१५ ऑगस्ट हा प्रजासत्ताक दिन आहे ?

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in काथ्याकूट
13 Aug 2010 - 2:00 pm
गाभा: 

प्रतिक्रिया

राजेश घासकडवी's picture

13 Aug 2010 - 2:04 pm | राजेश घासकडवी

हॅ हॅ हॅ, हे मुंबईतले लोक म्हणजे! यांच्यासमोर हातच टेकले बुवा. आम्लेट खावा म्हणावं... आणि पाव तरी घ्या बरोबर

हा प्रजासत्ताक दिन मिपावर साजरा व्हायला हवाच... रोज बाय एनी नेम...

हेच म्हंतो, [जाहीर] साला वरील फोटुत रडाय सारख काय आहे साला? ([खाजगी] ह्या पर्‍याला हलकटाला बरे १०० प्रतिसाद खेचणारे फोटु मिळतात!)

बाकी सद्ध्याच्या भ्रष्ट देशात कुणीतरी झेंडा फडकवतो आहे हे विसरुन नुस्ता दिवस चुकला तर रडणार्‍यांचे प्रतिसाद पाहुन खेद वाटला ([खाजगी] पर्‍या लेका लक्षात ठेव, मी देतोय तितकेच प्रतिसाद पुढे माझ्या धाग्यावर मिळवुन द्यायचे आहेत तुला)

विनायक पाचलग's picture

13 Aug 2010 - 2:07 pm | विनायक पाचलग

तो प्रजासत्तक दिन नाही ..
पण यावर जास्त काही लिहिण्याआधी ही चेपु वर वाचलेली एक कॉमेंट इथे देतो ...
ती जास्त सुचक आणि बोलकी आहे असे वाटते

काही अपरिहार्य कारणामुळे यंदा प्रजासत्ताक दिन १५ ऑगस्ट ला घेण्याचे कॉंग्रेस ने ठरवलेले आहे , तरी सर्व भाविकानी तिर्थ प्रसादासाठी ९ -३० ला उपस्थित रहावे .. तसेच स्वातंत्र्य दिनही पुढे ढकलण्यात आला असुन मॅडम ना ज्या दिवशी सवड मिळेल त्या दिवशी ठेवण्यात येईल

मुळ प्रतिक्रिया - मिलिंद शिंत्रे
=)) =))
यांच्यावर एक राष्ट्रदोहाचा खटला भरा ...

llपुण्याचे पेशवेll's picture

13 Aug 2010 - 2:07 pm | llपुण्याचे पेशवेll

हा मुंबईचा विक्षीप्तपणा म्हणायचा का?

चलताय हो पेशवे.. बरेच जण रिक्षावाल्यांच्या/पुस्तक विक्रेत्याच्या आडमुठे स्वभावावरुन संपुर्ण पुण्याला नाव ठेवतात इथे तर चक्क मुंबईच्या खासदाराच(?) नाव बोर्डावर छापलय ;)

घाशीराम कोतवाल १.२'s picture

13 Aug 2010 - 5:04 pm | घाशीराम कोतवाल १.२

त्या पाटी वरचे एक महाशय मुंबईचे महापौर होते ऐके काळी नारायण राण्यान बरोबर ते कॉग्रेसवासी झालेत

हुप्प्या's picture

13 Aug 2010 - 4:39 pm | हुप्प्या

अस्सल मुंबईकराचे लक्षण म्हणजे कुणी मुंबईला एक शिवी घातली तर मुंबईकर आणखी दहा घालेल.
गर्दीला, उकाड्याला, असल्या पाट्यांना शिव्या दिल्याने त्याची अस्मिता दुखावत नाही. त्याचा जाज्ज्वल्य अभिमान सहसा उफाळून येत नाही. तो प्रकार पुण्यातच जास्त. असो.

काय यडपट लोक आहेत. येवढंही माहित नसावं?

पंगा's picture

13 Aug 2010 - 6:52 pm | पंगा

अस्सल मुंबईकराचे लक्षण म्हणजे कुणी मुंबईला एक शिवी घातली तर मुंबईकर आणखी दहा घालेल.

खाजगीमध्ये पुणेकरसुद्धा घालतो. (म्हणजे पुण्याला / पुणेरी मानसिकतेला. मुंबईला तर घालतोच, पण ते सोडा.) फार कशाला, अनेक पुणेकर जाहीरसुद्धा घालतात. (पुण्याला / पुणेरी मानसिकतेला शिव्या.) पण म्हणून बाहेरच्यांकडून काय म्हणून ऐकून घ्यायचे?

त्याचा (मुंबईकराचा) जाज्ज्वल्य अभिमान सहसा उफाळून येत नाही. तो प्रकार पुण्यातच जास्त. असो.

ठीक. एक प्रयोग करून पाहू.

फाळणीच्या सुमारास मोठ्या शहरांच्या वाटणीत कलकत्ता शहर हे पाकिस्तानला मिळावे म्हणून मुस्लिम लीगने खूप निकराचे प्रयत्न केले, असे वाचल्याचे आठवते. (किंबहुना एका वेळी कलकत्ता पाकिस्तानला आणि त्याऐवजी लाहोर भारताला मिळाले असते तरी तेही लीगला एक वेळ चालू शकले असते, असेही कुठेतरी कधीतरी वाचल्याचे आठवते. या क्षणी नेमका संदर्भ हाताशी नाही. पण नेमके याउलट झाले. पण ते एक असो.) याला कारण, कलकत्ता हे मोठे आणि महत्त्वाचे बंदर आणि औद्योगिक केंद्र असल्यामुळे पाकिस्तानकरिता ते आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे ठरते, वगैरे वगैरे.

खरे तर मुंबई हेही मोठे आणि महत्त्वपूर्ण बंदर आणि औद्योगिक केंद्र आहे. आणि योगायोगाने मुंबईतील मुस्लिम वस्ती बहुसंख्येच्या जवळपासही नसली तरी बर्‍यापैकी मोठी आहे. (कलकत्त्यात तरी मुसलमानांची बहुसंख्या कोठे होती? २३% म्हणजे बहुसंख्या नव्हे. पण तरीही कलकत्त्यावर लीगचा दावा होताच ना?) शिवाय पाकिस्तानचा मुख्य भाग जे पश्चिम पाकिस्तान राहिले असते, त्याला मुंबई बर्‍यापैकी जवळही आहे आणि म्हणून अधिकच फायदेशीर राहिले असते.

एवढे सगळे असून आणि मुख्य म्हणजे खुद्द मोहंमद अली जीनांचे अर्धे करियर मुंबईत गेले असूनसुद्धा पाकिस्तानसाठी मुंबईची मागणी करावी ही साधी गोष्ट लीगला सोडा, खुद्द जीनांना सुचली नाही, त्यांच्या डोक्यातसुद्धा हे आले नाही, हे लक्षणीय आहे. (की कदाचित अर्धी करियर मुंबईत घालवल्यामुळेच मुंबई जीनांना नकोशी झाली होती? अनायासे टळती आहे भारतात, तर टळू द्या!)

आता, एवढे सगळे मी म्हणू लागलो, आणि असल्या तर्काच्या आधारावर* 'पाकिस्तानलासुद्धा नको असलेले शहर' म्हणून मुंबईची संभावना जिथेतिथे करू लागलो (आणि माझ्यापाठोपाठ आणखी पंचवीस जण** करू लागले), तर मुंबईकरांचा जाज्ज्वल्य अभिमान जागृत होऊन माझा गळा घोटायला ते येणार नाहीत काय?

(* मुळात या तर्काला आधार कितपत आहे, हा प्रश्न विचारायचा नसतो. एखाद्याची संभावनाच करायची झाली, तर त्यासाठी लढवलेल्या तर्काला आधाराची फारशी गरज नसते. काहीतरी तर्क - बहुधा स्वतःच्या समाधानासाठी - केल्याशी कारण. कन्क्लूजन अगोदरच काढलेले असले, की मग त्यामागचे लॉजिक कोणी फारसे तपासत बसत नाही. मग ज्याची संभावना करायची तो पक्ष त्याबद्दल कितीही शंख करो. पुण्याच्या बाबतीतसुद्धा काहीसे असेच होत नाही काय?)

