकता तयार होते की, मनुष्य आज्ञाधारकता आणि अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी जीवन वंâठत असतो. अशी व्यक्ती प्रत्येक क्षणी अल्लाहच्या प्रसन्नतेचा विचार करीत असते. त्याला अल्लाहची अप्रसन्नता होऊ नये म्हणून एखाद्या कृतीमुळे अल्लाहची अप्रसन्नता ओढवून घेण्याची भीती त्याच्या मनात नेहमी असते. अल्लाहला प्रसन्न करण्याच्या संधीला अशी व्यक्ती जाऊ देत नाही. म्हणजेच मनुष्य स्वत:वर नियंत्रण ठेवून आणि इच्छा-आकांक्षांना बंदिस्त ठेवूनच ईशपरायणता प्राप्त करू शकतो.
अल्लाहनं कुरआनात म्हटलं आहे की,
‘‘आणि ज्यानं आपल्या पालनकत्र्यासमोर उभं राहाण्याचं भय बाळगलं होतं आणि मनाला वाईट इच्छेपासून दूर ठेवलं होतं स्वर्ग त्याचं ठिकाण असेल.’’ (कुरआन– ७९:४०-४१)
रोजा मनुष्यातील शक्तिशाली उत्कट स्वाभाविक इच्छांवर नियंत्रण ठेवतो. महिन्याभराचं आंतरिक प्रशिक्षण दररोज १२-१४ तास निरंतर चालत असतं. मनुष्य या कालावधीत इतका तहाणलेला बनतो की, त्याला नीट बोलतासुद्धा येत नाही. त्याच्या हातात थंड पाणी आपली तहाण भागविण्यासाठी असते. त्याला ते पाणी प्यावेसं वाटतं. परंतु रोजा असं करण्यापासून त्याला परावृत्त करतो. अशा व्यक्तीमध्ये कशा प्रकारची सहनशक्ती, संयम आणि ईशपरायणता निर्माण होत असेल याची कल्पना करावी तितकी कमीच! अशा प्रकारे रोजा मनुष्यामध्ये स्वत:ला नियंत्रित करून उत्कट स्वाभाविक इच्छांवर प्रबळ नियंत्रण ठेवतो. हीच शक्ती मनुष्यात खNया अर्थानं ईशपरायणता निर्माण करते.
रोजा ही दिखाव्यापासून आणि दांभिकतेपासून पूर्णत: अलिप्त अशी उपासनापद्धती आहे. नमाज, जकात, हज या उपासनापद्धतींमध्ये काही अनिवार्य करावं लागतं, नाहीतर ती उपासना ठरत नाही. असं मात्र रोजाबद्दल नाही. ही उपासना कुणीही पाहू शकत नाही की ऐवूâ शकत नाही. अशी उपासना दिखाऊ स्वरुपाची असूच शकत नाही. इस्लामच्या मूलतत्त्वांपैकी रोजा हे एक असं मूलतत्त्व आहे ज्यास दांभिकता स्पर्शदेखील करू शकत नाही. रोजाच्या याच गुणवैशिष्ट्यामुळे पवित्र कुरआनात वैशिष्ट्यपूर्ण उल्लेख करण्यात आला आहे की,
‘‘हे श्रद्धावंतांनो! तुमच्यावर विहित केलेले उपवास (रोजा) तुमच्या पूर्वजांवरही विहित केलेले होते जेणेकरून तुम्ही ईशपरायण व्हाल.’’ (पवित्र कुरआन–२:१८३)
पवित्र कुरआनातील वरील संकेतवचन फक्त आणि फक्त रोजा (उपवासा)साठीच अवतरित झालंय. इतर उपासनापद्धतींद्वारे जरी ईशपरायणता प्राप्त होत असली तरी त्यांच्यासाठी अशा प्रकारचं वर्णन पवित्र कुरआनात कोठेच आलेलं नाही.
रोजामुळे ईशपरायणता आणि संयम यासारखे सद्गुण निर्माण करण्यावर भर दिला गेला आहे. मनुष्य रोजा कालावधीत खाण्या-पिण्यापासून आणि संभोगापासून अलिप्त राहात असतो. याचाच अर्थ असा की, इतर वेळी तो अल्लाहच्या प्रसन्नतेविरुद्ध कोणतीही गोष्ट करू शकत नाही. म्हणून रोजादार इतर बाबींतसुद्धा अल्लाहच्या आज्ञापालनात राहातो, त्याच वेळी त्याचा रोजा हा खरा रोजा सिद्ध होतो.
ईशपरायणता जीवन व्यतीत करण्यासाठी रोजाव्यतिरिक्त अन्य दुसरे अत्युत्तम अशी कोणतीच उपासनापद्धत नाही. दुसरं कोणतंच कृत्य त्याची जागा घेऊ शकत नाही. म्हणूनच नमाज, जकातप्रमाणे रोजा हीसुद्धा धर्माची स्वाभाविक अनिवार्यता आहे. रोजाअभावी नमाजची शिस्तप्रिय व्यवस्थादेखील पूर्णतेला पोहोचू शकत नाही.
रोजा अनेक कारणांमुळे इस्लामच्या खNया स्वरुपाचं द्योतक आहे. कुरआननं धर्माची स्पष्ट केलेली कल्पनाही रोजामध्ये सर्वांगानं स्पष्ट होते. कारण रोजा मनुष्याला फक्त सदाचरणीच बनवत नाही तर त्याच्या आत्म्याला आणि विचाराला एक दिशा देतो. बहिरंग आणि अंतरंग दोन्ही ईशपरायण बनतात.
रोजामध्ये ईशपरायणतेबरोबरच त्याची मौलिकता आणि महत्त्वसुद्धा रोजादार जाणून, समजून व उमजून घेतो. हे सर्व अनुभवातूनच! जेव्हा ‘रोजा’ हा शब्द कानी पडतो तर लगेचच स्वयंप्रेरणा विंâवा अंत:स्पूâर्तीच्या मागणीला रोखून धरणं म्हणजे रोजा हे आपल्या लक्षात येतं.
अल्लाहच्या प्रसन्नतेच्या प्राप्तीसाठी फक्त अल्लाहचे आदेश पाळणं पुरेसं नाही, तर आपल्या मनातील इच्छांना आवर घालून स्वत:च्या इच्छेनुसार न वागणं गरजेचं आहे. अल्लाहची उपासना करणं म्हणजे अल्लाहव्यतिरिक्त इतर तथाकतिथ ईश्वरांना नाकारणं आणि अल्लाहचं एकत्व, एकेश्वरत्व मान्य करणं या दोन्ही मौलिक गोष्टी आहेत. अल्लाहला आत्मसमर्पण करणं आणि ईशपरायण जीवन जगणं म्हणजे अल्लाह आणि त्याच्या प्रेषितांची आज्ञाधारकता स्वीकारणं होय. जे न करण्याचा आदेश दिला आहे ते नाकारणं आणि ज्याची परवानगी दिली आहे ती गोष्ट आचरणात आणणं हे माणसाला आत्मिक समाधान प्राप्त करून देते. अल्लाह आणि त्याच्या प्रेषितांनी घालून दिलेल्या मर्यादांचे पालन करणे आणि स्वत:ची भर त्यात न घालता, मर्यादा भंग न करता जीवन वंâठत राहणं ईशपरायणता आहे.
रोजाचा उद्देश ईशपरायणतेला वृद्धींगत करणं हा आहे. एकीकडं रोजा ठेवणाNया व्यक्तीला पहाटे ‘सेहरी’ (जेवण) करण्याची कडक ताकीद दिली आहे. ‘सेहरी’ न करता रोजा ठेवणारा अल्लाहची कृपा प्राप्त करू शकत नाही. तसेच रोजा सोडण्याच्या वेळेसंबंधी कडक ताकीद आहे. रोजा सोडण्यात विलंब करणे म्हणजे श्रद्धेत कमतरता करणे होय. ही दोन्ही कृत्यं ईशपरायणता प्राप्त करण्याच्या मार्गातील अडथळे आहेत. अंत:स्पूâर्ती व स्वयंप्रेरणेवर नियंत्रण अशा कृत्यांमुळं होते. त्यामुळं रोजाचा हेतूसुद्धा साध्य होण्यास मदत होते. म्हणूनच रोजाला इस्लामचा आधारस्तंभ म्हणून संबोधलं आहे आणि इस्लामची इमारत या आधारस्तंभाअभावी अपूर्ण राहते, हेदेखील कळून येतं.
रोजामुळं अल्लाहचं प्रभुत्व आणि सार्वभौमत्वाच्या विश्वासाला आणखी बळकटी येते. पहाटे ‘सहेरी’ केली जाते, परंतु जेव्हा उष:काल होतो त्याच क्षणी खाणं-पिणं आणि जीवनातील इतर सुखांचा उपभोग घेण्यापासून मनुष्य दूर राहतो. संपूर्ण दिवसभर त्याला ईशपरायणता यापासून रोखून धरते. सूर्यास्तानंतर लगेचच रोजा सोडल्यानंतर त्याला खाणं-पिणं आणि जीवनानंद उपभोगता येतो.
म्हणून प्रेषित मुहम्मद (स.) यांनी म्हटलं आहे की, ‘‘रमजान महिना संयमाचा महिना आहे तर त्याचा निम्मा संयम रोजा आहे.’’
संयम ही ईशपरायणतेची पहिली पायरी होय. याच ईशपरायणतेच्या प्रगल्भ इच्छाशक्तीनं आपण सर्वांनी पवित्र रमजान महिन्याचं, त्या पवित्र प्रशिक्षणाचं स्वागत केलंय. या प्रशिक्षणाचा लाभ घेत ईद साजरी करून भावी काळात ईशकृपेचा लाभ उठवू या.
(संपर्वâ- ९२२४६३९३७१)

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

17 Aug 2010 - 11:25 am | नितिन थत्ते

पुढच्या वर्षी नॉर्वेमध्ये जाणार्‍या मुस्लिम व्यक्तीने सूर्यास्तानंतर म्हणजे केव्हा जेवण घ्यायचे?

