खांडवी

शाल्मली's picture
शाल्मली in पाककृती
14 Aug 2010 - 2:52 pm

नमस्कार मंडळी,
आज येथे देत आहे एक खास कोकणी पदार्थ - खांडवी. आमच्याकडे हा पदार्थ नागपंचमीच्या दिवशी करतात.

DSCN6337" alt="" />

साहित्यः-
१ वाटी तांदुळाचा रवा (इडली रवा)
२ वाट्या दूध
दीड वाटी गूळ
अर्धी वाटी ओलं खोबरं
आवडीप्रमाणे काजू, बदाम, बेदाणे यांचे तुकडे
प्रत्येकी अर्धा चमचा, वेलची पावडर, जायफळ, किसलेलं आलं
चिमूटभर मीठ.

कृती:-
एका कढईत तूप घालून त्यावर तांदुळाचा रवा चांगला तांबूस होईपर्यंत भाजून घ्यावा. त्यात उकळते दूध घालून २ दणदणीत वाफा आणाव्यात. रवा चांगला शिजला पाहिजे, नसेल तर जरा दुधाचा हबका मारुन परत एक वाफ आणावी. आता त्यात गूळ मिसळून चांगले ढवळावे. त्यात काजू, बदाम, बेदाणे यांचे तुकडे तसेच वेलची पावडर, जायफळ, किसलेलं आलं मिसळावे. त्याचा शिर्‍यासारखा गोळा झाला की गॅस बंद करावा.
१ ताटाला तुपाचा हात लावून त्यावर तयार गोळा काढून घ्यावा आणि ताटभर सारख्या जाडीचा थापावा. त्यावर ओलं खोबरं पसरवून ते दाबून घ्यावे. आता आवडीप्रमाणे हव्या त्या आकाराच्या वड्या कापाव्यात. गार झाल्यावर वड्या काढून डब्यात ठेवाव्यात. ताज्या ताज्या असतानाच ताव मारावा. :)
हा पदार्थ नाजूक असल्याने फार टिकत नाही. एका दिवसातच संपवावा. वरील साहित्यात साधारण आकाराच्या २५ वड्या होतात.

--शाल्मली.

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

14 Aug 2010 - 2:57 pm | मदनबाण

लाळ लाळ लाळ लाळ लाळ............ :)

परिकथेतील राजकुमार's picture

14 Aug 2010 - 3:00 pm | परिकथेतील राजकुमार

ख ल्ल्ला स !!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Aug 2010 - 3:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कधी भेटायचं? ;-)

रश्मि दाते's picture

14 Aug 2010 - 4:17 pm | रश्मि दाते

मस्त दीसत आहेत त्या वड्या,आम्च्याकडे सुरळीच्या वड्याना खांडवी म्हणतात पण तो प्रकार जरा किचकट आहे ही सोपी दीसत आहे क्रुती

सुत्रधार's picture

14 Aug 2010 - 4:26 pm | सुत्रधार

भन्नाट आहे. सोपीपण....
फोटो पाहुन खल्लास... लगेचच प्रयत्न करायला हवा.

दिपक's picture

14 Aug 2010 - 4:27 pm | दिपक

भन्नाट पाककृती आहे :)
कुणी आयत करुन देणार असेल तर गिळायला मज्जाच मज्जा.

स्वाती दिनेश's picture

14 Aug 2010 - 5:23 pm | स्वाती दिनेश

फोटो मस्तच,
किती दिवसात नव्हे कित्येक महिन्यांत केलेली नाहीये.. आता करायला हवी लवकरच,:)
स्वाती

सहज's picture

14 Aug 2010 - 5:25 pm | सहज

मस्त! गेली काही वर्षे खाल्ले नव्हते.

धन्यु.

अगगग!
आले आले! पदार्थ तयार ठेव!
एकाच दिवसात काय एकाच बैठकित संपवून दाखवते.

खादाड's picture

14 Aug 2010 - 7:26 pm | खादाड

मस्त !!!