माजी मालकांनी एकदा पक्वान्नांच्या निवडणूका घेतल्या होत्या. पण तेव्हाचे पर्याय अगदीच विस्कळीत होते. आज श्रावण सोमवारी आम्हाला गोडाधोडाची आठवण झाली आणि आठवण आली त्या निवडणूकांची.
पण आम्हाला जात्याच विस्कळीतपणा मान्य नाही. म्हणून आम्ही गोड पदार्थांचे वर्गीकरण केले. ते खालील प्रमाणे -
१) दुध अथवा दुग्धजन्य पदार्थापासून बनवलेले.
२) खोबर्यापासून बनवलेले - उदा. खोबर्याच्या वड्या, नारळीभात, मोदक इ.
३) बेसनापासून बनवलेले - मैसूर पाक, बेसनलाडू, सोनपापडी इ.
४) अन्य - रवालाडू, पेठा इ.
पहिल्या वर्गाचे दोन उपवर्गात विभाजन करता येईल -
१अ) दूध नासवून केलेले - उदा. रसगुल्ला
१ब) दूध न नासवता केलेले - उदा. गुलाबजाम
तर मंडळी, तुम्हाला कोणत्या वर्गातील पदार्थ जास्त आवडतात हे सांगा.
प्रतिक्रिया
17 Aug 2010 - 12:21 am | विलासराव
१ब) दूध न नासवता केलेले - उदा. गुलाबजाम
17 Aug 2010 - 12:35 am | पुष्करिणी
१ब म्हण्जे रसमलाइ,बासुंदी, दूधीहलवा, श्रीखंड वग्रै खूप आवडतात.
17 Aug 2010 - 7:03 am | सहज
जबरी! अगदी हेच! + खरवस
खरवस देखील या यादीत येईल ना?
17 Aug 2010 - 8:00 am | सुनील
खरवस नक्कीच येईल! खरवसावर आमचा जीव!
17 Aug 2010 - 12:38 am | चतुरंग
तुम्ही आम्हाला काहीही गोड द्या हो आम्ही हाणून दाखवतो! ;)
तरीही तुमच्या म्हणण्याला मान देऊन आम्ही लिस्ट देतो -
विभाग १ मधे - श्रीखंड (ह्याचाच उपप्रकार आम्रखंड) (हे मी शक्यतो घरीच चक्का बनवून केलेले पसंत करतो), बासुंदी (बंबईवाला हलवाई नगर आणि नरसोबावाडी कुरुंदवाड), कुंदा, पेढे (हे फक्त महेंद्र पेढेवाला नगर यांचेच), खव्याची पोळी, फक्त खव्याचेच गुलाबजाम (गिट्सच्या गोळ्यांना मी गुलाबजाम म्हणत नाही), मलई बर्फी (पुन्हा एकदा बंबईवाला)
विभाग २ - नारळाच्या वड्या, उकडीचे मोदक (फोडून आत भरपूर साजूक तूप भरलेले - अन्यथा समोर आणू नयेत ;)), नारळीपाकाचे लाडू,
विभाग ३ - बेसनलाडू (बेदाणा वरती दिसायला हवा नाहीतर मजा नाही), म्हैसूरपाक, मोतीचूर लाडू
विभाग ४ - अन्य मधे लै मोठी लिस्ट आहे हो पण वानगीदाखल काही - सत्यनारायणाचा शिरा (हा मी कितीही खाऊ शकायचो! गेले ते दिवस ;) ) पुरणपोळी, गुळाचीपोळी, सुधारस (केळ्याचे काप, वेलदोड्याची पूड आणि केशर मस्ट!), रवालाडू, बालूशाही, गरमागरम जिलेबी (ही बारीक नळीची असेल तर कुरकुरीत, थोडी जाड नळीची असेल तर पाकाने भरलेली आणि कडक हवी - मीटरवर मोजता येण्याजोगी जिलबी आम्ही खात नाही! ;)),
आम्ही केलेले गोडाचे गुणवर्णन इथे चाखा! ;)
(गोडघाशा)चतुरंग
17 Aug 2010 - 12:59 am | विलासराव
बंबईवाला हलवाई नगर यांची बासुंदी, गुलाबजाम, मलाई बर्फीचा भरपुर आस्वाद घेतला आहे कॉलेजला असताना.
रुचिराची जिलेबी तर मी कधीच विसरु शकणार नाही.
आनी हो....माणिक चौकातला वडाही. थोडे अवांतर होतेय पण नगरची आठवण झाली की हे आठवतेच.
सिध्दीविनायक मंदिरातली नारळबर्फी तर खासच.