एकूण आरोग्याच्या दृष्टीने रात्री जेवण करणे अहितकारक समजले जाते.

बाकी चालू द्या.

हेहेहे..फारच विनोदी लिहिता तुम्ही.
(ही लेखावरील प्रतिक्रिया आहे, थत्ते यांच्या प्रतिसादावरील नव्हे)

विजुभाऊ's picture

17 Aug 2010 - 12:30 pm | विजुभाऊ

ते नियम वाळवंटी प्रदेशातील लोकांनी वाळवंटी प्रदेशातील लोकांसाठी त्या काळात केलेले आहेत.

अप्पा जोगळेकर's picture

17 Aug 2010 - 1:30 pm | अप्पा जोगळेकर

लवकरच या लेखाच्या चिंधड्या उडवणारी लांबलचक प्रतिक्रिया इथे पोस्ट करुच. आत्ता जरा कामात आहे म्हणून आखडता घेतला आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

17 Aug 2010 - 1:42 pm | परिकथेतील राजकुमार

आत्ता जरा कामात आहे म्हणून आखडता घेतला आहे.

काय हे अप्पा ? असे ऐन कामात असताना आखडता घेणे बरोबर नाही ;)

अनुराग's picture

17 Aug 2010 - 6:16 pm | अनुराग

आप्पा लवकर लिहा.

परिकथेतील राजकुमार's picture

17 Aug 2010 - 1:41 pm | परिकथेतील राजकुमार

अल्लाहची उपासना करणं म्हणजे अल्लाहव्यतिरिक्त इतर तथाकतिथ ईश्वरांना नाकारणं आणि अल्लाहचं एकत्व, एकेश्वरत्व मान्य करणं या दोन्ही मौलिक गोष्टी आहेत.

सर्वात वादग्रस्त वाक्य आणि स्वतःला ज्ञानी म्हणवुन घेणार्‍यांनी ह्या वाक्याचे काढलेले अर्थ तर अजुन वादग्रस्त.

अर्धवट's picture

17 Aug 2010 - 1:46 pm | अर्धवट

मुळ शब्द...

"ला इलाह् इल्लल्लाह्."

नावातकायआहे's picture

17 Aug 2010 - 2:25 pm | नावातकायआहे

तंबाकु , चुना पुडि आनि पार

प्रकाश घाटपांडे's picture

17 Aug 2010 - 2:44 pm | प्रकाश घाटपांडे

करणारे या भावना वा भुमिका समजावुन घेउन मगच असा उपास करतात का?

अल्लाहची उपासना करणं म्हणजे अल्लाहव्यतिरिक्त इतर तथाकतिथ ईश्वरांना नाकारणं आणि अल्लाहचं एकत्व, एकेश्वरत्व मान्य करणं या दोन्ही मौलिक गोष्टी आहेत.

या मुळे इस्लाम मधे मुलतत्ववाद फोफावला. सुदैवाने कुराणाचा कालसुसंगत अर्थ काढणारे काही पुरोगामी मुस्लिम विचारवंत आता येउ लागले आहेत.

कराडकर's picture

17 Aug 2010 - 3:30 pm | कराडकर

चालेल... छान आहे....!

विसुनाना's picture

17 Aug 2010 - 5:13 pm | विसुनाना

ईस्लाम हा पृथ्वीतलावर अवतरलेला सर्वात बांधीव धर्म आहे.
अंतिम ईश्वर (अल्लाह), अंतिम पुस्तक (कुराण), अंतिम प्रेषित(मुहम्मद पैगंबर), अंतिम न्यायपद्धती (शरिया) इ. सार्‍या अंतिम गोष्टी पाहिल्या की जनसमूहास एकत्र बांधून ठेवणार्‍या संकल्पनेचे सर्व पैलू किती बारकाईने विचारात घेतले असतील याचे आश्चर्यमिश्रित कौतुक वाटते. इतर एकेश्वरवादी धर्मांतही इतका काटेकोर विचार केलेला आढळत नाही.

एखाद्या नव्या राष्ट्राची राज्यघटना लिहिणार्‍यांनी या सर्व बाबींचा अभ्यास केल्यास एकसंघ राष्ट्र नक्कीच उभारता येईल.

सर्व मुस्लिम बांधवांना रमजान मासाबद्दल शुभेच्छा आणि आगाऊ ईद-मुबारक!

इन्द्र्राज पवार's picture

17 Aug 2010 - 8:32 pm | इन्द्र्राज पवार

"अल्लाहची उपासना करणं म्हणजे अल्लाहव्यतिरिक्त इतर तथाकतिथ ईश्वरांना नाकारणं आणि अल्लाहचं एकत्व, एकेश्वरत्व मान्य करणं या दोन्ही मौलिक गोष्टी आहेत."

श्री.मगदुम, लेखातील वरील वाक्य तुमच्या 'रोजा' च्या महतीला फार बदनाम करत्येय हे लक्षात घ्या. धर्म आणि धर्माची वचने हा सध्याच्या काळात फार नाजूक विषय बनला असताना जरी एखादी व्यक्ती आपल्या मताशी ठाम असली तरी ते मत व्यक्त करताना भाषेची बांधणी सौम्य असणे फार गरजेचे आहे. तुमच्या मनाला, कुराअनच्या शिकवणीमुळे जी गोष्ट मौलिक वाटली ती तुम्ही शुक्रवारच्या सायंकाळच्या नमाजाच्या वेळी मशिदीत जमलेल्या बांधवाना सांगणे आणि "ग्लोबल" पातळीवरील स्थळावर येऊन (जिथे विविध धर्माचे, विचाराचे, प्रांताचे लोक असतात) सांगणे यात फार फरक आहे. सर्वच संस्थळावरील लोक सहनशील असू शकतील असे नाही, त्यामुळे तुमच्या वरील वाक्याला (जरी ते धर्मग्रंथातील असले तरी) येथील एखाद्या सदस्याकडून जहाल भाषेत प्रत्युत्तर आले तर ते स्वीकारण्याची तुमची मानसिकता वा तयारी असणे फार गरजेचे आहे.

ज्या प्रेषित मुहम्मद (स.) यांचा तुम्ही उल्लेख केला आहे त्या प्रेषितांना असे वैचारिक मतभेद मान्य होते. इतकेच नव्हे की अशा मतभिन्नतेला त्यानी वैध ठरविले होते, त्याची प्रशंसाही केली होती. त्यांच्या मते धर्माधर्मातील असे मतभेद तर या गोष्टीचे लक्षण होते की समाजात विचार व चिंतन, जिज्ञासा व संशोधन आणि बोध या व्यासंगाच्या क्षमता आहेत. असे असले तरी मुद्दाम एखादा कळीचा मुद्दा लेखी स्वरूपात खुल्या मंचावर मांडून अन्य धर्मियांच्या श्रध्दास्थानाला डिवचणे हे (सध्याच्या वातावरणात) सूज्ञपणाचे लक्षण खचीत नव्हे.

हमीद भाईंचा १९७०-७५ च्या काळात असा विश्वास होता की, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आधुनिक शिक्षणाने मुस्लिम समाजाची एक नवी पिढी उदयास आली आहे. त्या समाजात मुलेच नव्हे तर आता मुलीही महाविद्यालयीन शिक्षण घेऊ लागल्या आहेत, त्यामुळे मुस्लिमांच्या विचारसरणीत जरी आता नाही तरी पुढील काळात धर्मापेक्षा विज्ञानविषयक दृष्टीला महत्व प्राप्त होईल.

पण आपली धर्मवचने आणि त्यांचे महत्व सांगण्याची धाटणी पाहिली की असे वाटते की हमीदभाईंना अभिप्रेत असलेला "पुढील काळ" अजून पुढेच आहे.

नितिन थत्ते's picture

17 Aug 2010 - 5:36 pm | नितिन थत्ते

पहिलेच लेखन आणि तेही डायरेक्ट कुराणाचे आणि तेही एका विशिष्ट ईश्वराचे अंतिमत्व सांगणारे !!!!

इंद्रराज यांच्याशी सहमत आहे.

अल्ला हु अकबर (गॉड इज ग्रेट)

अंतिम तत्त्व सांगितले असल्याने लेखक काही चर्चा करतील अशी अपेक्षा करणे चुकीचेच आहे. लेख आल्यापासून आलेल्या प्रतिसादांवर पुन्हा काही भाष्य झालेले नाही.

(टंकनावर मात्र चांगले प्रभुत्व दिसते आहे).

राजेश घासकडवी's picture

18 Aug 2010 - 12:23 am | राजेश घासकडवी

धार्मिक दृष्टिकोनातून सांगितलेली रोजा या महत्त्वाच्या सणाविषयीची चांगली माहिती.

(टंकनावर मात्र चांगले प्रभुत्व दिसते आहे).

हे चोप्य पस्ते वाटतंय. काही विशिष्ट जोडाक्षरं, विशिष्ट पद्धतीने चुकलेली आहेत. उदा 'र्‍या'...

इन्द्र्राज पवार's picture

18 Aug 2010 - 8:36 am | इन्द्र्राज पवार

"हे चोप्य पस्ते वाटतंय."

शुअर. शिवाय लेख समाप्तीनंतर तो भ्रमणध्वनी देण्याचे काहीच प्रयोजन नाही. अशी प्रथा 'आकाशातून बाप बोलतो तुमच्याशी' छाप धर्तीचे बिल्स ख्रिश्चन धर्म प्रसारकांकडून वापरले जात असत. तीत दूरध्वनी क्रमांक असत, एवढ्यासाठी की "अंधारातून बाहेर येण्यासाठी" अधिकचे मौलिक मार्गदर्शक हवे तर फोन करा.

श्री.मगदूम यांनी अद्याप एकाही प्रतिसादावर आपले भाष्य व्यक्त केलेले नाही, ही बाब ठळकपणे ही बाब अधोरेखीत करते की, हा एक धर्म महत्व प्रसारणाचा एक भाग असावा.