(** एक जण म्हणू लागला की त्याच्याच पार्टीतले पंचवीस जण म्हणू लागायला फारसा वेळ लागत नाही. कारण शिव्या घालण्याचे उद्दिष्ट महत्त्वाचे असते, त्यामागची कारणमीमांसा महत्त्वाची नसते. मग पंचवीस जणांना कारणमीमांसा सांगण्याचीही गरज राहत नाही. पंचवीस जणांचे उद्दिष्ट साध्य होत असेल तर कारणमीमांसा अगोदरच पटलेली असते, मग ती कितपत बरोबर आहे किंवा मुळात काय आहे हे माहीत नसले तरी.

शिवाय, 'An oft-repeated lie soon becomes the Gospel Truth' अशा धर्तीवरचे काहीतरी गोबेल्समहर्षी म्हणून गेलेलाच आहे.)

असुर's picture

13 Aug 2010 - 8:05 pm | असुर

+१
शब्दाशब्दाशी सहमत!

-- (त्या '२५' मधला एक) असुर

एक अवांतर प्रश्न : जे १९४७ साली दिलंय, ते परत घ्यायची वेळ आता तरी आली आहे काय?

-- (आसेतुहिमाचल अखंड हिंदुभुमीचा रहिवासी) असुर

सुहास..'s picture

13 Aug 2010 - 8:17 pm | सुहास..

अभिमान वगैरे ..................................................शिवाय, 'An oft-repeated lie soon becomes the Gospel Truth' अशा धर्तीवरचे काहीतरी गोबेल्समहर्षी म्हणून गेलेलाच आहे.)

ए क अ क्ष र क ळ ल अ स ल त र श प थ !!!

जरा उकलुन सांगाल काय ?

हुप्प्या's picture

14 Aug 2010 - 5:01 am | हुप्प्या

हो हो. मुंबई हे पाकिस्तानलाच काय पण अफगाणिस्तान, इराण, इराक, नेपाळ, चीन, बांग्लादेश, म्यान्मार आणि श्रीलंका यांनाही नकोसे असणारे शहर आहे. अगदी खरे हो. काही अर्थ नाही या शहरात!

खरडपंच's picture

15 Aug 2010 - 1:56 pm | खरडपंच

दुसर्यांना नावे ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पुण्याला वाचवा माहिती प्रमाणे तुमच्या कडे पण लोंढे च्या लोंढे कोसळतायत. (ममता बनर्जी) पुण्याचे मुंबई व्हायला वेळ लागणार नाही. मुंबईच्या जवळ असणारे हे शहर पण बिहारीबाबू घाण करतील. नाहीतर हूप हूप करीत नावाप्रमाणे नुसत्या माकडउड्या मारत बसाल.

मेघवेडा's picture

14 Aug 2010 - 10:25 pm | मेघवेडा

या विनोदी प्रयोगातून काय सिद्ध करू पाहताय तेवढं कळलं तर बरं होईल.

विकास's picture

13 Aug 2010 - 2:12 pm | विकास

आठवणीप्रमाणे, पंतप्रधान झाल्यावर पहील्याच वर्षात राजीव गांधींनी हा गोंधळ घातला होता.

बाकी माझे लक्ष एक राजकीय पक्ष जाहीर निवेदन करत झेंडावंदन करतो आहे याकडेच जास्त गेले आणि आनंद झाला! किमान पहीली पायरी गाठली आहे. ;)

कोणा एका राजकिय पुढार्‍याच्या चुकीसाठी संपूर्ण मुंबईकरांचा उद्धार सुरु आहे हे मात्र योग्य नाही... नसेल कळले त्या राज्किय पुढार्‍याला त्यात आम्हा मुंबईकरांचा काय दोष?

बिहारमधील एक अशिक्षीत माणुस आहे तो असं समजुन चुक दुर्लक्षीत करावी....

मृत्युन्जय's picture

13 Aug 2010 - 3:30 pm | मृत्युन्जय

पाटी लावणारी दोघेही नम्र व्यक्तिमत्वे मराठी आहेत. कशाल उगाच गरीब बिहार्‍यांना त्रास देता? लालुकडे तक्रार करेन हा.

सहज's picture

13 Aug 2010 - 3:59 pm | सहज

मुंबईकर - पुणेकर - बिहारी - भैय्या - मराठी :-(

१५ ऑगस्टला दोन दिवस आहेत इकडे अजुनही असाच भेदभाव करत रहाणार?

१९८२ मधे मनमोहन देसाईने साद घातली होती सगळ्यांना अमिताभ- महंमद रफीकरवी

archana2285's picture

13 Aug 2010 - 4:19 pm | archana2285

+१०००००००००००००००००००००
सहमत.

(जातीभेदाच्या विरोधात) अर्चना

पंगा's picture

13 Aug 2010 - 5:29 pm | पंगा

कोणा एका राजकिय पुढार्‍याच्या चुकीसाठी संपूर्ण मुंबईकरांचा उद्धार सुरु आहे हे मात्र योग्य नाही... नसेल कळले त्या राज्किय पुढार्‍याला त्यात आम्हा मुंबईकरांचा काय दोष?

(१) भारतात लोकशाही आहे.
(२) लोकशाहीत खासदार किंवा अन्य राजकीय प्रतिनिधी हे लोकनियुक्त असतात.
(३) लोकनियुक्त प्रतिनिधी आपल्याला निवडून देणार्‍या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीचे प्रतिनिधित्व करतात. (मग अशा व्यक्तीने संबंधित प्रतिनिधीस मत दिले असो वा नसो, अथवा मतदान केले असो वा नसो, अथवा मतदानास पात्रही असो वा नसो.)
(४) नुकत्याच हाती आलेल्या माहितीप्रमाणे, मुंबई हे शहर अजूनही भारतातच आहे.

पण तरीही आपले म्हणणे बरोबर आहे. समस्त मुंबईकरांचा उद्धार करणे हे या परिस्थितीत चूकच आहे. संबंधित खासदार ज्या मतदारसंघातून निवडून आले त्या मतदारसंघाचा (वरील (३)ला अनुसरून) उद्धार करावा फार तर.

नगरीनिरंजन's picture

13 Aug 2010 - 2:14 pm | नगरीनिरंजन

१५ ऑगस्ट हा भारताचा प्रजासत्ताक दिन आहे असं तिथं कुठंही लिहीलेलं नाही. त्यांनी फक्त एवढंच लिहिलय की प्रजासत्ताक दिनानिमित्त १५ ऑगस्टला ध्वजारोहणाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. त्यांना फक्त सात महिने उशीर झाला आहे असं वाटतंय. पुढच्या २६ जानेवारीला ते स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणाचा राष्ट्रीय कार्यक्रम नक्की करणार असावेत.
(भलत्या वेळेला भलतं करण्याची सवय मुंबैकराना आहे हे कदाचित यावरुन पुन्हा सिद्ध होईल.)

(पोलिटीकली करेक्ट) नगरीनिरंजन

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Aug 2010 - 2:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

२६ जानेवारी १९५० च्या नंतरच्या प्रत्येक २६ जानेवारीला 'प्रजासत्ताक दिन' असतो का प्रजासत्ताक दिनाची अ‍ॅनिव्हर्सरी (मराठी शब्द?) असते?

हाच बोर्ड पुण्यात लागला असता तर काय प्रतिक्रिया आल्या असत्या?

नगरीनिरंजन's picture

13 Aug 2010 - 2:27 pm | नगरीनिरंजन

हेच स्वातंत्र्यदिनाबद्दलही म्हणता येईल. चांगला मुद्दा.
हाच बोर्ड पुण्यात लागला असता तर मुंबैकरांच्या जागी पुणेकर लिहायचं.

>>'प्रजासत्ताक दिन' असतो का प्रजासत्ताक दिनाची अ‍ॅनिव्हर्सरी (मराठी शब्द?) असते?
हाहाहा! आपल्या वाढदिवसाला आपण 'जन्मदिन' समजता की जन्मदिनाची अ‍ॅनिव्हर्सरी ? ;)

मृत्युन्जय's picture

13 Aug 2010 - 4:38 pm | मृत्युन्जय

"वाढ"दिवस समजतो. त्यामुळे "वाढ"दिवसाची अ‍ॅनिव्हर्सरी साजरी करत नाही

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Aug 2010 - 5:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

माझ्या वाढदिवसाचा संबंध कळला नाही. मी पोलिटीकली आणि भाषिकदृष्ट्या काय योग्य असा प्रश्न विचारला आहे. उत्तर मला माहित नाही.