17 Aug 2010 - 1:20 am | सुनील
वा वा वा!!! खरे खवैय्ये आहात. लगे हात तुमचा जुना लेखही वाचला. मस्त आहे.
बाकी पुरणपोळी आणि जिलेबी हे पदार्थ "अन्य" मध्ये नव्हे तर, बेसनाच्या पदार्थात मोडतात बरे!
17 Aug 2010 - 2:07 pm | निखिल देशपांडे
आता गोडा बद्दलचा लेख आणि आम्ही काही बोलणार नाही असे होउच शकत नाही.
वर रंगा काकांनी त्यांचा लेखाचा दुवा दिलाय त्याच लेखात आमचा प्रदिर्घ प्रतिसाद वाचाच.
17 Aug 2010 - 3:22 pm | नगरीनिरंजन
जुने दिवस आठवून लाळावलो.
सगळ्या यादीशी सहमत! गुलाबजाम बन्सीमहाराज चे फार छान असायचे. पानांच्या द्रोणात घेऊन गरमागरम चार-पाच हाणायचो!
17 Aug 2010 - 12:40 am | अर्धवट
अत्यंत अन्यायकारक धागा आहे हा.. असं कसं निवडणार ब्वॉ..
प्रत्येक वर्गातला एकेक पदार्थ निवडायचा असेक तर सांगा..
17 Aug 2010 - 1:28 am | सुनील
जरूर निवडा!!
17 Aug 2010 - 1:29 am | रेवती
सगळे गोड पदार्थ आवडतात.
त्यातल्यात्यात पेठा आणि बॉम्बे हलवा कि कायसे नाव असलेला पांढरा चौकोनी प्रकार कमी आवडतो.
गोडाचं काही खाल्लं की मनात अपराधी भाव आल्याशिवाय रहात नाहीत.
कुठं फेडायच्या या कॅलरीज? असं वाटत रहातं.;)
17 Aug 2010 - 6:59 am | कुक
मला गोड पेषा तिखट व आम्ब्ट खुप आवडते . गोड पदार्थ कमीच
17 Aug 2010 - 8:07 am | शिल्पा ब
मला वाटलं काही गोडाच्या पाकृ टाकल्यात कि काय ... असो,
नगरच्या बंबईवाल्याचे गुजा मस्तच...नाशिकच्या बुधाचे गुजा, बर्फी, जिलबी छानच, पांडेच्या बर्फ्यासुद्धा मस्त...
17 Aug 2010 - 10:10 am | स्वाती दिनेश
असा एकच पदार्थ निवडणे हा शुध्द अन्याय आहे, सबब ......
पुढे काय लिहिणार ते समजले असेलच,;)
स्वाती
17 Aug 2010 - 1:38 pm | सूड
वर दिलेल्या यादीतील सर्व, पण मैसुरपाक हा साजूक तुपातला नसेल तर काही मजा नाही बॉ !! आमच्या ऑफिसमधील एक मल्लु त्यांच्याकडचा मैसुरपाक आणत असे तो अगदी जीभेवर विरघळायचा. सध्या जिम ट्रेनरने ताकीद दिली आहे म्हणून नाहीतर फक्त गोड वाढा, त्याहून मागणं लई न्हाई :)
17 Aug 2010 - 1:46 pm | परिकथेतील राजकुमार
सुनील शेठ, हि चौकशी आहे का आमंत्रण ?
17 Aug 2010 - 2:00 pm | संजा
गोड पदार्थ ? आजिबात नाही.
से नो टु स्विट्स.
***साखरेचे खाणार त्याला देव नेणार ****
17 Aug 2010 - 3:34 pm | नितिन थत्ते
१ अ मधला एकही पदार्थ आवडत नाही (पनीरसह). (तरीसुद्धा कलकत्त्यात वर्ष काढलंय).
बाकी सगळे आवडतात.
हे गुलाब जाम यांच्यावर आमचा भारी जीव.
वजन कमी करण्याचे दुष्ट सल्ले मिळाल्यामुळे अलिकडे एवढे संपत नाहीत.
17 Aug 2010 - 6:09 pm | आशिष सुर्वे
खरवस अन् बेसनलाडू.. कधीही आणि कितीही द्या.. आमचे त्वांड सताड उघडे मिळेल!!
17 Aug 2010 - 7:42 pm | रामदास
पण आज गोडाधोडाची आठवण केल्यावर कुणीतरी
"या ,एकदा आमच्या इंदोरला,सराफ्यात जाऊ "अशी हाक मारली असा भास झाला.
17 Aug 2010 - 11:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
:-(
चव गेली तोंडाची!