असो. शेवटी धर्म कोणताही असो त्याबाबत आपण "नीरक्षीरविवेक" राखला तरी पुरे.

Pain's picture

18 Aug 2010 - 10:20 am | Pain

सहमत

इंद्रराज यांच्याशी सहमत!

सर्व मुस्लिम बांधवांना रमजान मासाबद्दल शुभेच्छा आणि आगाऊ ईद-मुबारक !!!
"अल्लाहची उपासना करणं म्हणजे अल्लाहव्यतिरिक्त इतर तथाकतिथ ईश्वरांना नाकारणं आणि अल्लाहचं एकत्व, एकेश्वरत्व मान्य करणं या दोन्ही मौलिक गोष्टी आहेत."
याच्यात बदल व्ह्यायला हवा...

बाकी मुस्लिम लोकांमधे जी कट्टरता आढळुन येते तिचा हिंदु लोकांमधे मोठ्या प्रमाणात अभाव दिसतो याचे फार वाईट वाटते.

इन्द्र्राज पवार's picture

17 Aug 2010 - 8:53 pm | इन्द्र्राज पवार

"मुस्लिम लोकांमधे जी कट्टरता आढळुन येते तिचा हिंदु लोकांमधे मोठ्या प्रमाणात अभाव दिसतो याचे फार वाईट वाटते."
.... याला मूळ कारण धर्म-शिकवण हीच आहे. 'एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे कर' ही नेमस्तता थेट रामायणापासून चालत आली आहे आणि अगदी आधुनिक काळातील शिक्षणपद्धतीतदेखील याच तत्वज्ञानाचा ऐसपैस पसारा झाला आहे. मुस्लिमांतील धर्म कट्टरतेला त्यांना धर्म प्रसारासाठी तलवारीच्या जोरावर करावा लागलेला संघर्ष कारणीभूत आहे. प्रसार मोहिमेत प्रेषिताची मुले, नातवंडे, जवळचे साथीदार यांचे रक्त जसे वाहिले गेले अगदी तसेच त्याचबरोबर इस्लामला विरोध करणार्‍यांचीही अशीच बेरहमपणे कत्तल करून रक्तांचे पाट वाहिले गेले होते असा इतिहास आहे. हिंदू धर्मात अशी रक्ताची शिकवण त्याज्य मानली गेली आहे. कोणत्याही हिंदू राजाने धर्म प्रसारासाठी आपल्या सैन्याला 'एल्गार हो' अशी आरोळी दिल्याची इतिहासात नोंद नाही. उलटपक्षी धर्माच्या नावाने संपूर्ण जीवनात एक प्रकारची संन्यासपूजेचीच शिकवण आहे, जी आपल्या पूर्वजांनी अंगीकारली होती; आणि पुढे कळतनकळत आपल्यातही उतरली आहे. त्यादृष्टीने या वस्तुस्थितीकडे पाहिल्यास श्री.मदनबाण यांना जी कट्टरता अभिप्रेत आहे ती याच काय पण पुढील पिढीतदेखील येण्याची कोणतीच शक्यता नाही.

नितिन थत्ते's picture

17 Aug 2010 - 9:20 pm | नितिन थत्ते

>>कोणत्याही हिंदू राजाने धर्म प्रसारासाठी आपल्या सैन्याला 'एल्गार हो' अशी आरोळी दिल्याची इतिहासात नोंद नाही. उलटपक्षी धर्माच्या नावाने संपूर्ण जीवनात एक प्रकारची संन्यासपूजेचीच शिकवण आहे, जी आपल्या पूर्वजांनी अंगीकारली होती

आँ. हे काय नवीनच ऐकतोय !!!

असो पण हिंदू धर्माची चर्चा इथे नकोच.

इन्द्र्राज पवार's picture

18 Aug 2010 - 12:10 am | इन्द्र्राज पवार

"पण हिंदू धर्माची चर्चा इथे नकोच."

+ सहमत आहे. खूप काही लिहिता येईल त्या अनुषंगाने, पण पुढे पाहू. मला आवडेल नक्की.

इन्द्रा

Pain's picture

18 Aug 2010 - 8:40 am | Pain

नवीन कुठे ? आग्नेय आशियाचा अपवाद वगळता ( आणि जो लष्करी बळाने झाला नव्हता) पवार यांनी सांगितलेले बरोबरच आहे. धर्मरक्षणासाठी आवाहन केल्याचे प्रसंग आहेत पण आपल्या कुठल्याही राजाच्या सैन्याने कधीही कुठेही धर्मांतरण घडवून आणलेले नाही. इतकेच काय काही तुरळक अपवाद वगळता मूळच्या हिंदू पण बळजबरीने मुस्लिम केलेल्या लोकांनाही परत हिंदू धर्मात घेत नसत.

असो पण हिंदू धर्माची चर्चा इथे नकोच.
सहमत. जर योग्य अस दुसरा धागा असेल तर तिकडे करू.

Pain's picture

18 Aug 2010 - 8:36 am | Pain

प्रसार मोहिमेत प्रेषिताची मुले, नातवंडे, जवळचे साथीदार यांचे रक्त जसे वाहिले गेले अगदी तसेच त्याचबरोबर इस्लामला विरोध करणार्‍यांचीही अशीच बेरहमपणे कत्तल करून रक्तांचे पाट वाहिले गेले होते असा इतिहास आहे

अजून एक -

याबरोबरच ज्यांचा याच्याशी काहीएक संबंध नाही त्या दूरदूरच्या प्रदेशात जाउन तिथल्या लाखो लोकांच्या रक्ताचेही पाट वाहावयाचे, रानटी अत्याचार, बलात्कार, सक्तीचे धर्मांतरण इ. नंगानाच हजारो वर्षे घालायचा हाही यांचा इतिहासच आहे.

कवितानागेश's picture

17 Aug 2010 - 5:44 pm | कवितानागेश

रोजा मनुष्यामध्ये स्वत:ला नियंत्रित करून उत्कट स्वाभाविक इच्छांवर प्रबळ नियंत्रण ठेवतो. .....
रोजा ही दिखाव्यापासून पूर्णत: अलिप्त अशी उपासनापद्धती आहे.

'उत्कट स्वाभाविक इच्छांवर प्रबळ नियंत्रण' म्हणजेच दिखावा असे मला वाटते!
मग नक्की काय करायचे?

वारा's picture

17 Aug 2010 - 5:53 pm | वारा

शिर खुरमा कधी देताय ते सांगा....कमीत कमी त्याची पाकक्रुती तरी टाका....
लै भारी लागती बॉ ही खीर.....
नाव आठवुन तोंडाला पाणी सुटलय्..काजु, पिस्ते , बदाम , मनुका..

SmileyCentral.com

विसुनाना's picture

17 Aug 2010 - 6:00 pm | विसुनाना

तोपर्यंत हलीमचा आस्वाद घ्या. :)

सुनील's picture

17 Aug 2010 - 7:17 pm | सुनील

आमच्या जुन्या धाग्याची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद!

बाकी रमजान म्हटला की आम्हाला दोन गोष्टींची फार्फार आठवण येते. त्यातील एक म्हणजे, रात्रीची महंमद अली रोडची सैर आणि दुसरी ... (जाऊदे...)

रमझान ईद दिवशी श्रावण महिना संपणार काय? म्हणजे त्या दिवशी मला मित्राकडे मांसाहार करता येईल.
मगदुम साहेबांनी मार्गदर्शन करावे.
बाकी वरील लेखात तुम्ही बर्‍याच गोष्टी तुम्ही गीतेतुन कॉपी केल्या आहेत काय?

वारा's picture

17 Aug 2010 - 6:24 pm | वारा

>>तोपर्यंत हलीमचा आस्वाद घ्या.

श्रावणात कसे चालेल हो..विसुनाना..पण श्रावण संपला की लगेच करु. :)

तिमा's picture

17 Aug 2010 - 6:35 pm | तिमा

माणूस सोडला तर कुठलाच प्राणी देव देव करत नाही. तरी देव त्यांच्याकडेही प्रेमानेच पहातो. कुठल्याही प्रकारे देवाला/ईश्वराला खूष करण्याचा प्रकार, हा रांग मोडून पुढे घुसण्याचा प्रकार वाटतो. या पृथ्वीतलावरील सर्व सजीव प्राण्यांकडे देव्/अल्ला/ईश्वर सारख्याच मायेने पहातो आहे. त्याचे मुद्दामहून लक्ष वेधून घेण्याची जरुर नाही.

ऋषिकेश's picture

17 Aug 2010 - 6:46 pm | ऋषिकेश

मिपावर स्वागत.. रमजानच्या शुभेच्छा!

वेताळ's picture

17 Aug 2010 - 6:48 pm | वेताळ

हलिमची पाकृ वाचली . खुपच सुंदर आणी चविष्ट डिश दिसते. मगदुम साहेब तुम्ही ईदच्या दिवशी ही डिश बनवा व आम्हा मिपाकराना आग्रहाचे निमंत्रन द्या. तिथेच वरील विषयावर ऑनलाईन चर्चा करता येईल.

सदर धाग्याला आणि त्यातिल बुरसट विचारसरणीला योग्य त्या जागी मारलेले आहे ;)

सहज's picture

17 Aug 2010 - 7:41 pm | सहज

>अल्लाहची उपासना करणं म्हणजे अल्लाहव्यतिरिक्त इतर तथाकतिथ ईश्वरांना नाकारणं आणि अल्लाहचं एकत्व, एकेश्वरत्व मान्य करणं या दोन्ही मौलिक गोष्टी आहेत.

मक्का येथे प्रेषीत महंमदांच्या काळात अनेक ट्राईब्ज / टोळ्या होत्या. व मक्का शहरात अनेक वेगवेगळ्या पंथ (वेगवेगळे देव मानणार्‍या - पेगनीझम) लोकांची "श्रद्धास्थाने" होती ज्याकरत मक्का शहर हे यात्रा, उरुसाकरता प्रसिद्ध होते.