नगरीनिरंजन's picture

13 Aug 2010 - 2:15 pm | नगरीनिरंजन

१५ ऑगस्ट हा भारताचा प्रजासत्ताक दिन आहे असं तिथं कुठंही लिहीलेलं नाही. त्यांनी फक्त एवढंच लिहिलय की प्रजासत्ताक दिनानिमित्त १५ ऑगस्टला ध्वजारोहणाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. त्यांना फक्त सात महिने उशीर झाला आहे असं वाटतंय. पुढच्या २६ जानेवारीला ते स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणाचा राष्ट्रीय कार्यक्रम नक्की करणार असावेत.
(भलत्या वेळेला भलतं करण्याची सवय मुंबैकराना आहे हे कदाचित यावरुन पुन्हा सिद्ध होईल.)

(पोलिटीकली करेक्ट) नगरीनिरंजन

पंगा's picture

13 Aug 2010 - 5:42 pm | पंगा

त्यांनी फक्त एवढंच लिहिलय की प्रजासत्ताक दिनानिमित्त १५ ऑगस्टला ध्वजारोहणाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. त्यांना फक्त सात महिने उशीर झाला आहे असं वाटतंय.

असे कसे? मग 'मुंबईकराच्या हाताला घड्याळ बांधलेले नसून घड्याळाच्या काट्यांना मुंबईकर बांधलेले असतात' अशा आशयाचे वाक्य भाईकाकांनी लिहिलेच कसे? (संदर्भः 'काही अप, काही डाऊन', संग्रहः 'हसवणूक'. वाक्य शब्दशः मुळाबरहुकुम नाही, मात्र आशय तोच आहे. गरजूंनी मूळ वाक्य पडताळून खात्री करून घ्यावी.) भाईकाकांना काय कळतबिळत नव्हते की काय?

इतकी दिरंगाई मुंबईकरांकडून अपेक्षित नव्हती. हे पुण्यात झाले असते तर गोष्ट एक वेळ समजण्यासारखी होती - शेवटी पुणेकरच ते, दिरंगाई ही चालायचीच. वेळच्या वेळी कोठले काम कधी पुणेकराने केलेय? दुपारची वामकुक्षी पूर्ण करायची सोडून प्रजासत्ताक दिन वेळच्या वेळी साजरा करण्यासाठी उठेल तो पुणेकर कसला? वगैरे वगैरे. पण मुंबईत?

मुंबईचे नाव बदलून आख्ख्या बृहन्मुंबईस पुण्याचे उपनगर म्हणून घोषित करावे काय?

राजेश घासकडवी's picture

13 Aug 2010 - 8:49 pm | राजेश घासकडवी

जोरदार प्रयत्नांबद्दल पंगाभाऊंना नक्कीच काहीतरी मेडल वगैरे द्यायला पायजे या प्रजासत्ताक दिनी! काही ठेवलं नाही - तीन चार छोटे छोटे प्रतिसाद पण देऊन बघितले (लांबलचक नेहेमीप्रमाणे कोणीच वाचले नसतील म्हणून) पण फुसकेच निघाले हो बार! कोणी मुंबईकर खवळून वगैरे उठले नाही. आहेच आमची मुंबई रद्दड, नकोच होती पाकिस्तानला. तुम्ही म्हणताय का देऊन टाका म्हणून? अहो, पाकिस्तानला जाऊ देत, गुजरातला सुद्धा दिली नाहीत...

मुंबईचे नाव बदलून आख्ख्या बृहन्मुंबईस पुण्याचे उपनगर म्हणून घोषित करावे काय?

जरूर करा की. तसं केल्याने काय पुणेकर मुंबईत राहायला येत नाहीत ना? मग मुंबईकरांचं काय बिघडतंय?

बरं शिवाय मग ही पाटी आणखीन एक पुणेरी पाटी म्हणून खपेल, ते वेगळंच.

पंगा's picture

13 Aug 2010 - 10:28 pm | पंगा

आहेच आमची मुंबई रद्दड, नकोच होती पाकिस्तानला. तुम्ही म्हणताय का देऊन टाका म्हणून?

अहो मी देऊन टाका म्हणून काय होणारेय? घेणार्‍याने घेतली पाहिजे ना! इथे घेतेय कोण? (शिवाय घेतलीच चुकून, तर मुंबईकरांसकट घेणारेय काय? किंवा मुंबईकरांसह घेतली, तरी मुंबईकर जाणारेत काय? म्हणजे पुन्हा मुंबईकरांना स्वतःच्या दारी झेलणे आले. पिंपरी-चिंचवडला 'यूएसए' वसवण्यापेक्षा मुंबई भारतात राहिलेली परवडली.)

अहो, पाकिस्तानला जाऊ देत, गुजरातला सुद्धा दिली नाहीत...

गुजरातची हरकत नसेल तर माझे व्यक्तिशः काहीच म्हणणे नाही*. पण मग तुमचेच 'सुंदर-मुंबई-मराठी-मुंबई-महापौर-मुंबई**'वाले पेटतात.

* उलट मुंबईविना विभक्त महाराष्ट्र - किंवा सध्याच्या महाराष्ट्रात अनेक छोटीछोटी प्रादेशिक राज्ये - झाली तर उत्तमच. मग मुंबईकरांनी कोणत्या गटात सामील व्हायचे ते आपले आपण ठरवावे. आमच्यात यावे असा आग्रह नाही. उलट नकोच.

** अशी पाटी मुंबईत पाहिलेली आहे.

जरूर करा की. तसं केल्याने काय पुणेकर मुंबईत राहायला येत नाहीत ना? मग मुंबईकरांचं काय बिघडतंय?

अहो ठेवलेय काय त्या मुंबईत? पूर्वी आयटीवाल्यांना परदेशी जायच्या संधीसाठी केवळ स्टेपिंग स्टोन म्हणून मुंबईची गरज असायची. कारण बाहेर पाठवणार्‍या सगळ्या मोठमोठ्या कंपन्या मुंबईतच असत म्हणून. मग त्यासाठी नाइलाजास्तव आपापल्या संधीची वाट पाहत मुंबईत ताटकळत कसेबसे राहत - नाहीतर बाहेरून येणार्‍या आणि मुंबईत स्वतःचे घर नसणार्‍या माणसासाठी नव्याने स्थायिक होण्याच्या दृष्टीने मुंबई अत्यंत निरुपयोगी (पक्षी: यूसलेस)! (आमच्या एका अशाच आपल्या संधीची वाट पाहत मुंबईत ताटकळत राहिलेल्या तत्कालीन - आणि बाय द वे हैदराबादी - मित्राकडून ऐकलेले, 'मुंबई ही एखाद्या वेश्येसारखी. तिच्याबरोबर झोपावे, हवे तितके झोपावे. पण तिच्याशी लग्न कधी करू नये.' हे मत चिंत्य आहे. ही गोष्ट साधारणतः १९८०च्या दशकाच्या उत्तरार्धातली. तेव्हा हैदराबादला आयटी इंडस्ट्री फोफावलेली नव्हती.) पण आता असे मुंबईवर अवलंबून राहावे लागण्याइतकी परिस्थिती राहिली आहे असे वाटत नाही. मुंबईला अनेक पर्याय - काही पुण्यातसुद्धा! - उपलब्ध आहेत असे वाटते.

आयटीखेरीज अन्य क्षेत्रांत, मुंबईत राहावे लागण्याइतकी मुंबईवर अवलंबून राहण्यासारखी परिस्थिती पुण्यात तेव्हासुद्धा सर्रास होती असे वाटत नाही.

तेव्हा, पुण्यात स्वत:चे राहते घर आणि बर्‍यापैकी नोकरीधंदा असलेला मनुष्य सध्याच्या काळात उठून मुंबईत राहायला कशाला झक मारायला जाईल?