पैगंबरांच्या काळात तो सर्व अरेबिया प्रदेश युद्ध, लुटालूटी गांजलेला होता (एक झलक - अफगणिस्तान जसे अनेक वॉर लॉर्डस इ आहेत) तर तुम्ही इस्लाम मधे (म्हणजे शांततेच्या पंथात) या, याचा एक नियम म्हणजे तुम्ही इस्लाम धर्माचे असाल तर एका इस्लाम धर्मीयाने दुसर्‍या इस्लाम धर्मीयाला त्रास द्यायचा नाही. (संपत्ती, बायका, पोरे बळकवायची नाही इ ) असा बंधुभाव प्रसार केला व तो तेथील लोकांना पंसद पडत गेला. हळुहळू तो पसरला. इस्लाम हा अब्राहमीक धर्म असल्याने तसेच भौगोलिक दृष्ट्या अरेबिया भागावर कधी ग्रीक, रोमन, पर्शीयन, टर्क, मंगोल सत्तांनी आक्रमण करुन राज्य केले असल्याने त्यांना इतर लोक व त्यांचे देव याची कल्पना नक्की होती. पण कायम गोंधळ व युद्धाच स्थिती असलेल्या त्याप्रदेशात (लोकल इनोव्हेशन ) इस्लाम धर्म आला व पसरला. पैगंबरांनंतर जे तिसरे खलीफा होते त्यांनी इस्लाम धर्माचा प्रसार करायला सैनिकांना बाहेर राज्यात युद्धावर घेउन जायला प्रेरणा देण्याकरता जिहाद, बिलिव्हर-नॉन बिलिव्हर,(realm of peace & realm of war ) त्या करता युद्ध निषिद्ध नाही ह्या कल्पनांना अजुन अधोरेखीत केले. सुरवातीला अगदी एकास तीन ह्या गुणोत्तरात कमी असुन आजुबाजुच्या राज्यांवर इस्लामधर्मियांनी स्वारी केली व जिंकले. ह्यामुळे त्या भागातील अजुन लोकांचा विश्वास बसत गेला की अल्ला असा देव आहे व त्याला मानणार्‍यांचा विजय होतो व त्या पंथातले सगळ्यांना शांतता प्राप्त होते. इस्लाम वाढायचे (पक्षी: इतर धर्म इश्वराचे अस्तित्व नाकारले जाण्याचे) ते अजुन एक कारण होते. सुरवातीला पंथाचे काही नियम (आता तुम्ही इस्लाम धर्मीय झाला तर इतर काही बघायचे नाही, मानायचे नाही) म्हणुन (धर्म टिकावा म्हणुन)उपयुक्त असे हे नियम. ह्या दृष्टीने पहावे. आता त्यातली अन्यधर्मीय कट्टरता का व कशी बघतात हे सगळे वेगळ्या चर्चेचा विषय. आजच्या जगात जसे तुम्ही समजा एका नोकरी करत आहात तर दुसरी नोकरी करायची नाही, नंतर रायव्हल कंपनीत जायचे नाही अशा काही शर्ती तुमच्या करारपत्रात असु शकतात. त्याच भूमीकेतुन मी वर उल्लेख केलेल्या वाक्याकडे बघतो.

पुस्तकाचे नाव आहे "Destiny Disrupted - A History of the world through Islamic eyes" -
Author - Tamim Ansary"

बर्‍याच गोष्टींची उत्तरे मिळतील. कट्टरता व फक्त त्या लिखीत ग्रंथालाच प्रमाण कसे व का मानले गेले यावर चांगले विश्लेषण आहे. इच्छुकांनी नक्की वाचावे असे पुस्तक.

प्रियाली's picture

17 Aug 2010 - 7:33 pm | प्रियाली

येथे आलेल्या नानाविध प्रतिक्रिया शाहजहान मगदुम संयमाने आणि सबुरीने घेतील अशी आशा व्यक्त करते.

>>अल्लाहची उपासना करणं म्हणजे अल्लाहव्यतिरिक्त इतर तथाकतिथ ईश्वरांना नाकारणं..

प्रस्तुत लेखातील सदर वाक्याने माझ्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत असे संपादक मंडळास नम्रपणे सुचवू इच्छितो..

श्री. मगदुम यांना रमजानच्या शुभेच्छा !

हा केवळ प्रतिसादखेचू धागा आहे असं वाटतंय...बाकी त्यातील मजकुराला फाट्यावर मारले आहे..

श्री राम जय राम जय जय राम.

वारा's picture

18 Aug 2010 - 12:58 am | वारा

असे कसे हो हे हळवे लोक, जरा काय झाल की म्हणे भावना दुखावतात...
आमच्या कधी भावना बिवना दुखावत नाहीत...
भलेही तो हुसेन येउदे किंवा आणि कोण येउदे.
आमचे देवही नागडे आम्हीही नागडे.
जन्माला आलो तेव्हाही नागडे...आणि जातानाही नागडेच जाणार..

देह अजस्त्र पहाड । सदा गर्वे बोलणार ।
पण केला त्याने । दक्खनचा चुहा हाती चिरडणार ।
स्वप्न स्वराज्याचे ऐसे । खंडीत होणे नाही ।
देह गर्व सर्व संपले । दक्खनी कबर राही ।

अप्पा जोगळेकर's picture

18 Aug 2010 - 9:55 am | अप्पा जोगळेकर

इंद्रराज पवार, सहज आणि इतर मंडळी यांनी जे प्रतिसाद दिले आहेत त्यानंतर इथे आणखीन काही लिहिण्याची आवश्यकता आहे असं वाटत नाही. तरीदेखील एका गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो.
अल्लाहची उपासना करणं म्हणजे अल्लाहव्यतिरिक्त इतर तथाकतिथ ईश्वरांना नाकारणं आणि अल्लाहचं एकत्व, एकेश्वरत्व मान्य करणं या दोन्ही मौलिक गोष्टी आहेत.
सदर वाक्य हा एका विशिष्ट विचाराचा पूर्वार्ध आहे. त्या विचाराचा उत्तरार्ध लेखकाच्या मनात आहे. आणि तो असा आहे की "म्हणून इतर धर्म जे इतर देवांना भजतात त्या देवांची प्रार्थनास्थळे नष्ट करणे, त्या धर्मीयांना नष्ट करणे, प्रेमाने,बळाने किंवा कपटाने त्यांना अल्लाहची शिकवण देणे यादेखील मौलिक गोष्टी आहेत."
अवांतर -
अर्थात कोणाच्या मनात काय आहे यापेक्षा कोणाच्या बाहूंमध्ये काय आहे यालाच अधिक मह्त्व दिले पाहिजे. गझनीच्या महंमदाने सोमनाथ फोडला तेंव्हा त्याचा हात धरण्यासाठी शंकर अवतरला नाही आणि चेंगीझखानाने मशिदींच्या घोडशाळा बनवल्या तेंव्हा किंवा विहिंपने मशीद जमीनदोस्त केली तेंव्हा त्यांचा हात धरायला अल्लाहसुद्धा अवतरला नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Aug 2010 - 9:57 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

इंटरनेटवर बागडताना सदर चित्र मिळाले.

Pain's picture

18 Aug 2010 - 10:02 am | Pain

तसाच डॅनियल पर्लच्या शिरच्छेदाचा व्हिडीओही इंटरनेटवर उपलब्ध आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Aug 2010 - 10:05 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

काय घ्यायचं आणि काय नाही ही ज्याची इच्छा, विचार नाहीत का?
डॅनियल पर्लला मारणारे आहेत तसे गुजराथेत गरोदर स्त्रीला फक्त मुसलमान आहे म्हणून भोसकणारे कोणी हिंदूही आहेतच.

बाकी चालू द्या. या चित्राची अंमळ गंमत वाटली म्हणून ते डकवलं.

काय घ्यायचं आणि काय नाही ही ज्याची इच्छा, विचार नाहीत का?
डॅनियल पर्लला मारणारे आहेत तसे गुजराथेत गरोदर स्त्रीला फक्त मुसलमान आहे म्हणून भोसकणारे कोणी हिंदूही आहेतच.

तो पर्याय इथेतरी नाहीये. वस्तुस्थिती, उदा. आकडे बोलतात.
आजपर्यंत स्वत: च्याच देशात परकीय मुस्लिमांकडून मारले गेलेले, अत्याचारित हिंदू आणि हिंदूंकडून मारले गेलेले मुस्लिम यात कोणता आकडा दुसर्‍यापेक्षा शेकडो पटीने मोठा आहे ?

बाकी चालू द्या. या चित्राची अंमळ गंमत वाटली म्हणून ते डकवलं.
इतक साधसोप वाटत नाही. इतर बाबतीत गंमत, मस्करी ठीक आहे पण या धाग्यावर मात्र हे चित्र बेगडी धर्मनिरपे़क्षतावादी* किंवा ते लोक कसा चांगले आहेत असा खोटाच प्रचार करणार वाटत.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Aug 2010 - 10:20 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

या धाग्यावर मात्र हे चित्र बेगडी धर्मनिरपे़क्षतावादी* किंवा ते लोक कसा चांगले आहेत असा खोटाच प्रचार करणार वाटत.

हा तुमचा विचार झाला! आणि तो तुम्ही माझ्यावर लादू शकत नाहीत.

हे चित्रं कुठेही पाहिलं तरी माझ्या डोक्यात हाच विचार येईल (/आला) धर्म ही ओळख बाजूला पडली आणि देशाची ओळख वरचढ ठरली.

मी तुमच्यावर कुठलाही विचार लादत नाहीये. तुम्ही तुम्हाला काय वाटले ते सांगितले आणि मीही.

धर्म ही ओळख बाजूला पडली आणि देशाची ओळख वरचढ ठरली.
हे नक्कीच आदर्श आहे (जर सगळ्यांनाच तसे वाटले तर)

नितिन थत्ते's picture

18 Aug 2010 - 10:35 am | नितिन थत्ते

>>आजपर्यंत स्वत: च्याच देशात परकीय मुस्लिमांकडून मारले गेलेले, अत्याचारित हिंदू आणि हिंदूंकडून मारले गेलेले मुस्लिम यात कोणता आकडा दुसर्‍यापेक्षा शेकडो पटीने मोठा आहे ?

या धाग्यावर हिंदूंविषयक चर्चा करायची नाही असे माझे ठरले आहे.

फॅन्सी ड्रेस खुप आवडले.
मुलाबरोबर असणार्‍या स्त्रीने देखिल एकदम वास्तव फॅन्सी ड्रेस घातला आहे.
पण इथे ह्या चित्राचे प्रयोजन समजले नाही.फॅन्सी ड्रेसेसचा व शाहजहान मगदुम ह्याचा काय संबध आहे काय?

अरुण मनोहर's picture

18 Aug 2010 - 10:02 am | अरुण मनोहर

"अल्लाहची उपासना करणं म्हणजे अल्लाहव्यतिरिक्त इतर तथाकतिथ ईश्वरांना नाकारणं आणि अल्लाहचं एकत्व, एकेश्वरत्व मान्य करणं या दोन्ही मौलिक गोष्टी आहेत."

हा लेख रमजान महिन्यातील रोजांविषयी माहिती देण्या साठी आहे. परंतू वरील वाक्य कारण नसतांना घालून, लेखकाने खोडसाळपणा केला अहे असे वाटते. इतर मुस्लीम बंधुंना अन्य धर्मियांविषयी असहिष्णुता शिकवण्यासाठी हे वाक्य आहे.
निधर्मी राष्ट्रा मधे एकमेकांनी एकमेकांच्या इश्वराचा आणि श्रद्धेचा आदर करायचा, की त्यांचे अस्तित्वच नाकारायला शिकवायचे?

मिपा सारख्या जबाबदार संस्थळाने असा खोडसाळ प्रचार कां चालू द्यावा?
त्या वाक्याचा लेखाच्या मूळ उद्देशा बरोबर काही संबंध नाही. ते वाक्य काढले तर लेख रोजा ची महती पटवण्या साठी आहे असे होईल. कदाचित चालू शकेल. त्या वाक्यामुळे उद्देशावर शंका येते.

Pain's picture

18 Aug 2010 - 10:08 am | Pain

त्या वाक्याचा लेखाच्या मूळ उद्देशा बरोबर काही संबंध नाही.

संबंध नाही कसा? हे तर हजारो वर्षे भारतात घडत आले आहे. हे २०१० मधील संकेतस्थळ आहे म्हणून लेख लिहिलाय. स्थळकाळ थोडा वेगळा म्हणजे इ.स. ८०० ते १८०० मधल्या कोणत्याही काळातील भारतात हेच तलवारीच्या धाकावर तुमच्या गळी उतरवले गेले असते.

अरुण मनोहर's picture

18 Aug 2010 - 10:13 am | अरुण मनोहर

लेखाचा उद्देश रोजाची महती पटवणे हा असावा असा आभास निर्माण केला अहे. मग तो आभास राहू द्या की. आणखी खोडसाळपणा कशाला?

नंदू's picture

18 Aug 2010 - 10:15 am | नंदू

श्री इंद्रराज पवार आणि मनोहररावांशी पूर्णपणे सहमत. दुसरी नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे सदर लेखकाने लेखाच्या शेवटी दिलेला स्वतःचा फोन नंबर. मलातरी यात छुपा (प्रचारकी) अजेंडा दिसतो.

वादग्रस्त विधान वगळून हा लेख पुनऱप्रकशित करावा असं वाटतं.

संपादक मंडळाकडून खुलाशाच्या अपेक्षेत.

नंदू

एवढेच पुरेसे नाही. हा लेख आणि अशा प्रकारच्या सर्व गोष्टींना इथे थारा दिला जाउ नये.

हा लेख अस्सच्या अस्सा कुठेतरी वाचल्याचे स्मरते ..बहुधा लोकमत मध्ये ...पण रमजान दरम्यानच !! ते आपणच का ?

असो जेव्हा ईतक लिहीताय तर सकाळ्ची पहिली अजान आणी बाकी अजान मधला फरक सांगा बर !!

श्री इंद्रराज पवार यांच्याशी पूर्णपणे सहमत,
>> अल्लाहची उपासना करणं म्हणजे अल्लाहव्यतिरिक्त इतर तथाकतिथ ईश्वरांना नाकारणं आणि अल्लाहचं एकत्व, एकेश्वरत्व मान्य करणं या दोन्ही मौलिक गोष्टी आहेत
मूळ लेखात काही विधाने आक्षेपार्ह केल्यामुळे माझ्या आणि माझ्या बर्याच मित्रांच्या भावनांस ठेच पोहोचली आहे.

प्रिय शाहजहान मगदुम साहेब ,
इतका वेळ तोंड बंद ठेऊन गप्प होतो याचा असा अर्थ असा समजू नये कि आम्हाला बोलता येत नाही.

संपादक साहेबांना नम्र विनंती,
त्यांनी लवकरात लवकर आक्षेपार्ह विधाने वगळून लेख पुन्हा प्रकाशित करावा.

अन्यथा शाहजहान मगदुम यांनी एक अतिजहाल प्रतिक्रियेसाठी तयार राहणे आणि पुढे चालू होणार्या हिंदू मुसलमान आंतरजालीय लढ्यास आम्ही/मी जबाबदार नसेन ह्याची प्रखर दाखल घ्यावी.

वेताळ's picture

18 Aug 2010 - 11:39 am | वेताळ

एका गांधीवाद्याला जहाल होताना पाहिल्यामुळे मन अगदी विषण्ण झाले.

Pain's picture

18 Aug 2010 - 11:41 am | Pain

:D

इन्द्र्राज पवार's picture

18 Aug 2010 - 11:09 am | इन्द्र्राज पवार

"आणखी खोडसाळपणा कशाला?"

कोणतीही नदी ही मुखापाशी स्वच्छ, नीतळ अशीच असते, पण नंतर तिला प्रवाहाचे रूप आल्यानंतर विविध प्रकारच्या "खोडसाळ" पणामुळे मूळचे निर्मळ रूप जावून जो "ताकदवान" घटक असेल तसे तो आपल्या बळावर तिला दिशा देत असतो तद्वतच श्री.मगदूम (ज्यांनी अद्यापि प्रतिसादावर भाष्य दिलेले नाहीत) यांचा हेतू रोजाची महती पटवणे असला तरी पडद्याआडून त्यांनी इतर धर्मापेक्षा "मुस्लिम"च आगळावेगळा (म्हणून "अल्ला"ला प्रिय) आहे हीच थाळी वाजवली आहे.

"कुरआन" च्या मूळ प्रतीवर वेळोवेळी (हवा बदलेल त्यानुसार) भाष्यकार आणि अनुवादक यानी आपल्या मताची पुटे चढविली असल्याने ज्यावेळी "त्या" वाक्यातील भाष्य हे एखाद्या कट्टर धर्ममार्तंडाच्या सुपीक डोक्यातूनदेखील पैदा होत असते त्यावेळी उत्तरादाखल अन्य धर्मीयांनी त्याचे खंडन करणे म्हणजे मूळ ग्रंथावर टीका करणे नसून अशा प्रवृतीला आवर घालणे होय.

इस्लाममध्ये "सजदा" या कृतीला फार महत्व आहे असे ते मानतात. "सजदा" चा मूळ अर्थ "झुकणे" असा आहे. पण त्यांच्या भाष्यकारांनी "आदरार्थी स्वरूपात हात, गुडघे आणि कपाळ जमिनीवर टेकणे" असा सोयिस्कर अर्थ घेतला आणि त्याची अंमलबजावणी मौलवी, बादशहा, पातशहा, जमिनदार यांच्याशी व्यवहार करताना जनतेने केली पाहिजे असा (लिखाणातून) हुकूमनामा बजावला. (आखाती देशात, जिथे आजही राजेशाही चालू आहे, तिथे "सजदा-ए-ताजीमी" कार्यरत आहे.). मूळ कुरआनात तर "अनिष्टापासून वाचविण्यासाठी अल्लाहसमोर उपासनात्मक सजदा करणे" असे म्हटले आहे, इतकेच नव्हे तर "ईश्वराशिवाय इतरांना केलेले सजदे हराम ठरविले गेले आहेत."

पण आता पेट्रोडॉलर्सच्या गुर्मीवर धर्मगुरूना नाचविणार्‍यानी इस्लामी परिभाषेच्या संकल्पना बदलण्याचे ठरविले असल्याने श्री.मगदूम यांच्यासारख्यांनी धर्मवचनाला त्या हवेनुसार झुकविले, असेच म्हणावे लागेल.

इन्द्रा

राजेश घासकडवी's picture

18 Aug 2010 - 12:59 pm | राजेश घासकडवी

एखाद्या धर्मातल्या विशिष्ट उपासनापद्धती विषयी लेख लिहिला तर त्यात उपासना का महत्त्वाची, व उपासकांचे व त्या धर्मग्रंथातले अंतिम शक्तीविषयी विचार काय आहेत, हे येणारच. जर क्ष धर्माच्या धर्मग्रंथात लिहिलं असेल की क्ष धर्मच सर्वश्रेष्ठ, तर ते मत, ('त्या ग्रंथात तसं लिहिलं आहे' हे सत्य विधान) यायला काय हरकत आहे? यात आक्षेपार्ह काय आहे?

जर कोणी मॉर्गनने किंवा मेघवेड्याने सचिन तेंडुलकर सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे असं म्हटलं तर ते त्यांचं मत म्हणून मान्य करायला काय हरकत आहे? ते कोणावर लादलेलं नाही. जर कोणी लिहिलं की 'ब्रॅडमन म्हणाला सचिन सर्वश्रेष्ठ' तर ते आणखीनच पत्रकारितेच्या जवळ जातं.

असं जर झालं तर अनेक विचार, मतं मिपावर मांडलीच जाऊ शकणार नाहीत.