उलट मुंबईकर मात्र पुढेमागे पुण्याला येऊन स्थायिक होण्याचा विचार मोठ्या प्रमाणावर करताना दिसतात. परांजप्यांच्या पुण्यातल्या अनेक स्कीम्स केवळ मुंबईकरांच्या जिवावर खपल्या, असे कळते. असो.

बरं शिवाय मग ही पाटी आणखीन एक पुणेरी पाटी म्हणून खपेल, ते वेगळंच.

छ्या:! ती क्वालिटी नाही. मुंबईकरांच्या पाट्या म्हणजे फार फार तर 'सुंदर मुंबई, मराठी मुंबई, महापौर मुंबई' इतपतच. याहून अधिक विनोदी पाट्या काढणे ही मुंबईकरांच्या बस किंवा लोकलची बात नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Aug 2010 - 10:35 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अरे काय विषय काय, काय चाललंय काय! बास आता ... कंटाळा आला!!
अजून कोणी "मराठी बाणा"वाले इथे येऊन तुम्हाला दोघांना ओरडत का नाहीयेत??

राजेश घासकडवी's picture

13 Aug 2010 - 10:37 pm | राजेश घासकडवी

मुंबईकरांना उचकवायला गेलं की स्वतःच उचकायला होतं हे अठरा इंची काळ्या-पांढऱ्याच्या विविध छटांनी नटलेला प्रतिसाद देऊन सिद्ध केलंत, यातच सगळं पोचलं. धन्यवाद.

।।मुंबादेवी प्रसन्न।।

पंगा's picture

13 Aug 2010 - 10:39 pm | पंगा

आणि मुंबईकरांवरून???

(ही पण काय उचकण्यासारखी गोष्ट आहे? छ्या:!)

मदनबाण's picture

13 Aug 2010 - 2:28 pm | मदनबाण

राजकिय लोक असाच घोळ घालत राहणार आणि सामान्य जनता पुणे-मुंबई असा खेळ खेळत बसणार !!!

धमाल मुलगा's picture

13 Aug 2010 - 4:04 pm | धमाल मुलगा

नशीब समजा, स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन ह्यापैकीच एक निवडलंय..
नाहीतर, 'ड्रायडेनिमित्त..' अशी मुक्ताफळंही येऊ शकली असती की. ;)

बाकी, "हे आकाशातल्या प्रभु, माझ्या मेंढपाळा, तुझ्या ह्या वेड्या कोकरांना क्षमा कर. का, की ते काय करत आहेत हे त्यांनाच कळत नाही....आमेन!" एव्हढे बोलुन मी माझे दोन शब्द संपवतो.
गॉड ब्लेस यु.
-फादर धमाल दि ब्रेटो.

मी-सौरभ's picture

14 Aug 2010 - 11:49 pm | मी-सौरभ

भावड्या मुद्द्याचं बोल्ला तू :)

तुझ दु:ख मी समजू शकतो..

सुनील's picture

13 Aug 2010 - 4:08 pm | सुनील

स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन यां नेमका काय फरक आहे?

धमाल मुलगा's picture

13 Aug 2010 - 4:18 pm | धमाल मुलगा

विषयच संपला. :)

प्यारे१'s picture

13 Aug 2010 - 4:27 pm | प्यारे१

क आणि ह आणि र......!!!

(मिपावर प्रतिक्रिया न व्यक्त करणे हे स्वतःपुरते असलेले धोरण बाजूला ठेवावे लागले.)

सुहास..'s picture

13 Aug 2010 - 4:39 pm | सुहास..

स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन यां नेमका काय फरक आहे?
>>

कोणीतरी चपला द्या रे मला !! (माझ्या चपलीची अंगठ्याची बक्कल तुटली आहे ) निघालो मी आंतरजाल सोडुन !!

आम्हाघरीधन's picture

13 Aug 2010 - 5:46 pm | आम्हाघरीधन

मेल्लो................... बापरे असे भारतीय पण आहेत............==)

इंटरनेटस्नेही's picture

15 Aug 2010 - 2:16 pm | इंटरनेटस्नेही

@ सुनील,

खालील लिंक वरील माहिती पहा:

स्वातंत्र्य दिन: http://en.wikipedia.org/wiki/Independence_Day_(India)
प्रजासत्ताक दिन: http://en.wikipedia.org/wiki/Republic_Day_(India)

(एखाद्या सदस्याने आपली शंका विचारली तर त्याचा अपमान होऊ नये असे मला वाटते.)

आता पुणेरी पाट्या जशा प्रसिद्ध आहेत, तसे मुंबैचे 'बोर्ड' प्रसिद्ध व्हायला हरकत नाही .... ;)

पंगा's picture

13 Aug 2010 - 5:14 pm | पंगा

...म्हणून स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन दोन्ही हलवून २५ डिसेंबरला ठेवावेत काय?

(पाकिस्तान उलटा लावते म्हणून आपल्याच झेंड्याचे डिज्जायन बदलण्याच्या धर्तीवर?)

पुणेरी पाट्यांप्रमाणे असे बोर्ड गल्लोगल्ली दिसत नाहीत यार. पुणेरी पाट्या आणि मुंबईतील बोर्डात हा फरक आहे. असाही पुणेरी पाट्यांना मी नावे ठेवत नाही........त्या पाट्या कितीही स्ट्रेंज वाटल्या तरी ........कारण अशा पाट्या लावतात म्हणजे काहितरी लॉजिक असणार हे नक्की. असो.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

13 Aug 2010 - 5:30 pm | घाशीराम कोतवाल १.२

प्र.का.टा.आ

साधा गांधी जयंती आणि प्रजासत्ताक दीन हा फरक न कळणार्‍या कॉंग्रेस चा निषेध असो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Aug 2010 - 5:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अर्र, तुम्ही प्रजासत्ताकच दीन बनवलंत हो! शुद्धलेखनाचा बाऊ नको म्हणताना अर्थाचा अनर्थ? का ही दीन कोटी (?) अपेक्षित होती??

हा नियम अचानक आठवला. म्हणल वापरून बघावा .. चुकलच तर लोक पकडून देतील ;)

तिमा's picture

13 Aug 2010 - 5:37 pm | तिमा

स्वातंत्र्यदिन = ब्रिटिशांच्या कडक कायदा व सुव्यवस्थेपासून नेत्यांची सुटका

आणि प्रजासत्ताकदिन = अजासत्ताक दिन कारण या प्रजेला हल्लीच्या नेत्यांनी, अज = बकराच केले आहे.

आम्हाघरीधन's picture

13 Aug 2010 - 5:42 pm | आम्हाघरीधन

प्रियाली's picture

13 Aug 2010 - 5:49 pm | प्रियाली

दोन्ही उद्बोधक! ;)

सुनील's picture

13 Aug 2010 - 7:18 pm | सुनील

माझ्या अत्यंत साध्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर व्यासंगी मिपाकरांकडून मिळाले नाही. असो.

दुसरा साधा प्रश्न.

सार्वजनिक सुट्टयांचा सुकाळ असलेल्या आपल्या देशात, जर ह्या सुट्ट्या कमी करण्याचा प्रस्ताव आला आणि स्वातंत्र्यदिन किंवा प्रजासत्ताक दिन यांपैकी कोणतीही एकच सुट्टी ठेवण्याचा निर्णय झाला, तर कोणती सुट्टी ठेवावी?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Aug 2010 - 7:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दुवा पाहा आणि दुव्यावरील ’स्वातंत्र दिवस’ यावरही क्लीक करावे......!

स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन याच्यात काय फरक आहे, याबाबतीत मी अनेकांचा गोंधळ पाहिलेला आहे. मला आपल्या प्रश्नाचं बिल्कूल नवल नाही.

विकिपीडियावर गेलात तर तिकडे काही माहितीही भरा.....! :)

-दिलीप बिरुटे
[मराठी विकि सदस्य]

सुनील's picture

13 Aug 2010 - 7:39 pm | सुनील

धन्यवाद!

ह्याला म्हणतात प्रा. विद्यार्थ्यांची तहान ज्ञानामृत देऊन पूर्ण करणारे प्रा.

एक लघुशंका.