'खानाचा कोथळा काढा' अशी विधानं मिपावर चालतात, पण 'अल्लाह एकमेव व सर्वश्रेष्ठ आहे असं मुसलमान मानतात' हे आक्षेपार्ह वाटतं?

काय चाललंय हे?

llपुण्याचे पेशवेll's picture

18 Aug 2010 - 1:05 pm | llपुण्याचे पेशवेll

का हो. सगळ्या धाग्यांवर बाजूने , विरोधी प्रतिक्रिया येणारच ना? मग इथेही आल्या तर काय वाईट आहे?

धर्म जात पात इ. बद्द्ल अ/ब्/क श्रेष्ठ/सर्वोत्तम/उच्च/नीच्च आहे अशी कुणाचीच मते इथे येउ नयेत असे आमचे मत आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

18 Aug 2010 - 1:14 pm | llपुण्याचे पेशवेll

बरं बरं इतरत्र त्याची खिल्ली कोणी उडवली तर चालते.

आम्हीच खिल्ली उडवतो हो.

मुद्दा असा आहे की, अशी हास्यास्पद विधानेच (धाग्यात) येउ नये असे आमचे मत आहे(मग कुठल्याही बाजुने असोत. (खिल्ली मात्र उडवायला अजिबात हरकत नाही, उलट त्याशिवाय काय करावे असाच प्रश्न अशा धाग्यांवर पडतो.)

राजेश घासकडवी's picture

18 Aug 2010 - 1:36 pm | राजेश घासकडवी

@ पुपे - तुमची जशी 'काहो' म्हणणारी प्रतिक्रिया आहे, तशीच माझी पण समजा...

धर्म जात पात इ. बद्द्ल अ/ब्/क श्रेष्ठ/सर्वोत्तम/उच्च/नीच्च आहे अशी कुणाचीच मते इथे येउ नयेत असे आमचे मत आहे.

नाईल, तुम्ही इथे सेक्युलारिझमचा अतिकठोर अर्थ लावता आहात असं वाटतं. एखाद्या धर्माच्या लोकांना आमची उपासनापद्धती योग्य आहे, ती सर्वश्रेष्ठ आहे, म्हणून आम्ही ती पद्धत वापरतो असं म्हणण्याचा अधिकार आहे. जोपर्यंत त्यांचं म्हणणं ते इतरांवर लादत नाहीत, किंवा ते लादण्यासाठी इतरांना आवाहन करत नाहीत तोपर्यंत ते जाहीर करण्याचा देखील अधिकार आहे. ते मत चुकीचं आहे म्हणून खंडन करणं वेगळं आणि ते विधान नष्ट करण्याचं आवाहन करणं वेगळं.

मुसलमानांचा नायनाट झाला पाहिजे या विधानाला नुकताच इथे अनेकांनी दुजोरा दिला. कोथळा काढण्याची विधानं आली आणि गेली. पण अल्ला सर्वश्रेष्ठ आहे व एकमेवाद्वितीय आहे या विधानावर इतकी राळ उडते. हे योग्य संतुलन आहे का? याला सेक्युलरिझम म्हणावं का?

Nile's picture

18 Aug 2010 - 2:20 pm | Nile

नाईल, तुम्ही इथे सेक्युलारिझमचा अतिकठोर अर्थ लावता आहात असं वाटतं. एखाद्या धर्माच्या लोकांना आमची उपासनापद्धती योग्य आहे, ती सर्वश्रेष्ठ आहे, म्हणून आम्ही ती पद्धत वापरतो असं म्हणण्याचा अधिकार आहे.

धर्म जात पात ह्या गोष्टी हद्दपार व्हायला हव्यात अशी इच्छा असल्याने माझे मत वर लिहल्या प्रमाणे आहे. आजही जर कुणी अश्या बाबींवर उच्च निच्चता ठरवत असेल तर ते हास्यास्पद आहे. संस्थंळांनी याबाबत पुरोगामी राहुन अशा विचारसरणीला प्रोत्साहन देउ नये असे थोडेसे आज कठोर वाटले तरी स्पष्ट असे माझे मत आहे.

त्याशिवाय, समाजात चार लोकांशी बोलताना मी माझ्या धर्मातील्/जातीतील(इत्यादी, 'अ/क्ष')(मी काही मानत नसलो तरी) प्रथा समोरच्याच्या धर्मा/जातीतील प्रथांपेक्षा थोर आहेत असे सहसा बोलायचे टाळतो. त्याउलट समोरचा आणी मी दोन्ही एकाच 'अ/क्ष' चे असु तर मात्र असे विचार व्यक्त करताना मोकळेपणा असतो. (समोरचा जर समजुतदार असेल तर मात्र अजातीय्/धर्मीय असताना ही चर्चा करतो, पण हे अनुभवाने). ह्या कारणानेही सोशल फोरम्स वरती माझा धर्म सर्वात श्रेष्ठ आहे असे मत मांडले जाउ नये असे वाटते.
(आमचा देव श्रेष्ठ हे विधान माझ्यासाठी प्रक्षोभक नसले तरी अनेकांसाठी आहे, म्हणुनही सोशल फोरमवर असे वाक्य नसावे.)

वरील मुद्द्यांना काही अपवाद आहेत, पण त्यावेळी त्यावर सांगोपांग चर्चा व्हावी, सर्वश्रेष्ठ का आहे याची तर्कसंगत (दुसर्‍याला चुक का वाटेनात) पुष्टी वगैरे द्यावी मग ठीक. पण क्ष पुराणात आम्हीच सर्वात श्रेष्ठ आहोत अश्या विधानांना विरोध असेल. (इतर अंधश्रद्धांना जसा विरोध असतो त्याप्रमाणेच हा विरोध आहे)

राहिला प्रश्न संतुलनाचा तर ते नाहीच हे मान्य आहे. समाजात मुर्ख जास्तच हे ही मान्य आहे,(मिपावर मुद्दाम धिंगाणा करण्यासाठी डुप्लीकेट आयडीतुन खानाचा कोथळा काढा म्हणणारेही आहेत हे ही कृपया ध्यानात घ्यावे) अश्या मुर्खांबद्दल काय बोलावे?

राजेश घासकडवी's picture

18 Aug 2010 - 3:02 pm | राजेश घासकडवी

आमचा देव श्रेष्ठ हे विधान माझ्यासाठी प्रक्षोभक नसले तरी अनेकांसाठी आहे

तसं अनेक देशांत स्त्रियांनी चेहेरा किंवा केस दाखवणं हे तिथल्या अनेकांसाठी प्रक्षोभक आहे. म्हणून त्यावर बंदी योग्य का?

त्याशिवाय, समाजात चार लोकांशी बोलताना मी माझ्या धर्मातील्/जातीतील(इत्यादी, 'अ/क्ष')(मी काही मानत नसलो तरी) प्रथा समोरच्याच्या धर्मा/जातीतील प्रथांपेक्षा थोर आहेत असे सहसा बोलायचे टाळतो.

तुम्ही याबाबतीत संयम पाळता हा शिष्टाचार झाला, तुमचा चांगूलपणा झाला. त्यात एकंदरीत तुमच्या आयडेंटीटीमध्ये धार्मिक संस्थांना फार स्थान नाही. त्यामुळेही ती वेळ येत नसेल. पण म्हणून तुम्ही जाहीर फोरममध्ये तो विचार मांडूच नये असं बंधन नाही. तसं असतं तर अनेक धर्मग्रंथ छापायलाच बंदी घालावी लागेल.—

"As the different streams having their sources in different places all mingle their water in the sea, so, O Lord, the different paths which men take, through different tendencies, various though they appear, crooked or straight, all lead to Thee!" and "Whosoever comes to Me, through whatsoever form, I reach him; all men are struggling through paths that in the end lead to Me."

हे स्वामी विवेकानंदांनी सर्व धर्म परिषदेत म्हटलं होतं. यात कोणीतरी हिंदू देव हा एकमेव व अंतिम, सर्वश्रेष्ठ देव आहे असं म्हटलेलं नाही का?

सर्वश्रेष्ठ का आहे याची तर्कसंगत (दुसर्‍याला चुक का वाटेनात) पुष्टी वगैरे द्यावी मग ठीक.

हे होणं आदर्शच. पण 'माझा विश्वास आहे, प्रत्यक्ष देवाने अमुक तमुक प्रेषिताला सांगितलं, त्याने इतरांना सांगितलं (व ते खरं आहे हाही माझा विश्वास आहे)' ही कारणं धार्मिक दृष्टिकोन बाळगणाऱ्यांसाठी पुरेशी होतात. केवळ तर्ककठोरच राहायचं असेल तर धर्म या विषयावर चर्चा होणं कठीण आहे. 'क्ष विधानावर अमुकतमुक लोकांचा विश्वास आहे' असं म्हटल्याने ते खरं थोडंच होतं? असं म्हणण्यालाच विरोध करणं हे जेम्स लेन प्रकरणासारखंच झालं नाही का?

llपुण्याचे पेशवेll's picture

18 Aug 2010 - 3:12 pm | llपुण्याचे पेशवेll

तसं अनेक देशांत स्त्रियांनी चेहेरा किंवा केस दाखवणं हे तिथल्या अनेकांसाठी प्रक्षोभक आहे. म्हणून त्यावर बंदी योग्य का?
त्या देशात ते सर्वमान्य असेल तर त्यावर बंदी योग्य का अयोग्य हे तुम्ही आम्ही कसे ठरवायचे. आपण आपल्या देशाबद्दल बोलू शकतो. आपल्या देशात तसे करायला लावणे हे अयोग्यच आहे.

यात कोणीतरी हिंदू देव हा एकमेव व अंतिम, सर्वश्रेष्ठ देव आहे असं म्हटलेलं नाही का?

असं कुठं दिसलं नाही त्यात. ते देवाबद्दल सांगताहेत असे वाटते. हिंदू देवाबद्दल नाही.

राजेश घासकडवी's picture

18 Aug 2010 - 3:33 pm | राजेश घासकडवी

असं कुठं दिसलं नाही त्यात. ते देवाबद्दल सांगताहेत असे वाटते. हिंदू देवाबद्दल नाही.

अरे वा, तसं असलं तर 'आपण ज्याला मराठीमध्ये देव म्हणतो, त्याला काही भाषांमध्ये अल्ला असं म्हणतात' एवढं साधं मान्य केलं, की प्रश्नच मिटतो.
'अल्ला तेरो नाम, ईश्वर तेरो नाम
सबको सन्मती दे भगवान'

शेवटी सन्मती असली की झालं. आता तुम्ही म्हणाल की, 'पण त्यांना नाही ना, म्हणून आम्ही आमची सन्मती सोडतो', तर आपण व ते वेगळे नाही हे लक्षात ठेवणं हीच सन्मती. विवेकानंददेखील बंधु आणि भगिनी म्हणाले होते हे आठवा.

He greeted the youngest of the nations in the name of "the most ancient order of monks in the world, the Vedic order of sannyasins, a religion which has taught the world both tolerance and universal acceptance."[77] And he quoted two illustrative passages in this relation, from the Bhagavad Gita—"As the different streams having their sources in different places all mingle their water in the sea, so, O Lord, the different paths which men take, through different tendencies, various though they appear, crooked or straight, all lead to Thee!" and "Whosoever comes to Me, through whatsoever form, I reach him; all men are struggling through paths that in the end lead to Me."[77] ....

ते हिंदू देवाविषयीच (किंवा हिंदूंच्या देव या कल्पनेविषयीच) बोलत होते.

llपुण्याचे पेशवेll's picture

18 Aug 2010 - 4:30 pm | llपुण्याचे पेशवेll

अरे वा, तसं असलं तर 'आपण ज्याला मराठीमध्ये देव म्हणतो, त्याला काही भाषांमध्ये अल्ला असं म्हणतात' एवढं साधं मान्य केलं, की प्रश्नच मिटतो.

नाही इस्लामिक कॉन्टेक्स्ट मधे त्याला देव म्हणत नाहीत. इस्लाममधे सांगितलेला देवच म्हणजे 'अल्ला'च देव असतो आणि तो सोडून मूर्तीपूजेत पूजले जाणारे देव खोटे असतात म्हणून ते फोडायचे असतात. त्यावरूनच पुढे गाझी, बुतशिकन अशा पदव्या दिल्या जात असतात.

आता तुम्ही म्हणाल की, 'पण त्यांना नाही ना, म्हणून आम्ही आमची सन्मती सोडतो', तर आपण व ते वेगळे नाही हे लक्षात ठेवणं हीच सन्मती. विवेकानंददेखील बंधु आणि भगिनी म्हणाले होते हे आठवा.
हो आम्ही पण त्यांना बांधव म्हणू. मग जेव्हा सख्ख्या भावांमधे प्रॉपर्टी वगैरे वादातून कज्जे खटले होत असतात झालंच तर मारामार्‍या खूनही होतात (म्हणजे आम्ही करू असे नाही). पण मग ह्या बांधवानांही त्यांच्या असल्या आगळीकीबद्द्ल शिक्षा देऊ. कमीतकमी खरमरीत निषेध तर नक्कीच करू.

ते हिंदू देवाविषयीच (किंवा हिंदूंच्या देव या कल्पनेविषयीच) बोलत होते.

हो पण ते त्या वेळेला इतरांच्या देवांना 'तथाकथित' म्हणून नाकारत नव्हते हे ही लक्षात घेतले पाहीजे. वरील लेखात नेमके याच्या विरुद्ध केले गेले आहे.
बाकी, सेक्युलर सिद्ध करण्यासाठी शब्दांचे बुडबुडे कितीही काढता येतील.

राजेश घासकडवी's picture

18 Aug 2010 - 4:48 pm | राजेश घासकडवी

हो आम्ही पण त्यांना बांधव म्हणू.

see, was that so difficult? चला, आजच्यापुरतं एवढं यश मला रगड.

बाकी मूर्तीपूजन व देव ही संकल्पना या वेगळ्या गोष्टी आहेत हे सांगत बसत नाही...

llपुण्याचे पेशवेll's picture

18 Aug 2010 - 5:59 pm | llपुण्याचे पेशवेll

see, was that so difficult? चला, आजच्यापुरतं एवढं यश मला रगड.

यश ??? कसलं बॉ?
आणि त्याच न्यायानी सर्व गुन्हे करणारे गुन्हेगार, चोर हेही आमचे बांधवच आहेत असे आम्ही मानतो. फक्त ते फाशी देण्याच्या लायकीचे आहेत असे मानतो. कारण भगवत गीतेत श्रीकृष्णाने कायम धर्माची बाजू घ्यायला सांगितली आहे. अधर्माच्या बाजूने आपले बांधव जरी उभे असतील तरी त्यांच्याशी युद्ध करा अशी भगवंताची आज्ञा आहे. 'तस्मात उत्तिष्ठ कौन्तेय युधस्य कॄतनिश्चयः'

बाकी मूर्तीपूजन व देव ही संकल्पना या वेगळ्या गोष्टी आहेत हे सांगत बसत नाही...

स्वामी विवेकानंदांनीच म्हटल्यानुसार 'जेव्हा आम्ही मूर्तीची पूजा देव म्हणून करतो तेव्हा तो देव तिथे असतो' . त्यामुळे माझ्यापुरत्या त्या वेगळ्या नाहीत असे म्हणतो.

तसं अनेक देशांत स्त्रियांनी चेहेरा किंवा केस दाखवणं हे तिथल्या अनेकांसाठी प्रक्षोभक आहे. म्हणून त्यावर बंदी योग्य का?

थोडासा(की बराच?) फरक आहे असे वाटते.

अनेक देव-जाती-धर्म एकत्र नांदत असताना (प्रत्येकाने) माझाच देव सर्वश्रेष्ठ अशी भुमिका ठेवल्याने एकत्र नांदण्यालाच अडथळा होतो. आता सदर समाजच जर एकत्र राहण्यात अडचण होत असेल तर अशी कारणे निर्माण होउ नयेत असे वाटले तर फार काय चुकले? (अर्थात, देव धर्म वगैरे थोतांड आहेत हे माहित असताना)

स्त्रीयांनी चेहरा दाखवल्याने कोण कसा प्रक्षोभित होईल माहित नाही, मात्र कुठल्या समाजात जर तसे खरेच होत असेल आणि त्यामुळे समाजाच्या अस्तित्वालाच धोका असेल तर स्त्रियांना चेहरा इ. झाकण्याच नियम समाजाने केला तर समजु शकतो.

हे स्वामी विवेकानंदांनी सर्व धर्म परिषदेत म्हटलं होतं. यात कोणीतरी हिंदू देव हा एकमेव व अंतिम, सर्वश्रेष्ठ देव आहे असं म्हटलेलं नाही का?

म्हणुनच सर्वात पहिला प्रतिसाद तसा लिहला. (मला कळले, पण इतके अवघड लिहलेत तर मात्र अनेकांना समजावयाचे नाही. :-) )

'क्ष विधानावर अमुकतमुक लोकांचा विश्वास आहे' असं म्हटल्याने ते खरं थोडंच होतं? असं म्हणण्यालाच विरोध करणं हे जेम्स लेन प्रकरणासारखंच झालं नाही का?

:-)

हे ज्यांकरता आहे ते उत्तर देतील अशी आशा करुयात, नवीन धोरणात मी द्यायचे म्हणले तर उत्तर बसेल की नाही कुणास ठावुक, पण पुन्हा तुमचे म्हणणे कळालेच नाही तर? ;-)

Pain's picture

18 Aug 2010 - 3:01 pm | Pain

मुसलमानांचा नायनाट झाला पाहिजे या विधानाला नुकताच इथे अनेकांनी दुजोरा दिला
असे किंवा अशा अर्थाचे एकही विधान या धाग्यावर नाही (तुमचा प्रतिसाद वगळता).

कोथळा काढण्याची विधानं आली आणि गेली. (तीही तुमच्याच प्रतिसादात)

आता तुमच्या प्रतिसादात जी वाक्ये येतात त्याबद्दल आम्हाला का जबाबदार ठरवता ?

पण अल्ला सर्वश्रेष्ठ आहे व एकमेवाद्वितीय आहे या विधानावर इतकी राळ उडते.
हे विधान तुम्ही फारच सौम्य बनवले आहे, संदर्भ द्यायचा असल्यास ते जसे आहे तसे द्या.
आणि का उडू नये ? गेल्या हजार वर्षांचा इतिहास पाहता अशी छुपी धमकी दिली तर राग येणारच.

हे योग्य संतुलन आहे का? याला सेक्युलरिझम म्हणावं का?

त्यांचा धर्म स्वीकारा अथवा मरा अशी धमकी देणे आणि ती हजारो वर्षे खरी करून दाखवणे याला काय म्हणतात हो ?

परिकथेतील राजकुमार's picture

18 Aug 2010 - 2:15 pm | परिकथेतील राजकुमार

जर कोणी मॉर्गनने किंवा मेघवेड्याने सचिन तेंडुलकर सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे असं म्हटलं तर ते त्यांचं मत म्हणून मान्य करायला काय हरकत आहे? ते कोणावर लादलेलं नाही. जर कोणी लिहिलं की 'ब्रॅडमन म्हणाला सचिन सर्वश्रेष्ठ' तर ते आणखीनच पत्रकारितेच्या जवळ जातं.

मत मान्य करायला काहीच हरकत नाही हो, कारण आणि मॉर्गन आणि मेवे सचिन श्रेष्ठ आहे असे नुसते लिहुनच मोकळे होतात. तो श्रेष्ठ नाही म्हणणार्‍यांचे गळे कापायला आणि घरदार जाळायला ते जात नाहीत :) हा सगळ्यात मोठा फरक आहे.

असो...