स्वांतत्रदिन साजरा न करणे हा भारतात गुन्हा आहे काय?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Aug 2010 - 7:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शासकीय कार्यालये, शाळा,महाविद्यालयात , स्वातंत्र्य दिनानिमित्त ’ध्वजारोहण’ करणे प्रशासकीय आदेशानुसार आवश्यक आहे. [खरे म्हणजे प्रशासकीय आदेशाची गरज पडू नये] न केल्यास आणि कोणी तक्रार केल्यास गुन्हा दाखल होतो. अधिक अधिकृत माहिती विचारुन देतो. नागरिकांना स्वातंत्र्य दिन साजरा करणे न करणेबाबत कोणतेही आवश्यक बंधन नाही.

-दिलीप बिरुटे

सुनील's picture

13 Aug 2010 - 8:05 pm | सुनील

धन्यवाद!

सरकारी आस्थापनांचे सोडा. पण गैरसरकारी संस्था किंवा संघटना यांनी स्वातंत्र्यदिन साजरा न केल्यास त्यांच्यावर तशी जबरदस्ती करता येते काय? त्यांनी साजरा न केल्यास संबंधित संस्था/संघटना ह्या देशद्रोही ठरतात काय?

सुनील's picture

13 Aug 2010 - 9:57 pm | सुनील

उत्तराच्या अपेक्षेतेत...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Aug 2010 - 10:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>पण गैरसरकारी संस्था किंवा संघटना यांनी स्वातंत्र्यदिन साजरा न केल्यास त्यांच्यावर तशी जबरदस्ती करता येते काय ?

नाही.

>>>त्यांनी साजरा न केल्यास संबंधित संस्था/संघटना ह्या देशद्रोही ठरतात काय ?

नाही.

-दिलीप बिरुटे

सुनील's picture

13 Aug 2010 - 10:23 pm | सुनील

पुन्हा धन्यवाद!

श्रावण मोडक's picture

15 Aug 2010 - 12:11 am | श्रावण मोडक

चला, म्हणजे 'नागपूर'ची सुटका होतेय तर...
काय सुनीलराव, याचसाठी केला होता का अट्टाहास? ;)

मृत्युन्जय's picture

13 Aug 2010 - 7:42 pm | मृत्युन्जय

जी शनिवारी किंवा रविवारी येणार नाही ती द्यावी.

प्राजक्ताचि फुले's picture

14 Aug 2010 - 12:43 pm | प्राजक्ताचि फुले

काय भिकारपणा चालला आहे ; लोकाना राष्ट्रीय सण फक्त सुट्टीसाठी हवे आहेत....!

मृत्युन्जय's picture

14 Aug 2010 - 8:15 pm | मृत्युन्जय

काय भिकारपणा आहे हा? सुट्टीसाठी हवी असे कोणी लिहिले आहे?

मृत्युन्जय's picture

13 Aug 2010 - 7:26 pm | मृत्युन्जय

इतकी दिरंगाई मुंबईकरांकडून अपेक्षित नव्हती.

असे गृहीत धरा की ५ महिने लवकर साजरा केला.

हे पुण्यात झाले असते तर गोष्ट एक वेळ समजण्यासारखी होती - शेवटी पुणेकरच ते, दिरंगाई ही चालायचीच. वेळच्या वेळी कोठले काम कधी पुणेकराने केलेय?दुपारची वामकुक्षी पूर्ण करायची सोडून प्रजासत्ताक दिन वेळच्या वेळी साजरा करण्यासाठी उठेल तो पुणेकर कसला? वगैरे वगैरे. पण मुंबईत?

आमच्या पुण्यात झेंडावंदन सकाळी सकाळी होते. त्यानंतर जाउन आम्ही जेवण करुन वामकुक्षी घेतो.

मुंबईचे नाव बदलून आख्ख्या बृहन्मुंबईस पुण्याचे उपनगर म्हणून घोषित करावे काय?

कृपया पुण्याचा इतका वाईट अपमान करु नये.

अविनाशकुलकर्णी's picture

13 Aug 2010 - 10:11 pm | अविनाशकुलकर्णी

अरे यार क्यु शोर मचा रहे हो? बडे बडे शहरोमे ऎसी छोटी छोटी बाते होति रहति है..

तिकडे निरुपम काय करतोय हे पहायचं सोडुण मुंबइकर आणि पुणेकर या वरुण भाडताय तुम्ही लोक...

म्हणुन कोणी मराठी माणुस झेंडा वंदन न करता तो निरुपम करतोय...

चालायचच....

पंगा's picture

13 Aug 2010 - 10:42 pm | पंगा

म्हणुन कोणी मराठी माणुस झेंडा वंदन न करता तो निरुपम करतोय...

आज १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी यांपैकी नेमके काय आहे, झेंडावंदन करायला?

१५ ऑगस्टचे १५ ऑगस्टला बघू. दोन दिवस आधीपासून कशाला?

आता एक राहिलेला अनुत्तरीत प्रश्न.

स्वातंत्रदिन आणि प्रजासत्ताकदिन यात अधिक महत्त्वाचा दिवस कोणता? थोडक्यात, जर दोहांपैकी कोणत्याही फक्त एकाच दिवशी सुटी देण्याचा निर्णय झाला, तर कोणत्या दिवशी मिळावी?

पंगा's picture

13 Aug 2010 - 11:21 pm | पंगा

दोन प्रकारे पाहता येईल.

स्वातंत्र्यदिनी भारत ब्रिटिशांपासून स्वतंत्र झाला, म्हणजे फक्त अधिकृत सत्तांतर झाले (तसे 'आपले' सरकार थोड्या आधीपासून होतेच). ब्रिटिश सार्वभौमत्व तरीही राहिलेच, पण नाममात्र राहिले इतकेच. घटना बदलली नाही. १९३५चा गवर्मेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट हाच घटनेसमान सर्व कारभारासाठी आधारभूत राहिला. मात्र प्रजासत्ताकदिनी नवी घटना अमलात येऊन इंग्लंडच्या राजाचे सार्वभौमत्व पूर्णपणे आणि कायमचे हटले, नवीन घटनेने नागरिकाचे मूलभूत अधिकार आणि एकंदरीत व्यवस्थेतले स्थान निश्चित झाले (नागरिक हा केवळ 'प्रजाजन' न राहता खर्‍या अर्थाने 'नागरिक' झाला) आणि भारत (आणि पर्यायाने भारतीय मनुष्य) 'खर्‍या अर्थाने' पूर्णपणे स्वतंत्र आणि सार्वभौम झाला. या अर्थाने प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व अधिक. हा झाला एक दृष्टिकोन.

मात्र, प्रजासत्ताक घडण्याकरिता आणि घटना निर्माण होण्याअगोदर स्वातंत्र्य हा एक अतिशय महत्त्वाचा पहिला टप्पा होता, स्वातंत्र्य / अधिकृत सत्तांतर ही एक मोठी सुरुवात होती, एक महत्त्वाचा मैलाचा दगड होता, आणि म्हणून स्वातंत्र्यदिन अधिक महत्त्वाचा, अशाही दृष्टिकोनातून याकडे बघता येईल. (मात्र, ब्रिटिश अधिपत्याखाली असतानाच घटना निश्चित करून स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन हे वेगवेगळे न ठेवणे तत्त्वतः अशक्य होतेच का, याबद्दल साशंक आहे.)

थोडक्यात, दोहोंपैकी एकाचीच निवड करायची झाल्यास निश्चितपणे सांगणे कठीण आहे, पण माझा वैयक्तिक कल काहीसा प्रजासत्ताक दिनाकडे आहे.

सुनील's picture

13 Aug 2010 - 11:45 pm | सुनील

१५ ऑगस्ट १९४७ ते २६ जानेवारी १९५० ह्या सुमारे अडीच वर्षांच्या काळात भारताचा कारभार हा ब्रिटिश पार्लमेन्टने पास केलेल्या १९३५ च्या गवर्मेन्ट ऑफ इन्डिया अ‍ॅक्ट द्वारे सुरू होता. वॉईसरॉय हे पद जाऊन पुन्हा (सी राजगोपालाचारी ह्यांच्या रुपाने) गवर्नर जनरल हे (तात्पुरते) पद आले होते. हेच काय पण आपले (आणि पाकिस्तानचेही) सेनाधिकारीदेखिल ब्रिटिश होते!