राजेश घासकडवी's picture

18 Aug 2010 - 2:39 pm | राजेश घासकडवी

तो श्रेष्ठ नाही म्हणणार्‍यांचे गळे कापायला आणि घरदार जाळायला ते जात नाहीत हा सगळ्यात मोठा फरक आहे.

राव तुम्ही अतिशयोक्ती अलंकार वापरून वापरून झिजवणार बघा. ८७ साली दिल्ली स्टेशनासमोर 'हम है हिंदू साठ करोड, हड्डी पसली देंगे तोड' अशी सहा फुटी अक्षरांची पाटी लागलेली होती. 'संयम व सबुरीचा महिना रमजान' असल्या मिपावरच्या धाग्यात अल्ला सर्वश्रेष्ठ व एकमेवाद्वितीय आहे असं म्हटल्याबरोबर गळे कापले जाण्याची भीती वाटते तुम्हाला... फारच तुम्ही सेन्सिटीव्ह बॉ.

परिकथेतील राजकुमार's picture

18 Aug 2010 - 2:43 pm | परिकथेतील राजकुमार

८७ साली दिल्ली स्टेशनासमोर 'हम है हिंदू साठ करोड, हड्डी पसली देंगे तोड' अशी सहा फुटी अक्षरांची पाटी लागलेली होती.

१६८९ मध्ये इस्लाम स्विकारला नाही म्हणुन संभाजी महाराजांची निर्घॄण हत्या झाली होती.

राजेश घासकडवी's picture

18 Aug 2010 - 3:10 pm | राजेश घासकडवी

आय रेस्ट माय केस.

इन्द्र्राज पवार's picture

18 Aug 2010 - 3:15 pm | इन्द्र्राज पवार

श्री.राजेश घासकडवी (ज्यांचे लिखाण मी कायम आत्मियतेने वाचत असतो) यांच्या प्रतिक्रियेमधील काही वाक्ये ही सर्वसमावेशक असल्याने वैयक्तिकरित्या त्यातील काहीचे खंडन प्रथम करणे मला निकडीचे वाटते.

१. जर क्ष धर्माच्या धर्मग्रंथात लिहिलं असेल की क्ष धर्मच सर्वश्रेष्ठ, तर ते मत, ('त्या ग्रंथात तसं लिहिलं आहे' हे सत्य विधान) यायला काय हरकत आहे? यात आक्षेपार्ह काय आहे?

आक्षेपार्ह काही नाही; पण याचा अर्थ असा नाही ते मत मांडताना भाषेचा संयम सोडावा. त्यातही विशेषतः ज्यावेळी लेखाचे शीर्षकच मुळी "संयम आणि सबुरी" याचे महत्व सांगणारा आहे. "अल्लाहव्यतिरिक्त इतर तथाकतिथ ईश्वरांना नाकारणं आणि अल्लाहचं एकत्व, एकेश्वरत्व मान्य करणं या दोन्ही मौलिक गोष्टी आहेत" ~~ 'रोजा'चे महत्व विशद करताना इतर ईश्वरांना नाकारा असे लिहिताना ज्या "तथाकथित" शब्दाचे प्रयोजन करण्यात आले आहे ते माझ्या हिंदू मनाला अपमानस्पद वाटले तर तसे प्रतिसादात (भाषेचा तोल न ढासळता) दिले तर आक्षेपार्ह मानले जाईल का?

२. कुठले वाक्य चालते, कुठले नाही या विषयावर इथे वारंवार मंथन झाले आहे आणि संपादक मंडळानेदेखील त्याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे, करीत आहेत. पण तुम्हाला व मला जे शब्द, वाक्य वा विधान आक्षेपार्ह वाटतात त्यावर संपादकांचीही नजर असेलच कारण ती मंडळी तुम्हाआम्हापेक्षा वेगळी नाहीत. आपण केवळ तशी सूचना करू शकतो, शेवटी कात्री त्यांच्या हातात आहे.

३. "असं जर झालं तर अनेक विचार, मतं मिपावर मांडलीच जाऊ शकणार नाहीत."
बरोबर आहे हा मुद्दा. पण मतमांडणीतही काही ताळतंत्र असणे अपेक्षित नाही का? उद्या श्री.मगदूम मशिदीतील त्यांच्या एखाद्या शिष्याने मिपावर "इस्लामला मानणारे पुण्यात भरपूर आहेत म्हणून दर शुक्रवारी शनिवारवाड्यावर भगव्याऐवजी हिरवा फडकविण्यात यावा काय?" असा विचार मांडला तर तोदेखील एक "वैचारिक अभिव्यक्ती" म्हणून चर्चेला घ्यायचा काय?

४. "ते मत चुकीचं आहे म्हणून खंडन करणं वेगळं आणि ते विधान नष्ट करण्याचं आवाहन करणं वेगळं. "
यावर माझे वैयक्तिक मत मी प्रतिसादात मांडले आहे. तरीही थोडक्यात सांगत आहे की, शक्य त्या योग्य आणि सौम्यरितीने मी 'त्या' मताचे खंडन केले आहे. विधान नष्ट करण्याचे आवाहन केलेले नाही.

५. "मुसलमानांचा नायनाट झाला पाहिजे या विधानाला नुकताच इथे अनेकांनी दुजोरा दिला. कोथळा काढण्याची विधानं आली आणि गेली."
यात मी नाही. माझ्या अत्यंत जवळच्या मित्रात तीन मुसलमान आहेत आणि ते हमीद दलवाई, हुसेन जमादार यांच्या पंथातील आहेत. माझ्या अनेक आवडत्या शिक्षकांपैकी एक मुस्लिम होते ज्यांचा "मराठी" हा विषय होता. त्यांच्या व त्यांच्या सहकार्‍यांसमवेत कुरआनवर वारंवार मी विचारांचे आदानप्रदान केले आहे. त्यामुळे वरील वाक्यात दिसणारी अतीटोकाची मते मी कधीही करू शकणार नाही.

६. "पण अल्ला सर्वश्रेष्ठ आहे व एकमेवाद्वितीय आहे या विधानावर इतकी राळ उडते."

मतांचे जे रूप वर प्रकट झाले आहे त्याला "राळ" म्हणणे अन्यायकारक आहे कारण "राळ" याला इंग्रजी प्रतिशब्द आहे "डिस्ग्रेस" अन ६० पेक्षा जास्त प्रतिक्रिया या "डिसग्रेसफुल" आहेत असे कृपया मानू नका. मी दोनतीन ठिकाणी लिहून श्री.मगदूम याना येथील लेखावरील चर्चेत भाग घ्यावा असे आवाहन केले आहे. पण तसे झालेले नाही.

शेवटी "धर्म" आणि "सचिन" या दोन्ही अभिमानाच्या गोष्टी असल्या तरी त्या एकाच तराजूत येत नाहीत. आज २०१० मध्ये 'सचिन' ने तुमच्या आमच्या हृदयात घर केले आहे. १९७५ साली तिथे "सुनील" होता, कुणी सांगावे २०२५ ला तिथे एक "सत्यजीत" येईल. पण धर्माचे स्थान एकमेव म्हणून अढळ आहे.

इन्द्रा

राजेश घासकडवी's picture

18 Aug 2010 - 5:41 pm | राजेश घासकडवी

सर्वप्रथम इंद्रराज, तुम्ही वैयक्तिक खुलासे देण्याची काहीच गरज नव्हती. माझा रोख तुमच्या प्रतिसादावर नव्हता. तुमचं म्हणणं नेहेमीच तुम्ही विचारपूर्वक मांडता.

एकंदरीत 'तथाकथित' या शब्दाला जोरदार आक्षेप दिसतोय. पण हा आता शब्दच्छल व्हायला लागला. माझा जर ठाम विश्वास असेल की माझ्या देवाचा संदेश हाच खरा संदेश आहे, माझा देव हाच खरा देव आहे, तद्वतच इतर लोकांची दिशाभूल झालेली आहे. तर तो विचार मांडायला काहीच हरकत नाही असं माझं मत आहे. विचार लादायला आक्षेप आहे. जिथे काहीच व्यक्तिनिरपेक्ष नाही, सर्वच विश्वासावर आधारित आहे, तिथे नक्की कुठची विधानं त्याज्य हे ठरवणं कठीण जातं. कुराणात अमुकतमुक लिहिलं आहे हे विधान त्याज्य असेल तर तुम्ही कुराण त्याज्य आहे असंच नाही का म्हणत?

हिरव्या झेंड्याचं उदाहरण थोडंसं टोकाचं असलं तरी विचारणाऱ्याला तो विचारल्याबद्दल शिक्षा करू नये इतकंच. त्याला सरळ नाही म्हणावं, त्याच्या अविचाराबद्दल हसावं, दुर्लक्षाने मारावं वगैरे ठीक आहे. शिवरायांनी मोठ्या मनाने हेच केलं असतं बहुधा.

यात मी नाही.

त्याबद्दल शंका नाही, पण इतर काही होतेच ना. माझा मुद्दा असा आहे की तथाकथित ने भावना जितक्या पटकन दुखल्या तितक्याच तीव्रतेने नायनाट व कोथळा त्याज्य सगळ्यांनीच म्हटले असते तर काहीच हरकत नव्हती.

राळ ऐवजी धुरळा हा शब्द बरोबर ठरला असता कदाचित. शब्द एकंदरीत जपूनच वापरावे लागतात.

अरे प्रिय मिपाकरांनो, कुणी एक उपटसुंभ एक काडी टाकुन जातो आणि मग आपण सगळे आपापल्या परीने त्यात तुप, तेल, घासलेट,डिझेल, पेट्रोल ओतत बसतो.
जर का धागा प्रवर्तक स्वतः या काथ्याकुटात भाग घेत आसेल वा निदान विचारलेल्या शंकांना उत्तर तरी (मग ती चुक वा बरोबर असो) देत असेल तर एक वेळ समजु शकतो.
सदर धाग्यातही शाहजहान मगदुमने एक काडी सारली आणि आपण सगळे बसलोय चर्वण करत.