(मात्र, ब्रिटिश अधिपत्याखाली असतानाच घटना निश्चित करून स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन हे वेगवेगळे न ठेवणे तत्त्वतः अशक्य होतेच का, याबद्दल साशंक आहे.)

ह्याबाबत अन्य देशांचा काय अनुभव आहे?

अमेरिका स्वतंत्र झाली ४ जुलै १७७६ रोजी आणि अमेरिकेने घटना स्वीकारली १७ सप्टेंबर १७८७ रोजी. तब्बल ११ वर्षांनी! तोवर अमेरिकेचा कारभार कसा चालला होता?

स्वांतंत्र्य मिळालेल्या कोणत्या देशाने, स्वतंत्र होण्यापूर्वीच पुढील व्यवस्था कशी असेल याची घटना बनवली होती? बहुधा कोणीच नाही. तरीही, सहसा कुठलाच देश असे दोन स्वतंत्र दिवस साजरे करीत नाही. असे का?

बेसनलाडू's picture

14 Aug 2010 - 2:15 am | बेसनलाडू

अमेरिका स्वतंत्र झाली ४ जुलै १७७६ रोजी आणि अमेरिकेने घटना स्वीकारली १७ सप्टेंबर १७८७ रोजी. तब्बल ११ वर्षांनी! तोवर अमेरिकेचा कारभार कसा चालला होता?
हा कारभार आर्टिकल्स ऑफ कन्फेडरेशनच्या आधारे चालला होता, असे वाचल्याचे आठवते.
(दुवादार)बेसनलाडू

पंगा's picture

14 Aug 2010 - 3:24 am | पंगा

अमेरिका स्वतंत्र झाली ४ जुलै १७७६ रोजी

किंचित सुधारणा. (माझ्या त्रोटक माहितीनुसार) ४ जुलै १७७६ला अमेरिकेने आपल्या स्वातंत्र्याची एकतर्फी घोषणा केली. या दिवशी सत्तेचे अधिकृत हस्तांतर वगैरे झाले नाही. तसेच अमेरिकेचे इंग्लंडविरुद्धचे स्वातंत्र्ययुद्ध या दिवशी सुरूही झाले नाही (ते आधीच सुरू झालेले होते) किंवा या दिवशी संपलेही नाही (ते बर्‍याच नंतर संपले) किंवा ब्रिटनने अमेरिकेवरचा आपला दावा सोडला नाही (तो बर्‍याच नंतर सोडला).

मात्र, 'आम्ही आजपासून आमच्या वतीने ब्रिटनच्या सम्राटापासून संबंध तोडले' या निर्धाराच्या घोषणेचा दिवस म्हणून या दिवसाचे भावनिक महत्त्व प्रचंड आहेच.

(याहून अधिक तपशिलांत शिरण्याकरिता आवश्यक असलेला या बाबतीतला अभ्यास माझ्याजवळ नाही, तेव्हा क्षमस्व.)

भारताच्या स्वातंत्र्यदिनाची गोष्ट थोडी वेगळी आहे. या दिवशी दोन्ही बाजूंच्या संमतीने फक्त सत्तेच्या हस्तांतराची घोषणा झाली. (याचेही भावनिक महत्त्व नाकारायचे नाहीच, पण...) सार्वभौमत्व बदलले नाही. इंग्लंडच्या राजानेही आपल्या सार्वभौमत्वाचा (नाममात्र) दावा सोडला नाही, की स्वतंत्र भारतानेही इंग्लंडच्या राजाचे हे (नाममात्र) सार्वभौमत्व मानायचे एकतर्फी नाकारले नाही. २६ जानेवारी १९५०पर्यंत. मला वाटते अमेरिकन स्वातंत्र्याच्या आणि भारतीय स्वातंत्र्याच्या परिस्थितींमधील हा फरक महत्त्वाचा आहे. (अर्थात महत्त्वाबद्दल मतांतरे असू शकतील.)

कदाचित अमेरिकन स्वातंत्र्याची तुलना बांग्लादेशी स्वातंत्र्याशी करता येईल, असे वाटते.

स्वांतंत्र्य मिळालेल्या कोणत्या देशाने, स्वतंत्र होण्यापूर्वीच पुढील व्यवस्था कशी असेल याची घटना बनवली होती?

कल्पना नाही. शोधावे लागेल. मात्र, यात जेथे स्वातंत्र्यदिनी सत्तेचे आणि सार्वभौमत्वाचे अधिकृत हस्तांतरण झाले अशाच उदाहरणांचा विचार करावा लागेल असे वाटते.

(हाँगकाँगची हस्तांतरणानंतरची घटना अगोदरच निश्चित झाली होती किंवा कसे, ते शोधावे लागेल. बहुधा झाली होती. अर्थात, हाँगकाँगच्या 'स्वातंत्र्या'चा प्रश्न येत नाही, परंतु सत्तेच्या हस्तांतरणाचा येतो.)

अधिक विचाराअंती, घटना बनणे हाही कदाचित तितकासा महत्त्वाचा घटक नसावा, पण सार्वभौमत्वाचे हस्तांतरण (अधिकृत किंवा एकतर्फी) हा असावा, असे वाटते. (४ जुलै १७७६ला अमेरिकन दृष्टिकोनातून ब्रिटनचे अमेरिकेवरील सार्वभौमत्व (अमेरिकेने धुडकावून लावल्याने) संपले. मग भले ब्रिटनला तसे वाटो अथवा ना वाटो. २६ मार्च (?) १९७१ला बांग्लादेशी दृष्टिकोनातून पाकिस्तानचे बांग्लादेशवरील सार्वभौमत्व (बांग्लादेशने धुडकावून लावल्याने) संपुष्टात आले. मग पाकिस्तानला तसे वाटो वा ना वाटो. भारतीय आणि ब्रिटिश दोन्ही दृष्टिकोनांतून ब्रिटनचे भारतावरील उरलेसुरले नाममात्र सार्वभौमत्व २६ जानेवारी १९५०ला संपुष्टात आले. मध्यंतरी भारताने ते धुडकावले नाही.)

मग १५ ऑगस्ट १९४७चे नेमके महत्त्व काय? या दिवशी ब्रिटिश पार्लमेंटचा भारताच्या व्यवहारांत ढवळाढवळ करण्याचा अधिकार संपुष्टात आला किंवा कसे? कल्पना नाही, पण या दिशेने तपास केल्यास रोचक ठरण्याची शक्यता आहे असे वाटते. (आणि कदाचित असे काही असल्यास या दोन्ही दिवसांच्या आपापल्या महत्त्वाचे रहस्य बहुधा उलगडावे.)

अन्य देशांचा काय अनुभव आहे?

कल्पना नाही. तपासावे लागेल.

वर हाँगकाँगबद्दल बोललोच.

सिंगापूरवरचे अधिपत्य तीनदा बदलले. एकदा ब्रिटिशांपासून स्वतंत्र झाल्यावर, एकदा मलेशियामध्ये सामील होताना आणि एकदा मलेशियापासून वेगळे झाल्यावर. पैकी प्रत्येक वेळी घटना अगोदर तयार होती का, कल्पना नाही. तपासावे लागेल. (पण निदान शेवटच्या बाबतीत तरी घटना - किंवा घटनादुरुस्ती - अगोदरच तयार असावी अशी शंका यायला वाव आहे असे वाटते. तपशील तपासावे लागतील.)

ऑस्ट्रेलिया, कॅनडासारखे देश सार्वभौम कधीही झाले नाहीत. येथे नेमकी काय परिस्थिती आहे ते पहावे लागेल. माझ्या (विकीवरून मिळालेल्या) अर्धवट माहितीप्रमाणे, ऑस्ट्रेलियाची ब्रिटिश राजाच्या अधिपत्याखालील स्वायत्त प्रदेश या नात्याने राज्यघटना निश्चित करणारा ब्रिटिश पार्लमेंटने पास केलेला कायदा ज्या दिवसापासून प्रत्यक्षात अमलात आला (१ जानेवारी १९०१), तो दिवस ऑस्ट्रेलियाच्या स्वातंत्र्यदिनासमान मानला जातो. (याचाच अर्थ, ऑस्ट्रेलियाच्या स्वातंत्र्यदिनी घटना नुसती तयारच नव्हती, तर ती त्या दिवसापासून अमलात आली.) मात्र, त्यानंतरही ब्रिटिश पार्लमेंटला ऑस्ट्रेलियामध्ये कायदे करण्याचे मर्यादित अधिकार दीर्घकाळपर्यंत राहिले, आणि शेवटी ते १९८६च्या एका कायद्यान्वये संपुष्टात आले, असे समजते.

(कॅनडाची स्वातंत्र्य आणि घटना यांबाबतची नेमकी परिस्थिती माहीत नाही.)

सुनील's picture

14 Aug 2010 - 8:33 am | सुनील

धन्यवाद पंगासाहेब!

थोडक्यात नोशनल स्वातंत्र्य आणि प्रत्यक्ष सार्वभौमत्वाचे हस्तांतरण ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जगातील बहुतेक सर्वच नवस्वतंत्र देश हे यापैकी कोणतातरी एकच दिवस "स्वातंत्रदिवस" म्हणून साजरा करतात, हे मात्र खरे. मग आपल्यालाच दोन वेगळे दिवस का, हा प्रश्न राहतोच!

पंगा's picture

14 Aug 2010 - 11:59 pm | पंगा

कदाचित असे काही असू शकेल काय?

जिथे नोशनल स्वातंत्र्य अगोदरच सार्वभौम असल्याच्या थाटात हिसकावून घेऊन (नोशनल किंवा खर्‍या) सत्तेचे आणि सार्वभौमत्वाचे 'हस्तांतरण' झाले, आणि सत्तेचे किंवा सार्वभौमत्वाचे 'अधिकृत हस्तांतरण' जिथे झालेच नाही, तिथे (उदा. अमेरिका, बांग्लादेश) नोशनल स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व.

जिथे सत्तेचे अधिकृत हस्तांतरण झाले, पण (नोशनल) सार्वभौमत्वाचे हस्तांतरण झाले नाही, तिथे (उदा. ऑस्ट्रेलिया, कॅनडा) या हस्तांतरणदिनाचे महत्त्व.

भारताच्या बाबतीत नोशनल स्वातंत्र्याचे आणि सत्तेचे हस्तांतरण आणि सार्वभौमत्वाचे हस्तांतरण हे वेगवेगळ्या दिवशी झाले. म्हणून भारताच्या दृष्टीने दोन्ही दिवसांचे महत्त्व.

नोशनल स्वातंत्र्याचे हस्तांतरण आणि सार्वभौमत्वाचे हस्तांतरण यांचे बाबतीत भारताची आणि पाकिस्तानची स्थिती साधारण सारखी असल्याने, पाकिस्तानमध्ये अशा दोन वेगवेगळ्या दिवसांना महत्त्व आहे किंवा नाही, हे तपासून पाहणे उद्बोधक ठरावे. (अर्थात पाकिस्तानमध्ये दोन्ही दिवसांचे महत्त्व असो वा नसो, त्याने भारताच्या धोरणांमध्ये काहीच फरक पडण्याचे कारण नाही, हे ओघानेच आले.)

सुनील's picture

15 Aug 2010 - 2:11 am | सुनील

माहितीबाबत धन्यवाद!

पाकिस्तानमध्ये अशा दोन वेगवेगळ्या दिवसांना महत्त्व आहे किंवा नाही

बहुधा नसावे.

भारताने २६ जानेवारी १९५० रोजी लिखित घटनाधारीत राज्यव्यवस्था सुरू केली. पुढे ह्या घटनेत अनेक दुरुस्त्या झाल्या तरी, घटनेचा मूळ साचा काही बदलला नाही. त्यामुळे २६ जानेवारीचे महत्त्व अबाधित राहते.

याउलट पाकिस्तानात मूळात घटनाच तीन वेळा लिहिली गेली (१९५६, १९६२ आणि १९७३). त्याखेरीज, घटनेलाच गुंडाळून लश्कराने सता बळकावण्याचे प्रकारही अनेक झाले. त्यामुळे तिथे ह्या दिवसांचे फारसे महत्त्व नाही/नसावे.

तसाही पाकिस्तानात स्वातंत्र्यदिन १४ ऑगस्ट रोजी साजरा होतो कारण पाकिस्तानी घड्याळ आपल्या अर्धा तास मागे आहे. खेरीज, काही पाकिस्तान्यांच्या मते हा त्यांचा स्वांतंत्र्यदिन नसून निर्माणदिन आहे. अर्थात त्याने आपल्याला काहीच फरक पडण्याचे कारण नाही, हे खरे!

मिसळभोक्ता's picture

14 Aug 2010 - 12:35 am | मिसळभोक्ता

सर्व मुंबई आणि पुणेकरांना व्हॅलेण्टाईन डेच्या शुभेच्छा.

सुनील's picture

14 Aug 2010 - 12:47 am | सुनील

अवो पावनं, वॅलेन्टाईन दिन गेल्याच आठवड्यात झाला की! पुढच्या वर्षीच्या शुभेच्छा अ‍ॅडवान्समधे देताय का?

मुंबईच्या लोकांच्या हातालाच नाही तर नशिबालाच घड्याळ बांधलेले असते ... इति - पु.लं

त्यांना अजिबात वेळ नसतो. ज्या वेळी ज्या गोष्टीची सवड असते ती गोष्ट त्या वेळी ते करतात...

आता १५ ऑगस्ट ला त्यांनी प्रजासत्ताक दिन साजरा केला तर बिघडलं कुठे ? २६ जाने. ला स्वातंत्र्य दिन साजरा करतील.

काही (पुणेकर) लोकांना उगीचच टीका करायची सवय असते ...

हा जो फोटो अंतर्जालात फिरतोय त्यामुळे रेडिओ मिरची चा फायदा झाला ...सकाळीच ऎकले ...मैं संजय निरुपम साभिको स्वतंत्र दिवस कि बधाई देता हुं....
च्यायला असे बोर्ड आणि बेनर लिहिणाऱ्या आणि छापणाऱ्या बोर्डे आणि बेनर्जी चा सूळ सुळात झालाय ..अगदी वीट आणलाय यांनी

सदर विषयावर आलेल्या प्रतिक्रिया आणि त्या प्रतिक्रियांवरच्या विक्षिप्त प्रतिक्रिया वाचून प्रथमतः तर एक गोष्ट स्पष्ट झाली की जाज्वल्य भारतीय अभिमानावरून सुरु झालेल्या थ्रेड वर वादी-प्रतिवादींच्या (मुंबईकर-पुणेकर, किंवा वाइसे वर्सा) जाज्वल्य प्रांतवादानेच पकड धरली. चालायचच, भारतीय म्हटलं की असेच प्रकार व्हायचे (याचा भारतीय म्हणून सार्थ अभिमानही आहे आणि असली सिक मानसिकता बदलता न येण्याबद्दल खंतही).

मूळात एक प्रश्न उपस्थित रहातो की, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ६३ वर्षांनतरही स्वतंत्र नागरीकाची किती कर्तव्ये आपण पार पाडतो? किंवा, ६० वर्षांच्या या प्रजासत्ताकात जेवढी आपापली (हपापलेली) आयुष्यं गेली त्यात किती वेळा आपण 'स्पिरीट ऑफ डेमॉक्रसी' आचरणात आणलीये? काही आठवतय का? नाही? बरं घटनेप्रमाणे काही अधिकार व जबाबदार्‍या आहेत आपल्यावर याची काही माहिती? काय म्हणालात, ’हो हो माहितीये, उगाच शहाणपणा नको शिकवूस’? तसं का असेना, घटनेने असं बोलायचा अधिकार दिलाच आहे तुम्हाला. जमलं तर वाचा थोडं पुढचं...

वागण्याचे स्वातंत्र्य मिळाल्यावर माणूस जबाबदारीच्या पारतंत्र्यात कायमचा ढकलला जातो. आपण तर जमेल त्या मार्गाने आपल्यावर आलेल्या जबाबदार्‍या टाळतो. आज प्रत्येकजण आपापली वैयक्तिक आयुष्ये सजवायच्या मागे लागलेला आहे. मग तो एखाद्या मल्टीनॅशनलचा चेअरमन असो, भारताचा पंतप्रधान (आणि त्यांचे ’रिस्पेक्टिव’ आणि ’रिस्पेक्टेड’ हायकमांड) असो किंवा विमा पॉलिस्या विकणारा टेलिकॉलर. वाढत्या भ्रष्टाचाराबद्दल हळहळणारे आम्ही आजही ’मामा’ने पकडल्यावर ’चिरीमिरीत’ त्याने सोडावं म्हणून त्याच्यासमोर लाचार विनवण्या करतो. एखादं सरकारी काम करताना एक छदामही लाच न देण्याच्या वल्गना करणारे आम्ही, काम होतच नाहीये म्हटल्यावर सरतेशेवटी ती तडजोड करतोच हो. आम्हाला पेशन्स वगैरे नाहीये आणि एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करायचा कंटाळाही आहे जाम. आता हेच बघाना की एखादं काम पैसे न देता नाही होत म्हटल्यावर त्याच्यासाठी थांबणार कोण? बरं असही नाहीये की कोणी एखादाच हे करतोय. पैसे घेणारे अगदी न शिकलेल्या चपरासी, मंत्र्यांपासून ते शिकलेल्या ’आयएस’ ऑफिसर्स पर्यंत तर देणारे एकजात सगळेच. चांगले सुशिक्षित लोकही ’त्यापेक्षा द्या पैसे आणि व्हा मोकळे’ असल्या खाक्याचे. खाजगी कॉलेजातून स्वत:च्या पैशाने किंवा सरकारी कॉलेजातून (आयआयटी धरून) सबसिडाइस्ड फीवर इंजिनीयरींग करणारे आम्ही आपल्या कोअर फिल्डमधे न रहाता एखादा सॉफ्टवेअरचा कोर्स करून आयटीत मिरवतो. त्यातूनही एखादा राहिलाच जर कोअर सब्जेक्टमधे तर रिसर्च करायला परदेशात (काही अतिसन्माननिय अपवाद वगळून). का? कारण जास्त पैसे मिळतात ना हो आम्हाला तिकडे. वर, "इकडे इंडियामधे (बाहेरची वारी घडली की भारत नाही म्हणायच बरं का) रिक्वायर्ड इन्फ्रास्ट्रक्चरच नाहीये. तिकडे (सहसा अमेरिकेत) किती डेव्हलपमेंट आहे यु नो..." हे बोलायला आम्ही मोकळे. अरे पण भावड्याहो आन तायड्याहो, इकडे राहून एखाद्या कामासाठी लागणारं पोषक वातावरण लगेच थोडीच बनतं, तसं असतं तर कशाला त्या स्वातंत्र्यसैनिकांनी या स्वातंत्र्याचा अट्टहास धरला असता?

आपण प्रश्न का नाही विचारत हो? गटारं साफ नाही झाली, रस्त्यावरचे खड्डे नाही बुजले, एखाद्या इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट्ला ठराविक वेळेपेक्षा जास्त वेळ लागला तर आपण सरळ पालिकेत (किंवा जबाबदार विभागात) जाऊन त्याबाबतची कारणं का नाही जाणून घेत? (प्रश्न पत्रकार विचारतातच हो. नाही, ते केवळ एखाद्या प्रश्नाला वाचा फोडतात आणि ते बघून किंवा वाचून आपण फक्त घरातल्या घरात घसे फोडून ओरडतो किंवा हतबलतेचे उसासे टाकतो.) खरं म्हणजे या व अनेक सरकारी कामांबद्दल जाणून घेणे हा आपला ’अधिकार’ आहे. आपण नाही प्रश्न विचारत म्हटल्यावर आपल्यातलेच जे पुढारी बनतात, ते ही असेच असणार ना. म्हणून तर भारताला दहशतवादावर सबूरीचा सल्ला देण्यार्‍या अमेरिकेने जेव्हा इराक आणि अफगाणिस्तानवर हल्ला चढवला, पाकिस्तानला अगणित हत्यारे, पैसे पुरवले, तेव्हा आपल्या नेत्यांनीही नाही विचारला प्रश्न बुशला आणि ओबामाला किंवा युएनला. सद्दाम दादाला कोणत्याही ’दृश्य’ पुराव्याशिवाय झटपट फाशी देऊन मोकळे झाले पण कसाबच्या केसच्या डाकुमेंटाची भेंडोळी आपण का दाखवतो त्यांना? कारण, ते सारखं सारखं काही बाही विचारत रहातात हो आपल्याला.

एखादा समाज, राष्ट्र हे लोकांमूळेच बनतं. त्यामूळे प्रत्येक नागरिकाने आपल्या स्वातंत्र्याचा आणि प्रजासत्ताकाचा उपभोग जबाबदार्‍यांसकट घेतला तर भारत जाइलच पुढे (आताही चाललाच आहे, गती धिमी आहे एवढाच काय तो फरक) पण त्या दिवशी असल्या वादाला (जो वाद या थ्रेडचा प्रणेता आहे) अर्थ प्राप्त होईल. तोपर्यंत असे झगडण्यापेक्षा, आपल्या स्वार्थाचा त्याग करून बाबा आमटे, प्रकाश-मंदा आमटे, अभय-राणी बंग यांचासारख्याच अनेक अपरिचीत व अप्रकाशित लोकांनी जे देशोपयोगी काम चालवलेलं आहे, त्याला सलाम करूया.

(अवांतर: १५ ऑगस्टसारखा हक्काचा सुट्टीचा दिवस रविवारी आल्या कारणाने जे जे बंधू आणि भगिनी व्यथित झाले आहेत, त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. त्याचबरोबर, स्वातंत्र्यदिवस किंवा प्रजासत्ताक दिवस जर विकेण्डला आल्यास आदल्या दिवशी ती सुट्टी मिळावी (अमेरिकेतल्या बांधवांनी आपले मत नोंदवावे, तिकडे असतं असलं काही असं ऐकून आहे) असा कायदा करण्यासंदर्भात मनुष्यबळ मंत्रालयाकडे आग्रहाची मागणी करत आहोत.)
(अतिअवांतर: वेळ मिळाल्यास, नारायण मुर्तींचे ’अ बेटर इंडिया, अ बेटर वर्ल्ड’ या पुस्तकातेल ’व्हॉट कॅन वि लर्न फ्रॉम द वेस्ट’ हे भाषण जरूर वाचावे.)
(खुलासा: या प्रतिक्रियेत जवळपास सगळ्याच ठिकाणी आम्ही, आमचे वगैरे लिहीलेलं आहे. हे माझे स्वत:बद्दलचे आदरार्थी बहुवचन आहे असे समजू नये.)
(विनंती: तुम्हालापण आजूबाजूची विदारक परिस्थिती समजत असूनही काही न करता येण्याची मळमळ होत असेल तर इथे जरूर काढा, आम्ही साफ करू.)
इथपर्यंत वाचत आलात, त्याबद्दल धन्यवाद!

जय हिंद, जय महाराष्ट्र!!!

भारी समर्थ

इंटरनेटस्नेही's picture

15 Aug 2010 - 3:51 am | इंटरनेटस्नेही

झालेला प्रकार अत्यंत खेदजनक आहे. आपल्या सर्वांचे लाडके परिकथेतील राजकुमार यांनी सदर बाब आपल्या सर्वांच्या निदर्शनास आणुन दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

पुणे आणि पुणेकरांवर हसणारे, तोंडसुख घेणारे लोक मुंबईवर वेळ आल्यावर मात्र मेरा भारत महान, भेदभाव नको, भांडणे नको इ. बोधामृत पाजताना दिसत आहेत!

मेघवेडा's picture

15 Aug 2010 - 2:34 pm | मेघवेडा

अरे वा! परासेठ! काय मस्त धागा! आवल्डा बॉ आपल्याला.. निखळ करमणूकीची ग्यारंटी आणि तुमच्या सर्कशीत असले पंडित विदुषक असल्यावर तर शंभरी सहज! ;)

बाकी गागाभट्ट साहेब, तुमच्या कंपणीत एखादी व्हेकन्सी असल्यास कळवा. नोकरी लावून दिलात तर बरं होईल. मग मीही असले लांबलचक प्रतिसाद लिहित जाईन आणि मिपावर फेमस होईन!

=)) =))